Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जागो ग्राहक जागो....

म
मोदक
Tue, 12/09/2014 - 09:38
🗣 107 प्रतिसाद
गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली.. आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने... या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव.. ***************************************************************** लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक. स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच. दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही. वेळ: दुपारी १:०० मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता. बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले. कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो.. साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही. मी : कारण कळेल का..? असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये. मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे. असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही. मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा. असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही. मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा. असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार. (आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो) आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला.. अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात... असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही.. आता दोघांचेही फ्युज गेले.. मी : ओ भाषा सुधारा.. सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश देत नाही म्हणून. असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा. मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि यावर अ‍ॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला. तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली. आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले. नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली. बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली. आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात. ***************************************************************** ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला.. टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मोदक सर बोलताय का..? मी: हो. टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात) मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!! मी: (तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला.. आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली. त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव. मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला. Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party. Hello, This is मोदक - My customer ID is १२३४५६७८९. Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank. I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers. Therefore I would like to know, Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..? If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party" I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND. Please feel free to revert in case any information required from my side. Regards, मोदक. नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते. मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत. ***************************************************************** या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. *****************************************************************

प्रतिक्रिया द्या
69296 वाचन

💬 प्रतिसाद (107)
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 14:48 नवीन
प्रतिसाद प्रश्नांच्याच क्रमाने- १. पगार खाते म्हणजे फॅमिली डॉ. ही कल्पना चूक आहे. पगार खाते ही संकल्पनाच खाजगी बँका घेऊन आल्या आहेत. ते एक स्पेसिफिक गरजांसाठीचे स्पेसिफिक प्रॉडक्ट आहे. सगळ्या गरजांसाठी बेसिक सेव्हिंग अकाउंट हे फॅमिली डॉ. चे काम करू शकेल. २. रोख पैसे भरता येणार नाहीत असे मी कुठे म्हणालो आहे ते दाखवा मग पुढे बोलू. ३. KYC खाली बँक काय प्रोफाइल करते ते या लिंक वर बघा. नियमात बसत असावे, कारण नियम बनवणार्‍या संस्थेचीच लिंक आहे ही- http://rbi.org.in/scripts/BS_ViewMasCirculardetails.aspx?id=7361
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा गुरुवार, 12/11/2014 - 17:25 नवीन
नोटा मोजायची यंत्रे असतात पण ती अगदी अपुरी असतात. समजा एका शाखेत ६ टेलर्स/कॅशियर्स आहेत, तर यंत्रे दोनच असतात. अशा वेळी ग्राहकाने समजा थोड्याशाच ५००/१००० च्या नोटा आणल्या तर कॅशियर चेक करतो. सर्वसाधारणपणे डोळ्यांना आणि हाताला फेक नोट कळते. पण शंका आली तर खात्री करून घेण्यासाठी अनेकदा त्याला जागेवरून उठून दुसरीकडे जावे लागते. समजा ५००/१००० चे बंडल असेल तर लेबलवर कस्टमरचे नाव्/खाते नंबर लिहून फक्त १०० नोटा असल्याची खात्री करून ड्रॉवरमधे टाकले जाते आणि मग काउंटरची वेळ संपल्यावर नोटा चेक केल्या जातात. कस्टमर शाखेचा रेग्युलर कस्टमर असेल तर बाबा तुझ्या बंडलात फेक नोट होती एवढ्या फोनवर कटकट न करता पैसे आणून देतो आणि फेक नोट परत नेतो. मात्र हेच बंडल दुसर्‍या शाखेच्या कस्टमरने किंवा तिसर्‍याच माणसाने आणले असेल तर त्या माणसाला संध्याकाळी फोन करून बोलावणे शक्य नसते. म्हणजे तो समोर असतानाच नोटा चेक कराव्या लागतात. एका नोटेला वीस-पंचवीस सेकंद लागतात असं समजलं तरी १०० नोटा मशीनमधे चेक करायला निदान ३५-४० मिनिटे लागतील. एवढा वेळ रांगेत असलेले इतर लोक गप्प बसणे शक्य नाही. फेक नोट बँकेत जमा करून घेतली पाहिजे हे खरे असले तरी ती कोणत्या ग्राहकाकडून आली आहे हे समजलेच पाहिजे. प्रत्यक्षात काय होते की, ते न कळल्यास ती नोट इतर सर्व नोटांमधे मिक्स होऊन मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाल्यावर स्टेट बँक किंवा रिझर्व्ह बँकेत जाते तेव्हा तिथे पकडली जातेच. आणि मग ते फक्त बँकेचे नाव तारीख पाहून त्या बँकेला कळवतात. मग एकतर ते पैसे बँकेच्या स्टाफला स्वतः भरावे लागतात किंवा मग स्टेट बँक्/रिझर्व्ह बँकेच्या जादा हुशार लोकांनी पोलीस कंप्लेंट दिल्यास पोलीस चौकीवर जाऊन उत्तरे द्यावी लागतात. अशा वेळी पोलीस बँकेचे स्टाफच फेक नोटा सर्क्युलेट करत आहेत अशा प्रकारे चौकशी करतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 15:37 नवीन
पगार खाते हे टेलर्ड प्रॉडक्ट आहे. त्यात costing करताना पगार हा सरळ खात्यावर जमा होणार असे गृहित असते. कॅश डीपॉझिट घेणे हा त्या खात्यासाठी बँकेला करावा लागणारा वाढीव खर्च होइल. एका मर्यादेवर अशी सुविधा देता येत नसावी.
बर्याच तरुणांसाठी पहिले खाते हे पगाराचे असते आणि त्याला घर किंव इतर कोणत्याही कारणासाठी मोठा चेक द्यायचा असेल तर आपल्या खात्यात पैसे भरणे आवश्यक आहे. नेमके अशा वेळेस बँकेने खोडा घातला तर काय. मी स्वतः लष्करात असताना विशाखापटणम ला असताना मला अशी गरज पडली होती. तेंव्हा माझे हॉंगकॉंग बँकेत खाते होते. हे खाते माझ्या सौच्या आणि वडिलांच्या नावावर होते तेंव्हा मी तेथे रोख पैसे भरले आणि दुसर्या दिवशी माझ्या वडिलांनी त्या पैशाचा धनादेश मुंबईत दिला. तेंव्हा पगाराच्या खात्यात रोख पैसे भरू न देणे हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा अत्यंत चुकीचा पवित्रा आहे. मि या परिस्थितीत त्या बँकेविरुद्ध अगदी वरपर्यंत तक्रार केली असती. आणि आपले पगाराचे खाते सरळ दुसर्या बँकेत हलविले असते. रोख पैसे भरता येणार नाहीत असा कोणता नियम आहे हे आपण सांगितलेले नाही. आणि बँकेचे प्रोफाईल मध्ये पगाराचे खाते असलेला माणूस LOW RISK गटात मोडतो. असे असताना त्याला पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हा शुद्ध आडमुठेपणा आहे.
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 12/11/2014 - 16:31 नवीन
याला म्हणतात मिसक्वोटिंग! आपण जे वर डकवले आहे त्याच्या आधीचा रायडर की ही माहिती नक्की केलेली नाही हा आपण वाचलाच नाही का? वरचे सगळे हे कारण मिमांसा देण्यासाठी लिहिले होते की पगार खाते वेगळे असते आणि का वेगळे असते. मुळात वर आपण डकवलेलं वाक्यच अशा अर्थी नाही की पगार खात्यात रोख रक्कम घेऊ शकत नाहीत. त्या वाक्यांचा अर्थ हा की एका मर्यादेपर्यंत रोख रक्कम घेऊ शकत असावेत. त्या मर्यादेवर जर रक्कम भरायची तर परिस्थिती काय असेल ते मला सांगता येत नाही. त्याच्या नंतरच्या प्रतिसादात मी नक्की केलेली माहिती दिली होती की सेवा शुल्क भरून आपण रोख रक्कम भरू शकता. आणि तरीही आपण माझा आधीचा प्रतिसाद- तोही अर्धवट- डकवून मला पुन्हा खिजवायचा प्रयत्न करत आहात की मी अजुनही नियम दाखवलेला नाही म्हणून? त्याच्या लगेच आधी मी या प्रश्नात कसा मार्ग काढता येइल तेही सांगितले होते.सर्विस चार्जेस चे सर्क्युलर मागवा किंवा वेबसाईट वर मिळते ते बघा. मगाशीच मी एका बॅकेच्या साइटवर बघितले की रोख रक्कम भरायचे चार्जेस किती. आता साइटवर चार्जेस सकट लिहिलेली सेवा बॅक नाकारेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्यारे१ गुरुवार, 12/11/2014 - 15:52 नवीन
मी होम ब्रँचला पैसे भरुन त्याचं बिल्डरला डाऊनपेमेंट करुन नंतर माझं होम लोन अप्रूव्ह होऊन रहायला जाऊन तीन वर्षं झाली. जौ द्या. आता नाही घेत पैसे तर नाही घेत ना! ;)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/11/2014 - 18:49 नवीन
दहा हजार रुपये पगार असणार्या पगाराच्या खात्याला लावणारे शुल्क ( चार्जेस ) खालील दुव्यात पाहावेत . स्वतःच्या खात्यात ५०,०००/- रुपये दर दिवशी दुसर्या शाखेत भरता येतात. मुळ शाखेत कितीही पैसे महिन्यात १५ वेळा भरा काहीही शुल्क नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घ्यावे. दहा हजार रुपये महिना हा जास्त पगार नाही.सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात. http://www.idbi.com/pdf/soc/Star-SalaryAccount.pdf असो मला जास्त वाद घालायचा नाही. मी काही वाणिज्य क्षेत्रातील माणूस नाही परंतु बँकेतील कर्मचारी मनमानी फार करतात. जर आवाज लावून धरलात तर आपले काम होते.
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 12/12/2014 - 13:58 नवीन
दहा हजार रुपये पगार असणार्या पगाराच्या खात्याला लावणारे शुल्क ( चार्जेस ) खालील दुव्यात पाहावेत . स्वतःच्या खात्यात ५०,०००/- रुपये दर दिवशी दुसर्या शाखेत भरता येतात. मुळ शाखेत कितीही पैसे महिन्यात १५ वेळा भरा काहीही शुल्क नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घ्यावे. दहा हजार रुपये महिना हा जास्त पगार नाही.सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात.
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे. मात्र वर 'सरकारी चपराशाला सुद्धा मिळतात' याचा संदर्भ नाही कळला.
असो मला जास्त वाद घालायचा नाही.
वादाचा मुद्दा नाहीच्चे. कुणीतरी एक दोन प्रश्न विचारले होते, त्याला मी माझ्या माहितीप्रमाणे उत्तरे दिली होती. आपल्याला कसलातरी राग आला आणि आपण मला मी जे जे लिहिले त्याचा विपर्यास करून उलट आव्हाने वगैरे दिलीत. (कर्मचारी पगार कशाचा घेतात, बँकांचा उपयोग काय, वगैरे सारखी आपली वाक्ये ही भावनिक आणि मी जे लिहिले त्याचा विपर्यास करूनच करता आली आहेत. ते आपले स्वतःचे वस्तुस्थितीनिदर्शक मत आहे हे मला पटत नसल्याने ते सर्व आपण रागात ते लिहिले असे समजत आहे. गैरसमज होत असल्यास दूर करा...) आपण माझ्यावर मी पक्षपाती अस्ल्याचाही आरोप केला. मी त्या त्या सुरात त्यांना उत्तरे दिली. आता उठून आपण एकदम म्हणत आहात की आपल्याला जास्त वाद घालायचा नाही? वाद कोण घालत होतं?
मी काही वाणिज्य क्षेत्रातील माणूस नाही परंतु बँकेतील कर्मचारी मनमानी फार करतात. जर आवाज लावून धरलात तर आपले काम होते.
हे सरसकटीकरण झाले. वाणिज्य क्षेत्रातील असण्याचा काहिच संबंध नाही. बँकेत सगळ्या विद्या-शाखांचे कर्मचारी आणि ग्राहकही असतात. आपलं अडलेलं काम करून घ्यायला आवाजाइतकीच योग्य माहितीही आवश्यक असते. अरे ला कारे म्हणल्याने आपल्याला लक्ष वेधून घेता येइल. काम कसं होइल? नुसता आवाज लाऊन कामं होत असती तर बँकांमध्ये नॉइज कॅन्सलिंग वगैरे सिस्टीम बसवल्याशिवाय कुणालाच काम करता येणार नाही. कसंही करून आपलं काम व्हायलाच हवं आणि सगळ्यात आधी व्हायला हवं, मग ते अगदी चुकीचं का असेना असं असणारेही बरेच असतात. ते तर पहिले आवाज लावतात आणि आवाज करतच बाहेर जातात. काम काही होत नाही. मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्‍यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे) -कारण यांचं गायन चाललेलं अस्तं तोवर बाकीचे ग्राहक ताटकळत असतात...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/12/2014 - 16:08 नवीन
साईट वरून माहिती घेण्याच्या माझ्या सल्ल्याचा आपल्याला उपयोग झाला असे दिसते आहे. साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती. मी आपल्या इतका वाणिज्य क्षेत्रात पुढारलेला नाही किंवा लोकांना सल्ला देण्या इतका ज्ञानी हि नाही. बाकी कुणाच्याही सल्ल्याचा फायदा कुणालाही झाला तरी ते चांगलेच. ( कुणाच्या का कोम्बडयाने , उजाडल्याशी कारण) राग आपल्याबद्दलचा नाही तर बँकेतील कर्मचार्याच्या( सरकारी सुद्धा) "मला काय त्याचे" या वृत्तीचा होता /आजही आहे. सरकारी कार्यालयाशी सामान्य माणसाचा रोज संबंध येत नाही पण बँकेशी येतो. उदा. १९८९ साली मी लखनौला कोर्स साठी गेलो असता मी ५००० रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन गेलो होतो तेथील SBI शाखेचा. त्यावर तेथील म्यानेजरने मला हे पैसे आपल्याला एक महिन्याने मिळतील असे सांगितले. मी लष्करी अधिकारी आहे आणि एक महिन्यासाठी आलो आहे आणि मी पैसे मुंबईत भरलेले आहेत. मग आपण मला एक महिन्याने पैसे देत त्याचा अर्थ काय? तो म्हणाला आम्हाला त्यांची तर आली नाही. आता यात माझा काय दोष? हा म्यानेजर ढीम हलायला तयार नव्हता आणि मी सांगितले कि तुम्ही मुंबईला फोन करून खात्री करून घ्या. पाहिजे तर त्याचे पैसे मी देतो( बँकेत हि सोय असूनही) शेवटी मला आवाज चढवावा लागला आणि खात्यामार्फत तुमच्या विरुद्ध वैयक्तिक तक्रार करावी लागेल असे सांगितल्यावर त्याने उपकार म्हणून दोन दिवसांनी( कदाचित फोन केला असावा) पैसे दिले. अर्थात जेंव्हा मी आवाज चढवतो तेंव्हा त्याबद्दल नियमांची पूर्ण माहिती असल्याशिवाय नाही त्यामुळे आवाज चढवून माझी कामे होत आली आहेत. आणि बँकेच्या कर्मचार्यांच्या चुकीमुळे लावलेले शुल्क मी कधीही भरलेले नाही. standing instruction असताना माझी ECS बाउन्स झाली आणि त्याचे ३५० रुपये शुल्क मला लावले. हे पैसे मी बँकेला भरायला लावले. परंतु कर्जाचा एक हप्ता वेळेत न भरल्याबद्दल माझ्या निष्कलंक आर्थिक चारित्र्याला डाग लागला. असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे. शेवटचा भविष्य निर्वाह निधीचे खाते पण आता राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून घेतले आहे. लष्करात असताना बँकेने चुकीच्या बँकेला धनादेश सदर केल्यामुळे चेक बाउन्सचा बट्टा मला लागला. ( लष्करात हा दखलपात्र गुन्हा आहे). या सर्व प्रकरणाची दाद लावण्यासाठी मला आवाजही चढवायला लागला आणि लिखित तक्रार दिल्यावर त्या बँक म्यानेजरने माझी सर्वांसमोर गयावया करणे सुरु केले. अर्थात मी प्रकरण लिखित स्वरुपातच तडास लावायचे असल्याने त्याला तसे सोडले नाहीच. तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही. असे असूनही पगाराच्या खात्यात पैसे भरू न देणे हे मला आजही अन्यायकारकच वाटते.
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 12/15/2014 - 06:51 नवीन
साईटवरून माहिती देण्याचा दुवा आपण सांगण्याचं अगोदर मी दिला होता( जनहितार्थ) आपण जरा तपासून पाहावे इतकीच विनंती.
सर्व्हीस चार्जेस चे सर्क्युलर मागवून त्यावरून सर्व्हीस मिळेल की नाही हे ठरवणे हे असलेल्या माहितीचे अ‍ॅप्लीकेशन झाले. नुसतेच साइट बघा असे मी म्हणालो नाही. साइटवर काय बघा आणि त्याचा कसा अर्थ लावा हेही मी सांगितले. ही माहिती मला दुसर्‍याकडून मिळाली होती, त्यामुळे तिचे महत्त्व मी जाणतो. तशी माहिती आपण अगोदरच दिली होती असे आपले म्हणणे आहे, मी तपासले, पण मला ते सापडले नाही. जरा लिंक देता का त्या प्रतिसादाची? (बाकी कोंबडा, उजाडणे वगैरेबद्द्ल संपूर्ण सहमत. पण तसे असतानाही आपल्याला ही माहिती आपणच अगोदर दिली होती असे सांगावेसे वाटलेच ना?)
तेंव्हा कर्मचारी माझ्या मागे काय बोलतात याचे मला घेणे देणे नसते आणि नाही.
ते उघड आहे हो. आपण सातत्याने मी जे बोलतो त्याचा विपर्यास का करत आहात? जे ग्राहकाच्या मागे बोलले जाते ते कर्मचारी बोलत नसून इतर ग्राहक बोलतात असे मी म्हणालो होतो- तपासा- मात्र ते बाहेर गेल्यावर त्यांचा असा उद्धार होतो- (इतर ग्राहकांमध्ये हां! कर्मचार्‍यांमध्ये नाही, तेवढाही वेळ नसतो त्यांच्याकडे) आता आपली बाजू न्याय्य आणि योग्य असेल तर इतर कुणीही - कर्मचारी काय, ग्राहक काय किंवा बघे काय- जे बोलते त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय रहात नाही हे खरेच आहे, पण आपण तसे न म्हणता कर्मचार्‍यांच्या म्हणण्याशी देणे घेणे नाही असे म्हणत आहात. हे माझ्या प्रतिसादाखाली आल्याने गैरसमज होऊ शकतो की मीच तसे म्हणालो आहे की काय, म्हणून खुलासा.
असे अनेक वाईट अनुभव आल्यापासून मी सरकारी बँकेशी व्यवहार करणे सोडून दिले आहे.
खाजगी क्षेत्रातील बॅंकांमध्ये वाइट अनुभव आल्यामुळे परत सरकारी बॅंकांकडे वळलेलीही उदाहरणे आहेत. (-उदाहरण हवेच असेल तर पहिला मी!) विषय चालू आहे पगार खात्यांचा. आपल्या मते पगार खात्यावर पैसे न भरू देणे हे अन्यायकारक आहे. मग पगार खाते स्कीम काय सरकारी बॅंकांनी आणली आहे काय? कित्येक सरकारी बॅंकांत ही स्कीम आजही उपलब्ध नाहिये. वड्याचं तेल वांग्यावर काढणे चाललंय ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिलीयन रायडर Mon, 12/15/2014 - 05:18 नवीन
महिन्याभरापुर्वी "पिझ्झा हट" मधुन "ब्रिझ्झा" मागवले होते. ८.४५ ला रात्री ऑर्डर दिली. वेळ लक्षात रहायचं कारण म्हणजे ऑर्डर घेणार्‍यानी अगदी आवर्जुन ती सांगितली. मला ८.५४ ला मेसेजही आला की तुमची ऑर्डर निघाली आहे. ९.१५ ला फोन आला की "तुमचं घर कुठंय?" ...मी विचारलं की तुम्ही कुठे आहात, त्या हिशोबानी सांगते.. म्हणे मी अजुन निघालोच नाहीये. मला कळेना की जर ३० मिनिटात पोहचणं आवशयक आहे तर हा अजुन निघाला कसा नाही. मी हे त्याला विचारल्यावर म्हणे "तुमचं घर फार लांब आहे.. ग्रिड मध्ये नाहीये.. शिवाय ३० मिनिट वाली ऑफर पिझ्झावर असते.. ब्रिझ्झा वर नाही.." म्हणलं ओके बेटा.. तू ये आधी ऑर्डर घेउन... मग बघते तुझ्याकडे... ९.४५ झाले तरी कुणी आलं नाही.. मी परत मेन लाईनला फोन करुन झापलं.. आणि हे ही विचारलं की ३० मिनिटाची ऑफर तर कोणत्याहि ऑर्डरवर आहे ना.. तर म्हणे हो.. मग म्हणलं तुमची माणसं खोटं कशी बोलतात? आता तर मला फ्री च पाहिजे.. त्यानी साम्ङितलं की ऑर्डर घेउन आलेल्या माणसाला स्टोअर मॅनेजरला फोन करायला सांगा. तुम्ही पैसे देऊ नका.. १०.१५ पर्यंत काहीच नाही...!! स्टोअरचा फोन कुणी उचलेना म्हणुन परत मेन लाइणवर फोन केला.. परत तीच राम कहाणी.. तेवढ्यात पिझ्झा हटचा माणुस दारात... मी आधी डिलिव्हरी घेतली आणि मग म्हणल की पैसे देणार नाहीये. तू १ तास लेट आहेस. तर म्हणे की तुमचं घर किती लांब आहे (मेन रोडवर आहे..) आमच्या ग्रिड मध्ये नाहीच.. म्हणलं मग तुम्ही माझी ऑर्डर घेतलीच कशाला? मग म्हणे ३० मिनिटाची ऑफर वीकेंडला नसतेच... आता माझा फक्त स्फोट व्हायचा बाकी होता... आवाज बुलंद झाला होतच.. (तो नेहमीच असतो..) "तू जेवढं खोटं बोलशील तेवढा अडकशील.. तुझ्या मेन लाइणवर फोन करुन मी सगळे नियम आत्तच विचारलेत. तू तुझ्या मॅनेजरला फोन लाव" तो ही उखडलला.. हो लावतोच ना.. बघुच म्हणुन तिरमिरिने फोन लावला... मॅनेजरने पण "दे बरं..कसं काय देत नाही पैसे पाहु.." म्हणून मला फोन द्यायला सांगितला.. "८.५४ ल ऑर्डर निघालीये.. माझ्याकडे मेसेज आहे.. आत्ता १०.१५ झालेत.. मी पैसे देणार नाही.." असं चाम्ङलंच ठणकवुन सांगितलं.. गपगुमान "फोन जरा बॉयला द्या" म्हणला.. त्याला म्हणे सही घेऊन ये.. पैसे वगैरे नको मागुस आता.. तोही गपचुप निघुन गेला... मी खरं तर पैसे देणार होते.. त्या दिवशी जरा पाउस होता, त्यामुळे उशीर झाला असता तरी मी समजुन घेतलं असतं. पण खोटं बोलणे आनी माझ्या वरच अरेरावी करणे ह्या प्रकारानी त्या माणसाचं नुकसान झालं. त्यानी अगदी १०.१५ लाही खरं कारण सांगुन साधं सॉरी म्हणलं असतं तरी मी पैसे दिले असते.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 12/15/2014 - 05:53 नवीन
म्हणून मराठी लोकांना नोकरी द्यायची नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 12/15/2014 - 06:01 नवीन
काका.. तो हिंदी होता.. मी सगळं मराठीत लिहीलय फक्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
अ
अद्द्या Mon, 12/15/2014 - 09:29 नवीन
दोन दिवसापुर्वीची गोष्ट. मी बेळगाव मध्ये राहतो . आयडिया च्या सीम वर उगाचच कैच्याकाय सर्विस चालू झाली . . कस्टमर केअर ला लावला फोन . . आणि सवयीप्रमाणे मराठीत बोललो . . समोरचा मुलगा म्हणाला "सर मराठी बरल्ला . कन्नड माताडी " (सर मराठी येत नाही . कन्नड बोला ) . म्हटलं ओके . बेंगलोर सेंटर ला लागली असण्याची शक्यता धरून मी इंग्रजी सुरु केल, . तरी तेच उत्तर . . मग मी हिंदी सुरु केलं . तरीही तेच . . शेवटी मोडक्या तोडक्या कन्नड मध्ये त्याला म्हणालो . . बाबा रे . क़न्नद समजतं . पण बोलता येत नाही . ंइ हिंदी /इंग्रजीत बोलेन . तू बोल कन्नड मधे। मला समजतं . तेवढी ती कॉलरट्यून बंद कर . यावर तो म्हणतो . . सर सपोर्ट पाहिजे असेल तर कन्नड मध्ये बोला . आणि फोन ठेऊन दिला . डोकं फिरलं . परत कॉल लावला . प्रत्येक कॉल च्या सुरुवातीला हे लोक आपलं नाव सांगतात . त्यामुळे मी म्हणालो . . अबक व्यक्तीला कॉल फॉरवर्ड करा . तसा तो झाला . . त्याला म्हटलं . कॉल का कट केला ?? म्हणाला सर कन्नड नाही बोला इसलिये . . तुमचा सिनियर असेल त्याला फॉरवर्ड कॉल कर । बरेच आढेवेढे घेतल्यावर त्याने तसं केलं . त्याला सगळी कहाणी सांगितली . . तो म्हणतो . सर आमच्या कडे सगळीकडून लोक येतात कामाला . एका प्रतिक भाषेसाठी आग्रह नाही धरू शकत तुम्ही . . मी : हेच तुम्ही केलं तर चालतं का? आणि मी सुरुवातीलाच त्याला सांगितलं . कन्नड बोलू शकत नाही . .तरि नशीब मला समजत तरी होतं . समजा बाहेरच्या राज्यातला माणूस असेल तरी त्याला तुम्ही हे उत्तर दिलं, तर तो ऐकेल का? आणि तुमचे हे लोक साधे पाचवी पण शिकलेले नाहीत का? हिंदी , इंग्रजी का येत नाही ? एक राष्ट्रीय भाषा आहे दुसरी आंतरराष्ट्रीय . . दुसरी गोष्ट . स्वतःला तुम्ही "कस्टमर सपोर्ट " म्हणवता . मग कस्टमर ला नाराज करायचं बघाल फालतू गोष्टीवरून कि त्याला जमेल तसं सपोर्ट द्याल . ? तो: सॉरी सर . वि विल कीप धिस इन माइंड नेक्स्ट टाईम .
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 12/15/2014 - 10:19 नवीन
तुमचा सिनियर असेल त्याला फॉरवर्ड कॉल कर ।
कॉल फॉरवर्ड केला असेल तो सिनियरनेच घेतला असेल असे मुळीच नाही. बहुतेक वेळेस सहकार्‍यालाच देउन ग्राहकाला शांत करतात . आप्ल्याला पण समाधान मॅनेजरची बोलल्याचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
असंका Mon, 12/15/2014 - 10:44 नवीन
हे इतकं सहज शक्य आहे? ते तर म्हणतात की कॉल रेकॉर्ड होणं शक्य असतं वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अद्द्या Mon, 12/15/2014 - 10:30 नवीन
असू शकेल . . पण तुम्ही म्हणताय तसं . "तेवढंच आपलं समाधान "
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 12/15/2014 - 14:28 नवीन
फ्लिपकार्ट, इबे, स्नॅपडीलचा कोणाला काही अनुभव आहे का..? हाफिसातल्या मित्राने "आर्मर जॅकेट" मागवले असता त्याला "लॅपटॉप टेबल" दिले गेले आहे. (स्नॅपडील)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/15/2014 - 14:53 नवीन
मित्राला स्नॅपडीलच्या फेसबुक पेजवर टाकायला सांग. http://www.americanbazaaronline.com/2014/11/04/order-samsung-smartphone-snapdeal-get-vim-soap-bar-liquid-dish-wash-now/ हा किस्सा लै फ्येमस झालाय. मला फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांचा अतिशय उत्तम अनुभव आहे. ईबेवर पूर्वी खरेदी करत असे, तेव्हाही कधी वाईट अनुभव आलेले नाहीत. हल्ली ईबेवर क्वचितच खरेदी करते. कारण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलकडून चांगल्या क्वालिटीच्या आणि खर्‍या कंपनीच्या वस्तू योग्य किंमतीत मिळतात. स्नॅपडीलकडून एकदाच चुकीच्या मापाचा ड्रेस आला होता. पण त्याना कळवताच त्यानी चुकीचा ड्रेस कुरियरने परत मागवून रिप्लेसमेंट दिली. कुरियर चार्जेस रिफंड केले आणि बरोबर मापाच्या ड्रेसला नंतर वाढलेले पैसे डिस्काउंट म्हणून कमी केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Mon, 12/15/2014 - 18:48 नवीन
मी नोकिआ आशा २१० मागवलेला फ्लिपकार्टवरुन...७ दिवसांत मिळेल असे स्टेटस दिसूनसुध्धा २० दिवसांनी आला जो फोन मिळाला त्याच्या सिम-२ वाल्या साईडच्या खाचेचे झाकण लागायचे नाही...मग त्यांना बदलून द्यायला सांगितले त्यांच्याकडे दुसरा फोन नव्हता म्हणून पैसे परत दिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अद्द्या Tue, 12/16/2014 - 06:36 नवीन
अतिशय चांगला अनुभव आहे दोन्हीचाही . आजपर्यंत तरी काहीही प्रोब्लेम आलेला नाही . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कपिलमुनी Tue, 12/16/2014 - 11:11 नवीन
"आर्मर जॅकेट" असे असेल तर अत्यंत रद्दड क्वालिटीचे असते असा स्नॅपडीलचा अनुभव आहे . शक्यतो पैसे परत मिळाले तर उत्तम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 12/16/2014 - 12:07 नवीन
रद्दड क्वालिटीचे म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम होता..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ल
लॉरी टांगटूंगकर गुरुवार, 12/18/2014 - 02:17 नवीन
मित्राला फ्लिपकार्टचा एक गंडका अनुभव आहे. डेलचा चार्जर मागवलेला. कार्ट्यांनी शामसिंगचा चार्जर पाठवला. त्यावर डेलचं स्टीकर होतं. ल्याप्टॉपला पीन बसेना म्हणल्यावर मग साधी स्टीकर उचकटून पाहीली तर खाली वेगळाच ब्रँन्ड.(दिल्लीच्या चोर बाजाराच पत्ता होता बॉक्सवर) फोन केल्यावर कस्टमर केअरची बै अक्कल काढायला लागली. फोटो वगैरे काढून पाठवल्यानंतर म्हणले रिफंड देणार नाही, रिप्लेसमेंट देतो. पैशासाठीच अडून बसल्यानंतर त्यांनी वॉलेट मध्ये पैसे टाकले. ते प्रॉडक्ट नंतर साईट वरून काढून टाकलं. अ‍ॅमेझॉनचा माझा एक हेडफोन सव्वामहीन्यात गंडला. जेबीएलवाले म्हणाले की ऑनलाईनला आम्ही वॉरंटी देत नाही. अ‍ॅमेझॉननं परत घेतला, संपूर्ण किमतीचा चेक दिला. ई रिटेलर्स कडचे वॉरंटीचे नियम नेमके काय आहेत? काही कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीला वॉरंटी देणार नाही असं डीक्लीअर केलेलं आहे. तरीही त्यांचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. नेमकं काय आहे हे? त्या वेळेला अ‍ॅमेझॉननं काम केलं म्हणल्यावर मी खोदकाम करत बसलो नाही. कोणाला माहीत असेल तर सांगणेचे करावे. Here’s what Lenovo, Dell, HP, Toshiba, Asus, Nikon have said about e-commerce offers & warranties in India Lenovo: Flipkart, Snapdeal and Amazon not our authorized resellers Snapdeal, Flipkart not our authorised resellers: Lenovo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
H
hitesh गुरुवार, 12/18/2014 - 00:31 नवीन
Dear Sir , My name is *** . I am from Mumbai. I had taken two cards ***and ***I am using them and paying the bills also since last few months. But since last one month I am getting calls from you that I have one more connection *** They are asking me the pending bill which was initially 701 and now gone to 901. This card is not mine. Your agent ***hadgiven me only two cards. This third card is not mine. Kindly stop this number *** and please ddon't harass me. Your agent who gave me two card is *** His number is . *** Thanking you. *** महिनाभर सारख फोन येत होते.. कार्ड तुमचेच आह . बिल भरा.. मी शेवटी कंटाळुन फेसबुकवर टाकले.. फेसबूकावर मेसेज केल्यावर चमत्कार्‍ झाला. दोन तासाट एज्म्तचा फोण आला. म्हणाला .. माझा जॉब जाइल. त्याने स्वता पैसे भरून सिम ब्म्द केले
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 12/18/2014 - 05:18 नवीन
हे तिसरे कार्ड नाना किंवा माइंनी वापरले असेल का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सतिश गावडे गुरुवार, 12/18/2014 - 05:48 नवीन
मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानात वडापाव खायला गेलो. तिथे नेहमीप्रमाणे वडापाव घेण्यासाठी रांग होती. वडापाव बरोबर त्यांनी मला चिंचेची चटणी दिली. माझं टाळकंच सणकलं. म्हटलं तुम्ही ही अशी वडापाव बरोबर चिंचेची चटणी देता आणि मग मुंबईकरांना (डोंबोलीकरांना टु बी स्पेचिफिक) पुणेकरांना बदनाम करण्याची संधी मिळते. ते वडापाववाले ही पुणेकरच असल्यामुळे आणि मी उपरा पुणेकर असल्यामुळे आमच्यात खडाजंगी झाली. शेवटी मी जिंकणार नाही असे लक्षात येताच (खरे तर आपण अजून पुण्यात तसे नविन आहोत याची जाणिव होताच) मी त्या वडापाववाल्यांना ग्राहक मंचाकडे जायची (पोकळ) धमकी दिली आणि घेतलेला वडापाव खाऊन तिथून सटकलो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 06:04 नवीन
क्यारे....कुच कामधंदा नै तेरेकू... वडापाव के सात चिंच का चटणी दिया तो लगेच (इथे "च" "चु..." मधला :) ) भांडण करनेका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खटपट्या गुरुवार, 12/18/2014 - 06:28 नवीन
घेतलेला वडापाव तीथेच टाकून सटकला असतात तर जास्त परीणामकारक झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अनुप ढेरे गुरुवार, 12/18/2014 - 06:56 नवीन
उगाच तणतण, छान लागते की चिंचेची चटणी वडापावबरोबर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/18/2014 - 07:01 नवीन
एकदा हिरवी चटणी + सुक्की लसूण चटणी घातलेला वडापाव मीठ लावून फ्राय केलेल्या हिरव्या मिरचीबरोबर खाऊन बघा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मुक्त विहारि Wed, 12/24/2014 - 22:15 नवीन
जबरदस्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सस्नेह गुरुवार, 12/18/2014 - 14:16 नवीन
येत्या 24 तारखेला राष्ट्रीय ग्राहक दीन आहे तस्मात ईथल्या सर्व हौशागौशानौशांनी आपली हौस भागवून घ्यावी.
  • Log in or register to post comments
म
मिहिर गुरुवार, 12/18/2014 - 14:46 नवीन
इतर दिवशी केवळ राज्यस्तरीय पातळीवरचा ग्राहक दीन असतो आणि २४ तारखेला राष्ट्रीय ग्राहकही दीन असणार आहे, असे काही आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अद्द्या Mon, 12/22/2014 - 12:11 नवीन
काही वेळा पूर्वीच . . चक्क रिजर्व बँक चे गवर्नर रघुराम राजन यांच्या नावाने एक मेल आला . . मेल ला डोमेन सुद्धा बँक चा होता . . मेल चा सारांश पुढील प्रमाणे . . " ब्रिटीश सरकार आणि रिजर्व बँक यांच्यात झालेल्या एका करार नुसार तुम्ही ५००००० ब्रिटीश पौंड जिंकला आहात . तरी आमच्या अबक खात्यावर १५००० रुपये जमा करा . आणि आपलं नाव गाव बँक चे नंबर इत्यादी सगळं पाठवून द्या . " लगेच रिजर्व बँक च्या साईट वर कम्प्लेंट लॉक केली . आणि अपेक्षे प्रमाणेच हे सगळं खोटं असल्याचा रिप्लाय आला . .
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 12/24/2014 - 22:02 नवीन
मलापण एक फोन आला होता. सांगत होते की तुमचा क्रेडीट्कार्ड्चा व्याजदर खूप जास्त आहे. आमचे बँकेबरोबर टायअप आहे. डीटेल्स द्या, व्याजदर कमी करून देतो. बॅंकेत फोन केला तेव्हा कळाले की बोगस फोन आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
म
मन१ Mon, 01/04/2016 - 06:44 नवीन
मी फार फार मागे एल आय सी हाउसिंग फायनान्स मधून होम लोन घेतलय. ( त्यांच्याकडून होम लोप्न घेण्याची घोडचूक केली आहे. ) सुरुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं. हे फ्लोतिंग म्हणजे वित्त संस्थेचा जो काही जहिर बेस रेट असेल, त्याच्याशी निगडित असते. अर्धा एक टक्का मागे पुढे. तीन वर्षे संपल्यानंतर मला तब्बल साडे अकरा, बारा असे कै च्या कै दराने व्याज आकारले जात आहे. ( ह्याच दराने घ्यायचे असेल तर पर्सनल लोन सुद्धा काय वाईट आहे ? ) . . मी त्यांच्या हापिसात जाउन " व्याजाचा दर बेस रेटशी लिंक्ड करुन हवा आहे. त्याची काय प्रोसेस आहे ती सांगता का " असे म्हणत विचारणा केली. "आमच्याकडे असे काहीही होत नाही" असे म्हणत त्यांनी मला घालवले. अर्थात ही सर्व विचारणा तोंडीच केलेली आहे, लेखी नाही. शिवाय त्यांचे उत्तर चुकीचे वाटत असले तरी त्यांनी शांअतपणे व नम्रपणेच दिलेले आहे. पण नवीन सर्व ग्राहक एल आय सी हाउसिंग फायनान्स कडून फ्लोटिंग दराने दहा सव्वा दहा टक्क्याच्या आसपास लोन मिळवू शकतात. अशा जाहिराती सर्वत्र आहेत. मग जुन्या ग्राहकास दहा सव्वा दहा फ्लोटिंग , किम्वा बेस रेटशी निगडित फ्लोटिंग नाकारला जाउ शकतो का ? . . आय सी आय सी आय, व इतर कित्येक बँकाबाबत मला खात्री आहे. रिझर्व्ह ब्यांकेने रेपो रेट वगैरे कमी केल्यास, आणि आपण ब्याअंकेस सुधारित दर लावण्याची विनंती केल्यास काही शे किंवा हजार रुपयांची प्रोसेसिंग फीस घेउन नवा दर आकारला जातो. . अ, पण सुधारित दर लावा; अशी भूमिका घेणे रास्त आहे; हा माझा अंदाज. . . . मला सल्ला हवा आहे. माझा अंदाज योग्य आहे का. . . गृह कर्ज दुसर्‍या ब्यांकेत हलवणे मला सध्या शक्य नाही. कागद पत्रांची पूर्तता वगैरे करणे जिकिरीएचे वाटते. सग्ध्या बर्राच व्यग्र आहे. त्यामुळे तूर्तास तरी ह्यांनीच जरा शहाण्यासारखा दर लावावा ही अपेक्षा आहे. . .
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 01/14/2016 - 12:22 नवीन
मनोबा.. तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे काही प्रोसेसींग फी भरून व्याजदर बदलता / दुसर्‍या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करता येतो का ते पाहणे. (दुसरा ऑप्शन म्हणजे लोन शिफ्ट करणे असा आहे.. पण तो तुला नको आहे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
प
पैसा गुरुवार, 01/14/2016 - 12:39 नवीन
एकदा लोन सँक्शन झाले की काही मोठी कागदपत्रे लागत नाहीत. तुझी सॅलरी ज्या बॅंकेत जमा होते तिथे जाऊन आपले लोन टेक ओव्हर करा म्हणून सांग. तेच सगळे करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
आ
आदूबाळ गुरुवार, 01/14/2016 - 13:17 नवीन
रुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं.
असं लोन अ‍ॅग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे का? ते कोणत्या कॉव्हेनंट्सवर (अटींवर) अवलंबून आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
म
मोदक गुरुवार, 01/14/2016 - 12:29 नवीन
गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद सुरू आहे. त्यांचे इंटरनेट कनेक्शन घेताना सेल्सवाला येवून डेमो देवून गेला व त्या स्पीडचे नेटवर्क पुन्हा मिळाले नाही. एअरटेल वाल्यांकडे भरपूर तक्रारी केल्या व त्याचे उत्तर म्हणून वेगवेगळ्या टीमचे भरपूर लोक्स येवून "हो येथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे" असे सांगून गेले. एअरटेलवाल्यांनी मला, "तुमच्या येथे टॉवर लावायला पाहिजे, त्याला वेळ लागेल", "टॉवर लावण्यास जागा शोधून द्या" येथेपर्यंत मेलामेली केली. (हा विनोद नाही माझ्याकडे या गोष्टींचे मेल आहेत..!!) काल संध्याकाळी सगळे उचलून मा. मंत्री रवीशंकर प्रसाद आणि ट्रायला पाठवले. आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे. बघू काय होते आहे ते...
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 01/14/2016 - 12:52 नवीन
मस्त च. इथे अपडेट द्या मधुन मधुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 12:44 नवीन
आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे. क्या बात है !
  • Log in or register to post comments
र
राहुल०८ गुरुवार, 01/14/2016 - 15:34 नवीन
मला कुठलीही माहिती किवा नोटीस न देता ICICI ने account मधून पैसे काढून घेतले "Low Balance " च्या नावावर . नाही तेव्हा नवीन policy, scheme, advertisement यांचे शेकडो sms, email फुकटचे पाठवतात. पण customer ला साधी माहिती सुद्धा देत नाही कि तुमच्या account चा balance कमी होत आहे, या दिवसानंतर आम्ही पैसे कापून घेऊ. Deduction वाचवायचं असेल तर इतके पैसे या कालावधीत भरा. आपलं जाम डोकं सरकलं…. एक खरमरीत email लिहिला…CEO ते सगळे Managing director, VP, AVP....जेवढे दिसले त्यांच्या email वर सगळ्यांना पाठवला… Hello, This is XXXX holding aaccount in ICICI bank from last 5 years. I did number of transactions with ICICI bank. Recently Rs XXXX has been deducted from my account before prior intimation. Reason was below quarterly balance. I have been told by customer service that, this is as per your policy. I agree, you can craft your policies as per your wish and benefits . But you shall consider customer and his track record with your bank. I have requested that the ICICI should inform customers beforehand if they see the balance below mark and shall advice them. If the customer can replenish the advised amount within certain time-frame, then he need not pay any charge. ICICI sending number of promotional, advertisement etc emails but why can't ICICI implement a simple system to check customer quarterly balance and advice him accordingly? Is it very difficult for you to implement ? or you wish to suck customer money with your policies and loose faith. If you are advertising as a customer oriented bank then you should implement system which really helps customer. If you still want to continue like this, then I may not keep an account with ICICI bank. -- Thanks and Regards एका आठवड्यामध्ये कापलेले पैश्याचं खात्यामध्ये पुनरागमन झालं….
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 01/14/2016 - 16:18 नवीन
सुंदर !! अभिनंदन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहुल०८
म
मोदक गुरुवार, 01/14/2016 - 16:42 नवीन
झकास.. अभिनंदन.!! मी गेले काही महिने क्रेडीट कार्डच्या लिमीटपेक्षा जास्त खर्च केला; म्हणून मला ओव्हरलिमीट चार्जेस + सर्वीस टॅक्स वैग्रै वैग्रै असा ५७२/- रूपये दंड लावला. चूक माझी होती; तरीही मी त्यांना मेल लिहिला की तुम्ही मला असे चार्जेस फोन करून कळवले नाहीत आणि कस्टमरला या कारणासाठी दंड लावणे योग्य नाही (This is not fair टाईप्स!!) तिसर्‍या दिवशी त्यांचा "In appreciation of your relationship, we have arranged to reverse the mentioned charges levied on the card account" असा मेल आला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहुल०८
प
पिलीयन रायडर Tue, 05/17/2016 - 07:21 नवीन
मला एक प्रश्न पडलेला आहे. पण तो नक्की ग्राहक कॅटेगरीत येतो की नाही हे नक्की माहिती नाही. तरीही इथे विचारत आहे. माझ्या मुलाला मागच्या वर्षी "ट्रिहाऊस कर्वेनगर" इथे प्रवेश घेऊन दिला. तेव्हा अ‍ॅडमिन फीस म्हणुन ३०हजार अधिकचे भरले होते. ह्या वर्षी रोल ओव्हर अ‍ॅडमिशन म्हणुन फिसचा पहिला हप्ता - १६ हजार रुपये भरले. शाळा नेहमी ३ टप्प्यांमध्ये फीस मागते. त्यानुसार पहिला जानेवारीचा हप्ता आम्ही दिला. पुढचा जुन आणि नोव्हेंबर मध्ये असतो. एप्रिल मध्ये आमचे एक वर्षासाठी अमेरिकेला जायचे ठरल्याने मी मुलाच्या अ‍ॅडमिशनचे कसे हे विचारण्यास प्रिन्सिपलकडे गेले. तेव्हा संपुर्ण फिस भरावी लागेल असे कळाले. त्या बदल्यात मुलगा "ऑनलाईन स्टूडंट" म्हणुन रोल वर राहिल आणि दर महिन्याला आम्हाला मंथली प्लानर पाठवले जाईल असे सांगितले. ह्यासंदर्भात अजुन चौकशी करण्यास आणि आवश्यक अर्ज देण्यास मी शाळेत अ‍ॅडमिनला परत भेटले. तेव्हा असे कळाले की १. मुलगा शाळेत येणार नसुनही "अ‍ॅक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्स फी" कमी करता येणार नाही. २. मध्येच अ‍ॅडमिशन कॅन्सल केल्यास फक्त ट्युशन फिस परत दिली जाईल. ती सुद्धा जेवढे दिवस शाळेत होतात त्या हिशोबाने कापुन. एकंदरीत विचार करता आणि शाळेत ज्या पद्धतीने मुलाला शिकवले जात आहे ते पहाता मला ह्या शाळेत मुलाला ठेवु नये असे वाटल्याने मी दुसर्‍याच दिवशी शाळेत अ‍ॅडमिशन कॅन्सल करायला गेले. तेव्हा तिथे परत प्रिन्सिपल भेटल्या. त्या भेटीत नव्या गोष्टी अशा कळाल्या की:- १. फीस कोणतीही परत मिळणार नाही कारण एकही दिवस शाळेत आला असाल तर त्या टर्मची फीस द्यावी लागेल. २. ह्या संबंधात शाळेचे धोरण लिखित स्वरुपात दाखवा अशी मागणी केल्यावर आउटलुक मधला एक मेल दाखवण्यात आला. मी ह्यावर "पहिला हप्ता भरलेला आहे. दुसर्‍या हप्त्याआधीच कॅन्सलेशन असल्याने पुढची फीस भरण्याचा प्रश्नच येत नाही, तेव्हा काही रक्कम परत न देता केवळ कॅन्सल करा आणि बोनाफाईड द्या" अशी मागणी केली. त्याला होकार मिळाला. पण ३ दिवसांनी फोन आला की "६०% रक्कम भरल्याशिवाय बोनाफाईड मिळणार नाही." मी परत जाउन प्रिन्सिपलला भेटले. तेव्हाही "हीच शाळेची पॉलीसी आहे" असे उत्तर मिळाले. तेव्हा माझे अनुत्तरित राहिलेले प्रश्नः- १. अ‍ॅडमिशन फॉर्म काढुन पाहिला असता शाळेने माझी कुठेही अशा धोरणांवर सही घेतलेली नाही. शाळेकडे असे मुळात लिखित धोरणच नाही. खरं तर "फीस आणि अ‍ॅडमिशन पॉलीसि" असणे आवश्यक नाही का? २. शाळेने कधीही टर्म प्रमाणे फीस मागितलेली नाही. नेहमी इन्स्टॉलमेंट मध्येच मागितली आहे. मग अशावेळी कॅन्सल करताना टर्म प्रमाणे फीस शाळा घेऊ शकते का? आणि ६० हा आकडा कसा काढला हे उत्तर देणे त्यांना बंधनकारक आहे का? आज पुन्हा चौकशी केली असता, डायरेक्टर मॅडमनेही हेच सांगितले आहे असे उत्तर मिळाले. वास्तविक बानोफाईड काही माझ्या मुलाला अत्यावश्यक नाही. मी परत आल्यावरही त्याला कुठेही प्रवेश मिळेलच. पण प्रश्न तत्वाचा आहे. अशी अडवणुक शाळा करु शकते का? मी ग्राहक म्हणुन इथे दाद मागु शकते का? शाळा खाजगी असल्याने कितीही आणि कशीही फिस घेऊ शकतात. पण एक पालक म्हणुन माझी संमती घेणे आवश्यक नाही का? किमान एक ठरलेले धोरण असणे आवश्यक नाही का?
  • Log in or register to post comments
व
वगिश Wed, 05/18/2016 - 19:12 नवीन
शाळेला " xxx रूपये भरल्याशिवाय bonafi मिळणार नाही" असेलेखी मागावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/25/2016 - 11:39 नवीन
हे सर्व मुद्दे लिहुन मी शाळेच्या डायरेक्टरला मेल केला. साईट्वर जे जे मेल आयडी सापडले त्या सगळ्यांवर हा मेल पाठवला. आज मला मुलाचे बोनाफाईड घेउन जा म्हणुन मेल आला आणि शाळेत गेल्यावर लगेच बोनाफाईड दिलेही गेले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोदक Wed, 05/25/2016 - 11:43 नवीन
व्वाह..!!! अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 05/25/2016 - 11:47 नवीन
आपला आशिर्वाद आहे सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा