पाककृती

टोमॅटो राईस

Primary tabs

1
साहित्य
2 वाटया बासमती तांदुळ
5 मिडियम टोमॅटो प्युरी करून
2 मोठे कांदे
3 मिरच्या
आलं लसूण पेस्ट 2 मोठे चमचे.
साजूक तूप 1/2 वाटी
पाव वाटी काजू
मीठ
साखर
कोथिंबीर (सजावटीसाठी)

कृती

प्रथम तांदूळ धुवून निथळत ठेवा. कांदा बारीक व उभा चिरा.
छोट्या कुकरमध्ये तुप घालुन जिरं व कांदा घालून परतून घ्या.त्यात
तांदूळ घालून परतावे.नंतर मिरचीचे तुकडे आणी आलं लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. थोडा वेळाने 5 वाट्या गरम पाणी घालावे. भात अधर्वट शिजल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. चवीपुरते मीठ व किंचित साखर घालून झाकण लावून ठेवावे. साधारण 10 मिनिटात भात तयार.
काजू पाकळ्यांची सजावट करून गरमागरम सर्व करा.

2

त्रिवेणी

मी चित्राहुती च म्ह्ट्ले आहे.
चित्रावती नाही काय *sad*
नकी शब्द काय आहे *unknw* *DONT_KNOW*

सूड

तुम्ही चित्राहुतीच म्हटले हो, आम्ही अपभ्रंश करुन चित्रावती म्हणतो.

सूड

येप, असं आहे हो थ्रीपोनीटेल काकू!!

सखी

अहो पण दही कुठुन आलं टोभामध्ये? टोभाताची दहीबुंदी झाली वाटतं.

दिपक.कुवेत

भातावर आणि त्याला अनुसरुन ईतर विषयांवर उलथापालथ झालेली दिसतेय. असो. आता टोरा बद्दल. मला खुप आवडतो हा भात पण मी भात वेगळा शीजवून नंतर टोमॅटो पेस्ट मधे अ‍ॅड करतो. फोडणीत शेंगदाणे, उडीद डाळ, कडिपत्ता, सुख्या लाल मिरच्या मस्ट. कुकर आणि पाण्याचा अंदाज चुकल्यास वरील भाताचा कुकर मधे गोळा होण्याची शक्यता आहे. टोमॅटो प्युरीच्या मानाने भाताचा कलर फारच फिका वाटतोय.

मनिमौ

इथे काही लिहिले आहे. सर्व सुचना वाचल्या त्या नुसार पुढील वेळेस सुधारणा करेन. @ दिपक टोमॅटो देशी असल्याने रन्ग फिका आला आहे.

अजया

हो,मने आपल्या टोमॅटोने दर वेळी गडद लाल रंग येतोच असे नाही.पहिल्या प्रयत्नाच्या मानाने छानच लिहिलं आहेस गं.लक्षात नाही आलं तू प्रथमच लिहिते आहेस.मस्त.अजून येऊ दे छान पाकृ.

स्रुजा

मनी मौ काल च रात्री तुझा टो भा केला गं ! छान झाला एकदम … मी पण थोडे दाणे, उडीद डाळ आणि दह्यातल्या मिरच्या घातल्या फोडणीत , सोपा करायला एकदम आणि चव पण आम्हाला खूप आवडली .

मी जोडीला पालक सूप , मिरगुंड आणि थोड्या भाज्या स्टीम करून घेतल्या … मजा आली काल तुझ्या राइस नी :)

भिंगरी

सासूबै किती घेतल्या
टवाळ सासू छटाकभर
सूड घेणारी सासू चिमूटभर
आणि अत्रुप्त सासू चवीपुरती

प्रीत-मोहर

सासु ही सासु असते. तिचे प्रकार नसतात. पण सासु नसलेल्याला कसे बरे समजेल? :P

स्रुजा

अगं "विनोद" करतायेत ते , छे बाई तुला कळत च नाही :D

स्रुजा

भिंगरी ताई , विनोदी सासू राहिली की , ती घातली फोडणी ला … काय खमंग झाला म्हणून सांगू भात ;)

सूड

>>सूड घेणारी सासू चिमूटभर

हम्म ही चिमूटभरपण फार झाली, चवीपुरती घेत चला पुढल्यावेळेपासनं.

अजया

अगं विनोदला असतील जास्त.म्हणून विचारत असेल.
काय म्हणतो विनोद?जमला का टोभा?

सविता००१

अग विनोदच्या कोणत्या सासूबै करणार टोभा ते ठरलं का?

अजया

सूनबाया अनाहितात चालतात तर सूनबुवा का नाही चालणार??अाणि अनाहितासाठी वेल क्वालिफाइड म्हणजे साबा साबु आहेत,टोभा करता येतो.अजून काय असणारे अनाहितात? सूनबुवा घेण्याचा विचार व्हावा.कसें?

उमा @ मिपा

फोटो दिसू लागले मौ. मस्तच गं, सजावट भारी केलीयस. लिहित राहा गं अजून अशा छान छान पाकृ.

आरोही

मने,छान दिसतोय ग टोभा..नककी करनार.

उमा @ मिपा

मौ, सकाळी पटकन करून, मुलांच्या डब्यात देता येईल आणि मुलांना हमखास आवडेल अशा पाकृच्या यादीत टोराचा समावेश करण्यात आला आहे.

टोभाचा धागा शंभरी गाठू लागल्याचे पाहून ड्वाले पानाव्ले :) ;)

हा नव्य्याणवावा. टाका शंभरावा कोणीतरी आणि घ्या श्रेय ! +D

एस

एकाने नंबर हुकला!

प्यारे१

दगड ना?
माहितीये ते! =))

विशाखा राऊत

लागला की काय दगड विनोदाला.... दगडाला कळले नाही समोर कोण ते

बॅटमॅन

च्च च्च च्च. प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे टाकून अशी एकदम भवसागरात उडी घेतल्याचं पाहून वाईट वाटलं.

सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे... की कै तरी म्हणुनच गेलयं ना कुणीतरी...

बॅटमॅन

सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे..

कविवर्य रामदास आठवल्यांची कविता आहे की काय ;)

"सच्चाई छुप नही सकती बनावट के उसुलोंसे
मोसंबी नही हो सकती गोड कभी संत्रोंसे".

=))

रामदास आठवलेंच्या नावावर फिरणार्‍या कविता तूच लिहीतोस असा मला सौंशय आहे!!!

बॅटमॅन

नाय बा. मी र ला ट जोडणारा कवी, ते कालिदासासम काव्य आपल्याला या जन्मी तरी जमणे नाही.

प्यारेमहाराजांनी भगवी वस्त्रे टाकून अशी एकदम भवसागरात उडी घेतल्याचं पाहून वाईट वाटलं.

अरेरे :(

हे अधःपतन पाहुन एकदम प्यासारामबापुच सॉरी सॉरी आसारामबापुच डोळ्यासमोर आले माझ्या !

प्यारे१

खिक्क टु बॅमॅ, पिरा आणि पश्या!
सो स्वीट ऑफ ऑल ऑफ यु ;)

इशा१२३

मौ अभिनंदन १०१% यशस्वी पाक़़कृतीबद्दल!

स्पंदना

टोभा मस्तच. आता करुन पाहेन. पहिला परड्यातले मुळे उपटायचे आहेत ते करुन येते. ;)

इरसाल

३४ चे एकदम १३४ पाहुन वाटलं टोभात नवीन काय आलं. उघडलं तर असं वाटतय की अनाहिताचं लॉगिन बंद पडले असावे २/३ दिवस म्हणुन ही म्हैलाट्रेन इकडं वळती झाली की काय ?;)

(साबांनी नाही, त्यांच्या मुलीने...) केला

(व्हेरिएशन : सद्या मिळणारे ताजे मटारचे दाणे टाकले होते !)

आणि चट्टामट्टा पण केला...

ह्या भातात मिर्च्या एवजी लाल तिखट घालावे. टोमॅटो प्युरी बरोबार टोमॅटो काप पण घालावेत. तिखटा मुळे कलर छान येतो