नक्की किती पैसे पुरेसे?
नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावर प्रवासासाठी करतो.
तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे
१.कुठे थांबायचे हे देखील धर्मानेच सांगितले आहे. अर्थ आणि काम हे प्रवाह धर्म आणि मोक्ष याच्या सीमेच्या आतच चालले पाहीजेत. लहान बाळ पोट भरले की आईने कितीही प्रभाव टाकला तरी तोंड फिरवते. गरजेपेक्षा जास्त ही आसक्ती ! .. तेन त्यक्तेन भुंजिता!या जगाची सर्वात मोठी समस्या ही आहे की... बाळ जसजसे मोठे होते तसतसे त्याचे पोट वयाच्या अनेक पटींत मोठे होत जाते... आणि काहींचे कितीही खाल्ले तरी कधीच पोट भरत नाही. त्यामुळे तोंड फिरवणे सोडाच, पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! :) :(पण असे लोक मिळेल न मिळेल तिथे जबरदस्तीने तोंड खूपसून खात राहतात ! SmileSad१००% बाडीस ! आणि मग अशा लोकांना धर्माच्या कक्षा रुंदावून हव्या असतात ! ( प्रगो , हलके घ्या )