Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

S
Sanjay Kokare
Fri, 01/16/2015 - 11:03
🗣 160 प्रतिसाद
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली.. मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या. मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या.. माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले.. परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल.... काही चुकल्यास क्षमस्व

प्रतिक्रिया द्या
30598 वाचन

💬 प्रतिसाद (160)
स
स्पा Fri, 01/16/2015 - 11:06 नवीन
ऑ... अच्च जाल्ल
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 01/16/2015 - 17:46 नवीन
खिक्क !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
व
विजुभाऊ Sat, 01/17/2015 - 08:27 नवीन
याच्यावर एक रामबाण+ रहीमबाण उपाय आहे इथे एक माईसाहेब आहेत. त्यां / ते स्वतः काहीच लिहीत नाहीत. बहुधा वयोमानामुळे बोटे अडखळत असावीत. मात्र त्या कोणालाही म्हणजे वाजपाई अडवाणी याना देखील " तो अटल , अरे लालकृष्ण असे एकेरी संबोधतात. त्यांच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिलेत तर नाना सुद्धा खूष होऊन तुम्हाला षास्बाकी देतील आणि त्या नंतर बघा तुम्हाला वेळ्गाच अनुभव येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गवि Sat, 01/17/2015 - 09:18 नवीन
म्हंजे:
छान उपाय सुचवलास रे विजू.. नवीन उमेदवारांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे असं हे म्हणतात. काय ते तुमच्या कारपोरेट भाषेत म्हणतात ना मोटिव्हेशन की काय. तेच.
असंच का विजुभौ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ब
बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 08:30 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मोहनराव Fri, 01/16/2015 - 11:11 नवीन
मनावर घेऊ नका हो... be cool...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/16/2015 - 11:18 नवीन
चांगल्या गोष्टींचाही अतिरेक केल्यास दुष्परिणाम होतो असं म्हणतात ! तुमचे लेखन वाचकांना जरा श्वास घेण्यास मोकळीक मिळेस अश्या दमाने (कमीत कमी दोनचार दिवसांच्या अंतराने) टाकल्यास प्रतिसादांत सुधार होऊ शकेल. अहो, श्वास रोखला गेला की कोणीही हातपाय झाडतोच की :) बाकी थोडे दिवस वावरलात की मिपाकरांच्या खोचकपणातील खोडकरपणाची मजा ध्यानात येऊन इथे रुळून जाल !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 01/16/2015 - 11:18 नवीन
तुमचे घागे पाहिले नाहित मी.. कदाचीत बर्याच सदश्यांना कामामुळे जास्त वेळ येथे देता येत नसेल. त्यामुळे आल्यावर ज्या गोष्टी आवडतात ते तिकडे जास्त लक्ष देतात, माझे म्हणाल तर भटकंती नंतर कलादालन आणि राजकारण - चर्चा मला आवडतात मिपावर आल्यावर मी भटकंती सर्वात पहिली पाहतो. नविन असल्यावर थोडा वेळ जावुन द्यावा.. दागा टाकण्यापेक्षा आपण दूसर्‍याचे धागे वाचुन त्याला कसे रिप्लाय देतो हे जास्त महत्वाचे.. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाचन करा.. रिप्लाय द्या .. नंतर तुमचे विचार पाण येवुद्या . आल्या आल्या लगेच लेख (काही प्रॉब्लेम नाही) पण लगेच रिप्लाय ची अपेक्षा कश्यासाठी .. असे असेल तर माझ्या धाग्यावर १०-१२ रिप्लाय असतात म्हणुन मी लगेच मिपाच वाईट म्हणावे का ? धागा हा रिप्लाय साठी नसुन आपले विचार मांडण्यासाठी असावा.. तसेच रिप्लाय चे पण . असो.. हळु हळु सरावताल
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 11:22 नवीन
मी मिपा ला वाईट म्हणत नाही आहे पण तुमच्या कंमेट्स ह्या नविन सदस्यांचा आत्मविश्वास कमी करण्यासारख्या नको यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Fri, 01/16/2015 - 11:54 नवीन
दोन्ही कविता वाचल्या ! छान आहेत.. वर्हाडी भाषेतली आर्त आहे एकदम .. एक कळकळीचे सांगतो! तुमचे वय धाग्यांवरुन अंदाचे २०-२५ च्या आस पास वाटते म्हणुन बोलतो .. ऑनलाईन वाद- संवाद .. त्यावर येणारे प्रतिसाद -- विचार यांना इतके पर्सनली घेवु नका .. लाईफ वेगळे असते.. इतक्यात आत्मविश्वास जात असेन तर तुम्ही त्याची आस बाळगु नका.. आपले विचार मांडण्याचा प्लॅटफॉर्म म्हणुन वापर करा.. मिळालेच एक दोन सोबती तर त्यांच्याशी गप्पा मारा. हे असले आत्मविश्वास वाढवा वगैरे खरेच छान नाही वाटत.. मुळात आत्मविश्वास लगेच गेलाच नाही पाहिजे .. मान्य तुम्ही कष्ट करुन लिहिताय .. त्या लिहिण्यातला आनंद घ्या .. लिहिल्या नंतर तो आनंद इतरांना देण्याचा प्रयत्न करा .. ज्यांना जमेल ते घेतील नाही तर सोडुन द्या .. वयक्तीक लेव्हल ला जर तुम्ही गोष्ट घेणार असताल .. तर एकदिवस तुम्ही या सोशल मायाजाळात तडफडत अडकलेच म्हणुन समजा .. असो.. हा माझा शेवटचा रिप्लाय असेन येथे. तुमचे इतर धागे मी आधी बघितले नव्हते .. कारण दिले आहे. पुन्हा असे धागे यायला नको असे वाटते .. लिहित रहा .. आम्ही वाचत आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Kokare
S
Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 12:11 नवीन
धन्यवाद सर, तुमच्या प्रतीक्रियेबद्दल आभारी आहे व तुमचा सल्ला नेहमी लक्षात ठेवील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ध
धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 11:22 नवीन
मिपा हे नवीन सदस्याकरीता मुळीच अडचणीचे ठरत नाही तर जिलब्यापाडू सदस्यांकरता अडचणीचे ठरते. आता थोडा गंभीर प्रतिसाद. पटतोय तर व्हय म्हणा नाहीतर सोडून द्या. मिपा हे नेहमीच जुन्या/नव्या लेखकांचे स्वागत करते. पण येथे येणारा बहुसंख्य वर्ग हा कोरडवाहू शेतकरी आहे. तो वर्षातून एक किंवा दोनच पिके घेतो आणि तुम्ही पडले बागायती शेतकरी एकाच वेळी चार चार पिके घेणारे. सांगायचा मुद्दा हा की एक / दोन दिवसांत एखादाच धागा / चर्चाप्रस्ताव / लेख टाकावा. तसे केले की एकाच लेखावर लक्ष केंद्रित करणे सदस्यांना सोयीचे पडते आणि सोईप्रमाणे प्रतिक्रिया, सुचना करता येतात. मराठी माणसाचे / जागतिकीकरणाचे विषय किंवा कोणताही मोठा आवाका असणारा विषय मांडण्याअगोदर त्या विषयावरील मिपावरील लेखांवर एक नजर टाका. काही सदस्यांचे प्रतिसाद खरोखरच माहितीपुर्ण असतात तर काही प्रतिसाद फक्त टिंगलटवाळीचे / मजेमजेचे असतात. मुख्य म्हणजे विषय मांडताना तुमची त्या विषयाप्रती कळकळ दिसू द्या. नुसतेच टाळ्या मिळविणारी / पुस्तकी छापाची वाक्ये इथल्या लोकांना आवडत नाहीत. जेव्हा तुम्ही (किंवा हवतर मी म्हणा) बाजारात माल विकायला आणतो (उदा. आंबे) तर चार जण तो दाबून बघतील, दोन जण नाकाला लावून वास घेऊन बघतील. एखादाच विकत देखील घेईल. तेव्हा हताश न होता बाजारात उभे राहत चला. अर्थात लिखाण चालू ठेवा. तुमचा माल चांगला असेल तर नक्कीच विकला जाईल. आज बर्‍याच जणांचा सुर हेटाळणीचा वाटला तरी नंतर तुम्हाला इथूनच तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण / मित्र सापडतील याची खात्री बाळगा. तेव्हा कीप ईट अप. निराश होऊ नका आणि आम्हालाही निराश करु नका.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 01/16/2015 - 11:22 नवीन
जुनी लोकं सांगत्यात.. सरवायवल आफ डी फिटेस्ट काकायतर.. येत रहा सवय होईल
  • Log in or register to post comments
S
Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 11:28 नवीन
मला कोठे माहीती होते की येथे लेख टाकण्यास पण मर्यादा आहेत
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/16/2015 - 11:30 नवीन
गैरसमज नसावा. ही मर्यादा मिपाच्या कायद्याची नाही तर सर्वसाधारण सारासारविवेकाची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Kokare
अ
अजया Fri, 01/16/2015 - 11:45 नवीन
अहो,तुमच्यावर अनेक वस्तुंचा एकदम भडिमार केला किंवा एक एक थोड्या दिवसानी दिली तर काय फरक असेल विचार करा.पहिलाच लेख वाचुन लोकांना अंदाज घेऊ द्या.तुमचे लिखाण सकस असेल तर त्याला प्रतिसाद वाचनं मिळतीलच.हळूहळू एकेक धागा टाका.लहान मूल खेळण्याची टोपली एकदम उलटं करुन बसतं तसं सगळे साहित्य प्रकार एका दमात टाकून खेळू नका.अारामात.मिपा कुठे जात नाही.टाकत रहा एक एक प्रकार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Kokare
प
प्रमोद देर्देकर Fri, 01/16/2015 - 11:41 नवीन
अरे बापरे तुम्ही तर एकदम षटकारच ठोकलात की.... तुंमच्या धाग्यांवर धिंगाणा घांलणारे नां हें पुंणेकर असावेत बरिक कांय संमजंले. ते असेच असतात नविन कोणी आलं की... :-))) जावुद्या तुम्हाला समजेल ह ळु ह ळू. तुम्ही तुमची ताठ ठेवा मान म्हणतोय मी. अजिबात घाबरु नका नाउमेद होवु नका. बाकी साहेबांनी किती दिवसांची रजा दिलेय तुम्हाला? नाही म्हणजे एका दिवसात एवढ्या जिल्ब्या पाडताव ते. बाजारातली साखर महागली की.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 11:45 नवीन
झालं ! जिथंतिथं पुण्याचीच लाल करा राव. मिपा पुणे पकडून होल वर्ल्ड मधे फेमस आहे म्हटलं. जरा क्रेडीट बाकीच्यांनाही द्या की !
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 01/16/2015 - 11:47 नवीन
कोकरे साहेब तुमच लिखाण वाचल आहे या पुर्वी . चांगल लिहिता . फ़क़्त वर्तमान पत्र वाचक आणि मिपा वाचक यांच्या प्रकृती मध्ये फरक आहे . तो तुम्हाला अनुभवाने कळेलच . फ़क़्त थोडा gap राहू द्या दोन लिखाणामध्ये . बाकी तुमच्यात क्षमता आहेच . Just keep floating .
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 01/16/2015 - 11:54 नवीन
तुम्ही भटकंती का नाही टाकलीत हो एखादी? मला भटकंतीसंबंधी लेख खूप खूप आवडतात. लिहा ना प्लीज.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/16/2015 - 11:58 नवीन
भटकंती बरोबर एखादी पाकृ पण येउन जाउदे. (अंडी घालुन) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
निवेदिता-ताई Fri, 01/16/2015 - 18:01 नवीन
हा हा हा ।। असेच म्हणते । येऊ द्या पाकृ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
S
Sanjay Kokare Fri, 01/16/2015 - 12:09 नवीन
भटकंती साठी सुद्धा मि लेख लिहीला आहे पण आताच मिपा वर टाकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 13:14 नवीन
मला उत्क्रांती आणि अध्यात्म यावर चर्चा करायला आवडते. या विषयांवरही काही लिहा ना. आणि तुमचे लेखन वर्तमानपत्रात छापून येत असेल तर त्याची कात्रणे इकडे चिकटवा. आमचे शेतागंमु सर तसेच करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Kokare
स
स्पा Fri, 01/16/2015 - 13:17 नवीन
मला भयकथा वाचायला खूप आवडतात, लिहा न मस्त भयकथा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
य
यसवायजी Fri, 01/16/2015 - 15:22 नवीन
मला मोजी कथा फार आवडतात. लिहा ना एखादी मोजीकथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 15:25 नवीन
मोजी कथा फक्त मोजीच लिहू शकतात. सको कसे लिहितील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
य
यसवायजी Fri, 01/16/2015 - 15:44 नवीन
मग तुमच्या सखूला विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सूड Fri, 01/16/2015 - 15:48 नवीन
माझ्यासाठी एक बालगीत, ईसापनीतीतल्या गोष्टी टाईप गोष्ट, पंचतंत्र आणि मांजरीने बाईकच्या सीटवर नखे मारु नयेत म्हणून उपाय असलेला लेख, याहून मागणं लई न्हाई!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 15:49 नवीन
आमच्या सखूने आमच्या घरचं काम सोडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
श
शैलेन्द्र Sat, 01/17/2015 - 17:59 नवीन
आह्हाहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 01/17/2015 - 18:15 नवीन
तो तुमच्या काव्याचा परिणाम आहे... उगाच बिचार्‍या सखूला दोष देऊ नका *unknw* ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चेतन677 Fri, 01/16/2015 - 17:01 नवीन
भयकथा आवडतात तर माझी कथा वाचा की ओ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/16/2015 - 17:09 नवीन
स्पा स्वतः भयकथा प्रसवतो. =)) उदा पुर्वीचे ते आणि आत्ताचे धागा पहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन677
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/16/2015 - 15:51 नवीन
उत्क्रांती,....!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 15:53 नवीन
मला उत्क्रांतीसाठी अत्यावश्यक असणार्या गोष्टीबद्दल वाचायला आवडेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Mon, 01/19/2015 - 08:33 नवीन
च्यामारी कलादालनाकडे कुणी बगतच नै. तिथे काहीतरी टाका ना गडे. (म्या बी सुरुवात तिथंच केली व्हती. कोण बी फिरकले नाही :( पण कोण कंपूबाजी बी केली नै. रुळलो मग हळू हळू )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कपिलमुनी Mon, 01/19/2015 - 09:27 नवीन
काहीतरी टाका ना गडे ? नक्की काय टाकायचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चिगो Fri, 01/23/2015 - 07:27 नवीन
काहीतरी टाका ना गडे ?
हा हा हा.. ;-) ह्यावरुन "नवरा माझा नवसाचा" मधलं 'चला ना गडे, चला ना गडे' हे गाणं आठवलं. काव्यातला कोणता अलंकार आहे तो? "श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी" वाला? अनुप्रास का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
वामन देशमुख Fri, 01/23/2015 - 19:21 नवीन
काहीतरी टाका नागडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/16/2015 - 15:52 नवीन
मला युद्धकथा आणि गुप्तहेरकथा वाचायला आवडतात. एकेक लिहा ना (गडे) सखोल अभ्यास करुन =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Sanjay Kokare
ट
टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 15:54 नवीन
एकेक लिहा ना (गडे) सखोल अभ्यास करुन
अर्रे...नया हय वह...त्यांनी "तशीच" लिहिली तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 15:57 नवीन
अरे क्या नया हय वह नया हय वह लगाके रक्खा हय. उनका लेख पेपर मे छापके आया हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 15:59 नवीन
मग क्या हुवा...मिपावर नया हय वह...इदर सगळेच उनको टेम्प्युत बशीवते हय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 01/16/2015 - 16:01 नवीन
अबी आपीच देखो. उनके अभ्यास पुर्ण लेखन की किसिको कदरच नय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/16/2015 - 16:11 नवीन
उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... उनके अभ्यास पुर्ण लेखन की है हमको कदर... वाचनेका तो वाचो नै तो रस्ता सुधर... -कवीहृदयसम्राट तेच ते (स्पा चे ते नाही)-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गवि Fri, 01/16/2015 - 11:59 नवीन
..बरोब्बर.. मिपाकर अत्यंत हलकट आहेत.. पण त्यांच्यावाचून राहवतही नाही. ..तुम्ही टाका हो लेख..
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 01/16/2015 - 12:53 नवीन
गवि तुम्ही पण सुरुवातीच्या काळात परा आणि मी कसा त्रास दिला याबद्दल कचकचुन शिव्या घालणारा एक लेख लिहा बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Fri, 01/16/2015 - 12:58 नवीन
..अगदी अगदी..बोटं शिवशिवताहेत नुस्ती. संजयसाहेब... ..हा मृत्युन्जय तर फार फार वैट्टपैकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ध
धर्मराजमुटके Fri, 01/16/2015 - 13:00 नवीन
गविंचे लिहिणे जरा सोज्वळच हो ! त्यांच्याच्याने कचकचून शिव्या घालणारे लिखाण व्ह्यायचे नाही. किंबहूना त्यांनी शिव्या दिल्या तरी त्या कानाला गोडच लागतील. तेव्हा ते काम तुम्हीच करा बरे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा