मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या.
मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला.
मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली..
मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या.
मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या..
माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले..
परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल....
काही चुकल्यास क्षमस्व
💬 प्रतिसाद
(160)
ल
लंबूटांग
Fri, 01/16/2015 - 17:13
नवीन
गेले? कधी?
आयेंगे मेरे संजय संजय आयेंगे.
संजय ह्या नावाचाच हा महिमा आहे का? ते सामना मधे पण एक संजय असेच काही काही अभ्यासपूर्ण लिहीतात रोज. प्रत्येक वाक्यात सरासरी ३ विशेषणे वापरलीच पाहिजेत असा काहीसा नियम आहे म्हणे.
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
Fri, 01/16/2015 - 17:48
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
च
चेतन677
Fri, 01/16/2015 - 16:32
नवीन
चांगले वाईट अनुभव येतच असतात..जास्त विचार नका करु..
- Log in or register to post comments
त
तिमा
Fri, 01/16/2015 - 16:34
नवीन
मिपावर येताना, नांवच एकदम 'कडक' घ्यायचं. आन, पायाने जमीन उकरतच यायचं. लोकांना तुमचा दबदबा वाटला पाहिजे. शिवाय महत्वाचं म्हणजे लेखन हे एकतर 'उच्च' नाहीतर 'हुच्चं' असलं पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे, दोन मुलांत योग्य अंतरही ठेवावे.
लिहित रहा.
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 01/16/2015 - 16:44
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 01/16/2015 - 19:02
नवीन
ठ्ठो =))
दोन मुलांत आणि दोन अवतारांतही योग्य अंतर ठेवावे, तसेच वर्तनही अंमळ वेगळे असावे. नायतर लग्गेच अवतारामागचा देव ओळखल्या जातो. मग तो थिंकर कितीही ग्रेट असो नायतर कसाही नेफळट असो नायतर कुणी माईसाहेब असो.
- Log in or register to post comments
H
hitesh
Sun, 01/18/2015 - 17:58
नवीन
णाणा व मै मीच असे सर्व म्हणत होते.
पण ते खोटे आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 08:33
नवीन
तुमची गोष्टच वेगळी हितेशसाहेब.
पूर्वीचे जामोप्या = उद्दाम = पोटे = हितेश = तुम्ही.
- Log in or register to post comments
ज
जातवेद
Fri, 01/16/2015 - 16:53
नवीन
हा शांतेचं कार्ट चालू आहे मधला संवाद तुमच्यासाठी,
श्यामः तुम्ही मला एक वचन द्या.
मिस माया साने: कसलं वचन?
श्यामः घाबरू नका मला मदत करायचं.
मिस माया साने: हा, ते दिलं.
श्यामः आता तुम्ही या घरात राहणार कि नाही, मग तुम्हाला तुमचे नाव बदलावं लागेल.
मिस माया साने: काय हो, तुम्ही सगळेजण ईथे नाव बदलून राहता?
श्यामः नाही, आम्ही सगळे एकमेकांना नावं ठेउन राहतो. :D
- Log in or register to post comments
भ
भाकरी
Fri, 01/16/2015 - 16:56
नवीन
तुम्हाला अजून आजची कविता, राजकारण सदरात लेख, झालच तर जनातल मनातल मधे काहितरी अस ब्रच काहि ल्हायचय. प्रतिक्रियाकदडे कुठे लक्ष देतात? चक्की चालु ठेवा.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 01/16/2015 - 16:59
नवीन
म्हणजे मग आतल्या आत पीठ* पडेल. *lol*
*जरी बसलो दाबून नीट, आतल्या आत पडतंय पीठ
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/16/2015 - 17:11
नवीन
तांबीय सांप्रदायिक काव्यही लिहुन बघू शकता आपण.त्यासाठी मार्गदर्शनही इथेच मिळेल.मठाधिपतींशी ओळख काढल्यास त्यांचे शिष्य म्हणून इतर भक्तगण प्रतिसादाच्या प्रसादाने प्रसन्न करतील तुम्हाला.जय तांबे बाबा =))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/16/2015 - 17:12
नवीन
=))
तांबीय मठाधिपतींना एक टवाळ शिष्य लाभलाय असं ऐकण्यात आलेलं आहे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/16/2015 - 19:06
नवीन
=))
- Log in or register to post comments
च
चेतन677
Fri, 01/16/2015 - 16:59
नवीन
तुमची कविता खुप आवडली...असंच लिहीत राहा..आणि काही मिपाकर जर तुमची चेष्टा करत असतील तर जास्त विचार नका करु..तसे सगळे मिपाकर मनाने एकदम चांगले आहेत..मदतीसाठी याच मिपाकरांचे हात लगेच पुढे सरसावतात..या सर्वांची मला सगळ्यात जास्त मदत झालीये..
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 01/16/2015 - 17:04
नवीन
अभ्यासपूर्ण लिहिलं की इतरांना काही शंका, झब्बू, दंगा करायला राहतच नै ना. यापुढं अभ्यासनपूर्ण लिहित चला म्हणजे तुंबळ हाणामारी होईल प्रतिसादांची.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Fri, 01/16/2015 - 17:27
नवीन
अता काय सेन्चुरी लावता काय पदार्पणातच..!! भारीये.. :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 01/16/2015 - 17:40
नवीन
त्यांच्या इतर अभ्यास पुर्ण लेखांवर चर्चा करायची सोडून तुम्हाला त्यांनी कळवळ्याने लिहिलेल्या धाग्याची सेंचुरी करायची पडली आहे. असंवेदनशील कुठचे.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Fri, 01/16/2015 - 18:43
नवीन
*lol*
तुम्ही त्यांना पदार्पणातच "सखू"ची ओळख (आणि आमाला आठवण ;)ओळख करून दिलीत, तेव्हा कुठे गेली होती तुमची संवेदनशीलता.. ?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 01/17/2015 - 02:50
नवीन
यसवायजीने सखुची आठवण करुन दिली त्यामुळे मन संक्लीद्य झाले. तसे काव्य मी त्याआधी प्रसवले नव्हते, आणि त्यानंतरही नाही...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 08:34
नवीन
ठ्ठो =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 01/19/2015 - 09:33
नवीन
याला आक्षेप.
आनंद मरते नही वैसे "सखू" विस्मरते नही !!!
बाबू माताय.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/16/2015 - 18:12
नवीन
१००
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Fri, 01/16/2015 - 18:57
नवीन
१०१
- Log in or register to post comments
श
शेखर काळे
Sat, 01/17/2015 - 04:04
नवीन
तुम्हाला आवडतं म्हणून लिहिता की लोकांनी तुमचे कौतुक करावे म्हणून ?
तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयावर तुम्ही जर लिहिलं, मनापासून लिहिलं तर लोकांना आवडेलंच की ..
- शेखर काळे
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
Sat, 01/17/2015 - 04:38
नवीन
नक्कीच
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 01/17/2015 - 09:59
नवीन
माईसाहेब मोड ऑनः
अरे संजया, लगेच इतका निराश होऊ नकोस रे बाळा. इथले काही सदस्य ना खूप खोडकर आहेत बाई आणि नवीन माणसाची ते खूप टर उडवतात. पण हे म्हणतात की जीवनात थोडी तरी थट्टामस्करी पाहिजेच नाही तर जीवन अगदीच एकसुरी व कंटाळवाणं होईल.
माईसाहेब मोड ऑफः
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 01/17/2015 - 10:18
नवीन
माईंचे हे राहिले की वो ;)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 01/17/2015 - 10:40
नवीन
माईंचे काय राहिले?
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Sat, 01/17/2015 - 11:24
नवीन
ये टका .. नीट वाच की .. हे पण आलेत हं. गुर्जींची आणि नानांची गहिरी दोस्ती होती(आहे) म्हणे.
गुर्जी माईंना वैनी म्हणित जा हो.. *lol*
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 01/17/2015 - 17:05
नवीन
एव्हढा जिव्हाळा नवमिपाकरांबद्दल दाखवलात तर त्यांच्यावर असे धागे काढायची वेळ येणार नाही.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Mon, 01/19/2015 - 11:39
नवीन
सगा उर्फ धनाजीराव, आमी सोता नव-मिपाकर (आणि नव-कवी, नव-विडंबक इ.इ.) आहोत हो. त्यामुळे एक नवमिपाकर दुसर्या नवमिपाकराशी बंधुभावाच्या जिव्हाळ्याने जोडला गेलेला आहे ( जाऊ देत, ते तुमच्यासारख्या कंपुबाजास नाही कळावयाचे.. ;) ) .
गुर्जी आणि नानांचा स्नेह आम्हास नेहमीच लोभवत आला आहे, त्यात काय एवढे.. :)
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sat, 01/17/2015 - 18:11
नवीन
माईंच वय झाल बहुदा.. मोड यायला लागले..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 08:34
नवीन
अश्लील =))
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 01/19/2015 - 16:54
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 01/17/2015 - 16:44
नवीन
=))
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 01/18/2015 - 06:18
नवीन
श्री.संजयजी कोकरे साहेब,
प्रथमतः तुमचे अभिनंदन,ज्याप्रकारे तुम्ही हा लेख लिहुन एका अन्यायाला वाचा फोडली आहे त्यास तोड नाही.
ज्या प्रमाणे महाभारातील संजय युद्धभुमीचे वर्णन करायचा,
ज्या प्रमाणे सामना चे संजय विरोधकावर तुटुन पडतात,
ज्या प्रमाणे आमचे हेवनवासी गुर्रदेव लोकांना भ्रमातुन बाहेर काढायचे,
त्याच प्रमाणे तुम्ही नवीन मिपाकरांवर होणर्या अन्यायावर लेख लिहीला आहे.
आज आल्यावर प्रथम तुमचे सर्व लेख वाचले.सर्व लेखांबद्दल ईथेच टोपी काढुन सलाम.
असेच लेख लिहीत रहा.आमची संघटना तुमच्या पाठीशी आहे.गरज भासल्यास यावर एक आंदोलन हि करु,
तसाही पयल्या आंदोलनाला बराच काळ लोटला आहे.सध्या कार्यकर्त व्यस्त आहेत वेळ मिळाला की आंदोलनाची दिशा ठरवु.
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ नये या साठी थांबतो.
जाता जाता- हाफ शेंच्युरी निमीत्त श्री आदुबाळ यांनी तुमचा सत्कार केला आहे.त्या बद्दल त्यांचे आभार आणी आता
शेंचुरी निमीत्त तुमचा आणी श्री.आदुदादु यांचा सत्कार (काय द्यावे बर!!) करण्यात येत आहे.
.
.
कळावे आपला नम्र.
जेपी,
गाव- लातुर
तालुका- महाराष्ट्र
जिल्हा- भारत
जय हिंद ,जय मिपा.
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Sun, 01/18/2015 - 06:26
नवीन
+१
बरं झालं तुम्ही आवाज उठवलात संजयजी! आमच्यात तुमच्या इतकी हिंमत नव्हती मिपावर नवे आलो तेव्हा!
आता मात्र तुम्ही पिच्छाच पुरवा या अच्रत मिपाकरांचा., खोड मोडा मेल्यांची!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/18/2015 - 06:31
नवीन
नुस्ते अच्रत नाही..."अच्रत बव्लत" =))
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 01/18/2015 - 19:15
नवीन
खोड मोडा मेल्यांची! हे वाचून हसल्या गेले आहे.
संजयजींनी आभार मानलेत त्यावर आणखी हसू आले. तुमची चेष्टा करण्याचा हेतू निदान माझा तरी नाही.
जेपी, शेंचुरीबद्दल उसाची मोळी दिली तरी चालेलसे दिसते.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 01/19/2015 - 08:42
नवीन
हो हो.. मोडाच आता!!!!
=))
- Log in or register to post comments
S
Sanjay Kokare
Sun, 01/18/2015 - 10:12
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Sun, 01/18/2015 - 15:56
नवीन
तुम्ही मिपावर नवीन असला तरी आभासी जगतात नक्कीच चार पावसाळे पाहिलेले वाटतात.
पदार्पणातच लक्ष वेधून घेऊन सनसनाटी निर्माण करण्यासाठी
हा धागा काढला ,
येथे कोणताही आयडी जिलब्या पाडाव्या तसे धागे पाडताना दिसत नाही मात्र तुम्ही त्या पाडल्या.
अनेक नवीन आयडी ही चूक करतात
तुमचे नशीब थोर आहे तुम्ही सध्या मिपावर आला आहात
सध्या मला येथे कंपू बाजी अजिबात दिसत नाही आहे त्यांचा बाजार केव्हाच उठला
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/20/2015 - 04:26
नवीन
पदार्पणाटंच शभंरी भरवणारे आणि जेष्ठ सदस्यांच्या "जुलमी" राजवटीविरुद्ध आवाज उठवुन नौमिपाकंरासं स्वातत्र्यांचे किंरण दाखवणांरे स्वातत्र्यंसेनानी, तसेच लेखप्रसवरत्न लेखकश्रेष्ठ नौमिपाकर श्रीं.श्रीं. सजंयजी ह्यांना विनम्रं प्रणांम.
आपल्यां ह्या प्रयत्नासं याक्टीव पाठिंबा म्हणुन दिनाकं १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारीरोजी कंशेंळें येथे मेंणंबंत्तीं मोर्चा काढण्यांचा ठराव आमच्या अस्तित्वात नसलेल्या कपुंने केलेला आहे. तरी आमच्या दुकानातुन एक एक बॉक्स मेणबत्त्या विकतं घेउन ह्या स्वायत्तातत्रं आदोंलनास सक्रीयं पांठिबां द्यावा ही नम्र विनंती. पेश्शल ऑफर एंक बॉक्स मेणबंत्तीवर १ कांडेपेंटी फ्री. आणि एक गिफ्ट कुपन ज्यात तुम्ही जिकुं शकतां जींवंनं ह्यांनां कंळंलें हों ह्या कुंथांसंग्रंहांचीं एंकं लिंमिंटेंडं काँपीं.
त्वंरां कंरां. ऑफर सं.मं.ची वक्रदृष्टी वळेपर्यंत किंवा जेष्ठ सभासदांनी कंपुंसेंनां घेउन "ब्लित्झ क्रिग" करेपर्यंतचं लांगुं.
(जेंष्ठंही नै आणि नौमिपाकरही नै अश्या कात्रीत अडकलेला आणि जीवनकथांमधला गुंढं अर्थावर पिंपळ्गाव ढेम्शे विंटर्नॅशनल उणिव-सिटी मधुन पींएचंडीं करणारा) कॅफ्टन खिक्क पारो!! =))
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/20/2015 - 05:07
नवीन
मेणबत्त्या आणि काडेपेट्या होलसेलमधे मी देते. कमिशन किती ते बोला!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/20/2015 - 05:12
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 01/20/2015 - 05:12
नवीन
तुमचा आयडी अगदी सार्थ आहे असे एक निरिक्षण विनम्रतेने नोंदवतो.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 01/20/2015 - 05:33
नवीन
अर्थात काडेपेटीसह अनुदानात मिळाव्यात. किमान ३३% टक्केतरी..
(नव्-कवी,नव्-मिपाकर्,नव्-मिपासाक्षर्,नव्-मिपासाक्षर-भित्-प्रतिसादक्,कुंथीत कवीता साक्षर) संघ यांचे तर्फे जोर्दार मागणी.
अन्यथा (मोजून ३३) मिनिटांचे उपोषण केले जाईल हा जाहीर इशारा.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 01/20/2015 - 05:33
नवीन
आमचे अणूमोदन आहे !!!
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 01/20/2015 - 05:35
नवीन
सर्कारी प्याकेज नको का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »