Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाद्यभ्रमंती - पुणे

न
नांदेडीअन
गुरुवार, 01/22/2015 - 06:46
🗣 251 प्रतिसाद
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !


प्रतिक्रिया द्या
124207 वाचन

💬 प्रतिसाद (251)
क
कपिलमुनी गुरुवार, 01/29/2015 - 10:24 नवीन
+१०० अनपेक्षित लॉटरी लागलेले ठिकाण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मी-सौरभ Wed, 01/28/2015 - 09:54 नवीन
मनपा जवळ्च सुदामा लई भारी आहे :')
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/29/2015 - 10:26 नवीन
धागा खाद्यभ्रमंती बद्दल आहे ! बाकी पेयभ्रमंतीच्या धाग्यामध्ये पण जबर्‍या पोटेन्शियल आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
य
यशोधरा Wed, 01/28/2015 - 15:16 नवीन
मस्तच धागा. लग्गेच वाचनखूण साठवली आहे!
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Wed, 01/28/2015 - 15:24 नवीन
ममता डायनिंग हॉल रविवारी जाणं झालं। अनुभव तितका बरा नव्हता। १४०रु.थाली.सीताफल रबड़ी होती, पण पाणचट होती.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 06:12 नवीन
किंमतीच्या मानाने बरेच आहे की. सिताफळ रबडीबाबत मात्र सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
म
मधुरा देशपांडे Wed, 01/28/2015 - 21:56 नवीन
वर बरेचसे आलेत. अजुन थोडी अ‍ॅडिशन. १. शुक्रवार पेठेत केळकर संग्रहालयाच्या जवळचे बापट उपहारगृह. इथली कारल्याची भाजी, भाकरी, मटकी आणि मटार उसळ एकच नंबर. होस्टेलला असताना घरचे असे काही खायला मिळावे असे वाटले की बापट फिक्स असायचे. आणि हो, इथेच अस्सल पुणेरी पाट्या पण बघायला मिळतील. फुकटात. ;) २. जेएम रोडवर सुप्रीमची पावभाजी. फक्त खूप ताटकळत वाट बघावी लागते. त्यामुळे हल्ली नको वाटते. ३. कमला नेहरु पार्कजवळ सकाळी साबुदाणा खिचडी, उपमा, पोहे सगळेच भारी मिळते. इथेच संध्याकाळी मिळणारे चाट, खास करुन पाणी पुरी. आणि खास म्हणजे बासुंदी चहा. हा बासुंदी चहा तर प्यायलाच हवा. अप्रतिम असतो. ४. लॉ कॉलेज रोडवर श्रीकृष्ण हॉटेल मधली दाल खिचडी. इथली थाळी नाही आवडली विशेष. ५. एरंडवणेत गणेश भेळच्या जवळच एका गल्लीत असलेले मानकर डोसा. त्यांचा चीज कट डोसा आणि चटणी. इतरत्र कुठल्याच मानकर डोश्याच्या दुकानात अशी चव नाही. ६. वर खत्री मस्तानीचा उल्लेख आला आहेच. त्यांची गुलकंद मस्तानी आवडती. ७. मॉडेल कॉलनी/शिवाजीनगर मध्ये (खूप आत खोपच्यात आहे हे हॉटेल. नेमका रस्ता सांगणे अवघड आहे) राधिका व्हेज. पुर्वी इथला मसाला पापड ऑस्सम होता. आता नाही. पण बाकी कुठलाही पदार्थ घेतला तरी उत्तम. ८. जहांगीर हॉस्पिटलजवळचे वहुमन कॅफे. अजुन आठवले तर लिहितेच.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 01/29/2015 - 05:24 नवीन
कमला नेहरु पार्कजवळ सकाळी साबुदाणा खिचडी, उपमा, पोहे सगळेच भारी मिळते. >>>>>>> आता नाही मिळत वाटतं. २ वर्षांमागे बऱ्याच टपर्या बंद केल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 01/29/2015 - 10:33 नवीन
ओह ओक्के. कित्येकदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्त्यासाठी चांगले होते. :( प्रतिसादात विसु लिहायची राहिली. ही सगळी माहिती दोन वर्षांपुर्वीची. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी
स
स्रुजा गुरुवार, 01/29/2015 - 20:17 नवीन
यादी भारी. तू आणि मी अनेकदा आजू बाजूने गेलो असणार. तुझ्या आणि माझ्या (सगळ्याच) फूटस्टेप्स फार च जुळतायेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे
प
पिंपातला उंदीर Fri, 01/30/2015 - 05:35 नवीन
कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर च्या कमानीमधून आत जायचं . उजव्या बाजूला झकास non-veg नावाच छोट शॉप कम टपरी आहे . फ़क़्त संध्याकाळी ७ ते ९ या वेळात उघडी असते . फक्त पार्सल मिळत . तिथल्या चिकन ची चव कातिल असते . कोथरूड मधल्या लोकांनी लाभ घ्यावा . दोन तासात चिकन संपत . तेल मसाले तिखट याचा सढळ वापर असतो . जहाल चव असते . त्याच्याकडे पोळ्या असतात . त्या पण छान . कधी मधी फिश पण असत . ह्याची टपरी पहिले मोरे विद्यालय स्टोप समोर होती .
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 06:15 नवीन
आज रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Fri, 01/30/2015 - 06:18 नवीन
कशी वाटलि चव ते टाका इथे. जमल तर फोटु. इकडे चिन्च्वडात आल्या पासुन लै मिसुन राहिलो त्या चविला
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 06:33 नवीन
नक्की टाकतो फोटो. चव चांगली नसेल तर इंटरनेटच्या बॅन्डविड्थसहित जेवनाचे पैसेसुद्धा तुमच्याकडून वसूल करण्यात येतील. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Fri, 01/30/2015 - 06:43 नवीन
चव चान्गली असेल तर काय देनार? तिथलि एक डिश प्रायोजित करा आम्च्या साठि *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 06:47 नवीन
चव चांगली असेल तर तुमचे जाहिर आभार मानणार आणि झोमॅटोला रिक्वेस्ट करणार या टपरीला ऍड करण्यासाठी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Fri, 01/30/2015 - 06:50 नवीन
मायला म्हन्जे आम्च्या नशिबि नुसते कोरडे शब्द आणि तुम्हि रस्सा हाणनार *lol* *LOL*
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 17:15 नवीन
भाऊ... भाऊ... भाऊ... निव्वळ अप्रतिम होते हो !!! ग्रेव्ही दिसायलाच फार तिखट दिसत होती, पण प्रत्यक्षात असायला हवी तितकीच तिखट होती. १२० रूपयात एक मोठी वाटी भरून रस्सा आणि ७-८ छोटे छोटे चिकनचे पिसेस होते. अधाशी म्हणा किंवा हावरट म्हणा, पण सांगतोच. पोळ्या संपल्या होत्या आणि रस्सा बराच उरला होता. तशीच वाटी लावली तोंडाला आणि रस्सा संपवून टाकला. तृप्तीचा ढेकर देऊनच हे सगळे टाईप करतोय. एक अड्डा मिळवून दिला राव तुम्ही. दर १०-१५ दिवसाला तिकडे जायला काहीच हरकत नाही आता. खूप खूप धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 01/31/2015 - 04:50 नवीन
धन्यवाद . भारीच आहे जागा ती . किंमत थोडी वाढलेली दिसते पण . मी ९० रु. प्लेट पार्सल न्यायचो . पण तुम्ही फोटू टाकणार होते राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 05:52 नवीन
घरच्या प्लेटमध्ये काढलाय हो फोटो. चपातीसुद्धा फारशी फोटोजेनिक दिसत नव्हती म्हणून टाकला नव्हता फोटो. :D
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Sat, 01/31/2015 - 10:44 नवीन
मोक्ष मिळाला . एवढी कातिल डिश बाजूला असताना पोळी कडे लक्ष कोण देणार ? आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 06:52 नवीन
एफ.सी. रोडवरचे कॉर्न क्लब तर सगळ्यांनाच माहित असेल. एकदम स्वस्त आणि जबरदस्त ! माझ्या वडिलांना मका खूप आवडतो. साधारण वर्षभरापूर्वी त्यांना एकदा तिथे घेऊन गेलो होतो. फॅन झालेत ते आता कॉर्न क्लबचे. ते पुण्याला आले आणि त्यांनी मला कॉर्न क्लबला घेऊन जाण्याचा आदेश दिला नाही असे होत नाही. पुण्याहून नांदेडला जाताना इथले पार्सल घेऊनच आम्ही गाडीत बसतो. इथले स्विट कॉर्न सूप, कॉर्न पॅटिस, कॉर्न हुर्डा हे माझे फेवरेट पदार्थ. पिझ्झा आणि टिक्की चाटसुद्धा चांगले आहेत.
Image removed.

Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/30/2015 - 07:04 नवीन
कॉर्न क्लब या एका वेगळ्याच आणि छान कल्पनेतून आलेल्या रेस्टॉरंटच्या पूर्वी खूप शाखा होत्या. मुंबई ठाण्यातही. आम्हीही त्याचे फॅन्स होतो. नंतर धडाधड बंद पडत गेल्या. त्यालाही किमान आठदहा वर्षं झाली. का अयशस्वी झालं असेल याचा विचार नेहमी मनात यायचा. चव तर चांगली होती. पण मला वाटतं की मोनोक्विझिन म्हणता येतील असे एकाच पदार्थाचे डेरिव्हिटिव्ह्ज हा प्रकार ग्राहकांना पुन्हापुन्हा खेचून आणण्यात कमी पडत असावा. जरी पिझ्झा, सँडविच, कॉब्ज आणि अन्य बरेच काही ठेवले तरी ज्यात त्यात कॉर्नच शेवटी .. "सर्वातमका शिवसुंदरा" अप्रोच नंतर कंटाळवाणा होत असावा खाणार्‍यासाठी. व्हरायटी हवीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
च
चिगो Sat, 01/31/2015 - 15:07 नवीन
"सर्वातमका शिवसुंदरा" अप्रोच
=)) :D कसली म्हणजे कसली हुच्च कोटी आहे ही, गवि.. पुनरपि फॅन झालो तुमचा.. अवांतर : पुढचा लेखसंग्रह/पुस्तक कधी काढताय मालक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ज
जागु Fri, 01/30/2015 - 07:07 नवीन
फोटो पाहून पुण्याला खास खाद्यभ्रमंतीसाठी येण्याची इच्छा झाली आहे.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 07:17 नवीन
शेगाव कचोरी.. गुणवत्तेसाठी ISO चे मानांकन मिळाले आहे या कचोरीला. खरंच नेहमीपेक्षा वेगळी आणि टेस्टी आहे इथली कचोरी. पत्ता : डेक्कन बस डेपोच्या बाजूच्या गल्लीत. या कचोरीबद्दल इथे अधिक वाचता येईल.
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 01/30/2015 - 07:20 नवीन
ठाण्यातही आहे यांची शाखा. खरोखर खुसखुशीत अन टेस्टी. पण प्र चं ड तेल प्यायलेली. ISO गुणवत्तेसाठी की प्रोसेस कम्प्लायन्ससाठी अशी शंका ते तेल पाहून येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ब
बॅटमॅन Fri, 01/30/2015 - 11:49 नवीन
आयेसो हे गुणवत्तेसाठी नस्तेच मुळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Fri, 01/30/2015 - 11:59 नवीन
तेच.. आय मीन मूळ शेगाव एसटी कँटीनने जारी केलेल्या प्रोसेसनुसार बनवले जाते असे सिद्ध होत असावे फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय Fri, 01/30/2015 - 12:37 नवीन
शेगाव कचोरीबद्दल (पुण्यात मिळणार्‍या) माझे काही फारसे चांगले मत नाही, म्हणजे इतर ठिकाणी मिळणार्‍या कचोरीपेक्षा बरीच बरी आहे. पण एकदा इंदौरची कचोरी खाल्ल्यावर जगात इतर कुठलीही कचोरी आवडत नाही. इंदौरी कचोरी जवळपास जाणारा प्रकार पुण्यात औंधला (जयहिंद शेजारी) इंदौर स्पाइस मध्ये मिळतो. बरीच चांगली आहे. कचोरी १० रुपये आणि कचोरी चाट १५ रुपये. खाली कचोरी चाटचा फोटो देत आहे. चांगली होती. पण नुसती कचोरी जास्त चांगली आहे (त्याचा फोटो नाही) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रचेतस Fri, 01/30/2015 - 13:00 नवीन
पुण्यातली जगात भारी अशी कचोरी अप्पा बळवंत चौकात रतन मिठाईवाल्याकडे मिळायची. इतका तुफान धंदा चालत असूनही रतनवाल्याची जागी आज पुस्तके/स्टेशनरीचे दुकान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
महासंग्राम Wed, 11/04/2015 - 09:03 नवीन
अगदी बकवास शेगाव कचोरी च्या नावाला बट्टा लावलाय या दुकानाने … भंगार स्टाफ, अस्वछ्पणा सगळाच भंगार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
स्मिता चौगुले गुरुवार, 11/10/2016 - 10:23 नवीन
सहमत .. इथे वाचून खास कचोरीसाठी गेले होते या भागात , तेही नवर्‍याला सोबत चलण्याचा आग्रह करुन . कचोरी खाल्ली आणि माझा आग्रह किति फोल होता हे मला त्या चविमुळे आणि नवर्‍याच्या 'याचसाठी केला होता अट्टाहास' (उफहासात्मक) चे भाव पाहून कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
प
प्रचेतस Fri, 01/30/2015 - 07:22 नवीन
लक्ष्मी रोडवरील आर. भगत ताराचंदचा उल्लेख कुणीच कसा काय केला नाही याचे आश्चर्य वाटले. तिथल्या मऊसूत पोळ्या, भेंडी फ्राय, तळलेला कुरकुरीत कांदा अगदी मनसोक्त घातलेली डबल दाल फ्राय निव्वळ अप्रतिम आणि नंतर ताक. अहाहा. सुदैवाने भगत ताराचंदच्या मूळच्या मुंबैतील जव्हेरी बाजारातील शाखेतही जेवण्याचा योग एकदा आलेला आहे. अफाट स्वादिष्ट आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 01/30/2015 - 08:37 नवीन
लिहिणार होतो. लिहिणार होतो. पण एका दुष्टाने अशी बातमी दिली की ते आता बंद प्डले आहे. त्यानंतर तिथे जाउन बातमीची शहानिशा करण्याचा वेळ मिळाला नाही. भगत ताराचंद म्हनजे निव्वळ सुख. मुंबैलाही गेलो होतो. का कुणास ठाउक मुंबईची चव जास्त आवडली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अनुप ढेरे Fri, 01/30/2015 - 09:11 नवीन
मी याच महिन्याच्या सुरुवातीला जाऊन आलोय. चालू होतं तेव्हा तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नांदेडीअन Fri, 01/30/2015 - 11:23 नवीन
एकदाच गेलो होतो इथे. (पुण्यातले) जेवण चांगलेच होते, पण ताक मात्र आहाहा... ताक मागवल्यावर वेटरने विचारले होते बॉटल आणू की ग्लास. मला वाटले ग्लासापेक्षा थोडीशीच मोठी असेल बॉटल, म्हणून मी बॉटल मागवली. वेटर जेव्हा ती बॉटल घेऊन येतांना दिसला तेव्हा कळाले काय दिव्य पार पाडावे लागणार आहे ते. पण खरं सांगतो, मी एकट्यानेच संपवले सगळे ताक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Fri, 01/30/2015 - 11:50 नवीन
हाथ मिलाओ फेलो ताकप्रेमी. मीही कितीही ताक पिऊ शकतो. एकच नंबर!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 05:41 नवीन
*drinks* *new_russian*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रचेतस Sat, 01/31/2015 - 04:57 नवीन
बाकी ते ताक बियर सदृश बाटलीत येते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ह
हेमंत बेंडाळे Fri, 01/30/2015 - 08:27 नवीन
पुणे तिथे काय उणे पण पिंपरी चिंचवड भागात फार पंचाईत होते तिकडचे काही भेटेल का? चांगला असा वडा पाव कुठे भेटेल नवी पेठ च्या अण्णा च्या तोडीचा? आमचा काही १. bay leaf bistro चाफेकर चौक २. rosewood डांगे चौक, सर्व काही चांगल ३. पराठा express विशाल नगर वाकड, पराठा , मिसळ पाव ४. slice of heaven , साई चौक जवळ JN रोड पिंपरी sandwich साठी
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 01/31/2015 - 04:56 नवीन
उपरोक्त चारही ठिकाणी जाऊन आलोय. एकही धड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत बेंडाळे
न
नांदेडीअन Sat, 01/31/2015 - 05:46 नवीन
नवीन सांगवीजवळ साई स्वाद नावाचे एक छोटे हॉटेल आहे. नेहमी गर्दी असते इथे. पण फॅमिलीसोबत जाण्यासारखा ऍबियंस नाही. इथले चिकन अद्रकी फार लाजवाब आहे. ट्राय करा कधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत बेंडाळे
प
प्रचेतस Sat, 01/31/2015 - 05:05 नवीन
पिंपरी चिंचवडमधली काही चांगली ठिकाणे हॉटेल रत्ना: पिंपरीतले अगदी जुन्या हाटेलांपैकी एक. इथल्या भाज्या आणि गार्लिक नान लै भारी. सावली (निगडी): इथले लसुणी पालक सूप अवश्य प्याच., रुमाली पराठा इथली खासियत. रामदेव धाबा (निगडी): चिरपरिचित ठिकाण. मला इथल्या भाज्या इतक्या खास वाटत नाहीत तरी राजस्थानी पद्धतीचे जेवण्यासाठी उत्तम ठिकाण. थोडंस महागडं जेवायचं असेल तर सिग्री ग्लोबल ग्रील आणि मेनलॅण्ड चायना. माउली चहा (पिंपरीगाव)- कुठलाही मसाला न घालता केलेला अतिशय कडक चहा. जबर्‍याच आहे एकदम फक्त १० रूपयांत. जनता मिसळ (पिंपरीगाव): लै भारी चव. नुकताच नाखुकाकांबरोबर जाऊन आलोय. बर्ड व्हॅली (आकुर्डी) - ज्यांना गोड भाज्या आवडतात त्यांनी इथला पनीर शाही कुर्मा अवश्य खाच. डेझर्ट अगदी. नुसताच बशीभर खावा.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Sat, 01/31/2015 - 05:37 नवीन
पिंचि मधल्या खालील ठिकाणांबद्दल बरेच ऐकुन आहे. त्याबद्दल काही लिहिले नाहिसः १. पिंपरी मार्केट मधले दाल पक्वान्न २. जयश्री, दे धक्का, नेवाळे ३. वासु वडापाव मी वरीलपैक्की एकाही ठिकाणी गेलेलो नाही. पण ऐकुन आहे. नेवाळेला गेलोय. मला ते आवडले देखील होते (बर्‍याच जणांना नाही आवडत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 01/31/2015 - 05:59 नवीन
दाल पक्वान तर राहिलेच रे. महादेव पॅटिसवाला इथले सगळ्यात भारी. तसे पिंपरीत बर्‍याच ठिकाणी दाल पकवान मिळतात. टिपिकल सिंधी पदार्थ. काही ठिकाणी दोन पांढर्‍या आणि पिवळ्या अशा दोन प्रकारच्या वरणात हा पदार्थ दिला जातो. जयश्री, दे धक्का, नेवाळे ह्या तीन्ही ठिकाणच्या मिसळी फारशा आवडल्या नाहीत. नेवाळे नुसतीच महातिखट. तिखटाचा डबाच ओततात ते पण त्यांच्याकडची बटाटा भजी एकदम मस्त. जयश्री पण फार तेलकट, दे धक्का मध्ये रस्सा कांदा लसूण मसाल्याचा बनवतात मात्र मटकी किंवा इतर तत्सम कडधान्ये अजिबात टाकत नाहीत. दे धक्का माझ्या घराशेजारीच आहे. वासू वडापाव छान आहे तसेच पिंपरी क्याम्पातील अशोक थियेटरच्या बाजूचा कदम वडेवाला पण भारी. त्याच्याकडची शेंगदाणा चटणी एकदम मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/05/2015 - 16:04 नवीन
जयश्री मिसळ म्हणजे बजाज ऑटोच्या समोर होती तिथे का? मला वाटतं तो सर्विस रोड झाल्यावर ती बंद झाली. आता कुठे नवीन ठिकाणी शिफ्ट झाली आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 02/05/2015 - 16:40 नवीन
अजुन आहे. बजाज ऑटो च्या समोरून जो अण्डरपास येतो त्याच्या समोरच हायवेलगत आत मधे आहे. हाटेलवजा मोठं दूकान टाकलंय. पण चव् मला आवडली नाही. तिखट आहे नुसतीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/05/2015 - 17:09 नवीन
मी दहा वर्षापूर्वी वगैरे खाल्ली होती. तेव्हा नेवाळे वगैरेपेक्षा बरी होती. एक कासारवाडीला 'मिसळ हाऊस' नावाचं दुकान होतं. रेल्वे स्टेशनला अगदी लागून. तिथंही बरी मिळायची मिसळ. पण लवकरच ते बंद पडलं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 02/06/2015 - 17:22 नवीन
होय तीचं ती. आता चवं बिघडली. २-३ वर्षांपुर्वीपर्यंत चांगली असायची चव आणि क्वांटीटी पण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा