खाद्यभ्रमंती - पुणे
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.
थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.
चला, सुरूवात मीच करतो.
- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.
- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !
💬 प्रतिसाद
(251)
न
नाखु
Sat, 01/31/2015 - 05:53
नवीन
मध्ये "धक्का" मिसळींचे पेवच फुटलय पण सगळे "खिशाला धक्का आणि चवीला धोक्का" अशा आहेत.
१. bay leaf bistro चाफेकर चौक
महागडा मनस्ताप.
२. rosewood डांगे चौक,
जवळ दुसरं काही नसल्याने वासरात लंगडी गाय या न्यायाने बरे!
३. पराठा express विशाल नगर वाकड, पराठा , मिसळ पाव
गेलो नाही सबब पास.
४. slice of heaven , साई चौक जवळ JN रोड पिंपरी sandwich साठी
पिंपरीत पॅटीसवाला हॉटेलात सोडून इतर ठिकाणी रस्त्यावरच खायची शक्यता नाहेच म्हणून कधीही अनुभवले नाहीच.
===
हॉटेल रत्ना: हाटेल बाज राखून हाये . दोन कांपिटेशन असूनही
सावली (निगडी): माझ्या बाय्डीला आणि बछड्यांना आवडलेलं ठिकाण *i-m_so_happy*
थोडंस महागडं जेवायचं असेल तर सिग्री ग्लोबल ग्रील आणि मेनलॅण्ड चायना.
तगडा प्रायोजक मिळाला की नक्की जाईन. *yes3*
माउली चहा (पिंपरीगाव)- मस्त आहे एकदम फक्त १० रूपयांत.अजून एक ठिकाणाचा पत्ता लागलाय जनता मिसळच्य रस्त्याला शेवटी पवनेश्वर मंदीराजवळ चहाचा अस्सल ठेला आहे
जनता मिसळ (पिंपरीगाव): लै भारी चव. धन्य्वाद अजून एक ठिकाणाची फक्त माहीती मिळालीय भेट दिल्यावर अभिप्राय देऊ.
बर्ड व्हॅली (आकुर्डी) - उद्यान खास गोष्टींसाठी फेमस असल्याने हॉटेलात गेलो नाही पण आता एकडाव जावून येऊच.
टाळण्याची ठिकाणं:
वृंदावन :भक्तीशक्तीजवळ उगा "हाईप" केलेले शिवाय महागडे
अन्नपूर्णा : नाविलाज को क्या विलाज कॅटेगरी
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/31/2015 - 06:10
नवीन
वृंदावन तर अगदि टुकार ह्या सदरात जमा होणारं. अन्नपूर्णा नूतनीकरण झाल्यापासून बरंय जरा.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:00
नवीन
चाफेकर चौकाच्या जवळचं का? (एसकेएफ ला जाणाऱ्या रस्त्यावर आहे ते). त्याच्या बाजूला एक कावेरी म्हणून होतं. तिथं बिअर वगैरे प्यायला गेलात तर चिकन चिली फ्राय मागवा. चांगलं मिळायचं.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:05
नवीन
सॉरी कावेरी नाही कामिनी! आणि टेल्कोसमोर मालवण समुद्र होतं ते पण चांगलं होतं. आहे का अजून?
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 02/03/2015 - 18:29
नवीन
टेल्कोसमोरील मालवण समुद्र आता कामिनी शेजारी शिफ्ट झाले आहे.
टेल्को समोर सध्या जे मालवण समुद्र म्हणून सुरु आहे ते डुप्लिकेट आहे.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:33
नवीन
ओह ओके. मी टेल्कोसमोरच्या हॉटेलचा 'सरंगा' या नावापासूनचा कष्टमर होतो. गेल्या दहा वर्षात अनेकवेळा नावं बदलली. आता मालकच बदलेलेले दिसताहेत. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे छान मिळायचं तिथे. (बहुदा आता कामिनीशेजारी मिळत असेल)
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Wed, 02/04/2015 - 04:25
नवीन
कालच मालवण समुद्र मध्ये चिकन कलेजी थाळी चापली . बेष्ट होती
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Sat, 01/31/2015 - 06:11
नवीन
फुगेवाडी जकातनाक्याचा अशोक पिंचि मध्येच येइल ना? एक नंबर चहा आहे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 01/31/2015 - 06:12
नवीन
हो. पिंचि मधेच.
मसालेदार गोडसर असा चहा. मजा येते पितांना.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Mon, 02/02/2015 - 15:11
नवीन
तांबडा पांढरा रस्सा खायचा असेल तर थरमॅक्स चौकातील "राजवर्धन" ब्येष्ट.
यशवंतनगर पेट्रोल पंपाजवळ 'पथिक' म्हणून एक हॉटेल आहे, तिथली चिकन दम बिर्याणी जबऱ्या आहे.
तसेच पिंपरीतल्या 'कराची' मधील चिकन नवाबी हंडी,खिमा,मटन पॅटीस,पाया सूप,चिकन बिर्याणी आवर्जून खावी अशीच. हॉटेल बर्यापैकी कळकट आहे पण टेस्ट अफलातून असल्यामुळे तिकडे जरा दुर्लक्ष करायचे :)
आणि महत्वाचे म्हणजे हे हॉटेल पहाटे पर्यंत चालू असते, अर्थात १२ नंतर प्रवेश मागील दाराने.
मिसळ साठी वरती वल्लीने सांगितल्याप्रमाणे 'जनता' मस्तच. त्याच्या थोडे पुढे 'निसर्ग' मिसळ आहे ते सुद्धा मस्तच. मोरया गोसावी मंदिरा जवळ कवींची मिसळ आहे, ते दर चतुर्थी ला उपवासाची मिसळ देतात, फॉर अ चेंज म्हणून खायला छान वाटते.
पुलाव,पाव भाजी अन कॉफी साठी निगडी प्राधिकरणातील 'नायडू' आणि 'शर्मा' दोन्ही मस्त. शर्मा कडील कुल्फी सुद्धा भारी असते. निगडी जकात नाक्या वरील भुर्जीवाला सुद्धा अफलातून आहे.
बाकी ठिकाणे आठवतील तशी भर घालतो.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/03/2015 - 18:43
नवीन
निसर्ग चवीला छान असली तरी अंमळ तिखट असल्याने लै जळजळ होते.
पिंपरीगावातीलच नवमहाराष्ट्र शाळेसमोरची अतिथी मिसळ पण छान आहे.
चिंचवडच्या बालाजी कवीची मिसळ आवडली नाही मात्र त्याचे बटाटेवडे मस्त असतात.
नायडू कुठे आहे?
मी शर्माकडे पावभाजी आणि आईसक्रीम खाल्लेले आहे.
बाकी बोपोडीत खडकीबाजारच्या रस्त्याला वळल्यावर उजव्या बाजूस ४/५ दुकाने सोडून वंदन स्वीट्स अॅण्ड चाट सेंटर आहे. तिथली आलू टिक्की, बास्केट चाट, कटोरी चाट लै भारी.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 02/03/2015 - 18:50
नवीन
'नायडू' प्राधिकरणात कॅम्प एज्युकेशन शाळे जवळ आहे, राधिका इलेक्ट्रॉनिक्स च्या समोर.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 17:58
नवीन
माऊली चहा आणि जनता मिसळ कुठेशी आहे नक्की? मला पिंपरी बाजार (रेलवेस्टेशन शेजारचा), साई मंदीर (क्याम्प) आणि आंबेडकर चौक असे तीन रेफरन्स पॉईंट माहीत आहेत.
-पिंचिंकर आजानुकर्ण
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/03/2015 - 18:03
नवीन
पिंपरी गावात.
कराची चौक, जयहिंद हायस्कूल मागे टाकत सरळ पुढे जायचे. एका ठिकाणी डाव्या बाजूला प्रचंड गर्दी दिसेल तोच माऊली चहा. तिथुम सरळ पुढे गेल्यावर लगेच पहिलीच उजवी मारायची की ४/५ दुकाने सोडून जनता दिसेलच.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:06
नवीन
ओके थ्यांक्यू. ट्राय मारायला पाहिजे एकदा.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 02/04/2015 - 05:38
नवीन
तिथे दोन मिसळी आहेत त्यातली जुन्या कौलारू घरातील "वर्जीनल" बाकी ढुप्लीकेट हे लक्श्यात ठेवा..
नाखु सराफ
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 02/04/2015 - 17:09
नवीन
पुन्हा एकदा धन्यवाद. सावतामाळी मंदिराजवळ हे ठिकाण असल्याचे एका मित्रानेही सांगितले. आता संधी मिळाली की जाऊन येतो.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:01
नवीन
विशाल टॉकिज शेजारचं रॉक्सी चालू आहे का अजून. तिथं मुघलाई चिकन लई जबरा मिळायचं. छाया पण चांगलं आहे पराठ्यांसाठी.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/03/2015 - 18:05
नवीन
रॉक्सी चालू आहे अजून. शाकाहारी असल्याने फ़क्त चहा पिण्यापुरताच तिथे जायचो.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:10
नवीन
मी पण खात नाही आता. पण खायचो तेव्हा रॉक्सीसारखं मुघलाई कुठं मिळालं नाही. एकदम लुसलुशीत आणि राजेशाही अशी मसालेदार डिश. किंमत अत्यंत वाजवी. अर्थात इराणी असल्यानं मोठे बाकडे आणि प्रचंड कलकलाट. अँबियन्स वगैरेवाल्यांसाठी नाहीच. (त्याच्या वरच्या मजल्यावर फ्यामिली रुम होती असे वाटते.)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 02/03/2015 - 18:45
नवीन
रॉक्सीमध्ये अजूनही फ्यामिली रूम आहे. रॉक्सीच्याच बाजूला बॅन्क ऑफ इंडीयाला लागूनच हैद्राबाद चहा नावाची हातगाडी आहे.
तिथे थोड्या वेगळ्या चवीचा मस्त असा चहा मिळतो.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Tue, 02/03/2015 - 18:50
नवीन
हो. एकदा चहा घेतलाय तिथला. मस्त. तिथून विशाल टॉकीजच्या बोळात गेल्यावर उजव्या हाताला एक बेकरी आहे. घरी मिसळपाव/वडापाव करायचा प्लान असला तर गरमागरम ताजे पाव मिळतात.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/04/2015 - 17:18
नवीन
पावच घ्यायचे असतील तर पिंपरी क्याम्पाताल्या विजय बेकरीला पर्यायच नाही. नुसते खावेत तरी भारी लागतात.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 02/04/2015 - 17:23
नवीन
ही बेकरी नक्की कुठे आहे? आजपर्यंत पावभाजीसाठी वगैरे आम्ही विशाल टॉकीजजवळूनच पाव आणतोय. नेहमीच ताजे मिळत आलेत. पण नवीन ठिकाण ट्राय करायला काहीच हरकत नाही.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/04/2015 - 17:33
नवीन
पिंपरी क्याम्प मेन बझार. भाजी मंडईकडे जाणार्या रस्त्यावर.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 02/04/2015 - 18:02
नवीन
ओके. बघतो.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Sat, 01/31/2015 - 05:21
नवीन
पिंपरी चिंचवड वाल्यांनी हा धागा follow करा . सगळे प्रश्न सुटतील . अगदी वडा पाव चा पण
http://www.maayboli.com/node/12710
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Sat, 01/31/2015 - 17:24
नवीन
हॉटेल निसर्ग - नळ stop पुणे
चिकन राजकुमार संतोषी + बाजरीची भाकरी ...
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 01/31/2015 - 19:12
नवीन
सदाशिव पेठेमधलं "रस्सा: जसा हवा तसा" झॅक जागा आहे चिकन आणि फिश खायची.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Tue, 02/03/2015 - 13:44
नवीन
कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर 'आशीर्वाद डायनिंग हॉल' मधे छान महाराष्ट्रियन थाळी मिळते
फ़क्त ७० रुपयात ,
सिंहगड रोडवर माणिक बागेतल 'ब्रम्हा गार्डन' पण छान आहे
शनिपारला चितळे बंधूंच्या समोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी एका बोळात 'अम्बिका अमृततुल्य' मधे मस्त चहा मिळतो
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 03/12/2015 - 17:48
नवीन
आत्ताच जेऊन आलो.
थाळी फार काही विशेष आवडली नाही.
कदाचित मला न आवडणार्या भाज्या असतील म्हणून थोडा भ्रमनिरास झाला असेल.
भोपळा, मसूर आणि बटाट्याची पातळ भाजी या तीनही भाज्या मला फार आवडत नाहीत, आणि आज तीनही भाज्या एकदाच खायला मिळाल्या.
पण सपक (सपक = साधे, आणि चांगल्या अर्थाने साधे बरं का !) वरण फार छान होते.
अगदी घरची आठवण आली.
- Log in or register to post comments
आ
आतिवास
Tue, 02/03/2015 - 19:38
नवीन
वाचनखूण साठवते आहे.
आता पुण्यात परतले की शोधेन एकेक ठिकाण!
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Wed, 02/04/2015 - 17:06
नवीन
मी पुण्यात असतांना असले धागे का निघत नव्हते?
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 02/07/2015 - 08:39
नवीन
+१...
(अगदी हेच..शब्द छान निवडलेत!)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/04/2015 - 17:17
नवीन
पिंपरीमधल्या एका ठिकाणाचा उल्लेख राहिलाच.
एच ए कॉलोनी मधील नाशिककर क्याण्टीन.
इथला समोसा आणि खोबरा चटणी केवळ अप्रतिम. वड्यांची चव मात्र हल्ली सोडा जास्त घालत असल्याकारणे बिघडली आहे.
इथले फ़रसाण आणि गुलाबजाम मात्र अगदी दर्जेदार.
बाकी चिंचवडगावातील यशवंत स्वीट मार्ट मधले गुलाबजाम पण एकदम ख़ास. पण इथली सपेशालिटी म्हणजे बाकरवडी. चवील नेहमीच्या बाकरवड्यांपेक्षा बरीच वेगळी पण अफ़लातून.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 02/04/2015 - 18:02
नवीन
पौड फाट्याच्या चौकात Borate's Biryani हे TakeAway हॉटेल सुरू झाले आहे.
एके दिवशी वर्तमानपत्रासोबत प्रसिद्धीका आली होती यांची.
"अस्सल काळा रसा... अस्सल बिर्याणी..." ही टॅगलाइन होती त्यात.
काळा रस्सा खूपच ’मसालेदार’ होता.
बिर्याणीसुद्धा फार विशेष वाटली नाही.
तुम्ही जर कर्वे नगरच्या ‘सोलकढी’ची बिर्याणी खाल्ली असेल, तर थोडीफार तशीच चव जाणवेल तुम्हाला.

- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/05/2015 - 06:18
नवीन
कर्वे रोड ला कोथरूड च्या दिशेने नळस्टोप च्या अगदी थोड पुढ आल की कर्वे रोडवरच (लागू बंधू च्या बाजूला ) हॉटेल खानदेश आहे . एकदम टिपिकल खानदेशी चवीच जेवण मिळत . थोड तिखट अमळ मसालेदार . झणझणीत चव असते . तिथली खानदेशी पद्धतीची शेव भाजी , वांग्याच भरीत आणि मटन फ्राय थाळी आवर्जून चाख्न्यासारखी आहे . तिथे पुण्यातल खानदेशी पब्लिक पडीक असते . अख्ख्या हाटेलात अहिराणी भाषा ऐकू येते . गल्ल्यावर एक मोठ्या पोटाचा मालक बसलेला असतो . त्याला हसताना कधीच पाहिलं नाही इतक्या वर्षात . हॉटेल चा ambiance , वैगेरे निकष असणारया लोकांनी या हॉटेल च्या वाटी न गेलेलंच बर . कधी कधी family दिसतात पण family ला घेऊन जाण्या अगोदर एकट्याने जाऊन रेकी केलेली बरी . चव मात्र झक्कास . तोंडात लिटरभर पाणी जमल राव आठवणीने .
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 02/05/2015 - 06:41
नवीन
पार्सल ट्रायलं जाणार. :)
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
गुरुवार, 02/05/2015 - 06:52
नवीन
हां, छान आहे हे चवीला.
कोथरूडला असलेले खानदेशी झटका म्हणजे यांचीच ब्रॅंच आहे का ?
आणि त्याच खानदेशी झटकाच्या बाजूला खानदेश एक्सप्रेस का अशाच काहीतरी नावाचे अजून एक हॉटेल आहे.
ambiance या दोन्ही ठिकाणी नाही मिळणार, पण चव चांगली आहे.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/05/2015 - 06:54
नवीन
नाहि. नाहि. या हॉटेल खानदेश ची कुथेहि शाखा नाहि
- Log in or register to post comments
झ
झकासराव
गुरुवार, 02/05/2015 - 13:40
नवीन
पिंचिचा वेगळा धागा पायजेल वल्ली शेठ. :)
बा द वे, मला भेळ चौकाच्या जवळच "रसोई से" प्रचन्ड आवडत.
व्हेज हॉटेल आणि टिपिकल पन्जाबी डिशेस.
पण माइल्ड चवीच्या जबरी भाज्या. पनीर त्यांच्या घरच्या दुधाचच करतात त्यामुळे फ्रेश आणि मलाइदार.
त्यापेक्षा भारी पनीर फक्त सयाजी बा ने मध्येच खाल्लय.
गोल्डन पाम मधील व्हेज भुना लै आवडलेला.
दोन तीन वेळा पार्सल आणलाय. तिथलं बाकीचं काही फारस आवडत नाही.
त्याच्या पलीकडेच पुणे गेट आहे. तिकडे मित्रमन्डळींसोबत निवान्त पार्टी करायला बरय ते.
पण जेवण वै अॅव्हरेजच. काही स्टार्ट्र्स बरी ते भारी कॅटेगरीत येतात. मेन कोर्स ठिक ठाक.
नॉनव्हेज वाल्याना पुणे गेट आणि गोल्डन पाम दोन्ही आवडतात अस दिसतय.
मिसळ, आकुर्डीच्या जयश्रीची आवडायची.
नेवाळे एकदाच ट्राय केली. नुसतीच तिखट.
बा द वे, चापेकर चौकात एक काका बुर्जीची गाडी लावतात.
त्यांच्या गाडीवर पुणेरी पाटीला स्पर्धा करेल अशा पाट्या आहेत.
पण बुर्जी, ऑम्लेट आणि अण्ड्याचेच फक्त आयटम्स.
सर्व भारी. मारामारी नावाची देखील डिश आहे. :)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 02/05/2015 - 13:48
नवीन
हातभर लांबीची सुरमई .. बिनसाउथइंडियन मसाला भरलेली.. काय सॉलिड असते राव.. लेयरवाले फ्रूट पंच..
गणेशा अरे कुठे आहेस रे?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/05/2015 - 16:18
नवीन
पुणे गेट ला काल मटण खीमा हाणला. भारि होता

- Log in or register to post comments
अ
असा मी असामी
गुरुवार, 02/05/2015 - 13:50
नवीन
मोरया गोस्वामी मंदिरा जवळची बालाजीची मिसळ मस्त असते. जास्त तिखट नसते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 02/05/2015 - 13:51
नवीन
रसोई से ला कधीच गेलो नाही आतापर्यंत.
आता जायलाच हवे एकदा
बाकी पिंपरी चिंचवड खाद्य संस्कृतीवर धागा काढलाच पाहिजे.
मुंबैची कच्छी दाबेली पुणे परिसरात आली तेव्हा पुण्याच्याही आधी सर्वप्रथम पिंपरीत अवतरली होती.
अशोक थेटराजवळची दिलखुश कच्छी दाबेली. २०/२१ वर्षांपूर्वी ती सुरु झाली होती. आता त्याने जवळच मोठं दुकान टाकलंय ते ही बऱ्याच वर्षांपूर्वी पण पहिली चव राहिली नाही आता.
अजून एक ठिकाण राहिलंच. नवमहाराष्ट शाळेच्या मागे कुदळे भेळ. निसर्ग मिसळीच्या शेजारीच.
मटकी, वाफ़वलेल्या मिरच्या टाकून तो अफ़लातून भेळ बनवतो. क्वांटीटी पण प्रचंड. लै भारी आहे ती चवीला.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 02/05/2015 - 14:34
नवीन
वर्हाडे नाव आहे त्यांचं. .४-५ दिवसातून एकदा लावतात गाडी.
त्यांच्याकडे सर्व पदार्थ चविष्ट मिळत असले तरी माणूस अतिप्रचंड उर्मट आहे.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 02/07/2015 - 08:42
नवीन
"रसोई से" खरंच आवडायचं.... व्हे़ज दम बिर्याणी तिथली खाल्ल्यावर मला दम बिर्याणीतल्या दमचा अर्थ कळला होता.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 02/05/2015 - 16:01
नवीन
बाबौ
- Log in or register to post comments
न
नितिन५८८
Fri, 02/06/2015 - 11:54
नवीन
जुनी सांगवी येथे हॉटेल गोमंतक Fish साठी फेमस, डापोडी येथील दत्त बोर्डींग स्वस्तात मांसाहारी जेवणासाठी आणी चव पण छान असते, हॉटेल रानजाई (हिंजवडी उड्डाण पुलाशेजारी)मटण भाकरी स्पेशल, हॉटेल आपुलकी (चाकण तळेगाव रोडवर ) मटण भाकरी स्पेशल, पानशेत रोडला nonveg घेऊन जायचे तिथले हॉटेलवाले बनवून देतात मासात शेतात बसून जेवता येते (हॉटेल शेतकरी, हॉटेल समाधान)
- Log in or register to post comments
स
सविता००१
Fri, 02/06/2015 - 12:19
नवीन
इथे लिहिणार्यांचं
कारण आता हा धागा कुणीतरी एकत्रित स्वरूपात (म्हणजे मूळ धाग्यात असलेली ठिकाणे आणि प्रतिक्रियांमध्ये आलेली ठिकाणे एकत्र करून ) माहिती स्रोत- मिसळपाव संकेत स्थळ असं लिहून व्हॉट्स अप वर पाठवलाय .
आता जोरदार फिरतोय. मला वेगवेगळ्या ५ ग्रूप्स मधुन आजच्या दिवसात आला.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »