Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाद्यभ्रमंती - पुणे

न
नांदेडीअन
गुरुवार, 01/22/2015 - 06:46
🗣 251 प्रतिसाद
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !


प्रतिक्रिया द्या
124207 वाचन

💬 प्रतिसाद (251)
न
नांदेडीअन Fri, 02/06/2015 - 17:52 नवीन
अरे वा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१
अ
असंका Sat, 02/07/2015 - 08:47 नवीन
होय..मला पण आला एका मित्राकडून! फोटो गायब आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
स
स्रुजा Fri, 02/06/2015 - 17:59 नवीन
आयला , काय सांगतेस ? मला पाठव बरं तो मेसेज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१
स
सविता००१ Mon, 02/09/2015 - 10:23 नवीन
पण आला हा धागा.. :)
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 02/09/2015 - 10:42 नवीन
काय म्हणता ? लिंक द्या ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१
न
नांदेडीअन Mon, 02/09/2015 - 10:45 नवीन
सापडले ! http://joshnilu.blogspot.in/2015/02/blog-post.html आणि https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=1011679062179517&id=307550929259004
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पिंपातला उंदीर Mon, 02/09/2015 - 10:44 नवीन
नांदेडीअन यान्चे अभिनन्दन : )
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 02/09/2015 - 10:46 नवीन
हाहा अहो मी तर फक्त सुरूवात करून दिली. या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकाच्या बोटांचे आणि पोटाचे धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
स
सविता००१ Tue, 02/10/2015 - 07:13 नवीन
आणि हे झाले २०० :)
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 02/10/2015 - 07:26 नवीन
पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी गावात 'स्नेहल' नावाचं मांसाहारी हॉटेल आहे (मगरपट्टा सिग्नलपासून १६किमी पुर्वेकडे) चिकन्/मटन थाळी...असा शिंपल मेनु. (शाकाहारी थाळी पण मिळते, पण ती कुणाला खायचीये?!!) एक छोटी प्लेट चिकन/मटन सुक्के, एक 'बाउल' म्हणता येईल एव्हढी वाटी रस्सा (अनलिमिटेड), चपाती/ज्वारीची/बाजरीची भाकरी (अनलिमिटेड), साधा मोकळा भात (अनलिमिटेड), एक्स्ट्रा सुक्के चार्जेबल. चिकनमिळते) रु. १५० मटन थाळी रु. १७० स्पेशल थाळी (५० एक्स्ट्रा: यात आळणी चिकन/मटन प्लेट एक्स्ट्रा मिळते) चवः (जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण आवडत असेल तर)... जन्नत!!!!!!!!!!!! (जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण आवडत नसेल तन)... अरेरे..! (जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण ट्राय केलं नसेल तर).. ट्राय कराच!! (असं जेवण आम्च्या घरी वर्षातून एकदाच बनतं, लोणीच्या उरसाला)
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/12/2015 - 18:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
नितिन५८८ Tue, 03/17/2015 - 08:43 नवीन
F.C रोड, ललित महल शेजारी - सर मिसळ (नविन चालू झालय, चव छान ) सोमाटणे फाटा: रुपेश मिसळ औंध आणि चिंचवड: निसर्ग मिसळ हाऊस सांगवी फाटा - डाळ वडे (सायंकाळी हाथगाडी असते) बाणेर रोड - idlicious (सर्व सौथ इंडिअन, special बिशीबेळी भात, इडली, मेदू वडा ) सांगवी - हॉटेल गोमंतक (sea फूड special) वाकड (हिंजेवाडी पुलाशेजारी ) - हॉटेल रानजाई (मटन भाकरी special ) दापोडी - दत्त बोर्डिंग (कमी पैशात मस्त मांसाहारी जेवण ) पानशेत रोड: घरगुती शाकाहारी तसेच मांसाहारी (मटन , चिकन घेऊन जाणे ते बनवून देतात) औंध संघवी नगर : भेळ (संघवी नगर end ला )
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/11/2016 - 06:47 नवीन
सरमिसळ ठीकठाक, इतके खास नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन५८८
न
नांदेडीअन गुरुवार, 04/09/2015 - 08:27 नवीन
पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते ? चितळे सोडून.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 04/09/2015 - 13:30 नवीन
चिंचवडला प्रदीप आणि यशवंत. पैकी यशवंतची एकदम वेगळ्या धर्तीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन गुरुवार, 04/09/2015 - 13:59 नवीन
धन्यवाद. शहरात नाहीये का एखादे ? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 04/09/2015 - 14:17 नवीन
तिथले माहित नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नाखु Sat, 06/11/2016 - 08:51 नवीन
पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते ? चितळे सोडून.
त्यांची चव राखून आहेत आणि अता सगळीकडे केंद्रे थाटली आहेत त्यांनी. पिंची काका हलवाईंचा ग्राहक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
G
ganu गुरुवार, 04/09/2015 - 13:27 नवीन
रास्ता पेठच्या M.S.E.B.हापिस्च्या डाव्या अन्गाला मसाला ताक अप्रतीम चवदार मिळते.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 06/18/2015 - 03:53 नवीन
काल कोथरूडच्या गार्निशमध्ये (यशवंतराव चव्हाण नाट्यगॄहाजवळ) पनीर मालवणी खाल्ली. फार छान चव होती. भाजीसोबत जी वेगळी ग्रेव्ही दिली होती, ती तर अमृततुल्यच !
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 11/09/2015 - 18:58 नवीन
छान खाद्यधागा!
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Sat, 06/11/2016 - 05:15 नवीन
महर्षी नगर मधले नागब्रह्म 1 नंबर साउथ फूड अप्पे इडली बटर डोसा सगळेच पदार्थ चविष्ट आणि शेवटची फिल्टर काप्पी खा खा खाऊन प्रति माणूस 200 च्या वर बिल काय जात नाय पण छोटे आणि बाकडी स्टाईल बसायची जागा आहे त्यामुळे ambiance ० पण चवि बद्दल वाद नाय
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 06/11/2016 - 10:50 नवीन
काय सांगता? आप्पे हाटेलात मिळतात? . कुणि पुणेस्थित मिपाकर नागब्रह्म इथे माझ्यासाठी आप्पेकट्टा साजरा आणि स्पॉन्सर करेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
अ
अभ्या.. Sat, 06/11/2016 - 10:52 नवीन
आमच्या हिरवीनीने बनवलेल्या चीज आप्प्यांईतके जगात भारी काहीच खाणे नसू शकते हे मात्र ठाम मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सामान्य वाचक Sat, 06/11/2016 - 11:25 नवीन
तुमच्या कडे आधी आप्पे कट्टा करू मग नागब्रह्म चा कट्टा करू आणि मग ठरवू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 06/11/2016 - 11:39 नवीन
आमच्याकडे कट्टा करायला हरकत नाही पण तुम्हाला आप्पे कसे मिळणार? आमची हिरवीन फक्त माझ्यासाठी करते. :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सुबोध खरे Sat, 06/11/2016 - 11:45 नवीन
हे म्हणजे ते पहा शंकर भगवान फक्त पुण्यवान माणसांनाच दिसतील म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 06/11/2016 - 12:14 नवीन
हीहीहीहीहीही. डोक्टरसाहेब समजून घ्या ना तुम्ही. उगी लग्नाआधीच कीती राबवायचे बिचारीला. ;) (एकदा लग्न झाले की असले काही लिहिणार नाही की बोलणार नाही. गप्प आप्पे खाणार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 06/11/2016 - 17:17 नवीन
आय माय स्वारी. मला माहित नव्हतं तुमचं लग्न झालेलं नाही. तरीच ती "फक्त तुमच्यासाठीच" आपलेसे (आप्पे) करते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
श्रीगुरुजी Sat, 06/11/2016 - 15:07 नवीन
महर्षी नगर मधले नागब्रह्म 1 नंबर साउथ फूड
+१ एक दुरुस्ती. ते नाव "नादब्रह्म" आहे. आप्पे व इतर सर्व दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत उत्कृष्ट असून तेथील फिल्टर कॉफी देखील अतिशय चविष्ट आहे. सांबारात मात्र डाळीचा दाणा चुकुनही सापडत नाही. नुसतेच पाणी देतात. चटणी अतिशय चविष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
स
सामान्य वाचक Sat, 06/11/2016 - 15:55 नवीन
ते नागब्रह्म च आहे पूर्ण नाव नागब्रह्म हट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 06/13/2016 - 10:47 नवीन
ओह! माझीच वाचण्यात चूक झाली असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
आ
आतिवास Sat, 06/11/2016 - 11:48 नवीन
हा लेख मुख्य पानावर जेव्हा जेव्हा आला, तेव्हा प्रत्येक वेळी वाचनखूण म्हणून ठेवायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही, आजही जमलं नाही.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Sat, 06/11/2016 - 12:07 नवीन
अरे वाह! खाद्यभ्रमन्ती-आमची मुंबई नाही का मिपावर? असल्यास लिन्क द्या ना.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 09/01/2016 - 23:29 नवीन
आधिकांश सामिषाहारः हा घ्या दुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
स
सही रे सई गुरुवार, 09/01/2016 - 16:47 नवीन
सिंहगड रोडला गंगा भाग्योदय मधे यम्मी पराठा ओपन झाले आहे. मस्त गरमागरम पराठे मिळतात तिथे. खूप प्रकारचे पराठे आहेत. तिथे जाऊन खाल्ले तर जास्त चांगले लागतात. पार्सल आणले होते पण ती मजा नाही त्यात.
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Wed, 11/09/2016 - 19:18 नवीन
१) सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते. हॉटेल तसे छोटेसेच आहे जेम-तेम १० ते १२ माणसच एकावेळेला जेवू शकतात पण मटणाची चव अप्रतिमच आहे. ईथे बिर्याणी मिळत नाही. पण मटण पुलाव झक्कास मिळतो. इकडे चिकन जास्त मिळत नाही बहुधा मिळतही नसावे बहुतेक.. मटण थाळीत ज्वारी, बाजरी भाकरी, मटणाचा रस्सा, साधा भात, सोबत कांदा, पापड, कोशिंबीर किंवा लोणचे आसे आसते. सुक्या थाळीत सुके मटण, मटणाचा रस्सा, ज्वारी, बाजरी भाकरी, साधा भात, लोणचे किंवा कोशिंबीर व कांदा.. तसेच कलेजी फ्राय हि वेगळी डिशही मिळते. व मटन पुलाव हवा आसल्यास एक्स्ट्रॉ पे करावे लागते. पण चव अप्रतिमच... २) कोथरुड बसस्टॅड जवळ शिवाजी पुतळ्या जवळ 'मालवणी नाका' नावाचे हॉटेल अप्रतिम मालवनी मांसाहारी जेवन मिळते. मालवनी फिश करी व तळलेले मासे, फ्राय मासे मालवनी पद्धतीने बनवतात. सोलकढी एकदम झक्कास आसते. ३) डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात. खासकरुन बटर चिकन, चिकन लॉलीपॉप्स, चिकन कबाब. इकडे व्हेज डिशेस पण मिळतात पण त्या काही खास नसतात. फक्त एकच आडचण ती म्हणजे इथे कुपन पद्धत आहे. म्हणजे आपल्याला जे पदार्थ मागवायचे आहेत त्यांचे कुपन काढावे लागतात. व पैसे पे करावे लागतात. व नंतर वेटरला ते कुपन द्यायचे आसते. पण जेवन काचैका आसते. गर्दीसुद्धा भरपुर आसते. त्यामुळे वेटिंगवर रहावे लागते १५ ते २० मिनिटांसाठी. ४) कोथरुड बसस्टँड जवळ/समोर जो पादचरी पुल आहे ना तिथे.. पी.के. बिर्याणी हाऊस वाल्यांनीच नविन हॉटेल काढले आहे. 'पी. के मटण भाकरी' म्हणून आजुन गेलो नाहीये पण जाईन एखाद दिवशी. त्या हॉटेलच्या जागी आधी 'द कोल्हापूर दरबार' नावाचे मांसाहारी हॉटेल होते. मस्त चिकन व मटण थाळी मिळायच्या. पण ते हॉटेल भाडेकरारावर होते त्यामुळे भडेकरार संपला म्हणून ते हॉटेल मालकाला बंद करावे लागले..
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 11/11/2016 - 07:50 नवीन
सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते.
हे आजच ट्राय करण्यात येईल.
डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात
या बद्दल असहमत तिथे एकदाच तंदुरी चिकन घेतले होते. कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैवल्यसिंह
क
कैवल्यसिंह Fri, 11/11/2016 - 08:01 नवीन
कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.
माझा अनुभव चांगला आहे.. कारण १८ ते २० वर्षांपासुन जातोय मी. टेस्टमधे काहीही फरक पडला नाही. त्या वेळेला जी टेस्ट होती ती आजही आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
य
यशोधरा Fri, 11/11/2016 - 10:57 नवीन
बोरावके'ज् कु-कुच-कु > बेकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
त
तनिश Fri, 11/11/2016 - 11:18 नवीन
1. नवनाथ चहा पिंपले गुरव--चहा अगदी मस्त फक्त 10 रूपयांत २. अशोक हॉटेल --दापोडी--नाशाता साठी आति उत्तम..
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 11/11/2016 - 11:31 नवीन
बादवे, सदाशिव पेठेत असलेलं 'रस्सा' आता म्हात्रे पुलाजवळ डी.पी रोड ला स्थानांतरित झालं आहे. तिथली बिर्याणी आणि कोल्हापूरी जेवण सुंदर असते. नॉनव्हेज चे माहेरघर हा सदाशिव पेठेचा नावलौकिक कमी होत चालला आहे हल्ली !!!
  • Log in or register to post comments
क
कैवल्यसिंह Fri, 11/11/2016 - 12:15 नवीन
आवारे लंच होम/खानावळ मधले झणझणीत चिकन व मटण एकदमच भारी... रूमाल जवळ बाळगल्या शिवाय पर्यायच नसतो.. पण आत्ता ती खानावळ चालु आहे का नाही ते माहीत नाही. चालु आसल्यास कृपया कळवावे. म्हणजे एखाद दिवशी जाता येईल. बिर्याणीसाठी 'पी. के बिर्याणी हाऊस' व 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' हि दोन्ही बिर्याणीची रेस्टॉरंटस् झकास आहेत. त्यातल्या त्यात 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' मला खुप आवडले. त्याच्याकड व्हेज-नॉनव्हेज या दोन्ही प्रकारातल्या बिर्याणींचे खुप ऑप्शन्स आहेत..
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Fri, 11/11/2016 - 12:33 नवीन
आवारे अजूनही सुरु आहे. चवहि तशीच अप्रतिम. पिके सुद्धा सुंदर .एस. पी. ची चव पार बिघडली आहे. बिर्याणीचाय नावाने साजूक तुपातला मसाले भात देतात हल्ली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैवल्यसिंह
क
कैवल्यसिंह Fri, 11/11/2016 - 14:20 नवीन
आवारेचा नेमका पत्ता देता का? खुप वर्ष झालीय आता पत्ता विसरुन गेलोय.. बहुतेक सदाशिव पेठ मधेच आहे ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
क
कैवल्यसिंह Sat, 11/12/2016 - 11:08 नवीन
मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड' हे रेस्टॉरंट/हॉटेल आता पुण्यात.. येथे बोंबील फ्राय, फिश कोशिंबीर, मटणाचा मालवणी हिसका, क्रॅब तंदूरी, टायगर प्रॉंन्स, लॉबस्टर, कोळंबीचं मस्त लोणचं आशी विविध तोंपासु पदार्थ मिळतात.. पन भरपुरच महाग आहे.. हे रेस्टॉरंट बंडगार्डन येथील आयनॉक्स सिनेमा गृहाजवळ मेट्रोपोलिस इकडे नविन शाखा सुरु झाली आहे.. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 07/20/2017 - 17:46 नवीन
बर्‍याच दिवसांपासून पिंपरी मार्केटजवळच्या महादेव पॅटिसवालाबद्दल ऎकून होतो. लोकांना जशी चहाची तलफ लागते, तशी मला चटपटीत खायची तलफ लागत असते अधूनमधून. काल रात्री अशीच तलफ लागली होती म्हणून रेनकोट घालून भर पावसात बाईकवर जाऊन हे ठिकाण शोधून काढलेच. लगेच पॅटिसची ऑर्डर दिली. पूर्ण पॅटिस संपवेपर्यंत मनात एकच विचार होता, की हे पॅटिस इतके फेमस का झाले असेल ? सगळीकडे मिळते अगदी तसेच पॅटिस आहे हेसुद्धा. चव खराब किंवा वाईट होती असे मुळीच म्हणत नाहीये मी, पण जेवढा गाजावाजा झालाय, तेवढे नक्कीच विशेष नाहीये हे पॅटिस. पॅटिस संपवल्यानंतर एक गुलाबजामुन मागवले. तेसुद्धा फार काही विशेष नव्हते. अती जास्त अपेक्षा ठेवून एखाद्या ठिकाणी पोटोबा करायला गेल्यावर आपला पोपटोबा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण. असो. महादेव पॅटिसवालामधून बाहेर पडताक्षणी Kalyani A1 हे छोटेसे पाणीपुरी-भेळ सेंटर दिसले. काहीही अपेक्षा न ठेवता एक प्लेट पाणीपुरी खायचे ठरवले. इथे मात्र उलटे झाले. अपेक्षेपेक्षा खूप टेस्टी पाणीपुरी खायला मिळाली. एक प्लेटची दोन प्लेट कधी झाल्या कळलेच नाही. यापूर्वी इतकी चांगली पाणीपुरी मी फक्त दोनच ठिकाणी खाल्ली होती. एक म्हणजे कॅम्पमधले जयशंकर पाणीपुरीवाला आणि दुसरी कोथरूडच्या डीपी रोडवरच्या बधाई स्वीट्समधली पाणीपुरी. Kalyani A1 च्या पाणीपुरीची चव बरीचशी जयशंकर पाणीपुरीसारखीच आहे. कोणाला पिंपरीतील स्ट्रीट फुडसाठी फेमस असलेली ठिकाणं माहीत असतील, तर कृपया शेअर करा. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/01/2021 - 09:12 नवीन
असल्यास माहिती टाकावी ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/01/2021 - 09:33 नवीन
माझेही उत्तर भारतात गेल्यावर काहीसे असेच व्हायचे ... एकदा दिली हुन आग्र्याला जाताना सकाळच्या थंडीत रस्त्याच्या बाजूल खाल्ले,,, गरम होते म्हणून मजा आली पण जडच याला कारण असे असावे : मराठी लोकांना कदाचित पराठा आणि खास करून मेथीचा म्हणले कि गुजराथी पद्धतीचा खुसखुशीत THEPLA सदृश खाण्याची सवय झाली असावी ,, पण मुळात उत्तरेतील पराठा हा प्रकार जाडजूडच असेल ! असो अजून एक गोष्ट भारतात मिळाली तर जरूर खा... फक्त वाटतात किसाचा पराठा म्हणजे स्विस पद्धतीचा " पोटॅटो रोस्टी"
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 04/01/2021 - 09:34 नवीन
फक्त वाटतात किसाचा पराठा फक्त बटाट्याच्या किसाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा