ह्या रांगेतील प्रत्येकाचे कर्तृत्व वादातीत आहे ...आपल्या पैकी कित्येकांची रोजी रोटी ह्या लोकांच्या उद्योगांशी निगडीत असेल ..सगळे सगळे मान्य पण .....१०० वर्षांनी ह्या फोटोचे ऐतिहासिक वर्णन काय असेल ? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आले असतांना त्यांच्या भेटीसाठी आतुरतेने रांगेत वाट पाहणारे तत्कालीन भारतीय अब्जाधीश ...
ओबामांच्या भेटीसाठी रांगेतील उभ्या भारतातील अब्जाधीशांना बघून धक्का बसलाय ...साक्षात मुकेश अंबानी सुद्धा 'एका पायावर' ?
एखाद्या खंडप्राय देशतील बहुतांश औद्योगिक साम्राज्याचे मालक असलेले ...असे हात बांधून रांगेत ?? त्याचे फोटो सार्वजनिक होताहेत आणि कुणाला त्याचे काही नाही ? नं त्या रांगेतल्या लोकांन्ना नं आजूबाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांना ...
नशीब आमच्या सैन्याधीकार्यांना असे रांगेत एका मागे एक उभे केले नाही ....
हि नम्रता / शिस्तप्रियता कि धंद्यातील पैसा/नफा याच्या साठी कडेला ठेवलेली अस्मिता / आब ?
असो कवी ग्रेस म्हणतात त्याप्रमाणे "हे जग आपले नाही"
इट'स ऑल बिझनेस मेट. सगळ्याचं देशामधले उद्योगपती जगातल्या सर्वात जास्त शक्तीमान जागी असणार्या माणसाच्या भेटीसाठी ताटकळतील. त्यातली कितीतरी न.मो. आणि बराक ओबामांच्या आण्विक चर्चेमधुन आपल्या हाती काही चांगली प्रोजेक्ट्स पडतील का ह्याचा अंदाज घ्यायला आलेले असणारेत. त्यातुन रोजगारनिर्मिती होणारचे.
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे..
१००% सहमत.. ह्या फोटोत लोकांना इतकं नवल वाटण्यासारखं काय आहे, हेच कळत नाही. 'रांगेत उभं राहणं' म्हणजे जणू भीक मागत असल्यासारखं आहे, असं वाटतंय का काय लोकांना?
मी हॉस्टेलमध्ये असतांना (जवाहर नवोदय विद्यालय) पाच वर्षं रोज चारदा रांगेत उभं राहीलोय जेवणासाठी. त्यामुळे "रांग म्हणजे अपमान" हा प्रकार पटत नाही मला..
इथे शिलाँगमध्ये एक सरकारी शाळा आहे. अगदी सव्वाशे वर्षं जूनी वगैरे.. फक्त ८,०००/- वार्षिक फी मध्ये १२वीला ICSEचा कोर्स शिकवणार्या ह्या शाळेत पोरांना टेबलांवर जेवण वाढायला 'बैरा' ठेवले आहेत.. मायला ! मी तर उडालोच. अबे, जिथं शाळेचा दैनंदिन खर्च चालवायला सरकारकडे पैसा मागावा लागतो, तिथे ही 'गोरा साहीब' आणि 'नेटीव्ह' प्रकारातल्या भावना वाढीस लावणार्या फालतू 'लीगसीज' पाळत बसण्याला काय अर्थ आहे? पण नाही.. "प्रिमीयर"पणा जातो म्हणे अशानं. "बडा घर, पोकळ वासा" म्हणजे काय हे अनुभवतोय.. ;-)
अगदी लाचार चेहरे करून उभे होते.
लाईन पाहून ह्यांनाही धक्का बसला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही,महासत्तेपुढे तर नाहीच नाही.अंबानी काय मित्तल काय, परदेशी तंत्रज्ञान्,यंत्रे बाहेरून आणायची,स्वतःची दुकाने चालवून खिसे भरायचे.मग उरलेल्या पैशात 'मेक इन इंडिया'
डु-आयडीरत्न नानासाहेबांचा अवतार समाप्त झाल्याची दु़ख्खद वार्ता काही हितचिंतंकांकडुन समजली होती. खरं खोटं माहित नाही. आत्मा अमर असतो तो "ग्रेटथिंकरां"च्या रुपात पुन:र्जन्माला आलाय असं दिसतयं..गुरुकृपा बाकी काय. =))
अभ्यास वाढवा. ग्रेटथुंकर आधीपासुनच होते. काही काळासाठी ते अज्ञातवासात होते. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की नाना, माई, अजातशत्रू, सचीन, हितेश आणि असे इतर बरेच हे एकाच आयडीचे डु आयडी आहेत?
मायबोली वरील जामोप्या आणि हे जामोप्या एकच होत काय ?
मायबोलीवर काय च्छान छान लेख टाकायचे ते , त्यांचा तो दृष्ट न लागण्या साठीच्या आमुलेटचा लेख मला अजुनही आठवतोय =))
असहमत. आधीचा ग्रेटथिंकरचा अवतार समाप्त झालेला आहे. हा दुसरा अवतार आहे.
हे व्हर्जिनल ग्रेट्थिंकर आहेत का ते माहित नाही. आधीच्या पेक्षा बरीचं वेगळी मतं मांडताना दिसतात हल्ली. =))
लहान सहान गोष्टीची "अस्मिता रेसिपी" बनवणे हा आपल्या भारतीय लोक मानासिकतेचा एक नको असलेला अभिनिवेष आहे असे मनापासुन वाटते, संस्कृति जितकी जुनी तितके हे ओघाने येतेच हे ही खरेच!!!, ह्याचाच फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनी ने "it's just good business" म्हणत हा खंडप्राय देश देशोधडी ला लावला!!! , अर्थात काही प्रमाणात मी सुद्धा ह्याचाच पाईक!! हा विचार खोडला जातोय ह्याचा आनंद!, बिजनेसमैन ची प्रार्थमिकता अन त्याची अस्मिता "प्रॉफिट एंड लोस स्टेटमेंट" असते!!, प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार! कालमहिमा! अजुन काय!!
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार!
सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;)
उद्योगपतींना झोडणे हा आपल्याकडील डाव्या विचार सरणीच्या लोकांचा आवडता उद्योग आहे. ज्या नरेंद्र मोदींना १० वर्षे व्हिसा नाकारला त्याच अमेरिकेने त्यांच्यापुढे लोटांगण घातलेच ना? नुसताच त्यांना व्हिसा दिला असे नव्हे तर त्यांना खास आमंत्रण देऊन अमेरिकेत बोलावले. त्यांच्यावरील खटला सुद्धा रद्दबातल केला. याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?
नसत्या गोष्टीत अस्मिता घेऊन कोणत्याही देशाचा फायदा झालेला नाही. चीन हा सरळ सरळ प्रतिस्पर्धी असताना अमेरिका त्यांच्या फायद्यासाठी चीन बरोबर पण व्यापारी संधी करतेच ना?
अस्मिता काय आहे हे आणि उपचार म्हणजे नक्की काय हे माहित नसताना बरेच लोक टीका करताना आढळतात सेनाधिकार्याना त्यांच्या पुढे रांगेत उभे केले तर त्यात गैर काय आहे. जसे आपल्या राष्ट्रपतींना भेटण्यास लष्करी अधिकारी रांगेत ( त्यांच्या वरिष्ठते प्रमाणे) उभे राहतात. तसेच त्या राष्ट्राच्या अध्यक्षांना( ते त्यांच्या लष्कराचे सर्वोच्च अधिकारी आहेत) भेटण्यासाठी रांगेत उभे राहिले तर गैर काय? ते आंतरराष्ट्रीय औचित्याला धरून आहे.
रांगेचा फायदा तुम्हा आम्हा सर्वांनाच.
राहिली गोष्ट पत्रकारांची. त्यांची लायकी एकंदर काय आहे ते अपना सर्वाना माहित आहेच. कोणती गोष्ट काय तर्हेने प्रसारित करावी त्याचे औचित्य काय याचा कोणताही विधिनिषेध त्यांना नाही आणि त्याबद्दल माहिती नसताना whats app वर forward करणारे आपण.
अधिक काय लिहिणे?
उद्योगपतींना झोडणे हा उद्देश नाहीये...
एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे ...
रांगेत उभे राहण्या ऐवेजी हे सगळे २-३ च्या गटात उभे राहून आपली टर्न येण्याची वाट बघत आहेत हे शक्य होते ...
...दुसरे...समजा काही कारणाने ते उभे राहणे अपरिहार्य असले तरी तसे फोटो प्रसारित नं होऊ देणे जरुरीचे होते ...
याला तुम्ही अमेरिकेने नरेंद्र मोदिंच्या पुढे ( हे आवडत नसेल तर भारतापुढे म्हणतो) लोटांगण घातले असे म्हणणार का?
चार पैसे मिळवण्या साठी स्वत:च्या तत्वांना झक मारत घातलेली मुरड तरी नक्कीच म्हणता येईल ...
असो ... कसली अस्मिता / profit first वगैरे सुरु झाले कि मग काही बोलायलाच नको ...
एकसाथ हे सगळे एका लायनीत उभे आहेत त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची अगतिकता, नाईलाज,मरगळलेले दिसत आहे .
हेच म्हणायचे होते. नरेण्द्रने दम देऊन उभे केल्यासारखे चेहरे दिसत होते.असो.
मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.
मोदी पुन्हा अमेरिकेला गेल्यावर बील गेट्स्,जी.ई.चे सी.ई.ओ.,वॉल स्ट्रीटवरचे शेठजी लोक लायनीत उभे राहिलेले बघायला आवडतील.
त्यासाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या दहापट मोठी भारतीय अर्थव्यवस्था व्हायला हवी.तसे झाल्यास सगळे सी.ई.ओ आणि शेठजी लोक भारतीय पंतप्रधानांपुढेही लाईनीत उभे राहतील.हे माझ्या (किंवा मिपावरील सगळ्यांच्या) तरी आयुष्यकाळात शक्य होणार नाही त्यामुळे तशी ही हायपोथेटीकल कल्पना आणि शक्यता आहे :)
बाकी काहीही असले तरी अमेरिकन लोकांना अगदी लहानपणापासून लाईनीत उभे राहायची सवय असते त्यामुळे असे उद्योगपतींना लाईनीत उभे राहायला लागले तरी त्याविषयी त्यांना कोणताही कमीपणा वाटणार नाही.तसेच अमेरिकन लोकांनाही त्याचे काही वावगे वाटणार नाही. त्यामुळे भारतातील मिसळपाव डॉट कॉमवर जरी अशी चर्चा चालू असली तरी अमेरिकेतील एखाद्या हॅमबर्गर डॉट कॉम यासारख्या वेबसाईटवर अशी चर्चा व्हायची शक्यता सुतराम नाही :)
बाबा रे क्लिंटना, लाईनीत उभे रहायला कोणाचीच हरकत नाही.त्यात कमीपणाही नाही.मुकेशभाईनी ८३ नंबरची कुलाबा-सांताक्रूझ बस पकडली तरी त्यात वावगे नाही.
गेले काही वर्षे(म्हणजे नरेंद्र सत्तेवर याय्चय आधीपासून हो!) इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.
इंडिया सक्सेस स्टोरीज् येत आहेत. भारतिय उद्योजकतेचे मिडियात सर्वत्र नगारे,ढोल ताशे बडवले जात असताना ह्यांचे प्रतिनिधींचे चेहरे मात्र पडेल होते.
अहो माईसाहेब, त्यांचे चेहरे पडेल होते असे मला तरी वाटले नाही.तरीही इंडिया सक्सेस स्टोरी येत आहे म्हणून सतत त्यांचे चेहरे हसतमुख आणि उत्साहाने सळसळतेच पाहिजेत आणि समजा कधी तितका उत्साह त्यांच्या चेहर्यावर दिसला नाही तर ते अपयशी आहेत असे थोडीच आहे?
माई मला तरी सगळ्यांच्या चेहर्यांवर स्मित दिसते आहे. तिथे गाढ्वासारखे खिंकाळुन हसणे शोभले नसते. त्यामुळे शिष्टाचाराला अनुसरुन हास्य / स्मित विलासते आहे चेहर्यांवर. अर्थात ज्याला त्याला जे ते पाहयचे आहे तेच दिसणार.
तरीही हे फोटो बघा. राष्ट्रपतींच्या फेसबुक पेज वर अप्लोड केले आहेत (त्यांच्याच कार्यालयाने बहुधा):
https://www.facebook.com/presidentofindiarb/photos_stream
हे चित्र नक्की कधी व कुठे टिपले आहे याचा तपशिल न पाहताच तर्क लढवणे योग्य नाही.
ओबामांचे त्यांच्या विमानातले कुत्र्याशी खेळतानाचे वा विमानाच्या खिडकीतुन बाहेर पाहतानाचे फोटो गेले काही दिवस वॉसपवर फिरत आहेत. उद्या अमेरिकेत यावर चर्चा होऊ शकेल की देशापुढे अनेक समस्या असताना अध्यक्ष महाशय खुशाल कुत्र्याशी खेळत आहेत.
भाउ, तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही. बरोबर उभे असलेले नमो, पर्रिकर, राष्ट्रपती वगैरे वंदन मुद्रेत आहेत. आपल्याला ते नाही का खटकलं? ते तर उद्योगपतींनी रांग लावण्यापेक्षा गंभीर आहे.
प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपती उपस्थित असताना उपराष्ट्रपतींनी ध्वजाला वंदन करणे अभिप्रेत नाही. राष्ट्रपती काही कारणांनी अनुपस्थितीत असतील तर मात्र ही त्यांची जबाबदारी असते अश्या आशयाचा खुलासा देण्यात आलेला आहे.,
तुम्हाला वॉसप वर 'तो' फोटो आलाच असेल. आपले उपराष्ट्रपती राष्ट्रगीताला उभे आहेत मात्र त्यांनी ध्वजाला सलाम केलेला नाही.
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता? 'सावधान' स्थितीत उभं राहून नक्कीच हा फोटो काढला गेला नसेल.
ह्या अश्या क्षुल्लक गोष्टींवरून बातम्या बनवायचा हा आजकाल मिडियाचा आवडता खेळ झाला आहे.
आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता?
प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ?
इतरत्र म्हटल्याप्रमाणे (किमान माझ्या पाहण्यात आलेला) हा सद्यचर्चेतला फोटो टीव्हीवरच्या फूटेजमधून स्क्रीनशॉट स्वरुपात सिलेक्टिव्हली चारच लोक फ्रेममधे असणारा क्षण साधून प्रत्यक्ष प्रसंगाच्या पश्चात निर्माण केला गेलेला आहे. कोणा फोटोग्राफरने काढलेला फोटो नसावा.
या विषयी माहिती नाही. पण समजा मिळालेली माहिती खरी आहे असे समजलो तरी त्याच प्रोटोकॉल प्रमाणे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वंदन करण्यास मनाई नक्कीच नसावी.
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका.
मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७
+१००
प्रथम गोर्यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे.
ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.
राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षी
राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !
लष्करात नोकरी करीत असताना मी एक प्रश्न विचारला होता कि मान देण्यासाठी सलाम करणे आवश्यक आहे का? यावर उत्तर असे कि आपण गुड मॉर्निंग, जय हिंद किंवा प्रत्यक्ष सलाम करणे यातील कोणतीही एक गोष्ट करू शकता. मान देणे महत्त्वाचे आहे कसे करता ते नाही. राष्ट्रगीत चालू असताना आपण एकतर सलाम करू शकता किंवा नुसते सावधान मध्ये उभे राहू शकता. अनावश्यक हालचाल करणे, गप्पा मारणे किंवा तत्सम दुसर्या गोष्टी करणे( सिगारेट पिणे) हा ध्वजाचा अपमान होऊ शकतो
आपण जर नीट पाहिले असेल कि लष्कराची तुकडी जेंव्हा ध्वजाच्या समोरून जाते तेंव्हा तुकडीचा मुख्य बंदुकीने किंवा तलवारीने किंवा हाताने सलाम करतो आणि तुकडीतील सर्व जण नुसतीच परेड करीत पुढे जातात.ध्वजारोहणाचे वेळी परेड मध्ये फक्त परेड कमांडर हा सलाम करतो इतर सर्व जण सावधान मध्ये निश्चल उभे राहतात
तेंव्हा छिद्रान्वेश करण्यात काहीही हशील नाही असे मला वाटते.
खरे साहेब,
तुम्ही सांगितलेली गोष्ट हा सैनिकी परेडमध्ये सैनिकांनी कसे वागावे याबद्दलचा नियम आहे.
इथला प्रश्न "राष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजासमोर उभे असलेल्या देशाच्या उपराष्ट्रपतींना काय करावे असे वाटले होते?" हा आहे.
माझ्या मते जर मनात राष्ट्रध्वजाबद्दल जर आस्था असेल तर "जेव्हा कायद्याने / शिष्टाचारने तसे करणे निषिद्ध नसेल त्या प्रत्येक वेळेस" हात वंदनास वर जातील. तसे न करणे अगदी राष्ट्रद्रोह वगैरे आहे असे मी म्हणणार नाही पण मानसिकतेचे दर्शन मात्र जरूर आहे.
विशेषतः जेव्हा इतकी उच्चपदस्थ व्यक्ती असे वागते; जिने देशाबद्दल आणि देशांच्या मानकांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आदर आणि प्रेम असावे असा संदेश देणे अपेक्षित असते; तेव्हा नक्कीच विरोधाभास होतो.
एक्का साहेब
हा नियम सर्व सरकारी अधिकार्यांसाठी/ नोकरांसाठी आहे.उलट सिव्हीलीयंसनि सलाम केला पाहिजे हा नियम कोणत्याही शासकीय नियमावलीत नाही. ती केवळ गणवेश धारक नोकरांची केलेली नक्कल आहे. केवळ आपण एकतर सलाम करा किंवा "सावधान" मध्ये उभे राहा. गणवेश असो कि नसो.आपण खिशात हात घालून उभे राहिलात तर चालणार नाही. आणी हे आम्हाला स्पष्टपणे नौदल अकादमीत परेडच्या सरावाच्या वेळेस सांगितले होते. कि तुम्ही एखाद्या उच्च पदस्थाला सलाम करता किंवा ध्वजारोहण करता तेंव्हा त्यांनी सलाम केला किंवा नाही केला तरी चालेल."सन्माननीय" व्यक्ती तुमच्या पुढे संरक्षण मंत्री किंवा तत्सम म्हणून येतील.
( खर तर सिव्हीलीयंस साठी कोणताच नियम नाही) तो केवळ शिष्टाचाराचा भाग आहे.
बाकी उपराष्ट्र्पतिनी नक्की काय केले आहे हे मला मीहिती नाही आणी ते पाहीलेलेहि नाही
प्रत्येकाचा एक फोर्टे असतो! वरती बिज़नसमैन ची मानसिकता सांगितली आहे तसेच वैज्ञानिक, सैनिक, अभियंता, वकील, सरकारी कर्मचारी प्रत्येक वर्गाची एक अस्मिता असते, असे वाटते, लाईनीत उभारणे ह्यात मला तरी गैर काही दिसले नाही! हे एप्रोच बिज़नस मधे " परी अंतरी नाना कळा" असते असेही वाटते! आज लाइन मधे उभे आहेत तेच उद्या रोजगार देणार, इतकेच काय तर ज्या सरकार पुढे उभे आहेत त्या पक्षाचं इलेक्शन स्पोंसर करणार!सहमत आहे सोन्याबापू. मुळात तो फोटो कुठल्या वेळी घेतलाय ते माहीत नाही. सुरक्षाघेर्यातून क्रॉस होण्यासाठी सुद्धा थांबलेले असू शकतात. आणि उभे राहीलेच रांगेत तर त्याने असा काय फरक पडतो. त्यांना पण कळू द्या जेव्हा सामान्य माणसाला प्रत्येक लहान-सहान बाबीसाठी इथे रांग लावावी लागते. तेव्हा त्याची मानसिकता काय असते ते. फरक इतकाच आहे की इथे खिडकी तोंडावर बंद होण्याची भीती नाहीये या उद्योगपतींना. ;)आपले उपराष्ट्रपती निदान 'सावधान' स्थितीत तरी उभे होते पण ज्याने हा फोटो काढला तो फोटोग्राफर काय करत होता?प्रचंड सहमत ! त्या फोटोग्राफरला शोधून त्याच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करु नये ?मुळात रांगेत उभे राहण्यात कमीपणा वाटावा हेच सरंजामी मानसिकतेचं लक्षण आहे. : जेम्स बॉन्ड ००७+१०० प्रथम गोर्यांची आणि नंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या दादा-भाऊ-मामा-नाना-साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत त्यांच्या अस्मितेची गळवे कुरवाळण्याची गुलामगिरी करणार्या मानसिकतेला हे समजणे कठीण आहे. ज्या देशात लोकशाही नीट रुजली-बहरली आहे तेथे पंतप्रधानापासून सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहायला कमीपणा वाटत नाही तर ते शिस्तीचे, समतेचे आणि सभ्यपणाचे लक्षण समजले जाते.राष्ट्रध्वजाला वंद्न करणे ही अभिमानाची गोष्ट आहे, ज्याला ती जबाबदारी वाटत असेल त्याने देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवू नये. सर्वच जबाबदार्यांमधून सुटका. : सर्वसाक्षीराष्ट्रगीत चालू असताना राष्ट्रध्वजाला वंदन करावे की नाही हे "तशी माझी जबाबदारी आहे की नाही ?" याचा विचार करून ठरवावे लागते, अश्या माणसाला "राष्ट्राबाबत किती आपुलकी आहे ?" असा प्रश्न निर्माण झाला तर आश्चर्य नाही !