Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

ग
गवि
Wed, 01/28/2015 - 11:38
🗣 281 प्रतिसाद
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

प्रतिक्रिया द्या
163907 वाचन

💬 प्रतिसाद (281)
ब
बाळ सप्रे Wed, 01/28/2015 - 11:58 नवीन
टाटा सफारी भारतीय बनावटीची आणि स्टायलिश आणि व्हॅल्यु फॉर मनी अशी पहिली एस यु व्ही.. पण ताकद मिळाली २००५-०६ मध्ये डायकॉर इंजिन आल्यापासुनच.. पण ऑफरोडींग करायला फोर व्हील ड्राईव्ह असेल तरच धाडस करावं.. खास करुन चिखल वगैरे असल्यास .. अन्यथा जास्त वजनामुळे रुतण्याचा धोका अधिक संभवतो.. एक दोन वेळा पस्तावलोय :-( सफारी स्टॉर्मने मात्र लूक्स खराब केले या मस्त गाडीचे.. सध्याच्या काळातील गाड्यात लुक्स, पॉवर यात फॉर्च्युनरला तोड नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:01 नवीन
फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या आहेत का? बाकी व्हील फसणे हा प्रकार बेकार असतो.. फोर व्हील ड्राईव्हशिवाय लेहबिह नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 01/28/2015 - 12:19 नवीन
हो.. फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या .. जवळपास सारख्याच ताकदीच्या ( व किमतीच्या) .. पण एन्डेव्हर खूप बल्की आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गुंड्या Wed, 01/28/2015 - 12:28 नवीन
गवि, सर्वप्रथम, अत्यंत आवडीच्या विषयाची चर्चा चालू केल्याबद्दल धन्यवाद! फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या आहेत. लेह साठी फोर व्हील ड्राईव्हची गरज नाही. सीरीयस ऑफरोडिंग करायचं असेल तर फोर व्हील ड्राईव्ह आवश्यक आहे. मी गेलं वर्षभर सफारी स्टॉर्म वापरतोय्..भन्नाट गाडी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:32 नवीन
सफारीचं इंटिरियर आणि एक्स्टिरियर फिनिशिंग / क्राफ्ट्समनशिप सुरुवातीपेक्षा आता खूपच चांगली झाली आहे ना? आधी कमी प्लॅस्टिक क्वालिटी आणि जोडकामात कमी नजाकत असं वाटायचं. आता बहुधा स्मूथ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या
ग
गुंड्या Wed, 01/28/2015 - 12:37 नवीन
हो..एकंदरीत क्वालिटी मधे खूपच सुधारणा झाली आहे. सगळ्यात महत्वाचं इंजिन. नवीन वॅरिकॉर इंजिन अतिशय स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह आहे. लुक्सबाबत म्हणाल तर मला जुना आणि नवा दोन्ही आवडतात्..दोन्हीचा चार्म वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बाबा पाटील गुरुवार, 01/29/2015 - 09:13 नवीन
बद्दल माहिती मिळेल का ? टाटा साफारी स्टॉर्म्,एक्स यु व्ही,आणी नविन येणारी होंडा एच आर व्ही यापैकी एक विचार आहे.सध्या लिनिया आणी इको स्पोर्ट वापरत आहे,लिनिया खुपच कंफर्टेबल आहे,एको स्पोर्ट पुर्णपणे बायकांची गाडी आहे,त्यामुळे वरील तिन पैकी एक गाडी चॉइस करायला मदत करा. नविन गाडी बोंबलत फिरण्यासा ठीच घ्यायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ग
गवि गुरुवार, 01/29/2015 - 09:21 नवीन
चित्त्यावरुन इन्स्पायर्ड डिझाईन अन एकेकाळी आधी पैसे भरुन मग काही नशीबवान लोकांना ती लाभणार वगैरे अशी सुरुवातीची शान पाहून.. शिवाय आजुबाजूला दोघातिघांनी घेतलेली प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून काळ्या रंगाच्या एक्सयूव्हीवर फार मन बसलं होतं. पण हळूहळू रिव्ह्यू यायला लागले आणि नुसता लुकच बेस्ट आहे असं वाटायला लागलं. गियरशिफ्ट स्मूथ नसणे आणि इतरही काही निगेटिव्ह मते बर्‍याच ठिकाणी वाचली. टीम बीएचपी याबाबत उत्तम रिव्यू वगैरे देते. चर्चाही रोचक असतात पण त्यांची मेंबरशिप ही अमेरिकेच्या विसापेक्षाही अवघड आहे असं वाटतं. मेम्बर होण्यासाठी मोठे तपशीलवार क्वेस्चअनेअर मनापासून भरुनही कोणतेही कारण न दाखवता "पुरेशी डीटेल्ड उत्तरे न देणे" आधी मोघम आणि साचेबद्ध कारण दाखवून मेम्बरशिप नाकारतात. अनेकांना हा अनुभव आहे असं ऐकलं. याहून चांगली उत्तरं काय लिहायची ? असा प्रश्न पडतो. पण गाईडलाईन्स काहीच नाहीत. मग वाटतं जाऊदे, आपली लायकी नाही असं मानू.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
व
वेल्लाभट गुरुवार, 01/29/2015 - 09:26 नवीन
या साईट चा खूप पूर्वीपासून मेंबर व चाहता आहे. पण सहभाग काही घेता आला नाही. आजवर चार पाच वेळा माझ्य आयडीस बॅन करण्यात आलं. का? मला कळत नाही. मी इंग्रजीत ट्रेक वृत्तांत वगैरे टाकला, छान फोटो टाकले, इत्यादी झालं... आणि मग पुढे प्रतिसादात कुठला तरी शब्द रिपीट केला तर स्पॅमिंग च्या कारणाखाली माझा आयडी ब्लॉक झाला. अजून दोन तीनदा अशीच क्षुल्लक निरर्थक कारणं. त्यामुळे नाद सोडला. पण साईट वाचक म्हणून अजूनही फॉलो करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 01/29/2015 - 09:30 नवीन
तुम्हाला सदस्यत्व मिळाले तरी.. तुमची गाडी भारीपैकी असणार.. त्यांच्या दृष्टीने सामान्य गाडीवाल्यांना ते घेत नसावेत असं आपलं माझं एक मत झालंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 01/29/2015 - 10:55 नवीन
फार पुर्वी ह्याचा मेंबर होतो, जेव्हा लाईसन्स नव्हतं आणी स्वतःच्या गाडीची स्वप्न पण पडत नव्हती तेव्हा पासून.. इतर लोकांचे अनुभव वाचून भारी वाटायचे, पण मग मधे साईटचा लूक बदलला आणी अचानक लॉगिन बॅन झाले, का माहीत नाही :( मज जेव्हा परत मेंबरशीप घ्यायला गेलो तेव्हा कशाही पद्धतीने फॉर्म भरला तरी मेंबरशीप मिळालीच नाही, अगदी तुमची पुढची ड्रीम कार कुठली ह्याला, फेरारी, बीएमड्ब्ल्यू, लॅम्बोर्गीनी, नॅनो, बजाज..कुठल्याही उत्तराने साईट अ‍ॅडमीनचे समाधान झाले नाही.. शेवट नाद सोडला.. माझ्या मते भारतातल्या ऑफरोड ड्रायवींगला महींद्राला पर्याय नाही.. भारताच्या रस्त्यांची एतक्या वर्षांची उत्तम जाण, आणी त्याच जाणीवेतून बनवलेल्या गाड्या यामुळे मनात ऑफरोड म्हणजे तिथे फक्त एस्टी आणी जीप याच जाऊ शकतील असे समीकरण बनले आहे. स्वतः असंख्य वेळा जीपमधून (खास करून महींद्रा कमांडर) फिरलो असल्याने याची खात्री आहे :) तश्या सध्याच्या चलती असलेल्या क्रॉस सेगमेंटच्या गाड्या पण ऑफरोडला चालू शकतील.. अवांतर - महाराष्ट्रातील पावसाळ्यातील रस्त्यांची अवस्था बघता ऑफबिट, ऑफरोड कुठल्या रस्त्याला म्हणायचे हाही एक प्रश्णच आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
च
चिगो गुरुवार, 01/29/2015 - 10:29 नवीन
पण हळूहळू रिव्ह्यू यायला लागले आणि नुसता लुकच बेस्ट आहे असं वाटायला लागलं. गियरशिफ्ट स्मूथ नसणे आणि इतरही काही निगेटिव्ह मते
हेच.. मलाही ही गाडी सुरुवातीला प्रचंड आवडली होती. पैसे असते तर घेतलीच असती. पण नंतर कळलं, की गाडीपेक्षा गाडीबद्दलचं बोलबच्चन भारी आहे म्हणून.. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/29/2015 - 12:48 नवीन
एक्स.यु.व्ही. ५०० चांगली गाडी आहे!!!!!!!! बाकी बी.एच.पी. टीम विषयी काही माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे गुरुवार, 01/29/2015 - 20:18 नवीन
खरं आहे अगदी, त्यांचे काय निकष आहेत देवच जाणे, अगदी नवीन साईट असताना सुरुवातीला माझी मेम्बरशिप मिळाली, काही कारणाने ३-४ वर्ष फिरकलो नाही तिकडे. नंतर कार घेतल्यावर गेलो तर लॉग इन करायला पासवर्ड आठवेना. ते पासवर्ड पाठवेना. नवीन मेम्बरशिप घ्यायला गेलो तर तुमचे इंग्रजी खराब आहे असे चक्क चक्क सांगून परतवलंय कित्ती वेळा. माझा ब्रिटीश क्लायंट म्हणतो तुझे इंग्लिश चांगले आहे आणि हे देशी लोक खराब म्हणतात. मी नाद सोडून दिला. मग ठरवले आपण आपले ज्ञान ग्रहण करावे. उगाच मनस्ताप करून घेऊन फुकटचा आनंद मिळतोय तो का घालावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ख
खंडेराव Tue, 03/31/2015 - 08:58 नवीन
हिशोब विचित्र आहे. मी बर्याचदा प्रयत्न केला, आणि एकदा अचानक मिळाली मेंबरशीप. बाकी, ते देत असलेल्या माहितीला तोड नाही. त्यांचे ओवनरशीप रिव्यु झकास असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 03/31/2015 - 09:24 नवीन
मेंबरशीपबद्दल अभिनंदन... मेंबरशिपचे आपले असे फायदे असतात, काही व्यक्तिगत समस्या तिथे मांडून जाणकारांकडून मार्गदर्शन मिळू शकतं. सम-विचारी, सम-गाडी ग्रुप मिळू शकतो. मेंबर नसल्याने थोडी अडचण होते इतकेच, कारण आपल्याला आलेली समस्या तिकडे कुणी मांडली असेलच असे नसते. बाकी प्रवासवर्णनं, गाडी-मालकीचे अनुभव, नविन गाड्यांचे अनेक वापरकर्त्यांकडून येणारे खात्रीलायक अनुभव, काही तांत्रिक समस्यांवर उपाय, नविन बातम्या वैगेरे भरपूर उपयोगाची माहिती विना-मेंबरशीप उपलब्ध आहे ते फारच छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
क
कंजूस Wed, 01/28/2015 - 12:13 नवीन
अनुभव काडीचा नसलेला परंतू असले कार्यक्रम टिव्हीवर कोचावर बसून पाहणारा आणि वाचनोत्सुक. नाही म्हणायला मारुतीच्या फोरव्हीलड्राइव(दोन दरवाजे) मधून ठाण्याच्या एरफॉर्स स्टेशनच्या वरच्या डिशस्टेशनपर्यँत पावसाळ्यात जाण्याचा अनुभव घेतला आहे. तीस पस्तीस डिग्रीचा चढ आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 01/28/2015 - 12:25 नवीन
भारतीय रस्त्यांवर मात्र या गाड्या खड्ड्यांची पर्वा न करता सुसाट नेता येतात.. जास्त ग्राउंड क्लीअरन्स आणि जबरदस्त शॉक अ‍ॅब्सॉर्बर असल्याचा फायदा खूपच असतो.. अति वेगात वळवताना मात्र high CG चा तोटा असतो.. गाडी टॉपल होण्याचा धोका जास्त असतो..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/28/2015 - 12:38 नवीन
मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि स्कॉर्पियो गेटवए सुध्दा आवडते ...पण १० आणि ११ लाख घालुन अशी रगेड दिसणारी गाडी खास हौसेसाठी घेण्याचे दिवस आले नाहीत अजुन . टाटा क्षेनॉन क्ष्त स्पेक्स पाहता गेट अवे पेक्षा लय भारी वाटत आहे http://www.team-bhp.com/forum/indian-car-dealerships/56927-took-delivery-used-xenon-tata-concorde-motors-bangalore-edit-now-settled-7.html Image removed. ही पहा आमच्या आवडत्या गुल पनाग ची मॉडीफाईड गेट अवे http://www.team-bhp.com/forum/4x4-vehicles/139358-interesting-modified-scorpio-getaway-gul-panag.html Image removed. अअवांतर : मिपावर फोटो टाकताना फोटोचि हाईट आनि विडथ किती असावी ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:41 नवीन
ही गेट अवे कधी आली बाजारात ? पाहण्यातून कशी निसटली इतकी मोठी गाडी ? निरीक्षण खूपच कमी पडतंय माझं.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/28/2015 - 12:46 नवीन
ही गेट अवे कधी आली बाजारात ?
स्कॉर्पियोचेच मॉडेल आहे , खुप आधी पासुन आहे मार्केट मध्ये . मला तर बोलेरो कॅम्पर पण आवडते आणि ही बजेट मध्ये ही येत होती पण महिन्द्रा महाराश्त्रात ती ट्रान्स्पोर्ट वेहिकल म्हणुन विकतात ... पिवळी नंबर प्लेट ... श्षी ... दुष्ट कुठले :-\ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 12:56 नवीन
झेनॉन कव्वा आहे बरं का गाडी. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे, ज्याचे तसे दिवस आलेत त्यानेच विचार करावा. महाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 01/28/2015 - 13:05 नवीन
खरंच महाग आहे राव , पण हौसेला मोल नसते . अर्थात चैनीचे दिवस आल्यावर ;) घरी एक मस्त होन्डा सिटी घेवुन द्यायची अन मग म्हणायचे की आता मला विचारु नका मी वाट्टेल ते करेन, मग एक अशी रगेड गाडी घेता येईल ! कसलं इम्प्रेशन पडेल राव , एखादी ओपन टॉप जीप , जीन चे जॅकेट , फास्ट त्रॅक चा गॉगल ! आणि " आय डोन्ट गिव्ह अ फक" असा अ‍ॅटीट्युड ! कसली लाईफ स्टाईल असेल ती ... अहाहा !! #dream2020 !! अजुन थोडी वाट पहावे लागेल , तोवर जीप रँगलर भारतात लॉन्च होवो हिच इच्छा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/29/2015 - 08:28 नवीन
फास्ट त्रॅक चा गॉगल
कर दी ना छोटी बात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अन्या दातार Fri, 01/30/2015 - 11:48 नवीन
गॉगल घेऊन घेऊन फास्त त्रकचा?? माझे रेकमेंडेशन फकस्त आनि फकस्त रेब्यान. त बी D श्टाईलचा Image removed. हा अस्सा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 01/28/2015 - 12:47 नवीन
रेनो डस्टर कशी आहे हो?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 12:54 नवीन
डस्टर आणि इकोस्पोर्ट एकमेकींच्या प्रतिस्पर्धी. पण इतके करुन त्या पाच सीटरच. प्रत्यक्ष अनुभव नाही. पण या दोन्हीपेक्षा निसान टेरानो चांगली असल्याचे माहितीतल्या लोकांच्या अनुभवाने वाटते. या कंपनीचे नेटवर्क भारतात कितपत आहे आणि सर्व्हिस कशी अन कुठे मिळेल याविषयी शंका आहे. @प्रगो. बोलेरोला बाजूने काहीच लुक नाही. बाकी सर्व उत्तम आहेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:02 नवीन
डस्टर व इकोस्पोर्ट ओव्हर हाईप्ड आहेत माझ्या मते. इकोस्पोर्ट्चे तर वाईट रिव्ह्यू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट गुरुवार, 01/29/2015 - 09:02 नवीन
बोलेरोला बाजूने काहीच लुक नाही. बाकी सर्व उत्तम आहेच..
हे....... नई.....पटलं.. ब्वा. बॉक्सी आहे एकंदरित. पण अगदीच लुक 'नाही' असं नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 01/29/2015 - 09:10 नवीन
हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे: Image removed. With thanks from www.cartoq.com साईडने बघा.. सपाट अन तुलनेत बोरिंग, फीचरलेस.. म्हणून म्हटले, साईडलुक नाहीच.. अगदी जुन्या ट्रॅक्स अथवा आरमाडेचा साईड लुक.. आरमाडा जरा जास्त डौलदार म्हणायची तरीही. Image removed. With thanks from images.cardekho.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 06:27 नवीन
जैसी जिसकी सोच मला प्रचंड आवडते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:46 नवीन
बोलेरोवर एक अक्क्खं गाणं आहे हरियाणवीत. मॅडम बैठ बुलेरो में ..... ऐका एकदा. व्हिडियोच बघा. यातून गाडीची लोकप्रियता, लोकमान्यता कळते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 12:54 नवीन
गाड्या म्हणजे प्रेम आहे राव पहिलं ! याबद्दल एक ब्लॉगपोस्ट लिहिली होती. ही बघा काही उत्तम एसयुव्हीज भारतातल्या/बाहेरच्या/उत्पादित होत असलेल्या/बंद झालेल्या १) टाटा सिएरा - बघताक्षणी जो वेडा झालो तो आजतागायत. कदाचित शेवटपर्यंत २) टाटा सुमो - ही ख-या अर्थाने एसयुव्ही नाही, पण दमदारपणा आणि युटिलिटीमधे हिला तोड नाही ३) महिंद्रा बोलेरो - एकच शब्द; जबराट. शान आहे गाडीची. स्कॉर्पियो च्या आगमनावेळी फेज आउट प्लॅन झाला होता हिचा. पण महिन्यागणिक महिंद्राची टॉप सेलिंग कार हीच ठरत गेली आणि आता ब्रँड झालाय बोलेरो म्हणजे. ४) महिंद्रा स्कॉर्पियो - अतिशय कॉमन तरीही उठून दिसणारी. गरीबाची हमर. बसायला बिसायला किंचित छोटी असेल, पण कितीही ताबडवावी अशी गाडी. ५) टाटा सफारी - ख-या अर्थाने भारतातील पहिली लक्झरी एसयुव्ही. आजही सेकंड थर्ड जनरेशन सफारी खरी हौशी लोकं विकत नाहीत यातच या गाडीचा महिमा कळतो. ६) क्लासिक ५५० - महिंद्रा, अर्थातच. ओपन जीप हवी तर ही. लाल रंग आणि सेक्सी अ‍ॅलॉय्ज. खलास. ७) फोर्स वन - फोर्स कंपनीला फारसं वलय अजूनही मिळालेलं नाही. पण मर्सिडिज चं ह्रदय घेऊन मिरवणारी ही अजस्त्र गाडी जबरदस्त आहे एवढं सांगू शकतो. ८) कॅडिलॅक एस्कलेड - केवळ साईझमुळे इंप्रेस करते ही गाडी. ह्यूज ! अ‍ॅब्सल्यूटली ह्यूज ! ९) रेंज रोव्हर - हे जरा महागाचं प्रकरण आहे पण ग्रेस काय वर्णावी १०) जीएमसी एन्व्हॉय - पुन्हा तेच; साईझ डज मॅटर. आणखी एक अजस्त्र गाडी. आता एसयुव्ही पेक्षा जरा वेगळ्या पण मनात घर करून राहिलेल्या गाड्या. (खरं तर या याद्या संपणारच नाहीत पण असो) १) ११८ एनी २) कॉन्टेसा - द लाँगेस्ट इन्डियन सेडान टिल डेट ३) टाटा इस्टेट - पहिली वाहिली स्टेशन वॅगन प्रकारातली गाडी. टाटाने पहिल्या काही गाड्या too ahead of time काढल्या. आणि अर्थातच त्या फसल्या. त्यापैकी ही एक. नंतर बलेनो अल्टुरा, सिएना वीकेंड, इंडिगो मरीना, ऑक्टाविया काँबी आल्या. ४) मेटॅडोर - काय माहीत पण ही गाडी जाम आवडते. युनीक. ५) फोर्ड मॉंडियो - जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी होती खरं ही गाडी. पण अ‍ॅकॉर्ड, सोनाटा केवळ नावामुळे सरस ठरल्या. वर म्हटल्याप्रमाणे असंख्य गाड्या आहेत नमूद करण्याजोगत्या. पण तूर्तास इतक्याच. बाकी कितीही आल्या गेल्या तरी माझी डार्लिंग मात्र आमची ८००च राहील. अखेरपर्यंत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 01/28/2015 - 13:00 नवीन
१) टाटा सिएरा - बघताक्षणी जो वेडा झालो तो आजतागायत. कदाचित शेवटपर्यंत २) टाटा सुमो - ही ख-या अर्थाने एसयुव्ही नाही, पण दमदारपणा आणि युटिलिटीमधे हिला तोड नाही
टाटा सिएरा आता ऑब्सोलीट झाली आहे ना? पूर्वी एकदा सेकंडहँड फक्त सव्वा लाखात आली होती डिस्प्लेला. त्यामुळे रिसेल व्हॅल्यू नाही इतकंच कळलं. शिवाय मागच्या खिडक्या उघडत नाहीत असं दिसलं. फक्त फट करता येते थोडीशी मला वाटतं.. म्हणून त्यावेळी आवडली नव्हती. काय गुण होता खास? सुमो एसयूव्हीच आहे ना? का नाही? या निमित्ताने एस यू व्ही आणि एम यू व्ही म्हणजे न्येमकं काय यावर स्पष्टता यावी तर मजा येईल. इंडिगो मरिना मजकडे होती. हौसेने घेतली होती लांबच्या प्रवासाला. पण दगा द्यायचे इंजिन. मग विकावीच लागली बरीच स्वस्तात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 13:06 नवीन
अहो ती मागची न उघडणारी भव्य काच - तेच ते युनिक डिझाईन - अ‍ॅग्रेसिव्ह ओव्हरॉल लुक - सुपिरियर कंफर्ट इन द रेअर सीट - पॉवरफुल इंजिन - !!!! काय सांगू अजून !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/05/2020 - 07:52 नवीन
अहो ती मागची न उघडणारी भव्य काच - तेच ते युनिक डिझाईन - अ‍ॅग्रेसिव्ह ओव्हरॉल लुक - सुपिरियर कंफर्ट इन द रेअर सीट - पॉवरफुल इंजिन - !!!! काय सांगू अजून !
https://gaadiwaadi.com/legendary-tata-sierra-reborn-as-a-concept-at-2020-auto-expo/amp/ तुमची लाडकी सिएरा पुन्हा जन्मास आली हो वेल्लाभट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
कापूसकोन्ड्या Wed, 01/28/2015 - 16:02 नवीन
टाटा सुमो हे नाव Sumant Mulgaonkar यावरून ठेवले आहे असे समजले पण कितपत खरे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
घ
घाटावरचे भट गुरुवार, 01/29/2015 - 09:55 नवीन
ते Sumant Moolgaonkar असे आहे. म्हणून नाव SuMo असे आहे. कै. सुमंत मूळगावकर टाटा मोटर्सचे चेयरमन होते. त्यांच्या कारकिर्दीत टेल्को (तेव्हाची. आत्ताची टामो) उभी राहिली असे म्हणायला हरकत नाही. २०७, ४०७ वगैरे त्यांच्याच काळातल्या. शिवाय त्यांनी टामो-करवी सामाजिक उपक्रमांमध्येही भरीव योगदान दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
क
कापूसकोन्ड्या गुरुवार, 01/29/2015 - 13:50 नवीन
धन्यवाद माहितीबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
व
विटेकर Wed, 01/28/2015 - 13:25 नवीन
नुकतीच लोन्च झालेली मर्क सी एल ए / जी एल ए ??? आणि जी क्लास ६३ ए एम जी ??? वोव !! पुढच्या वर्षी सी एल ए / जी एल ए पैकी एक नक्की !!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/28/2015 - 13:45 नवीन
झेनॉन मस्त आहे. पॅसेंजर बॉडी बिल्ड करुन घेणं सगळ्यात मस्त. आता भारतीय मार्केट मधे असणार्‍या सगळ्या एस.यु. व्हीं.ची किंमत २७ लाखापर्यंत हा घटक गृहित धरला तर माझी विशलिस्ट खालील प्रमाणे आहे. १. फोर्ड एंडेव्हर. २. टोयोटा फॉर्च्युनर ३. लॅंडरोव्हर ४. टाटा झेनॉन (४*४) वाली पॅसेंजर बॉडी बांधुन घेऊन ५. एक्स यु व्ही ५०० ६. स्कॉर्पिओ ७. डस्टर आणि किंमत हा घटक नाही पकडला तर १. ऑडी क्यु ५ २. बी.एम.डब्ल्यु. ३. एक्स ५ टाटा सिएरा वर वेल्लाभट म्हणतात तशी प्रचंड आवडायची. आता टाटा २०७ जी झेनॉन म्हणुन विकली जाते तिचा ओरिजिनल टर्बो चार्जर बदलुन, बोर्ग वॉर्नर चा टर्बो चार्जर लाउन एक झॅक एक्सुसिव्ह एस.यु.व्ही. पुढे मागे बनवायचा प्लान आहे. :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sat, 01/31/2015 - 06:50 नवीन
अतिप्रचंड महाभयानक असहमती. तुम्हाला कदाचित २०७डिआय आणि झेनॉन पिकप म्हणायचे असावे. अन्यथा २०७ आणि झेनॉन एक्सटी मधे जमीन-आस्मानाचा फरक आहे. जरा स्पेसिफिकेशन्स तपासून पहा. विशेषतः चॅसिज वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 07:46 नवीन
ओह..माफ करा...मला एवढे दिवस झेनॉन ही २०७ डी.आय. ची वारसदार वाटायची. -_- मला लिंक द्याल का फरकाची? मी कारवाले आणि कारदेखो वर चेक केलं पण २०७ डी.आय. सापडली नाही. -_- त्यामु़ळे माझा असा समज झाला की झेनॉन ही २०७ डी.आय. ला रीप्लेस करते आहे. -_-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 07:51 नवीन
एक मिनिट ही लिंक पहा. http://en.wikipedia.org/wiki/Tata_TL ह्याच्यामधे झेनॉन २०७ चा फोर्थ जनरेशन सक्सेसर म्हणुन दाखवते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Sat, 01/31/2015 - 09:34 नवीन
विकीवरील माहिती जनरेशनवाईज जरी ठीक असली तरी त्यात तांत्रिक माहिती समाविष्ट नाही. आणि जनरेशन जरी चौथी दाखवलेली असली तरी फर्स्ट जेन आणि फोर्थ जेन गाडीमधे खूप फरक आहेत. आत्ता जी २०७ बाजारात उपलब्ध आहे त्यात टाटा ४एसपी डिआय इंजिन आहे (नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड)तर झेनॉनमधे २.२लि किंवा ३लि कॉमन रेल इंजिन आहे. २०७ ४-व्हील ड्राईव्हमधे उपलब्ध नाही, झेनॉन आहे. जर कुठे साधर्म्य असेल तर साधारण स्टायलिंग प्रोफाईलमध्ये आहे. तुमचा गोंधळ २०७ डिआय आरएक्स आणि झेनॉन पिक-अप मधे झाला असावा. झेनॉन पिक-अपचे मेकॅनिकल्स बर्‍याच प्रमाणात २०७ डिआय वर आधारित आहेत. कॅब स्टायलिंग झेनॉन सारखे आहे आणि लोड बॉडी जास्त छान दिसणारी आहे. शिवाय त्याला ३लि टर्बो डिआय इंजिन आहे (डायकॉरचा ऑप्शन आहे, भारतात उपलब्ध आहे की नाही ठाऊक नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बाबा पाटील Wed, 01/28/2015 - 14:55 नवीन
सफारी स्टॉर्म नक्की.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 01/28/2015 - 16:20 नवीन
रोबस्ट रफ टेरेन व्हेईकल...

Image removed..Image removed. लँड रोव्हर (सिरीज १) (डावीकडील चित्र जालावरून साभार)

आणि ऑल टेरेन बुलेटप्रूफ व्हेईकल...

Image removed. १९९०च्या दशकातला M-सिरीज अमेरिकन मेन बॅटल टँक

  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 01/28/2015 - 17:08 नवीन
रणगाड्यातून जायची आयडिया तुम्हालाच सुचणार! मला ब्वा पायी चालायला आवडतं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/29/2015 - 09:50 नवीन
+D पहिली गाडी वाळवंट, दलदल, चिखल, इत्यादीत ५०-६०,००० किलोमीटर चालवली आहे. दुसरी मात्र फक्त ५० एक मीटर्स चालवून रक्तदाब वाढण्याची मजा चाखली आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वेल्लाभट Wed, 01/28/2015 - 17:57 नवीन
आच्चर्य म्हणजे...... जिप्सी चं नाव कुणीच घेतलं नाही ! Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा