ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.
कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.
मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.
-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)
💬 प्रतिसाद
(281)
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 08:18
नवीन
पॉइंट आहे.
- Log in or register to post comments
ग
गुंड्या
गुरुवार, 10/01/2015 - 07:38
नवीन
सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म बद्दल अधिक माहीती हवी आणि असेल तर आमच्या SOUL (Safari Owners United League) च्या ड्राईव्ह मधे आपण सहभागी होऊ शकता !
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/01/2015 - 07:42
नवीन
हैला... असा ग्रुपदेखील आहे का पुण्यात? मीही असा काहीतरी ‘झोल’ (XOL) करावा म्हणतो. ;-)
- Log in or register to post comments
ग
गुंड्या
गुरुवार, 10/01/2015 - 07:47
नवीन
हो आहे पुण्यात. महिन्यातून एक ड्राईव्ह असतो.‘झोल’ (XOL) कराच !
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 08:17
नवीन
लोल !
सही आहे.
- Log in or register to post comments
ज
जिन्क्स
गुरुवार, 10/01/2015 - 09:27
नवीन
तुम्हीच लिहा ना एखादा user review सफारी बद्दल.
- Log in or register to post comments
आ
आर्बि२३९९
गुरुवार, 10/01/2015 - 08:39
नवीन
माझी टाटा सफारी २.२ EX (February २००८) आहे . ~ २,००,००० रंनिंग झाले आहे :). जवळपास सर्व राज्ये पालथी घातली आहेत हिच्यातून :) (ह्यात २ लडाख ट्रिप्स अन अनेक हिमाचल +काश्मीर ट्रिप्स आल्या )
गाडी एकदम rugged आहे , आफ्टर सेल्स सपोर्ट बेस्ट आहे . फक्त suspension अन timing belt कडे लक्ष द्यावे लागते वेळोवेळी ....
driving comfort unmatched आहे अन रोड presence बाबत बोलायलाच नको !
हे काही फोटू
गुरुडोंग्मार लेक , नॉर्थ सिक्कीम:
भूतान
सच पास (२०१३)
स्पिती valley
pangong lake २००९
कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/01/2015 - 08:48
नवीन
फोटो लई कातिल आणि जब्र्या! इनो घेतो आहे.
आमच्या ब्लॅकप्युमालाही असेच नवनवे प्रदेश पाहण्याचे भाग्य लाभो अशी प्रार्थना करा. येत्या वर्षात तिला सदेह लडाखगमन करवून ते रंगीत फ्लॅग लावण्याचे मनी योजितो आहे (तसे मी एकदा लडाख आणि एकदा झंस्कार सदेह केलंय, पण ते झेंडे शरीरावर लावता येत नाहीत ;) )
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 09:12
नवीन
कडकच फोटो. सफारीचं ते स्पेअर व्हीलच अर्धा जीव करून टाकतं...
तसं म्हणता, एक वेडं स्वप्नं होतं अजूनही आहे, ८०० ने मुंबई लदाख मुंबई करायचं. असो. ८०० नाही आता, तरी जी कुठली गाडी असेल ती. पण डोअर टू डोअर गाडीने जाणार.... नैतर नाय जाणार असं ठरवलंय. व्हेनेवर इट इज.
ते....एखाद ईनो एक्स्ट्रा असेल तर बघा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 10/01/2015 - 08:59
नवीन
कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !
विकायची आहे काय?
-Tj (Truly Jargon)
- Log in or register to post comments
आ
आर्बि२३९९
गुरुवार, 10/01/2015 - 10:04
नवीन
ही ही
नाही, आता तिची पालखी माझ्याबरोबरच निघणार !
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 10/01/2015 - 09:17
नवीन
एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली टीयूवी३०० प्रतेक्ष पाहिली. घाईत असूनही घाई दूर ठेवून दरवाजे वगैरे उघडून पाहिले. मागच्या सीट्स जंपसीट्स आहेत. लुक ओव्हरऑल चांगला आहे. फिनिशिंग उत्तम. समोरचं ग्रिल पाहून जीप चेरोकी (की शेरोकी.. चूभूदेघे) ची आठवण होते. (जशी पूर्वी मरिना = गरिबाची सीआरव्ही, तशी टीयूव्ही३०० गरीबाची चेरोकी?! ;) )
जीप चेरोकी:
With thanks from Jeep.com
टीयूव्ही:
With thanks from Mahindratuv300.com
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/01/2015 - 09:22
नवीन
हो हो. ते उघड आहे. शरूकी वरूनच उचललेलं आहे डिझैन.
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 10/01/2015 - 09:23
नवीन
शरुकी आहे होय उच्चार.. धन्यवाद..
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/01/2015 - 09:23
नवीन
खरंय. फ्रंट ग्रिल ग्रॅंड शेरोकीचं डिझाईन आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/02/2015 - 03:58
नवीन
फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु आहेत का कोणाचे? मला फ़ोर्स चे डीलर नेटवर्क कसे आहे ते माहिती नाही तस्मात् त्यांची सर्विस कशी असेल कल्पना नाही.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 05:52
नवीन
गोरखा चांगली गाडी आहे. मी एकदा चालवली आहे चांगली ३० एक किमी. टु मच पॉवर अंडर लाईट चासीज एवढं म्हणेन. ऑफरोड ला चांगली आहे. पण इंटेरिअर एवढं विशेष आवडलं नाही. शिवाय मी चालवलेली गाडी हार्ड टॉप होती. हि गाडी वरती टॉप नसताना अजुन भारी दिसेल.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/02/2015 - 06:29
नवीन
तिचं साइलेंसर साइड न बाहेर काढलेले आहे उभे ते लैच भारी वाटते एकदम हमर स्टाइल
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 06:40
नवीन
हमर वरुनचं ढापलयं डिझाईन ते. अर्थात ६२०० सी.सी. चं इंजिन सोडुन =))!!!
- Log in or register to post comments
ग
गुंड्या
Tue, 10/06/2015 - 06:31
नवीन
एअर इनटेक आहे तो..for deep water wading
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 10/06/2015 - 11:01
नवीन
हेच म्हणतो.
तो हवेचा इनलेट आहे असं वाटतं, एक्झॉस्ट नव्हे.
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Tue, 10/06/2015 - 05:54
नवीन
टीयुव्ही३०० ची टेस्ट ड्राइव्ह काही गेल्या वीकेंडला घेता आली नाही. कुटुंबाला घेऊन खराडी-पनवेल-डोंबिवली-निगडी-चाकण-सुपा-अहमदनगर-जामगावचा भुईकोट किल्ला-भाळवणी-पारनेर-सुपा-पुणे असा ६००किमी मॅरेथॉन ड्राइव्ह झाला. एक्सयुव्ही बिहेव्ड वेल.
एक्सप्रेस हायवेला नॉर्मल क्रुझिंग स्पीड १२०, फास्ट क्रुझिंग स्पीड १३०, हायेस्ट स्पीड १६० (खालापूर टोल नंतर मुंबईच्या दिशेने आणि उर्से टोलनाक्यानंतर पुण्याच्या दिशेने फक्त सरळ रस्ता असतानाच). नॉर्मल क्रुझिंग करताना त्या १२० च्या वेगातही आतमध्ये बॉडी रोल न होता व्यवस्थित आणि कॉन्फिडन्ट वळणे घेता आली. १३०किमी/तासच्या पुढे मात्र केबिन नॉइज जरा वाढतो. पण १२० पर्यंत स्पीडोमीटरकडे पाहिल्याशिवाय कळतही नाही की आपण त्या वेगात चाललो आहोत. त्यामुळे जरा cautiously चालवावी लागतेय.
- Log in or register to post comments
ग
गुंड्या
Tue, 10/06/2015 - 06:37
नवीन
प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील वेग टाळावा. भारतातील एकही रस्ता ह्या वेगासाठी तांत्रिकरित्या योग्य नाही. तसेच अश्या वेगाने गाडी चालवल्याचा उल्लेख आणि फोटोही सार्वजनिक करु नयेत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 10/06/2015 - 10:33
नवीन
अॅग्रीड
माझ्यामते भारतातील रस्तांवर जास्तीत जास्त स्पीडलिमिट ८० किमी प्रति तास आहे !
जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा !
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 10/06/2015 - 10:59
नवीन
८० किमी प्रति तास या वेगासाठी रस्ते , वळणे, उतार बनवलेले असतात तिथे जास्त वेग धोकादायक ठरू शकतो
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Wed, 10/07/2015 - 05:30
नवीन
फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. परंतु सुरक्षित ड्राइव्हिंगचे नक्की करेन. पण एक्सप्रेस-वेवर अगदी वीसचाकी ट्रेलर सुद्धा ८० हून अधिक वेगाने चालतो. त्याला आपल्याकडे इलाज नाही. मी मधल्या लेनमधून ८० (किंवा कमी) वेगाने जात राहिलो तर ट्रेलर माझ्यावरुन घालतील. किंबहुना इथल्या कुठल्या सदस्याने ऐंशीहून अधिक वेगाने वाहन चालवले नाही काय?
अवांतर: आपल्याकडील वेगमर्यादा या इसवी सन १८५७ च्या काळातील आहेत. ज्यावेळी गाड्यांमध्ये लहान क्षमतेची इंजिने होती, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा नव्हत्या त्यावेळी मोटर वाहन आणि हायवेचे नियम बनवले गेले आहेत. त्यात कालपरत्वे सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. सध्या एक्सप्रेस हायवेवर वेगमर्यादा १२० करावी की १०० यावर सरकार आणि न्हाई पातळीवर चर्चाही सुरु आहे.
अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 08:21
नवीन
अहो पण आपल्याकडे लोकांना ड्रायव्हिंग सेंस नाही त्याचे काय? ७०-८०+ च्या स्पीडने XUV/Fortuner सारखे रणगाडे zig-zag रिक्शाचालवल्यासारखे चालवताना बघितले आहेत....ते सुध्धा आजूबाजूच्या वाहनांपासून फक्त २-३ फूट अंतर ठेउन
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 08:24
नवीन
बाला.... बाजू व्हं !
फोर्चुनर आयली दादूस ची...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 08:33
नवीन
असे नस्ते....सगळ्या टैपची लोकं बघितली आहेत...अगदी सुटाबुटातला डस्टरवाला हॉर्न न देता डावीकडून झूमकरून ओव्हरटेक करून गेलेला आहे
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 12:44
नवीन
हो रे टका... :)
म्हैत्ये. पण तरीही.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 13:29
नवीन
अस्सं कसं अस्सं कसं :)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 13:54
नवीन
दादूस ची गाडी दादूस ची गाडी असते.
तिची सर सुटाबुटाला नाही.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 08:23
नवीन
अवाव्वा ! हे भारी आहे.... वाचायला हवं
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 10/09/2015 - 04:14
नवीन
ही पोस्ट आपल्याला उद्देशून नाही, हे आधीच स्पष्ट करू इच्छितो.
गाड्यांमध्ये मोठ्या क्षमतेची इंजिने आली, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा आल्या, तरीही भारतात, अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाहीये ;) कारण अर्थात वेगळीच आहेत, हे मान्य आहेच.
उलट भारतात तरी रेकलेस ड्रायव्हिंग फार वाढत चालले आहे. गाडी लोडेड आहे, टेक्निकली सुपिरिअर आहे, मग कशाला काळजी करा? ही भावना असू शकेल काय?
पॉवर स्टेअरिंग आले आणि कट मारण्याचे प्रमाण वाढले. मी आत्तापर्यंत गाडीत एबीएस, ईबीडी नाहीयेत म्हणून सांभाळून चालवायचो. पण जर मी मोठी गाडी घेतली आणि अधिक स्पीडवर चालवायला सुरुवात केली तर ते कधी रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकेल सांगता येत नाही. लोकं सेफ्टी फीचर्सना गृहीत धरून अधिक फास्ट चालवायला लागलीत!
एके ठिकाणी असे दावे करण्यास सपोर्टिंग मटेरीअल सापडले. टेक्निकली लोडेड कार्स वाले लोकं रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकू शकतात.
http://www.esafety-effects-database.org/applications_16.html
आल इन आल, स्पीड थ्रील्स, बट इट किल्स!
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 05:56
नवीन
(मिपाच्या पोस्ट कुणालाच उद्देशून नसतात हे गृहितच आहे. उलट सारे जण मिळून साधक बाधक चर्चा करत आहेत.)
एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉयवर ब्रेक्स, एअरबॅग यांमुळे रेकलेस ड्रायविंग वाढले का? मला तरी असे वाटत नाही. उलट भारतात फारतर ५-१०% कार्सना (अंदाज आपला) हे फीचर्स असतील (पॉवर स्टिअयरिंग सोडून). उलट माझा अनुभव असा आहे की असे फीचर्स नसलेलेच बहुतेक ड्रायव्हर्स रेकलेस चालवतात. उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ. किंबहुना रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडी कुठल्या परिस्थितीत शिकलात आणि शिकवायला कोण होतं यावरही थोडेबहुत अवलंबून असते. रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडीपेक्षा मानसिकतेचा भाग अधिक आहे. सीटबेल्ट पोलिस पकडतील म्हणून लावणारा आणि सीटबेल्ट आपल्यासाठी आहेत म्हणून लावणारा यात जो फरक आहे अगदी तोच.
अजूनही आपल्याकडे चार पैसे वाचतात ना म्हणून सेफ्टी फीचर्स नसलेली कार विकत घेतली जाते. अगदी मीही आयुष्यातल्या पहिल्या कारच्या वेळी तेच केले. कारण तेव्हा फक्त पावसापाण्यापासून वाचत शरातल्या शहरात फिरणे, कधीतरी फोटोशूट्ला आणि नियमित ऑफिसला जाणे एवढाच उद्देश होता. परंतु जसा जसा मी आत्मविश्वासाने गाडी चालवायला शिकलो, प्रवासाचे पल्ले वाढले, दिवसाला सहाशे-सातशे किलोमीटरचे काही वाटेनासे झाले, गाडीचा वेग वाढला आणि विशेष म्हणजे लग्न झाले, बाप झालो त्यामुळे मला माझ्यापलीकडे जाऊन आणखी काही प्रियजनांचा विचार करण्याची गरज वाटू लागली. त्यामुळे अपग्रेड करताना साहजिकच मी सेफ्टी फीचर्स असलेलीच गाडी पाहत गेलो.
राहिला प्रश्न वेगमर्यादेचा, तर कुठल्याच रस्त्यावरील वेगमर्यादा प्रॅक्टिकल नसावी. हे नियम १९८९ मध्ये बनवले आहेत. पुण्यातल्या बहुतेक रस्त्यांवर ती चारचाकी वाहनाला ३० आणि दुचाकीला ४० अशी आहे. सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच. परंतु त्यांनाही माहीत आहे की बदलत्या तंत्रज्ञानाच्या (वाहने आणि रस्ते दोन्ही बाबतीत) दृष्टीने हे प्रॅक्टिकल नाही. आणि ते बदलण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेतच.
ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 06:44
नवीन
यात ऑटोरिक्षा कशी विसरलात =))
खिखिखि....इतके सरकार विचार करते???
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 07:11
नवीन
नक्कीच करु शकते. सरकारकडे ARAI सारख्या पारंगत तंत्रज्ञ असलेल्या नियामक संस्था आहेत. नुकत्यात १२५सीसी वरील सर्व बाईक्सना २०१६ पासून ABS सक्तीचे करणार आहेत अशी बातमी वाचनात आली.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 07:52
नवीन
तेच म्हणतो...ती बातमी अजून बातमीच आहे...तसा नियम बनायचा आहे
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 08:06
नवीन
नियम झाला आहे हे सांगण्याचा हेतू नसून, सरकार तांत्रिक विचार करते हे दाखवण्याचा आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 10/09/2015 - 08:14
नवीन
ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश!
>>
+१००.
बहुतांशी सहमत. आपल्याकडले स्पीड लिमीटस हे एक घोळ असतात त्यात वाद नाही. शहरी वाहतुकीत तर कितीही नियम लावलेत तरी सुधारणा नाहीच :D
सेफ्टी फर्स्ट! आपल्या हातात तेवढेच आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 10/06/2015 - 11:03
नवीन
हो ते चांगलंच आहे,
पण भाई जरा जपून...
यक्शेवीस ला टरन म्हणजे जरा रिक्सीच
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Wed, 10/07/2015 - 05:18
नवीन
१२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे. एकदा घाट चढताना अमृतांजन पुलाच्या एक किमी आधी आणि दुसरा सिंहगड इन्स्टिट्यूटचा टर्न. दोन्ही ठिकाणी बर्यापैकी रस्ता मोठा आणि मोकळा असतो. अर्थात फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. पण मला गाडीचे (आणि माझे) लिमिट टेस्ट करण्याचे असल्याकारणे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 10/07/2015 - 08:22
नवीन
वोक्के
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 10/07/2015 - 14:02
नवीन
धागा प्रतिसाद आव्डले...
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/07/2015 - 15:31
नवीन
आज एक मॉडीफाय केलेली थार बघितली. अलॉय व्हील्स ला बॉटम आउटवर्ड कँबरिंग करुन घेतलेलं आणि वरच्या आडव्या पट्टीवर ६ फॉग लँप्स लावलेले. बॉडीवर दबा धरुन बसलेल्या वाघाचं मस्तं आर्टवर्क केलेलं.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 17:03
नवीन
फटू??? बाकी थारपेक्षा गुरखा जास्त आवडली पण फक्त लुक्स साठीच
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/07/2015 - 19:20
नवीन
फोटो काढायला वेळ मिळाला नाही. :/
- Log in or register to post comments
ग
गुंड्या
Fri, 10/09/2015 - 09:47
नवीन
थर आणि जिप्सि मॉडिफाय करण्यासाठी एक नंबर आहेत. एअर इनटेक, एक्झॉस्ट, विंच, रोल केज्...बरंच काही करता येतं!
- Log in or register to post comments
भ
भटकंती अनलिमिटेड
Fri, 10/09/2015 - 09:59
नवीन
थार आणि जिप्सीसारख्या गाड्यांचं एक कॉमन वैशिष्ट्य असं आहे की बेसिक लॅडर ऑन फ्रेम चॅसीवर इंजिन आणि ट्रान्समिशन मॉड्युल माऊंट करुन त्यांचं लग्न लावलं आहे. सस्पेन्शनदेखील अगदी बेसिक प्रकारचे. प्रत्येक गोष्ट सुटसुटीतरीत्या जोडली गेल्याने त्याचे मॉडिफिकेशनदेखील सहज साध्य असते. म्हणूनच मॉडिफाय करणार्या जमातीच्या त्या आवडत्या गाड्या आहेत. दुचाकींमध्ये तशीच रचना रॉयल एन्फिल्डची आहे.
- Log in or register to post comments
अ
अ.रा.
Fri, 10/09/2015 - 09:48
नवीन
खरच अफाट आणि अचंबित करणारी माहिती आहे तुमच्या सर्वांकडे ... सलाम ....
मला गाड्यांमधले काडीचही ज्ञान नाही तरीपण सगळी माहिती वाचून माझाकडेही एसयुवि असावी असं वाटायला लागलंय.
माझाकडे wagonR आहे १५ वर्षापूर्वीची. कंटाळा आलाय गाडी चालवून असं नाही तर नवीन टेक्नोलोजी असलेली गाडी हवी म्हणून एसयुवि घ्यायचा विचार पक्का झालाय. आधी मारुतीची ertiga घ्यायचा विचार पक्का झाला होता पण नवीन आलेली महिंद्राची TUV ३०० ने परत विचार करायला सुरुवात केलीये.
माझी गाडीबद्दल फार काही अपेक्षा नाहीयेत . मला फमिली कार घ्यायची इच्छा आहे तरी तुमच्या सारख्या जाणकारांकडून योग्य माहिती मिळाली तर आपला आयुष्यभर आभारी असेन.....
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »