ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.
कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.
मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.
-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)
With thanks from www.mahindracarsindia.com
-भरपूर रफनेस असलेली थार
-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट
-एक्सयूव्ही५००चा अॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)
-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.
-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा
-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.
with thanks from i.ndtvimg.com
...
ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.
या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)
💬 प्रतिसाद
(281)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 18:31
नवीन
जिप्सी अजुनही भारी आहे. पण मारुतीवाले दळिद्री, अजुनही काही विशेष सुधारणा करत नाहियेत डिझाईनमधे. जर का काळाशी सुसंगत बदल केले तर ही पण एक मस्त आणि मस्ट होऊ शकेल.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 01/28/2015 - 18:36
नवीन
..जिप्सी कुठेही दिसली नाही नवीन गेल्या कित्येक वर्षांत
..डिसकंटिन्यु झालीय ना?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 03:16
नवीन
मिळते अजुन. पण वेटिंग पिरिअड खुप आहे. आर्मी मधे अजुनही नव्या जिप्सिज घेतात. मारुतीनी त्यात सुधारणा करायला हवी काळाशी सुसंगत.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 06:00
नवीन
मला कळत नाही
द ऑल न्यू मारुती जिप्सी
२.० लि DDIS Turbo Engine
Bigger, Better, Meaner
हे वास्तव का होऊ शकत नाही मारुती साठी? सेगमेंट हलवून सोडतील हो अशी गाडी काढली तर.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 06:17
नवीन
२ नको. ही गाडी खरचं मीन मशिन करायची असेल तर ४.२ लिटर च्या DDIS Supercharged engine पाहिजे. ते पण इनलाईन ८ किंवा व्ही-६ मधे.
टर्बोचार्जरच्या ऐवजी ही गाडी सुपरचार्जड म्धे जब्राड परफॉर्म करेल.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 06:20
नवीन
हां ते तुम्ही योग्य सांगा. पण म्हणजे...... का? या गाडीत तो दम भरण्याचा विचार का नाही करत मारुती? शॅ !
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 06:24
नवीन
काही कल्पना नाही हो. पण जर का ह्या लोकांनी मनापासुन लक्ष घातलं तर जिप्सीचं सुवर्णयुग परत यायला हरकत नाही. फक्त अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेलं इंजिन आणि इंटेरिअर मधे थोडे फेरफार केले तरी गाडी लै सेक्सी होईल ती. टायर्स चा कँबर थोडासा वाढवुन फॅट टायर्स टाकले तर सोन्याहुन पिवळं!!
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 06:25
नवीन
@कॅजॅस्पॅ: जिप्सीला इतकी पॉवर दिली तर आकाराच्या /वजनाच्या मानाने ओव्हरपॉवर्ड होऊन बेफाम किंवा अनकंट्रोलेबल होईल असं वाटतं का? तदनुषंगिक व्हॉल्युम आणि डिझाईन बदलही करावे लागतील ना? ग्राउंड क्लिअरन्स कमी करावा लागेल का वाढीव पॉवरसहित स्टॅबिलिटीसाठी?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 06:39
नवीन
चासी रिएन्फोर्स्ड करायला लागेल वाढीव ताकद सहन करण्यासाठी. गिअरबॉक्स ४ स्पीड मॅन्युअल च्या ऐवजी ५ किंवा ६ स्पीड मॅन्युअल/ सेमी/ ऑटोमॅटीक करायला लागेल. चारही चाकाला मास्टर सिलिंडर पुश्ड प्रकारचे डिस्क ब्रेक लावायला लागतील. ग्राऊंड क्लिअरन्स कमी करायची आवश्यकता नाही. जिप्सी ला सद्ध्या कुठल्या प्रकारचं सस्पेंशन वापरलं जात हे माहित नाही. पण लीफ वापरत असतील तर त्याच्या जागी मागच्या चाकांना लीफ आणि पुढच्या चाकांना इंडिव्हिजुअल सस्पेंशन वापरायला लागेल.
किंमत कदाचित दोन किंवा अडीचं पटीनी वाढेल, स्कॉर्पिओ वगैरे च्या रेंजमधे येईल.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/29/2015 - 10:19
नवीन
मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट चं इंजिन ( जे की फियाट चे आहे ) लावुन जवळपास तेवढ्याच किमतीला जरी ही गाडी विकायला काढली तरीही तुफ्फान चालेल !
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Fri, 01/30/2015 - 11:52
नवीन
आजही या गाडीत कंपनी टर्न अराऊंड करुन द्यायचे प्रचंड पोटेन्शियल आहे. कदाचित त्यासाठीच कंपनी तिच्याकडचा हुकमी एक्का काढत नसावी??
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 01/31/2015 - 02:09
नवीन
स्विफ्टचं इंजिन एखाद्या एस.यु.व्ही. साठी अंडरपॉवर्ड आहे. आणि हाय फ्लो वेस्टगेट टर्बो नाही बसवता येणार स्विफ्टच्या इंजिनला. म्हणजेचं इंजिनानी २९००-३२०० आर.पी.एम. क्रॉस केलं की बसवलेला टर्बो अक्षरशः शिट्ट्या वाजवायला लागेल. आणि इंजिन ब्लॉकची वाट लागेल.
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 01/28/2015 - 18:41
नवीन
+१
हम आपके है कौन हा निम्मा पिच्चर त्या गाडीत शूट झाला असेल ....
बराच काळ भारतात्ली एकमेव ४डब्ल्यू डी असलेली गाडी. बियास नदीच्या पात्रात एक एक दगड डोंगराएवढा असताना आमच्या जिप्सी वाल्या टॅक्सी ड्रायव्हरने सरळ त्या पात्रातनं अर्धा किमी ही गाडी चालवली होती!
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Wed, 01/28/2015 - 18:01
नवीन
मला जाम आवडते. पण या सगळ्या इथे मिळत नाहीत ना. नुसत्या बघूनच खुश व्हायचं.

- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/28/2015 - 18:29
नवीन
फोर्ड एफ ३५० किंवा ६५० आहे ही?
जर असेल तर हिचा पंखा आहे मी. आणि फक्त आपल्या इथे मिळतं नाही म्हणुन झेनॉन चा पंखा आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 06:01
नवीन
ही डॉज रॅम आहे. खालील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे. बीस्ट
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
Wed, 01/28/2015 - 19:47
नवीन
हा डॉजचा रॅम. मी ईथे 5.7L Hemi engine VVT V8(8 cylinder) असलेली डॉजची डूरॅन्गो (Durango) चालवते. असली दणदणित, पण चालवायला मख्खन मलाई गाडी आहे!! तिचं मायलेज वगैरे विचारायच नाही, पण तरिही fuel saver mode अर्थात cylinder deactivation फिचर असल्यामुळे चांगल एवरेज देते. (अर्थात ईथे पेट्रोल १३ Rs./L आहे हा ही एक मोठ्ठा प्लस पॉईंट आहेच...*dance4* *DANCE* :dance:)
तर , जेंव्हा नविन नविन चालवायला घेतली तेंव्हा एकदा फ्री राईट घेतांना जागा किंचित कमी होती आणि डिव्हाईडर लगेच होता, तर ही गाडी मलाही कळायच्या आत तो साधारण पाउण फुट तत्सम उंचीचा अडथळा अश्या नजाकतीने चढून पार करुन गेली की पुढे बराच वेळ मला 'अल फजा वाल्यांनी पाहिलं तर नसेल ना..?' या विचारानी धडधडत होतं!!
तसा कतार बर्यापैकी सपाट देश आहे, कसलेही चढ-उतार नाहीत. त्यातूनही काही काही ऑफरोड् झोन्स आम्ही शोधून काढलेत. ही गाडी ..गाडी कसली, माझा लाडका रणगाडा आहे तो...तिथल्या दगड-गोट्यांवरून 'किस झाड की पत्ती' असल्यासारखी आरामात विहरत जाते. त्याची उंची जास्त असल्यामुळे खूप उंच वालुका टेकड्यांवर नेण्यासाठी फार आदर्श नाहिये तो. पण मध्यम साईझ च्या टेकड्यांवर मात्र सही ड्युन बॅशिंग करता येतं.
ईथून भारतात परत जायची वेळ येईल तेंव्हा फक्त हा रणगाडा मला तिकडे नेण्याची ईच्छा आहे!!
माझा याच्यावर फार जीव!!!
- Log in or register to post comments
म
मीता
Wed, 01/28/2015 - 20:44
नवीन
सहीये....
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 01/28/2015 - 20:46
नवीन
मस्तच , काय भारी गाडीये.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 03:21
नवीन
मी खालीचं उतरणार नाही ह्या गाडीतुन मिळाली कधी चालवायला तर.
५.७ लिटर बेस्ट बीस्ट. =))
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 06:09
नवीन
@ स्वप्नांची राणी: मत्सराने आम्ही जळून खाक. करा करा.. चैन करा.. रोज ड्युरँगो चालवा वाळूत..
बादवे, मिडलईस्टमधे स्त्रियांना ओव्हरऑलच ड्रायव्हिंग करायला मिळत नाही अशी एक जनरल समजूत अन्यत्र असते. दुबईत लिबरल आहे असे वाटले पण तिथेही ड्राईव्ह करणार्या मुली कमी दिसल्या.
सौदीमधे तर म्हणे अलाउडच नाही. कतारमधे ते सहज शक्य आहे हे पाहून आनंद झाला.
- Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी
गुरुवार, 01/29/2015 - 12:46
नवीन
फक्त सौदीमधेच स्त्रियांना नाही चालवता येत गाडी. कतार मधे नो प्रोब्लेमो... आणि स्पिडब्रेकरमुक्त, खड्डेमुक्त गुळगूळीत रस्ते, तसेच नो टेन्शन ड्रायव्हींग यामुळे गाडी चालवणं हा खराच सुखद अनुभव आहे. हे असलं धुडही फुल्ली ऑटोमॅटीक transmission . त्यातून क्रूझ कंट्रोलला गाडी टाकली की ड्रायव्हरला झोप लागायची फुल्ल गॅरंटी!!! पण साधारण 60-95 km कुठल्याही दिशेला गेलं की कतारच संपून जातं त्यामुळे नाईलाजानी परत फिरावं लागतं!!!
- Log in or register to post comments
आ
आरोही
गुरुवार, 01/29/2015 - 17:04
नवीन
कसली भारीये ग गाडी हि !!! मस्तच ...
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/29/2015 - 08:00
नवीन
(मी हमेरिकेत होतो तेव्हा ) डॉज ची रॅम चालवलीये , तुफ्फान गाडि !!
गाड्या पाहुन फक्त गाड्या पळवायला अमेरिकेत जावं असं वाटलं होतं .... टेस्ला कॅडिलॅक कॉर्व्हेट कस्यल्या भारी होत्या ... आणि मेन म्हणजे एस.यु,व्ही / ट्रक सुद्दा परवडेबल होते !!
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 01/28/2015 - 19:30
नवीन
१.सफारी - शक्यतो जुनी ३ लि. इंजिन वाली.. स्टॉर्म म्हंजे सिंहाची आयाळ काढुन घेतल्यासारखं झालंय,
२.फोर्स नं १ - प्रचंड मोठी अन महत्वाचं म्हणजे मर्सिडिजचं इंजिन.
३.फोर्स गुरखा ४ बाय ४ - हार्ड्कोअर ऑफरोडिंगसाठी फक्त
४.बोलेरो - पार शेताच्या बांधावरुन मग शेतातुन देखील चालवता येईल. पण मधले आणि मागचे सीट बदलुन घेणं गरजेचं.. मध्यंतरीच्या काळात एक १०० एच्पी मॉडेल आणलं होतं, उगाच बंद करुन पुन्हा ६५ एच्पी केलं.. पण कंपनीच्या पडत्या काळात कंपनी जिवंत ठेवणारी गाडी..
५.क्वांटो - स्वस्तात एस्युव्ही,
आणि स्वप्नातली म्हंजे - टाटा झेनॉन + कस्टम बॉडी, एकदा चालवुन पाहिल्यावरच कळतं काय चीज आहे ही गाडी, पण बहुधा टाटाला विकायची नाही किंवा विकता येत नाही.
आणि अजुन टाटा अरिया, एकरभराची गाडी, मधल्या आरशातुन पाहिलं तर गाडी मागं कुठपर्यंत आहे हेच समजत नाही लवकर.
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 01/29/2015 - 08:17
नवीन
टाटा झेनॉन आणि टाटा अरीया बद्दल प्रचंड सहमत.. टाटा कधीकधी एकतर्फी प्रेमवीरासारखं का वागतो, मला कळत नाही. ;-) म्हणजे गाड्यांची कॉलिटी भारीतली असली तरी त्याबद्दल बोलणार नाही. च्यामारी, महींद्रा बघा. गाडीत दम असो किंवा नसो, बोलबच्चन जबरदस्त.. स्कॉर्पियो दमदार गाडी असली तरी स्टॅबिलीटीच्या बाबतीत मार खाते असं माझं मत आणि अनुभव आहे. मधल्या सीटवर बसून पहा, वळणदार आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावर.. माठातल्या ताकासारखा घुसळून निघतो माणूस.. नवीन स्कॉर्पियोमध्ये ह्या बाबतीत सुधारणा आहे, असं ऐकलंय, पण त्याचा अनुभव नाही..
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 01/29/2015 - 06:27
नवीन
अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा चर्चा असेल तर एकापेक्षा एक अवजड गाड्यांची खूप आवड आहे तिकडे.. फोर्ड एक्सपिडीशन, एक्सकर्शन, डॉज डुरँगो, निस्सन पाथफाईंडर, हमर, जी एम सी एन्वॉय, टोयोटा सीकोइया, लिंकन नेव्हीगेटर, कॅडीलॅक एस्क्लेड, ..
यांची पॉवर ३००+ हॉर्सपॉवरपर्यंत असते.. भारतातील बहुतांश प्रिमीयम एसयुव्हीज १५०-२०० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत तर कॉम्पॅक्ट एसयुव्हीज १००- १४० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत..
आणि रेंटल कंपन्यांकडे या सर्रास मिळतात.. (अर्थात रेंट खूप जास्त असते).. पण हौस म्हणून कधीतरी घ्यायला ऑप्शन असतो..
कहर म्हणजे या सर्व मॉडेल्सची लिमोझीन आवृत्ती देखिल असते (पण या रेंटल वाल्यांकडे नाही मिळत )..
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 06:37
नवीन
-ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा?
-लिमोझिन आवृत्ती म्हणजे काय?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 06:42
नवीन
लिमोझिन आव्रुती म्हणजे गाडीची लांबी वाढवणं. त्यासाठी गाडीची फ्रेम वाढवायला लागते. तसचं गाडी रिअर व्हील ड्राईव्ह असल्यास् प्रॉपेलर शाफ्ट आणि डिफ्रन्शिअल बदलावा लागतो.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 01/29/2015 - 06:55
नवीन
ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा?
नक्की अंदाज नाही पण काही आवडीनिवडींवर अवलंबून असावे.. अमेरीका व यु ए ई सारख्या ठिकाणी अशा मोठमोठ्या गाड्यांची आवड आहे आणि त्यांना भरपूर लागणारे ईंधन परवडणार्या दरात उपलब्ध आहे..
युरोपात खासकरुन शहरांत जास्त जागेच्या अभावामुळे छोट्या गाड्या जास्त लोकप्रिय आहेत..
भारतासारख्या देशात कींमत व फ्युएल इकॉनॉमी जास्त महत्वाची असल्याने कमी पॉवरची मॉडेल्स काढली जातात..
सेडान, हॅचबॅक, कन्व्हर्टिबल, व्हॅन याप्रमाणे लिमोझीन ही एक कॅटॅगरी आहे, ज्यात गाडीची लांबी जास्त असते आणि आतील ले आउट वेगळा असतो.
अतिलांब लिमोझीन देखिल असतात (स्ट्रेचलिमो) त्या ७-८ मीटर पर्यंत लांब असु शकतात. एका बाजूला १०-१२ खिडक्या देखिल असतात..
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 07:05
नवीन
धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस (म्हणजे मला) लिमोझिन ही एक विशिष्ट कंपनी वाटायची (मर्सिडिजप्रमाणे)..
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
गुरुवार, 01/29/2015 - 07:29
नवीन
कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच क्न्फ्युजन झालं हे !! फक्त उलटं.. लोक या कंपन्यांना जनरल/कॅटॅगरीचे शब्द समजतात.. तुम्ही कॅटॅगरीला कंपनी :-)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 01/29/2015 - 07:33
नवीन
बिसलरी विसरलात मालक :)
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 07:41
नवीन
फार्फार पूर्वी पहिल्यांदा भारतात नेस्ले चॉकलेट लाँच झालं तेव्हा सर्वजण "नेस्लेची नवीन कॅडबरी आलीय" असं म्हणायचे.
अगदी लहानपणी आणखी एक भेद होता. "चॉकलेट" म्हणजे टॉफीसदृश म्हणजे चिकट वडीरुपी (किस्मी, मेलोडी वगैरे) अन कॅडबरी म्हणजे मोठे डेअरी मिल्क फाईव्ह स्टार टाईप "भारी"
म्हंजे.. काकांनी चॉकलेट नाय दिलं नुसतं.. कॅडबरी दिली. इ इ
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 01/30/2015 - 07:27
नवीन
अगदी अगदी,
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/29/2015 - 08:21
नवीन
स्कोडा येती कशी गाडी आहे? मला ओवर प्राइझ्ड वाटली ज़रा!, महिन्द्रा रेक्स्टन?
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 08:57
नवीन
येती ही खर्या अर्थाने या कॅटेगरीतली गाडी आहे का? ती तर नॉर्मल सिटी कार आहे ना? एसयूव्हीसारखा शेप असलेली स्टाईलिश लुक पण खरी साधारण चारसीटर सिटी कार (रिओ, डस्टर आदिप्रमाणे).
अर्टिगा नामक लाजिरवाण्या तडजोडीचा विषयही न निघाल्याचं पाहून बरं वाटलं.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/29/2015 - 09:01
नवीन
१००% मान्य! मला वाटले कोणी येती चे बी पंखे असतील दुखावतील म्हणून घाबरत विचारले! :P
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 09:12
नवीन
अर्टिगा एसयुव्ही नव्हेच. आणि ऑफबीट गाडीही नव्हे. नाहीतर इनोव्हाचाही उल्लेख झाला असता मग.
बाकी काही म्हणा, पण अर्टिगात बसलेलो आहे; आणि छान आहे गाडी. very practical and compact passenger car.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 09:10
नवीन
बरोबर. किमतीच्या मानाने इतकी भारी नाही.
फॉर्च्युनर मधे पैसे घालायची तयारी असलेल्याने एकवार रेक्स्टन बघावीच. खूप छान आहे आणि स्वस्तही. पण सगळी भारी फीचर्स औटोमॅटिक व्हर्जन मधेच येतात. मॅन्युअल घेऊन त्याला ती बसवूनही देण्यास कंपनी नकार देते. त्यामुळे ड्रायव्हिंगवेड्यांचा हिरमोड होतो.
येती खाली म्हटल्याप्रमाणे चौघांचीच आणि सिटी कारच म्हणावी अशी आहे. खूप लो आहे एक तर. एकच जमेची बाजू म्हणजे डिझाईनमधला वेगळेपणा. लक्ष वेधून घेते गाडी.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 01/29/2015 - 12:44
नवीन
मारुती सुझुकीची ग्रँड व्हिटारा आली आहे,तिचे रिव्ह्युज कसे आहेत?

- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 01/29/2015 - 12:52
नवीन
किंमत पहा
GRAND VITARA MT 2,341,459 /-
आर यु किडिंग मी ? येवढ्यात तर फोर्चुनर किंवा एन्डेव्हर पण येईल ... इतका पैसा टाकणारा माणुस मारुति सुझुकीचा विचार करेल असे वाटत नाही .
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 01/29/2015 - 13:41
नवीन
चर्चा (सध्या फक्त) वाचतो आहे. कधी ह्या माहितीचा उपयोग करण्याचा चान्स मिळेल असे वाटत नाही! :-)
- Log in or register to post comments
आ
आदिजोशी
गुरुवार, 01/29/2015 - 15:38
नवीन
ऑफरोड गाड्यांचा विषय आणि हमरचा उल्लेखही नाही. जोंगा बद्दल गप्पा होतील अशी अपेक्षाही नव्हती पण हमरचा उल्लेख नसल्याचे बघून डोळे पाणावले आणि एक मिपाकर म्हणून...
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 01/29/2015 - 15:43
नवीन
तुमच्याकरताच राखून ठेवलेला असं समजा.....
येउद्यात
- Log in or register to post comments
ग
गवि
गुरुवार, 01/29/2015 - 15:49
नवीन
..आदिसाहेब..आमची औकात कितीही फुलवली तरी हमरविषयी स्वप्ने नाही हो बघत.
..पण बरे केलेत..आता मोठे स्वप्न गावले.
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 01/29/2015 - 17:45
नवीन
मला टोयोटा क्वालिस आवडायची ,विशेषतः नंतरच वर्जन. छान लुक्स व कम्फर्टेबल होती.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
गुरुवार, 01/29/2015 - 20:40
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
गुरुवार, 01/29/2015 - 20:50
नवीन
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/29/2015 - 21:26
नवीन
मित्सुबिशी च्या गाड्यांबद्दल कुणी बोलत नाही आहे इथे.
मी स्वत: मित्सुबिशी गाड्यांचा पंखा आहे.
अतिशय उत्तम गाड्या पण सेवा आणि स्पेअर पार्टस ची अनुपलब्धता यांच्यामुळे भारतात या गाड्यांना कधीच व्यवस्थित सेल्स व सन्मान मिळाला नाही.
असो.
जुनी पजेरो
मला नव्या पजेरो पेक्षा जुनी पजेरो जास्त आवडते. नवी पजेरो नव्या काळातल्या स्पर्धेला बघून बनवली आहे.
मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स : २.५ लिटर , डीझेल, २४ लाख ते २६ लाख
खास करून फ़ोर्चुनर ला टफ फाईट म्हणून २-४ लाखांनी कमी किमतीत देत आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे सेल्स साठी प्रयत्न नाहीत हिंदुस्थान मोटर्स कडून.
मित्सुबिशी मोन्टेरो : ३.२ लिटर डीझेल, ४२ लाखांपासून पुढे
माझ्याकडे आत्ता मित्सुबिशी लान्सर स्पोर्ट्स (२०००) आहे. 'मेंटेनन्स भयंकर आहे' असे म्हणून लोकांनी पार घाबरवून टाकले होते. सेकंडहँड कार असून गेल्या साडेचार वर्षात मेंटेनन्स वर अवघा पन्नास हजार खर्च झाला आहे. हेल्थ म्हणाल तर नाशिक-मुंबई रस्त्यावर यच्चयावत नव्या गाड्यांना कधीही धूळ चारते. पार खेड्यापाडयातुन ताबडवली आहे. आत्ता तरी हिच आमची फॅमीली कार, एसयुव्ही, एमयुव्ही सर्वकाही आहे. लडाख टूर करायचा तर हीच्यासोबतच असा प्लान आहे. बघू कसे जमते ते.

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »