Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ए आय बी ची बातमी

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/03/2015 - 11:22
🗣 119 प्रतिसाद
ए आय बी ची बातमी आज सकाळी तडक जाऊन तू नळी वर संबंधित कार्यक्रमाच्या २ ३ क्लिप्स पहिल्या ... सुरुवातीला हा काहीतरी उच्चप्रतीचा बौद्धिक कोटीक्रमाचा कार्यक्रम असावा असा संशय येतो न येतो तोच अत्यंत अश्लील, सवंग, शिवराळ भाषेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि माईक समोरील माणसाने बाजूच्या सगळ्यांची नावे घेऊन ..प्रसंगी समोरील दीपिका पदुकोन, आलीय भट्ट आदींची सुद्धा 'काढणे'... एकमेकांच्या लैंगिक अवयवांचा, तदनुश्न्गिक अत्यंत बीभत्स विनोद हे कमी म्हणून कि काय एक महाशय तर दुसर्या उपस्थिताच्या जन्मप्रसंगाचे त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे विक्षिप्त वर्णन ... लैंगिक क्रिया, अनैसर्गिक संभोग ह्यांचा उल्लेख करतांना कश्शा कश्शाचा संकोच म्हणून नाहीच तो ... वक्त्यान्न्मध्ये एक पंजाबी स्त्री होती आणि तिने तर कहर केला संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ... माणशी ४००० रुपये तिकीट काढून गेलेल्या लोकांची गर्दी बघून केवळ स्तिमित व्हायला झाले ... ...
तुज विकृत म्हणू कि अश्लील रे
असे त्या करण जोहरला म्हणावेसे वाटते ...

प्रतिक्रिया द्या
30181 वाचन

💬 प्रतिसाद (119)
क
कहर गुरुवार, 02/05/2015 - 07:10 नवीन
ज्यांनी अश्लील बोलले त्यांना प्रोब्लेम नाही … ज्यांच्याविषयी अश्लील बोलले गेले त्यांना प्रोब्लेम नाही … ज्यांच्यासमोर बोलले गेले त्यांनासुद्धा काही प्रोब्लेम नाही …. पण "अश्लील कार्यक्रम" अशी प्रसिद्धी मिळताच १. डोळ्यांवरचे हात काढून पळत जाउन तो कार्यक्रम शोधून पाहणाऱ्या २. कानावरचे हात काढू शब्द नि शब्द ऐकणार्या आणि ३. तोंडावरचे हात काढून "हे चूक" "हे अश्लील" "हे … " वगैरे बोलणार्या गांधींच्या तीन माकडांना प्रोब्लेम का असावा आता मात्र "कहर" झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जिन्क्स Wed, 02/04/2015 - 13:56 नवीन
चारचौघात(चारचौघीतही) चालणारे विनोद फक्त स्टेज वर सादर करुन प्रक्षेपित केलं एवढंच संगत बदला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 02/04/2015 - 07:39 नवीन
संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ...
तुम्ही एकदाही हसला नाहीत का? खरं सांगा. किंवा अ‍सं समजा कि हेच विनोद तुमच्या ग्रुप मधे चालले आहेत, तर हसला असतातच ना? आता फक्त तो ग्रुप मोठा झालाय एवढंच.. त्यात प्रॉब्लेम असेल तर तो ग्रुप सोडावा, कारण तुमची ईच्छा असो वा नसो, प्रायवेट आणि पब्लिक या संकल्पनांमधली सीमा आता ब्लर होतेय, तुम्ही तुमच्यापुरतं हे टिकवुन ठेवु शकता, ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तसंच याच न्यायाने दुसर्‍यांवर तुम्ही काहीच लादु शकत नाही हे सुद्धा लक्षात असु द्या..
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 08:24 नवीन
हे तुम्हाला स्वीकारता येतय?...
तुम्ही तुमच्यापुरतं हे टिकवुन ठेवु शकता, ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तसंच याच न्यायाने दुसर्‍यांवर तुम्ही काहीच लादु शकत
हेच म्हणतो कि तुम्ही (म्हणजे ते सादरकर्ते आहेत त्यांना उद्देशून ) सोशल मेडीयावर टाकून लादता आहात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 02/04/2015 - 13:18 नवीन
हे तुम्हाला स्वीकारता येतय?...
हो. अर्थात ही सीमारेषा व्यक्तिगत असते आणि ज्याप्रमाणे मला माझे लिमीट्स ठरवायचा अधिकार आहे तसाच तो इतरांनाही आहे. आणि माझ्यामते सोशल मिडीयावर असणारी प्रत्येक गोष्ट बघणं हे ऑप्शनल असतं.. एक लक्षात घ्या, एवढी कुप्रसिद्धी होउनही तो शो जे बघतात त्यांना ते हवंच असतं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ट
टवाळ कार्टा Wed, 02/04/2015 - 08:02 नवीन
आज तो भाग बघितला....नुस्ता वाय्झेडपणा आहे...बरे जे प्रेक्षक आलेले त्यांच्यासाठी असे विनोद चालतील त्याबद्दल काहिही आक्षेप नाही...पण एक चावट संध्याकाळ सुध्धा असेच (पण यापेक्षा सौम्य) नाटक आहे ... चावट्/अश्लील्/वात्रट प्रोग्राम बनवणे ठिक आहे पण असे प्रोग्राम खुल्लेआम युट्युबवर टाकणे हे फार चुकीचे आहे...चुकीच्या प्रक्षकांपर्यंत जातात मग ते
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 02/04/2015 - 08:08 नवीन
AIB - All India Bakchod. म्हणजे बडबड करणारे, वटवट करणारे. अशा लोकांना कोणी सिरियसली घेतो का? जर घेत असेल तर तो मूर्ख. शिवाय तुनळी असो किंवा अन्य कोणतेही माध्यम असो,लोकांच्या सहनशक्तीचा मीटर त्यांनीच ठरवलेला असतो आणि तेच योग्य आहे.शिमग्याला गेलो आहोत असं मानावं आणि कार्यक्रम बघावा किंवा बघू नये. आपल्या देशात लोक नको त्या गोष्टी गंभीरपणे घेतात,उदाहरणार्थ हे असे कार्यक्रम.ज्या गोष्टी सिरियसली घ्यायला हव्यात त्या घेत नाहीत , उदाहरणार्थ अजूनही चालू असलेले वाळीत टाकण्यासारखे प्रकार, राजकारणाचं गुन्हेगारीकरण,वगैरे बरेच.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 02/04/2015 - 08:27 नवीन
विरोधाचा मुळ गाभा लक्षात न घेता चुकीच्या गोष्टींचे जे समर्थन चालले आहे ते पाहून 'मिपा' ही माझ्यापासून दूर जात असल्याचे जाणवले.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 02/04/2015 - 08:30 नवीन
पेठकर काकांबरोबर ५०००% सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 08:36 नवीन
अगदी अगदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
च
चलत मुसाफिर Wed, 02/04/2015 - 10:57 नवीन
१. सदर (आणि मिळत्याजुळत्या इतर) मतांशी मी मुळीच सहमत नाही. हा कार्यक्रम गटारी विनोदाचा होता आणि तशीच त्याची प्रसिद्धी करण्यात आली होती. तिकिटे काढून आलेल्या प्रेक्षकांना याची पूर्ण कल्पना देण्यात आलेली होती. तूनळीवरील फिती पाहणे-न पाहणे हा व्यक्तिगत निर्णय असतो. शिवाय, आंतरजालावर इतर कायकाय उपलब्ध असते, हे वेगळे सांगणे नकोच. मग काय भारत सरकारने आंतरजाल बंद करून टाकावे काय? २. इथे वाचलेल्या प्रतिसादांवरून एक निराळीच गोष्ट लक्षात आली, ती अशी: सदरच्या कार्यक्रमात केवळ लैंगिक विनोद नव्हते तर स्थूल, काळ्या आणि कुरूप व्यक्तींनाही बेसुमार टिंगलीचे लक्ष्य बनवले गेले होते. विस्मयाची बाब म्हणजे, सुजाण, प्रगल्भ मिपाकरांपैकी कोणालाही अजून ते विशेष आक्षेपार्ह वाटलेले दिसत नाही. जो काही विरोध, राग, घॄणा इ. व्यक्त केले जात आहेत, ते केवळ लैंगिक अर्थाच्या विनोदांच्या संदर्भात आहेत. वास्तविक पाहता शारीरिक व्यंगावरून केलेले विनोद हे हीनतेच्या मापावर अधिक खालचे मानले जायला हवेत. कारण शारीरिक गुणधर्म हे व्यक्तीच्या हातात नसतात. यावरून काय उमजावे? मला हे वाटते, की आपण अजूनही सेक्स हा विषय (!!) मोकळेपणाने, निर्मळपणे हाताळण्यास तयार नाही. दादा कोंडके टाइपचे द्वयर्थी विनोद चालतात, कारण त्यांना एक साळसूद असा 'आवरण-अर्थ' असतो. (माझा अर्थात त्याला आक्षेप नाही, कारण तीही विनोदाची एक निराळी जातकुळी आहे). पण थेट लैंगिक विनोद ऐकून मनमोकळेपणाने हसणे अजून आपल्याला कठीण जाते. बरेचजण गोरेमोरे होतात. ३. इथे होणारा विरोध कार्यक्रमाच्या हीन कलात्मक मूल्यांना आहे या दाव्याला मुळीच अर्थ नाही. या कार्यक्रमातील बहुतेक विनोद बाष्कळ होते यात शंका नाही. पण अशोक-लक्ष्याच्या (भरत-मकरंद असे वाचले तरी चालेल) सिनेमातले ९०% विनोदही बाष्कळ असायचे. तिथे कोणी संस्कॄती धोक्यात आल्याचा ओरडा केला नाही. कारण एकच - ते सिनेमे सेक्सपासून कोसभर दूर राहायचे. ४. येथे मी कोणत्या गोष्टीचे 'समर्थन' करत आहे, हे कॄपया नीट लक्षात घ्यावे. परस्परसंमतीने उडवली गेलेली थट्टा हा इतरांनी निषेध करण्याचा विषय होऊच शकत नाही, हा माझा मुद्दा आहे. उद्या माझ्या मित्राने मला टकलू, ढोल्या किंवा कुत्रा म्हटले, त्याचा व्हिडिओ जालावर टाकला आणि त्यावर मी ळोळ वगैरे लिहिले, तर मिपाकरांना राग येईल काय? सदर कार्यक्रमात थट्टेचा विषय असलेले महाभाग ती ऐकून हास्यरसात गडबडा लोळत होते (तो अभिनय असू शकेल, पण त्यांना आक्षेप नव्हता हे स्पष्ट दिसत होते). ५. करण जोहरची आई प्रेक्षागारात उपस्थित होती. तिलाही तो प्रकार मनोरंजक वाटला असणार असे मानायला हरकत नाही. मग तुम्ही-आम्ही कोण लागून राहिलोत? (आता आई कशी असावी वगैरे धागा इथे कोणी काढला नाही म्हणजे मिळवली!) ६. कोणत्याही performance ला सेन्सॉरबोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक असते, हा कायदा आहे. हा कार्यक्रम performance मधे मोडतो का, त्याला असे प्रमाणपत्र मिळाले होते का, सेन्सॉरबोर्ड असावे की नको, हे मुद्दे सर्वस्वी वेगळे आहेत. त्यावर निराळी चर्चा होऊ शकते. मात्र केवळ लैंगिक विनोद होते म्हणून या कार्यक्रमाला वेगळे काढून झोडपणे अयोग्य आहे असे मला वाटते. लोभ असावा ही विनंती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यसवायजी Wed, 02/04/2015 - 11:14 नवीन
+१२३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 02/04/2015 - 13:19 नवीन
दंडवत स्विकारा मालक... शब्दाशब्दाशी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
अ
अवतार Wed, 02/04/2015 - 15:22 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
व
विनोद१८ Wed, 02/04/2015 - 16:34 नवीन
............/\...........,............/\............,............/\.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
च
चिगो गुरुवार, 02/05/2015 - 08:44 नवीन
मी काल हा कार्यक्रम पाहीला. त्याबद्दलच्या गदारोळामुळेच पाहीला. धक्का बसला, कारण की असा कार्यक्रम सार्वजनिकरित्या होऊ शकतो, ह्याचंच अप्रुप आणि आश्चर्य.. शिव्यांचा अतीवापर आणि लैंगिक अवयवांचा उल्लेख, विशेषरित्या रघुरामन आणि त्याच्या जुळ्या भावावर केलेला विनोद अत्यंत हिन दर्जाचा होता. मात्र, बर्‍याच ठीकाणी मी मनमुराद हसलो. खासकरुन आलियाला टारगेट करुन केलेल्या हजरजवाबी विनोदांवर..
विस्मयाची बाब म्हणजे, सुजाण, प्रगल्भ मिपाकरांपैकी कोणालाही अजून ते विशेष आक्षेपार्ह वाटलेले दिसत नाही. जो काही विरोध, राग, घॄणा इ. व्यक्त केले जात आहेत, ते केवळ लैंगिक अर्थाच्या विनोदांच्या संदर्भात आहेत. वास्तविक पाहता शारीरिक व्यंगावरून केलेले विनोद हे हीनतेच्या मापावर अधिक खालचे मानले जायला हवेत. कारण शारीरिक गुणधर्म हे व्यक्तीच्या हातात नसतात.
एकदम खरं.. पण कसं आहे ना, जसे 'टॅबू', तसेच आक्षेप.. साधारणतः भारतात जात, वर्ण, शारीरिक व्यंग ह्यांचा उल्लेख किंवा विनोद ह्यात काहीच चुकीचं मानल्या जात नाही. लैगिक वर्णन आलं की ढासळलीच आमची संस्कृती.. असो. काय होणार ह्याची कल्पना असून आलेले प्रेक्षक आणि अभिनेते, वयोमर्यादेची स्पष्ट कल्पना देऊन युट्यूबवर टाकलेला व्हिडीयो, ह्यामुळे मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. मला जे अश्लील वाटतं ते सगळ्यांनाच चुकीचं वाटावं, अशी अपेक्षाही नाही आणि आग्रहपण नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/05/2015 - 10:23 नवीन
साधारणतः भारतात जात, वर्ण, शारीरिक व्यंग ह्यांचा उल्लेख किंवा विनोद ह्यात काहीच चुकीचं मानल्या जात नाही. लैगिक वर्णन आलं की ढासळलीच आमची संस्कृती..
आहा, काय बोललात चिगो साहेब. एकच नंबर. माझ्याकडनं एक आंध्रा थाळी लागू तुम्हांला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
स
सूड गुरुवार, 02/05/2015 - 11:31 नवीन
साधारणतः भारतात जात, वर्ण, शारीरिक व्यंग ह्यांचा उल्लेख किंवा विनोद ह्यात काहीच चुकीचं मानल्या जात नाही. लैगिक वर्णन आलं की ढासळलीच आमची संस्कृती..
अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिंतामणी Fri, 02/06/2015 - 08:41 नवीन
बाकी मिपापासून अनेक लोक लांब रहात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. भले मान्य असो वा नसो. आता ही क्रिया अजून वेगाने होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सूड Wed, 02/04/2015 - 11:28 नवीन
ज्यांना आमंत्रणाची अक्षत देऊन बोलवलं होतं त्यांनी हे एंजॉय केलं, पार त्यांच्यावर विनोद झाले तरी!! लैंगिक विनोद किंवा शिव्या म्हणाल तर गधेगाळ/शापवचने यातही अशी भाषा वापरली आहे. शारीरिक व्यंगांवरचे विनोद खरंतर हीन मानायला हवेत, त्याबद्दल एकाही सोकॉल्ड सद्गृहस्थाने तोंड उघडलेलं दिसत नाही. ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांनी आनंद लुटला ज्यांनी आमंत्रित केलंय त्यांनी आनंद लुटला. आपण इथे ऊर बडवण्यात काय हशील आहे. अश्लील वाटत असेल तर बघू नये. मिपाच्या बाबतीत पाव्हण्यांच्या घरचे नियम आपण ठरवू नये हे ज्यांना कळत असेल, ते युट्युबवर पण आपण पाव्हणेच असतो हे कसं विसरतात? त्यांनी काय प्रक्षेपित करावं हा त्यांचा प्रश्न आहे, काय बघायचं नि काय नाही हे आपलं आपण ठरवू शकतो. राह्यला प्रश्न मुलांचा!! मुलं आपल्याहून दोन पावलं पुढं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नसलीच तर तीही ते व्हिडिओ आपण होऊन बघणार नाहीत.
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 02/04/2015 - 11:36 नवीन
चलत मुसाफ़िर आणी सुड- अव्वल प्रतिसाद
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 02/04/2015 - 12:00 नवीन
जरूर वाचावा असा ब्लॉग एआयबीची होळी
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 02/04/2015 - 12:12 नवीन
सॉलिड लिहीलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
प
पिंपातला उंदीर Wed, 02/04/2015 - 12:10 नवीन
A I B ने विडिओ हटवला . का ? त्याच स्पष्टीकरण त्यांनी दिल आहे . सगळ्यात शेवटची ओळ भन्नाट . निळ्या डागाला लाल रंगांचा (रक्ताचा ) डाग समजा असे प्रेक्षकाना सांगणार्या सत्यदेव दुबेंची आठवण झाली . *lol* *LOL* :-)) :)) “I may not agree with you, but I will defend to death my right to get offended. How dare you? Baahar mil.” – Desi Voltaire Dear everyone, Let’s just all take a deep breath. They’re just jokes. Unfunny, crass or whatever you want to call them, they’re still just jokes. The AIB Knockout video has been taken down. While we’d love to claim that it’s because so many people watched it that it broke YouTube, the truth’s a little sadder. First things first; no one person or force forced us to take this video down. This is not something that’s happened because of a 3 am phonecall or a morcha at our front door or a gunman on a grassy knoll. Under the circumstances, this is us being pragmatic. Allow us to explain. People who’ve been following our work will know that we’ve always tried to experiment with content be it on Youtube or a live comedy show, with the sole intent of making people laugh and/or think. AIB Knockout was another such attempt to try something new and bring the roast format to a country where celebrities aren’t often known to laugh at themselves. To our pleasant surprise, we managed to bring together consenting adults who were willing to be made fun of by other consenting adults in a crowd full of (wait for it) consenting adults. And if we’re honest, it was a phenomenally entertaining evening. Were the jokes repetitive? Crass? It didn’t matter because they happened in the spirit of irony and good humour. It was just liberating to be able to say those things, things that people have thought in one form or another privately for years. A lot of the laughter that night came from that spirit (there’s your answer, people who wondered why everyone was laughing at terrible jokes). The video came with a clear disclaimer with several age and content warnings. No one was forced to watch it, we didn’t buy airtime on every single TV channel on Earth to broadcast it. YouTube videos do not magically auto-play in front of you. And yet the videos got over 8 million views. Far more importantly, on the video page, the people who liked them outnumbered the people who disliked them by ten times to one. Yes, ten times. The format was the same as any international roast i.e. insult comedy, delivered in the form of one-liners designed to be as rude as possible. It is performed with the understanding that none of the material is to be taken seriously—none of the performers actually mean the “offensive” things they say to each other on the night. We clarify this simply to provide context. With the Knockout, in our own juvenile, idiotic way, we wanted to push the envelope of comedy in this country. But then the envelope pushed back. Things got to a point where people who have supported us, people who work hard to make what we do come to life, were put in a position where things could get deeply unpleasant for them. And that’s a problem. We can live with abuse, hate, anger, fury, rage, ignorance, bigotry and perhaps even bullying. But we don’t want anybody to get hurt because of us. And we do mean anybody. We hope it’s clear by now that we never write with the aim of hurting people. That’s not our goal and we daresay that no comedian ever does that. We don’t go to work and say, “Hmm, let’s offend XYZ people from XYZ community today.” If we really wanted to piss off people and hurt them, we’d be selling credit cards over the phone. Our job is to raid the newspapers, pop culture and life for observations and analogies and it’s okay if you think we’re juvenile or unfunny. We respect arguments that are critical, and as for the arguments we don’t, we respect your right to make them without impediment. It is a courtesy we wish worked both ways. Over the last few days, we’ve found ourselves subject to more scrutiny, judgment and opinion than we’re worth. This Knockout shouldn’t matter. In a secure culture it wouldn’t matter. We’re lucky to have support pouring in from all quarters. First up, from our fans, just the greatest people in the world, who have nothing but good cheer and encouragement and positive thoughts. We were pleasantly surprised that people in power who we have made fun of in the past, including people from both the so-called right wing and left-wing, went out of their way to convey support to us. It was fantastic to know that they stand for free speech as much as us. Friends in the media have told us to stay our course, pledging their support for our right to say anything, no matter how ridiculous. Thank you to anyone who has stated in the last few days that we have the right to say what we want, not as comedians but more importantly as citizens of this country. There’s a larger cultural conversation going on here, where we’re at the very edges of what it’s okay to say. And it’s a conversation we need to have now because the world we live in is entirely too complicated to be run by silences. We still stand by our belief in the right to absolute freedom of expression for us and for anyone who has anything to say about anything at all. We hope to be part of an environment that supports that sort of expression without fear of persecution, intimidation and most importantly, annoyance. As always, in our own AIB way we’ll continue to strive towards creating that very environment. In the meantime, we’d like to say thank you to our fans and everyone else who is standing by us. You guys make the struggle worth it. To everyone railing against us and against the stars that were present, to everyone who’s decided we’re destroying the fabric of our culture, to everyone who’s called us seditious pornographers while plotting the downfall of Indian Values And Civilization As We Know It, we would like to reiterate that we are just a bunch of comedians who work, and have always worked, without any malicious intent whatsoever. We encourage any and all conversation on the subject of freedom of expression, for our own silly selves, and for people better, smarter and more courageous than us. For hundreds and thousands of artists, commentators and any and all citizens that do not have the privilege of social platforms and reach that we do. We are also cooperating with the authorities and hope to resume normal service soon. We’d like some sort of cheerful resolution to this so we can focus on more important national issues, like the upcoming Cricket World Cup. P.S. Best of luck Virat Kohli. Sorry for the jokes. We heart emoticon you. P.P.S. It’s a good thing nobody’s downloaded the file and put it on a torrent website or anything.
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 02/04/2015 - 12:14 नवीन
यांना लाजही वाटत नाही निर्लज्ज समर्थन करायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
अ
अनुप ढेरे Wed, 02/04/2015 - 12:24 नवीन
एक नंबर लिहिलय. शोधायलाच हवा तो व्हीडो आता.
There’s a larger cultural conversation going on here, where we’re at the very edges of what it’s okay to say. And it’s a conversation we need to have now because the world we live in is entirely too complicated to be run by silences.
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 12:34 नवीन
P.P.S. It’s a good thing nobody’s downloaded the file and put it on a torrent website or anything. मी आधीच म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे फक्त अधिकार उपटायचे .. कर्तव्य नाही ... असो ..आपल्या आजूबाजूला हे पेरले जाते आहे ... उगवल्यावर पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 02/04/2015 - 12:49 नवीन
@अत्रंगी पाउस साहेब - सेन्सॉर शिप ची गम्मत म्हणजे तुम्ही जेन्व्हा एखाद्या गोष्टीची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न करता तितके तिच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होते . पीके ला विरोध झाला त्याने ३०० करोड चा धंदा केला . प्रेषिताचे चित्र काढले म्हणून अतिरेक्यांनी हल्ला केला तर चार्ली हेब्दो ने पुन्हा ते चित्र काढलेच वर सोशल नेट्वर्किंग वर अनेक लोकांनी ते चित्र शेयर केले . आता पण A I B च्या विडिओ ला लाखो likes आणि शेयर मिळाले . बहुतेक वेळा सेन्सॉर शिप/ कलाकृतीला विरोध boomerang ठरू शकतो . त्यामुळे जे आवडत / पटत नाही त्याला इग्नोर करण जास्त योग्य असे वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 12:54 नवीन
एक प्रकारची जाहिरातच करतोय आपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ज
जेम्स बॉन्ड ००७ Wed, 02/04/2015 - 13:22 नवीन
जबरदस्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
च
चिगो गुरुवार, 02/05/2015 - 08:57 नवीन
If we really wanted to piss off people and hurt them, we’d be selling credit cards over the phone.
क्कं हाणलाय.. =)) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 02/04/2015 - 12:23 नवीन
ओ साहेब . जरा तोंड आवरा . च्यायला अनुचित भाषेमुळे दुसर्या संकेत स्थळावर ban झालेला इसम दुसर्यांच्या भाषेची मापे काढतो म्हणजे हद्द झाली .
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 02/04/2015 - 12:24 नवीन
दुसर्‍या संकेतस्थळावरची भांडणे इथे घेऊन येऊ नयेत असा इथल्या मालकांचा आदेश आहे. उल्लंघन केलेत तर............. मी त्या लोकांच्या समर्थनाबद्दल बोलत होतो. तुम्हाला उद्देशून नव्हते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर Wed, 02/04/2015 - 12:26 नवीन
ओके . माफ करा . माझा गैरसमज झाला
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Wed, 02/04/2015 - 12:27 नवीन
इट्स ओके. नो प्रोबलेम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ऋ
ऋषिकेश Wed, 02/04/2015 - 12:26 नवीन
रोस्टिंग म्हणजे काय, त्याचा इतिहास, व या शो मागील पर्श्वभूमी, जगातील इतर रोस्टिंग शोजच्या तुलनेत या शोचा केलेला रिव्ह्यू असे एकत्र असणारा हा एक लेख नुकताच वाचनात आला. इथेही नजर टाकालच
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 12:52 नवीन
वाचला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
_
_मनश्री_ Wed, 02/04/2015 - 12:57 नवीन
जेव्हा आपण समाजात राहतो ,तेव्हा काही सामाजिक नियम पाळलेच पाहिजेत म्हणजे काही निर्लज्ज लोकांनी त्यांना वाटेल तसा नंगानाच करायचा आणि सोशल साइट्सवर त्याचे व्हिडिओ टाकायचे आणि परत हे सो कॉल्ड अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते म्हणणार तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही बघु नका , म्हणजे सुसंस्कृत लोकांनी त्यांना त्रास होणाऱ्या गोष्टीला विरोध करायचा नाही म्हणजे निर्लज्ज लोकांना व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी करण्याची मुभा पण ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांना चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची मुभा नाही तस झाल की ह्या व्यक्ति स्वातंत्र्य पुरस्कर्त्यांना मिरच्या झोंबतात
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 02/04/2015 - 13:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 13:44 नवीन
आहे ती ... डीस्लाईक ...असायला हवे होते नाही का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
कपिलमुनी Wed, 02/04/2015 - 14:53 नवीन
प्रत्येक गोष्तीची मर्यादा वाढत चालेलेली आहे असा वाटत ..पूर्वी या गोष्ती मर्यादा उल्लंघन मानल्या गेल्या १. नऊवारीची सहा वारी झाली तेव्हा ! २. केसांचे कल्ले वाढले तेव्हा ३. स्त्री शिक्षित झाली तेव्हा .. आणि सध्या च्यायला , मायला , आयच्या गावात , भां**, गां* , चु* अशे जे विशेषण बराच तरूणवर्ग सहजपण बोलीभाषेत वापरतो त्या एके काळी घाणेरड्या शिव्या होत्या ! पण त्या आज बरेच जण नियमितपणे वापरतात ( याचे मी समर्थन करत नाही).. कपडे , मेकअप ते दारू सर्व बाबतीत समाजाच्या मान्यता बदलत चालल्या आहेत. आज पहिल्यांदा ( सार्वजनिकपणे ) हे प्रदर्शन झाले म्हणून बोभाटा झाला ! अजून २० वर्षांनी हे कॉमन असेल ( आपल्याला ते वाईत वाटेल ) आणि पुढची पिढी मात्र धोंडू चिल्ल म्हणून निवांत बघेल
  • Log in or register to post comments
क
कोंबडी प्रेमी Wed, 02/04/2015 - 15:14 नवीन
वर लिंक मिळेना झालीय ...
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 02/04/2015 - 15:24 नवीन
विडिओ पाहिला. मला ते 'विनोद' थर्डक्लास वाटले. मी फुकटही असा शो पाहणार नाही. पण असे विनोद ज्यांना आवडू शकतात त्यांनी ते पाहिल्याने 'मर्यादा' कशी काय ओलांडली जाते बॉ? 'शो'ला आलेले आमंत्रित आणि ज्यांच्यावर विनोद केला गेला असे लोक यांना कुणाला आक्षेप दिसत नाही. अमेरिकेत रसेल पीटर्स सारखे अनेक महाभाग निव्वळ लैंगिक विनोदांवर आख्ख्या करियर चालवतात. बहुतेक सगळ्याच ष्ट्यांडप कॉमेड्या लैंगिक विनोदावरच तगून आहेत. असो 'भले तर देऊ गांडीची लंगोटी' या तुकारामांच्या मूळ अभंगाचेही सोज्वळीकरण करण्याची आपली 'संस्कृती' असल्याने थोडाफार धुरळा उडणारच.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/04/2015 - 15:44 नवीन
*विली महारे । त्याची व्याली असे पोरे ॥ करी संतांच मत्सर । कोपे उभारोनी कर ॥ बीज तैसे फळ । वरी आले अमंगळ ॥ तुका म्हणे ठावे । ऐसे झाले अनुभवे ॥ एका ( तथाकथित गळेकाढू) बहुजन संमेलनात संत तुकारामांचा हा अभंग ऐकवल्यामुळे उडालेला गोंधळ आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
न
नांदेडीअन Wed, 02/04/2015 - 15:44 नवीन
TVF ने AIB च्या समर्थनात एक व्हिडिओ बनवला आहे. https://www.youtube.com/watch?v=IX2Kp7Lip2Q
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Wed, 02/04/2015 - 16:10 नवीन
मि पा मुळात अशा सेन्सॉरशिपच्या विरोधात तयार झाले होते. इथे कोणत्याही भाषेवर बंधने नव्हती. आपण ज्या समाजात जी भाषा ऐकतो ती लिहिण्याचे पुर्ण स्वातंत्र्य होते. मग ए आय बी वर बंदी घालण्याची भाषा इथे का? कुणाला बळजबरीने तर कार्यक्रम दाखवला नाही ना!
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Wed, 02/04/2015 - 16:18 नवीन
कुणाला बळजबरीने तर कार्यक्रम दाखवला नाही ना!
अगदी! मगाशीच कुठेतरी वाचलं "स्क्रीनवर उजव्या कोपर्‍यात एक लाल क्रॉस आहे. नाही आवडलं तर त्यावर क्लिक करता येतं!!!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.
स
संदीप डांगे Wed, 02/04/2015 - 18:14 नवीन
ह्या नॉकआउट कार्यक्रमापेक्षाही थिल्लर आणि विभत्स असे कार्यक्रम आपल्याच देशात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वर्षापासून होत आहेत. यामध्ये अश्लील गाण्यांपासून ते नृत्य आणि नाटकांपर्यंत सगळ्याच प्रकारात अगदी रेलचेल आहे. त्याचा आस्वाद घेणारे व्यवस्थित घेत आहेत, कलाकारांची रोजीरोटी सुद्धा सुखनैव सुरु आहे. उदा: सदर विडिओ (आपापल्या जबाबदारीवर बघावा. मराठी आहे.) https://www.youtube.com/watch?v=hdr7TOjbcuk मग याच कार्यक्रमाबद्दल राळ उडण्याचे कारण काय? कारण आहे हा कार्यक्रम करणारे जे कोण आहेत ते. हेच तथाकथित उच्चभ्रू समाजाच्या खालच्या वर्गाने केलेल्या अश्लील कार्यक्रमांना नाक मुरडतात, सो चीप, फिल्दी म्हणतात. संख्येने मोठा असलेला मध्यमवर्ग, जो संस्कार आणि परंपरा पालनामध्ये इतर घटकांपेक्षा जास्त पुढे आहे, त्यांच्यासाठी हे लोक सेलेब्रिटी आहेत, आदर्श आहेत. एक दिवस यांच्यासारखे श्रीमंत आणि प्रसिद्ध आपणही असू याची वर्गाला आस आहे. त्यामुळे हा हुच्च्भ्रू वर्ग जो करेल त्याचे (आपला मध्यमवर्गीय सुसंस्कारीपणा राखून) आंधळेपणाने आचरण करणे हा मध्यमवर्गाचा अजेंडा आहे. मध्यमवर्गाच्या मनातल्या हुच्च्भ्रू वर्गाच्या अभिजात प्रतिमेला या कार्यक्रमाने प्रचंड धक्का बसला आहे. एवढी फालतू आणि शिसारी आणणारी शेरेबाजी विनोदाच्या नावाखाली खपवणे, वर आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलाकाराचे हक्क वैगेरे मानतो असा आव आणणे हा दांभिकपणा मध्यमवर्गाच्या गळी उतरत नाही आहे. ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांनीच असे दर्जाहीन कार्यक्रम करावे तर मग मूल्य आणि संस्कार कशाला म्हणावे असा प्रश्न उभा राहिला आहे. आपण खालच्या वर्गातल्या लोकांना नावे ठेवून ह्या तथाकथित उच्चभ्रू लोकांच्या कलाकृतींना अभिजात दर्जेदार समजत होतो. मग आता नेमके काय समजावे असा गोंधळ झाला आहे. असो. आता माझे मतः मानवजातीला सर्व नउही रसांमधून अभिव्यक्त व्हायला आवडतं. त्यात उच्चवर्गीय निम्नवर्गीय असा काही भेद नसतो. त्यामुळे हा कार्यक्रम चांगला किंवा वाईट हे मी अजिबात म्हणणार नाही. पण त्याच वेळेस ह्या नॉकआउट प्रकाराला जे कोणी चांगले म्हणून डोक्यावर घेत आहेत त्यांनी इतरही अशाच कार्यक्रमांना, कलाकारांना तोच मान द्यावा. करण जोहर करेल तर हायक्लास कॉमेडी आणि कुणी भोजपुरी भैय्या करेल तर चीप, थर्डक्लास असे म्हणून दांभिकता दाखवू नये. (दांभिकतेच्या विरोधात क्रांतीची मशाल) संदीप डांगे ता. क. कार्यक्रम पूर्ण बघितला. दोन तीन पंचेस सोडले तर बाकी सारे थिल्लर होते. अश्लील विनोदांचा पण काही एक दर्जा असतो. तो नव्हता. ४-५ मूळ विनोदांवर अख्खा कार्यक्रम रिपीट होत होता. त्यामुळे फार मेहनत घेऊन थिल्लरपणा केला असंही नाही. कार्यक्रमात तिकीट घेऊन जाउन खिदळणाऱ्या पब्लिक ला बघून इडिओक्रसी या इंग्रजी चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटात एका सीन मध्ये लोक थेटरात जाउन द अ‍ॅस नावाची फिल्म बघतात ज्यात संपूर्ण दोन तास एका माणसाचा फक्त पार्श्वभाग दाखवला असतो आणि लोक ते बघून नुसते हसत असतात. हा कार्यक्रम जालावर शोधण्यापरीस हा सिनेमा शोधून बघा. वेळेचा पूर्ण सदुपयोग होईल. ह्या चित्रपटाबद्दल एक छान परीक्षण लिहायचेच आहे, तोवर तुम्ही बघून घ्या, नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 02/04/2015 - 19:11 नवीन
तुम्ही दिलेली क्लिप पाहून दातखीळ बसायची बाकी होती .. *shok*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/04/2015 - 20:09 नवीन
अहो, मध्यमवर्गाला अर्धांगवायू होईल असं बरंच काही चाललेलं असतं आपल्या देशात. युपी बिहारच्या काही जत्रा उत्सवांमध्ये तर स्टेजवर प्रत्यक्ष संभोग (चित्रफित नाही) दाखवला जातो आहे. आणि हे गेले कित्येक वर्ष घडत आहे तिकीट लावून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा