Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ए आय बी ची बातमी

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 02/03/2015 - 11:22
🗣 119 प्रतिसाद
ए आय बी ची बातमी आज सकाळी तडक जाऊन तू नळी वर संबंधित कार्यक्रमाच्या २ ३ क्लिप्स पहिल्या ... सुरुवातीला हा काहीतरी उच्चप्रतीचा बौद्धिक कोटीक्रमाचा कार्यक्रम असावा असा संशय येतो न येतो तोच अत्यंत अश्लील, सवंग, शिवराळ भाषेत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे आणि माईक समोरील माणसाने बाजूच्या सगळ्यांची नावे घेऊन ..प्रसंगी समोरील दीपिका पदुकोन, आलीय भट्ट आदींची सुद्धा 'काढणे'... एकमेकांच्या लैंगिक अवयवांचा, तदनुश्न्गिक अत्यंत बीभत्स विनोद हे कमी म्हणून कि काय एक महाशय तर दुसर्या उपस्थिताच्या जन्मप्रसंगाचे त्यांच्या मातोश्रींच्या अवयवांचे विक्षिप्त वर्णन ... लैंगिक क्रिया, अनैसर्गिक संभोग ह्यांचा उल्लेख करतांना कश्शा कश्शाचा संकोच म्हणून नाहीच तो ... वक्त्यान्न्मध्ये एक पंजाबी स्त्री होती आणि तिने तर कहर केला संपूर्ण श्रोतृवृंद क्षण न क्षण खिदळत होता ... माणशी ४००० रुपये तिकीट काढून गेलेल्या लोकांची गर्दी बघून केवळ स्तिमित व्हायला झाले ... ...
तुज विकृत म्हणू कि अश्लील रे
असे त्या करण जोहरला म्हणावेसे वाटते ...

प्रतिक्रिया द्या
30181 वाचन

💬 प्रतिसाद (119)
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 02/05/2015 - 03:14 नवीन
साती ताई म्हणताहेत तेच खरंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आजानुकर्ण Wed, 02/04/2015 - 19:15 नवीन
छान प्रतिसाद. (दांभिकतेच्या विरोधात एक कंदील) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुहास झेले Wed, 02/04/2015 - 19:52 नवीन
मस्त प्रतिसाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साती Wed, 02/04/2015 - 21:01 नवीन
अक्षरशः इडिओक्रसी या चित्रपटाचीच आठवण झाली. एकंदर समाजाची अभिरुची काय थराला गेलीय हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसलं. विनोद करायला आणि समजायलाही एका किमान बुद्धीची आवश्यकता असते. तिलाच विनोदबुद्धी म्हणत असावेत. या कार्यक्रमात (म्हणजे ज्या दोन क्लिप्स मी पाहिल्या त्यात तरी) या विनोदबुद्धीचीच कमतरता होती. बिभत्स हा शब्दही कमी पडावा असा निर्बुद्ध बिभत्सपणा जर आता स्टेज शो या प्रकारात चालु लागला असेल तर वर कुणीतरी म्हटलंय तसं 'आमची या जगाशीही नाळ सुटु लागलीय'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आजानुकर्ण गुरुवार, 02/05/2015 - 05:36 नवीन
करण जोहर व इतर उठवळ बॉलीवूडी मंडळींच्या तितक्याच उठवळ परंतु खाजगी कार्यक्रमामुळे दांभिकपणाचे आणखी काही नमुने समोर आले ही एक इष्टापत्तीच मानायला हवी. १. वर्तमानपत्रात पादरे पावटे, गांडू, लांडे इ. या व अशा अनेक शब्दांचा नियमित रतीब घालणाऱ्या सेनेला हा सर्व प्रकार अश्लील वाटला. २. जाहीर सभेत 'उपटायची' भाषा करणाऱ्या नेत्याच्या नवनिर्माणवादी पक्षाने या कार्यक्रमाविरोधात आंदोलनाची भाषा केली. ३. धरणात मुतायची भाषा करणाऱ्या नेत्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या भावना या कार्यक्रमामुळे दुखावल्या. बाकी या कार्यक्रमामुळे जगबुडी आल्याच्या अविर्भात चालू असलेली चर्चा पाहून गंमत वाटली. महाराष्ट्राची लोककला म्हणून उठताबसता नाव घेतल्या जाणाऱ्या तमाशाची निव्वळ पहिली दहा मिनिटे जरी पाहिली तर सदर कार्यक्रम अगदीच घरगुती वाटेल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला गुरुवार, 02/05/2015 - 05:41 नवीन
खरे आहे पण अशा कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणे हा उत्तम उपाय ! एक म्हण आठवली, ह*णारा गेला ह*न, बघणारा गेला बघून , आपण का चिवडत बसावे?
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 02/05/2015 - 06:02 नवीन
आज AIB Knockout चा व्हिडीओ बघितला. मी कॉमेडी सेंट्रल चॅनेलचे रोस्ट नियमित बघत असल्याने ह्या कार्यक्रमाची उत्सुकता होती. निराशा झाली आणि नाहीही. AIB ने जे पॅनल जमवले होते त्यांनी केलेली कॉमेडी 'Insult comedy' ह्या प्रकारातली होती आणि त्यांनां तो प्रकार व्यवस्थित कळला आहे जाणवण्याइतपत ठीकठाक होती. काही-काही पंचेस ब्रिलीयंट होते. मग माशी कुठे शिंकली? तर ज्यांचे 'रोस्ट' होणार होते त्यांना त्या विनोदाची जातकुळी, जॉनर, समजलाच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. अतिशय थिल्लर प्रकारे त्यांनी विनोद निर्मीती करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यांच्याकडून परिपक्व वागणूकीची अपेक्षा करणे हेच जरा अती आहे. अर्जुन कपुर, जो की १२ वी नापास आहे आणि बापाकडे गडगंज पैसा आहे, त्याच्याकडून त्याने जे काही केले त्याच्या वेगळे वागणे शक्यच नव्हते. पण म्हणून एकंदरीत कार्यक्रमाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे थोडे आततायी व्हावे. त्या कार्यक्रमाचा एक फॉरमॅट आहे, जो दर्जेदार विनोद निर्मीत करू शकतो, अर्थात Insult comedy ह्या जातकुळीतली. - ('रोस्टेड') सोकाजी
  • Log in or register to post comments
ओ
ओल्द मोन्क गुरुवार, 02/05/2015 - 06:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/05/2015 - 06:49 नवीन
पण म्हणून एकंदरीत कार्यक्रमाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे थोडे आततायी व्हावे. इंसल्ट कॉमेडी आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. ती तिकडे पल्याडला स्टँड अप कॉमेडियनची आवडती पद्धतलापण मूळात आक्षेप इंसल्ट कॉमेडीला नाहिच. माझा आक्षेप आहे मुख्यत्वेकरुन त्यातील आईवरुन केलेल्या विनोदाला. अतिशय हिडीस, किळस्सवाणा, बिभत्स, बाजारु, असंस्कृत विनोद होता. आणी वर निर्लज्जपणे तोंड वर करुन लोकांना अक्कल शिकवण्याच्या त्यांच्या कर्तुत्वाला तर सलाम. त्यांना म्हणाव घरी जा आणि स्वतःच्या आयांना तो विनोद ऐकवा, स्वतःचे नाव घालुन. अर्रे किमान आयांना मुलांना जन्म घातल्याचा पश्चात्ताप होउ नये आणि लाज वाटु नये इतपत लायकीचे तरी विनोद करा ना. झाल्या प्रकाराबद्दल ना खंत ना खेद वर यावर टीका करणार्‍यांना तुम्ही मागास म्हणून हिणवणार आणी अजुन १० वर्षानंतर बघाच तुम्ही असले विनोद जाहीर कार्यक्रमातुन होणार असेही म्हणणार? विनोद काळानुसार कदाचित लाऊड होतही जाइल पण विनोदनिर्मितीसाठी एखाद्याला जर एखाद्याच्या आईचा अश्याप्रकारे उल्लेख करावा लागत असेल आणी ज्याच्यावर असा विनोद होत असेल त्याला हसायला आणि टाळ्या वाजवायला लागत असेल आणि आयोजकांना त्याचे समर्थन करावेसे वाटत असेल तर त्या रेम्याडोक्यांना विनोद म्हणजे काय हेच कळाले नाही असे सखेद म्हणायला लागते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
भ
भृशुंडी गुरुवार, 02/05/2015 - 07:01 नवीन
ह्या प्रतिसादाबद्दल शतशः धन्यवाद. विनोद, त्याची जातकुळी आणि त्याबद्दल केलेलं विश्लेषण अचूक आहे. कार्यक्रमाचा दर्जा वाईट होता- पण तो इथे चर्चिल्या गेलेल्या कारणांसाठी नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
म
माहितगार गुरुवार, 02/05/2015 - 10:18 नवीन
आंतरजालावर या विषयावरील चर्चेच्या निमीत्ताने भारतीय सांस्कृतीक संदर्भ दिले जाताहे त्यात विवाह प्रसंगी गायले जाणार्‍या गारी (गाली) गीतांचा उल्लेखही केला जातो आहे त्यात भोजपुरी आणि छतीसगढी विवाहांचे उल्लेख नमुद केले जात आहेत असे दिसते. संदर्भ * छत्तीसगढ़ के विवाह संस्कार - डॉ सत्यभामा आडिल * भोजपुरी संस्कृति - कुछ रोचक प्रसंग - विवाह में गाली दीहीं, इनाम लीहीं - डॉ. डॉ. पुष्पा तिवारी
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/05/2015 - 19:11 नवीन
बरा वाटला. पौगंडावस्था ते बॅचलर लाईफ संपण्यापुर्वीच्या वयात ( थोडंफार अधिक उणे ) जि काहि टवाळाखोरी मित्रांमधे चालते त्यापेक्षा फार काहि वेगळं नव्हतं... आम्हि एव्हढं हाय फाय (म्हणजे नक्की काय?) इंग्लीश बोलु शकत नव्हतो (अजुनही नाहि ;) ) हा भाग वेगळा :) असो. सोवळेपणाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. मला सेक्रेड वाटणार्‍या गोष्टींवर केलेले विनोद मला पण सहन होत नाहित.
  • Log in or register to post comments
V
vikramaditya Fri, 02/06/2015 - 06:43 नवीन
पातळीवरचे विनोद होते. विनोदाचे कोणाला वावडे नसावे. पण नवरसांपैकि हा बीभत्स रस म्हणावा लागेल. तो ही आवडणारे जगात असतील. बरेचसे लोक्स आपण अश्या आई वरील घाणेरड्या जोक्स वर हसतो म्हणजे आपण 'कुल' आहोत असे दाखवण्यासाठी पण हसत असतील. स्त्रियांना नैसर्गिक रीत्याच ही गटारगंगा आवडत नसेल , पण ब -याच स्त्रिया स्वःताला मॉडर्न दाखवणे आणि पीअर प्रेशर मध्ये येवुन आपणही एंजॉय करतोय असे दाखवत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बाकी समाजावर वाईट प्रभाव पडण्याच्या पलीकडे समाज गेला आहे. टीनएजर्स ची भाषा एकली तर हा फार सोज्वळ प्रकार वाटेल. पण एकंदरीत फार बीभत्स.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 02/06/2015 - 06:55 नवीन
एकच वाटते, nature is always naked man makes it NUDE !!
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 02/06/2015 - 08:23 नवीन
कार्यक्रमाला लोक स्वेच्छेने गेले होते.. यु ट्युबवर देखिल बघणे ऐच्छिक आहे सर्व ठिक. पण यांचे नावच ( ऑल इंडीया बक**) चारचौघात घेताना गलिच्छ वाटते. तेवढे तरी निदान सभ्य असायला हवे होते कारण ते सर्वांना ऐकावं बघावं लागतं. आत काय तो धुमाकुळ घाला ज्यांना आवडतय त्यांच्याबरोबर.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/06/2015 - 09:56 नवीन
'अ' 'ब'ला शिव्या घालतो. 'ब' दात विचकून हसतो. हे सगळे बघून 'क' टाळ्या पिटतो. आणि 'अ', 'ब' किंवा 'क' नसलेली मंडळी त्यावर गहन चर्चा करतात!! ;)
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 02/06/2015 - 10:28 नवीन
बाकि हे सगळे मिपा वर्च्या सग्ळ्याच काथ्याकुटाना लागु पडत नाहि का? *smile*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
वेल्लाभट Fri, 02/06/2015 - 10:13 नवीन
सगळे प्रतिसाद वाचले. तो शो व्हॉट्सॅपवरची एक ३ मिनिटांची क्लिप वगळता बघितला नाही. तशी इच्छाही नाही. तेवढ्या तीन मिनिटातही केवळ पहिली काही सेकंद हसू आलं नंतर एकंदर तो काय प्रकार आहे कळल्यावर मुळीच हसू आलं नाही. एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे it wasnt my cup of tea I suppose. असो. फार सविस्तर लिहावंसं वाटत नाही. हा प्रकार निषिद्ध असावा / नसावा हा वेगळा मुद्दा. परंतु, पैसे मिळतात म्हणून स्वतःवर हिडीस, अश्लील विनोद करून घेणारी स्वाभिमानशून्य व्यक्ती माझ्या लेखी मृतवत आहे. आईवर वगैरे विनोद करून घेणारी व्यक्ती तर म्हणजे....
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/12/2015 - 13:20 नवीन
ए आय बी ने त्या कार्यक्रमातल्या ख्रिस्ती धर्माच्या केलेल्या चेष्टेबद्दल कुठल्यातरी चर्चच्या आर्चबिशपची माफी मागितली असं चेपू वर वाचलं...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा