५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)
प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते..
--------------------
किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले.
टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल
७० अॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे:
१. दिल्ली जनलोकपाल बिल
ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील
या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात.
२. स्वराज विधेयक
स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते.
३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा-
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन.
- भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील.
याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे.
४. वीज बिल अर्धे -
हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे.
आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन.
५. वीज कंपण्यांचे ऑडिट
5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन .
- ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ?
ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते.
६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन
आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल.
७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात
प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे.
८. सोलर सिटी बनवण्याची योजना
घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय
आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो.
९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी
हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन
११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण-
पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन
आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी।
१२. मुनक नहर मधुन पाणी-
दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार
१३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर -
जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन
१४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई -
आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन
१५ यमुना पुनर्जीवित-
यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.
💬 प्रतिसाद
(255)
प
पगला गजोधर
Tue, 02/10/2015 - 14:59
नवीन
दिल्लीच्या जनतेने, आज कोणालातरी कुठल्यातरी प्राण्याच्या ऐका विशिष्ठ भागाचा मुका घ्यायला लावला म्हणे, आपल्या मतदानाद्वारे.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 02/10/2015 - 15:13
नवीन
खपलो *LOL*
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Tue, 02/10/2015 - 16:31
नवीन
*lol* *LOL* :-)) :))
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 02/10/2015 - 15:13
नवीन
मतांची टक्केवारी बघण्यासारखी आहे. टक्केवारीच्या भाषेत, भाजपा ऑलमोस्ट जिथे होते तिथेच राहीले आहे. मात्र यातून एक सिद्ध होते की आपला काँग्रेसच्या नाराज मतदारांची एकगठ्ठा मते मिळाली आहेत. पण ते जाउंदेत, आपचे महत्व त्यासाठी कमी करत नाही, पण काँग्रेसची टक्केवारी आता १०च्या खाली आणल्याबद्दल अभिनंदन.
Delhi Election 2015 | Create infographics
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 16:51
नवीन
आप मधे जो कोणि गणिती असेल त्याला सलाम. काँग्रेसचे मतदार आप कडे गेले (कि काँग्रेसनी पाठवले? ) अदर्स मधले आप कडे गेले (बुखारी साहेब वगैरे? ) भाजपने आपला १ टक्का आप ला दिला (पॅराशुट लीडरशीपचा परिणाम ?). नतिजा सामने है. शहा आलम स्वतःला लई एक्स्पर्ट गणिती समजत होते... त्यांच्यावर वरताण निघाला आप.
हाच फॉर्म्युला युपी, बिहार मधे लागु होऊ शकतो. बिहारमधे तशिही नितीश, लालु, कम्युनिस्ट आणि काँग्रेस ची मोट बांधुन तयार आहे. युपी जर मुलायम+माया+काँग्रेस मिळुन लढले तर बसलं बिजेपी बोंबलत.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 18:56
नवीन
विरोधी वोट भाजप ला स्वताकडे आकर्षित करता आले नाही ही भाजप ची शोकांतिका वाटते आहे.
मतदार हे कधीच गृहित धरुन चालत नाही. उद्या आप ने निट काम केले नाही आणि बिजेपी त्यांचा विश्वास संपादण करेन तर ती मते भाजप कडे पण वळतील.
आणि भारतीय राजकारणाची शोकांतीका ही पण आहे की ३०-३५ % वोट घेवुन ही आपण बहुमत साबित करु शकतो.
माझा एक प्रश्न आहे... मला खरेच हे निटसे माहिती नाही, कोणॅए सांगु शकेन का?
हे वोट % आहेत ते निवडनुकित ६७ % मतदान झाले आहे त्यांनुसार असते की पुर्ण १०० % मतदार गृहित धरुन असते
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Tue, 02/10/2015 - 19:38
नवीन
साहेब, बाकी ठिक हो, पण तुमच्या लेखनातली एक शुद्ध लेखनाची चूक सुधाराल काय ? वाचताना दाताखाली खडा आल्यासारखं होतंय आणि खूप वेळा दुर्लक्ष केलं पण आता शक्य नाही असं वाटलं म्हणून सांगतोय
विश्वास "संपादन" "करेल" (करेन नव्हे)
त्याच्या बरोबरच अजून एक, जेथे करेन (भरेन मरेन) हवे, तेथे तुम्ही बर्याचदा करेल (भरेल मरेल) आणि जेथे करेल (भरेल मरेल) हवे, तेथे तुम्ही करेन (भरेन मरेन) असे लिहिता. अशी पद्धत कोणत्याही बोली भाषेमध्येही नाही आणि ते चूक आहे. जमल्यास दुरुस्त करावे.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 19:44
नवीन
शुद्धलेखनाबद्दल माफी करावी. प्रयत्न करतो परंतु शक्यता कमी आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 19:50
नवीन
आणि अगदी कमि वेळात स्वतःचा डेडीकेटेड चाहता वर्ग निर्माण करणं, त्याला पक्षाशी घट्ट बांधुन ठेवणं, हे निवडणुकीचं स्कील आपमधे ज्यानि कोणि डेव्हलप केलं तो खरोखर कौतुकास पात्र आहे. आपच्या मतदारास भाजपकडे जावेसे वाटले नाहि. काँग्रेसच्या मतदाराने आपला पसंती दिली. मुस्लीम वस्तीत कोणि ओवेसी टाईप उभा राहु शकला नाहि. या सर्व इतःस्तः पसरलेल्या लोकमताला आपच्या मागे एकसंघ उभं करणं हे केवळ केजरीवालसाहेबांच्या सद्गुणी इमेजवर शक्य नव्हतं. आपमधे कुणितरी अगदी शांत डोक्याने हे सगळं समिकरण जुळवलं असणार... जसं शहा साहेबांनी युपी भाजपच्या बाजुने फिरवला.
बाकि मला वाटतं व्होटींग पर्सेण्ट एकुण मतदान संखेवर अवलंबुन असावं. मागील वेळी मतदान ६७% झालं होतं बहुतेक यावेळी ६८%.
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Tue, 02/10/2015 - 15:53
नवीन
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 02/10/2015 - 16:00
नवीन
दिल्ली पॉवर < इंडिया केंद्रीय पॉवर, म्हणूनच इक्वेशनच्य राईट साईडची रिस्पोसिबिलीटी खूप पटीने जास्त.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 02/10/2015 - 16:02
नवीन
दिल्ली पॉवर 'इज खूप खूप लेस द्यान ' इंडिया केंद्रीय पॉवर, म्हणूनच इक्वेशनच्य राईट साईडचीही रिस्पोसिबिलीटी खूप खूप पटीने जास्त.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 02/10/2015 - 17:47
नवीन
स्वतः नापास झालो तर दु:ख होते पण आपल्याबरोबर वर्गातला हुष्षार मुलगाही नापास झाला असेल तर मात्र फार आनंद होतो चला आपण एकटेच नाही.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 02/11/2015 - 09:44
नवीन
आता तुम्ही काय करा की, प्राथमिकचे विद्यार्थी आणि १२ वी चे विद्यार्थी, या दोघांचेही मूल्यमापन १२ वी च्या प्रमाणमापणाने करा हं !
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 02/10/2015 - 16:05
नवीन
केजरीवाल यांना आजपासून झेड सिक्यूरीटीचा दर्जा देण्यात आला आहे. आता परत मागच्या सारखे "मला सिक्यूरीटी नको" वगैरे चालू करू नये असे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 02/10/2015 - 16:14
नवीन
:)
केजरीवाल आणि टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आणि प्रामाणिक कारभार करणार हे उघड आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर बर्यापैकी काम होईलच. आणि त्याचे परिणाम दृगोच्चर देखील होतील. त्याचा फायदा मोदिंना पण होणार काय... मोदिंनी केजरीसाहेबांना चाय पे बुलाया है अशी बातमी सकाळने दिली आहे.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 02/11/2015 - 07:41
नवीन
२४ तास झाले नाहीत हो अजून !
http://timesofindia.indiatimes.com/elections/delhi-elections-2015/top-stories/Delhi-elections-2015-results-Amid-regime-change-touts-at-RTO-pack-their-bags/articleshow/46194142.cms
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:15
नवीन
चांगले आहे,
आताच दिल्लीच्या टीम बरोबर बोलत होतो, त्यांचे म्हणणे हे आहे की , न्युज चेनेल आधी फोकस चुकीचा करत होते, काय चुकीचे केले हेच न्युज मध्ये दिसत होते, आप ने ग्राउंड लेवेल वर खुप कामे केली आहेत आणि ती न्युज चेनेल वाले दाखवत नव्हते, म्हणुन तुम्हाला तिकडे बसुन हे माहीत नाही, तुम्ही न्युज चॅनल वरुन आप ला अनालिसिस करता आणि आमच्या इअथल्या कामावरुन . आणि पुढे जावुन ते म्हणाले, येथे देतो ते वाक्य
Khandelwal, Sumit X. 1:15 PM
I know one thing... Even if AAP doesn't complete all the sayings.. they will be way ahead BJP or any other party
Jagtap, Ganesh B. 1:15 PM
yes
Khandelwal, Sumit X. 1:16 PM
even if 10% things will be implemented, it's a grt achievement
----
आता दिल्लीकरांच्या अशा अपेक्षा आहेत आणि त्यांना १० % काम झाले तरी ते बिजेपी आणि कॉन्ग्रेस पेक्षामोठे वाटणार आहे तेंव्हा ह्या २ पार्ट्यांनी आधी काय केले असेन ते कळते आहेच.
असो.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/11/2015 - 10:59
नवीन
परत स्वारी भौ.. पण
इथे "असेन" नाही हो, "असेल". :)
थोडा प्रयत्न तरी करा ..
(मराठीवर लई प्रेम हाय आमचं तेव्हा बघवत नाही हो.)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 11:19
नवीन
पुन्हा माफी.... नक्कीच प्रयत्न केला जाईन.
प्रयत्न करेल की करेन यात गफलत झाल्याने केला जाईल असे लिहिले. निदान असे तरी करु शकेन.
वयक्तीक -
हा 'न' खुप नडतो मला, एकतर मी अशुद्ध बोलतोच, पण काही वर्षापुर्वी कवितेच्या कार्यक्रमासाठी खुप मजा आली होती.
पेठेतली काही मंडळी गृप मध्ये, काय तो शुद्धपणा, हेवा वाटावा इतका.. पण आमच्या 'न' ला मात्र लय संबहळावे लागले.
खुन की खुण यात पण गफलत .. आता हे नक्कीच सांगण्यासारखे नाही, परंतु प्रयत्न केलाच पाहिजे हे मनोमन ठरवले आहे. पण थोडा वेळ लागेल
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 11:21
नवीन
पण आमच्या 'न' ला मात्र लय संभाळावे लागले. असे वाचावे, टाईप करण्यातली चुक
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 02/11/2015 - 11:24
नवीन
तेच मी देखील वर म्हणले आहे (१०% ऐवजी १० मुद्यांबद्दल). ते कुठल्याही लोकशाहीत अपेक्षित आहे. पण अजून दिल्ली बरीच दूर आहे. मी आत्ता होईल अथवा होणार नाही असे काहीच म्हणत नाही. (मोदींच्या बाबतीत पण मी असे म्हणल्याचे आठवत नाही).
पाच वर्षाचा काल हा सत्ताकारणासाठी जनतेच्या दृष्टीने बराच मोठा असतो पण जेंव्हा खरेच मुलभूत चांगले आणि तरी देखील जनतेस दृश्य स्वरूपात दिसेल असे घडवून आणायचे असते, तेंव्हा त्यासाठी तोच काळ मर्यादीत असतो. हे केजरीवाल आणि मोदी या दोघांना लागू आहे. दोघांकडे बहूमत आहे. तरी आता राजकारण म्हणून मोदींचे प्रत्येक विधेयक हे अजूनही मोदी-भाजपा विरोधकांना राज्यसभेत अडवता येऊ शकते आणि मोदी कसे काम करत नाहीत हे दाखवता येऊ शकते. केजरीवालांना तसे नाही, पण केंद्र सरकार राजकारण म्हणून आणि कधी कधी खरेच कायद्यात / धोरणात बसत नाही म्हणून अडवू शकते. पण दोन्ही बाबतीत मोदी अथवा केजरीवाल हे तक्रार करू शकणार नाहीत. कारण त्यांच्या राजकीय अथवा घटनात्मक अडीअडचणीचे जनतेला काही देणंघेणं नाही.
केजरीवालना आता आधीचा आक्रस्ताळेपणा सोडून काम करून दाखवायचे आहे आणि जेथे एखादी गोष्ट त्यांना हवी तशी होत नसली तरी धरणे धरणे वगैरेची नौटंकी न करता करून दाखवायची आहे.
अजून एक भाग म्हणजे, लोकसभेत, विधानसभेत आणि महापालीकेत जनता अनेकदा वेगळी मते देते. आत्ताचे आप चे यश जरी आत्तापर्यंतच्या इतिहासातले एअमेवाद्वितिय असले तरी तो नंबरांचा अपवाद सोडल्यास उदाहरण म्हणून महाराष्ट्राचे बघा, जो गेल्या निवडणूकीच्या आधीपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. ८५ साली राजीव लाटेत केवळ ५ विरोधक निवडून आले. त्याच सुमारास नंतर झालेल्या विधानसभेत पुलोद जरी सत्तेवर येऊ शकले नाही तरी बरीच जास्त मते घेऊ शकले. त्याच पाठोपाठ मुंबई महापलीकेत शिवसेना आली. हे केवळ उदाहरणादाखल.
एक गोष्ट नक्की झाली आहे... भाजपा आणि मोदींना जनतेकडून, पहील्या नऊ महीन्यातच संदेश मिळालेला आहे. (९ महीन्यावरून व्हॉट्सअॅपवर जोक्स पण आले आहेत). पण त्यांना करेट्क्टीव्ह कोर्स ऑफ अॅक्शन घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे आणि संधी आहे. ती संधी त्यांनी आणि स्वतःचे नाव नीट ठेवण्यासाठी आपने देखील घेतली तर भारतात राजकीय क्षेत्रात प्रथमच एक निकोप/सकारात्मक स्पर्धा राजकारण्यांना करावी लागेल. जी सगळ्यांच्याच फायद्याची ठरेल.
बघू काय होते ते...
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 13:57
नवीन
+१
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 02/11/2015 - 17:48
नवीन
>>> Khandelwal, Sumit X. 1:15 PM
>>> I know one thing... Even if AAP doesn't complete all the sayings.. >>> they will be way ahead BJP or any other party
wishful thinking
>>> Jagtap, Ganesh B. 1:15 PM
>>> yes
>>> Khandelwal, Sumit X. 1:16 PM
>>> even if 10% things will be implemented, it's a grt achievement
----
तुमचे मित्र सुशिक्षित असल्याने केजरीवालांनी दिलेली बहुसंख्य अव्यावहारिक व अवास्तव आहेत हे त्यांच्या लक्षात आले आहे आणि म्हणूनच १००% टक्के पूर्ततेची अपेक्षा ठेवण्याऐवजी निदान १०% टक्के आश्वासने तरी पूर्ण व्हावीत ही त्यांची सदिच्छा आहे. हे सुशिक्षित मतदारांना समजू शकेल. परंतु कमीशिक्षित मतदारांना हे पटेल का? आआपला या वर्गातील बहुसंख्य मते मिळाली आहेत. आआप फारच थोडी आश्वासने पूर्ण करून मते मागावयास आल्यास हे मतदार कसे वागतील?
>>> आता दिल्लीकरांच्या अशा अपेक्षा आहेत आणि त्यांना १० % काम झाले तरी ते बिजेपी आणि कॉन्ग्रेस पेक्षामोठे वाटणार आहे तेंव्हा ह्या २ पार्ट्यांनी आधी काय केले असेन ते कळते आहेच.
तुमचे १-२ सुशिक्षित मित्र म्हणजे तमाम दिल्लीकर झाले का?
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 18:34
नवीन
नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व दिल्लीकर नक्कीच झाले नाहीत.
परंतु फक्त कमी शिक्षित लोकांनीच आप ला मते दिले असे ही नाही.
दुसरी गोष्ट कमी शिक्षित असणे आणि समजुतदार असणे यात फरक आहेच, ते समजुत दार असतील म्हणुनच त्यांनी पुन्हा ( ४९ दिवसाला इतरांनी कमी लेखले त्यांनी उचलुन धरले) त्यांना निवडुन दिले.
जर त्यांना ही असे वाटले की झालेले काम इतर कोणी करु शकणार नाही तर ते पुन्हा निवडुन देतील .. नाही तर नाही देणार.. हे येव्हदे सोप्पे असेन.
आपण कीती ही शिक्षित असलो तरीही जे पक्ष निवडनुकीमध्ये अमाप खर्च करतात ज्याचे मोजमाप कोणी देवु शकत नाही तरी त्याकडे आंधळेपणाअने बघतोच ..
आपण कीती ही शिक्षित असलो तरीही जे पक्ष मतदारांना गृहित धरुन कुठल्याही इतर पक्षातील आणि काही गुन्हेगारांना त्यांनी सर्रास उमेदवारी दिली तरी आपण ते ही आंधळेपणाने सहन करतोच.
आपण कीती ही शिक्षित असलो तरीही प्रत्येक रोडच्या कंत्राटावर.. इअतर गोष्टींवर कीती भ्रष्टाचार झाला हे सर्रास बोलतो पण मत पुन्हा त्यांनाच देतो ..
आपण कीती ही सुशिक्षित असलो तरीही आपण कट्टर भाजपेयी किवा कॉन्ग्रेसी किंवा इतर कोणाचे तरी कट्टर होतो, भले त्या पार्ट्या त्यांच्या तत्वाला त्यांच्या कट्टर गोष्टींना सोडुन इतर पक्षातील विरोधी नेत्याला आपल्या पक्षात आणतात आणि आपण कट्टर पक्षाचे असलो तरी दुसर्याच कोणाला कट्टरतेच्या नावाखाली मत देवुन पक्षाची इमान राखण्यात धन्यता माणतो .
असो .. आपण किती ही शिक्षित असलो तरी आपण ही सुशिक्षित कधी होणार हाच प्रश्न आहे, त्यामुळे कमी शिक्षित हे सुविचारी अहु शकतात हे आपण कधी मान्य करु असे वाटत नाही.
असो अश्या कमी शिक्षित लोकांकडे खर्या अर्थाने फक्त मतांसाठी नसुन एक सच्च्या मानवतेच्या भावनेने किती राजकारणी भघतात.. झटतात हे त्यांना ही माहिती असते, त्यामुळे कोणाला किती समज आहे आणि नाही हे आपण शिक्षित लोकच कसे ठरवु शकतो ?
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
गुरुवार, 02/12/2015 - 04:21
नवीन
मस्त प्रतिसाद
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 08:43
नवीन
>>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित असणे आणि समजुतदार असणे यात फरक आहेच, ते समजुत दार असतील म्हणुनच त्यांनी पुन्हा ( ४९ दिवसाला इतरांनी कमी लेखले त्यांनी उचलुन धरले) त्यांना निवडुन दिले.
फुकट पाणी, स्वस्तात वीज इ. आश्वासनांमुळेच मते दिली.
>>> जर त्यांना ही असे वाटले की झालेले काम इतर कोणी करु शकणार नाही तर ते पुन्हा निवडुन देतील .. नाही तर नाही देणार.. हे येव्हदे सोप्पे असेन.
बरोबर
>>> आपण कीती ही शिक्षित असलो तरीही जे पक्ष निवडनुकीमध्ये अमाप खर्च करतात ज्याचे मोजमाप कोणी देवु शकत नाही तरी त्याकडे आंधळेपणाअने बघतोच ..
आआपही त्याला अपवाद नाही. लोकसभा निवडणुकीला किती खर्च केला हे अजून आआपने जाहीर केलेले नाही.
>>> आपण कीती ही शिक्षित असलो तरीही जे पक्ष मतदारांना गृहित धरुन कुठल्याही इतर पक्षातील आणि काही गुन्हेगारांना त्यांनी सर्रास उमेदवारी दिली तरी आपण ते ही आंधळेपणाने सहन करतोच.
आपण कीती ही शिक्षित असलो तरीही प्रत्येक रोडच्या कंत्राटावर.. इअतर गोष्टींवर कीती भ्रष्टाचार झाला हे सर्रास बोलतो पण मत पुन्हा त्यांनाच देतो ..
चांगला पर्याय नसला की असेच होते.
>>> आपण कीती ही सुशिक्षित असलो तरीही आपण कट्टर भाजपेयी किवा कॉन्ग्रेसी किंवा इतर कोणाचे तरी कट्टर होतो, भले त्या पार्ट्या त्यांच्या तत्वाला त्यांच्या कट्टर गोष्टींना सोडुन इतर पक्षातील विरोधी नेत्याला आपल्या पक्षात आणतात आणि आपण कट्टर पक्षाचे असलो तरी दुसर्याच कोणाला कट्टरतेच्या नावाखाली मत देवुन पक्षाची इमान राखण्यात धन्यता माणतो .
सध्या आआपमध्ये असलेल्या अलका लांबा आधी कोठे होत्या हे माहीत असेलच.
>>> असो .. आपण किती ही शिक्षित असलो तरी आपण ही सुशिक्षित कधी होणार हाच प्रश्न आहे, त्यामुळे कमी शिक्षित हे सुविचारी अहु शकतात हे आपण कधी मान्य करु असे वाटत नाही.
फक्त आआपला मत म्हणजेच सुविचारी का?
>>> असो अश्या कमी शिक्षित लोकांकडे खर्या अर्थाने फक्त मतांसाठी नसुन एक सच्च्या मानवतेच्या भावनेने किती राजकारणी भघतात.. झटतात हे त्यांना ही माहिती असते, त्यामुळे कोणाला किती समज आहे आणि नाही हे आपण शिक्षित लोकच कसे ठरवु शकतो ?
कोणताच पक्ष त्यांच्याकडे तसे बघत नाही.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/12/2015 - 10:40
नवीन
---------------/\-------------..
सर्व मते तुमचीच आहेत , त्यामुळे ती प्रमाण नाही. पण मी वस्तुस्थीती दिलेली आहे या मुद्द्यांमध्ये ती चआंगला पर्याय नाही असे आपण ठरवुन आपले मत देतो हे तुम्ही मान्य केली आहे,
दिल्लीतील लोकांअन त्यांचा चांगला पर्याय दिसला.. म्हणुन त्यांनी त्यांना मत दिले, त्यांनी तुमच्या म्हणण्यानुसार वागायला थोदेच हवे आहे. त्यांना जे चांगले वाटले ते त्यांचे मत. तुम्ही तुमचे मत इअतरांवर बिंबवने सोडा की राव.
आता तर मला वीट यायला लागलाय तुमच्या कट्टरतेचा.. जेव्हडी चांगली मते होती भाजप बद्दल तुमच्या सारखे कट्टरते आणि चुकीला पण बरोबर म्हणणारे पाहुन खरेच निट विचार करावा म्हणतोय नक्की वेळ आपण फुकट घालवतोय की काय.
सुजान नागरीक म्हणुन आपली मते मांडणे ठिक पण प्रत्येक वेळेस आपलेच म्हण्ने बिंबवने आणि तेच योग्य म्हणने खरेच ठिक नाही.
हा तुम्हाला या धाग्यावरही शेवटचा रिप्लाय.. हद्द होणे म्हणजे श्रीगुरुजी
बाकी पुढील राजकिय घडामोडीस शुभेच्छा !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 10:51
नवीन
>>> हा तुम्हाला या धाग्यावरही शेवटचा रिप्लाय.. हद्द होणे म्हणजे श्रीगुरुजी
धन्यवाद! आभारी आहे.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 02/12/2015 - 10:50
नवीन
श्रीगुर्जी, राग मानू नका पण एक सांगतो. तुमचे प्रतिसाद हे "संक्षी प्रतिसाद" होऊ लागलेले आहेत. असं झालं की मांडलेल्या चांगल्या मुद्द्यांचं पण भजं व्हायला लागतं हो.
या प्रतिसादास उत्तर देऊ नकाच पण विचार करा ही विनंती.
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 02/13/2015 - 08:00
नवीन
या प्रतिसादास उत्तर देऊ नकाच पण विचार करा ही विनंती. हाहा...
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 02/11/2015 - 09:35
नवीन
'केजरीवालनी दिलेली आश्वासने पूर्ण होतील कारण त्याच्या शक्याशक्यतेचा चार महिने अभ्यास करून ती देण्यात आली आहेत 'असा दावा आपच्या पुण्यातील एका नेत्याने केला आहे. आप हे सर्व करून दाखवेल अशी मूर्ख आशा धरण्याइतकी भारतीय जनता आता खुळी राहिलेली नाही. लोकाना असे वाटते की टेंडर निघून पैसे खाता येतात म्हणून तारांगण बांधायचे की कसे ? याचा अधिकार नगरसेवकाचा स्थायी समितीचा नसून तो लोकांचा असला पाहिजे. यात चूक काय आहे ? लोकाना वाटले की संडास ही प्रायारिटी आहे तर साहित्य संमेलनाला कोटी रुपये कशासाठी द्यायचे ? जनमनाचा फार मोठा कानोसा घेण्याचा आवश्यक पायंडा केजरीवाल पाडत आहेत. असे प्रयोग पूर्व आशियात झालेत असे म्हणतात. पारदर्शक अप्रोच असणे महत्वाचे. मोदींचा तो दिसत नाही हे लोकाना वाटू लागले आहे. मोदीनी मै ये करना चाहता हूं च्या ऐवजी आप क्या चाहते है ची भाषा वापरावी त्याना जनतेचा आवाज तेंव्हाच कळून येईल.नुसता विकास विकास म्हणून चालत नाही त्यात नितळपणा फार गरजेचा .
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 09:37
नवीन
काळ पासुन तुमचे २-३ रिप्लाय वाचले वेगवेगळ्या धाग्यावर. अतिशय मस्त लिहिली आहेत तुमची मते.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/11/2015 - 11:00
नवीन
मंग काय, आमचे चौरा आहेतच मस्त.. ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 02/11/2015 - 11:03
नवीन
ते "काळ" असं लिवलंय त्यांनी ;) :)
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/11/2015 - 12:16
नवीन
आलरेडी दोन डाव माफी मागितलीये त्यांनी त्यांच्या अशुद्ध-लेखनाबाबत, आता अजून त्याबद्दल टोकून कशाला मुद्दा भरकटवू एक्का साहेब ?
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 02/11/2015 - 12:43
नवीन
गणेशा हे हाडाचे कवि आहेत. सबब कोणत्याही युगात भरारी मारण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यानी पार त्रेतायुगापासून आमचे प्रतिसाद पाहिलेले दिसताहेत. मग काळ हा शब्द बरोबरच आहे ना ? कस्सं ?
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
Wed, 02/11/2015 - 16:07
नवीन
पार त्रेतायुगापासून आपण प्रतिसाद देत आहोत हे सांगण्याची (आणि लाल रंगाचा डबा वापरून घेण्याची ) तुमची हातोटी आवडली हो चौरा काका..
(बादवे कुठून शिकता हो सग्ळं ? कस्सं कस्सं जमतं हो तुम्हाला काळाच्याबरोबर रहायला ? ;) )
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Wed, 02/11/2015 - 10:14
नवीन
http://kiranyake.blogspot.in/2015/02/blog-post_10.html
- Log in or register to post comments
क
केदार-मिसळपाव
Wed, 02/11/2015 - 16:23
नवीन
की, अरविंद केजरीवाल जिंकले ते छानच झाले. ते तसेही ४-५ वर्षांपासुन सक्रीय आहेत. त्यांना ५ वर्षे दिल्लीकरांनी सत्ता दिली हे पटते. दुसरे असे की हा काही मोदींचा पराभव आहे असे वाटत नाही. कारण ते काही दिल्लीत मुख्यमंत्री होणार नव्हते. गेल्या २-३ वर्षात बहुसंख्य लोकांना हे दोन पर्याय वाटत होते आणि दोघेही पाच वर्षे स्थिर जनमत घेउन आले आहेत. मी विचार करतोय कि हे दोघे जेव्हा आता सोबत काम करतील तेव्हा दोघांचाही एकामेकावर वचक असेल आणि तेच भारतासाठी उत्तम आहे. भारतियांना ज्यांचा सत्तेचा तिटकारा वाटत होता ते सत्तेबाहेर आहेत हे महत्वाचे.
आता आप आणि भाजप ह्या दोघांच्या समर्थकांनी आपापसात न भांडता सोबत काम कसे करता येइल ते बघावे. (मोदी आणि केजरीवाल ह्यांनी एकामेकांना आमंत्रणे ही दिली आहेत भेटण्याची) तेव्हा समर्थकांनी आत्ता तुच चुक, तुच वाइट असे न विचार करता दोघांची चांगली कामे पुढे आणावीत आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा.
मुळात मिच चांगला किंवा तुच वाइट असे कधीही नसते. त्यांच्या कामाने त्यांना जोखा, त्यासाठी त्यांना काम करण्याची संधी द्या.
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 02/11/2015 - 18:38
नवीन
+१
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
गुरुवार, 02/12/2015 - 03:17
नवीन
आप पक्षाने वारेमाप आश्वासने दिली आणि लोकांनी त्यांच्या ४९ दिवसांचा औट घटकेच्या कारकीर्दीवर विश्वास ठेऊ त्यांना पाच वर्षे दिल्लीचे राज्य चालवतील अशी अपेक्षा करून निवडून दिले. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी आर्थिक तरतूद ते कशी करू शकतील हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. दिल्ली राज्याचे स्वत:चे वार्षिक महसूल उत्पन्न , आणि त्यांना मिळणारे केंद्रीय अनुदान किती आणि त्यांनी दिलेल्या आश्वासानासाठी लागणारी जास्तीची तरतूद किती याचा ताळमेळ कोण करणार ? आप पक्ष , त्यांच्या धोरणा प्रमाणे, दिल्लीतील जनतेवर अधिक कर लादणार नाहि. आणि केंद्रसरकार खास मेहेरबानी करून त्यांची आश्वासने पूर्ण होण्यासाठी अनुदान वाढवणार नाहि. अशा परीस्थित हि आश्वासने पूर्ण कशी होणार ?
दिल्लीच्या मतदाराची - घी देखा लेकिन बडगा नही देखा- अशी अवस्था होण्याची शक्यता जास्त आहे.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 02/12/2015 - 04:28
नवीन
आप्ल्याला मिळणारी झेड सुरक्षा केजरीवाल यानी नाकारली आहे. भाजपच्या जवळ जवळ सर्व महत्वाच्या नेत्याना शपथविधीचे निमंत्रण आहे. शपथविधी साधेपणानेच होईल. हे चित्र पहा.
आमच्या पिंपरी चिंचवड मधील एक स्थानिक नेते यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त एका वर्तमान पत्रात पानभर जाहिरात आली आहे. खाली कार्यकर्त्यांची फौज फोटोत उभी आहे. हा अपव्यय जाणत्या राजाला दिसत नाही काय ? असे जाणते राजे काय कामाचे ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/12/2015 - 04:46
नवीन
नौटंकी परत सुरु झाली म्हणायची. चालायचच.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/12/2015 - 08:38
नवीन
+१
मागील वेळेसही नाटकाचा हाच प्रयोग केला होता. आधी नाही नाही म्हणत सुरक्षा घेतलीच होती.
यावेळी एक फरक दिसलाय. गेल्या वेळी स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःवर शाई उडविण्याचे आणि स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला जाहीररित्या थोबाडीत मारून घ्यायचे आणि प्रत्येकवेळी भाजपवर दोषारोप करायचे मॅनेज्ड कार्यक्रम त्यांनी केले होते. यावेळी असे कार्यक्रम झालेले दिसत नाहीत. सुरवातीला शाईचा एक कार्यक्रम झाला होता तेवढाच.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Fri, 02/13/2015 - 10:37
नवीन
दोन्ही बातम्यांमागे कारण एकच आहे.
त्या ऑफिसरची ईमानदारी !
AIIMS Vigilance Officer Shunted Out By Modi Government
http://www.ndtv.com/india-news/aiims-vigilance-officer-shunted-out-by-modi-government-seeks-cbi-probe-651843
Kejriwal to appoint AIIMS whistleblower Sanjiv Chaturvedi as top anti-corruption officer
http://www.indiatvnews.com/politics/national/kejriwal-to-appoint-sanjiv-chaturvedi-as-anti-corruption-officer-26331.html
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Fri, 02/13/2015 - 20:06
नवीन
मेडिया वाले- पत्रकार या सर्व लोकांविरुद्ध असणारी एक तासाभराची ही लिंक मिळाली अरविंद केजरीवालच्या व्यवस्थीत प्रश्न उत्तरे स्वरुपातील मुलाखातीची
https://www.youtube.com/watch?v=XWhdAS8R8Rc
मला वाटाते बर्याच प्रश्नाची उत्तरे पण मिळतील प्लस मायनस असेन ही पण छान आहे
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 02/14/2015 - 22:24
नवीन
ह्या सर्व ट्वीट्स आहेत. हे खरे असल्यास केजरीवाल यांची पारदर्शकता दिसते.... :)
#AAP bans Aam Aadmi: No cameras in #Delhi Assembly and no public access to Secretariat. #AAPRaj
@AapYogendra: Subsidy will be for a short period and not for a long term for water and electricity @KaranThapar_TTP
Rahul Mehra of #AAP says we never promised anything free
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Sun, 02/15/2015 - 07:36
नवीन
@AapYogendra: Subsidy will be for a short period and not for a long term for water and electricity
बरोबर हे आधी पासुनच सांगितले होते आप ने. त्यांचे म्हणने होते, वीज ऑडीट झाल्यानंतर सबसिडीची गरज लागणारच नाही. वीज बील कमी करता येइनच आणि नाहीच झाले तसे तरी प्रतिस्पर्धी कमी विज बिल दर सणार्या दुसर्या कंपण्यांना पण मारेक्ट मध्ये उतरवले जातील .
दुसर्या आणि तिसर्या त्वीट बद्दल जास्त माहीती नाही
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 02/15/2015 - 14:55
नवीन
त्या बातम्या (News X सोडून)इतरत्र दिसल्या नाहीत म्हणून विचारले.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »