५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)
प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते..
--------------------
किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले.
टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल
७० अॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे:
१. दिल्ली जनलोकपाल बिल
ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील
या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात.
२. स्वराज विधेयक
स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते.
३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा-
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन.
- भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील.
याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे.
४. वीज बिल अर्धे -
हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे.
आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन.
५. वीज कंपण्यांचे ऑडिट
5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन .
- ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ?
ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते.
६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन
आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल.
७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात
प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे.
८. सोलर सिटी बनवण्याची योजना
घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय
आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो.
९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी
हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन
११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण-
पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन
आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी।
१२. मुनक नहर मधुन पाणी-
दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार
१३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर -
जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन
१४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई -
आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन
१५ यमुना पुनर्जीवित-
यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.
💬 प्रतिसाद
(255)
ल
लॉर्ड फॉकलन्ड
Fri, 05/22/2015 - 10:54
नवीन
अगदी.
दिल्ली सरकार राजस्थानच्या शेतकर्याला दिल्लीत आणून त्याच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहून त्याला आत्महत्येचं नाटक करायला लावतंय आणि त्यात त्याचा जीव गेल्यावर त्याच्या टाळूवरचं लोणी ओरपतंय.
दिल्ली सरकार मुख्य सचिवांच्या कार्यालयाला कुलुप लावण्याचा पोरकटपणा करतंय.
दिल्ली सरकार मुख्य सचिव पदासाठी ज्या व्यक्तीचं नाव सुचवतंय त्याच व्यक्तीवर २ दिवसांनी कोणतेही पुरावे नसताना वीज कंपन्यांशी साटंलोटं करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतंय.
दिल्ली सरकार आपल्याला जे जे विरोध करताहेत त्यांची बाऊन्सर्सकरवी झडती घेऊन त्यांना मारहाण करून पक्षातून हाकलून देतंय.... इतकी भारी कामं सुरू असल्यावर पोट्,पाठ्,हात,पाय,केस्,नखे असे सगळेच दुखेल.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 05/22/2015 - 12:35
नवीन
ले.गव्हर्नर मोदी का व्हाइसराय है:- उगपुरुश
आता मात्र शब्द खुंटले (माझेच)
किति दिवस असे ह्यच्यावर नाहि तर त्याच्यावर आरोप करणार आहेत हे लोक ? आय माय स्वारि पुढिल ५ वर्ष तरि त्याना ते करण्या पासुन कोणि पराव्रुत्त नाहि करु शकणार. पुर्ण राज्याचा दर्जा नसला तरि ह्याला कोणितरि (गुलामांपैकि) सांगा रे कि ह्याला जनतेने मुख्यमंत्री पदि बसवलय, किमान त्याचि तरि तमा बाळग.
#पांचसालकेजरीवाल (लगे रहो, तुम हसाना जानते हो और हम हसना, अभि पांच साल तो ये लगा हि रहेगा )
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 05/22/2015 - 12:56
नवीन
जगातला सर्वात चांगला विनोद कोणता? तर ज्यावेळी दुसरा घसरून पडतो त्यावेळी घडतो तो. इथे तर पूर्ण दिल्लीच घसरून पडतेय आणि हा विनोद पूर्ण ५ वर्ष चालणार आहे. दिल्लीवर पूर्ण भारतातली जनता हसत असेल. पाच वर्ष तरी हा मनोरंजक तमाशा मोफत पहायला मिळणार आहे.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Mon, 05/25/2015 - 14:16
नवीन
Lt Governor must act on the ‘aid and advice of the council of ministers’ and that ‘mandate of the people must be respected by the Lt governor in respect of matters which fall within the domain of the Legislative assembly.
- Delhi High Court
The NCT of Delhi shall not be administered by the President through the Lieutenant Governor in respect of matters over which the Legislative assembly of the NCT has authority to make laws.
- Delhi High Court
Central government's notification of restricting the jurisdiction of the ACB was ‘wrong.’
- Delhi High Court
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 05/26/2015 - 08:59
नवीन
दोन गोष्टी
१. केजरीवाल सरकारला १०० दिवस पूर्ण झाले :
त्यानिमित्त त्याने ओपन कॅबिनेट बैठक घेतली.
ज्यात त्याचे सर्व कॅबिनेट मंत्री, चीफ सेक्रेटरी आणि ऑफिसर्स उपस्थित होते.
यात प्रत्येक मंत्र्याला बोलायची संधी मिळाली, प्रत्येक मंत्र्याने आपण काय केलं, काय करत आहोत आणि पुढचा प्लान काय आहे हे सांगितलं.
शेवटी केजरीवाल बोलला, ज्यात त्याने फक्त पब्लिकच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली.
आम्ही हे करत आहोत हे उपकार नाहीत किंवा आम्ही तुमच्यासाठी फार काही करत आहोत याची जाणीव करून देण्यासाठी आलो आहोत असेही नाही.
आम्ही जे करत आहोत त्याची फक्त माहिती देण्यासाठी ही मिटिंग आहे असे सांगण्यास तो विसरला नाही.
यात त्याने एकदाही शीला दीक्षित सरकारच्या निकम्मेपणावर किंवा मागील सरकारच्या नाकर्तेपानावर एक शब्दही काढला नाही.
२. मोदी सरकारला १ वर्ष पूर्ण झाले
त्या निमित्ताने भाउंनी मथुरेत (आणखीन एकदा) भव्यदिव्य भाषणाचा घाट घातला.
त्यात मोदीसरकारचा कोणताही मंत्री नव्हता.
हे बाबाजी एकटेच होते.
भाषणाची सुरुवात मन्नू सरकारला शिव्या देऊन झाली.
ते असते तर किती वाईट झालं असतं याची भीती दाखवली गेली आणि मी आलो म्हणून मी कसा तारणहार ठरलो याची स्वत:च दवंडी पिटली.
निम्मा वेळ मागच्या सरकारला शिव्या देणे, निम्मा वेळ न केलेल्या कामाचे क्रेडीट घेणे आणि फेकाफेकी यात गेला.
यात दुसऱ्या कोणत्याही मंत्र्याचे किंवा अधिकाऱ्याचे नाव त्यांनी घेतले नाही.
सगळे काही स्वत:च करत आहोत, सगळीकडे स्वत:च चौकीदारी करत आहोत, आपण गरिबांचे रखवाले आहोत, आपण श्रीमंतांसाठी काम करत नाही इत्यादी नेहमीची यशस्वी फेकाफेक आणि "मी मी मी माझं.. ' इत्यादी करून त्यांनी भाषण आटोपले.
काही कोणाचे ऐकून घेतले नाही, काही कोणाचे प्रश्न घेतले नाही.
स्वत: जे पोतं आणलेलं ते ओतलं आणि गेले.
मौज वाटली.
यात कोणाचेही समर्थन/विरोध नाही, जे पाहिलं ते लिवलं.
तुम तुम्हारा सोचो और ठरवो
Written by - Prashant B Nimbalkar
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 05/26/2015 - 12:19
नवीन
>>> यात प्रत्येक मंत्र्याला बोलायची संधी मिळाली, प्रत्येक मंत्र्याने आपण काय केलं, काय करत आहोत आणि पुढचा प्लान काय आहे हे सांगितलं.
शेवटी केजरीवाल बोलला, ज्यात त्याने फक्त पब्लिकच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली.
गजेंद्रसिंहाला आत्महत्या करायला लावण्याचं नाटक कसं फसलं आणि त्यात खरोखरच तो कसा गेला हे सांगण्यास ते विसरलेले दिसताहेत.
गजेंद्रसिंहाकडे सापडलेलं पत्र हे त्याने लिहिलेलेच नव्हते हे सांगण्यास देखील ते विसरेलेले दिसताहेत.
त्याच्या लटकत्या मृतदेहासमोर पुढील ७५ मिनिटे भाषण करताना कशी मज्जा आली हेही सांगायला ते विसरलेले दिसताहेत.
योगेंद्र यादव, प्रशांत भूषण इ. ना पक्षाच्या बैठकीत झडती घेऊन बॉडीगार्ड्सकरवी कशी मारहाण करून हाकलून लावलं हेही सांगायला ते विसरलेले दिसताहेत.
मुख्य सचिव फक्त १० दिवसांच्या रजेवर गेल्यावर राज्यपालांनी फक्त त्या १० दिवसांकरीता शकुंतला गम्लीन यांची नेमणूक केल्यावर आपण त्यांच्यावर कसे खोटे आरोप केले आणि दुसर्या एका सचिवाच्या केबिनला कुलुप लावून आपण त्यांची कशी गम्मत केली हेही सांगण्यास ते विसरलेले दिसताहेत.
आपण बॉडीगार्ड घेऊन गजेंद्रसिंहाच्या घरी गेल्यावर त्याचा योग्य तो परीणाम कसा झाला ते संजय सिंहांनी सांगितलं का?
गजेंद्रसिंह जायच्या काही दिवस आधी आपलं आणि त्याचं फोनवरून काय संभाषण झालं ते सांगण्यास सिसोदिया विसरलेले दिसताहेत.
आजतक वर आपण ढसाढसा रडण्याचा कसा उत्कृष्ट अभिनय केला हे सांगण्यास आशुतोष विसरलेले दिसताहेत.
एकंदरीत बर्याच गोष्टी ते सांगायला विसरलेले आहेत.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 05/26/2015 - 12:53
नवीन
केजरूके गुलाम या टॉपिकवर एक चक्कर टाका ना प्लिज.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 05/26/2015 - 13:36
नवीन
या धाग्यावर माझ्या प्रतिसादाला तुम्ही उत्तर दिले नाही. अर्थात तुम्हाला प्रतिसाद न देण्याचा साक्षात्कार झाल्याचे वाचून मी शांत बसलो होतो.
http://www.misalpav.com/comment/reply/30890/696975
पण इथे अजूनही तुम्ही सक्रीय दिअत आहात म्हणून आठवण करून दिली.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 05/26/2015 - 14:10
नवीन
केलाय तुम्हाला तिकडे रिप्लाय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 05/26/2015 - 15:51
नवीन
सगळ्या धाग्यांवर चक्कर टाकलेली आहे. धागा बदलला म्हणून मी वर दिलेली वस्तुस्थिती बदलत नाही.
- Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर
Tue, 05/26/2015 - 17:32
नवीन
ते काय करायचं ते आप बघून घेईल . एकंदरीत आप विरोधकांनाच आप ची जास्त काळजी दिसतेय .
आमच्या वरील प्रतिसादाची प्रेरणा इथ
http://www.misalpav.com/comment/699589#comment-699589
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Tue, 05/26/2015 - 19:31
नवीन
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 07/04/2015 - 08:33
नवीन
Delhi Janlokpal Bill final draft completed.
Bill to be sent to Central Govt through LG for approval.
- ANI News
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sat, 07/04/2015 - 08:37
नवीन
Lokpal 2.0 to get more teeth: AAP gets ready to unveil new and improved anti-corruption bill
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3148958/Lokpal-2-0-teeth-AAP-gets-ready-unveil-new-improved-anti-corruption-bill.html
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sun, 07/19/2015 - 08:50
नवीन
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Sun, 07/19/2015 - 08:51
नवीन
Delhi government to launch 'aam aadmi' canteens in Delhi, provide meal for Rs 5
http://www.ibnlive.com/news/india/delhi-government-to-launch-aam-aadmi-canteens-in-delhi-provide-meal-for-rs-5-1021303.html
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/19/2015 - 15:01
नवीन
अम्मा जयललिताने सुद्धा 'अम्मा कॅन्टीन' या नावाने १ रूपयात इडली-साम्बार देणारी कॅन्टीन्स सुरू करून २-३ वर्षॅ लोटली. एकन्दरीत किमान २५-३० रुपये किम्मत असलेल्या वस्तू मतदारान्ना अत्यल्प दरात देण्याची लालूच दाखविणे हे तामिळनाडू मॉडेल केजरीवाल दिल्लीत सुरू करताना दिसत आहेत. करदात्यान्च्या पैशातून उधळपट्टी करून मतदारान्ना लालूच दाखविणे व फुकटेगिरीची सवय लावणे आणि आपण गरीबान्चा मसीहा असल्याचा आव आणणे यात केजरीवाल कुशल आहेत.
एक शन्का. अशी कॅन्टीन चालविताना जो तोटा होणार आहे, तो कोठून भरून काढणार? केजरीवाल स्वतःच्या खिशातून देणार का आआप देणग्या गोळा करून तोटा भरून काढणार का करदात्यान्च्या पैशावर डल्ला मारणार?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 07/19/2015 - 16:59
नवीन
अशा व्यवहारांमधे तोटा झालाच पाहिजे असं काहि नाहि. ना नफा-ना नुकसान तत्वावर असे उपहारगृह चालवता येतं. फार मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास अधिक उत्तम.
पण इथे मुद्दा थोडा वेगळा वाटतोय. स्माजवादी विचारसरणीचे असे उद्योग पुढेमागे सरकारच्या गळ्यातली धोंड बनतात. अगोदरच पैशाची चणचण असणार्या सरकारने असले उद्योग इतक्या लवकर करु नयेत. असो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/19/2015 - 18:26
नवीन
५ ते १० रूपयात उत्तम, पोषक जेवण देणे म्हणजे कॅन्टीन तोट्यातच चालणार.
एक जुने वाचलेले आठवले. तुम्ही एखाद्याला रोज फुकट मासे देण्यापेक्षा त्याला मासे पकडणे शिकविले तर तो स्वतःच्या पायावर उभा राहून फुकट घेण्याची सवय लागणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sun, 07/19/2015 - 20:41
नवीन
नीट प्लॅनींग केल्यास १० रुपयात एक वेळचे 'पोषक' अन्न शक्य आहे. तिथे अगदी दिल्लीवाल्यांची चटपटीत डीश अपेक्षीत नाहि.
- Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ
Mon, 07/20/2015 - 07:22
नवीन
च्यायला तुम्हाला दहा रूपयात पोषक डिश प्लॅन करता येत असेल तर सांगा ना आम्हालापण. जरा खर्च कमी करीन असे म्हणतो :)
बाकी दहा रूपयात पोषक जेवण शक्य आहे हे वाचून संजय निरूपम आणि कोण कोण १ ते २२ रूपयात जेवण शक्य आहे असे म्ह्णायचे त्याची आठवण झाली.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 07/20/2015 - 19:50
नवीन
आमचे सरकार येऊ देत. तुम्हालाच फुड मिनिस्टर करतो :)
पोषक जेवण म्हणजे एकदम ताटभर, चमचमीत अन्न नाहि. दहा रुपयात एक समोसा खाण्यापेक्षा नारळ/केळी/दलीया खाल्लं तरी ते जास्त पोषक असतं. आणि सरकार नामक यंत्रणेला चार ठिकाणच्या योजना एकत्र करुन, ग्रॉस लेव्हलला अन्न प्रक्रिया करुन १० रुपयात पोटाला बर्यापैकी आधार देणारं अन्न बनवणं कठीण नाहि. एकदम तड लागेस्तो जेवण मिळणार नाहि त्यातुन, पण कुपोषण होणार नाहि हे नक्की.
- Log in or register to post comments
न
नांदेडीअन
Wed, 08/19/2015 - 17:46
नवीन
CAG findings a shot in the arm for Kejriwal govt
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAG-findings-a-shot-in-the-arm-for-Kejriwal-govt/articleshow/48519586.cms
बिजली कंपनियों ने घाटे को 8 हजार करोड़ बढ़ाकर बताया: CAG
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/other-news/discoms-inflated-dues-by-rs-8k-cr-cag/articleshow/48523116.cms
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/20/2015 - 10:49
नवीन
तेच म्हटले हे आपटर्ड ही बातमी येऊनही कुठे गायब आहेत.
दिल्लीतील ३ डिसकॉमने accumulated तोटा २० हजार कोटी रूपये आहे असे म्हटले होते ( संदर्भः http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/CAGs-discom-audit-over-but-suspense-remains/articleshow/47621693.cms ). तो आकडा ८ हजार कोटींनी फुगवून दाखवला म्हणजे accumulated तोटा १२ हजार कोटी रूपये होता यावर तर शिक्कामोर्तब झाले. म्हणजे या कंपन्या तोट्यात होत्या हे नक्की. तसे असेल तर महान युगपुरूषजी श्री.रा.रा अरविंद केजरीवाल यांचे म्हणणे होते की या कंपन्या तोट्यात नाहीत तर फायद्यात आहेत . पुरावा हवा आहे का? हा घ्या--- http://www.ndtv.com/cheat-sheet/delhis-electricity-scam-exposed-claims-arvind-kejriwal-10-developments-512104 . यातील तिसरा आणि चौथा मुद्दा बघा.
३. Mr Kejriwal says that in 2010, Brijnder Singh, who was head of the Delhi Electricity Regulatory Commission (DERC), which decides electricity prices, found that distribution companies (DISCOMS) were making large profits because inefficiencies in the supply had been contained. Mr Kejriwal says that the chair of the DERC wanted power prices to be slashed by 23%.
४. He alleges that power companies projected losses of nearly 600 crores for the years 2010-11 and wanted prices increased. The chairman of the DERC, however, reportedly found their profits would add upto nearly 3000 crores and wanted power rate slashed by about 20%.
म्हणजे तोट्यात असलेल्या कंपन्यांकडून दिलेल्या वीजेचे बिल अर्ध्यावर आणून त्यांचा तोटा अजून वाढत जाणार नाही का? केजरीवालांचे वीजेचे बिल अर्ध्यावर आणायच्या बेसिसलाच कॅग ऑडिटने नख लावले आहे. म्हणजे खरे तर केजरीवाल तोंडावर आपटले आहेत या कॅगच्या रिपोर्टमुळे. पण कसे असते काहीही झाले तरी जितं मया किंवा गिरा तो भी टांग उपर ही आपटर्डांची प्रवृत्ती जायची नाही.
रच्याकाने तुमचे महापुरूष लालू यादव सामील असलेल्या आघाडीला बिहारमध्ये पाठिंबा देत आहेत त्याचे काय?
तुमचा भ्रष्टाचारविरोधी असल्याचा बुरखा टराटरा फाटला आहे हे मान्य करा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 11:02
नवीन
>>> तेच म्हटले हे आपटर्ड ही बातमी येऊनही कुठे गायब आहेत.
हे आपटार्ड आपण देणार असलेली बातमी न वाचताच, केवळ शीर्षक बघून इथे लिन्क देतात. नंतर मिपावरील एखाद्या सदस्याने लिंकमधील बातमी पूर्ण वाचून केजरीवाल आणि कंपनीचा खोटारडेपणा उघडकीला आणल्यानंतर हे आपटार्ड कोणताही प्रतिवाद न करता पुढील काही दिवस अज्ञातवासात जातात. थोड्या दिवसांनी पुन्हा येऊन नवीन लिंक देऊन निघून जातात.
यांनीच काही आठवड्यांपूर्वी असा दावा केला होता की दिल्लीचे पोलिस आआपच्या नेत्यांना मारण्याचा प्रयत्न करीत आहेत व आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी एका चित्रफीतीची लिंक दिली होती. यांच्या दाव्यानुसार आआपचे दिलिप पांडे बोलत असताना पोलिसांनी त्यांच्यावर व्हॅन घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. मी ती चित्रफीत पूर्ण पाहिल्यावर असे उघडउघड दिसून आले की ती चित्रफीत वेगवेगळ्या २-३ चित्रफितींचे तुकडे जोडून व एडीट करून मॉर्फ केलेली आहे. दिल्ली पोलिसांवर म्हणजेच पर्यायाने भाजप सरकारवर खोटे आरोप करण्यासाठी आआपवाल्यांनीच ती बनावट चित्रफीत तयार केली. हे मी सविस्तरपणे मांडल्यावर हे आपटार्ड इथून गायब झाले ते काल उगवले.
तुम्ही वर जी माहिती लिहिली आहे ती वाचल्यावर हे आता पुढील काही दिवस मिपावर फिरकणार नाहीत. २-३ आठवड्यांनी पुन्हा एकदा येऊन नवीन लिंक देऊन गायब होतील.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/20/2015 - 16:57
नवीन
केंद्रात मोदींना रोखायला केजरीसाहेब राज्यात लालुंशी आघाडी करत आहेत. हाए का नाय डोक्यालिटी :)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 08/22/2015 - 11:04
नवीन
अहो नांदेडिअन, एक महत्वाची बातमी द्यायला तुम्ही विसरलातच की.
Arvind Kejriwal’s Aam Aadmi Party had nothing to do with CAG audit of discoms
http://www.financialexpress.com/article/industry/companies/arvind-kejriwals-aam-aadmi-party-had-nothing-to-do-with-cag-audit-of-discoms/45224/
याचे कारण दिल्लीतील डिस्ट्रीब्युशन कंपन्यांचे कॅग ऑडिट करायचा निर्णय शीला दिक्षित यांच्या सरकारने २०११ मध्ये घेतला होता. आणि हे खुद्द दिल्ली सरकारचे वकिल राजीव धवन यांनी म्हटले आहे असे या बातमीत दिले आहे.
एक तर या ऑडिटमुळे केजरीवाल तोंडावर जोरदार आपटलेले आहेतच. आणि हे ऑडीट शीला दिक्षित यांच्या सरकारने करायचा आदेश दिला होता तरी त्याचे श्रेय लाटायचा प्रयत्नही केजरीवाल आणि आपटर्ड गॅन्ग कडून झाला आहे. याविषयी तुम्ही काहीही लिहाल ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. आतापर्यंत विविध चर्चांमध्ये अनेक मिपाकरांनी काही स्पेसिफिक प्रश्न विचारले होते तरी त्याला बगल देऊन मधूनमधून मिपावर अवतीर्ण होऊन नव्यानव्या लिंका देण्याव्यतिरिक्त तुम्ही फार काही सकारात्मक चर्चा केल्याचे ऐकिवात नाही. तेव्हा तुम्ही याविषयी काही लिहिणार नाहीच ही खात्री आहेच. पण तरीही आम आदमी पक्षवाले नक्की कोणत्या थराला जाऊ शकतात आणि किती ढोंगी होऊ शकतात हे इतर मिपाकरांसाठी लिहित आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 10:18
नवीन
हा माणूस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एवढा हपापलेला आहे की स्वतःचा उदोउदो करून घेण्यासाठी याने स्वातंत्र्यदिन सुद्धा सोडला नाही.
__________________________________________________________________________________________

- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 11:02
नवीन
अशी नावं बनवणं वगैरे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत बसून आदेश दिलेला असतो का?
माझ्या मते असं स्वतः कुणी सांगत नसावं.
कुणातरी स्वामीनिष्ठ कार्यकर्त्याला वाटलं असेल कि स्वातंत्र्यदिनी आपण जास्त शोबाजि करु.
त्यानं केली असणार शाळकरी पोरांना नि त्यांच्या मास्तर, हेडमास्तरांना धरुन.
ऐन कार्यक्रमात कोण म्हणणार बाबांनो माझं नाव का लाल करताय म्हणुन?
यात केजरीवाल बद्दल प्रेम वगैरे काही नाहीये, एक साधा प्रश्न आहे.
एवढ्या मायन्युट डीटेल मध्ये मुख्यमंत्र्यांशी कार्यक्रम डिस्कस होतो का असा. (नाव 'त्यांचं' असल्यानंतर व्हायलाच हवा खरं तर) मला 'आपटे/ टार्ड' म्हणू नये.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 11:10
नवीन
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/20/2015 - 11:13
नवीन
पण १५ ऑगस्टला हा प्रकार लक्षात आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या नाहीत आणि जे काही चालू आहे ते बघत राहिले याचाच अर्थ त्यांचा मूक पाठिंबा होता असे म्हटले तर काय चुकले? शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 'अरविंद केजरीवाल' हे नाव त्या रंगाचे कपडे घालून तयार केले आहे. तेव्हा मुलांनी रॅन्डमली बसावे म्हणजे कुठचाच पॅटर्न दिसणार नाही एवढे म्हणता येत नव्हते का माननीय मुख्यमंत्र्यांना? तसे करणे शक्य नसेल (समजा इतकी मुले उठणार आणि इतरत्र बसणार म्हणजे बराच गोंधळ होईल या शक्यतेमुळे) निदान भाषणात तरी हा प्रकार परत होणार नाही हे बघा असे सांगता आले असते की नाही?
आणि या माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करून बघाच--कसे एकामागोमाग एक हिंदी सिनेमे बघायला वेळ आहे त्यांच्याकडे.इतका वेळ आहे त्यांच्याकडे. मग शाळेला सूचना ते वेळ नाही म्हणून देणार नाहीत हे तरी शक्य वाटत नाही.अन्य कुठले कारण असले तर माहित नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 08/20/2015 - 11:17
नवीन
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 08/20/2015 - 11:19
नवीन
मग याच न्यायाने शीला दिक्षित यांच्या कार्यकाळातही भ्रष्टाचार होता मग केजरीवालांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार असला तर काय बिघडले असेही म्हणता येईल. बरोबर की नाही कपिलमुनी?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 08/20/2015 - 11:32
नवीन
श्रीगुरुजींनी असा आरोप केला होता. आणि या गोष्टी मुख्यमंत्र्यांना विचारून करत नाहीत. ही दिल्ली मधील एक प्रथा आहे आणि श्री गुरुजींनी "स्वतःचा उदोउदो" करण्याचा आरोप केला होता.
आणि इथे भाजपाचा मुख्यमंत्री असता तरी हीच प्रथा पाळली गेली असती आणि केजरीवाल यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिला स्वातंत्र्यदिन होता. या प्रकारबद्दल त्यांनी नंतर ट्विटर वर लिहिले आहेच.
"Some school students made visual formation of my name during independence celebrations. I was not at all aware that students wud do this .I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) ,I agree this is a wrong practice. I will stop this practice forthwith "
भ्रष्टाचार आणि मानवंदना यातला फरक समजून घ्या
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 16:53
नवीन
>>> ही दिल्ली मधील एक प्रथा आहे
मुनीवर्य,
प्रथा? ही प्रथा नक्की कधी सुरू झाली आणि किती वर्षांपासून सुरू आहे?
१९९३-१९९८ या काळात दिल्लीत भाजपचे सरकार होते. त्यात सुरवातीला मदनलाल खुराना आणि नंतर साहेबसिंग वर्मा हे मुख्यमंत्री होते. त्या काळातले असे फोटो दिसले नाहीत. बहुतेक भाजपही ही जुनी प्रथा त्या ५ वर्षात मोडीत काढली असावी.
किंवा, ही प्रथा काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली असावी.
बरोबर ना मुनीवर्य?
>>> आणि इथे भाजपाचा मुख्यमंत्री असता तरी हीच प्रथा पाळली गेली असती
कशावरून? भाजपचे मुख्यमंत्री ५ वर्षे असताना असे काही झाल्याचे दिसत नाही.
>>> आणि केजरीवाल यांचा हा मुख्यमंत्री म्हणून पहिला स्वातंत्र्यदिन होता.
पहिला स्वातंत्र्यदिन म्हणजे पहिली मंगळागौर, पहिला पाळणा असे काही होते का की ज्यामुळे लगेच स्वतःचे कौतुक करून घ्यावा?
>>> या प्रकारबद्दल त्यांनी नंतर ट्विटर वर लिहिले आहेच.
"Some school students made visual formation of my name during independence celebrations. I was not at all aware that students wud do this .I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) ,I agree this is a wrong practice. I will stop this practice forthwith "
"I was not at all aware that students wud do this" - असत्य
".I am told it has been a practice in del govt to form visual formation of whoever chief guest is (CM or LG) " - असत्य
अर्थात अंतर्बाह्य खोटारडे असलेल्या केजरीवालांकडून सत्याची अपेक्षाच नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 17:06
नवीन
>>> भ्रष्टाचार आणि मानवंदना यातला फरक समजून घ्या
मानवंदना आणि मॅनेज केलेला स्वतःचा उदोउदो यातला फरक समजून घ्या.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 13:00
नवीन
कपिल धन्यवाद!
एक प्रथा आहे. विषय मिटला.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/20/2015 - 13:04
नवीन
भ्रष्टाचार देखील प्रथा आहे. :(
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 13:16
नवीन
केजरीवाल हा इसम माझ्या डोक्यात प्रचंड जातो.
फक्त आत्ताच्च याच्च परेडबाबतच्च प्रथा हाच्च एवढाच्च विषयच्च आहे!
धन्यवाद.
भ्रष्टाचाराबाबत काही बोलायचं नाही.
तरीही तुमच्या नवीन धाग्यावर काही दोन चार चांगले प्रतिसाद तुम्हाला देईन एवढं नक्की सांगतो.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 16:54
नवीन
>>> एक प्रथा आहे. विषय मिटला.
अशी कोणतीही प्रथा नव्हती.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 17:10
नवीन
ओके केजरीवाल खोटं बोलले. नेहमीच बोलतात. विषय संपला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 19:14
नवीन
बरोब्बर. विषय संपला.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/20/2015 - 17:23
नवीन
असेच अजून काही फोटो...

- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 08/20/2015 - 19:16
नवीन
मोदी स्वतःचाच उदोउदो करीत आहेत हे स्पष्ट दिसत आहे. कारण, जय आणि भारत ही मोदींचीच पाळण्यातील नावे आहेत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 20:30
नवीन
बास की राव! थोडक्यात गम्मत असते.
विकास रावांनी ती चित्रं मुद्दाम फरक दाखवून देण्यासाठीच टाकलीत. विकास यांचे लेखन कधीतरी वाचावं म्हणजे त्यांचा झुकाव समजेल.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/20/2015 - 21:24
नवीन
आम्ही नाही झुकत जा! ;)
टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते।
सत्य का संघर्ष सत्ता से,
न्याय लड़ता निरंकुशता से,
अँधेरे ने दी चुनौती है,
किरण अन्तिम अस्त होती है।
दीप निष्ठा का लिए निष्कम्प
वज्र टूटे या उठे भूकम्प,
यह बराबर का नहीं है युद्ध,
हम निहत्थे, शत्रु है सन्नद्ध,
हर तरह के शस्त्र से है सज्ज,
और पशुबल हो उठा निर्लज्ज।
किन्तु फिर भी जूझने का प्रण,
पुन: अंगद ने बढ़ाया चरण,
प्राण-पण से करेंगे प्रतिकार,
समर्पण की माँग अस्वीकार।
दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते;
टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते।
----------------
सन्माननीय कवीराज सांगायला हवेत का?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 08/20/2015 - 21:49
नवीन
म्हणजे हे विनोदी काव्य आहे तर :)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 08/20/2015 - 21:54
नवीन
अरे काय हे? अर्धवटराव, नका करु असं.
आणि विकासराव बघतोय बरका. मागच्या १६ मे पासून बघतोय तुमचं वागणं.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 08/20/2015 - 22:04
नवीन
बघाना! मी कवीराजांना "सन्माननीय" म्हणले आहे. ते विनोदी कसे असेल? :)
विकासराव बघतोय बरका. मागच्या १६ मे पासून बघतोय तुमचं वागणं.
जो पर्यंत गावात शोभा होत नाही तो पर्यंत हे वागणं चालू राहील. ;)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 08/20/2015 - 16:37
नवीन
प्रशांत निंबाळकर यांच्या चेपुवरुन साभार
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »