Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५

ग
गणेशा
Tue, 02/10/2015 - 09:37
🗣 255 प्रतिसाद
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अ‍ॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे) प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते.. -------------------- किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले. टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल ७० अ‍ॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे: १. दिल्ली जनलोकपाल बिल ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्‍यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात. २. स्वराज विधेयक स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते. ३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा- दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन. - भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील. याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे. ४. वीज बिल अर्धे - हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे. आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन. ५. वीज कंपण्यांचे ऑडिट 5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन . - ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ? ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते. ६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल. ७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे. ८. सोलर सिटी बनवण्याची योजना घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो. ९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन ११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण- पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी। १२. मुनक नहर मधुन पाणी- दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार १३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर - जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन १४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई - आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन १५ यमुना पुनर्जीवित- यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.

प्रतिक्रिया द्या
146692 वाचन

💬 प्रतिसाद (255)
व
विकास Mon, 02/16/2015 - 20:07 नवीन
#AAP bans Aam Aadmi: No cameras in #Delhi Assembly and no public access to Secretariat. #AAPRaj हे पण खरे दिसते आहे. त्यावरून पत्रकारांनी बहीष्कार टाकला आहे. फक्त तशा ठळक बातम्या येत नाहीत कारण हे मोदी सरकार नाही! ;) सचिवालयाच्या बाहेर पत्रकार परीषद घेत असताना सिसोदीयांना अवघड प्रश्न आणि या निर्णयाबद्दल विचारले तर त्यांनी सरळ निघून जाणे पसंद केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रीगुरुजी Tue, 02/17/2015 - 08:17 नवीन
केजरीवालांना शपथ घेऊन अजून ३ दिवस सुद्धा झाले नाहीत. त्यांना किमान १-२ वर्षे तरी वेळ द्यायला हवा. नंतरच मूल्यमापन सुरू करता येईल. दिल्लीत वाय-फाय, सीसीटीव्ही इ. गोष्टी पूर्णत्वाला जायला संपूर्ण ५ वर्षे लागतील. अर्थात त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची योजना पहिल्या वर्षात सुरू व्हायला हवी. वीजबिलात ५० टक्के सवलत, फुकट पाणी इ. योजना काही महिन्यातच पूर्णत्वाला नेता येतील. परंतु भर उन्हाळ्यात वीजेची व पाण्याची मागणी खूप वाढलेली असताना आणि याच काळात वीज व पाण्याची टंचाई असताना ही आश्वासने कितपत प्रमाणात पूर्ण होतील याविषयी साशंक आहे. पण तरीही केजरीवालांना आश्वासने पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Mon, 02/16/2015 - 20:09 नवीन
आपने दिल्लीतल्या रहीवाशी भागातील (अनधि़कृत) बांधकमे पाडण्यास मनाई करणारे आदेश दिले आहेत. फक्त गंमत अशी आहे की जमीन दिल्लीसरकारच्या ताब्यात नसल्याने त्यांचे त्यावर अधिकार (पक्षि: jurisdiction) नाही. ;)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 02/17/2015 - 07:13 नवीन
खरे तर अनधिकृत बांधकामे अधिकृत करुच नयेत आणि काही कारणास्तव करावी लागली तरी त्यासाठी बिल्डर किंवा रहिवाशी जे जबाबदार आहेत त्यांना दंड केला पाहिजे असे माझे मत. आप असो वा भाजपा दोघांनीही अनधिकृत बांधकामे नियमित केली जातील हे आश्वासन दिले होते, लोकल पृओब्लेम वेगळॅ असु शकतील परंतु यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही अशी ग्वाही ही आली पाहिजे असे वाटते. दूसरे, दिल्ली सरकार - केंद्र सरकार असा खेळ कीतीही नको वाटला कींवा मजेशीर वाटला तरी तो होणारच आहे. जसे भाजप ला काही गोष्टी मंजुर करता येत नाही कारण राज्यसभेत त्यांचे बहुमत नाही. त्यामुळे लोकसभेत बहुमत पण राज्यसभेत नाही, तसेच दिल्ली सरकारचे आहे, सत्ता दिल्लीत पण बरेच निर्णय केंद्राकडे अवलंबुन. दिल्लीला राज्य दर्जा दिला पाहिजे असे माझे मत. फुटकळ विदर्भ वेगळाअ करणारच पेक्षा दिल्लीला राज्य दर्जा दिलेला आवडेल. असो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ह
हाडक्या Tue, 02/17/2015 - 12:21 नवीन
फुटकळ विदर्भ
विदर्भाला फुटकळ म्हणणारे तुम्ही कोण हो टिकोजीराव ?? *aggressive*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गणेशा Tue, 02/17/2015 - 18:16 नवीन
विदर्भ वेगळा करण्याच्या फुटकळ( फुकट तोंडाच्या वाफा सोडण्यापेक्षा) घोषणेपेक्षा असा अर्थ घ्या फुटकळ, विदर्भ वेगळा करण्याच्या घोषणेपेक्षा दिल्लीला राज्याचा दर्जा द्यावा असे म्हणायचे होते. बाकी स्वताच्या राज्याच्या अखंड पणाबद्दल अभिमान आहेच. त्यामुळे वेगळा अर्थ काढु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ग
गणेशा Tue, 02/17/2015 - 18:25 नवीन
तरीही, वाद होणार असेल तर संपादक मंडळाने वरील मुळ पोस्ट निट करावी किंवा उडवुन टाकावी ही विनंती. लिहिण्याचे हे होते की .. फुटकळ, विदर्भ वेगळा करणारच असल्या पेक्षा दिल्ली वेगळे राज्य केले तर छान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/17/2015 - 18:43 नवीन
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा हा खूप बागुलबुवा केलेला मुद्दा आहे असे माझे मत आहे. उदा. कायदा व सुव्यवस्था हा विषय खूप त्रासदायक विषय ठरू शकतो. सदर विषय एखाद्या राज्यसरकारकडे नसल्यास इतर महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करता येते. बरेचदा सर्व उपाय करूनही अतिरेकी घटना घडतात त्यामुळे इतर कारभारावर परिणाम होतो. सध्याच्या रचनेमध्ये काही वावगे घडल्यास जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. दिल्लीच्या बाबतीत नव्या राज्यसरकारने आपल्या कारभारावर, प्रशासकीय सुधारणांवर पहिली काही वर्षे लक्ष केंद्रीत करावे. त्यात नवे आदर्श बनवून दाखवावेत अन मग पूर्ण राज्याच्या दर्जाची लढाई सुरू करावी. थोडक्यात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/17/2015 - 18:58 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
न
नांदेडीअन Wed, 02/25/2015 - 20:17 नवीन
- वीज बिलात ५०% कपात. - महिन्याला २०,००० लिटर पाणी मोफत. - आत्तापर्यंत २५०० ई-रिक्शा लायसन्सचे वाटप. (last mile connectivity) - भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन - वीज वितरण कंपन्यांच्या ऑडिटची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी शशिकांत शर्मा (CAG) यांच्याशी चर्चा. - Affordable Healthcare या आश्वासनाअंतर्गत स्वाईन फ्लू च्या टेस्ट्ससाठी कुणीही ४,५०० रूपयांपेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत असा आदेश. - नवीन धोरण लागू होईपर्यंत जुन्या झोपड्या हटवण्यात येणार नाहीत. - कंत्राटी कामगारांना कामावरून काढण्यास बंदी. १ लाख कामगारांना फायदा. - महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसमध्ये एक होमगार्ड तैनात करण्याच्या दृष्टीने रोडमॅप बनवण्याचे आदेश. - Delhi Subordinate Services Selection Board मार्फत २००७ पासून प्रलंबित असलेल्या २०,००० जागा भरण्यात येणार. (employment) आप सरकारने सत्तेत आल्यापासून ११ दिवसांच्या आत जाहीरनाम्यातली ही १० आश्वासनं पूर्ण केली आहेत किंवा त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. यासोबतच जनतेची कामे करण्यासाठी फक्त प्रामाणिकपणा आणि इच्छाशक्ती लागते हेसुद्धा या सरकारने दाखवून दिले आहे. 'सब्सिडीसाठी पैसा कुठून येणार ?' सारखे बालिश प्रश्न कृपया विचारू नयेत. केजरीवाल आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी या प्रश्नाचे उत्तर हजार वेळा दिले आहे. युट्युबर १७६० व्हिडिओ मिळतील, त्यापैकी कोणताही एक बघण्याची तसदी घ्यावी. सर्च करण्यासाठी वेळ नसेल तर मीच देतो लिंक. http://tiny.cc/aapsubsidy पाणी आणि विजेसाठी मिळून दिल्ली सरकारने प्रत्येक वर्षी १६०० ते १७०० करोडची सब्सिडी देण्याचे ठरवले आहे. दिल्लीचे वार्षिक बजेट ४० हजार करोडचे आहे, त्यामुळे सरकारवर त्याचा फार बोजा पडणार नाही. (बाय द वे, ज्याचा सामान्य नागरिकाला काहीही फायदा नाही, अशी मूर्ती उभारण्यासाठी ३ हजार करोड कुठून आले हे विचारले का कधी ?) असो, भक्तांनी पांचट जोक्स फॉर्वर्ड करणे आणि आपल्याच देशबांधवांना (दिल्लीकरांना) शिव्या घालणे चालू ठेवावे. अजून ५ वर्ष हेच करायचे आहे आपल्याला. ;)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 02/25/2015 - 21:01 नवीन
दिल्लीचे वार्षिक बजेट ४० हजार करोडचे आहे
ओह्ह... बजेट ४० हजार करोडचे आहे होय... मला वाटलं ४० हजार सर्प्लस असतात दिल्लीकरांकडे.
(बाय द वे, ज्याचा सामान्य नागरिकाला काहीही फायदा नाही, अशी मूर्ती उभारण्यासाठी ३ हजार करोड कुठून आले हे विचारले का कधी ?)
ह्म्म्म.. मुर्ती बहुतेक कावळे आदि पक्षांना प्रातर्विधी करायला सोय म्हणुन उभी केली जाणार आहे, हा किती उदात्त विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
विकास Wed, 02/25/2015 - 22:05 नवीन
आप सरकारने सत्तेत आल्यापासून ११ दिवसांच्या आत जाहीरनाम्यातली ही १० आश्वासनं पूर्ण केली आहेत किंवा त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. उत्तम! त्यासाठी आप चे कौतुकच आहे! आणि यात खरेच तिरकसपणा नाही, मात्र... 'सब्सिडीसाठी पैसा कुठून येणार ?' सारखे बालिश प्रश्न कृपया विचारू नयेत. हा प्रश्न विचारला जाईलच आणि त्यात कुठेही बालीशपणा असण्याचा संभव नाही. जेंव्हा फुकटेगिरीची संस्कृती रुजवली जाते तेंव्हा कुठल्यान्कुठल्या रुपाने त्याची परतफेड करावीच लागते. कारण शेवटी म्हणतात ना, पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून. तरी देखील परीणाम बघण्यासाठी किमान दोन वर्षे याबाबत वेळ देऊयात. कधीकाळी कम्युनिस्टांनी आपापल्या देशात असेच काहीसे केले - सोव्हिएट रशिया सकट बरेचसे कोसळले तर चीन सारख्यांनी हळूहळू शिड भांडवलवादाकडे झुकवले आणि आपल्याला काही उत्तर कोरीया होयचे नाही तेंव्हा त्याचा प्रश्न नाही... बाय द वे, ज्याचा सामान्य नागरिकाला काहीही फायदा नाही, अशी मूर्ती उभारण्यासाठी ३ हजार करोड कुठून आले हे विचारले का कधी ? मी काही पुतळ्यांचा पंखा नाही त्यामुळे त्याचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. पण एकंदरीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ची संकल्पना पाहीली तर तो एका धंदेवाईक व्यक्तीने चालवलेली उद्योगनिर्मितीची शक्कल आहे. कारण त्यात नुसता एक पुतळा नाही तर खालील गोष्टींचा विचार देखील केला आहे. World’s best Exhibition narrating the story of Indian National Movement, the unification of India and Sardar’s contribution Memorial Garden Bridge connecting Sadhu Island with the mainland Memorial and Visitors Center Improved Roadway between the Statue and Kevadia Parking and Transport Site Hotel and Convention Center Development of banks of River Narmada up to Bharuch Development of road & rail, and tourism infrastructure Schools, colleges and universities for tribal development Education Research Centre and Knowledge City Tourism corridor from Garudeshwar to Bhadbhut Clean Technology Research Park & Agriculture Training Centers - See more at: http://www.statueofunity.in/execution.html#sthash.9CYtUnwJ.dpuf असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 02/26/2015 - 04:38 नवीन
@नांडेदीयन मुळात भाजप समर्थक (सर्व नाही ) भाजप ला समर्थन धार्मिक मुद्दे , धर्मभावना गोंजारणारे भावनिक मुद्दे , अल्पसंख्यांचा रेच मोडणे या विषयावर समर्थन देत असतात (वरून कितीही विकासाच्या कळकळीचा आव आणत असले तरी ). आणि केजरीवाल या असल्या भंपक मुद्द्यांना भाव देणार नाही हे उघड आहे . त्यामुळे केजरीवाल ने सगळी आश्वासन पूर्ण केली तरी ते केजरीवाल समर्थक बनणार नाहीत . त्यांच्या वरील भावनिक गरजा पूर्ण करायला साक्षी महाराज , साधव्या , अमित शाह कंपनी समर्थ आहेच . बाकी आप सरकारचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 02/28/2015 - 09:31 नवीन
दिल्ली सरकारने मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा १ करोड रूपयांची आर्थिक मदत आणि परिवारातील एकाला सरकारी नौकरीत घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या शहिदांसाठी खरं तर १ करोडसुद्धा खूप कमी आहेत, पण ही एक चांगली प्रथा सुरू केली आहे दिल्ली सरकारने. मला एक प्रश्न पडलाय. केजरीवालला देशद्रोही म्हणणारे आणि स्वतःला उच्च कोटीचे देशभक्त ठरवून मोकळे झालेले अशा वेळी नेमके कुठे असतात ? बारामतीमध्ये ? मुफ्ती मोहम्मद सईदसोबत ? यादवांच्या लग्नात ? Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/28/2015 - 13:04 नवीन
>>> दिल्ली सरकारने मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा १ करोड रूपयांची आर्थिक मदत आणि परिवारातील एकाला सरकारी नौकरीत घेण्याची घोषणा केली आहे. आपल्या शहिदांसाठी खरं तर १ करोडसुद्धा खूप कमी आहेत, पण ही एक चांगली प्रथा सुरू केली आहे दिल्ली सरकारने. मुखपृष्ठावर बातमी आली नाही तरी यंत्रणा काम करत असते हो. The CRPF DIG had said the families of the slain personnel will receive around Rs 80 lakh each including Rs 20 lakh of insurance money and Rs 10 lakh ex-gratia declared by the Bihar government.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 02/28/2015 - 16:34 नवीन
राहुलबाबा नाहि का गरिबाघरची भाकरी खायचे आणि श्रमदानाचे फोटो मिरवायचे... शेवटी कितीही मोठी पोस्ट मिळाली तरी नौटंकी करण्याची हौस भागायला पाहिजे ना... न्हाव्याकडे जा-काढ फोटो, सकाळी फिरायला जा - काढ फोटो... आगे आगे बघु होतय काय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Sun, 03/01/2015 - 13:25 नवीन
Just inaugurated 50MGD Water Treatment Plant in Dwarka. Congrats to 13 lakh ppl who will get clean water now. Congrats 2 officers who did it 4:47 PM - 1 Mar 2015 Inaugurated a 15.5 ML underground reservoir in janakpuri. It will provide clean water to 1.7 lakh ppl. Congrats 2 officials who did it. 5:17 PM - 1 Mar 2015 अरविंद केजरीवाल यांचे आजचे ट्विट्स.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 03/01/2015 - 16:12 नवीन
Rome wasn't built in a day, they say. But here is someone building New(er) Delhi in a week!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Sun, 03/01/2015 - 16:42 नवीन
>>> अरविंद केजरीवाल यांचे आजचे ट्विट्स. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून जेमतेम २ आठवड्यांच्या आतच केजरीवालांनी तब्बल २ मोठे स्वच्छ पेयजल प्रकल्प पूर्ण करून सुरू केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!!! Congrats 2 नांदेडीअन as well for sharing Kejariwal's tweets and constantly updating us about Kejariwal's achievements!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन गुरुवार, 03/12/2015 - 13:52 नवीन
आप संबंधीच्या नकारात्मक बातम्या तर सगळीकडेच प्रकाशित होतात. त्यांचा प्रसार आणि प्रचारसुद्धा सगळीकडे केल्या जातो. काही दिवसांनी ‘केजरीवालच्या दूधवाल्याच्या म्हशीने दूध द्यायचे बंद केले. पक्ष आता संपणार !’ अशा बातम्या आल्या तरी आश्चर्य वाटायला नको. पण कधी विचार केलाय का, की आपचे एव्हढे वाईट चित्र रंगवूनसुद्धा लोक त्यांच्यावर इतके प्रेम का करतात ? नसेल, तर खाली दिलेल्या लिंकवर जा. दिल्लीतल्या लोकांनी परत आपला का निवडून दिले या गोष्टीचा हे स्क्रिनशॉट्स बघून तुम्हाला थोडाफार तरी अंदाज नक्कीच लावता येईल. http://imgur.com/a/EJkub हे सगळे स्क्रिनशॉट्स मी आप आमदारांच्या ट्विटर हॅंडलवरून घेतले आहेत. बरेच आमदार ट्विटर किंवा फेसबुकवर नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती अजून उपलब्ध झाली नाही. पक्षांतर्गत कलहाचा दिल्लीतील लोकांवर काहीही फरक पडत नाहीये. त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तितक्याच तत्परतेने सोडवल्या जात आहेत. त्यांचे आमदार त्यांच्यासाठी आजही सहज उपलब्ध असतात. त्यांचे आमदार आजही त्यांनाच विचारून पैसे खर्च करत आहेत. खोटे आरोप, बिनकामाची चिकलफेक आणि फक्त भाषण देण्याऎवजी कॉंग्रेस/भाजपच्या नेत्यांनीसुद्धा जनतेची कामे करावीत जेणेकरून पुढच्या निवडणूकीत ‘मार्केटिंग’वर अब्जावधी रूपये खर्च करावे लागणार नाहीत. कामं करा, निवडून या. इतके सोप्पे आहे ! काल कुमार विश्वास एका चॅनलवर म्हणाले, "जिन लोगों का दिल्ली में अस्तित्व खत्म हो चुका है, जिन्हे ० और ३ सिट्स मिली हैं, जिनको पुछनेवाला कोई नहीं था, वो आज टी.व्ही. चॅनलों पर हमारी वजह से ही आ पा रहे हैं ।" खरंच आहे ना ! पक्षांतर्गत लोकशाही कॉंग्रेस आणि भाजपाकडून शिकावी इतकेही वाईट दिवस आले नाहीत अजून आम आदमी पार्टीवर. सध्या फक्त एव्हढीच माहिती पुरवतो. आपने पहिल्या १० दिवसांत जाहीरनाम्यातली १० आश्वासनं पूर्ण केल्याची माहिती मी अगोदरच दिली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे अफवा जास्त लवकर पसरते, आणि खरी माहिती लोकांपर्यंत पोहचतच नाही. असो, तुम्ही आयुष्यभर भक्त बनून राहा किंवा आपचे अंध विरोधक बनून राहा, फक्त तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहचावी म्हणून हा खटाटोप करतोय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 03/13/2015 - 11:34 नवीन
Image removed. शेवटी सर्वाम्चे पाय मातीचेच
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 03/13/2015 - 18:38 नवीन
३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड

Image removed.

  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 03/16/2015 - 09:36 नवीन
>>> ३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड या रिपोर्ट कार्डमुळे खालील रिपोर्ट कार्ड आठवले. http://www.misalpav.com/comment/619966#comment-619966
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Fri, 03/13/2015 - 18:42 नवीन
POWER: · 50% reduction in electricity tariffs for consumption up to 400 units for domestic consumers. · White Paper on Electricity commissioned under former DERC Chief Bijendra Singh. WATER: · Free lifeline water up to 20k liters per month for every household with a metered connection. This facility has been extended to group housing societies as well. · Sewerage charges have been waived as well. · Amnesty scheme announced for domestic consumers to pay their outstanding dues till March 31. Late user charges have been waived off till then. WOMEN SAFETY: · The Delhi government has asked the Delhi Police for a list of dark spots across the national capital. · Exercise is on to ensure marshals in DTC buses from 6 PM to 12 midnight. · Government is working on a plan to allow SDMs to conduct surprise checks in buses with powers to take appropriate action against eve-teasers EDUCATION: · 200 private schools have been issued showcause notices for charging exorbitant fees. · Process for the installation of CCTVs in schools has begun. TRADERS: · In a major relief to city traders, the Delhi government has decided to allow “carry forward” of refund (input tax credit) of VAT and extend the date of filing R9 form. · Stamp vendor license will now be online. ADMINISTRATIVE REFORMS: · Birth/death & other certificates to be online from April 1 · Ration cards also to be online. ENVIRONMENT: · 66 surprise checks were conducted at pollution control centers and 18 were found to be not working properly. · 18 waste burning checks found waste being burnt in open places and warnings were issued. · 170 challans of overloaded vehicles was conducted, which are a major source of air pollution. OTHER DECISIONS : · Licences provided for 20,800 E-rickshaws in one month as compared to around 600 till now. · There were 1 lakh-stalled old-age pensions in the past. 30,000 cleared by the Delhi government and 20,000 will be done this month. · Anganwadi workers used to get Rs. 750 per month as rent for their Anganwadi premises, which have now been increased to Rs. 4-5 thousand per month. · Anganwadi material in now being purchased straight from FCI straight in place of open market, surplus money being utilized to provide fruits to children · Attention on Forensic labs · Mandoli Jail to be ready till October end · Redesigning of hospitals to increase their beds-capacity to allow poor people access to health care. · Health department conducted surprise checks on private labs to curb overcharging of Swine Flu tests beyond a cap of Rs 4500. · Free tests and medicines in all government hospitals for Swine Flu patients
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 03/14/2015 - 06:45 नवीन
where is the money come from ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Sat, 03/14/2015 - 07:45 नवीन
अरे देवा. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विकास Mon, 03/16/2015 - 15:09 नवीन
where is the money come from ? या प्रश्नाला काही अर्थ नाही... तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो? ;) आता उदाहरणादाखल - 50% reduction in power असे म्हणालात तर लक्षात येईल की यादव-भूषण यांची पॉवर कमी करून ते सहज साध्य करून दाखवले गेले आहे! Free wi-fi साठी जनतेला प्रश्न विचारले गेले आहेत... आता "What is the capex and opex required to create and operate public wi-fi? What could be a model that makes public wi-fi viable, sustainable and scalable in terms of usage, technology and financials," असल्या प्रश्नाला जनतेकडून जेंव्हा उत्तर मागितले जाते, तेंव्हा समजते की नुसत्या प्रश्नाचा अर्थ समजून घेतानाच किती लोकशिक्षण होणार आहे ते... शिवाय सरकारला पैसे न देता कन्सल्टन्सी सर्विस मिळते ते वेगळेच. याला क्रिएटिव्ह सोशालिजम म्हणतात! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ह
होबासराव Mon, 03/16/2015 - 15:43 नवीन
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: *yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Mon, 04/06/2015 - 08:35 नवीन
Image removed. पूर्ण भाषन https://www.youtube.com/watch?v=V4M76A-dTE4
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 04/06/2015 - 15:20 नवीन
आप स्टींग ऑपरेशनसाठी एक मोबाईल अ‍ॅप पण डेव्हलप करत आहे. त्यात जे काही रेकॉर्ड केले जाईल ते सर्व सरकारी सर्व्हरवर साठवले जाईल. थोडक्यात उद्या कुणी शिंकल्याचे चित्रिकरण अजून कोणी केले तरी अमुक एक व्यक्ती शिंकली हे सरकारला माहीती होणार . हे उदाहरण अर्थातच अतिसुलभीकरण आहे हे सांगायला नको. मुद्दा इतकाच की व्यक्तीगत स्वातंत्र्यावर हल्ला करणे चालू केले आहे. हे घटनेत बसते का? बसत असले तर घटना (आप साठी नाही पण एकंदरीतच) बदलणे गरजेचे आहे आणि घटनेच्या विरुद्ध असले तर आप ला न्यायालयीन चपराक बसणे गरजेचे आहे, आणि हो, त्यांनी तो निवडणूक खर्च सांगितला का न्यायालयाला?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 04/06/2015 - 15:27 नवीन
आणि हो, त्यांनी तो निवडणूक खर्च सांगितला का न्यायालयाला?
छे हो विकासराव, तुम्हाला आआपने न सांगितलेल्या खर्चाचीच पडली आहे. भाजपने ५१४ की ७१४ कोटींचा खर्च सांगितला त्याविषयी कधी बोलणार आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नांदेडीअन Wed, 04/08/2015 - 08:34 नवीन
Image removed. Aam aadmi to shape city budget http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Aam-aadmi-to-shape-city-budget/articleshow/46844001.cms
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 04/08/2015 - 15:54 नवीन
Speaking on 'Economic Development of Delhi' at the national conference of Confederation of Indian Industry, Kejriwal said, "We are going to do a small experiment to decentralize decision making." He said Rs 20 crore will be allotted to each constituency which will be divided into 40 segments. "Each of these segments will have a voters' meeting starting April 12. The next meeting will be held every subsequent Sunday. Voters will decide how to use the funds," he added. सभेत बसणारे मतदार आहेत का हे कसे कळणार? का ते मतदानपत्र बघून खात्री करून घेतले जाणार आहे? अर्थात हा फारच गौण मुद्दा आहे. त्यांना खरेच जनतेला सामील करून घेयचे असेल तर ते आमदारनिधीतला पैसा कुठे वापरावा या संदर्भात आधी करून बघू शकतात. तसे ते करणार आहेत का? कशाला पैसे खर्च करायचे हे असे जाहीर अधिकार दिले तर तेथे जनता येणार का कंत्राटदारांचे नोकर येणार ते कळेलच. तरी देखील माझी म्हणून एक भविष्यवाणी: हा "small experiment" किमान वरकरणी तरी सुरळीत झालेला दिसले. मग तात्काळ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि हार्वर्डची मुले येऊन या अनोख्या मुक्त लोकशाहीवर संशोधन करून पेपर छापतील (बेसिकली स्वतःच्या डिग्र्या करून शेवटी फायनान्स कंपन्यात जॉब्ज मिळवतील). सगळी कडे कसा माझा गुंडुला केजरी... म्हणून कौतुक होईल. आणि इथे एके लालूंचे ट्रिक सांगितल्याबद्दल आभार मानतील. अजून २-३ वर्षांनी बाहेर येईल नक्की काय होते ते - जसे रेल्वे मंत्रालयाचे झाले तसे. तो पर्यंत बिहार आणि अजून कुठे (कदाचीत मुंबई महानगरपालीका) काही जागा मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Wed, 04/08/2015 - 16:50 नवीन
त्यांना खरेच जनतेला सामील करून घेयचे असेल तर ते आमदारनिधीतला पैसा कुठे वापरावा या संदर्भात आधी करून बघू शकतात. तसे ते करणार आहेत का?
आम आदमी पक्षाचे आमदार हे अगोदरपासूनच करतात.
कशाला पैसे खर्च करायचे हे असे जाहीर अधिकार दिले तर तेथे जनता येणार का कंत्राटदारांचे नोकर येणार ते कळेलच.
सभेला येणार्‍या त्या परिसरातल्या नागरिकांना अनोळखी माणूस कोण आणि ओळखीचा कोण हे कळणार नाही का ? जर गरज नसलेल्या गोष्टींची मागणी करण्यात येत असेल, तर परिसरातले इतर नागरिक त्या गोष्टीचा विरोध करणार नाहीत का ? आणि असंही दिल्लीच्या जनतेने आप ला निवडून देऊन स्वतः किती फुकट्या मानसिकतेचे वगैरे आहोत हे सिद्ध केलेलेच आहे ना ? मग असे प्रश्न उपस्थित करण्यात काय अर्थ आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
अ
अर्धवटराव गुरुवार, 04/09/2015 - 04:01 नवीन
हे खरं असलं तरी जगात काहि चांगलं करतो म्हटलं तर डोकेफिरीला पर्याय नाहि हे देखील स्त्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
न
नांदेडीअन गुरुवार, 04/09/2015 - 09:30 नवीन
दिल्लीमध्ये रोडरेजच्या प्रकरणावरून एका माणसाची त्याच्या दोन लहान मुलांपुढेच मारहाण करून हत्या करण्यात आल्याची बातमी तुम्ही वाचलीच असेल. http://indianexpress.com/article/cities/delhi/road-rage-in-delhi-man-beaten-to-death-by-car-occupants/ दिल्ली भाजपाने या घटनेचे राजकारण करण्यात कसलीही कसूर ठेवली नाही. गुटखामॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, सतिश उपाध्याय यांनी तर असासुद्धा आरोप केला की मारहाण करणारे आपच्या एका आमदाराचे लोक होते. नंतर ते म्हणाले की आपचा आमदार गुन्हेगारांना पकडू नये म्हणून दिल्ली पोलिसांवर प्रेशर आणतोय.(दिल्ली पोलिस आणि आपमध्ये असलेले सख्य सर्वश्रुत आहे.) एव्हढे कमी की काय म्हणून आज सतिश उपाध्याय हे केजरीवालच्या घरापुढे मोर्चा घेऊन आले आहेत. बॅरिकेडवर चढून नारे देत आहेत. (ही अनार्की नसावी, नक्कीच शांततापूर्वक मार्गाने सुरू असलेले विरोध प्रदर्शन असेल.) मुद्दा हा आहे की आज भारतातल्या नवजात बालकालासुद्धा माहित झाले आहे की दिल्ली पोलिस ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. मग हे असे विरोध प्रदर्शन केजरीवालच्या घरापुढे करावे की केंद्रीय गृहमंत्र्याच्या घरापुढे ? दिल्ली पोलिस आणि ती मृत व्यक्ती राहिली बाजूला, मला तर वाटते की आप सरकारने दिल्लीमध्ये गुटखाबंदी केल्याचा वैयक्तिक राग आहे हा. मृत व्यक्तीचे वडिल आज कॅमेर्‍यापुढे येऊन बोलले. त्याचा हा व्हिडिओ. https://www.facebook.com/video.php?v=677648752334888
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन गुरुवार, 04/09/2015 - 12:06 नवीन
AAP launches app to get students’ feedback on government schools in Delhi http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-launches-app-to-get-students-feedback-on-government-schools-in-capital/
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sat, 04/11/2015 - 11:07 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sat, 04/11/2015 - 15:30 नवीन
Arvind Kejriwal has announced compensation of Rs 20,000 per acre (highest in the country) of damaged crops to farmers of Delhi. - News 20 हज़ार रूपए प्रति एकड़ का मुआवज़ा देकर तो ये केजरीवाल किसानों की आदत बिगाड़ रहा है, उन्हें मुफ्तखोर बना रहा है । कुछ सीखो हरियाणा की भाजपा सरकार से । 2, 3 और 6 रूपए के चेक दे रही है किसानों को, ताकि किसान खुद्दार बन सके, अपना ख्याल खुद रखें और नई तकनीक अपना सकें । पता नहीं अगले 5 साल में ये केजरीवाल कितनों की आदत बिगड़ेगा । - भावेश जयंत वालवेकर और सबसे महत्वपूर्ण बात - मुआवजे की रकम विधायक की उपस्थिति में गाँव की पंचायत तय करेगी, कोई सरकारी अफसर नहीं। - Dilip K. Pandey
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Sat, 04/18/2015 - 11:49 नवीन
Delhi will now vote and choose projects http://economictimes.indiatimes.com/articleshow/46966459.cms
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 05/20/2015 - 13:28 नवीन
LG cancels all postings, transfers done by Arvind Kejriwal in a week http://indiatoday.intoday.in/story/delhi-najeeb-jung-cancels-kejriwals-postings-and-transfers/1/439142.html अरे काय चाल्लंय हे ? केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालांना (आणि पर्यायाने केंद्र सरकारला) जर इतके अधिकार असतील, तर तिथे निवडणुका घेऊन जनतेने निवडलेले सरकार कशाला ठेवायचे ? राज्यपाल किंवा उपराज्यपाल या घटनात्मक पदांचा इतका गैरवापर तर कॉंग्रेसनेसुद्धा केला नसेल. नजीब जंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्यापेक्षा सरळ सरळ केंद्र सरकारनेच चालवावी दिल्ली. आम आदमी पार्टीला ७० पैकी ६७ सिट्स देणारी दिल्लीची जनता गेली उडत.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 05/20/2015 - 14:12 नवीन
The Chief Minister has a perfect right to a Chief Secretary of his choice This crisis has been created entirely by the Lt-Governor. It is abundantly clear that the Lt-Governor has exceeded his authority. - Rajeev Dhawan, Senior Supreme Court lawyer There is no provision granting to LG the power to act at his own discretion in the matter of appointment of the chief secretary. The question of any difference of opinion on that issue can arise only after the proposal is made by the council of Ministers and sent to the LG. Prior to that no question of difference of opinion can arise. - Indira Jaising, Former additional solicitor general LG cannot overrule powers vested in Delhi govt. It is violative of the Constitution. - Senior SC advocate & former Solicitor General
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
व
विकास Wed, 05/20/2015 - 18:33 नवीन
गजेंद्र सिंगचे काय झाले? सिसोदीया त्याबाबतीत गप्प का बसले? "लटक गया" हे ऐकूनही एके बोलतच का बसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
न
नांदेडीअन Wed, 05/20/2015 - 18:38 नवीन
कृपया 'केजरू के गुलाम' या टॉपिकवर एक चक्कर टाकावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ल
लॉर्ड फॉकलन्ड Wed, 05/20/2015 - 16:44 नवीन
दिल्ली हे नावापुरते राज्य आहे.तेथील विधानसभा ही एखाद्या मोठ्या शहराच्या महापालिकेसारखी आहे.तेथील राज्याला फारसे अधिकार नाहीत्.बहुतेक सर्व अधिकार केंद्राकडे आहेत.बहुतेक सर्व अधिकार उपराज्यपालांकडे आहेत्.तिथे निवडून आलेल्या सरकारला खूपच मर्यादित अधिकार आहेत.उपराज्यपाल जे करत आहेत त्यात घटनाविरोधी काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
ल
लॉर्ड फॉकलन्ड Wed, 05/20/2015 - 16:38 नवीन
The Chief Minister has a perfect right to a Chief Secretary of his choice
जर तसं असेल तर उपमुख्यमंत्री श्री. सिसोदिया यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून त्यात मुख्य सचिव पदासाठी शकुंतला गॅमलिन व परिमल रॉय ही दोन शॉर्ट लिस्ट केलेली नावे का पाठविली? जर मुख्य सचिव निवडीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते तर स्वतःच्या पसंतीच्या व्यक्तीला सचिवपदासाठी निवडण्याऐवजी दोन नावे उपराज्यपालांकडे का पाठविली?
There is no provision granting to LG the power to act at his own discretion in the matter of appointment of the chief secretary.
उपराज्यपालांनी त्यांच्याकडे निवडीसाठी जी दोन नावे पाठविली त्यातून एक निवडले आहे. यात घटनाबाह्य काय आहे?
LG cannot overrule powers vested in Delhi govt. It is violative of the Constitution.
आप सरकारने दिलेल्या दोन नावांमधून उपराज्यपालांनी एक नाव निवडले. हे केल्यामुळे घटनेच्या कोणत्या कलमाचे उल्लंघन झाले? जर मुख्यमंत्र्यांना मुख्य सचिव निवडीचा अधिकार असेल व हा अधिकार उपराज्यपालांना नसेल तर त्यांच्याकडे दोन नावे संमतीसाठी व निवडीसाठी पाठवून आप सरकारनेच घटनेचे उल्लंघन केले आहे.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Wed, 05/20/2015 - 18:32 नवीन
अहो जरा नीट वाचा तो अर्धवट स्क्रिनशॉट. त्यात स्पष्ट लिहिले आहे I propose Parimal Rai या इवल्याशा वाक्याचे मराठीत भाषांतर करावे लागेल का आता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉर्ड फॉकलन्ड
ल
लॉर्ड फॉकलन्ड गुरुवार, 05/21/2015 - 11:14 नवीन
I propose Parimal Rai
परिमल राय हे नाव प्रोपोझ करायचे होते तर त्यान्च्या बरोबरीने शकुन्तला गॅमलिनचे नाव का पाठविले? एकट्या परिमल रायचे नाव का पाठविले नव्हते? राज्यपालान्समोर दोन नावे आल्यावर व निवडीचे अधिकार त्यान्ना असल्यावर त्यान्ना योग्य वाटेल ते नाव राज्यपाल निवडणार. तो त्यान्चा अधिकारच आहे. शकुन्तला गॅमलिनचे नाव पाठविताना त्यान्च्याबद्दल काही तक्रार नव्हती आणि त्यान्चे नाव निवडल्यावर लगेच त्यान्चे आणि वीज कम्पन्यान्चे साटेलोटे कसे झाले? बिनबुडाचे आरोप रेटून करण्याची केजरीवालान्ची सवय मुख्यमन्त्री झाल्यावर सुद्धा गेलेली दिसत नाही आणि केजरीवालान्च्या गन्भीर चुकान्चे समर्थन करण्याची त्यान्च्या आन्धळ्या भक्तान्ची सवयही गेलेली दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
काळा पहाड Wed, 05/20/2015 - 19:28 नवीन
या बद्दल कुणाला अधिक वाचायचं असेल तर ते इथे आहे: http://indianexpress.com/article/explained/explained-delhi-cm-v-lg-much-lies-between-the-lines-of-statute-act-and-rules/99/ या लेखाचं सार असं आहे की दिल्लीसाठीचे नियम हे अस्पष्ट (आणि कदाचित असंवैधानिक सुद्धा) आहेत आणि त्यांत स्पष्टता नाही आणि वाचणारा त्यांचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे लावू शकतो. अर्थात जर हा मुद्दा केंद्राच्या दरबारी गेला तर केंद्राचा निर्णय दोघांवर बंधनकारक असेल.
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 05/22/2015 - 10:46 नवीन
केजरीवाल यांची प्रेस कॉन्फरन्स
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा