Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोवंशहत्या बंदी

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 03/03/2015 - 13:51
🗣 262 प्रतिसाद
अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ... एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ... दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ... तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती" चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता .. त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ... आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो ...विचार करकरून एक शीण येतो :D

प्रतिक्रिया द्या
44860 वाचन

💬 प्रतिसाद (262)
ज
जेपी गुरुवार, 03/05/2015 - 13:53 नवीन
द्विशतक निमीत्त धागाकरते आणी समस्त मिपाकरांचा सत्कार एक -एक प्लेट करंभ,परिवाप आणी पुरोडाश देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम वैदिक कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/05/2015 - 14:00 नवीन
त्यापेक्षा एक किलो बीफ द्या प्रत्येकाला. कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
स्वप्नांची राणी गुरुवार, 03/05/2015 - 14:04 नवीन
एक प्लेट परिवाप चालेल मला पण..वडापावसारखं वाटतय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 03/05/2015 - 16:54 नवीन
कृपा करा आणि पामरांना प्राकृत मध्ये समजवा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/05/2015 - 12:15 नवीन
तेच तर म्हणतो ना. आपले सरकार हिंदु नाही. त्यामुळेच या कायद्याला धार्मिक रंग द्यायचा आणि हे सगळे हिंदुंनी केले म्हणुन उर बडवायचा यात काय हशील? मी फक्त इतकाच मुद्दा मांडला आहे. तुमचा हा प्रतिसाद कोणाच्या प्रतिसादाला होता हे न कळाल्यामुळे परत तोच प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तिता Fri, 03/06/2015 - 09:58 नवीन
मी दुबईमध्ये राहतो. इथे पोर्क मिळते. पोर्क मिळणारा भाग सुपर मार्केटमध्ये वेगळा असतो आणि तिथे 'For Non-Muslims only' अशी पाटी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
H
hitesh Sun, 03/08/2015 - 15:22 नवीन
गाय व डुक्कर यात फरक आहे. डुक्कर खाऊ नका असा सरसकट आदेश काढला तरी कुणाला फरक पडत नाही. लोक डुक्कर पाळणारही नाहीत व कुणी खाणारही नाहीत. पण हिंदु धार्मिक लोक गाय खात नाहीत. पण त्याना दूध मात्र हवे असते. कुणीतरी गाय पाळायची , याना दूधही द्यायचे व ती भाकड झाली तरी त्या बिचार्‍याने स्वखर्चाने पाळही बसायची . शिवाय नवी दुभती गाय आणुन यांची पुन्हा सोयही करायची. धर्मांधता कुणाची व भुर्दंड कुणाला ! हा मुख्य मुद्दा आहे. गाय पवित्र मानणार्‍यानी भाकड गायी पाळायला सुरु कराव्यात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ह
हाडक्या Sun, 03/08/2015 - 15:56 नवीन
कुणी खाणारही नाहीत.
हे कसे काय हो ? कळाले ही नाही. म्हणजे पोर्क खातातच की लोकं. सॉसेज खातात. झालंच तर बर्‍याच भटक्या जमाती अजून ही डुक्कर पकडून मारून खातात की. बाकी शक्य असेल तर थोडे तटस्थ होऊन लिहा की राव. नाय तर तुमचे ते परखड मत आणि इतरांची ती अस्मिता हे काय पटत नाय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sun, 03/08/2015 - 19:23 नवीन
अहो ते पाकिस्तानातील डुक्करबंदी व इथली गोबंदी यासंदर्भात आहे.. वर कुणीतरी विचारले होते की की पाकिस्तानात सरसकट डुक्करबंदी आहे का ? त्याबाबत मी लिहिले आहे... तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही. पण गाय ही दुधाच्या हेतूने शेतकरी पाळतो.. ती गाय भाकड झाल्यावर त्यालाच पाळावी लागेल. गोप्रेमी लोक त्याला मदत करतील का ? या संदर्भात ते लिहिले आहे. आपल्याकडे बरेच लोक डुक्कर खातात . मला कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Mon, 03/09/2015 - 00:18 नवीन
तिथे सरसकट डुक्करबंदी केली तर फरक पडत नाही.
फरक पडतो. मी दारु पिणार नसेन तरीही सरसकट दारुबंदीच्या विरोधातच असेन. तशीच ही पण गोष्ट आहे. कोणाला खायचा असेल डुक्कर, तर बंदी करणारे कोण ? आणि तुम्ही त्याने फरक पडत नाही म्हणण्याचा काय संबंध ? अशी सरसकट बंदी चूकच (आणि चूक ला चूक म्हणा की स्पष्ट). तुमचा दांभिकपणा उघड पडतोय इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Mon, 03/09/2015 - 02:23 नवीन
बंदी असणे हे चूकच आहे , हे मान्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
क
कोंबडी प्रेमी गुरुवार, 03/05/2015 - 12:58 नवीन
संकलित करण्याची जरुरी आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सुचिकांत Wed, 03/04/2015 - 09:49 नवीन
या विषयावर जास्त विचार केलात तर डोक्याचा भुगा होईल. तात्विक दृष्टीकोनातून विचार करा - गाय बैल आपल्याकडे शेतीच्या कामासाठी वापरले जातात. आता आयुष्यभर त्यांच्याकडून काम करून घेणे आणि नंतर खाटकाला नेउन विकणे चूक. पण कर्जात बुडालेला शेतकरी करणार काय? मुंबईत कबुतरे वाढली तर रोगराई वाढली, उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी. आणि डोईजड झालेल्या गायी रोज मरत असतात. प्लास्टिक च्या पिशव्या खाउन! ३०-३५ किलो प्लास्टिक निघते पोटातून. नाहीतर भुकेने व्याकुळ होऊन मरतात. शेवटी दुर्दैवी मरण त्यांच्यासाठी ठरलेले आहे. या नाहीतर त्या बाजूने. पशुप्रेमी म्हणून एखादी व्यक्ती ३-४ भाकड गायी सांभाळू शकतो पण इथे हजारो गायींचा प्रश्न आहे! सरकारने कायदा करून चालणार नाही, त्या हजारो गायींचे काय करायचे, हे सुद्धा सांगावे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/04/2015 - 10:11 नवीन
उद्या गायी वाढल्या आणि रस्त्यात बसून त्यांनी वाहतुकीची कोंडी केली, एखादी रुग्णवाहिका वेळेवर इस्पितळात नाही पोहोचली तर जीव जाइल ना कोणाचा तरी. हे जरा अति खेचलेले वाटत नाही का ? रुग्णवाहिकेला अडवायला आपले रिक्षावाले, बाईक वाले , कारवाले सगळेच किती तत्पर असतात ... एखाद्या गाईने रुग्णवाहिकेला अद्व्ल्याचे ऐकिवात /पाहण्यात नाही ...किंबहुना हॉर्न वाजवल्यावर गाय चट्कन बाजूला होते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचिकांत
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:12 नवीन
अगदी अगदी....मेरे मन को भाया, मैं गाय काटके खाया छाप प्रकार वाट्टो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
स
सुचिकांत Wed, 03/04/2015 - 10:17 नवीन
यावर एकच उपाय आहे. देशातल्या मंदिरांनी गोशाळा उभ्या कराव्यात आणि सर्व भाकड गायींना सांभाळावे, नाहीतर प्रत्येकाने आपल्या पगारातून गो संवर्धनासाठी ठराविक रक्कम बाजूला काढून द्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 09:50 नवीन
गोभक्तांची मुक्ताफळे ऐकून बाकी मजा वाटली.
  • Log in or register to post comments
न
निनाद जोशी Wed, 03/04/2015 - 10:00 नवीन
ह्यात मुक्ताफळे कोणती होती हे जरा सांगू शकता का ज्यात अजिबात तथ्य नाही ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:07 नवीन
सरसकट म्हशीचे दूध पीत असूनही म्हशीला प्रोटेक्शन न देणे, गायींना मारू नये म्हणून ज्या गौ सेवा संस्था काढल्या आहेत तिथे गायींची कंडिशन इतकी वाईट असते की मरण हाच त्यांच्या सुटकेचा एकमेव मार्ग असतो कैक वेळेस-तरी तिकडे दुर्लक्ष करणे, सावरकरांच्या विचारांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, वैदिक धर्मातील आहाराकडे दुर्लक्ष करणे, आणि एकूणच बिनडोकपणे बोंबा मारणे, इ.इ. सध्याच्या जगात नॉनव्हेजचे प्रमाण अ‍ॅज़ अ होल कमी झाले तर ते पर्यावरणाच्या फायद्याचे आहे. चिकनमटन सगळेच कमी खाऊ लागले तर ठीक, पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून जे मांस बहुसंख्य हिंदू लोक सध्या खातच नाहीत त्याच्याच नावाने बोंबा मारणे हे खास बिनडोक गोभक्तांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अशी नानाविध बाष्कळ मुक्ताफळे "हा आमचा देश आहे" वगैरे (१६ मे नंतर या प्रवृत्ती जास्त माजल्यात) छापाची उधळणे हे यांचे पेटंट कसब आहे. लय मज्जा येते निरर्थक बिनबुडाच्या गैरसमजुती ऐकायला, अजून चालूद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
न
निनाद जोशी Wed, 03/04/2015 - 10:14 नवीन
मगाशी हि मला उत्तर मिळाले नाही.... सावरकरांनी असे कुठे म्हंटले आहे ते मला जरा कृपया सांगाल का.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:17 नवीन
अगदी नक्की सांगतो. जरा कळ काढा. आज रात्री वा उद्या रात्रीपर्यंत नक्की शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
ख
खंडेराव Wed, 03/04/2015 - 10:25 नवीन
विन्ग्रजीत आहे, अनुवादित माहिती. Cow is worthy of protection so long as this serves humanitarian and national interests Animals such as the cow and buffalo and trees such as banyan and peepal are useful to man, hence we are fond of them; to that extent we might even consider them worthy of worship; their protection, sustenance and well-being is our duty, in that sense alone it is also our dharma! Does it not follow then that when under certain circumstances, that animal or tree becomes a source of trouble to mankind, it ceases to be worthy of sustenance or protection and as such its destruction is in humanitarian or national interests and becomes a human or national dharma? (Samaj Chitre or portraits of society, Samagra Savarkar vangmaya, Vol. 2, p.678) …When humanitarian interests are not served and in fact harmed by the cow and when humanism is shamed, self-defeating extreme cow protection should be rejected…(Samagra Savarkar vangmaya, Vol. 3, p.341) …A substance is edible to the extent that it is beneficial to man. Attributing religious qualities to it gives it a godly status. Such a superstitious mindset destroys the nation’s intellect. The cow is but a milch symbol of the Hindu nation. By no means should it be considered its emblem
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:32 नवीन
धन्यवाद!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:21 नवीन
http://mayurkhape.blogspot.in/2010/06/blog-post_9744.html समग्र सावरकर, खंड ८. सरसकट गोमांसभक्षणाचा पुरस्कार नसला तरी आंधळ्या गोभक्तीला विरोध केलेला आहे. गोभक्तांना ते समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
न
निनाद जोशी Wed, 03/04/2015 - 10:51 नवीन
ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या सांगितली नाही आहे. गाय हि हिंदू धर्माचं प्रतिक नसली तरी पूज्य आहे हे त्यांनी हि मान्य केले आहे. त्यामुळे सांभाळणे जड झाले म्हणून तिला विकणे ह्याचे त्यांनी कोठेही समर्थन केलेले नाही अथवा आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तिला मारावे ह्याचेही समर्थन केलेले नाही. त्यामुळे ह्या मुद्यावर सावरकरांचे मत हे व्यर्थ गोहत्येच्या बाजूने आहे असे मानता येउच शकत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:52 नवीन
वरील भाषांतरित मजकुराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेत याची नोंद घेण्यात आलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
ख
खंडेराव Wed, 03/04/2015 - 11:04 नवीन
savarkar.org काही मराठीत हे पशु पहा ! मनुष्यांच्या सेवेला आणि सुखाला हवे तसेच विविध, हवे तितकेच बुद्धिमान, वाळवंटातील ते मनुष्याचे तारू - म्हणून काटे खाऊन पाण्यावाचून महिनोगणती चालण्याची युक्ति त्या उंटाला शिकविली. तो घोडा किती चपल ! त्याच्यावर स्वारी भरणार्‍या मनुष्यास भर रणांगणाताही सांभाळून वहाण्याइतकी नि मनुष्याशी अत्यंत प्रामाणिकपणे वागण्याइतकी बुद्धि त्याला देवाने दिली. पण मनुष्यावरच स्वारी भरण्याइतकी बुद्धिमात्र दिली नाही! ही गाय पहा. एका बाजूला सुके गवत ढकलावे नि दुसर्‍या बाजूला त्याचे बनलेले त्याचे ताजे जीवनप्रद दूध चरव्या भरभरून काढीत बसावे ! असे ते आश्चर्यकारक रासायनिक यंत्र ज्या देवाने घडविले तो खरोखरच किती दयाळू असला पाहिजे! आणि पुन्हा प्रत्येक वेळी जुने यंत्र मोडताच नवे घडण्याचे श्रमसुद्धा मनुष्याला पडू नयेत अशी सोय त्यातच केलेली; पाहिल्या यंत्रातच गवताचे दूध करून देता देताच तसलीच नवीन अजब यंत्रे बनविण्याचीही व्यवस्था केलेली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
H
hitesh Wed, 03/04/2015 - 13:22 नवीन
ह्यात त्यांनी स्वसंरक्षण वा राष्ट्र संरक्षण ह्यासाठी गोहत्या मान्य केली आहे आणि ती मान्य करण्यासारखीच आहे परंतु त्यांनी भक्षणासाठी गोहत्या......... ..... स्वसंरक्षणासाठी गोहत्या ! म्हणजे गाय अंगावर आली तर मारुन टाकावी की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद जोशी
आ
आयुर्हित Wed, 03/04/2015 - 10:00 नवीन
A1 versus A2 Milk Posts from Keith Woodford The Desi Cow – Almost Extinct Indian Cow Milk Benefits Indian Cow and it`s benefits ( Scientific Facts ) आणि ज्याला कोणाला भाकड गाय पोसता येत नाही त्याने ती समाजसेवी संस्थांच्या हवाली करावी. यात जैन व मारवाडी लोकांच्या संस्था अग्रणी आहेत. ही लोक आपल्या उत्पन्नाचा एक भाग वेगळा काढून ह्या गायी पोसण्यासाठी वापरतात.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Wed, 03/04/2015 - 10:37 नवीन
धन्यवाद. हा कायदा देशी गायीपुरता मर्यादीत नाही. ४०% ह्य जर्सी आणि इत्सम आहेत. त्यान्चे बैल हि शेतीकामाचे नसतात. ते काय करायचे? कोणी संभाळायचे? वरच्या संस्था १० कोट जनावरे संभाळतील? १९६० मधे या कायद्याला विरोध झाला तो अर्थिक कारनामुळे. डेरी धंदा पुढे न्यायचा असेल तर निरुपयोगी जनावरे काढलीच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/04/2015 - 10:43 नवीन
तो एक गायीसारखा प्राणी आहे असे कुणीतरी अलीकडेच सांगत होता .... देशी गाय हा वेगळा प्राणी आहे आणि ब्राझील का आणखीन कुठल्या तरी देशात त्याचे शुध्द वाण मोठ्या प्रमाणात जोपासले जात आहे अशीही माहिती होती....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
अ
अनुप ढेरे Wed, 03/04/2015 - 10:15 नवीन
अ‍ॅक्चुअली महाराष्ट्र बीफ हब झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 03/04/2015 - 10:18 नवीन
गायींना पोसण्यापेक्षा अनाथांना , माणसांना पोसण्यात हे पैसे सत्कारणी लागतील. बाकी हिंदू धर्मात गायीला पवित्र मानायचा खूळ केव्हापासून घुसले हे कळाले तर जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 03/04/2015 - 10:33 नवीन
आता मत्स्य, कूर्म, वराह वगैरेंची हत्याबंदी व्हावी असं वाटतं !!! कुत्रा दत्ताच्या आजूबाजूला असतो (आणि वाघ्यापण बरं का) .. त्यालाही मारण्यावर बंदी यावी .. अगदी पिसाळलेले असेल तरी.. त्यांची नसबंदी वगैरे अन्यायही दूर व्हावेत.. सर्व महापालिकेतील उंदीर मारण्याचे विभाग बंद करावेत.. आमच्या बाप्पाचे वाहन आहे ते... आणखी पुराणकथा वगैरे वाचून संरक्षणासाठी प्राणी सुचवावेत.. आमचा पाठींबा आहे.. यासाठी सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून हे कायदे ताबडतोब मंजूर करून घ्यावेत
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:37 नवीन
अगदी अगदी. झालंच तर कुठल्याही प्रकारची जीवहत्या बॅन करून टाकावी. जुलमी परकीय म्लेंच्छ लोकांमुळे शिरलेला हा अनाचार लौकरच धर्मरक्षकांनी समूळ नष्ट करून टाकावा आणि इतःपर झाडांप्रमाणे फक्त प्रकाशसंश्लेषणाद्वारेच अन्नग्रहणाला परवानगी असावी. एक बॅक्टेरिया मारल्यास एक वर्षे तुरुंगवास असा शिक्षेचा रेट असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
पिंपातला उंदीर Wed, 03/04/2015 - 10:49 नवीन
*lol* *LOL* :-)) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 03/04/2015 - 14:12 नवीन
प्रतिक्रियेच्या बटणावर क्लिक करताना आणि ही प्रतिक्रिया लिहिताना मी किमान ८८,५७० बॅक्टेरिया मारल्याचं सबळ पुराव्याने सिद्ध झालेलं आहे. कारावासाची शिक्षा झाल्याने आपल्या प्रतिसादांवर उपप्रतिसाद देणे ह्या जन्मात शक्य होणार नाही. पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 14:18 नवीन
पुढचा जन्म बॅक्टेरियाचा मि़ळाला तर बॅटमोबाईलच्या किमान आरश्यावर बसायला जागा मिळावी ही विनंती. धन्यवाद.
तुमच्यासाटी कायपन! ब्याक्ट्रिया मार्ले तरीपन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Wed, 03/04/2015 - 15:57 नवीन
क्लोरोफिल कुठून येणार? आणि आलंच तर सगळ्यांचा रंग हिरवा होईल ना भो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 19:29 नवीन
बाकी रंग हिरवा झाला तर काळागोरा हा भेद उरणार नाही अन रेसिझम निकालात निघेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 12:08 नवीन
Image removed. हे महाराज गेले ७० वर्षे फक्त प्रकाशावर जगत आहेत म्हंतात. 'आपलेच' आहेत. यांच्याकडून दिक्षा घ्यायला पाहिजे लौकरात लौकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/05/2015 - 12:36 नवीन
वा क्या बात है! दीक्षा तर घेतलीच पायजे यांच्याकडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 03/05/2015 - 13:02 नवीन
डोके गरगरले आहे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 03/05/2015 - 13:06 नवीन
http://en.wikipedia.org/wiki/Prahlad_Jani
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ख
खंडेराव Wed, 03/04/2015 - 10:39 नवीन
अनुमोदन. +१ महिषासुरामुळे म्हशी बद्नाम. त्या चालतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 10:41 नवीन
मत्स्यावर बंदी नको हां! आमका मत्स्य व्हयोच ताटात. बाकी चलांदेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 03/04/2015 - 10:51 नवीन
मत्स्य स्वतः विष्णूचा अवतार त्यामुळे शिक्षा जास्त होण्याची तरतूद हवी .. १० वर्ष करावी की १५ ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 10:54 नवीन
ओ दादानू, असा ओ काय? द्येवाचो अवतार म्हणान तर तेका आदर दाखवतव मां? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:54 नवीन
१० १५ काय घेऊन बसलात सप्रेकाका? ब्रह्मदेवाच्या एका दिवसाएवढी शिक्षा द्या, बास झालं. किती वेळ डांबून ठेवायचं त्यांना, नै का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 10:57 नवीन
ज. मे. ल. ते तुझं! तुझ्यावर विष्णुवताराची कृपा न व्हावी हीच तुला शिक्षा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा