Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोवंशहत्या बंदी

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 03/03/2015 - 13:51
🗣 262 प्रतिसाद
अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड ठरावा असा कायदा ... एकीकडे गाय हि माता तिचे पावित्र्य ..आयुर्वेदिक महत्व ... दुसरीकडे 'गाय हा पशू ..देव नव्हे' हे आमच्या आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्पष्टोक्ती ... तिसरीकडे ते वेन्दांचे दाखले "अनुस्तरणी कर्म ...चर्मण्वती शब्दाची व्युत्पत्ती" चौथीकडे अन्य धर्मातील त्याज्ज्य प्राणी खाण्याब्द्दल्ची कठोर आचारसंहिता .. त्यातून शाकाहार मांसाहार वाद ... मुळासकट उपटून खाल्लेल्या भाज्या वगैरे हि सुद्धा हत्त्याच असे मानणारा एक गट ... आणखीन कुणी म्हणतो "फलाहार हाच काय तो माणसाला शक्य असलेला नैसर्गिक आहार ..कारण फळे माणूस कसलेही कृत्रिम प्रोसेसिंग न करता करू शकतो ...विचार करकरून एक शीण येतो :D

प्रतिक्रिया द्या
44860 वाचन

💬 प्रतिसाद (262)
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 10:59 नवीन
खी खी खी =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सूड Wed, 03/04/2015 - 10:59 नवीन
>>ब्रह्मदेवाच्या एका दिवसाएवढी शिक्षा द्या, बास झालं. किती वेळ डांबून ठेवायचं त्यांना, नै का?
अगदी!! गायीत देव असतात असं 'म्हणतात'. पण मत्स्य हा तर साक्षात विष्णूचा अवतार, त्यामुळे त्याच्या वधासाठी शक्य तितकी अधिक शिक्षा केली जावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 11:01 नवीन
याकरिता मत्स्यावतारास जर जलसमाधी देऊन खाल्ले गेले तर दोष नसावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 03/04/2015 - 11:05 नवीन
किंवा खाण्याआधी सिद्ध करावे की हा प्रकार विष्णूच्या अवतारांपैकी नाही. समुद्राच्या पाण्यातले मासे हे विष्णूच्या अवतारांपैकी नसून घाटावरले नदीच्या पाण्यातले मासे हे विष्णूच्या अवतारांपैकी असल्याचं 'केतकी पिवळी पडली' मध्ये वाचल्याचं आठवतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अत्रन्गि पाउस Wed, 03/04/2015 - 11:08 नवीन
मध्ये पण असेच म्हटले आहे नं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 03/04/2015 - 11:10 नवीन
त्यातली प्रकरणे थोडी विस्तृत आहेत. त्यामुळे विशेष लक्षात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 11:09 नवीन
त्यातही कुठल्यातरी विशिष्ट नदीच्या पाण्यातलेच मासे होते असंही कुडचेडकर म्हणतात. (ख्यातनाम)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
H
hitesh Wed, 03/04/2015 - 13:33 नवीन
मासा उलटा टांगुन मिर्चीची धुरी दिल्यास छान लागतो. गटण्याचे मानसपिता मत्साहारी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाळ सप्रे Wed, 03/04/2015 - 10:57 नवीन
पण जसे म्हैस, रेडा मारण्यावर बंदी नाही तसंच... पापलेट, कोळंबी वगैरे विशेष प्रकार वगळू शकतो.. मत्स्यावतार या प्रकारतला नव्हता असे सोयीस्कररीत्या गृहीत धरु .. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 11:01 नवीन
ओ येक वेळ मोठ्या माशांका बंदी करा ओ तुम्ही. तेंका काय चव असता? श्या! मिपाच्या भाषेत व** मेले! बारक्या आणि काटेरी माशांची चव जर तुमका म्हायत नसात तर कसले तुम्ही माशेखाव! बंदी खयच्या माशार आणूक व्हयी ह्या पण समाजणा नाय तुमका? काय ह्या? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/04/2015 - 11:17 नवीन
इथे सगळ्यांनी किती किती घोर अध्यात्मिक अज्ञान प्रकट केले आहे हे पाहून एक मिपाकर म्हणून... वगैरे वगैरे वाटले. *unknw* अज्ञानी लोकहो, मासे म्हणजे पर्यायाने मत्स्यावतार खाणे म्हणजे त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ? म्हणून तर मासे खाल्ल्यावर स्वर्गसूख लाभते ना ? श्या, तुमा लोकान्ला ना लईच इस्काटू सांगाय्ला लाग्तयं, ह्यां... *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 11:27 नवीन
ताच तर मी म्हणी होतय, पण आपली घालूचीच असात बंदी तर घाला बापडे मोठ्या माशांर, तेंका इतकी काय चव नाय हो बारक्या माशांइतकी. बंदी घालणारेही खुश रवतीत जरा.. कसां? सगळ्यांच्या मनासारक्या थोडाफार झालां म्हंजे कसां बरां, नाऽऽय? आमच्या कोकणात कसां, मुख्य देवाची पूजा असताच, पण तेच्या गणांकही अनमस्कार करुचो लागता नाय? तसांच ह्याय थोडाफार.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बाळ सप्रे Wed, 03/04/2015 - 11:31 नवीन
मासे म्हणजे पर्यायाने मत्स्यावतार खाणे म्हणजे त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ? म्हणून तर मासे खाल्ल्यावर स्वर्गसूख लाभते ना ?
या वचनामुळे तुमचा भक्त !! काय सॉल्लिड अध्यात्म हाय !! बोला इस्पिक एक्का महाराज की ssssssss ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 11:33 नवीन
अगदी असेच म्हणतो. अद्वैतमतानुयायांनी तर ही खाद्यभक्ती अंगीकारलीच पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Wed, 03/04/2015 - 11:38 नवीन
>>पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ?
हो तर, आणि त्या परमात्म्याचा 'वास' जो काही घरात; भांड्यांवर उरतो त्यामुळे सदेह वैकुंठी आल्यासारखं वाटत असेल नै? *acute*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या Wed, 03/04/2015 - 15:22 नवीन
त्यांना आपल्या पोटात घालणे म्हणजे खाणारा आत्मा आणि खाल्लेला परमात्मा यांचा संगमच नाही काय ?
मस्त हो एक्कासाहेब, मग याच न्यायाने तेहतीस कोट देव पण जाउ देत की पोटात.. :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Wed, 03/04/2015 - 15:45 नवीन
जाऊ देत की नाय कोण म्हणतंय!! आम्हाला एक विष्णू पोटात धरवेना, तिथे तेहतीस कोटी देवांची काय कथा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या Wed, 03/04/2015 - 15:55 नवीन
आम्हाला एक विष्णू पोटात धरवेना
काय सूड घेतो काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/04/2015 - 10:58 नवीन
म्हावरा प्राणी नाहीच मुळ्ळी, ती नदीची / समुद्राची फळे आहेत... तवा चिंता इल्ले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 03/04/2015 - 11:01 नवीन
ब्येश्ट, ब्येश्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बाळ सप्रे Wed, 03/04/2015 - 11:05 नवीन
कोंबड्यादेखिल कापायला नेताना उलट्या टांगून नेतात - म्हणजे फळंच ती.. चला कोंबड्यापण वाचल्या ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Wed, 03/04/2015 - 11:12 नवीन
बकरे इ. देखील कापल्यावर उलटेच टांगून ठेवतात, म्हणजे तीही फळंच. तेही वाचले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
स
सुचिकांत Wed, 03/04/2015 - 10:42 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
पिंपातला उंदीर Wed, 03/04/2015 - 10:59 नवीन
गायीत देव आहेत म्हणून पोथ्या सांगतात, तर वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात; मग गोरक्षणच का करावे? डुक्कर-रक्षण संघ स्थापन करून डुक्कर- पूजा का प्रचलवू नये? …. मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय, बैल पशु आहे, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणात हीन असलेल्या पशुस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशुहून नीच मानण्यासारखे आहे.… गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशु असलेल्या गायीस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. …. कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे. … एकवेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशु आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून आणि त्या पशुचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशु म्हणूनच जोपासना करू म्हणाल तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे " इत्यादी थापा माराल , तर त्यावर जरी राष्ट्राने या पुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील. म्हशीला देव मानून म्हशीचे रक्षण केवळ तिच्या आर्थिक लाभासाठीच कोणी करत नाही की , काय? ती अमेरिका पाहा . आज ते राष्ट्र एका अर्थी गोभक्षक असताही गोरक्षणाच्या कामी आमच्याहून शतपट पुढारलेले आहे. . कारण त्या प्रश्नात धार्मिक आंधळेपणाचा गडबडगुंडा न चालू देता, निव्वळ आर्थिक नि वैज्ञानिक द्दृष्टीने ते तो सोडवतात. (संपादित लेख -- "गाय -- एक उपयुक्त पशु" : वि, दा, सावरकर )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 03/04/2015 - 12:15 नवीन
१. हिंदूंच्या नेमक्या कुठल्या धर्मग्रंथात गाय पुजनिय व अभक्षणीय आहे असे सांगितले आहे? २. महाभारत काळात त्या लक्षावधी गायींचं काय करत होते आर्यलोक? ३. म्हैस हा गायीइतकाच उपयोगी प्राणी असतांना पूजनीय का नाही? ४. मुस्लिम लोक म्हैस खात नाही म्हणून म्हशीबद्दल आदर नाही असे आहे का? ५. नपुंसक गोहत्याविरोध नेमक्या कुठल्याप्रकारे राष्ट्रसेवा सिद्ध होतो? ६. वृद्ध आई-वडीलांना, वृद्ध विधवांना रस्त्यावर सोडून देणार्‍या लोकांविरोधात कधी हिंदूपरंपराभिमानी एवढीच कठोर आणि जाज्वल्य भुमिका घेऊन कायदा करवून घेऊन त्याची अंमलबजावणी जातीने लक्ष घालून करून घेणार आहेत? ७. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरून देशभक्ती, देशाभिमान ह्या गोष्टी केंव्हापासून ठरवल्या जाऊ लागल्यात या देशात? ८. मी काय खातो ह्यावरून मी या देशात राहायचे की नाही हे मला सांगणारे कोण हे टिकोजीराव? ९. तर याप्रकारे इतर देश त्यांची धार्मिक बंधने लादतात, म्हणून आम्हीपण लादू म्हणणार्‍यांचा स्क्रू ढिला आहे का? १०. शेवटचा प्रश्नः असे जातीय अहंकार सुखावणारे कायदे बनवत बसायला सरकारकडे बराच वेळ शिल्लक दिसतो, तो जरा गंगेत अर्धवट जळलेली प्रेते सोडून देणार्‍यांविरोधात कायदा बनवण्यासाठी का नाही वापरत?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 03/04/2015 - 12:50 नवीन
(ह घ्या) असं डायरेक्ट धोतराला हात घालू नै.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 03/04/2015 - 16:36 नवीन
हम आगेसे खयाल रकेंगे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर गुरुवार, 03/05/2015 - 05:49 नवीन
ख्याल..ठुमरी...गजल.. सब रखो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
H
hitesh Wed, 03/04/2015 - 13:37 नवीन
आँ ! मोदीजी कोट विकुन आलेले कोटभर पैसे गंगा शुध्हीकरणालाच देणार आहेत. अच्चे दिन आ गये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 06:45 नवीन
अनुमोदन. +१ कोणी जाणकार योग्य उत्तरे देतील ही अपेक्शा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साती Wed, 03/04/2015 - 13:45 नवीन
गाय पूज्य आहे म्हणून गोवंश हत्या बंदी केलेली नाही. गायीचा आणि धर्माचा काही संबंध नाही. देशातले पशूधन वाढावे याकरिता घेतलेला निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्याच्या सोयीनुसार योग्य ते नियम घालून व्हावी अशी घटना लिहिणार्यांची डायरेक्टीवज आहेत. अगदी महाराष्ट्रातल्या कायद्यातही गायीच्या हिंदुधर्मातील आदरणीय स्थानाचा काही उल्लेख नाही. मी या कायद्याची प्रशंसक नाही पण कायद्याचे खरे काय ते स्वरूप वाचून सगळ्यांनी त्या अनुशंगाने चर्चा करावी म्हणून लिहित आहे.
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 03/04/2015 - 13:50 नवीन
one of the Directive Principles of State Policy contained in Article 48 of the Constitution. It reads, "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
संदीप डांगे Wed, 03/04/2015 - 16:48 नवीन
देशी गायीची प्रजाती संरक्षित करता यावी म्हणून हा कायदा आहे. संकरीत गायींमुळे होणारे संभाव्य आजार व दुष्परिणाम अभ्यासणे हा एक मुद्दा आणि देशातल्या विविध मूळ प्रजाती नुसत्या भाकड आहेत म्हणून संपून जाऊ नये म्हणून त्यांचे संवर्धन असा कायद्यामागचा उद्देश आहे. मग वर ज्याप्रकारे 'पूजनीय, माता, धर्म,' वैगेरे बोम्बाबोम्ब सुरु आहे तीचे काय नेमके प्रयोजन असावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ब
बोका-ए-आझम Wed, 03/04/2015 - 17:36 नवीन
गोहत्याबंदीचा कायदा धार्मिक कारणावरून केलेला आहे असं जरी प्रथमदर्शनी वाटत असलं (कारण भाजप सरकारने आणलाय) तरी तो तसा नसावा असं म्हणायला जागा आहे. त्याची कारणं ही आहेत - १. महाराष्ट्र हे एकमेव राज्य नाहीये जिथे हा कायदा लागू आहे. अगदी जम्मू आणि काश्मीरमध्येही हा कायदा आहे आणि तिकडे भाजपच्या हातात सत्ता येऊन एक आठवडाही झालेला नाही. २. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतही हा कायदा आहे. या दोन्ही राज्यांत भाजप सत्तेवर असताना (बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या भागीदारीत)हा कायदा झालाय का याची कल्पना नाही पण कायदा अंमलात आहे.समाजवादी पक्ष, बसपा किंवा आता फक्त जनता दल युनायटेड - या पक्षांनी कायदा तसाच ठेवलेला आहे, रद्दबातल केलेला नाही - जे करणे आणि भाजपला मुस्लिमविरोधी सिद्ध करणे त्यांना सहज शक्य होते पण तसं झालेलं नाही. ३. राष्ट्रपतींंनी या कायद्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.प्रणव मुखर्जींसारखा मुरब्बी काँग्रेसवाला जर सही करतो तर कायदा नक्कीच धार्मिक कंटेंटने भरलेला नसावा कारण त्यांनाही त्यावर विरोध दर्शवून महाराष्ट्रातल्या भाजप सरकारची कोंडी करणं सहज शक्य होतं. ४. आजच काँग्रेसनेही या कायद्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Wed, 03/04/2015 - 17:56 नवीन
मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.
पूर्णपणे असं वाटत नाही हो. कारण हा धागा कोणी काढलाय पहा, त्यात त्यांचा रोख पहा, जरी असे मानून चालू की सरकारच्या निर्णयात असा कोणताही हेतू नव्हता तरीही त्यांचा बहुतेक लोकांनी त्याना अपेक्षित असा अर्थ घेतलाय असे दिसतेय. आता ज्या बातम्या बाहेर आल्यात त्यानुसारच लोक बोलत आहेत आणि या बातम्या प्रो-भाजपा, अँटी-भाजपा दोन्हीही तर्‍हेच्या मंडळींसाठी सोईच्या आहेत असे दिसतेय आणि सरकार "नरो वा कुंजरो वा" या भुमिकेत खुश आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 03/04/2015 - 19:08 नवीन
एखाद्या माणसाला एकदा कानफाट्या नाव पडलं की सरसकट सगळ्या गोष्टींसाठी तो जबाबदार धरला जातो तशातला प्रकार आहे. सोशल मिडिया तर पेटलाय. गोबेल्सच्या आत्म्याला गुदगुल्या होत असतील त्याची बिग लाय थिअरी अजूनही कालाबाह्य झालेली नाही हे पाहून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ह
हाडक्या गुरुवार, 03/05/2015 - 12:45 नवीन
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते कळालेले नाही. म्हणजे तुमचे हे म्हणणे कळाले की हा कायदा सगळे म्हणतायत तसा धार्मिक वगैरे कारणांनी बनलेला नाही आणि आधीचा १९७६ चा ही कायदा धार्मिक वगैरे कारणांनी बनला नव्हता (मग हा फक्त गोवंशासाठीच का असा प्रश्न डोक्यात येतोय पण तो तूर्त बाजूस ठेवू). पण जेव्हा उतावळी माध्यमे आणि सोशल मिडिया पण काही (चुकीचा असा) अर्थ काढून दंगा करतेय तर सरकारने पुढे होऊन सांगावे ना, की बरोबर काय आहे ते, उगी सरकार "नरो वा कुंजरो वा" या भुमिकेत कशाला रहावे. इतर विधायक आणि गरजेच्या कामांपेक्षा यालाच कशी इतकी प्रसिद्धी मिळतेय ? प्रगो म्हणाले तसे गोवंशबंदीपेक्षा ही इतर महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत हो करायला (करत नाहीत असे म्हणायचे नाही) आणि प्रसिद्ध करायला पण. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/05/2015 - 17:44 नवीन
१९७६ सालापासून हा कायदा आहे हे खरंच माहित नव्हतं. या कायद्याबद्दल जे छापून येतंय त्यात असं आहे की हा कायदा पूर्वीच्या युती सरकारने १५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मध्ये मांडला होता पण त्याला राष्ट्रपतींची मंजुरी नव्हती. मध्ये १५ वर्षे आघाडीचं राज्य होतं त्यामुळे हा कायदा बासनात गुंडाळून ठेवला होता.आता परत तो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आणि त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यामुळे अंमलातही आला. कानफाट्या हा शब्द मी भाजपच्या संदर्भात वापरलेला आहे. कुणा एका व्यक्तीबद्दल नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
स
सुनील गुरुवार, 03/05/2015 - 06:09 नवीन
आजच काँग्रेसनेही या कायद्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे
आताचा कायदा हा खरे म्हणजे १९७६ च्या कायद्याचे विस्तारीकरण दिसते. १९७६ च्या कायद्यात फक्त गायी होत्या तर आताच्या कायद्याने त्यात बैलांची भर पडली आहे, इतकेच! आता मूळ कायदा जो १९७६ साली पारीत झाला होता तेव्हा (देशात आणिबाणी होती) आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या शंकराराव चव्हाणांचे सरकार होते!
मला तरी असं वाटतं की केवळ भाजपचं नाव आल्यामुळे या कायद्यावर धार्मिक, असहिष्णु वगैरे शिक्के मारण्यात येत आहेत.
हे (दोन्ही बाजूने*) खरे दिसते आहे. मला स्वतःला रस आहे तो फक्त भाकड गायींबाबत कायद्यात काय म्हटले आहे ते जाणून घेण्यात. * एक बाजू मानसिक समाधानवाल्यांची तर दुसरी बाजू हातात कोलीत मिळालेल्यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
H
hitesh Wed, 03/04/2015 - 18:22 नवीन
निम्म्यापेक्षा जास्त लोक म्हशीचे दूध पितात.. ती मात्र माता नाही.. तिला कापलं तर चालतं आणि दोन चार लोकाना दूध पाजुन गाय मात्र गोमाता ! हिंदुत्वीय लबाडी ! मुळात , कोणत्याही प्राण्याचं दूध पिणं हेही पापच ना?
  • Log in or register to post comments
H
hitesh Wed, 03/04/2015 - 18:31 नवीन
देशातील पहिल्या ६ क्रमांकाच्या मांस निर्यातदारांमध्ये ४ हिंदु आहेत. 1) Al-Kabeer Exports Pvt. Ltd. Its owner name: Mr. Shatish &Mr. Atul Sabharwal Add: 92, Jolly makers, Chembur Mumbai 400021 2) Arabian Exports Pvt.Ltd. Owner’s name: Mr.Sunil Kapoor Add: Russian Mansions, Overseas, Mumbai 400001 3) M.K.R Frozen Food Exports Pvt. Ltd. Owner’s name Mr. Madan Abott. Add : MG road, Janpath, New Delhi 110001 4) P.M.L Industries Pvt. Ltd. Owner’s name: Mr. A.S Bindra Add : S.C.O 62-63 Sector -34-A, Chandigarh 160022 त्यापैकी एक्जण जैन आहेत म्हणे... पण दुकानाची नावे मात्र मुस्सलमानी का अहेत. ?
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 03/04/2015 - 18:41 नवीन
(लॉजिक विचारू नका, अर्थ समजून घ्या!) एका कॉन्व्हेन्ट शाळेतील नन शिक्षिका बरोबर उत्तर दिल्यास $१० बक्षिस मिळतील असे सांगून खालील प्रश्न ३ धर्मिय विद्यार्थ्यांना विचारते: सगळ्यात श्रेष्ठ देव/प्रेषित कोण? ज्यू मुलगा म्हणतो: मोझेस. (शिक्षिका म्हणते: चूक!) मुसलमान मुलगा म्हणतो: पैगंबर (शिक्षिका म्हणते: चूक!) पटेल आडनावाचा मुलगा म्हणतो: जिझस ख्राईस्ट... शिक्षिका खूष होते आणि म्हणते बरोब्बर! पटेल ला $१० देत ती विचारते, की तू तर हिंदू आहेस. मग असे कसे म्हणालास? पटेल म्हणतो: माझ्या मनात सर्वश्रेष्ठ देव हा (जय श्री) कृष्णच आहे. पण "you know, business is business"! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ब
बोका-ए-आझम Wed, 03/04/2015 - 19:14 नवीन
हितेशभाऊ, याच्यात एक नाव विसरलात - अरिहंत एन्टरप्रायझेस - तुमच्या कपिल सिब्बलांची कंपनी. त्यांची बायको याची मालक आहे. अरिहंत नावामुळे जैन धर्मीयांनी आक्षेप घेतला म्हणून नाव बदललं आणि लोकसभा निवडणुकीत सिब्बलांनी आपल्या मालमत्तेत या कंपनीचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे त्यांना नोटिसही आली होती. पुढे त्यांनी माफी मागून प्रकरण वाढवलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
मृत्युन्जय गुरुवार, 03/05/2015 - 06:02 नवीन
मला एक कळत नाही आहे गायीला मारण्यासंदर्भात सावरकरांचे मत इतके महत्वाचे का आहे? इतर बाबतीत तर बिग्रेडी आणि सिमीयन जनता सावरकरांवर आगपाखड करत असते की. गोहत्या आली की त्यांना एकाएकी सावरकर इतके पुज्यनीय का वाटायला लागतात म्हणे?
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव गुरुवार, 03/05/2015 - 06:43 नवीन
बरोबर आहे. मलाही हाच प्रश्न पड्लाय. योग्य अयोग्य ठरवायला त्यांची का साक्श काढली जाते. आज हजारो भाकड जनावरे मोकाट फिरुन वाईट आयुश्य जगताय. सरकारने भारतीय गोवंश विकसीत करायचे सोडुन हा एक सोपा निर्णय घेतलाय. त्यावर चर्चा व्हावी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा गुरुवार, 03/05/2015 - 07:18 नवीन
भाकडच नव्हे, लहान वासरे आणि त्यांच्या गायी अर्धा रस्ता व्यापून बसलेले असतात. काळ्या रंगाचे असेल तर संध्याकाळच्या वेळी स्वतः तरी ट्रकांखाली मरतात, नाहीतर मोटारसायकलवाल्यांना अपघात घडवून आणतात. तेच भटक्या कुत्र्यांबाबत. ५/६ जण मिळून टोळकी करून सापडतील ती मांजरे मारत फिरतात आणि गाड्यांवर भुंकतात. तसेच मथुरेला भयानक प्रमाणात रस्त्यात डुकरे पाहिली होती. या सगळ्याच भटक्या प्राण्यांना आळा घातला पाहिजे. ज्यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून बसलेली सापडतील त्यांना जबर दंड ठोकला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
क
काळा पहाड गुरुवार, 03/05/2015 - 14:15 नवीन
यांची गुरे/डुकरे रस्ता अडवून बसलेली सापडतील त्यांना जबर दंड ठोकला पाहिजे.
हां म्हणजे पोलिसमामा आता गुरांच्या मालकांचा पत्ता शोधत फिरतील. दुपारच्या वेळेला टिंग टाँग करून झोपमोड करत तुमच्या बंगल्याबाहेर बसलेलं डुक्कर कुणाचं आहे हे विचारल्यावर तुमच्या चेहर्‍यावरचे भाव बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 03/05/2015 - 16:10 नवीन
बेवारस डुकराला उचलून जंगलात नेऊन टाका म्हणून सांगेन आणि इतर प्राण्यांना योग्य त्या जागी. (गायींना पांजरपोळात वगैरे). त्यांचे मालक शोधत आले की त्यांना पण पोलिसच्या ताब्यात देऊ हाकानाका. रस्ते मोकळे होणार असतील तर एवढा त्रास काहीच नाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/05/2015 - 09:06 नवीन
प्रतिसाद वाचले . हितेश , ह्यांचा पराकोटीचा हिंदुद्वेश मोदी/भाजप द्वेष लक्षात आला . इरव्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांना संडासवीर म्हणणार्‍यांचे अचानक उफाळुन आलेले सावरकर प्रेम दिसले. गाय हा उपयुक्त पशु असे सावरकर म्हणाले त्याचा गाय वगैरे सर्रास मारुन खावे हे अजब तर्क मतिगुंग करुन गेला. भाकड गायी रस्त्यावर बसतात म्हणुन मारुन टाका असाही तर्क दिसला मग मुंबईत फुटपाथावर जे भिकारी रस्ता अडवुन बसतात त्यांनाही मारावे काय असा एक विचार आला . महाभारत काळात गाय खात म्हणुन आजही खावी असा एक तर्क दिसला मग महाभारत काळात राक्षसविवाह पैशाच्च विवाह चालत होता तसा आजही चालु करावा काय असा विचार मनात डोकावला . आणि माणसाची उत्पत्ती जणु काही जगातील सर्वच प्राण्यांना मारुन खाण्यासाठी झाली आहे अशा प्राकरचे एक मत दिसले , माणुसच सर्वभक्षक काळ झाला हे पटले. असो . हे असले काही वादविवाद पाहिले की ह्या कोपर्‍यात असलेल्या ज्ञानेश्वरांची आणि तुकारांची फार फार कीव येते काही वेळा . "ज्ञानोबा , तुकोबा , तुम्हाला अपेक्षित धर्मात गोहत्याबंदी होती का हो ?" आणि गायीच्या हत्येवर बंदी घालण्या पेक्षा गायछापवर ( अर्थात तंबाखु आणि सर्व तंबाखुजन्य प्रॉडक्ट्स वर) बंदी घालवर्)जास्त महत्वाचे आहे हे आमचे वैयक्तिक मत मांडुन कीबोर्ड आवरता घेतो .
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे गुरुवार, 03/05/2015 - 10:39 नवीन
प्रतिसादातल्या शेवटच्या २ ओळींशी प्रचंड सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा