आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही .
मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते .
आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु,
मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात.
उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते.
परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे.
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत.
आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल.
आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात.
1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल.
2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल
3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल.
4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल.
आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद
http://www.bionews.org.uk/page_51579.asp
http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm
💬 प्रतिसाद
(243)
H
Hrushikesh Marathe
गुरुवार, 06/04/2015 - 08:52
नवीन
Upyukt mahiti..
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/04/2015 - 11:01
नवीन
मराठेसाहेब - शक्य असेल तर प्रतिसादही देवनागरीतच द्यावा ही विनंती. मोबाईलवरून लिहीत असाल तर गूगल इंडिक कीबोर्ड वगैरे वापरून सहज शक्य आहे.
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 06/04/2015 - 08:53
नवीन
१००% सहमत!
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 06/04/2015 - 09:04
नवीन
बर्याच वर्षांपूर्वी काही सहकार्यांबरोबर झालेली जातिव्यवस्थेवरील चर्चा आठवली. त्यात गुणसूत्रांच्या वैविध्यास जातिसंस्थेच्या अडथळ्याबद्दल बरीच सकारात्मक चर्चा झाली होती.
अर्थात तुम्ही मांडलेला मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर असला तरी त्याची अंमलबजावणी करणे हे सामाजिक रूढीवादी मानसिकतेमुळे जरा कठीणच आहे. पूर्वीच्या काळी अनुलोम विवाह एकवेळ चालत, पण तथाकथित उच्च जातीच्या पुरुषाने तथाकथित खालच्या जातीतील स्त्रीशी विवाह करणे अनुचित मानले जाई. आता हे प्रतिलोम विवाह तितके नवीन राहिले नाहीत. उलट खालावणार्या लिंगगुणोत्तरामुळे ते वाढीस लागले आहेत हे लेवा पाटील या जातीतील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करण्याच्या वाढत्या प्रथेवरून दिसून येते. (हे केवळ उदाहरणार्थ.) पण त्याउलट दलित मुलाने उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यास त्या दलित घराची राखरांगोळी केली जाते. यात दोन प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती दिसतात. एक म्हणजे इतर जातींना आपल्या जातीपेक्षा कमी दर्जाच्या मानणे आणि स्त्रियांना भोगवस्तू असल्याप्रमाणे वागणूक देणे.
या दोन्ही प्रवृत्ती दुर्दैवाने कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची वाट कठीण आहे.
(आमच्या घरात आणि नातेवाईकांमध्ये अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत. एवढेच नव्हे तर अगदी आंतरधर्मीय विवाहही झाले आहेत.)
स्वतःबरोबर इतर सर्वांनाच फक्त माणूस मानणारा -
स्वॅप्स.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 09:50
नवीन
सहमत, फक्त ते अनुलोम-प्रतिलोमचा तपशील अंमळ चुकलाय.
पुरुष उच्चजातीचा अन स्त्री नीचजातीची = अनुलोम.
पुरुष नीचजातीचा अन स्त्री उच्चजातीची = प्रतिलोम.
लेवा पाटील समाजातील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करणे हे तस्मात अनुलोम विवाहाचेच उदाहरण आहे.
अन प्रतिलोम विवाहाप्रति समाज अर्थातच अजूनही खूप संवेदनशील आहे.
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 06/04/2015 - 09:56
नवीन
अनुलोम-प्रतिलोमबाबत खातरजमा करून घेणे मोबाईलवरून प्रतिसाद लिहिल्याने शक्य झाले नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 06/04/2015 - 09:08
नवीन
विषय शेवटी जातीव्यवस्थेवर जाईल म्हणून जास्त खोलात जात नाही
उदाहरणार्थ कोकणस्थ आणी देशस्थ ब्राम्हण या दोन पोटजातीतच इतके जनुकीय वैविध्य आहे कि त्यांचा संकर हा खूप फायदेशीर आहे. अशाच तर्हेने सर्व जातींचे जनुकीय पृथक्करण झाले पाहिजे आणी ज्या जातींची जनुके भिन्न आहेत त्यात विवाह असावा आणी ज्यात साम्य आहे त्यात विवाह टाळावा. हे शास्त्राला धरून होईल.
परंतु काही जातींमध्ये असलेली विशिष्ठ गुणाची जनुके विरलतेतून( DILUTION) लुप्त होऊ शकतील. उदा. उत्तर भारतात काही जातीत उंची खूप जास्त आहे. अशा लोकांनी बुटक्या जातीत लग्न केले तर उंचीचे सरासरीकरण( AVERAGING) होऊन उंची कमी होऊ शकेल. तेंव्हा सर्वच आंतर जातीय विवाह फायदेशीर ठरतील असेही नाही. आंतरधर्मीय विवाहात असे नक्की सांगता येणार नाही. गोव्यात बरेच GSB लोक ख्रिश्चन झाले आहेत( बाटवले गेल्या मुळे) तेथे विवाह मंडळाच्या जाहिराती सुद्धा RCB (ROMAN CATHOLIC BRAMHIN) वर/ वाढू पाहिजे अशा येतात. कोकणी मुसलमानात कोकणस्थ ब्राम्हणांची आडनावे डिन्गणकर, पाटणकर इ आणी गुण (घारे डोळे ई ) दिसून येतात. तेंव्हा धर्माधारीत विवाह हे जनुकीय संशोधन केल्याशिवाय करावे हे म्हणणे कठीण आहे. ( तशी माहिती उपलब्ध असेलही. मला माहित नाही)
मूळ ठरवून कोणी आंतर जातीय विवाह करीत नाहीत. त्यातून आपल्याकडे राखीव जागांमुळे हा प्रश्न ज्वलंत आणी गुंतागुंतीचा झाला आहे. यामुळे मी यावर भाष्य करीत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 09:48
नवीन
प्रचंड सहमत.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 06/04/2015 - 09:17
नवीन
जनुकं बिनुकं शरीरात असतात. शरीराबाहेरचं एक जनुक असतं ज्याचं नाव असतं लोक. ते जनुक काय म्हणतं यावर बरंच अवलंबून असतं.
शिवाय जनुकं 'विचारांवर' परिणाम करत नाहीत ना ! ते विचार कसे बदलणार?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 06/04/2015 - 09:27
नवीन
थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची सरासरी ६ होइल आणी विविधता वाढेल असेच ना? याला दुसरा प्रतिवाद असा होइल की ७+ ७ ची सरासरी ७ च राहिल. म्हणजे ७ ला या सगळ्या प्रकारामुळे काहिच फरक पडणार नाही आहे. ५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे कदाचित ७ ला आवडणार नाही. त्यामुळे या जनुकीय गुंतागुंतीला केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातुन बघणे योग्य होणार नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असेल तर प्रश्नच मिटला.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 15:28
नवीन
७ ने स्वत:ला ०(शुन्य) समजावे म्हणजे ० + ०=० आणि ० X ० = ० किंवा ० / ० = ० च,
मग ते ५ चं भलं देखील म्हणता येणार नाही कारण ५ देखील तेव्हा ० च आणि ७ चं ते बलिदान होणार नाही.
त्रास आहे तो ७ ने स्वत:ला ७ आणि समोरच्याला नेहेमी २ ने कमी समजण्याचा.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 06/04/2015 - 15:36
नवीन
प्रश्न समजण्याचा नाही. असण्याचा आहे. ७ स्वतःला ७ च समजेल ना? तो ७ नसेल तर तो स्वतःला ७ नाही समजु शकणार. ५ स्वतःला ७ समजायला लागला मह्णुन तो ७ थोडीच होणार आहे. आणि ७ ने स्वत:ला आणी इतरांनी त्याला ० समजणे हे ७ चे अवमूल्यन आहेच. अजुन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजात फकत ७ नसतात. ८, ९, ५ आणि २ देखील असतात. ७ ने स्वतःला ७ समजणे (किंवा असणे) सोडले तरी ८ तसे करेल असे नाही आणि कदाचित असेही असेल की २ ला देखील स्वतःच्या २ असण्यातच जास्त आनंद आहे / असेल. २ असण्याने कदाचित त्याला काही जनुकीय फायदे म्मिळत असतील जे ७ असण्याने मिळणार नाहित. त्यामुळे कदाचित २ च २ राहण्यात समाधान मानेल.
शिवाय ७ ने दुसर्याला ५ समजण्याचा देखील प्रश्न नाही. ५ हा ५ च असतो. ७ ने त्याला काहिही समजले तरी त्यात फरक पडत नाही. शिवाय ७ समोरच्याला २ ने कमी समजण्याचा त्रासही असु शकत नाही. खासकरुन हे कमी समजणे म्हणजे असणे असेल तर प्रश्नच नाही. शिवाय मी अजुन एक गोष्ट म्हटली ती तुम्ही लक्षात घेतलेली नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असतील आणी त्यासाठी तडजोडी करायची त्यांची तयारी असेल तर प्रश्नच मिटला की
असो महत्वाचा मुद्दा हा की समजणे महत्वाचे नसुन असणे महत्वाचे आहे. जे आहे ते आहेच. ते नाकारता कसे येइल?
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 16:08
नवीन
धागाकर्ताच असं म्हणत आहे.
शिवाय असंही तेच म्हणतात. मुळात ० ते ९ हि विभागणीच चुकिची नाही का? आवडीचं म्हणाल तर ते पटलंच पण एक गोष्ट आणखी अशी की ही आवड निवड ते दोघे करायला तयार असतात पण घरचे, भावकीतले, समाज, ई. तयार नसतात व त्यामुळे थिंकर साहेबांची प्रमेय आणखी मागे पडत जातात/जातील. मी ७ म्हणून दुसर्या ७ बरोबर उभा असेल तर कोणाला काही वाटणार नाही पण मी ५ आहे असं कळलं तर बर्याच भुवया तानल्या जातात. आजपर्यंत असंच चालत आलंय म्हणुन तेच बरोबर आहे हा आग्रह देखील चुकीचा. शिवाय थिंकर यांची प्रमेय पचणी पडायला बराच वेळ जाणार हे देखील तितकंच खरं.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
गुरुवार, 06/04/2015 - 17:05
नवीन
० ते ९ ही विभागणी मुळीच चुकीची नाही. कारण ती मुलात जनुकीय रचनेवर अधारित आहे असे धागाकर्त्याचे म्हणणे आहे. मी तो धागा पकडुनच पुढे लिहिले आहे. जर मुळात ० ते ९ नसेलच तर या जनुकीय कॉम्बिनेशनची गरजही नाही,
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/04/2015 - 16:07
नवीन
हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं.
बाकी
१) ५ ला ७ नं ० असावं असंच आत्तापर्यंत वाटत आलंय.
२) ५ ची १,२,३,४ बरोबर ची वागणूक बघता ५ वर विश्वास ठेवण्याचं कारणच नाही.
३) आधी १,२,३,४ आणि ५ यांनी सलोख्यानं वागून दाखवावं, मग ७ ला उपदेश करावा.
थोडक्यात, १,२,३,४,५ आणि ७ यांना तसं एकमेकाबद्दल काहीच प्रेम नाहीये. तेव्हा हे बिनकामाचे उद्योग कोण सांगितलेत? १,२,३,४ आणि ५ यांनी एकत्र किंवा वेगवेगळं सुखानं नांदावं. ७ ला रहायचंय तर राहू द्यावं एकटं. होईल ७ ला जनुकीय प्रॉब्लेम तर ७ बघून घेईल.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 16:15
नवीन
अहो अगदीच याच तर भावनेने सगळा प्रॉब्लेम वाढवलाय ना?
० ते पुढे हे एका ओळीत नाहीत ना, ते खालुन वर या क्रमाने करुन ठेवलेले आहेत शिवाय आलाच एखादा ज्ञान शिकवायला तर तात्पुरते व सोयीनुसार हे अर्ध्याने किंवा खुप झालेच तर एकाने वर खाली होतात पण तात्पुरतेच.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/04/2015 - 19:04
नवीन
बरं मग उलट करूया. ७=१ समजा आणि मी वापरलेली १,२,३,४,५ ही रचना ही ३,४,५,६,७ अशी आहे असं समजा (किंवा अ,ब,क,ड,इ घेवूया. अ स्वतःला अ समजतो, ब स्वतःला ब समजतो हे तरी खरं आहे की नाही?)
दुसर्या शब्दात सांगायचं तर २ ला तो २ आहे ही जाणीव आहे, तशीच १ ला तो १ असल्याची जाणीव आहेच. आणि १ ला इतकं इतकं डिवचलं गेलंय (तुमच्या बापजाद्यांनी ७ ला शिकू दिलेलं नाही इत्यादी) आणि सरकारी नोकर्या वगैरे मधून, शिक्षणातल्या संधी मधून अशा प्रकारे दूर केलं गेलंय की आता १ ला तो १ आहे ही जाणीव पक्की झाली आहे. आता स्वतःच्या पायावर (जबरदस्तीनं उभं रहायला लागलेल्या) १ ला या सामाजिक समरसते मध्ये ईंटरेस्ट असेल असं वाटत नाही. त्याला त्याची गरजही नसेल. या अॅन्टी-१ प्रकारामुळे १ मधले काही स्वप्नांच्य जगात जगणारे सोडले तर १ ला एकत्र यायला २ ते ७ नी भाग पाडलंय. तेव्हा हा प्रकार कितीही आयडियल वगैरे असला तरी १ च्या पूर्वजांच्या पेक्षा १ च्या मनात २ ते ७ बद्दल जास्त अढी असणार. एखादा शत्रू सैनिक सामोपचाराची बोलणी करायला आलेला दिसला तरी या बाजूचा सैनिक जसा बंदूक रोखूनच सावधगिरीनं त्याच्याशी बोलेल, वागेल तसाच १ वागणार.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 19:29
नवीन
अढी मिटावी याकरीताच धागाकर्त्याने प्रमेय मांडलीत ना? आणि काहींना ती पचली नाहीत, हेच सांगायचंय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 06/04/2015 - 17:01
नवीन
>>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं.
किरकोळ दुरूस्ती - गणितात '०/०' किंवा कोणतीही 'अशून्य संख्या/०' म्हणजे 'अनंत' नाही. गणितात असे भागाकार निरर्थक किंवा Undefined समजले जातात.
अवांतर - नाना आणि माईंचा विवाह हा सजातीय का आंतरजातीय का आंतरपोटजातीय का आंतरउपजातीय का आंतरपंथीय का आंतरधर्मीय का आंतरराष्ट्रीय आहे याचा ग्रेटथिंकरांनी खुलासा करावा अशी विनंती आहे. माईंच्या आयडीने (म्हणजे आईने नव्हे तर आयडी वापरून) खुलासा केला तरी चालेल.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 06/04/2015 - 18:07
नवीन
काहीही श्री.. :D ;)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 06/05/2015 - 18:13
नवीन
कोणीतरी हे लिहायची वाट पहात होतो. =)) हाडुक ट्रॉल =))
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 06/05/2015 - 10:28
नवीन
०/० हे undefined आहे ....
- Log in or register to post comments
ब
बाबा पाटील
गुरुवार, 06/04/2015 - 09:37
नवीन
शाळेच्या दाखल्यावरचा धर्म आणी जातीचा उल्लेख काढुन टाका,आज हे केले तर २० वर्षानंतर त्याचे परिणाम नक्की चांगले होतिल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/04/2015 - 09:46
नवीन
प्रचंड सहमत
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 09:51
नवीन
नुस्तं तेवढ्यानं काय होणार? समजा जातधर्म हा निकष हद्दपार झाला असे समजू (जे मुळात कधीही होणे अशक्य), तरीही नवनवीन निकष येतच राहणार.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/04/2015 - 09:56
नवीन
परीणाम होतील तेव्हा होतील. ते उल्लेख काढावे ह्याच्याशी मात्र अगदी सहमत...
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 06/04/2015 - 10:26
नवीन
सहमत.
च्यामारी त्या सरकारी व्यवस्थेच्या. रेडक्रॉसमधे नव्या बाळाला लस द्यायला घेऊन गेलो. नावनोंदणी करतांना तुमची जात काय सांगा, म्हणाल्या बाई. डोक्यात तिडीक गेली. म्हटले बाई याचा काय संबंध इथे? तर ती सद्ग्रहणी उच्चारती झाली. "अहो, आमच्या मनाने नाही विचारत, इथे फॉर्ममधे लिहून सरकारला द्यावं लागतं आम्हाला."
माझा प्रॉब्लेम असा आहे की चारचौघात जात विचारली की तळपायाची मस्तकात जाते. हे सरकार काही पिच्छा सोडत नाही. मुलांच्या दाखल्यावर जात-धर्म लिहायचाच नाही अशी नागरिकांना सूट नाही आहे का?
- Log in or register to post comments
क
कहर
Fri, 06/05/2015 - 07:29
नवीन
अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना चार चौघात जात सांगायला लाज वाटते. तेच लोक आरक्षणाचा गैरफायदा अगदी खुलेआम घेताना दिसतात. हि समाजाची खूप मोठी विडंबना आहे. म्हणजे आरक्षण असेल तेथे स्वत: जात सांगायला काही प्रोब्लेम नाही आणि जर त्याच जातीचा दुसऱ्या कोणी उल्लेख केला कि atrocity लागू. हे कधी थांबणार
(व री न घे )
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 06/05/2015 - 07:36
नवीन
देशाचे अजुन एक दुर्दैव म्हणजे जातीपातीविरोधात आंदोलने करणारे स्वतःच मोठ्या प्रमाणावर जातपात मानतात. महाराच्या पोराने (इथे जातदर्शक उल्लेख हा तुच्छतापुर्ण अथवा द्वेषमूलक नाही हे लक्षात घ्यावे) उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न करण्यास विरोध केल्यावर त्यांना शिव्या घालणारे महार स्वतः जातपात मानतात. त्यांच्यातही पोटजाती आहेत आणी त्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार चालत नाहित के खोटे आहे काय?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 09:46
नवीन
थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना? कारण अशा बहुतेक धाग्यांचा उद्देश तोच असतो. बाकी जाईना का कुठे.
बाकी असे ओरडणार्यांनी अगोदर तथाकथित नीचजातीयांचे वर्तन तपासून पाहणे उद्बोधक ठरेल.
अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 06/04/2015 - 10:29
नवीन
सहमत.
खरेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ठरवून असे विवाह अशक्यच. प्रेमविवाहामधे जे होतं त्याला तरी समाजाने पाठिंबा द्यावा अशीही अपेक्षा करू शकत नाही.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 06/04/2015 - 10:41
नवीन
अशी जाहीर धोतरफेड बरी नव्हे.. बरं दिसत नाही चार चौघात. आता त्यांनी इतकं थिंकून ग्रेट लिहिलय तर नीट लिसनना जरा, तू म्हणजे कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस. तोच तुझा प्रोब्लेम (नोट शब्द नीट टाईपला आहे) आहे. तेव्हा गुरुजींकडे शिकवणी लावणे.
काळजीवाहू नाखु.
- Log in or register to post comments
ह
हाडक्या
गुरुवार, 06/04/2015 - 11:24
नवीन
बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.
हे मान्य..
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 11:30
नवीन
कैकदा आडून आडून सजेशन तेच असते. अशाच एका कार्यक्रमात एका साहेबांनी 'मग ब्राह्मण पोरी आम्हांलाही मिळाल्याच पाहिजेत' असे जाहीर विधान केलेले अजून लक्षात आहे, तस्मात यांचा मुख्य रोख कुठे असतो हे सांगणे तसे अवघड नसावे. भलेही ग्रेटथिंकरसाहेबांना मी बेनिफिट ऑफ डौट द्यायला तयार आहे.
- Log in or register to post comments
ग
ग्रेटथिंकर
गुरुवार, 06/04/2015 - 11:49
नवीन
मी कुठल्याही ब्रिगेड वा बामसेफी दृष्टीकोनातून हा लेख लिहलेला नाही. ब्राह्मणांचा तर यात उल्लेखही नाही. उच्च नीच जातीय विवाह असाही विषय नाही.
विषय आहे भारतीय समाजाचा जीन पूल वाढवुन एकजीनसी समाज तयार करणे. मग असे विवाह कुठल्याही स्तरातील जातींजातीमध्ये होऊ शकतात. जेणेकरुन Inbreeding depresion कमी होईल. फक्त उच्च व नीच जाती हा मुद्दा गौण ठरावा.
http://www.wikipedia.org/wiki/Inbreeding_depression
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 11:58
नवीन
तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट दिलाय असे अगोदरच म्हटलेले आहे, सबब तो विषय नाहीच...
बाकी या अनुषंगाने अजूनेक प्रश्न, दक्षिण भारतात ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत सर्व जातींत कझिन म्यारेज असते. हे इनब्रीडिंग नव्हे काय? अन त्याचा त्यांना तोटा झाल्याचा काही विदा आहे का?
- Log in or register to post comments
स
साती
गुरुवार, 06/04/2015 - 14:24
नवीन
कॉंन्सॅग्विनस मॅरिजमुळे प्रोजेनी डिफेक्टीव निघण्याचा अतिप्रचंड विदा उपलब्ध आहे.
पिडिएट्रिक्स हा विषय शिकताना एक अख्खा सेक्शनच याप्रकारच्या विवाहांनी होणार्या लहान मुलांतील आजारांविषयी आहे.
दक्षिण भारतात गंमत म्हणजे मामा आणि भाच्यांचीही लग्ने होतात.
असाच एक विदा-
http://www.ias.ac.in/jgenet/Vol81No3/91.pdf
या लिंकवरून पुढेपुढे सर्च करत गेल्यास या संदर्भात प्रचंड विदा मिळू शकेल.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 14:30
नवीन
पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक डिफेक्टिव्ह असतं का अॅज़ कंपेअर्ड टु नॉर्थ इंड्यन्स? शिवाय नक्की कसं काय कोरिलेशन वा कॉजेशन आहे ते बघायला आवडेल. हे लै वेळेस ऐकलं आहे पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक असं डिफॉर्म्ड, रोगट दिसत नाही ते कसं काय???? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीच देऊ शकलेले नाही. ते कृपया द्यावे ही विनंती. कारण कझिन म्यारेजला सौथमध्ये अमुकच एका जातीचे असे बंधन नाही.
- Log in or register to post comments
स
साती
गुरुवार, 06/04/2015 - 15:10
नवीन
डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बनवायच्या कर्नाटक सरकारच्या प्रकल्पात सहभागी झाल्याने इथल्या भागात किती प्रचंड शारिरीक आणि मानसिक विकलांगता आहे याचा विदा आहे.
मात्रं उत्तर भारतीय राज्यांची क्रॉस सेक्शनल डाटा माझ्याकडे तरी नाही.
मात्रं कॉनसँग्विनिटी यातल्या किती विकलांगतेकरिता जबाबदार आहे याचा प्रत्यक्ष आकडा सध्या हातात नाही. ते मोजण्याचे काम चालू आहे.
अर्थात असा प्रायमरी अवस्थेतला डाटा मला सध्यातरी इथे उघड करता येणार नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 15:43
नवीन
क्या बात है, एकदम नेमके काम आहे हे. जितके शक्य असेल तितके आणि तेव्हा अवश्य माहिती शेअर करावी, ही विनंती. जमल्यास रिसर्च पेपरही अवश्यमेव पाठवणेचे करावे हे विज्ञापना.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 16:21
नवीन
साहेब प्रिफरेबली उच्चजातीय म्हणजे किंवा असं का वाटतं?? अहो जातीय व्यवस्थेने(व्यवस्था??) उच्च आणी निच अशा अनेक ब्राहमणेतर जातींमधे देखील सोय करुन ठेवलेली आहेच की. उगाच का स्वतःला मानीत "च" रहायचं??
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 16:26
नवीन
हे आम्ही मानण्या न मानण्यावर नाही, तर अनेकांचा जो रोख असतो तो पाहिल्यावर त्यातून आलेलं आहे.
- Log in or register to post comments
म
म्हया बिलंदर
गुरुवार, 06/04/2015 - 19:03
नवीन
व्वा छान!!
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/04/2015 - 09:59
नवीन
आंतरजातीय की आंतरधर्मिय विवाहांना अनुदान वगैरे मिळतं असं मी ऐकलंय. त्यावर कुणी काही प्रकाश टाकू शकेल काय?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 06/04/2015 - 11:04
नवीन
लोल! काय सांगता!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
गुरुवार, 06/04/2015 - 11:27
नवीन
महाराष्ट्र शासनानेच अनुदान जाहीर केलेय असे वाचनात आले होते मध्यंतरी.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/05/2015 - 08:47
नवीन
तसे अनुदान आहेच. पण ते इतके कमी आहे ते पाहते ते दलित जातीत आंतर जातीय (महार + चांभार, महार + ढोर)किंवा वनवासी लोकांमधे असे विवाह प्रमोट करण्यासाठी असावे. पूर्वी युपीए च्या काळात त्याची जाहीरात ढँण ढँण वाजत असायची रेडीओवर. हल्ली रेडीओ ऐकायला वेळ मिळत नाही. असो.
ते अनुदान अजूनही असावे असे वाटते.
- Log in or register to post comments
भ
भुमन्यु
गुरुवार, 06/04/2015 - 15:25
नवीन
आंतर जातिय विवाह केल्यास ५०००० अनुदान महाराष्ट्र सरकार कडुन मिळते.
दुवा १
दुवा २
- Log in or register to post comments
अ
अलबेला सजन
गुरुवार, 06/04/2015 - 11:44
नवीन
होय. आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहांना महाराष्ट्र शासनाकडुन रु. ५००००/- (पन्नास हझार) इतक अनुदान मिळतं.
पुर्वि हे अनुदान रु. १५००० त्यमधे रु. ७५०० चि किसान विकास पत्र व ७५०० चि भान्डि असे होते. मात्र २०१० च्या शासन निर्णयानुसार हि रक्कम आता रु. ५००००/- इतके करण्यात आलेले आहे.
आंतरजातीय विवाहामध्ये वर व वधुपैकि एक जण खुल्या प्रवर्गातिल व दुसरा मागासवर्गिय असणे अभिप्रेत आहे.
व हे सर्व जिल्हा परिषद मधिल समाजकल्याण विभागाच्या अखत्यारित येते.
- Log in or register to post comments
अ
असंका
गुरुवार, 06/04/2015 - 11:50
नवीन
धन्यवाद हो ...!!
रच्याकने , २५००० ची भांडी देत नसावेत
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »