Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५

ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 08:54
🗣 160 प्रतिसाद
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो. तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे. या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते. बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले. तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे. दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही. माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले. विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्‍या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला. मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले. ७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो. अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला.. abcd डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका. बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे. abcd रंगलेल्या गप्पा. abcd दोन उत्सवमुर्ती
वर्गीकरण
कट्टा

प्रतिक्रिया द्या
20370 वाचन

💬 प्रतिसाद (160)
व
वेल्लाभट गुरुवार, 06/18/2015 - 10:05 नवीन
भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव
ती भास्कर कॉलनी नव्हे. ती ब्राह्मण सोसायटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/18/2015 - 12:16 नवीन
ब्राह्मण सोसायटीच ती.. आनंदाश्रमवरुन थोडं पुढे जाऊन उजवीकडे जायचं की उमा निळकंठ व्यायाम शालेकडे जाणार्‍या रस्त्यावर डावीकडे कोपर्‍यावर एक मारुतीचे मंडिर आहे, त्याच्या समोर एक वडापाववाले आहेत, मस्त असतो तो ही वडा! काय आठवणी काढताय रे.. आता इतक्यात कुठले ठाणे आणि कुठला वडापाव आणि कुठची मामि.. :( स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
किसन शिंदे गुरुवार, 06/18/2015 - 15:20 नवीन
अच्छा! तो संपूर्ण भाग पूर्वीपासूनच भास्कर कॉलनी या नावाने मला ठाऊक होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 06/18/2015 - 13:23 नवीन
कुठे आहे म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे गुरुवार, 06/18/2015 - 15:27 नवीन
मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याकडे जाताना उजवीकडे एक छोटा रस्ता दमाणी इस्टेटकडे जातो त्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच आहे सुरूची मिसळ हाऊस. मोजून आठ माणसांना आत बसायला आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/18/2015 - 11:44 नवीन
गजानन वडापाव ठाण्यातला पुरातन वडापाव वाला आहे .खूप खूप पूर्वी त्याची टपरी आताचे वामन हरी पेठे आहे ना, तेथे होती. आता सुशील डेअरीच्या इथे,कौस्तुभ सोसायटीच्या खाली आहे. त्याच्या शेजारीच शेगाव कचोरीचे जॉइंट झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ख
खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 12:42 नवीन
हो बरोबर... हा वडापाव ठाण्यातल्या जुन्या लोकांना माहीत नाही म्हणजे आश्चर्य आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/18/2015 - 13:11 नवीन
मला माहिती नाही खरा. कदाचित असे असेल की मी नेहमीच राजमाता आणि दुर्गा (त्यातही दुर्गा जास्त) मध्ये जायचो त्यामुळे लक्षात नसेल आले :(. आता परत ठाण्याला येइन तेव्हा खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
भ
भाते Tue, 06/16/2015 - 14:25 नवीन
सचित्र कट्टा वृत्तांत आवडला. इथे त्रोटक वृत्तांत लिहिला आहे आणि प्रत्यक्ष कट्टयाला (इथे न सांगण्यासारख्या) बऱ्याच विषयांवर चर्चा झाली असेल याची आधीच्या कट्टयाच्या अनुभवांवरून खात्री आहे. दिपक गेल्या वेळेपेक्षा थोडासा बारिक झालेला दिसतोय. डायटिंग करतो आहेस का रे बाबा? पुढला जुलैच्या पहिल्या आठवडयातला ठाणा कट्टा तरी विकांताला किंवा किमान शुक्रवारी ठेवा. म्हणजे मला कट्टयाला येता येईल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 08:04 नवीन
बहूदा शनिवारी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 10:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 10:41 नवीन
मला नाही दिसत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सूड Wed, 06/17/2015 - 10:52 नवीन
हा दिसला!! यातले मानाचे पहिले पाच कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 11:36 नवीन
पण पहिले तुम्हीच. (सुडांचे शाब्दिक आसूड सकारात्मक घेणारा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 06/17/2015 - 17:52 नवीन
पण पहिले तुम्हीच.
ते तर आहेच हो, पण हे बदलापूरातून ...गेला बाजार पुण्यातून झालं. मुंबैच्या मध्यवर्ती ठिकाणचं काही कळायला नको का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 18:08 नवीन
चला, मुंबैकरांना वादात ओढवून, धाग्याला थोडे पाणी घालून ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 12:12 नवीन
मलाही हाफीसातून फोटो दीसत नाहीये पण आठवतात त्याप्रमाणे बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 06/17/2015 - 17:50 नवीन
ह्यातले तुम्ही सोडून सगळ्यांना ओळखतो हो मी, मानाचे पहिले पाच साठी अभ्यास वाढवा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कंजूस Wed, 06/17/2015 - 10:48 नवीन
टका, तुमच्या ब्राउजरच्या/ फायरवॅालमध्ये "dot org " site ban आहेत का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 10:59 नवीन
ब्राउसर मध्ये नाही आणि फायरवॉलचे माहित नै आणि मला अरे-तुरेच करा...मी फार फार लहान आहे तुम्च्यापेक्षा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
द
दमामि गुरुवार, 06/18/2015 - 10:49 नवीन
टक्याकाका!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 10:52 नवीन
बोला आज्जोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/18/2015 - 16:40 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कंजूस Wed, 06/17/2015 - 10:59 नवीन
या फोटो न दिसण्याबद्दल मागच्या वर्षी वल्ली यांना विचारले होते. त्यांनी सांगातले काहीजण office मधून मिपा पाहतात तिथे काही साइटस ब्लॅाक केलेल्या असतात. फोटो हे मुळात दुसय्रा साइटच्या http auto request असतात.कोणाकडे Photobucket /google /Flicker/postimg यापैकी blocked केलेल्या साइटवरचे फोटो असल्यास दिसणार नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Wed, 06/17/2015 - 12:16 नवीन
छान लिहीलाय व्रुत्तांत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 12:44 नवीन
हाप-शेंचुरीनिमित्त खटपट्यांचा सत्कार एक वही व एक पेन देउन कर्ण्यात येत आहे (अभ्याने फुकटात फ्लेक्ष बनवून दिला तर तो कळवा नाक्यावर ५ मिनिटांसाठी लावण्याचे आश्वासन मोफत)...लवकरच आणखी लेखनास सुरवात करावे हे विनंती शुभेछ्छूक - समस्त कळवा + खारेगाव (पारसिक नगर सकट) हाथ कि सफाई संघटना
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/17/2015 - 12:48 नवीन
पुण्याचे तिकीट विसरलास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 12:52 नवीन
नाय ब्बॉ...आम्च्या शेजार्यांब्रोब्र इतके वैट्ट नै वागत आम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Wed, 06/17/2015 - 12:54 नवीन
एका कट्ट्याला साडेतीन धागे आणि पाश्शे प्रतिक्रिया कशा व्हायच्या मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 13:04 नवीन
फ्लेक्स नकोरे बाबा !! आव्हाडची माणसं मला शोधत घरी येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भटक्या योगी Wed, 06/17/2015 - 14:43 नवीन
​ह्यो कट्टा म्हणजे नक्की काय रे भाऊ? ​मिपा वर नवीन आहे. कृपया माहिती द्या. मीही ठाण्यातून आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 14:49 नवीन
कॉलिंग मुवि - द कट्टा-एक्सपर्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्या योगी
म
मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 17:11 नवीन
जेंव्हा २ किंवा त्यापेक्षा अधिक मिपाकर एकमेकांना प्रत्यक्ष भेटतात, त्या क्षणापासून कट्टा सुरु होतो. त्यावेळी खाद्य-पेयाचा समाचार घेतलाच पाहिजे असे नाही. तुम्ही ठाण्याला रहात असाल तर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक कट्टा ठाण्यालाच होणार आहे. आम्ही कट्ट्याचे जाहीर आमंत्रण देतो. त्या कट्ट्याचे पण जाहीर आमंत्रण इथेच प्रकाशीत केल्या जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भटक्या योगी Fri, 06/19/2015 - 07:22 नवीन
धन्यवाद मुक्त विहारि ! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रसाद१९७१ Wed, 06/17/2015 - 15:02 नवीन
ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले समजतात का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 15:03 नवीन
हा प्रश्न पुणेकरांनाच जास्त असतो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 15:15 नवीन
नम्र प्रश्नाला बगल देण्याचा क्षिण प्रयत्न! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 15:21 नवीन
तो तुमचा समज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 15:27 नवीन
चालु द्या तूमचे निरर्थक आत्मकुंथन! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 15:28 नवीन
आपणांस मुद्दा समजलेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 16:15 नवीन
हा तुमचा निरर्थक भ्रमवाद आहे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड Wed, 06/17/2015 - 16:44 नवीन
गुरुशिष्याची जुगलबंदी छान रंगली आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 17:11 नवीन
हा कुज कट सुडुक 1नंबरचा जंगली आहे! :-D :P :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 17:46 नवीन
मनाने साफ आहे. (सुडांचे शाब्दिक आसूड नेहमीच सकारात्मक घेणारा) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 17:48 नवीन
मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि गुरुजी यांच्या कट्ट्याला जायचे आहे. काय ती जुगलबंदी एकदाच बघता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पैसा Wed, 06/17/2015 - 18:11 नवीन
परवा बुवा लोणचे फेकून मारणार होते. शेवट मीठ पिरपुडीवर भागवलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 19:12 नवीन
=)))))) आणि नंतर त्यावरच हत्तीच्या डोक्यात लिंबु पिळुन मालिश क्येलं!!!! :-D :-D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 06/17/2015 - 19:47 नवीन
मुरवणं झालं की सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 21:06 नवीन
आरारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Wed, 06/17/2015 - 19:16 नवीन
तात्या, ह्या लव ट्रैंगल मदी आमास्नी वडू नका. हे तिघं काय ते करतेत (आमी मजा बगतांव ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा