दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो.
तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे.
या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते.
बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले.
तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे.
दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.
माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले.
विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या.
दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला.
मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले.
७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो.
अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला..
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्ती
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्ती
💬 प्रतिसाद
(160)
स
सूड
गुरुवार, 06/18/2015 - 11:15
नवीन
आपुला संवाद आपणासि!! =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 11:31
नवीन
;)
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
गुरुवार, 06/18/2015 - 09:40
नवीन
अहो त्या टक्याला खावु दे ना धम्मकलाडू. आपण तुम्च्यासाठी अळीवाचे लाडु आणायला सांगुया अनाहितांना हाकानाका.
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 06/18/2015 - 10:45
नवीन
छे, छे, आधी लाडू बुंदीचे (टक्या देणार)मग आमचे अळिवाचे!
(आधी लगिन कोंढाण्याचे .....तसे)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 10:52
नवीन
बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना =))
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/18/2015 - 11:42
नवीन
स्वयेच करी स्वतःशी संवादु |
ड्वायडीची किमया वाटू पाहे ||
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 12:49
नवीन
मी पण ओळखलेय तुम्ही कोण ते
ल्ल्ल्लूऊऊऊउ
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/18/2015 - 13:16
नवीन
शक्यच नै. सांगा बरं. आमाला पण ऐकायचंय "मैं कौन हूं".
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 14:11
नवीन
आपण भेटलोय :)
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 06/18/2015 - 21:05
नवीन
नै ब्वा. मी फटू बगितलाय तुमचा. तुमाला बगितलेलं आटवत नाय. तुमी माजे पैशे बिशे घेत्लेते का?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4