Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५

ख
खटपट्या
Tue, 06/16/2015 - 08:54
🗣 160 प्रतिसाद
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो. तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे. या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते. बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले. तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे. दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही. माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले. विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्‍या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला. मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले. ७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो. अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला.. abcd डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका. बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे. abcd रंगलेल्या गप्पा. abcd दोन उत्सवमुर्ती
वर्गीकरण
कट्टा

प्रतिक्रिया द्या
20370 वाचन

💬 प्रतिसाद (160)
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 03:07 नवीन
तरी अद्याप आपण, बुवा आणि स्पा यांची जुगलबंदी बघीतलेली नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/18/2015 - 03:27 नवीन
=))))))) लै मज्जा येते पां डुब्बा ला छळायला! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/18/2015 - 03:32 नवीन
लै मज्जा येते गुर्जींनापण छळायला :-D (स्मायल्या आणा रे.) स्मायली बिन मै यु..कैसे जिया..कैसे जिया स्मायली बिन...!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु गुरुवार, 06/18/2015 - 08:30 नवीन
अत्ता मुवींना एक फक्त जुगलबंदी कट्टा ठेवावा लागणारः आकर्षण येन प्रकारे: स्पांडुबा-बुवा बुवा-सगा+वल्ली बॅट्या-स्वघोषीत प्रवक्ता प्रगो-प्यारे

सांघीक

श्रीगुरुजी+क्लिंटन्+संदीप डांगे+मृत्युंजय वि पिंपातले उंदीर्+नांदेडीयन+आजानुकर्ण या सांघीक कलगी तुर्यामध्ये काही भिडू येऊन जाऊन असतील प्रो कब्बडीसारखे. नंतर "यंदा कर्तव्य" या सदाहरीत विषयासाठी एका बाजूने टक्या+कॅप्टन्+जेपी तर दुसरी कडून विषयाची तीव्रता आणि प्रतिसाद निक्ड पाहून पै ताई सक्षम भिडू मैदानात उतरवतील. मुवींसाठी मिपा जुगलबंदी कट्टा आयोजन समीतीकरीता अभा मिपा महानगरी कट्टा संघ अंकीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 08:51 नवीन
कहर आहात _/|\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मृत्युन्जय गुरुवार, 06/18/2015 - 09:23 नवीन
हाहाहाहा. माझे नाव बघुन डोळे भरुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन गुरुवार, 06/18/2015 - 09:43 नवीन
ओ मी नाय ओ कसलाच प्रवक्ताबिवक्ता. तो मान निरर्थक अत्मकुंथन करणार्‍यांकडे आहे. (नेहमीचे नव्हेत, ते दुसरे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु गुरुवार, 06/18/2015 - 10:44 नवीन
छे च्छे ! तुल प्रवक्ता म्हटलंच नाहीय्ये,तू इकडून मैदानात उतरल की, आप्सूक उतरणार्य तुझ्या (जिव्हाळ्याच्या) प्रतिस्पर्ध्या बद्दल आहे ते. मुद्दाम येडा बनून पेढा खाणार्या बॅट्याचा पक्का शाना मैतर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 10:53 नवीन
बॅटमॅनची कॅटवुमन कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्यारे१ गुरुवार, 06/18/2015 - 10:42 नवीन
प्रगो शी आपण फाइट करू शकत नै. आमचा सविनय पास! नाखु तुमच्यात मला भा सं दिसू लागले आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 10:54 नवीन
मला प्रगोसाठी एक आपोनंट सापडला आहे...नाव जाहिर नै कर्णार नैतर माझचं भजं व्हायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
संदीप डांगे गुरुवार, 06/18/2015 - 15:08 नवीन
नाखुकाका, आम्हास संघाची (टीमची ओ.. नायतर भलतंच समजाल) अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे मी संघाबाहेर बरा. परत कुठल्या बाजूने मैदानात उतरू हे नेमकी वेळ येईपर्यंत मलाही सांगता यायचे नाही. (बाकी नाखुंनी माझं नाव मिपावरच्या दिग्गजांसोबत घेतले हे वाचून मनात गुदगुल्या झाल्या :-) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 06/19/2015 - 07:36 नवीन
नाही तसे काही नाही आम्च्याकडे "वाईल्ड कार्ड" प्रवेश पद्धत आहे तेव्हा काळजी नसावी आणि तसेही हे चमू खो-खो पद्ध्तीने असल्याने तुम्हाला दोन्ही बाजूंनी खेळण्याची संधी देऊ. खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 15:49 नवीन
उलट मुंबईकरांना ठाणेकर आपल्यातलेच समजतात. कारण मुंबई पूर्वी फार लहान होती. जसा जसा मुंबईचा विस्तार होत गेला तसा ठाण्याचा काही भाग मुंबईला जोडला गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
म
मृत्युन्जय Wed, 06/17/2015 - 15:52 नवीन
ठाणेकर स्वतःला मुंबैइकर समजतात का हा देखील एक उप्प्रश्न आहे. मला विचाराल तर ठाणेकर मुंबै म्हटले की दात विचकतो आणि मुलुंडपल्याडच्या कुठल्याही भागाला मुंबई म्हणताना मुंबईकराची जीभ चाचरते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 15:59 नवीन
खरी मुंबै ती फोर्टातलीच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 06/18/2015 - 13:49 नवीन
वरचे लोक्स वरळीला/हाजीअलीकडे मुंबई संपते असे मानतात ... आणि सेन्ट्रल वरची स्टेशने त्यांना अगदीच नाईलाज म्हणून लक्षात असतात ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
भ
भटक्या योगी Fri, 06/19/2015 - 08:16 नवीन
अजिबात नाही......आणि आम्हा ​ठाणेकरांना 'ठाणेकर' म्हणूनच ओळखलं जाव, मुंबईकर नाही ​:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ख
खटपट्या Fri, 06/19/2015 - 10:11 नवीन
+१ ठाणे आधीच होते. मुंबई नंतर अस्तीत्वात आली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटक्या योगी
स
सविता००१ Wed, 06/17/2015 - 16:40 नवीन
मस्त मजा केलेली कळते आहे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/17/2015 - 18:20 नवीन
पहिलाच कट्टा वृतांत सुरेखच झालाय.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 21:28 नवीन
कळविणेस अत्यंत आनंद होतो, की समांतर-मिपा कट्टा १५ जून लाच बाजूच्याच हॉटेल मध्ये संपन्न झाला. त्यावेळचा एक फोटो हाती लागला आहे. खालच्या चित्रात डावीकडून उजवीकडे १. नाना २. हितेश ३. ग्रेटथिंकर ४. सद्दाम आणि ५. टॉपगिअर्ड Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 22:21 नवीन
फोटो माईंनी काढलाय भौतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड गुरुवार, 06/18/2015 - 05:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 06:00 नवीन
बहूदा त्यांनी "पायरेट्स ऑफ द कॅरेबियन", मधल्या "जॅक स्पॅरो" कडून म्रुत्युंजय अमृत, घेतले असावे. खरे तर माईंचा जन्म इसवीसना पुर्वीचा असावा, असे त्यांच्या प्रतिसादावरून वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 06:10 नवीन
पहिला सजीव (अर्थात माईंनंतरचा...हा माईंनीच बनवला म्हणतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 06:16 नवीन
असेही असेल.... माई तेरा महिमा अपार.... बाद्वे, शतक लागले का? आजकालची सही : आम्ही धाग्यांचे शतक लावायला ४-५ प्रतिसाद देवू शकतो.* *अटी लागू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
इ
इरसाल गुरुवार, 06/18/2015 - 10:41 नवीन
मग बबिता बा कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विनोद१८ गुरुवार, 06/18/2015 - 11:08 नवीन
ही 'बबिता बा' मला तर माईची ताई वाटते
नुकतीच अवतर्लेय मिपातलावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/18/2015 - 02:47 नवीन
कित्ती विलोभनीय फोटू हाय,नै!? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/18/2015 - 03:04 नवीन
हजेरी लावलेल्या पहिल्या कट्ट्याबद्दल अन पहिल्या वृत्तांताबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 03:58 नवीन
प्रतिसादातून लेखा कडे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/18/2015 - 04:24 नवीन
बयो या कथामालिकेनंतर खटपट्याने बहुधा काही लिहिलं नव्हतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ख
खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 06:18 नवीन
बयो नंतर डोब्रा लीहीले ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्यारे१ गुरुवार, 06/18/2015 - 06:21 नवीन
भा सं ना वेळेत सापडली नसेल लिंक. -भा सं चा पंखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 06:23 नवीन
भा सं म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ख
खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 06:20 नवीन
आणि मी काय तुमच्यासारखा लेखक नाय. जसं सुचतं तसं लीवतो. सुचायला डोस्क जरा थंड होउद्या. सद्या दोन तीन कामात व्यस्तं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/18/2015 - 06:25 नवीन
म्हणूनच 'बहुधा' लिहिलं होतं. डोब्रा वाचले होतेच फक्त बयोच्या आधी प्रकाशित झाले असा समज होता.
तुमच्यासारखा लेखक नाय
अन होऊ पण नका. ललित लेखनाची एक ओळही लिहिता येत नाही मला :-( .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
भ
भाते गुरुवार, 06/18/2015 - 07:32 नवीन
मुवि, गेल्या वर्षी पावसाळ्यात (पाऊस नसताना) केलेली पळसदरीची वर्षासहल आठवली. अर्थात, पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अजुन भरपुर वेळ आहे आपल्याकडे. या वर्षीचा वर्षासहलीचा धागा येऊ द्या. मिपा प्रथेप्रमाणे सर्वसमंतीने तारिख आणि ठिकाण ठरेलचं!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 08:08 नवीन
साधारण पणे जुलैच्या १ल्या किंवा २र्‍या आठवड्यात. माणशी ५००/-रु. खर्च अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
द
दमामि गुरुवार, 06/18/2015 - 08:06 नवीन
सोमवार असल्याने कट्टा हुकला. रच्याकने,कुठचा हो तो डुआयडी?????
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 08:16 नवीन
तुम्ही तारीक आणी वेळ सांगा, आम्ही नक्की येवू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि गुरुवार, 06/18/2015 - 08:25 नवीन
जुलैचा ठाणे कट्टा ठरतोय ना? कधिची तारिख?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अजया गुरुवार, 06/18/2015 - 08:52 नवीन
५जुलैला अनाहिता कट्टा आहे ठाण्याला.येता का दमामि? तुम्हाला बघुन तरी घेऊ!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 11:30 नवीन
तुम्हाला बघुन तरी घेऊ!
खरा अर्थ - तू ये, तुला बघतेच... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दमामि गुरुवार, 06/18/2015 - 08:56 नवीन
अय्या खरंच?
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 06/18/2015 - 09:20 नवीन
अय्या हो ना!या ना.किनै खूप मज्जा अस्ते.अनाहिता कट्टयाला यायचं हं!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 09:55 नवीन
खाली - ताई, माई, आक्का ल्हिआयचे र्हायले कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
द
दमामि गुरुवार, 06/18/2015 - 09:30 नवीन
अनाहिता कट्टयात फकस्त टक्याचे लाड होतात म्हणे, बाकिच्याना धम्मकलाडू मिळतात, असे नाठाळ चौकड़ी बोलत होती.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 09:54 नवीन
खिक्क...नाठाळ चौकडी कोण म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा