निखिल वागळे
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.
वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?
हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?
💬 प्रतिसाद
(163)
न
नेत्रेश
Sun, 06/28/2015 - 09:09
नवीन
क्लिप मध्ये वागळे एकदम पिसाळल्या सारखे ओअरडत होते. समोरच्याला बोलायची, त्याची बाजु मांडण्याची बिलकुल संधी देत नव्हते. जोशींनी नक्की त्यांचे काय बिघडवले होते ते समजले नाही. पण जोशी हे अडनाव ऐकल्यावर तर त्याचा तोलच सुटला. त्यानंतर वागळे जे काही बोलले त्याला बरळले म्हणाबे लागेल. तरीही जोशी शांत राहुन डीसेंट कॉन्हर्सेशन करायचा प्रयत्न करत होते.
वागले शाहु, फुले, आंबेडकर यांचे उगाचच नाव जपत होते. या तीघांविषयी वागळेनां फारशी माहीती दीसत नाही. वागळेंच्या आचार विचार आणी बोलण्यावरुन तरी शाहु, फुले, आंबेडकर यांचे कोणतेही साहीत्य अथवा विचार वागळेनी अभ्यासलेला वाटत नाही.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sun, 06/28/2015 - 09:19
नवीन
आंबेडकरांनी आपल्या हजारों, लाखों अनुनायांसह धर्म बदलला म्हणुन हींदु धर्माचे काय आणी कीती नुकसान झाले? (जाणकारांनी माहीती द्यावी)
तर वागळेनी घर्म बदलुन कुणाला काय फरक पडणार आहे? कदाचीत वागळेलाच थोडा अल्पकालीन फायदा होईल.
वागळेंनी धर्म बदलायचे ठरवले तर त्याच्या घरचे तरी त्याच्याबरोबर आपला धर्म बदलतील काय? त्याला सपोर्ट तरी करतील काय? बहुतेक तुझी नाटके TV वरच ठेव, घरी आणु नको असाच सल्ला (दम) मीळेल.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Sun, 06/28/2015 - 10:10
नवीन
इस्लाम १८ % , ख्रिस्चन २ % , जैन बौद्ध १ %
- २१ % आधीच झालेले आहे.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Mon, 06/29/2015 - 09:11
नवीन
इस्लाम १८%, ख्रिस्चन २% यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे बदललेली नाही. आणी १% जैन्,बौद्ध आपल्याकडे आधीपासुनच होते.
तेव्हा बाबासाहेबांच्या धर्मांनरामुळे हींदु धर्माला फारसा फरक पडलेला नाही.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 09:34
नवीन
तुम्ही तुमचा शर्ट बदलता तो तुम्हाला स्वतःला फरक पडण्यासाठी की कुठल्या तरी कंपनीला फरक पडण्यासाठी ?
धर्म बदलणारा माणुस त्याला काहीतरी फरक पडणे अपेक्षितसते म्हणुन धर्मांतर करतो. हिंदू धर्माला फरक पडावा म्हणून नव्हे.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Wed, 07/01/2015 - 07:37
नवीन
पण स्वत: मध्ये फरक पडण्यासाठी शर्ट किंवा धर्म बदलणारा माणुस मी ते करुन दाखवीन अशा धमक्या दुसर्याना देताना पाहीला नाही. या क्लिप मध्ये तर वागळे स्वतःचा धर्म बदलण्याची धमकी देतो आहे. जसेकाही याच्या धर्म बदलण्यामुळे हींदु धर्माचे फार मोठे नुकसान किंवा बदनामी होणार आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
Wed, 07/01/2015 - 11:36
नवीन
पण मी काय म्हणतो दादा आणि नेत्रेश भाऊ..वागळे साहेब या फुकाच्या वल्गना का करत आहेत? करून टाका ना म्हणा धर्मांतर. हिंदू धर्माला तर काहीच फरक पडणार नाही हे उघड सत्य आहे. आणि वागलेंना काय फरक पडेल ते त्यांना धर्मांतर केल्यावर कळेलच. स्वत: च्या धर्माचे वाभाडे काढण्याची हिम्मत दुसऱ्या एखाद्या धर्मात जाऊन करून बघा म्हणा (उदा. इस्लाम स्वीकारून इस्लाम वर टीका किंवा ख्रिश्चन स्वीकारून ख्रिश्चन वर टीका ..किंवा अजून काही)
त्यांनी क्लीप मध्ये वापरलेल्या भाषेप्रमाणे "त्यांच्या पार्श्वभागात दम असेल तर हे करून दाखवा!"
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 06/28/2015 - 10:07
नवीन
एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी हा वागळेचाच धाकटा भाऊ आहे.
मिपावर देखील वागळेचे भाऊबंद आहेत.
वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sun, 06/28/2015 - 11:15
नवीन
दोन लोक फोनवरून एकमेकांशी भांडले जी त्यांची खाजगी बाब होती पण तिला मुद्दामहून इतकी प्रसिद्धी दिलेली दिसते.
मुळात संभाषण रेकॉर्ड कोणी केल हे हि महत्वाच आहे कारण रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला फोन सुरु होतानाच माहिती होत कि यातून काहीतरी "ज्वलंत" कंटेंट मिळणार आहे. यावरून उद्देश स्पष्ट होऊ शकतात.
वागळेंनी पुराव्याशिवाय आरोप केले असतील तर त्यांच्यावर कारवाही होणे शक्य आहे आणि योग्यही.
पण इथे कोणीही त्या जोशी नामक व्यक्तीविषयी अक्षरही काढले नाही याचे आश्चर्य वाटले.
एखाद्याला मुद्दामहून तोपर्यंत डिवचत राहायचे जोपर्यंत तो चिडत नाही आणि संयम सुटून बरळत नाही हि युक्ती बरेच लोक वापरतात. ते जुने आप वाले योगेंद्र यादव हि तसेच! इथे हि असेच काहीतरी केलेले दिसते. रात्री एखाद्याला निनावी संदेश पाठवणे अयोग्य नाही का?
वरती लेखामध्ये दिलेल्या लिंकवर "motivational SMS " पाठवला असे म्हटलंय! :D
हे म्हणजे सरळ सरळ "आपला तो बाब्या… " असे झाले.
बाकी कायद्यानुसार कारवाही व्हावीच पण कोणी स्वतःहून धर्म बदलणार असेल तर ती त्याची खाजगी बाब आहे त्याची इतकी प्रसिद्धी कशासाठी?
आणि एक प्रश्न, भटजी म्हणणे खरोखर अॅट्रॉसिटी कायद्याखाली येते का?(माहितीकरिता विचारला आहे, जाणकारांनी सांगावे)
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Sun, 06/28/2015 - 12:09
नवीन
कुणी धर्म बदलला आणि नव्या धर्माबद्दल अभिमान बाळगला की जुन्या धर्माचे लोक का चवताळतात हे समजत नाही.. आपल्या कोरसमधून एकजण कमी होतोय , याची भीती वाटुन ते बेताल होतात का ?
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 06/29/2015 - 10:13
नवीन
केम छो हितेसभाय....
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 06/28/2015 - 11:34
नवीन
वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.>>>>>अनिरुद्ध जोशी ही सुद्धा व्यक्ति नसुन प्रव्रुत्ती आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 06/28/2015 - 12:05
नवीन
ज्जे ब्बात! :-D अता शंभर धावा नक्की! ;-)
पांडूsssss , ये रे!!! :-D
- Log in or register to post comments
श
शून्य
Sun, 06/28/2015 - 12:53
नवीन
Midlife crisis मध्ये आहे ओ तो. फार मनावर घेउ नका त्याचं
- Log in or register to post comments
व
वॉल्टर व्हाईट
Sun, 06/28/2015 - 15:26
नवीन
पर्फेक्ट. एका शब्दात बोळवण !
- Log in or register to post comments
श
शि बि आय
Mon, 06/29/2015 - 10:04
नवीन
ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे की वागळे हे हातात असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करायला फार वेळ घेणार नाही. जो माणूस बाहेर निर्भीड निरपेक्ष पत्रकार म्हणून ओळखला जातो तो प्रत्येक्षात अश्या कोत्या, हिणकस मनोवृत्त्तीचा आहे हे कळून येते. फुले, आंबेडकर ह्यांचे आदर्श समोर ठेवतात मग जातीवाचक संबोधने का वापरतात ? ह्यालाच " माज" ह्यापलीकडे काहीही म्हणू शकत नाही. जर अशा प्रकारचा आक्रस्ताळेपणा वागळे जर करत असतील म्हणूनच त्यांना एका मोठ्या वाहिनीने ह्यांना नारळ दिला आहे.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 19:24
नवीन
..
- Log in or register to post comments
क
कोंकणी माणूस
Mon, 06/29/2015 - 11:51
नवीन
शिव्या घाला, थोबाडीत मारा काही पण करा बस माझा TRP वाढला पाहिजे - इति .वागळे
- Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर
Mon, 06/29/2015 - 12:36
नवीन
दोन हाणा पण सरपन्च म्हणा!!!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 06/29/2015 - 11:59
नवीन
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल जीनियस- नव्या अवतारासाठी शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 06/29/2015 - 12:09
नवीन
लगेच ओळखायला येतात कि नाहि :)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 06/29/2015 - 12:11
नवीन
अगदी अगदी...
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/29/2015 - 13:01
नवीन
सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि फुजी असे लघूरुप वापरावे.
(कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे)
- Log in or register to post comments
च
चिगो
Mon, 06/29/2015 - 13:08
नवीन
हा पण चांगला आयडी आहे तसा..
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/29/2015 - 13:20
नवीन
हे हे, बुक करून ठीवतो आताच... :-)
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 06/29/2015 - 13:40
नवीन
दुरुस्ती
कुठे कुठे शोधु तुला, तुझे अनंत देव्हारे ऐवजी कुठे कुठे बोधु तुला, तुझे (आय डी) अनंत देव (सुद्धा) हारे !
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 06/29/2015 - 14:12
नवीन
येक नंबर, आपल्याला हे जमलंच नसतं.
म्हणून इतं आणून चिकटवलं आणि बघा खास ना'खु टच मिळाला की नै..
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 14:18
नवीन
अहो रूपम् अहो ध्वनिम् !
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 06/29/2015 - 14:23
नवीन
"अहो रूपम् अहो ध्वनि:" असं आहे ते.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 14:24
नवीन
बरोबर
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/29/2015 - 17:33
नवीन
वागळे किंवा तत्सम मंडळी असली नाटकं करतात त्याचं काहि वाटत नाहि.... ते खपतं याचं दु:ख वाटतं
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 19:16
नवीन
रेकॉर्डिंग कुणी केले ? वागळेनी की जोशीनी ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/29/2015 - 19:49
नवीन
.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 06/29/2015 - 19:53
नवीन
बोलल्ले ते वागळे आणि अनिरुद्ध जोशी ना ?
हा निखिल जोशी कुठून मधे आला ?
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 06/29/2015 - 19:58
नवीन
आपल्यासारख्यांना याची फोड करुन सांगावी लागु नये दादा.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 06/30/2015 - 02:06
नवीन
दोन माणसे फोनवर बोलत असताना तिसर्याने कसे काय रेकॉर्डिंग केले. ? तॉ जोशी या जोशीला सामील होता म्हणजे फोन रेकॉर्ड होतोय हे बोलणार्या जोशीला ठाउक होते. वागळेला फोन रेकॉर्ड होतोय हे ठाउक नव्हते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 06/30/2015 - 04:50
नवीन
वागळे साहेब जर घटीत-अघटीत गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे कधिही-कुठेही ऐकु शकतात तर निखील जोशीने रेकॉर्डींग केल्यास आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात??
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/30/2015 - 06:18
नवीन
स्वतःला शोध पत्रकार म्हणवणार्या माणसाला आपला कॉल रेकॉर्ड केला जाऊ शकतो हे समजत नसेल का?
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 06/30/2015 - 06:26
नवीन
जोशीने आधी निनावी मेसेज करुन वागळेला इरिटेट केला.
नंतर कॉल केला.
आता त्या संवादात वागळे जहाल शब्दात बोलणार हे नक्कीच होते.
चतुरपणे जोशीने त्यामुळे हा कॉल रेकॉर्ड केला.
वागळेने ' कावा ' असा उल्लेख केला आहे, तो असाच तर असतो ना ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/30/2015 - 06:28
नवीन
शोध पत्रकारिता म्हटल्यावर हे चालतच ना? परवा अर्णवकडे ललित मोदीच्या संबंधित ईमेल्स कशा पोचल्या हेच लोक विचारत होते ना!
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 06/30/2015 - 06:32
नवीन
मिपावरदेखील काही कावेबाज लोक जिनियस माणसाना डिवचत बसले आहेत.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/30/2015 - 06:56
नवीन
मिपावरदेखील काही कावेबाज लोक ====> कोण?
जिनियस माणसाना ====> कुठल्या?
डिवचत बसले आहेत =====> कशावरून?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 08/14/2015 - 00:27
नवीन
मला हो
माझे सगळे धागे बघा
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 06/30/2015 - 09:39
नवीन
गेट वेल सून या एसएमएस मध्ये इरिटेट होण्यासारखं काय आहे?
तसं असेल तर वागळे ज्या जमातीला रिप्रेझेंट करतोय त्यांचा 'गुढघ्यात' असा उल्लेख केला तर चालेल ना? की हे वाक्य टाकून मी तुम्हाला 'इरिटेट' केलं? लै इरिटेट होणारे लोक ब्वा तुम्ही. गेट वेल सून, दादा.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 06/30/2015 - 09:49
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 06/30/2015 - 09:56
नवीन
नाही हो....
ते तसे नाहीत.
ते फार ज्ञानी आणि उदारमतवादी आहेत.
ते फक्त त्यांचे ज्ञान आपल्याजवळच ठेवतात, असे वाटते.
शंका विचारल्या तर त्यांच्याकडे उत्तरे असतात.पण ते देत नाहीत.दादा, असें ज्ञान झाकून कसे चालेल?
पुर्वी एक गहन-विचारी होते, ते पण असेच.
हो की नाही हो, दादा.
(दादांचा आणि फुलथ्रॉटल जिनियस, यांचा फॅन) मुवि
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Tue, 06/30/2015 - 06:37
नवीन
आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग होतय हे वागळेंना माहित नसावं. पण रेकॉर्डिंग करणार्या जोशींना ते पक्क माहित होत. त्यामुळे अगोदरच उचकलेल्या वागळेंना अजून शांतपणे उचकवणे सोप गेल असाव. निखिल वागळे आक्रमक व उचकणारा पत्रकार आहे हे सर्वज्ञात आहे. ते काही संयमी व विवेकी पत्रकार नाहीत. वागळे हे पत्रकारितेतील आदर्श नसले तरी पत्रकारितेला एक वेगळा पैलू देण्यात यशस्वी आहेत.माध्यमदांडग्यांची निर्मिती कशी व का झाली हा वेगळा विषय आहे. वागळे हे शेवटी एक गुणदोषांचे पॅकेज आहे. पुरोगाम्यांना शाहू फुले आंबेडकर घडोघडी लागतात हे तर सर्वश्रुत आहे. सामाजिक राजकारणसाठी शेवटी काहीतरी भांडवल करावे लागते.त्यांना काही शाहू वा फुले वा आंबेडकर काही शंभर टक्के मान्य नसतात. आपल्या सोयी साठी व सोयी पुरते मान्य असतात. पण तसे प्रत्येक संघटना वा पक्षाचे प्रेरणापुरुषां बद्दल असते.काँग्रेसला गांधी आपल्या सोयीपुरते मान्य असतात.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 06/30/2015 - 06:40
नवीन
ज्जे बात!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 06/30/2015 - 10:02
नवीन
राजकारणी आपापल्या सोयीपुरते महापुरुषांना वापरतात . जसे की सध्या वल्लभभाई पटेल
- Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर
Tue, 06/30/2015 - 13:08
नवीन
मुनी +१
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »