Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुराणातील वांगी ?

J
Jack_Bauer
Sun, 07/12/2015 - 21:25
🗣 171 प्रतिसाद
आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ? आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया : अ : अणूबॉम्बचा शोध ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!! मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ? अ : विमान ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर. मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ? अ : प्रोग्रामिंग ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे. मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो. अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी . मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ? मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले. आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

प्रतिक्रिया द्या
60448 वाचन

💬 प्रतिसाद (171)
क
कंजूस Mon, 07/13/2015 - 00:04 नवीन
ही वांगी तितकीशी काटेरी नाहीत.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Mon, 07/13/2015 - 02:00 नवीन
अणुबॉम्ब आणि विमान हे आधुनिक काळातले शोध आहेत. त्यामागे दीर्घकाळ चालणारी संशोधने आहेत. अणुबॉम्ब निर्माण होण्यामागचे डाल्टनच्या सिद्धांतापासून रदरफोर्ड, बोर वगैरे शास्त्रज्ञांचे काम हे आपण तपासून बघू शकतो. अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे चुकीचेही ठरले आहे. अशा खाचखळग्यातून प्रवास करत विज्ञान ह्या टप्प्यावर पोचले. विमानाचेही तेच. अर्किमडिजने द्रव पदार्थांचे वागणे ओळखायचा प्रयत्न केला. मग न्यूटन, रॅले, पास्कल, बर्नुली हे वैज्ञानिक आणि अनेक तंत्रज्ञ ह्यांनी मेहनत करुन राईट बंधूंच्या विमानापर्यंत प्रगती केली. हे सगळे टप्पेही विज्ञानाच्या इतिहासात नोंद केलेले आहेत. महाभारत वा अन्य ठिकाणची अणुबाँब, विमाने वगैरे कल्पना ह्यांना असला वैज्ञानिक इतिहास नाही. आधुनिक विमानाच्या मागे असणारे भक्कम सैद्धांतिक पाठबळ आपल्याकडे होते ह्याला काहीही आधार नाही. मुळात महाभारत ऐतिहासिक आहे ह्यालाही भक्कम पुरावा नाही त्यामुळे ही निव्वळ कवीकल्पना असावी असे दिसते आहे. रम्य कल्पना प्रतिभावंत करु शकतो. त्याकरता वैज्ञानिक पाठबळ असायची गरज नाही. माणूस चंद्रावर जायच्या आधी कितीतरी वर्षे जूल्स व्हर्नच्या कादंबरीतील माणूस चंद्रावर पोचला होता! पाणबुडीच्या शोधाआधी अतीखोल पाण्यात उतरू शकणारे यान अशा कादंबरीत कितीतरी आधीच बनले होते. ह्या कविकल्पनेला ठोस पुरावा मानून पुढचे मनोरे रचणे शहाणपणाचे नाही. सुश्रुताची शस्त्रक्रिया बहुधा खरी असावी पण सुश्रुत वा त्याच्या शिष्यांनी ही उपयुक्त पद्धती लोकप्रिय केली नाही वा अन्य वैद्यांना शिकवली नाही आणि ह्या बाबतीत भारतीय कायमच मागे होते. संशोधन करणे इतके पुरे नाही तर त्याच्या काटेकोर नोंदी करून ते वापरात ठेवणे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा करणे ह्यात आपण कमी पडलो. संस्कृत संगणकाकरता योग्य भाषा आहे म्हणजे काय? सी वा जावा ऐवजी संस्कृत वापरायचे? का? आणि कसे? संस्कृत मधे फॉर लूप कसा लिहिणार? व्हाईल लूप कसा? इफ एल्स ब्लॉक कसा लिहिणार? स्विच, केस कसे लिहिणार? कुणी उदाहरण देऊन हे स्पष्ट करेल का? आणि प्रस्थापित संगणकी भाषांपेक्षा संस्कृतमधे काय उजवे आहे ते समजावा कृपया.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 07/13/2015 - 06:13 नवीन
संस्कृत संगणकाकरता योग्य भाषा आहे म्हणजे काय? सी वा जावा ऐवजी संस्कृत वापरायचे? का? आणि कसे? संस्कृत मधे फॉर लूप कसा लिहिणार? व्हाईल लूप कसा? इफ एल्स ब्लॉक कसा लिहिणार? स्विच, केस कसे लिहिणार? कुणी उदाहरण देऊन हे स्पष्ट करेल का? आणि प्रस्थापित संगणकी भाषांपेक्षा संस्कृतमधे काय उजवे आहे ते समजावा कृपया. संस्कृत आणि संगणक यावर मिपावर एक छान चर्चा झाली होती. http://www.misalpav.com/node/14431 मुळात C/C++/Java ह्यांना english म्हणाल का? आणि compilers हे ह्या high level programming ना बाईट कोड मध्ये convert करत असल्याने तुम्ही जर संस्कृत ->byte code असा compiler तयार केला तर तुम्ही संस्कृत मध्ये ही coding करू शकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
व
वगिश Mon, 07/13/2015 - 10:23 नवीन
संस्कृत ही स्पीच रिकग्णीशन साठी इंग्रजी पेक्षा जास्त सोयीची आहे. बाकी प्रोग्रामिंगचा आणि बोली भाषेचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अरवीन्द नरहर जोशि. Mon, 07/13/2015 - 02:28 नवीन
अनावश्यक चर्चा आहे .
  • Log in or register to post comments
J
Jack_Bauer Mon, 07/13/2015 - 16:28 नवीन
आपल्या मताचा आदर आहे पण ही चर्चा आपल्याला का अनावश्यक वाटते हे सांगू शकाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरवीन्द नरहर जोशि.
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/13/2015 - 04:35 नवीन
ह्यावर मर्यादित प्रमाणात लेखनाशिवाय दैंनंदिन जीवनातही बोलल गेलं पाहिजेच असं मला वाटतं. कारण, टनाटनि प्रवृत्तिचे लोक अत्यंत लबाड आणि नीच पणानि या गोष्टींचं समर्थन करत असतात. त्या खोट्या आहेत हे त्यांनाही माहीत असतं. आपण त्यांना पाठिंबा अथवा मूक सम्मति देतो,गप्प बसतो..हेच त्यांना हव अस्स्तं/आहेही. एकदा हे मान्य होतय असं दिसलं की मग सगळं जुनं चांगलं ,समाजव्यवस्था भारी..पुरुष एकाधीक विवाह हक्क योग्य, अगदी बाल विवाह सुद्धा बरोबर..,चातुर्वण्य श्रेष्ठ..,वगैरे अध्याय सुरु होतात. त्यामुळे जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्तीची जागोजाग प्रतिवाद करून धिंड काढली पाहिजे. भारतामातेची सेवाच आहे ती ही!
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Mon, 07/13/2015 - 05:24 नवीन
अणूमोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाव आडनाव Mon, 07/13/2015 - 07:00 नवीन
जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्तीची जागोजाग प्रतिवाद करून धिंड काढली पाहिजे +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ए
एस Mon, 07/13/2015 - 09:12 नवीन
+१ निखर्व. ह्या प्रवृत्तींना जागोजागी उघडे पाडून त्यांचा खोटेपणा उघड केला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Tue, 07/14/2015 - 15:35 नवीन
चतुर्वर्ण ज्या पद्धतीनं अम्मलात आणला गेला त्या पद्धतीनं तो वाईटच असला तरी चतुर्वर्णाला पर्याय आहे काय? नावं वेगळी असली तरी आज चतुर्वर्ण सुरु आहेच की! बाकी काही मूठभरांच्या फायद्यासाठी इतरांना वेठीला धरण्याची लोकांन्ची वृत्ती कायम आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Tue, 07/14/2015 - 15:50 नवीन
+२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 16:09 नवीन
अगदी बरोबरे, फक्त याबद्दल एक मुद्दा असा की विषमता ही राहणारच, तिला जन्माधारित धार्मिक सँक्शन देणे हे वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/14/2015 - 16:20 नवीन
@तिला जन्माधारित धार्मिक सँक्शन देणे हे वाईट.>> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Tue, 07/14/2015 - 16:43 नवीन
सहमत. म्हणूनच ज्या पद्धतीनं अम्मलात आणली गेली ते वाईट असं लिहीलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/14/2015 - 17:22 नवीन
ह्यावर मर्यादित प्रमाणात लेखनाशिवाय दैंनंदिन जीवनातही बोलल गेलं पाहिजेच असं मला वाटतं. कारण, टनाटनि प्रवृत्तिचे लोक अत्यंत लबाड आणि नीच पणानि या गोष्टींचं समर्थन करत असतात. त्या खोट्या आहेत हे त्यांनाही माहीत असतं. आपण त्यांना पाठिंबा अथवा मूक सम्मति देतो,गप्प बसतो..हेच त्यांना हव अस्स्तं/आहेही. एकदा हे मान्य होतय असं दिसलं की मग सगळं जुनं चांगलं ,समाजव्यवस्था भारी..पुरुष एकाधीक विवाह हक्क योग्य, अगदी बाल विवाह सुद्धा बरोबर..,चातुर्वण्य श्रेष्ठ..,वगैरे अध्याय सुरु होतात. त्यामुळे जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्तीची जागोजाग प्रतिवाद करून धिंड काढली पाहिजे. भारतामातेची सेवाच आहे ती ही!
खरयं !!! पण स्वमातांध दांभिकता ह्याहीपेक्षा वाईट्ट ! त्या प्रवृत्तीची धिंड काढायला गेले की मात्र लगेच प्रतिसाद संपादन होते असे पाहण्यात आले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/14/2015 - 18:29 नवीन
निरर्थक आत्म-परहल्लेखोर कुंथन हे प्रकट होण्याच्याहि पातळिचं कधीच नसतं त्यामुळे ते संपादित झालं तर त्यात नवल काहीच नाही! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/14/2015 - 23:04 नवीन
स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे आणि त्याच भोळ्या भाबड्या हिंदूंच्या श्रध्दांचा गैरफायदा घेवुन तुंबडी भरणारे लोक आणी ह्या असल्या अतर्क्य कल्पना बाळगणाऋया टनाटनि लोकात तात्विक द्रुश्ह्ट्या काहीच फरक नाही । त्यामुळे टनाटनि लोकान्सोबतच दान्भिकांचा बुरखा फाडून त्यांचीही धिंड काढली पाहिजे ह्या मुद्द्यावर तुझा काय विचार आहे पराग ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 04:36 नवीन
@ @स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे आणि त्याच भोळ्या भाबड्या हिंदूंच्या श्रध्दांचा गैरफायदा घेवुन तुंबडी भरणारे लोक >> असे लोक आहेत का? माझ्या माहिती प्रमाणे धर्मसुधारणा वादी लोक "स्वत:" कध्धिही कुणाच्या दारात किंवा mlm वाल्यांसारखं किंवा पोरी पटवणाय्रां सारखं टुकार छपरि पणानि कुणा हिंदुंच्या घरात जात नाहित..आणि त्यांना हे करा म्हणजे ते होइल,ते करा म्हणजे हे होइल.. असं काहीच भिकारडेपणानि किंवा टनाटनि दरवडेखोरपणानि किंवा लबाड साधेपणानिहि करत नाहित. त्यामुळे त्यांनी कुणाच्या श्रद्धांचा गैरफायदा "घेतला".. हा आरोपच गैर लागू होतो अश्यांच्या बाबतीत! असच आहे,आणि त्यामुळे असच वाटत मला. उलट ही लोकं बाहेरून समाज सुधारकांच्या ज्या ज्या चळवळि चालतील त्यांना आतुन सपोर्ट करून धर्मातल्या टनाटनि प्रवृत्तिंना हाकलून लावण्याचं वेळ आली तर स्वत:च्या हातानी प्रसाद देण्याचं सावरकरि सत्कार्य करतात. त्यामुळे टनाटनि लोकांनी काढलेली त्यांची धिंड , ही एका अर्थी सुधारणा वादाचा सत्कारच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 07:38 नवीन
शाब्दिक खो खो नको । प्रश्न अजुन सोपा करूँ विचारतो । स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे रानाडे चांस मिळताच बालविवाह करून रिकामे झाले , बाकी इतर बाबतीत ते ग्रेट असतील पण इथे स्पश्ट पणे दांभिक आहेत । मग असा दान्भिकांत आणि भोल्याभाबड्या श्रध्दावन्त लोकात वाईट कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 09:01 नवीन
@ शाब्दिक खो खो नको >> तुम्हीच श्रवणिक को को पिऊ नका! आणि स्वत:लाच पाहिजे "ते" ऐकू नका .. प्र.गो.काका! :P @ स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे रानाडे चांस मिळताच बालविवाह करून रिकामे झाले , बाकी इतर बाबतीत ते ग्रेट असतील पण इथे स्पश्ट पणे दांभिक आहेत ।>> निर्विवाद दांभिक आहेत. पण त्यांचा आणि धर्मसुधारकांचा तसा काय संबंध? ते समाजसुधारक!आम्ही ज्यांच्या बद्दल बोलतो ते धर्मांतरगत कार्यरत धर्मसुधारक!मार्ग एक कार्यक्षेत्र पद्धति भिन्न. आणि हे सगळं सोडुन दिलं तरी जो सुधारक त्याच्या व्यक्तिगत आणि पर्यायानी त्याच्या समोरच्या समाजात बोलतो त्याच्या विपरित वागत असेल,तर तो निसंशय दांभिक आहे. अश्यांचे आपण नाव घेऊन पुरावे देऊन बुरखे फाड़ा. आमचे काहीच म्हणणे नाही! (ह्ही ह्ही! :-D )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 10:03 नवीन
म्हणजे बालविवाहाला विरोध करणारे अन चांस मिळताच स्वतः बालविवाह करणारे रानाडे आणि सत्यनारायणाला विरोध करणारे पण कोणी त्यांच्या कडे सत्यनारायण करा असा आग्रह धरला तर लगेच एकापायावर करायला तयार होणारे रानाडे गुरुजी हे दोन्ही वेगवेगळ्या वृत्तीचे आहेत असे आपले ंहणणे आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 10:59 नवीन
सत्यनारायणातल्या "कथेतल्या लबाड स्वार्थी चमत्कारिकपणाला" विरोध आणि त्या जागी साध्या नैतिक स्वरुपाच्या मांडणिचा कृतिशिल आग्रह" हे त्या धर्मसुधारक पुरोहिताचं वर्तन आहे. त्याचा सत्यनारायणाच्या पुजेला विरोध नाहीच.आहे.. असं तुमचं अजुनंहि म्हणणं असेल तर तसा पुरावा द्या! :P हे सगळं तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही स्वत:च्या त्या धर्मासुधारकावर आरोप करून त्याची बदनामी करायच्या सोई खातर स्वत:च तैयार केलेलं निरर्थक आत्म रंजन आहे.. सबब ते संपूर्ण निरर्थक आणि गैर लागू आहे! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 11:29 नवीन
"कथेतल्या लबाड स्वार्थी चमत्कारिकपणाला" विरोध आणि त्या जागी साध्या नैतिक स्वरुपाच्या मांडणिचा कृतिशिल आग्रह"
कशाला ना ? वर सदर लेखकाने केलेल्या चमत्कारिक विधानाला तुम्ही टनाटनि म्हणता आनि रानाडे गुरुजी असल्याच चमत्कारिक गोष्टी सुधारायच्या नावाने पैसे छापतात ते टनाटनी कसे नाहीत बरे ? उलट ते तर सुधारायच्या नावाखाली पसे छापतात हीच मोठ्ठी लबाडी नाही का ? स्वत्ळ धर्मसुधारणा वादी म्हणणे आणि असल्या चम्त्कारिक गोष्टी सुधारायच्या नावाने चालवत रहाणे ह्यालाच स्वमतांध दांभिकता असे संबोधले जाते ! सच्च्या धर्मसुधारकाने , "सत्यनारायण हे निव्वळ थोतांड आहे , बामणी कावा आहे " असे जाहीर करुन त्या विरुध्द आंदोलन पुकारले पाहिजे , आणि ज्याप्रमाणे चळवळी नंतर बालविवाह बंद झाला तसेच सत्यनारायण चळवळ करुन बंद पाडला पाहिजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 11:53 नवीन
हा तुमचा दृष्टिकोन झाला.. त्याची तुम्ही धर्मसुधारकांवर बळजबरि करू शकत नाही. आणि स्वत:ची स्वमतांधता दुसय्रांवर लादू शकत नाही. तुमचा तुम्ही तो स्वतंत्र बाळगू शकता,कारण तो काही एकमेव योग्य मार्ग नव्हे! (तुम्ही कित्तिही त्याच्या नावानी बोंबललात...तरी! हे उघड आहे.) "जानवी घालायची असतील तर सगळ्यांनाच घाला" "पौरोहित्याचा हक्क हिंदू मधल्या सगळ्याच जातिंना द्या" ह्याला धर्मात केलेली समतावादी सुधारणा म्हणतात. याउलट हे सर्व नाकारा.. असे म्हणणे..ही सरळ समाजात केलेली सुधारणा आहे..आणि दोन्ही गोष्टींना सुधारणावादात तेव्हढच महत्त्व आहे,हे इतिहास सिद्ध सत्य आहे.(उदा:-पुनर्विवाह विधवा विवाह लावणारे त्या काळातले पुरोहित!) मग तुम्ही ते महत्त्व धर्मसुधारकांवर आरोप करण्याच्या सोइखातर(आणि केवळ तेव्हढ्याच खातर!!!) कित्तिही नाकारा,अथवा त्याला बदनाम करण्याचा टनाटनि कुटिल डाव रचा! त्यानी काही एक फरक धर्मसुधारकांना आणि त्यांना चालवून घेणाय्रा पुरोगामी यजमानांना पडणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 12:02 नवीन
सहमत. मुद्दा छान मांडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 12:03 नवीन
@सच्च्या धर्मसुधारकाने, "सत्यनारायण हे निव्वळ थोतांड आहे , बामणी कावा आहे " असे जाहीर करुन त्या विरुध्द आंदोलन पुकारले पाहिजे>> हे असं म्हणायची परवानगी फ़क्त समाज सुधारकांना असते,धर्मसुधारकांना नाही! हे तुमचं तुम्हीच स्वमतांधतेनि धर्मसुधारकांच्या अंगावर लादून दिलेलं आहे... आणि ते ही केवळ स्वत:च्या आरोप करायच्या कपटी काव्याची पूर्तता करण्याच्या हेतुनिच.. अन्य काहीही नाही.. या शिवाय जो पुरावा तुम्हाला मागितला तो तर तुम्ही देऊ शकलेला नाहित,इथेच तुमची हार आणि दांभिकता स्पष्ट होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
न
नाखु Wed, 07/15/2015 - 12:14 नवीन
विठ्ठ्ला कोणती "पोथी" धरू हाती !
आजवर ज्यांची वाचीलीया पोथी , भलताच त्यांचा देव होता पुरे झाली आता उगा शब्दफोडी,आशयात माझा जीव होता विठ्ठला.. कोणती "पोथी" धरू हाती ?
दोहोंंचा मित्र नाखु (कुठलीही "पोथी" न (कव)टाळणारा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 13:12 नवीन
या शिवाय जो पुरावा तुम्हाला मागितला तो तर तुम्ही देऊ शकलेला नाहित,इथेच तुमची हार आणि दांभिकता स्पष्ट होते!
छान चर्चा चालु आहे ! धर्मसुधारक म्हणुन बुरखा पांघरुन सोयिस्कर गोष्टींन्ना टनाटनि म्हणणे आणि सोयिस्कर गोष्टींन्ना शर्मसुधारणेतील साधन म्हणणे ह्यातील फरक कोणाच्याही लक्षात येईल ! स्वतुंबडीभरु स्वमतांधदांभिक कोण आणि सच्चा धर्मसुधारक कोण हे काळच ठरवेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Wed, 07/15/2015 - 13:19 नवीन
भांडू नका रे! बुवा, या श्रावणात सत्यनारायण सांगायला आणि पश्या,तीर्थप्रसाद घ्यायला चला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
कपिलमुनी गुरुवार, 07/16/2015 - 11:10 नवीन
प्यारेभाई मांडवलीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 13:28 नवीन
धर्मसुधारक म्हणुन बुरखा पांघरुन सोयिस्कर गोष्टींन्ना टनाटनि म्हणणे आणि सोयिस्कर गोष्टींन्ना शर्मसुधारणेतील साधन म्हणणे ह्यातील फरक कोणाच्याही लक्षात येईल ! स्वतुंबडीभरु स्वमतांधदांभिक कोण आणि सच्चा धर्मसुधारक कोण हे काळच ठरवेल =))

पुन्हा एकदा (अपेक्षित..) स्वमतांध आत्मसंरक्षक निरर्थक आत्मरंजन!

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 13:28 नवीन
@वर सदर लेखकाने केलेल्या चमत्कारिक विधानाला तुम्ही टनाटनि म्हणता >> कुठेही म्हणालेलो नाही. उलट लेखकाची मांडणी आणि जे काहि लेखनात आहे ते म्हणणे' आमच्या म्हणजे धर्मसुधारकांच्या बाजुचे आहे.. -
आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?
- आणि मी त्या विरोधी मतावर आक्षेप घेतलाय...आणि एका अर्थी धागाकर्त्याशी सहमत झालोय. ही तुम्हि परत पहिलीच आत्मरचित थापेबाजी आरोप करण्याच्या सोइखातर आणि केवळ तेव्हढ्याच खातर धर्मसुधारकांवर केल्याच परत एकदा उघड झालं. @आनि रानाडे गुरुजी असल्याच चमत्कारिक गोष्टी सुधारायच्या नावाने पैसे छापतात ते टनाटनी कसे नाहीत बरे ? उलट ते तर सुधारायच्या नावाखाली पसे छापतात हीच मोठ्ठी लबाडी नाही का ?>> हे घ्या! आधी रानाडे नामक व्यक्तिला समाजसुधारक आणि त्याविरोधी वर्तन करणारा बालवि'वाहक म्हणून तुम्ही पेश केलत..आणि त्यानी काम साधत नाही,म्हटल्यावर..आता त्यालाच स्वतःच्या अंधमताच्या थापेबाजी व थोपे'बाजी करण्यासाठी /धर्मसुधारकांवर (केवळ आणि केवळ)आरोप करण्याच्या कुटील बदनामीकारक डावासाठी सुधारणावादी सत्यनारायण करणारा गुरुजी केलत...पण तो तसा असल्याचा एकंही पुरावा देऊ शकला नाहीत.. आणि तो तुम्ही देऊही शकणार नाही..कारण तो नाहीच,तर देणार कुठनं? :p उलट स्वतःच स्वतःच्या सोइसाठी स्वमतांध दांभिकतेनी "दिलं ठोकून!" असल्या दर्जाचं हे तुमचं आरोप करणं. सांगा बरं.., कुठे केली जाहिरात या गुरुजींनी? कोणाच्या घराघरांमधे "य्या य्या ..मी तर सुधारणावादी गुर्जी..माझ्याकडून पूजा करुन घ्या..आणि द्या मला खर्ची..(पक्षी :- खर्चा-पानी!) ...अशी जाहिरात केली.. उलट आम्ही ज्या धर्मसुधारणावादी गुरुजींची बात करतो... त्यांचं मत असं आहे..की ही माझ्या धर्मात असलेली लबाडी,गाढवपणा,ढोंग,स्वार्थ इत्यादी जे काही ज्या ज्या रुपानी आहे..ते तुम्ही सज्जन धर्माचरक यजमान आणि मी धर्मसुधारक पुरोहित..अश्यांनी एकत्र येऊन समजाऊन घेऊन मान्य करुन बदलून टाकुया,(कारण काढून टाकता तर आपल्याला येत नाही..काढायला गेलो,तर धर्म आपल्याला काढतो..)आणि त्याबद्दल मला तुम्ही वेगळं असं कोणतंही मान व धन देऊ नका.कारण माझी ही धर्मसुधारणेची भुमिका तुमच्यामाझ्या धर्मातल्या वाइटासाठी प्रायश्चित्ताच्या भावनेनी आहे. ... तेंव्हा असे मत नम्र आनि प्रामाणिकपणे बाळगणार्‍या आमच्या या धर्मसुधारक हिंदू पुरोहितास तुम्ही कसेही कित्तीही बदनाम करत राहिलात.. तरी त्यानी त्या पुरोहितास काहिही फरक पडणार नाही..कारण त्याचा त्याच्या सुधारणावादी/पुरोगामी असलेल्या हिंन्दू समाजावर भरपुर विश्वास आहे..आणि सगळे त्याच्यासह येणार नाहीत..पण काही तर येतील..ह्याची त्याला खात्री आहे.

वंदे मातरम्...

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 14:21 नवीन
ही माझ्या धर्मात असलेली लबाडी,गाढवपणा,ढोंग,स्वार्थ इत्यादी जे काही ज्या ज्या रुपानी आहे..ते तुम्ही सज्जन धर्माचरक यजमान आणि मी धर्मसुधारक पुरोहित..अश्यांनी एकत्र येऊन समजाऊन घेऊन मान्य करुन बदलून टाकुया,(कारण काढून टाकता तर आपल्याला येत नाही..काढायला गेलो,तर धर्म आपल्याला काढतो..)आणि त्याबद्दल मला तुम्ही वेगळं असं कोणतंही मान व धन देऊ नका.कारण माझी ही धर्मसुधारणेची भुमिका तुमच्यामाझ्या धर्मातल्या वाइटासाठी प्रायश्चित्ताच्या भावनेनी आहे.
हेच सौजन्य आधी
त्यामुळे जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्तीची जागोजाग प्रतिवाद करून धिंड काढली पाहिजे.
ह्याच्या ऐवजी दाखवले असते तर बरे झाले नसते का ? सदर लेखकाला किंव्वा कोणत्याही भोळ्या श्रध्दाळुला टनाटनि धिंड काढणे वगैरे शब्दांनी हिणाववुन काय साधणार आहे ? धर्मसुधारणा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 14:39 नवीन
@हेच सौजन्य आधी @त्यामुळे जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्तीची जागोजाग प्रतिवाद करून धिंड काढली पाहिजे. >>> जाणिवपूर्वक करणार्‍यांना सौजन्य दाखवायच कशासाठी? त्यांची धिंडच काढावी लागते..कारण ते पक्के लबाड आणि स्वार्थसाधू असतात. अफजलखानांना सौजन्य कशासाठी? @ह्याच्या ऐवजी दाखवले असते तर बरे झाले नसते का ? सदर लेखकाला किंव्वा कोणत्याही भोळ्या श्रध्दाळुला टनाटनि धिंड काढणे वगैरे शब्दांनी हिणाववुन काय साधणार आहे ? धर्मसुधारणा ? >>> लेखकाला तो सदर प्रतिसाद-दिलेलाच नाही...न कि त्याना तो लागलाय. तसेच जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा टनाटन प्रवृत्ती , ही भोळ्या श्रद्धाळूची नसतेच! तो चिडतंही नाही..आणि चुकून चिडला..तरी नंतर आपल्या मतातली निरर्थकता कळल्यानंतर शांत होतो.. त्यामुळे लेखक आणि भोळा श्रध्दाळु हिणवला जाणारच नाही..जायचा असता तर तसा तो याच धाग्यावर आपल्या वादा आधी किंवा वादावेळीही गेला असता..आणि काहितरी बोलला असता.. यापैकी काहिच घडलेलं नाही.. सबब्,तुमचा हा भोळी धर्मःश्रद्धाळू लोकं आणि लेखक धर्मसुधारणेच्या धारेत माझ्या शब्दाम्मुळे न येण्याचा कयास चुकिचा आहे. जो नाही चोर,तो कशाला होइल चिडलेला आणि सुधारणापराङमुख मोर!? इत्यलम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/15/2015 - 18:47 नवीन
ते पक्के लबाड आणि स्वार्थसाधू असतात. >>> स्वार्थ कोणाचा साधला जातोय हे लख्ख सुर्यप्रकाशाताल्या सूर्या सारखं स्पष्ट आहे ! खी खी खी इत्यलमच।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 07/15/2015 - 19:38 नवीन
@स्वार्थ कोणाचा साधला जातोय हे लख्ख सुर्यप्रकाशाताल्या सूर्या सारखं स्पष्ट आहे ! >> (अपेक्षित) स्वमतांध टनाटनी कपटी पलटवार. Image removed. आणि तोच तो स्वतःची दांभिकता उघड पडतीये म्हटल्यावर केलेला निरर्थक स्वार्थपरायणास्वात्मरंजनवादी टनाटनी आरोप! Image removed. धर्माच्या आवरणात स्वतःचे सर्व प्रकारचे नागवे स्वार्थ (टनाटनी लोकांशिवाय दुसरं) कोण साधतं?,,, हे तर अख्ख्या जगात चंद्रप्रकाशातही सूर्यप्रकाशाइतकं कचकाऊन स्पष्ट आहे. Image removed. अव्यवहार्य टनाटन कैदी'क भोंदू Term की ..................... Image removed. त्यामुळे.......इत्य...वेलकमच्च! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/16/2015 - 10:14 नवीन
स्वार्थ कोणाचा साधला जातोय हे लोकांसमोर आणायचा आम्ही कायम प्रयत्न करत राहु आणि तुम्हीही करत रहा :) दांभिकतेचा बुरखा फाडणे हा आमचा उद्देश आणि धर्मसुधारणा हा तुमचा उद्देश ! चालु राहु दे !! ख्खी ख्खी ख्खी To Be Continued .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/16/2015 - 10:20 नवीन
@दांभिकतेचा बुरखा फाडणे हा आमचा उद्देश >>> खिक्क! @चालु राहु दे !! ख्खी ख्खी ख्खी To Be Continued .....>> अरे...........जरुर........ नक्कीच! To Be फंटीन्यिव्व! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/16/2015 - 10:58 नवीन
ते नेहमीचे राहीलेच की ... ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/16/2015 - 15:44 नवीन
:-D ह्हुह्हुह्हुहुह्हुह्हुह्हुह्हू!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/16/2015 - 23:53 नवीन
मिपावर धर्मसुधारक आणि बुरखाफाडु असे दोन डुऐडी आहेत तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मृत्युन्जय Mon, 07/13/2015 - 08:04 नवीन
तुमची यादी अपूर्ण आहे. पुर्वी भारतात वायरलेस कम्युनिकेशन सुद्धा होते. पुरातत्व खात्याला इतक्या गोष्टी सापडल्या पण कुठे केबल. फोन, फॅक्सच्या वायर सापडल्या का? जमिनीत १०० फूट खोल खणुन बघा. तिथेही नाही सापडणार. पण मग संजयाने धृतराष्ट्राला लाइव्ह प्रक्षेपण कसे केले? हीच तर मेख आहे. त्या काळी फोन आणि टीव्हीसुद्धा होता हेच यातुन सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 07/13/2015 - 08:27 नवीन
थोडे शिर्षकाविषयी - खरा शब्द "पुराणातील वानगी" असा आहे. बाकी चालूद्या !!
  • Log in or register to post comments
प
प्रशु Mon, 07/13/2015 - 08:27 नवीन
वांगी नाहि हो वानगी.वानगी म्हणजे दाखले...
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Mon, 07/13/2015 - 09:32 नवीन
लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?>>> केवळ दुसर्याची स्तुती करण्यासाठी सत्य नाकारणं ह्यात तरी कसला अभिमान ? आपल्याच ज्ञानाचा आपल्याला उपयोग करून घेता येत नसेल तर ती आपलीच चूक आहे अणूबॉम्बचा शोध>>> पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ?अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात>>> ह्यात आपलीच चूक नाही का ?आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाला दोष द्यायचं काय कारण आहे ? घरात स्वयपाक बनवता येत असताना मुद्दाम हॉटेल मध्ये जावून खाणं आणि आपल्याच ज्ञानाचा उपयोग न करता मुद्दाम बाहेरून आयात कारण ह्यात फरक काय ? तीच गोष्ट विमानाची , शस्त्रक्रियेची . आधुनिक विमानाच्या मागे असणारे भक्कम सैद्धांतिक पाठबळ आपल्याकडे होते ह्याला काहीही आधार नाही>>> भारद्वाज ऋषींचा ग्रंथ वाचलंय का तुम्ही ? लोकमत मध्ये सध्या जुन्या ग्रंथातलं विज्ञान आणि त्याचं मराठी भाषांतर येत असतं सध्या . ते वाचलंय का तुम्ही? भारतीय तत्वज्ञानाची ६ दर्शनं कधी वाचली आहेत का ? ज्याच्यात धातुशास्त्र , इलेक्ट्रोनिक्स , बांधकाम शास्त्र आणि काय काय शास्त्र डिटेल मध्ये दिली आहेत . तुम्ही नक्की किती आणि कोणत्या भारतीय ग्रंथांचा अभ्यास केलाय ?वरचं विधान कशाच्या आधारावर केलं आहे ? कशाची काहीही माहिती नसताना केवळ पाश्चात्यांचा उदो उदो करायची भिकार मानसिकता आहे आपली . पाश्चात्यांनि आपल्याकडच्या एखाद्या गोष्टीची दाखल घेतली कि मात्र आपल्याला तिचं महत्व पटत . शेकडो वर्षांपूर्वीची मंदीर , बांधकामं उन , वारा , पाऊस झेलूनही जशीच्या तशी आहेत . आधुनिक काळात बांधलेल्या इमारती मात्र ३०-३५ वर्षात कामातून जातात. संस्कृत संगणकाकरता योग्य भाषा आहे म्हणजे काय? सी वा जावा ऐवजी संस्कृत वापरायचे?का? आणि कसे?>>> सी वा जावा ह्या कोणत्याही भाषा नाहीत . ती फक्त इंग्लिश लिपी वापरून बनवलेली virtual language आहे . मग तशीच देवनागरी लिपी वापरायची . विज्ञान एवढं पुढं गेलंय म्हणता मग का आणि कसे ह्याची उत्तरे विज्ञानानेच शोधून काढा कि
  • Log in or register to post comments
J
Jack_Bauer Mon, 07/13/2015 - 16:36 नवीन
>>सत्य नाकारणं ह्यात तरी कसला अभिमान?<< >>पूर्वजांच्या ज्ञानाला दोष द्यायचं काय कारण आहे ?<< आपल्याला बहुतेक मुद्दा कळला नसावा , सत्य नाकारणे अथवा पूर्वजांच्या ज्ञानाला दोष हा मुद्दाच नाहीये. आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल हा मुख्य मुद्दा मांडायचा आहे. >>शेकडो वर्षांपूर्वीची मंदीर , बांधकामं उन , वारा , पाऊस झेलूनही जशीच्या तशी आहेत . आधुनिक काळात बांधलेल्या इमारती मात्र ३०-३५ वर्षात कामातून जातात.<< आपणच आणखी एक छान उदाहरण दिलंत. शेकडो वर्ष टिकणार्या मंदिराच्या बांधकामावरून आपण काही शिकलोय का? आपण त्या बांधकामाचा अभ्यास करून आजच्या इमारती टिकाऊ बनवतोय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ज
जडभरत Mon, 07/13/2015 - 19:44 नवीन
तुडतुडी ताई मानलं तुम्हाला!!! जे जुनं ते फालतू असं मानायची लाटच आहे आज! जेव्हा घटाची कल्पना केली जाते तेव्हा घट कुठेतरी अस्तित्वात असतोच! हा न्याय शास्त्रातला सिद्धांत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 14:32 नवीन
जेव्हा घटाची कल्पना केली जाते तेव्हा घट कुठेतरी अस्तित्वात असतोच! हा न्याय शास्त्रातला सिद्धांत!!!
अच्चा, म्हणजे हॅरी पॉटर, हल्क, थोर, लॉर्ड ऑफ द रिंग्स, इ. सगळे खर्रे खुर्रे आहेत तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
क
कपिलमुनी Tue, 07/14/2015 - 14:38 नवीन
बॅटमॅन इथेच आहे :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा