Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुराणातील वांगी ?

J
Jack_Bauer
Sun, 07/12/2015 - 21:25
🗣 171 प्रतिसाद
आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ? आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया : अ : अणूबॉम्बचा शोध ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!! मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ? अ : विमान ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर. मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ? अ : प्रोग्रामिंग ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे. मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो. अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी . मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ? मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले. आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

प्रतिक्रिया द्या
60448 वाचन

💬 प्रतिसाद (171)
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 14:40 नवीन
श्श्श्श मुनिवर श्श्श्श!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 07/14/2015 - 20:00 नवीन
डोन्ट यु रिव्हिल हिज आयडेंटीटी!! >_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 08:48 नवीन
धन्स कप्तानसाहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जडभरत Wed, 07/15/2015 - 07:01 नवीन
तुमचा मुद्दा मला पटतोय. पण मला असे म्हणयचे आहे की समजा जगात लाल रंगच नसता तर तुम्हाला त्याची कल्पना करता आली असती का? हॅरी पॉटर, हल्क, थोर, लॉर्ड ऑफ द रिंग्स ह्या जरी मानवी कल्पनेच्या निर्मिती असल्या तरी त्यांच्यासारखे काहीतरी आपण पाहिलेले असतेच. म्हणजे रस्त्यावरील जादूगार, साधू, अत्यंत अचाट शक्ती असणारे लोक, ज्यात जादू आहे असे समजले जाते अशा वस्तू- यंत्र, मंत्र, अंगठी वगैरे. त्याचेच अतिशयोक्त रूप आपण निर्माण करतो. एवढाच माझा मुद्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 08:46 नवीन
म्हणजे रस्त्यावरील जादूगार, साधू, अत्यंत अचाट शक्ती असणारे लोक, ज्यात जादू आहे असे समजले जाते अशा वस्तू- यंत्र, मंत्र, अंगठी वगैरे. त्याचेच अतिशयोक्त रूप आपण निर्माण करतो. एवढाच माझा मुद्द आहे.
पॉइंट टेकन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 07/15/2015 - 15:26 नवीन
ज्युल व्हर्न्स च्या कादंबर्‍या वाचा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 14:40 नवीन
भारद्वाज ऋषींचा ग्रंथ वाचलंय का तुम्ही ? लोकमत मध्ये सध्या जुन्या ग्रंथातलं विज्ञान आणि त्याचं मराठी भाषांतर येत असतं सध्या . ते वाचलंय का तुम्ही? भारतीय तत्वज्ञानाची ६ दर्शनं कधी वाचली आहेत का ? ज्याच्यात धातुशास्त्र , इलेक्ट्रोनिक्स , बांधकाम शास्त्र आणि काय काय शास्त्र डिटेल मध्ये दिली आहेत . तुम्ही नक्की किती आणि कोणत्या भारतीय ग्रंथांचा अभ्यास केलाय ?वरचं विधान कशाच्या आधारावर केलं आहे ? कशाची काहीही माहिती नसताना केवळ पाश्चात्यांचा उदो उदो करायची भिकार मानसिकता आहे आपली . पाश्चात्यांनि आपल्याकडच्या एखाद्या गोष्टीची दाखल घेतली कि मात्र आपल्याला तिचं महत्व पटत .
तुडतुडी ताई, यूजरनेम सार्थ करू नका. वर्तमानपत्रातली चार कात्रणे वाचून मोठा शोध लावल्याच्या आविर्भावार बोलण्याआधी जरा जरी शहानिशा केलीत का काय खरे काय खोटे याची? तो तथाकथित वैमानिक शास्त्र नामक ग्रंथ कसा यूसलेस आहे हे बेंगळूरू येथील आय आय एस सी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या संस्थेतील तज्ञांनी सप्रमाण सिद्ध केलेय हे माहितेय का? हा बघा पेपर. गूगल सर्च केल्यावरती पहिलीच पीडीएफ लिंक आहे. https://www.google.co.in/#q=vaimanika+shastra+iisc शिवाय भारतीय तत्त्वज्ञानाच्या ६ दर्शनांमध्ये धातुशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इ. ची माहिती आहे हाही नवीनच शोध लागला. कुठल्या दर्शनाच्या कुठल्या ग्रंथातल्या कितव्या अध्यायात आहे काही सांगता येईल का? की वाचला लोकमत अन बडवला कळफलक? आपले पूर्वज अनेक बाबतींत महान होते, मात्र त्यांचा महानपणा सिद्ध करायला असली फेकूगिरी करून त्यांचे नाव आपणच खराब करतो आहोत हे लक्षात घ्या. वैदिक विमाने, वैदिक गणित, इ. फ्रॉड संकल्पनांमुळे आपल्याकडच्या असली मालाला भाव देत नाही कुणी. ते वैदिक गणित तर कुठल्याच अर्थाने वैदिक नाही. चार वेदांपैकी कुठल्याच वेदात त्याचा उल्लेख नाही. असो, या विषयावर मी आणि इतर अनेकांनी मिपावर आणि अन्य ठिकाणी हजारोवेळेस लिहिलेले आहे तरी असले प्रतिसाद पुन्हा पुन्हा येतात हे बघून हतबलतेची भावना वाढीस लागते, बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अस्वस्थामा Tue, 07/14/2015 - 16:45 नवीन
+१
हे बघून हतबलतेची भावना वाढीस लागते, बाकी काही नाही.
हे अगदी खरंय. परवाच या गोपालक्रिश्णन नावाच्या iish या संस्थेच्या संस्थापकाचे याच संदर्भातले भाषण ऐकायला गेलो होतो (खरंतर त्याला काही प्रश्न विचारण्याच्या हेतूने गेलो होतो पण काकानी QnA सेशन कँसलच केला आणि आमचा हिरमोड झाला).
अच्चा, म्हणजे हॅरी पॉटर, हल्क, थोर, लॉर्ड ऑफ द रिंग्स, इ. सगळे खर्रे खुर्रे आहेत तर...
कालच बोलला होतास ना तू या मात्रेबद्दल. आज उपयोग पण करायला मिळाला बघ.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 23:23 नवीन
कालच बोलला होतास ना तू या मात्रेबद्दल. आज उपयोग पण करायला मिळाला बघ.. ;)
येस्सार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 07/15/2015 - 15:28 नवीन
सहमत. पुराव्यानिशी शाबीत करता येत असेल तरचं अश्या बाबतीत तोंड घालावं उगाचं लोक्मत, सकाळ वगैरेंमधुन येणार्‍या सो कॉल्ड स्कालरांची मतं टंकु नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/16/2015 - 07:31 नवीन
शेकडो वर्षांपूर्वीची मंदीर , बांधकामं उन , वारा , पाऊस झेलूनही जशीच्या तशी आहेत . आधुनिक काळात बांधलेल्या इमारती मात्र ३०-३५ वर्षात कामातून जातात.
अहो तुडतुडी ताई, युरोपातली कॅथेड्रलही शेकडो वर्षे जुनी आहेत हो. रोममधली काही कॅथेड्रल तर इ.स. ३००-३५० च्या आसपासची आहेत.तरीही युरोपिअन लोक आमच्याकडे इतके जुने उच्च शास्त्र होते वगैरे अशा टिमक्या मारत नाहीत हो. कारण मधल्या काळात त्यांनी खूप काही डेव्हलप केले (आणि सध्या ते उधळत आहेत :( ) त्यामुय्ळे १७०० वर्षांपूर्वी आमच्याकडे हे हे होते अशी सतराशे वर्षे जुनी टेप त्यांना वाजवावी लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 08:21 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
व
विवेक्पूजा गुरुवार, 07/16/2015 - 14:11 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
त
तुडतुडी Mon, 07/13/2015 - 09:35 नवीन
एकदा हे मान्य होतय असं दिसलं की मग सगळं जुनं चांगलं ,समाजव्यवस्था भारी..पुरुष एकाधीक विवाह हक्क योग्य, अगदी बाल विवाह सुद्धा बरोबर..,चातुर्वण्य श्रेष्ठ..,वगैरे अध्याय सुरु होतात. >>> लेख कोणत्या विषयावर आहे ? तुम्ही कोणता विषय मधेच काढला ? तुम्ही उल्लेख केलेल्या ह्या गोष्टी काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी समाजात पसरवल्या आणि इतर वर्गाच्या लोकांना छळ छळ छळलं . ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्याच आहेत . पण त्याचा भारतीय पुरातन विज्ञानाशी संबंध नाही . कृपया विषय सोडून बोलू नये. ह्या विषयासाठी वेगळा धागा काढता येईल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/13/2015 - 19:32 नवीन
@तुम्ही कोणता विषय मधेच काढला ? >> मी विषय मधेच काढलेला नाही. तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं दिसत नाही. असो! आवड आपापली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
श
श्रीरंग_जोशी Mon, 07/13/2015 - 19:49 नवीन
मिपावर काही मंडळी पुराणातली वांगी असा कुणी उल्लेख केला की वांगी नाही हो वानगी असा आक्षेप घेतात. वानगी की वांगी हे मी तरी निश्चितपणे सांगू शकणार नाही. परंतु लहानपणापासून शाळेत, घरी, मोठ्या वक्त्यांच्या भाषणात पुराणातली वांगी असेच ऐकले आहे. आज जालावर 'पुराणातील वांगी' असे शोधले असता भरपूर दुवे मिळाले अन 'पुराणातील वानगी' असे शोधले असता केवळ तीन दुवे मिळाले. त्यापैकी दोन मिपावरचे अन एक दुसर्‍या मराठी संस्थळावरचा होता. जयंत नारळीकर यांचा एक लेखही मिळाला - पुराणातली वांगी विज्ञानविकासाची. नारळीकरांना शब्दांच्या वापराबाबत अतिश जागरुक असलेलं पाहिलं आहे. आर्यभट्ट हा उच्चार चुकिचा असून आर्यभट हेच प्रत्यक्षातलं नाव होतं असही त्यांनी लिहिलं होतं. माझ्या मते पुराणातील वांगी असे कुणी लिहिल्यास त्यावर आक्षेप घेणे संयुक्तिक नाही. आक्षेप घेणार्‍यांनी त्यासमर्थनार्थ अधिक माहिती पुरवल्यास उत्तम.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 16:37 नवीन
ते मूळ वानगीच आहे. पण वाक्प्रचार वापरणारे कुत्सितपणे त्यांचं वांगी असा अपभ्रंश करतात. ज्यांना माहित नसते ते वांगी हाच शब्द पुढे नेतात. असो, नारळीकरांचा लेख वाचला. कैच्या कै अपेक्षा आहेत त्यांच्या पुराणग्रंथांतून, कथांतून, त्येनला कोनतरी सांगाया पायजेल की बाबानु हे पुराणग्रंथ, कथा आहेत, प्रॉडक्ट मॅन्युअल नाही. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आज एखादी कथा लिहायची म्हणजे अशी सुरुवात होईल,. "तीचा खून करून तो त्याच्या मर्सीडीजकडे परत आला. ही मर्सीडीज म्हणजे २१ फूट बाय ७ फूट बाय ४ फूट असलेली वेगवेगळ्या धातूंच्या मिश्रणातून तयार झालेल्या पत्र्यापासून बनवलेली एक गाडी होती. हे धातू होते. अमूक ढमूक .........., त्यांची बनवण्याची पद्धत अशी की एक किलो अल्युमिनिअममधे एक किलो कार्बन टाकून........ अशा तर्‍हेने तो पत्रा बनतो. ती चालते ते ईंजीन.. (मग इथून पुढे कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी लिहिलेले इंजिनावरचे सगळे भाग टाकावे), ज्या चार चाकांवर ती उभी आहे ती चाके रबरापासून बनवलेली, त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे......" (अशा पद्धतीने किमान दोन हजार पाने लिहून पुढलं वाक्य लिहावं) "गाडीत बसून त्याने आपल्या खास लायटरने सिगार शिलगावली... ते लायटर खुनाच्या जागी विसरून यायला तो वेडा नव्हता. हे लायटर म्हणजे खास धातूंच्या नळकांड्यांपासून......... (परत दहा पाने मग पुढे). त्याने चावी फिरवली आणि तो निघाला सुसाट." काय राव सोडाना, कशापासून काय अपेक्षा धरायची यालाही काही लिमिट असते. अशा संशोधक माणसाने फक्त खिल्ली उडवण्यासाठी असे लिखाण करावे हे जरा आश्चर्यजनकच. काही गोष्टींचे पुरावे नाही मिळत म्हणून त्या नव्हत्याच? ही कोण विमान बनवणार्‍या कंपन्या आहेत त्या काय प्रत्येकाच्या घरी जाऊन विमान बनवण्याचे शास्त्र नावाचे पुस्तक देतात काय? जो ते शिक्षण घेण्यास सिद्ध आणि पात्र आहे त्यालाच ते मिळणार. आणि असं सगळं ज्ञान असणारे एकजात नष्ट झाले तर काय म्हणणार? अरे ही विमान तर दिसतायत पण उडवणारे नाहीत आणि हे कसं उडवायचं हेही माहित नाही तर ती कधी उडालीच नाहीत असा तर्क लावून मोकळे व्हायचे? चमत्कारिक आहे बुवा वैज्ञानिक लोकांचं, कालपर्यंत ते एक गोष्ट ठाम अशीच असे मानत असतात, आज काही त्याच्याविरूद्ध सिद्ध झाले तर तेपण ठाम मानायला तयार होतात, परत उद्या काही वेगळेच समजले तर तेही ठाम हेच खरं असंही मानायला तयार असतात. (पुराणासंबंधी आपल्या विधानांवर नारळीकर कायम ठाम राहणार आहेत असे नेहमीच ऐकत आलो आहे.) नारळीकरांबद्दल टींगलटवाळीसारखं लिहितो म्हणून राग येईल कुणाला पण ह्या लोकांनी चालवलेल्या भारतीय ज्ञानाच्या टींगलटवाळीमुळे जुन्या वस्तूंचं, ठिकाणांचं, माहितीचं अणि पर्यायाने खुद्द विज्ञानाचं खूप नुकसान होतंय. कालच मला एक घटना कळली, ती अशा विचारांनी प्रेरित झालेले कशी मुदलात वाट लावतात याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. नाशिकमधले रामकुंड येथे अस्थि विसर्जीत करतात हे अक्ख्या जगाला माहित आहे. तिथेच का? कारण तिथे काहीतरी विशेष आहे, ते पाण्याचे स्त्रोत विशेष आहेत. पण मॉडर्न सायन्सने शिक्षित आणि पुर्वजांच्या ज्ञानाला फाट्यावर मारणार्‍या व्यक्तींनी ते सरळ बुजवून टाकलेत. स्विमिंगपूल केलाय त्याचा. आता तिथे नदीचे पाणी वाहून आणून टाकले जाते. विधी अजूनही सुरू आहेत पण आता त्या विधींना कर्मकांडांशिवाय फार काही अर्थ राहिला नाही. कुंभमेळ्यावर जे मी लिहिणार आहे त्यात याचा उहापोह होईलच. त्या पाण्यात काय विशेष आहे हे जाणकारांना माहित असेल, अनभिज्ञ लोकांनी थोडी वाट पाहावी. सतत पाश्चात्त्य चष्म्यातून जगाकडे बघायची सवय लागलेल्या व ऐहिक सुख हेच परमोच्च साध्य असं समजणार्‍या लोकांना माझे हेच कळकळीचे सांगणे आहे की खिल्ली उडवण्याआधी थोडासा विचार करा. कुठेतरी कुणीतरी अशीच महत्त्वाची वस्तू उगाच पायाच्या ठोकरीने खोल दरीत उडवून देत असेल जी फार महत्त्वाची असू शकते पण त्याचे महत्त्व न कळल्याने उजेडात यायच्या ऐवजी कायमची लुप्त होऊन जाईल. तो ठोकर मारणारा आपल्याच आधुनिक विचारांनी लुब्ध असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 16:47 नवीन
नारळीकरादि लोक किमान नेमके वर्णन नाही म्हणून तरी आक्षेप घेताहेत. बाकीच्यांचं काय? संस्कृतचा स तरी महिती असतो का त्यांना? अन ज्यांना थोडेफार येते तेही नुसते ठोकून देतो ऐसाजे करत बसतात. जे लोक अफाट दावे करतात त्यांना कधी दाबून विचारलंय का हो की कुठल्या पुराणाच्या कुठल्या अध्यायात आहे हे वर्णन म्हणून? अचाट दावे न करताही पुष्कळ भारी भारी गोष्टी आहेत हे दिसून येतं. पण न्यूनगंडग्रस्त लोकांना 'युरोप-अमेरिकेचं ज्ञान आपल्या ग्रंथांत' लिहिलेलं पाहिजे असतं, प्रत्यक्ष काय लिहिलंय ते कुणीच पाहत नाही. हे लोक आणि नीलचित्रफितींच्या विश्वात गुंगून प्रत्यक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे लोक यांत काडीचाही फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 16:49 नवीन
आणि विचार करा म्हणजे काय? बेनिफिट ऑफ डाउट द्या असेच ना? अन तोही का म्हणून द्यावा? काही नेमकं सांगा म्हटलं तर हात झटकले जातात, मग संशय का नै येणार? सर्व गोष्टींचे पुरावे नसतात हे मान्य, पण म्हणून त्या आधारावर किती कल्पनेचे इमले चढवावे त्याला कै अर्थ आहे की नाही? दुर्दैवाने आपल्या देशी ग्रंथांची बदनामी करण्यात हे अंधभक्तच आघाडीवर आहेत. त्यांच्यामुळेच आज जेन्विन काही सांगू गेले तरी कोणी लक्ष देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 17:33 नवीन
अचाट दावे न करताही पुष्कळ भारी भारी गोष्टी आहेत हे दिसून येतं. पण न्यूनगंडग्रस्त लोकांना 'युरोप-अमेरिकेचं ज्ञान आपल्या ग्रंथांत' लिहिलेलं पाहिजे असतं, प्रत्यक्ष काय लिहिलंय ते कुणीच पाहत नाही. हे लोक आणि नीलचित्रफितींच्या विश्वात गुंगून प्रत्यक्षाकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे लोक यांत काडीचाही फरक नाही. शंभर टक्के सहमत. स्वतः अभ्यास न करता, अजिबात डोकं न लावता 'व्हय जी' करणारे दोन्ही बाजूंनी आहेतच. होतं काय की अशाने खर्‍या विज्ञानाला मर्यादा पडतात. आइन्स्टाइनने म्हटलंय ना मग तेच खरं असं म्हणणारे व भृगु ऋषींनी म्हटलंय तेच खरं असं म्हणणारे माझ्यामते एकाच माळेचे मणी. असो. माझ्या गावाकडे १५-१६ वर्षांआधी आम्ही गावकुसाबाहेर एक प्लॉट घेतला होता. त्यात विहिर खणायचे काम सुरू होते. विहीर पुर्ण झाल्यावर चार-पाच दिवसांनी बघायला गेलो तेव्हा खोदणार्‍यांनी सहज बोलता बोलता सांगितले की जमीनीखाली साठ फूटांवर त्यांना दिडफूट लांब व एक फूट रूंद अशी एक मातीची पक्की वीट मिळाली होती. मी म्हटलं कुठाय तर म्हणे आम्ही फेकून दिली, विहिरीतून काढलेल्या मातीच्या ढिगार्‍यात तुकडे झालेली, परत मिळणे शक्य नाही. ती माती कोण कोण घेऊन गेलेले. ती सर्व माणसे खेडूत. अशा गोष्टींचे कणभरही महत्त्व माहित नाही. माझ्याकडे काहीच पुरावाही नाही की कुठल्या तज्ञाला दाखवू. मला त्यावेळेस प्रचंड दु:ख झाले की मी तिथे का उपस्थित नव्हतो. आमचं गाव फार जुनं नाही फारतर दिडशे -दोनशे वर्ष. जिथे ती वीट मिळाली तीथे शेकडो वर्ष जुनं जंगल होतं. आम्हीच तिथले पहिले रहिवासी. त्या भागात परत काही खोदकाम झाले नाही कारण नंतर बोअरवेल सुरू झाले व शासकीय नळही आले. एक महत्त्वाची घटना अशी सहज हातातून निसटून गेली कारण संबंधितांकडे योग्य दृष्टीकोन नव्हता. ही दहावी पर्यंत शाळा शिकलेली मंडळी, यांच्यात तो शास्त्रीय दृष्टीकोन विकसित करण्यात आलेल्या अपयशाची ती किंमत होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 07/14/2015 - 23:34 नवीन
गावाकडचा किस्सा रोचक आहे. आईन्स्टाईन आणि भृगुऋषी यांची निव्वळ तळी उचलणारे लोक सारखेच याबद्दल सहमत. मात्र आईन्स्टाईन आणि आपले ग्रंथ या दोहोंचा डीटेल अ‍ॅनॅलिसिस झालेला आहे, त्यात अजूनतरी अचाट शक्ती वगैरे सापडलेल्या नाहीत. "असतील की, तुम्ही सगळे ग्रंथ पाहिलेत का? तुम्हांला कशावरनं सगळं येतंय?" वगैरे प्रश्न विचारणार्‍यांना याचे अ‍ॅटिट्यूड आणि अ‍ॅप्टिट्यूड दोन्हीही नसते असे निरीक्षण आहे. तेव्हा कुंपणावर बसून मजा पाहणार्‍यांनी स्वतः थोडातरी एफर्ट घेऊन मग बोलावे असे माझे मत आहे. हेही अर्थात दोन्ही बाजूंना लागू आहे, पण सध्या निरर्थक भूतकालरंजनात मग्न होणार्‍यांचा सुळसुळाट झाल्याने त्यांनाच जास्त झोडपले जाते, बाकी काही नाही. त्यामुळे "अगोदर त्यांना सांगा" वगैरे निव्वळ रडीचा डाव आहे. ज्यांना आपल्या संस्कृतीची इतकी पडलीय, ज्यांची अस्मिता हागर्‍यापादर्‍या कारणावरून दुखावण्याइतकी तकलादू आहे, त्यांनी अगोदर आपल्या संस्कृतीचा जरा तरी अभ्यास करावा. जुने ग्रंथ कुठले आहेत, त्यांची भाषा-लिपी काय आहे, त्यांचा काय अभ्यास झालाय हे थोडेतरी बघावे. जनरली अशा लोकांना चार वेदांची नावेही धड माहिती नसतात असे निरीक्षण आहे. इतक्या अगाध ज्ञानाच्या आधारे जेव्हा इतरांचे अजेंडे बाहेर काढण्याची गोष्ट करतात तेव्हा काय बोलावे ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Wed, 07/15/2015 - 05:24 नवीन
____________________/\___________________ ........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे Wed, 07/15/2015 - 08:50 नवीन
भूतकालरंजनाचा उगम का व कुठून झाला हे शोधले तर माझ्यामते ह्या वादावर तोडगा सापडण्याची शक्यता आहे. बहुतेक इंग्रजांच्या काळातच किंवा नंतर, नक्की कधी ते सांगता येणार नाही पण 'तिकडे पहा, किती (महान, हुशार, शिस्तबद्ध, श्रीमंत) लोक आहेत, नाही तर आपले लोक' असा आपल्याच लोकांना नालायक ठरवण्याचा प्रघात इंग्रजांकडून उसना घेऊन, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या आणि इंग्रजमिंध्या लोकांनी बाटग्या मुल्लाच्या थाटात जोरदार बांग देत सुरू केला. या एतद्देशीय स्वाभिमानी लोकांना मानाहानीकारक वाटणे साहजिकच होते. पण त्यांची एक मोठी समस्या होती की ना काळ त्यांच्यासोबत होता, ना सत्ता, पुर्वजांची मौल्यवान अशी ज्ञानसंपत्ती. मधल्या पीढींच्या संवर्धन, संगोपन न करण्याच्या सवयीने म्हणा किंवा हे ज्ञान जतन केले नाही तर दोन हजार वर्षांनी आपल्या लोकांना खाली मान घालावी लागेल अशी दूरदृष्टी त्यांचेकडे नसेल त्यामुळे म्हणा, किंवा मुसलमानी सत्तेच्या काळात झालेल्या विध्वंसामुळे म्हणा, कुठल्यातरी कारणाने हे ज्ञान, माहितीचे संकलन लुप्त झाले. सांप्रत लोकांकडे काही कथा/आख्यायिकांशिवाय आपले दावे पुढे रेटायला काहीच हातात नाही. परत वाद पण अशा लोकांशी घालायचाय जे वेगळ्या विचारपद्धतीच्या शिकवणूकीतून तयार झालेत. त्यांना हवे असलेले पुरावे विशिष्ट फॉर्मॅट मधेच हवेत. ह्यांचे पुरावे त्यांना ग्राह्य नाहीत. बरीचशी एकतर्फी पद्धत आहे. त्यामुळे प्रश्न विचारणारे भुवया उडवून विचारतायत आणि आपल्या इतिहासावर विश्वास असून उत्तर देता येत नाही अशी विचित्र परिस्थिती झाली. कुठल्याही देशाच्या लोकांना यापद्धतीने वागवल्या गेले असते तर त्यांनी तेच केले असते जे आज काही भारतीय करतात. आज आपल्या दिव्य भूतकाळाची भलामण करणारे कुठून तरी काही तरी ऐकून, स्वतःचं थोडं कल्पनारंजन त्यात जोडून देतात ठोकून. हे प्रचंडच चुकतंय. ज्यांना खरंच आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगायचा आहे त्यांनी तेवढे कष्ट उपसायला हवेत. पुरावे ठिकठिकाणे जाऊन शोधायला हवेत. त्याचा शिस्तबद्ध रेकॉर्ड तयार करायला पाहिजे. पण हे कोण करणार नाही. कारणे तीन: १. पुर्वजांचे ज्ञान, नियम, पद्धती परत मिळवण्यापलिकडे गेल्यात. आकाश पाताळ एक केले तरी मिळणार नाहीत. मिळाले तर फक्त काही खुणा मिळतील, त्यापेक्षा जास्त काही नाही. २. 'तसे काही खरंच होतं का नाही' असा स्वतः देशी स्वाभिमानी व्यक्तींचा डळमळीत विश्वास. ३. सांप्रत काळात जे सहज भौतिक सुख मिळतंय त्याचा आरामात उपभोग घेतांना येणारा न्यूनगंड टाळायला पोकळ ज्ञानाच्या अहंकारी पिंका टाकायला हव्या असतात. खरोखर योग्य पद्धतीने संशोधनाचे काम सोडून एकमेकांवर चिखलफेक करणे इतकाच ह्या भूतकालरंजनाचा उद्देश झालेला आहे. 'असं काही नव्हतंच' म्हणणारे ह्याबद्दल संशोधन करणारच नाहीत. "असंच होतं" म्हणणार्‍यांनी करणं जरा अवघड आहे हे वरच्या तीन कारणात आपण बघितलं. खरं संशोधन सोडून धर्म, जाती, डावे/उजवे, वर्ण, वर्ग आणि काय काय असे सगळे बिनमहत्त्वाचे मुद्दे येत राहतात. कारण ह्या वादाचं खरं कारण दोन्ही बाजूंचा अहंकार आहे. नारळीकरांना काय कारण पुराणातले दावे खोडून काढायचे? स्वतःचा अहंकार सुखावण्यापलिकडे काय होईल त्याने? जर त्यांना खरंच प्रचंड विश्वास आहे की असं काही नव्हतंच त्याचे विश्लेषण तरी का करावे? जसं मिड-ब्रेनच्या धाग्यावर काही लोकांनी म्हटले की जे धडधडीत खोटं आहे त्याची परिक्षा तरी का करावी? तरी नारळीकर ती करतात. का? केवळ विशिष्ट शिक्षणपद्धतीतून आलेला अहंकार. दुसरे कसे चूक आहे हे दाखवून द्यायची खुमखुमी. दुसरीकडे ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्याची कोण धडपड? मॉडर्न सायन्सच्या शास्त्र या संज्ञेत ते बसत नाहीये तर कशाला जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करायचा? हा सरळ सरळ बनाव आहे ज्योतीषवाल्यांचा. त्यांना मॉडर्न सायन्सकडून मान्यता पाहिजे. त्यांची खोटी दुकाने उघडी पडतील म्हणून ते घाबरतात. लाखो ज्योतिषात एखादा सिद्धहस्त असतो, बाकीचे अशांच्या पुण्याईवर आपली दुकाने रेटून नेत असतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 09:16 नवीन
नारळीकरांना काय कारण पुराणातले दावे खोडून काढायचे? स्वतःचा अहंकार सुखावण्यापलिकडे काय होईल त्याने? जर त्यांना खरंच प्रचंड विश्वास आहे की असं काही नव्हतंच त्याचे विश्लेषण तरी का करावे? जसं मिड-ब्रेनच्या धाग्यावर काही लोकांनी म्हटले की जे धडधडीत खोटं आहे त्याची परिक्षा तरी का करावी? तरी नारळीकर ती करतात. का? केवळ विशिष्ट शिक्षणपद्धतीतून आलेला अहंकार. दुसरे कसे चूक आहे हे दाखवून द्यायची खुमखुमी.
असं वाटत नाही. त्यांनी ते दाखवून दिलं तर इतका त्रास व्हायचं कारण काय? इतकं असेल तर करा तुम्हीही अभ्यास अन पाडा खोटे नारळीकरांना. शिवाय संशोधकांनी आपल्या ग्रंथांचाही अभ्यास केलेला आहे. त्यातून बर्‍याच रोचक गोष्टी समोर आलेल्या आहेत, पण ते बघणार कोण? समोरचे लोक माझं ऐकत नाहीत म्हणून रडत बसण्यात कै अर्थ नाही. अभ्यास करा, तो पब्लिश करा अन त्याचा प्रसार करा. हे न करता निव्वळ "आमच्याकडे काही नाही तरी लोक उगीच चेष्टा करतात" छाप डिफेन्सिव्हपणा करण्यात कै अर्थ नाही. मुळात आपल्याकडे काहीच नसतं तर ठीक होतं, हे जस्टिफाईड झालं असतं. पण बरेच काही असूनही त्याचा अभ्यास न करता फक्त जे अभ्यास करतात त्यांना शिव्या घालणे मला पटत नाही. अभ्यास करुन त्यांनी तुम्हांला न रुचणारे निष्कर्ष काढले ना? मग ते कसे चूक आहेत ते पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. स्वतः काहीच न करता ज्यांनी काहीतरी केले त्यांना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे इतके फक्त मला सांगा. हे जरासे ब्रिगेडी इतिहासकारांसारखे वाटते. "शिवाजीमहाराजांचा खोटा इतिहास लिहिला गेला" इ.इ. सांगतात, पण त्यांच्या खर्‍या इ. इतिहासामागील पुरावे विचारले की तोंड बंद होते त्यांचे. आणि हे कोणी करणार नाही वगैरे चूक आहे. विविध ज्ञानशाखांतून याबद्दल प्रचंड काम सुरू आहे. बरेच गोरे आणि काही भारतीयही यात आघाडीवर आहेत. पण बघायचे कष्ट कवण घेतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 07/15/2015 - 16:22 नवीन
मला वाटतं आपण दोघंही एकच गोष्ट वेगवेगळ्या भाषेत सांगतोय. कुठलाही दावा करणार्‍यांच्या हाती पुरेसा पुरावा असावा असंच तुमचंही म्हणणं आहे आणि माझंही. बेनेफिट ऑफ डाऊटचा गैरफायदा घेऊन उगाच कुणी 'हे तर आमच्याकडे आधीपासून होतं' अशी पोकळ अहंकारी पिंक टाकणं मलाही मंजूर नाहीच. तसंच एखाद्या नामवंत संशोधकाचे स्वतःचे मत त्यांनी फार अभ्यासांतीच व्यक्त केले असणार हा भाबडा विचारही मंजूर नाही. भूतकालरंजन करणार्‍यांना असं का वाटत असावं याचं विश्लेषण मी केलं. तुम्ही म्हणता संशोधन करणारे करत आहेत, त्यातून ज्या रोचक गोष्टी समोर येत आहेत, मग त्या कुठे आहेत? त्याचा गाजावाजा का होत नसावा? कुठे आहेत ती संशोधनं? विमानिका शास्त्र या तथाकथित ग्रंथाला फोल ठरवणार्‍या संशोधनाची लिंक चटकन मिळते. एखादी काहीतरी सिद्ध झाल्याची मिळाली आहे का? त्याचा हिरिरिने प्रचार झालाय का? अभ्यास करुन त्यांनी तुम्हांला न रुचणारे निष्कर्ष काढले ना? मग ते कसे चूक आहेत ते पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. स्वतः काहीच न करता ज्यांनी काहीतरी केले त्यांना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे इतके फक्त मला सांगा. नारळीकरांनी लिहिलेल्या लेखावर आक्षेप एवढाच होता की कथा कादंबर्‍यांतून परिपूर्ण वैज्ञानिक माहिती (त्यांना ज्या फॉरमॅटमधे हवी तशी) मिळत नाही म्हणून ते पुराणग्रंथांना उडवून लावतात. कशावरून त्यांनी काय निष्कर्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. तो मला रुचतोय, नाही हा माझा प्रश्न आहे. इथे खर्‍या विज्ञानाला काय फायदा झाला? माझ्यामते तरी पुराणग्रंथांवर/कथांवर आधारून 'आमच्या कडे हे आधीच होतं' असं नुसतं ठोकून देणं आणि 'ते तसं नव्हतंच' असं तथाकथित अभ्यास करून मांडणं दोन्ही चूकच. जेव्हा पुराणं ही शास्त्रिय माहितीचे अधिकृत स्त्रोत नाहीतच तेव्हा त्यांना 'ते तसे का नाहीत' म्हणून विचारणं पटत नाही. 'ते तसे नाहीत म्हणून मी जे म्हणतो तेच सत्य' हे कितपत बरोबर? उदाहरणार्थ, त्या लेखात एका ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कालमापनाचा आणि पृथ्वीवरच्या कालमापनाचा संदर्भ दिला आहे. ब्रह्मदेवाचे काही क्षण म्हणजे पृथ्वीवरची काही युगे असं ग्रंथात्/कथेत म्हटल्याचं सांगतात. पण त्याच ठिकाणी आइन्स्टाइनने सर्वप्रथम मांडलेली वेळेच्या सापेक्षतेची संकल्पना पुराणग्रंथात उल्लेखली आहे ह्या बाबीवर जोर न देता तमुक राजा पृथ्वीवरून ब्रह्मदेवाकडे कसा पोचला याबद्दल काहीच नाही म्हणुन आश्चर्य व्यक्त करतात. त्या कथेत गणिती तपशील अमूक ढमुक नाही असे त्यांचे म्हणणे. त्यांचा प्रश्न रास्त आहेच. पण एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी दुसरा बिनमहत्त्वाचा मुद्दा पुढे आणून त्यावर सोयिस्कर चर्चा करणे याने काय सिद्ध होते? आपला सोयिस्कर मुद्दाच कसा सर्वार्थाने सर्वोच्च महत्त्वाचा आहे हे पटवून सांगणे किती योग्य. म्हणून म्हटले कशावरून त्यांनी काय निष्कर्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. मॉडर्न सायन्सच्या काही मान्यता आहेत. त्या मान्यतांच्या बाहेर जगात काहीच घडत नसतं असा त्यांचा (अहंकारी) दावा असतो. त्या मान्यता कालांतराने बदलल्या की नव्या मान्यतांना डोक्यावर घेतले जाते. नवे पुरावे समोर आले की जुन्या मान्यता टाकून दिल्या जातात. म्हणजेच पुरावे उपलब्ध नाहीत म्हणून एखाद्या गोष्टीची शक्यताच नाकारणे हे बरोबर नाही. प्रस्तुत लेखात त्यांनी ती शक्यताच सपशेल नाकारली आहे. आणि ते सतत नाकारत आले आहेत. एक विज्ञानवादी म्हणून ही भूमिका माझ्यामते तरी योग्य नाही. बाकी ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न. तरी अशा शक्यतेचे सूत धरून धर्म/जाती/देश वैगेरेंचा स्वर्ग गाठून 'आम्ही कसे जात्याच हुशार आहोत कि नाइ बघा' चा दंभ मिरवणार्‍यांना कानफटात हाणाविशी वाटते ते वेगळे. आणि हे कोणी करणार नाही वगैरे चूक आहे. विविध ज्ञानशाखांतून याबद्दल प्रचंड काम सुरू आहे. बरेच गोरे आणि काही भारतीयही यात आघाडीवर आहेत. पण बघायचे कष्ट कवण घेतो? >> भूतकाल किंवा पुराणकाळ रंजन करणार्‍यांना पटापट दाखले देऊन तोंडावर पाडण्यास विज्ञानवादी लोक अहमहमिकेने पुढे असतात. कुठे भारतीयांच्या ओरिजीनल ज्ञानाचं कौतुक होत असेल तर तिथे मूग गिळून गप्प असतात. तुम्ही जे प्रचंड काम सुरू आहे म्हणताय त्याबद्दल मात्र कुठेही कोणीही बोलत नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 16:45 नवीन
भूतकालरंजन करणार्‍यांना असं का वाटत असावं याचं विश्लेषण मी केलं. तुम्ही म्हणता संशोधन करणारे करत आहेत, त्यातून ज्या रोचक गोष्टी समोर येत आहेत, मग त्या कुठे आहेत? त्याचा गाजावाजा का होत नसावा? कुठे आहेत ती संशोधनं? विमानिका शास्त्र या तथाकथित ग्रंथाला फोल ठरवणार्‍या संशोधनाची लिंक चटकन मिळते. एखादी काहीतरी सिद्ध झाल्याची मिळाली आहे का? त्याचा हिरिरिने प्रचार झालाय का?
केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स, chakravala algorithm or the pulverizer for solving diophantine equations, पाणिनीचे संस्कृत व्याकरण आणि त्याचा आधुनिक भाषाशास्त्रावरचा खोल प्रभाव, दिल्लीतला विनागंज विष्णुस्तंभ, wootz steel, सुश्रुतसंहितेतील सर्जरीची डीटेल आणि शास्त्रीय वर्णने, टिपू सुलतानाची रॉकेट्स, दक्षिणेतले मंदिरस्थापत्य, वेरूळसारखी वरून खाली खोदलेली देवळे ही अनेकांपैकी काही उदाहरणे आहेत. यांपैकी प्रत्येक उदाहरणाचे संशोधन होऊन त्याला संशोधकांनी आणि सामान्य लोकांनीही चिकार डोक्यावर घेतलेले आहे. साधे गुगलून पाहिल्यासही याचे प्रत्यंतर येईल. पण भूतकालरंजन करणार्‍यांना यांपैकी कशाचे फारसे पडलेले नसते. चक्रवाल अल्गोरिदम आणि केरळ स्कूलसारखे हिरे समोर असताना वैदिक गणित नामक दगडाशी खेळणारे हे लोक, यांच्या काय नादाला लागता....असोच. बाकी प्रतिसादाबद्दल बोलायचे तर किमान काहीएक अभ्यास करून बनलेले मत हे भले मग पूर्ण अनबायस्ड नसले तरी तुलनेने ठीकच असते. याचा अर्थ मी त्यांचा पूर्ण समर्थक वगैरे नाही, फक्त दोन पक्षांत तुलना केली असतानाचे मत सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 07/15/2015 - 22:35 नवीन
तुम्ही जी उदाहरणे दिलीत तीच डोक्यात ठेऊन बोलत होतो आता पर्यंत. त्यामुळेच... असो. आता नारळीकर अथवा त्यांच्यासारखं मत असणारे यांच्या विषयी थोडं. ही लोकं कायम भूतकालरंजकांवर का उखडलेली असतात? याचे कारण भूतकालरंजकांच्याच न्यूनगंडातून आलेल्या अहंगंडात आहे. मॉडर्न सायन्सने (वा एखाद्या व्यक्तीने) सांप्रत काळात एखादा महत्त्वपूर्ण शोध लावला आणि त्याचा यथोचित सन्मान होत असेल तर काहींच्या (जे पूर्वी पाश्चात्त्यांकडून दुखावले गेलेते) 'यात काय मोठं, हे तर आमच्याकडे आधीच होतं, तुम्ही काय मोठे तीर मारलेत' अशा अर्थाच्या पि़ंका पडतात. हे पिंकसम्राट जे नवे शोध लागले त्यांनाच टार्गेट करत असल्याने जेन्युइन भारतीय शोधांकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नाही. आता होतं काय की सांप्रत काळात कुठलाही शोध लावायचा म्हणजे खायचं काम तर नाही. आधी भयंकर रीसर्च करा, त्याचे शेकडो प्रयोग करा, काही सिद्धांत मांडा, ते जाणकारांकडून ठोकबजावून मान्यताप्राप्त करून घ्या. अशा सगळ्या दिव्यांतून जाऊन कुठेतरी हजारोत एखाद्या संशोधकाचे स्वप्न साकार होते. त्यातही मॉडर्न सायन्समधे ज्याने सगळ्यात आधी जाहीर केलं त्यालाच त्या शोधाचा मान मिळतो. मॉडर्न सायन्समधे संशोधकाच्या नावाला अतोनात महत्त्व आहे. त्यांच्या कष्टाचं, बुद्धीमत्तेचं कौतुक केलंच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. यातलं काहीही न करणारे आणि शष्प माहित नसणारे उगाच डीवचल्यासारखं, "हुं, त्यात काय एवढं" असं म्हणायला लागले तर कोणाचीही तळपायची मस्तकात जाणारच. मग तो अशा दावे करणार्‍यांची बिन-पाण्याने करायला मागे पुढे पाहणार नाहीच. माझ्यामते नारळीकरांचा पुराणकथांवरच्या रागामागे हीच मीमांसा असेल, असं वाटत तरी आहे. शेवटी काय तर विज्ञान राहतं बाजूला आणि लोक फक्त अहंकाराच्या लढाया करत राहतात. त्यापेक्षा खरं विज्ञान कुठल्याही अहंभावाशिवाय लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ते प्राचीन असो वा अर्वाचीन. त्याचा उचित सन्मान राखणे सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमधे ज्या काय पद्धती होत्या, त्या तशाच का होत्या, अशा का नव्हत्या असले भोचक प्रश्न आजचा काळ डोळ्यासमोर ठेवून विचारणे चूक आहे. भारतीय प्राचीन विज्ञान संस्कृती आजच्या पाश्चिमात्त्य विज्ञान संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी असण्याची भरपूर संभावना आहे. आजचं विज्ञान हे समाजकेंद्रित वाटतं, प्राचीन काळातलं कदाचित व्यक्तिकेंद्रित/व्यक्तिपुरतं मर्यादित असेल. म्हणून ते काळाच्या ओघात लुप्त झालं. आजच्या नियमांनुसार तेव्हाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे कठीण आहे. कारण त्यांचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि ती मिळवण्याची त्यांची पद्धत याचा सांप्रत समाज कदाचित कल्पनाही करू शकणार नाही. याची उदाहरणं जागोजाग पाहायला मिळतात, पिरामिड्स हे त्यातलंच एक. शेवटी तुमच्या मताला दुजोरा देऊन ही उपचर्चा संपवतो. समर्थांचंही तेच म्हणणं आहे. अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतर झाकोनि असावे प्रकटोनि नासावे, बरे नव्हें ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 07/16/2015 - 12:10 नवीन
संदीप डांगे आणि बात्मान छान चर्चा! ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/15/2015 - 14:35 नवीन
मधल्या पीढींच्या संवर्धन, संगोपन न करण्याच्या सवयीने म्हणा किंवा हे ज्ञान जतन केले नाही तर दोन हजार वर्षांनी आपल्या लोकांना खाली मान घालावी लागेल अशी दूरदृष्टी त्यांचेकडे नसेल त्यामुळे म्हणा, किंवा मुसलमानी सत्तेच्या काळात झालेल्या विध्वंसामुळे म्हणा, कुठल्यातरी कारणाने हे ज्ञान, माहितीचे संकलन लुप्त झाले. सांप्रत लोकांकडे काही कथा/आख्यायिकांशिवाय आपले दावे पुढे रेटायला काहीच हातात नाही.
जुने मिपाकर फार फिरकायचे नाहीत असे म्ह्टले तरी पण या विषयावर लिहायची खुमखुमी कितीही म्हटले तरी कमी करता येत नाही. समजा त्या काळी इतके ज्ञान होते-- कुरूक्षेत्रावर अ‍ॅटम बॉम्बचा वापर केला होता तर मग लढाई घोडे आणि रथ वापरून का केली जायची (की तसे काव्यात लिहिले आहे) हो डांगे साहेब? आताच्या काळात अणुयुध्द होऊ शकेल.पण एकीकडे अणुबॉम्ब वापरायचा आणि त्याच युद्धात खंदे वीर धनुष्यबाण- गदा आणि तलवारी घेऊन लढत आहेत असे चित्र अणुबॉम्बच्या सध्याच्या काळात कुठेच उभे राहणार नाही.मग त्याकाळी का बरे उभे रहावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उगा काहितरीच Mon, 07/13/2015 - 21:30 नवीन
लेखकाशी काही अंशी सहमत! जे तंत्र आपण वापरूच शकत नाहीत तर त्याचा काय फायदा? उगा आमचे पुर्वज लै भारी ! असं म्हणायचे. त्यापेक्षा खरंच करून दाखवा एखादे अस्त्र महाभारतात लिहील्याबरहुकूम आणि करावे तोंड बंद पुरोगामी पुरोगामी म्हणतात त्यांचे !
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Tue, 07/14/2015 - 12:59 नवीन
तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं दिसत नाही. >> मान्य अहे. कृपया लिंकिंग समजावून सांगितलत तर बरं होईल आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल हा मुख्य मुद्दा मांडायचा आहे.>> तेच म्हणायचय मला पण . हआपल्याकडे प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे हो. पण आपण त्याचा उपयोग कारण नहि. नुसती पूर्वजांना नावं ठेवत बसतो . त्याची कारण अशी देत येतील १. हे ज्ञान संस्कृत मध्ये असल्यामुळे ते उजेडात येत नहि. (संस्कृत शिकण्यात कोणाला इंटरेस्ट आहे ? इंग्लिश महत्वाची ) २. ज्ञानाने भरलेले अनेक दुर्मिळ ग्रंथ परकियांनी नष्ट केले (उदा . नालंदा ,तक्षशीला हि पूर्वीची विद्यापीठं . ज्यात अफाट ज्ञान साठवलेलं होतं ). ३. काही गोष्टी पूर्वजांनी मुद्दामच ग्रंथांमध्ये नमूद करून ठेलेल्या नाहीयेत . ते ज्ञान चुकीच्या लोकांच्या हाती लागू नये म्हणून . असं ज्ञान गुरु शिष्य परम्परेकडून पुढे सरकवल जायचं . पण आता ती परंपराही राहिली नाही . आणि ते ज्ञान हि लुप्त झालं त्यापेक्षा खरंच करून दाखवा एखादे अस्त्र महाभारतात लिहील्याबरहुकूम आणि करावे तोंड बंद पुरोगामी पुरोगामी म्हणतात त्यांचे >> आपल्या पूर्वजांना काही काळात नाही असं म्हणणार्यांनी तसा प्रयत्न करून बघावा कि . कुणी अडवलंय ?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 07/14/2015 - 16:26 नवीन
आपल्या पूर्वजांना काही काळात नाही असं म्हणणार्यांनी तसा प्रयत्न करून बघावा कि . कुणी अडवलंय ?
प्रयत्न चालू आहेत, तयार झाल्यावर पाककृती अगोदर मिपावरच टाकण्यात येईल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
J
Jack_Bauer Tue, 07/14/2015 - 16:47 नवीन
>>पण आपण त्याचा उपयोग कारण नहि. नुसती पूर्वजांना नावं ठेवत बसतो . आपण नावं ठेवत नाही , आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
प्यारे१ Tue, 07/14/2015 - 13:04 नवीन
http://misalpav.com/node/17635 जुन्या लेखाची झाईरात!
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 07/15/2015 - 08:56 नवीन
आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता >>> आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 09:09 नवीन
आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता
यत्ता १०वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या माणसासाठी हे वाक्य चूक आहे. प्रयोगशाळेत प्रयोग करवून घेतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
J
Jack_Bauer Wed, 07/15/2015 - 16:28 नवीन
आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता >>> आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता
प्रयोग करत बसण्यापेक्षा त्या आधुनिक शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आपण वापरतो आपल्याला उपयोगी पडतील अश्या प्रकारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी Wed, 07/15/2015 - 12:25 नवीन
हो ना . मग तसेच ग्रंथांमध्ये सांगितलेले हि प्रयोग करून बघावेत . आणि खरं खोट आपल आपण ठरवावं
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 13:03 नवीन
तुम्ही केला का एक तरी प्रयोग ग्रंथांमधला? नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 13:51 नवीन
अरे हो, बॅटमॅन भौ, तुमचं ते संस्कृत काव्य या विषयावरचं कुठं आहे हो (एका प्रतिसादात वाचलं होतं). सापडत नै. जमेल तर टाका इथे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संजय पाटिल Wed, 07/15/2015 - 12:40 नवीन
आयुर्वेद वाचलाय काय हो कोणी? हा पुरावा म्हणून पूरेसा आहे काय?
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 13:38 नवीन
च्यायला, दर आयडी-पिढीत (ही वर्षाला बदलते इथे) हेच प्रश्न, असेच एक-दोन हेकट आणि तरीही दर वेळेस (किमान) शंभरीची खात्री. धागाकर्त्यास प्रतिसादाला रुपया मिळत असता तर मी रोज ह्या आणि ह्याच ज्वलंत विषयावरचे धागे काढले असते. ;) (किमान तारतम्याची आशा बाळगणारा)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 13:52 नवीन
अगदी सहमत. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 07/15/2015 - 14:29 नवीन
लेख आवडला. पण हाच लेख समजा २०१० किंवा २०१२ मध्ये लिहिला असतात तर ट्रिपल सेंच्युरी पण मारली असतीत. आता त्याच त्याच विषयावर काथ्या कुटून कंटाळा आला असावा निदान माझ्यासारख्या जुन्या मिपाकरांना तरी. तेव्हा यात काथ्या कुटायला नवीन मिपाकरच सरसावतील. जुने मिपाकर फारसे फिरकायचे नाहीत इथे असा माझा कयास आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/15/2015 - 14:37 नवीन
आमच्या पुणेकर जातभाईशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
म
मृत्युन्जय Wed, 07/15/2015 - 16:07 नवीन
शमत आहे. मलाही टंकाळा आला आहे. त्यामुळे फिरकलोच नाही (अर्थात मी उलट्या बाजुने बोलायचो बरं का ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
अ
अस्वस्थामा Wed, 07/15/2015 - 16:11 नवीन
तुमचे रामायण महाभारतावरचे निबंधीय प्रतिसाद आमच्या ज्ञानात भरपूर भर टाकून गेले होते बरं का. आम्हाला अजून आठवतायत बरं का..!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सतिश गावडे Wed, 07/15/2015 - 17:05 नवीन
अगदी अगदी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
म
मी-सौरभ Wed, 07/15/2015 - 16:47 नवीन
मिपा च्या पुराणात पण ही वांग्याची भाजी बरेच वेला झालीये
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 07/15/2015 - 23:47 नवीन
जुन्या लोकांना ते फार जुने आहेत्, त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेत असं सारखं सारखं सांगून नक्की काय सुचवायचं असतं? सेम टू सेम प्रतिसाद, सेम टू सेम विचार जर आढळत असतील तर जुन्या लोकांनी कष्ट घेऊन लिण्का पुरवाव्यात. नव्यांनाही जुन्या विषयांवर बोलायला आपल्याकडे काही नवं व वेगळं आहे का याचा अंदाज घेता येईल. तसंही इथं कुणी जगाला शाणं करायला येत नसतं, मनातलं बोलायचं असतं, इतरांचं त्यावरचं मत ऐकायचं असतं, आपलं मत/ज्ञान/विचार चाचपून बघायचे असतात. इथल्या एका धाग्याने, प्रतिसादाने जग हलणार नसतं. (पण प्रतिसादकर्त्याचं/धागाकर्त्याचं जग मुळासकट हलू शकतं.) ह्यावरून म्हातारे लोक तरूणांच्या प्रकरणांकडे कसे पाहत असतात ते आठवलं. अनुभव घेऊन झालेला असतो. त्यात काय राम नाही हे दिव्यज्ञान झालेलं असतं. नव्या पोरांकडे, 'का हे असा व्यर्थ वेळ वाया घालवतात' टाईप लूक टाकत असतात. पिकलेल्या पानांनी आपण पिकलोय म्हणून नव्याने कुणी हिरवे होऊच नये असं म्हणणं जरा विचित्रच नाही का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा