Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुराणातील वांगी ?

J
Jack_Bauer
Sun, 07/12/2015 - 21:25
🗣 171 प्रतिसाद
आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ? आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया : अ : अणूबॉम्बचा शोध ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!! मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ? अ : विमान ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर. मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ? अ : प्रोग्रामिंग ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे. मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो. अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी . मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ? मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले. आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

प्रतिक्रिया द्या
60448 वाचन

💬 प्रतिसाद (171)
ह
हुप्प्या गुरुवार, 07/16/2015 - 08:11 नवीन
अनयुझ्वल क्लेम्स रिक्वायर अनयुझ्वल प्रूफ असे इंग्रजीत म्हणतात. म्हणजे तुम्ही अवाच्या सवा दावे करत असाल तर त्याकरता अवाच्या सवा पुरावे आवश्यक आहेत. हजार वर्षापूर्वी कुणालाही अणुबॉम्ब, विमाने, लेझर, टीव्ही हे माहित नव्हते. असल्या कुठल्या गोष्टीचे शोध लागले नव्हते हे म्हणणे असामान्य नाही. हे प्रस्थापित ज्ञान आहे. असे म्हणणार्‍याला संस्कृत वाचा, कुठलेसे प्राचीन ग्रंथ वाचा वगैरे सल्ले देणे मूर्खपणाचे आहे. कारण त्यांच्या दाव्यात असे अवाच्या सवा, अचाट आणि अफाट काही नाही. याउलट आपल्याकडे सग्गळे सग्गळे आधीच होते, आम्हाला संस्कृत कळत नाही म्हणून, नाहीतर आम्हीच सगळे शोध लावून चुकलो आहोत हे सिद्ध करता आले असते वगैरे अचाट आणि अफाट दावे आहेत. युरोपियन व अन्य पाश्चात्य लोकांना जे आत्ताआत्ता अथक मेहनतीनंतर मिळाले, ज्या मेहनतीचे, प्रतिभेचे, संशोधनाचे अनेक पुरावे ढळढळीत उपलब्ध आहेत हे शोध हजारो वर्षे आम्हाला आधीच अवगत होते. असला दावा काहीच्या बाही अचाट आहे. तो सिद्ध करायला तसेच अचाट पुरावे असायला हवेत. तसे नसतील तर ह्या फुकाच्या बाता आहेत. त्यात काहीही दम नाही. रिकामटेकड्या लोकांनी, पोकळ अभिमान बाळगणार्‍यांनी मारलेल्या फुशारक्या आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 08:41 नवीन
म्हणजे तुम्ही अवाच्या सवा दावे करत असाल तर त्याकरता अवाच्या सवा पुरावे आवश्यक आहेत.>>> ज्या मेहनतीचे, प्रतिभेचे, संशोधनाचे अनेक पुरावे ढळढळीत उपलब्ध आहेत>>> हे अवाच्या सवा पुरावे तुमच्या समोरच अनेक ग्रंथांमध्ये दिले आहेत. तुम्हाला ते वाचायला नको. करायला नको. साधी सोपी गोष्ट घ्या .electrical आणि इलेक्ट्रोनिक्स विषयावर चा अगस्ती ऋषींचा ग्रंथ घ्य. त्यातला विद्युत घाट निर्माण करण्याचा साधा प्रयोग तरी करून बघितलाय का ? नसेल बघितला तर ह्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? हजारदा तेच सांगून सुधा तुम्हाला काळात नसेल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते . हे ज्ञान जर तुम्हाला समजत नाही , झेपत नाही . म्हणून असं काही नव्हतंच च टुमण लावलंय . म्हणतात न कोल्ह्याला द्राक्षे आंबट . :-)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 07/16/2015 - 16:14 नवीन
साधी सोपी गोष्ट घ्या .electrical आणि इलेक्ट्रोनिक्स विषयावर चा अगस्ती ऋषींचा ग्रंथ घ्य. त्यातला विद्युत घाट निर्माण करण्याचा साधा प्रयोग तरी करून बघितलाय का ? नसेल बघितला तर ह्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? हजारदा तेच सांगून सुधा तुम्हाला काळात नसेल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते . हे ज्ञान जर तुम्हाला समजत नाही , झेपत नाही . म्हणून असं काही नव्हतंच च टुमण लावलंय . म्हणतात न कोल्ह्याला द्राक्षे आंबट .
माझ्याकडे चार वर्षांची इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकीची पदवी आहे. चार वर्षांत विद्युत घटासंबंधी जे काही अभ्यासलं ते सारं पाश्चात्यांनी लिहिलेल्या संदर्भग्रंथांमधून. अगस्ती ऋषींच्या ग्रंथाचा उल्लेख चार वर्षांच्या अभ्यासात कुठेच आढळला नाही. मात्र आता अभ्यासायला आवडेल. तुम्ही सविस्तर संदर्भ देऊ शकाल का? शिवाय मला संस्कृत तितकंसं जमत नाही. खरं सांगायचं तर "देव" शब्द चालवण्यापलिकडे मला संस्कृत येतच नाही. तुम्ही त्या संदर्भांचे मराठी भाषांतर करायला मदत कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ह
हुप्प्या गुरुवार, 07/16/2015 - 21:13 नवीन
इलेक्ट्रॉनिक्स, अणूबॉम्ब वा विमान ह्या गोष्टींचे वर्णन कुठल्याशा ग्रंथात असणे हा पुरावा असू शकत नाही. तो वाचून, तो अमलात आणून कुणीतरी खरोखरचे अण्वस्त्र, इलेक्ट्रॉनिक उपकरण वा विमान बनवून ते अपेक्षेप्रमाणे वागते आहे उदा. उडू शकणारे विमान तरच तो पुरावा म्हणता येईल. पुस्तकांमधे अनेक कपोलकल्पित, कवीकल्पना असू शकतात. भा रा तांब्यांच्या एका कवितेत "पंख फडकती घोड्यांना मौज दिसे ही थोड्यांना" अशी ओळ आहे ह्याचा अर्थ तांब्यांच्या काळात उडणारे घोडे होते आणि ही कविता हा त्याकरता पुरावा आहे असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच अगस्ती ऋषींच्या ग्रंथाचा दाखला देणे आहे. निव्वळ लेखी शब्द हा त्या तंत्रज्ञानाचा पुरावा असू शकत नाही. तसा प्रयोग करून सिद्ध करून दाखवायची जबाबदारी ते लिहिलेले खरे होते म्हणणार्‍यांची आहे. ज्यांना ते पूर्ण काल्पनिक वाटते आहे त्यांना पुरावा द्यायची गरज नाही. कारण त्या तथाकथित तंत्रज्ञानाचे कुठलेही ठोस अस्तित्त्व नाही हा पुरावा पुरेसा आहे, पुन्हा एकदा, निव्वळ लेखी शब्द हा पुरावा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 21:41 नवीन
ही तर खूप नंतरची गोष्ट झाली हुप्प्याशेठ. अगोदर ग्रंथांमध्ये तरी नक्की काय उल्लेख आहेत ते दाखवा म्हणावं. काहीच माहिती नसता नुसत्या फुकाच्या गप्पा मारणे इतकेच ज्यांना जमतेय त्यांचे नादास लागो नका ऐसा सल्ला देतो ऐसाजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 08:45 नवीन
बॅटमॅन. तुम्ही सगळी ऑपरेशन करून बघित्लीयेत वाटतं . विमान , अणुबॉम्ब स्वतः तयार करून बघितलंय वाटतं . प्रयोग करायची गरज त्याला असते ज्याला त्या सिद्धांताबद्दल शंका असते . आम्हला कुठलीही शंका नहि. त्यामुळे प्रयोग करण्याचा प्रश्न आहे . शंका तुम्हाला अहेत. त्यामुळे प्रयोग तुम्ही करायला आहेत .
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/16/2015 - 10:59 नवीन
प्रयोग करायची गरज त्याला असते ज्याला त्या सिद्धांताबद्दल शंका असते . आम्हला कुठलीही शंका नहि.
याबद्दल जाणकार जास्त बोलतीलच. पण साधारणपणे याला आंधळी श्रद्धा म्हणू हवं तर. त्याला शास्त्र म्हणू नका ना मग.
त्यामुळे प्रयोग करण्याचा प्रश्न आहे . शंका तुम्हाला अहेत. त्यामुळे प्रयोग तुम्ही करायला आहेत .
हे उरफाटे तत्वज्ञान झाले. म्हणजे गोमूत्रात अथवा स्वमूत्रात कँसर बरा करण्याचे गुणधर्म आहेत असा तुमचा ठाम विश्वास असेल तर ते तुम्ही सिद्ध करायचे नाही. पण "ते तसे कसे नाही" हे ज्यांना शंका असेल त्यांनी करायचे ? याउप्पर कोणी केलेच प्रयोग आणि सिद्ध केले की तुम्ही चूक आहात (उदा. विमान शास्त्राबद्दलचा रिसर्च पेपर) तर तुम्ही त्यांनाच दोष देऊन रिकामे होणार. हे म्हणजे चित भी मेरी आणि पट भी मेरी.. तुम्ही काय म्हणताय त्याचा तुम्हाला तरी तार्किक बोध होतोय का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 08:49 नवीन
तुडतुडी, तुम्हांला संस्कृतचा स देखील माहिती असेल तर अफाट अन अचाट विधाने तुम्ही करणार नाही. त्यामुळे तुमची विधाने नॉट ईव्हन राँग या क्याटेगरीत आहेत. चालूदेत तुमचे निरर्थक अत्मरंजन. बनवा त्या वैदिक गणितावर चालणारा सुपरकम्प्यूटर. बाकी त्या ग्रंथाचे नाव कळेल का हो? इलेक्ट्रॉनिक्स विषयावरच्या? की वर्तमानपत्रात दिलेले नाही?
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 11:01 नवीन
बॅटमॅन - तुम्हाला मेडिकल चा म आणि इंजिनीरिंग चा इ जरी माहित असेल तर ज्याविषयी आपल्याला काही माहित नाही किवा काळात नाही त्याबद्दल बोलू नये हे समजलं असतं . तुमचं आधुनिक सायन्स वापरा आणि दाखवा कि पाऊस पाडून आणि थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या . एबोला , एड्स सारखे आधुनिक रोग बरे करून दाखवा . नसेल जमत तुमच्या आत्मरंजनातून बाहेर पडा .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 11:06 नवीन
तुमचं आधुनिक सायन्स वापरा आणि दाखवा कि पाऊस पाडून आणि थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या .
कॄत्रिम पाऊस वगैरे गोष्टी ऐकल्या तरी आहेत का? बेसिक साक्षरता असलेल्या माणसापर्यंतही ही न्यूज बहुधा पोहोचली असावी. बाकी आधुनिक सायन्सचा वापर आम्ही रोजच करतो, प्रयोगशाळेतले प्रयोगही थोडे थोडे केलेले आहेत. तेव्हा आमच्या खात्यावर लहानशी का होईना, जमा आहे. पण तुमच्या खात्यावर बढाईखेरीज काय आहे? कुठलाही जुना ग्रंथ कधी पाहिला आहे का? मगाशी इतक्या बढाया मारत होता ना, अगस्त्य ऋषींच्या ग्रंथाचे नाव तरी ठाऊक आहे का? लै मागणे नै. जमल्यास बघा. नै आठवलं तर तुम्हांला परत गूगल नामक आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. तुमचे वैदिक गणिताधारित सुपरकम्प्यूटर बनवून दाखवा इतकंच असेल तर. ० आणि ०.०००००००००१ या दोन्हीमध्येही शेवटी शून्य ते शून्यच राहते हे सत्य विसरल्याने असा त्रास होतो. चालायचंच, नविन तंत्रज्ञानाने त्याच्या विरुद्ध वाटेल तसे नि तितके लिहायची मुभा दिलेली आहे. त्यातच तुमच्यासारखे पोकळ अभिमानवाले हात मारून घेतात. चालूद्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
प्यारे१ गुरुवार, 07/16/2015 - 11:07 नवीन
वांग्यांचे ज्येश्ठ अभ्यासक Jack_Bauer यांना शतकी धाग्यासाठी विशेष मदत केल्याबद्दल बॅटमॅन, अत्रुप्त, प्रगो आणि तुडतुडी यांना सव्वा सव्वा किलो वांगी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ;)
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 11:33 नवीन
तुम्ही जे मुख्य आहे ते सोडून नावावरच अडून बसलाय त्यातून तुम्हाला केवळ शब्दछल करण्यात इंटरेस्ट असावा असं दिसतंय .कधीकाळी पावसाच्या ४ सारी पाडल्या असतील तर आम्ही कृत्रिम पाऊस पडून दाखवला म्हणून कोण कुटून वाटतंय . किती मिलीलीटर कृत्रिम पाऊस पडून दाखवला हो ?लै मागणे नै. जमल्यास बघा. नै आठवलं तर तुम्हांला परत गूगल नामक आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. शेंबड्या पोरांनी सुधा कृत्रिम पावसाचं नाव ऐकलय हो . पण नुसतं नावच झालं . पाऊस कुठंय ? आणि ते एड्स , एबोला बद्दल कै बोलला नै ते . आता असले हास्यास्पद प्रतिसाद बंद करावेत हि विनंती . प्यारे१. ठांकू . वांग्याचं भरीत खायची लै इच्छा होत होती बघा . काही दिवसांपासून .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 12:13 नवीन
तुम्हांला नावही सांगता येत नाही म्हणजे कळालं काय ते. बाकी काही वेळेस तरी का होईना पाऊस पाडून दाखवलेला आहे. तुमच्या अगस्त्यमुनींप्रमाणे किती बॅटर्‍या बनवल्यात म्हणे तुम्ही? आणि त्या कितीचे व्होल्टेज देतात? याचे उत्तर कधीच येणार नाही, कारण जे आडात नाही तेच तुम्ही आहे म्हणून दाबून सांगताय. आडात सोनेचांदीप्लॅटिनम सगळे आहे, पण पितळ नसले तरी तेच आहे म्हणून तुमची बोंब सुरूये त्याला आता काय करणार. :) बाकी शेंबड्या पोराने ऐकले तरी तुम्ही मात्र ऐकले नसावेसे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 07/17/2015 - 09:28 नवीन
अरेय बाबा त्या बॅटर्‍यांना मी हवं तर तुझा संगणक जोडुन देतो. इलियड वर उजेड टाका ना जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 07/17/2015 - 14:39 नवीन
दोन मिनिटं ब्याट्या ईलियानावर कसा प्रकाश टाकणार म्हणून चक्रावलो होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
वगिश Sat, 07/18/2015 - 21:00 नवीन
पण मी म्हणतो तेलाचे दिवे असताना अगस्ती ऋषी विद्युत घटाचा शोध लावायला गेलेच कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/16/2015 - 12:08 नवीन
तुडतुडी ताई, आजच आमच्या इन्फोसिसच्या नारायणमूर्तींनी म्हटले आहे---भारतातील आय.आय.टी आणि आय.आय.एस.सी सारख्या संस्थांमध्ये ६० वर्षांमध्ये लोकांच्या जीवनात मूलगामी परिणाम घडवून आणेल असे एकही संशोधन झालेले नाही. आणि ते बरोबरही आहे. पण मग जास्त महत्वाचा प्रश्न कोणता? असे मूलगामी संशोधन कसे होईल हे बघणे की पन्नास हजार वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीतरी होते म्हणून उगीचच स्वतःला धन्य समजणे?
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/16/2015 - 13:38 नवीन
पण मग जास्त महत्वाचा प्रश्न कोणता? असे मूलगामी संशोधन कसे होईल हे बघणे की पन्नास हजार वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीतरी होते म्हणून उगीचच स्वतःला धन्य समजणे?
+१ मुदलात लेख हेच म्हणतोय थोडक्यात. पण काही लोकांचे "climing the victim card and blaming the world" हे इतके टोकाचे होते की मुद्दा राहतो बाजूलाच. अगदी लेखक म्हणतोय तसे "बरे बुवा असेल पूर्वी पण आता भविष्यातल्या जडण घडणीसाठी त्याचा वापर करता येत असेल तर पाहुया ना" त्याला ही विरोध आहे. थोडक्यात "आमच्याकडे होते हे मान्य करा" आणि आम्हाला ग्रेट म्हणा, बाकी . आता "bionic prosthetics" तयार होताहेत जे की अगदी आपल्या अवयवांसारखेच असतील. ते तयार झाले ही आपण आपली पुराणे घेऊन क्रेडिट क्लेम करायला तयार.. चीड याचीच जास्त येते. तयार तर करायचे नाही (आता परत या काळात जर आधी होते तर) पण मानभावीपणा मात्र मुलखाचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
त
तुडतुडी गुरुवार, 07/16/2015 - 13:57 नवीन
बाकी काही वेळेस तरी का होईना पाऊस पाडून दाखवलेला आहे. तुमच्या अगस्त्यमुनींप्रमाणे किती बॅटर्‍या बनवल्यात म्हणे तुम्ही? आणि त्या कितीचे व्होल्टेज देतात?>>> किती वेळेस , किती मिलीलीटर , त्यातून कुठली पिकं घेतली ? किती लोकांना प्यायला पाणी मिळालं हे हे सांगता येत नाही ना. त्या रोगान्वारच्या औषधाबद्दल सुधा काही सांगता येत नाहीये. त्या बॅटर्‍या कितीचे व्होल्टेज देतात हे बघायचंय न तुम्हाला . मग करा कि त्यांनी सांगितल्याप्रमाणे . आणि स्वतःच बघा कितीचे व्होल्टेज मिळतंय ते . माझ्या सांगण्यावर कशाला विश्वास ठेवताय ? बरे बुवा असेल पूर्वी पण आता भविष्यातल्या जडण घडणीसाठी त्याचा वापर करता येत असेल तर पाहुया ना>>> exactly . मला हेच म्हणायचय . आपल्याकडे जे काही आहे त्यावर कुठलाही संशोधन होत नाही .कुणालाही त्याबद्दल कुतूहल नाही कि जाणून घ्यायची , शोधून काढायची इच्छा नाही . जे आपलं आहे ते वाईट . आणि इंग्लंड , अमेरीकावाल्यांच सगळं चांगलं हाच आपला गैरसमज आहे . त्यांना आपण नावं ठेवतच नाही आहोत . पण आपल्याकडे जे आहे ते शोधायचा प्रयत्न होत नहि. परकीयांनी वापरलेलं उष्ट खाण्यातच आपल्या लोकांना धन्यता वाटते . अनेक गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच असूनसुद्धा त्यांची पेटंट केवळ आपल्या नालायक पणामुळे दुसर्यांकडे गेली आहेत . आता ह्याचं संशोधन करायचं म्हटलं तरी कोण करणार ? संस्कृत चं जावू द्या . आपली मातृभाषा तरी लिहिता वाचता किती जणांना येते ? मग कशाचं डोम्बल्याच संशोधन. आणि मग आपल्याकडे असं काही नाहीच त्यांच्याकडेच सगळं आहे म्हणून ओरड करायला मोकळे .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/16/2015 - 14:10 नवीन
जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे हा दावा तुमचा, सबब तो सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची. आमची नव्हे. इतके बेसिक तर्कशास्त्रही कळत नसेल तर मजा आहे. चला, अजून करमणूक करा आमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अस्वस्थामा गुरुवार, 07/16/2015 - 15:54 नवीन
नै बाकी सगळे आमचे प्रतिसाद तुम्ही इग्नोरलेत ते जौ देत. किमान या एका प्रतिसादाला तरी नीट वाचा. (उत्तराची अपेक्षाच नै.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मंदार कात्रे Fri, 07/17/2015 - 08:38 नवीन
Image removed. http://www.infowars.com/why-does-ancient-art-contain-depictions-of-flying-aircraft-helicopters-and-dinosaurs/
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 09:08 नवीन
या चित्रात काहितरी घोळ आहे म्हणतात. Image removed. Image removed. (चित्रे जालावरून साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 09:11 नवीन
हा तर इजिप्तमधला पुरावा आहे. आम्हांला भारतीय पायजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
स
संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 09:19 नवीन
काय बॅटमॅनकाका तुम्हीपण... अहो आपले भारतीय ही विमाने घेऊन उडत उडत तिकडे पिरामिडवर घिरट्या घालायला जायचे. इजिप्तवाल्या लोकांना हे काय प्रकार माहित नव्हता म्हणून त्यांनी ते कोरून ठीवलंय. आपल्या कडे तर कॉमन होतं ना मग कशाला कोरून ठेवतील? सांगा बरं आजपण आपल्या शाळेतली पोरं चित्र काढतांना डोंगर, त्याच्यामागून उंगवणारा सुर्य, पुढुन वाहणारी नदी असंच चित्र काढतात की नाही? की विमानं, कारा, बाइका, ट्रॅफ्फिक, बिल्डींगी असं काही काढतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 09:25 नवीन
ठांकु संदीपकाका, येकदम डोळेच उघडलेत १००० वॅटची बॅट्री वाप्रूण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/17/2015 - 09:42 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या! :-D आता दावा कर्ते पळुन जाणार , त्याच eमाणा तूण! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Sat, 07/18/2015 - 05:33 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
त
तुडतुडी Fri, 07/17/2015 - 09:55 नवीन
जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे हा दावा तुमचा, सबब तो सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची. आमची नव्हे>>> जुन्या ग्रंथात नुसते डावेच नाहीत तर त्यांची प्रोसेस आणि पुरावे सुधा आहेत . सबब ते वाचण्याची जबाबदारी तुमची . आमची नव्हे . दुसर्याला तर्क शिकवण्यापेक्षा वाचण्याचे कष्ट घेतले म्हणजे काही बेसिक गोष्टी क्लिअर होतील .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 12:31 नवीन
प्रोसेस आणि पुरावे आहेत हा दावा तुमचा, सबब ते दाखवण्याची जबाबदारी तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ग
गवि Fri, 07/17/2015 - 13:13 नवीन
मेल्या, पुराणात विमानं उडत होती म्हणशील तर काय जीभ झडेल तुझी? "सत्य वदे वचनाला नाथा" ऐवजी तुला नुसते "क्यिर्र" कसे ऐकू येते रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 13:25 नवीन
पाय लागू गवीकाका =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ह
हुप्प्या Fri, 07/17/2015 - 19:03 नवीन
पुलंची प्रतिभा अफाट आहे पण कुठल्या प्रसंगाला पुलंचे कुठले वाक्य चपखल बसेल ते ओळखणे हेही येरागबाळ्याचे काम नव्हे! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Sat, 07/18/2015 - 05:35 नवीन
=))__/\__ अगदी अगदी!!या बॅट्याचे कान पकडुन म्हणवुन घ्या बरं=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ह
हुप्प्या Fri, 07/17/2015 - 19:58 नवीन
ग्रंथात उल्लेख असणे हा फक्त ग्रंथात उल्लेख आहे ह्याचा पुरावा असू शकतो. त्या वापरुन विमान वा अन्य प्रगत वस्तू बनवल्या तरच तो ठोस पुरावा असू शकतो. कारण ग्रंथातील उल्लेख हा निव्वळ कल्पनारंजन असू शकते. अनेक कविता, अरेबियन नाईटस, वेताळ पंचविशी अशा अनेक पुस्तकात अत्यंत रम्य पण कपोलकल्पित गोष्टी आहेत. म्हणून निव्वळत पुस्तकातले खरे नाही. अगदी प्रोसेस आणि विधी तपशीलवार दिले असले तरी. आज विमानविद्या आहे, इलेक्ट्रोनिक उपकरणे आहेत ह्याचा पुरावा पुस्तके हा दिला जात नाही. उडणारी विमाने, चालणारी उपकरणे दाखवता येतात. जोवर पुराणातील वांग्यांचे ठोस अविष्कार दिसत नसतील तर त्या पुस्तकी मंत्रतंत्रांचे महत्त्व अत्यंत मर्यादित, ऐतिहासिक पण काल्पनिक दस्तावेज इतकाच. हा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रयत्न आहे ह्याची प्रस्तुत लेखकाला जाणीव आहे पण तरी एक शेवटचा प्रयास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/17/2015 - 10:05 नवीन
झोंबी लोकांनी १० हजार वर्षांपूर्वी सुपरकॉम्प्युटरचा शोध लावला होता.परवा अमेरिकेचे यान प्लूटोपलीकडे गेले.झोंबी लोकांची याने १० हजार वर्षांपूर्वीच त्याच्या दुप्पट अंतर लीलया पार करत असत.झोंबी लोकांच्या शनीच्या कड्यावर वसाहती होत्या.तिथे बुलेट ट्रेन, न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर, स्मार्ट सिटी या सगळ्या गोष्टी होत्या.सूर्यावरील तापमानही सहन करू शकेल असे मटेरिअल बनविले होते झोंबी लोकांनी.त्या मटेरिअलची घरे बनवून सूर्यावरही वसाहत होती आणि तिथे मनुष्यवस्ती असल्याचे झोंबीपुराणातील ४७७ व्या खंडातील १९२ व्या अध्यायातील २१४ नंबरच्या श्लोकात उल्लेख आहेत.पृथ्वीवरही झीरो ग्रॅव्हिटी त्यांनी तयार केली होती.पृथ्वीवरून चंद्रावर जाणारा ब्रीज त्यांनी बांधला होता. त्यावरून झोंबी लोकांच्या गाड्या २००० किलोमीटर प्रतिमिनिट इतक्या महाप्रचंड वेगाने जात असत.अनेक लोक नोकरीला चंद्रावर असत आणि विकेंडाला पृथ्वीवर येत असत आणि सोमवारी सकाळी लवकर निघून सकाळी ८ ला चंद्रावरील ऑफिसात हजर असत. झोंबी लोकांनी कित्ती प्रचंड प्रगती केली काय सांगू. सध्याची मानवी प्रगती त्यापुढे काहीच नाही. या सगळ्याला पुरावा मागता? अहो झोंबीपुराणात झोंब्यस्त ऋषींनी केलेले प्रयोग तुम्ही करून न बघताच असे प्रश्न विचारता? आणि झोंबी लोकांनी इतकी प्रगती केली होती हे खोटे असेल तर ते सिध्द करायची जबाबदारी तुमची. आम्ही आमच्या मनाला येईल ते दावे करणार. काय समजलात?
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Fri, 07/17/2015 - 10:20 नवीन
वैमानिक शास्त्र, यंत्र सर्वस्व -by rishi भारद्वाज ऋग्वेद - ह्यात वेगवेगळ्या यानांची माहिती दिली आहे अथर्ववेद , आयुर्वेद - ह्यात रोग आणि त्यांच्या औषधांबद्दल माहिती दिली आहे . षड्दर्शन समुच्चय - by हरिभद्र वैशेशिका, उलूक कांड -by महर्षी कणाद . ह्यात atomic system आणि physics बद्दल माहिती आहे . तसेच Time आणि space बद्दल सुधा सांगितलंय . सांख्य आणि योग -by rishi कपिल . ''enery can neither be created nor be destroyed. It can be convereted to one form to another form' हा सिद्धांत ह्याच्यात सांगितलाय . तसंच जैविक उत्क्रांती संबंधी ह्यात माहिती आहे .
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 12:37 नवीन
वैमानिक शास्त्र हा ग्रंथ फ्रॉड असल्याचे अगोदरच सिद्ध झालेले आहे. बाकी ॠग्वेदात कुठल्या यानाची माहिती आहे जरा सांगा बघू. काये, आमच्या तोकड्या बुद्धीने केलेले वाचन बहुधा अपुरे पडले असेल. आपण वाचन केलेत तर सांगावे. आयुर्वेदाबद्दल सहमत. अथर्ववेदात मुख्यतः अमुक रोग झाला तर काय मंत्र म्हणायचा इतकेच दिले आहे. ते म्हणून तुम्हांला गुण आलाय का? असल्यास सांगावे, सायन्स जर्नलमध्ये शिफारस करतो आत्ताच्या आत्ता. बाकी कणादांनी एक फक्त एकोळी सिद्धांत मांडला म्हणून आपल्याकडे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर होतेच, बरोबर? त्या हिशेबाने मीही दुसर्‍या आकाशगंगेतल्या राज्याचा स्वामीच आहे. पुरावे मिळणार नाहीत आणि पुरावे विचारणारे मूर्ख, पाखंडी, इ. आहेत. सेम विथ कपिलऋषी. नक्की कुठल्या अध्यायात दिलेय? तुम्हांला आहे ना माहिती, मग सांगा की आम्हां अडाणी जनांना. आम्हीही मिळवू नवीन ज्ञान. ग्रंथातील कितव्या अध्यायात काय विधान आहे हे जरा दाखवा, आम्ही अडाणी लोक तुमचे उतराई होवू. आपल्या इतिहासाबद्दल तुम्हांला खूप माहिती आहे असे दिसते, तरी तुम्ही हे ज्ञान वाटावे अशी विनंती आहे. त्याने आमचाही फायदाच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अस्वस्थामा Fri, 07/17/2015 - 12:54 नवीन
बॅटमॅन भौ.. आत्ता सांगायलाच आलो होतो की आता तू यांचे पाय धर आणि सगळे ज्ञान घे पाहू. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 13:06 नवीन
हा हा हा, अगदी अगदी. ज्ञान मिळवण्यासाठी कोणीही गुरू चालेल. तुडतुडीपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
स
संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 13:43 नवीन
"क्षमा करे, मुझे ऋग्वेद पूर्णरूपसे कंठस्थ है| आप जो कह रह है वैसा नही है|"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 13:48 नवीन
कंचा ड्वायलॉक की खरंच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 07/17/2015 - 13:54 नवीन
सौजन्य... श्रीयुत राजू श्रीवास्तव.... "भाईंचा रामायण सप्ताह"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 14:00 नवीन
हाहाहा, ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रचेतस Fri, 07/17/2015 - 15:03 नवीन
राष्ट्रकूटराजा कर्क ह्याच्या इ.स. ७३४ च्या बडोदे ताम्रपटात आहे ब्वा पुरावा विमानाचा. एलापुराचलगताद्भूतसन्निवेशं यदीक्ष्य विस्मित्विमानचरामरेन्द्रा: | एतद्स्वयंभुशिवधाम न कृत्रिमे श्री- र्दुष्टे दृश्यन्ति सततं बहु चर्चयन्ति | भूयस्तथाविधकृतौ व्यवसायहाने- रेतन्मया कथमहो कृतमित्यकस्मात् | कर्तापि यस्य खलु विस्मयमाप शिल्पी तन्नाम कीर्त्नमकार्यत येन राज्ञा | विमानातून जाताना एलापुर येथील पर्वतावर बांधलेले अद्भूत देवालय पाहून देव विस्मित झाले ते आपल्याशीच म्हणू लागले, की हे देवालय स्वयंभू असावे कारण इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. ज्या शिल्पीने हे देवालय बांधले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, हे माझ्याने कसे बांधवले हेच माझे मला कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Fri, 07/17/2015 - 15:20 नवीन
रोचक माहीती ! अवांतर : तुम्ही नक्की टनाटनी कुटिल संघिष्ठ आहात की स्वमतांध दांभिक तुंबडीभरु सुधारक हेच ठरवता येत नाहीये आम्हाला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 17:29 नवीन
अगदी बरोबरे, अन ही कन्सेप्ट त्यांनी घेतलीये रामायण व इतर पुराणग्रंथांतून. पण इतक्याने काय सिद्ध होते ते कळत नाही. एलोटीआरमध्येही बरेच काय काय आहे वैसे तो ;) शिवाय, विमान हा शब्द वाहन या जनरल अर्थानेही वापरला जातो हेवेसांनल. ;) त्यामुळे देवांची घोडागाडी म्हटली तरीही ते विमान, देवळातील मुख्य मूर्ती असलेल्या गाभार्‍यावरचा कळस हेही विमान आणि वैदिक काळातली बैलगाडी हेही विमानच =)) त्यामुळे वैदिक विमाने अस्तित्वात होतीच, फक्त हवेत उडणारी होती की नाही इतकाच वाद आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/17/2015 - 17:51 नवीन
उडणारी विमानं, स्फिंक्स, उडते घोडे(पेगेसस), ग्रिफिन इत्यादी सर्व तत्कालीन लोकांचे कल्पनारंजन रे. त्याचे पुरावे कुठून मिळनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 07/17/2015 - 17:52 नवीन
उल्लेख हाच पुरावा. तुम्हांला पटतच नै मेलं काही. -बॅटतुडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 07/17/2015 - 18:05 नवीन
चालू दया तुमचं निरर्थक अत्मरंजन. --सुधारकात्रुप्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा