Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?

ह
हाडक्या
गुरुवार, 08/13/2015 - 00:37
🗣 139 प्रतिसाद
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला. असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्‍हेने रंगवत आहे ? देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ? यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ? याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ? या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.

प्रतिक्रिया द्या
28185 वाचन

💬 प्रतिसाद (139)
अ
अगम्य गुरुवार, 08/13/2015 - 03:36 नवीन
"1,000 people, mostly Muslims, were killed in clashes after 60 Hindu pilgrims died in a fire on a train." पाहिलंत? मुस्लिमांसाठी "killed" शब्द वापरला. हिंदूंसाठी मात्र "died". जणू काही हिंदू आपोआप मेले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 08/13/2015 - 07:46 नवीन
ह्यांचे बोलविते धनी नक्कीच कोणीतरी असले पाहिजेत
बीबीसीने लेखिकेकडून लेख आधीच काही महिन्यांपुर्वीच बनवून घेतला असेल, आणि बीबीसी संपादकात बसलेल्या एखाद्या भारत द्वेष्ट्याने किंवा करप्ट संपादकाने १५ ऑगस्ट जवळ येते आहे तसे भारतात अशांतता पसरावी म्हणून वेळ पाहून लेख छापला असेल का अशी शंका वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
म
मंदार कात्रे गुरुवार, 08/13/2015 - 05:01 नवीन
भारतीय पत्रकार आणि मीडिया हरामखोर XXXXX XXX XXXXXXXXXXXX XXXXX आहे .यांना सर्वांना एका बोटीत बसवून बोट बुडवा खोल समुद्रात ...... देश जरा शांत होईल मीडिया म्हणजे उपयोग शून्य आणि उपद्रव जास्त असे झालेय आजकाल
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/13/2015 - 05:25 नवीन
सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात. त्यांना मुद्देसुद प्रतिवाद करुनच उघड पाडावं लागतं. यानी देखिल ते बंद होत नाहित,लोकांचा बुद्धिभ्रम थांबतो.
  • Log in or register to post comments
म
माहितगार गुरुवार, 08/13/2015 - 06:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/13/2015 - 10:08 नवीन
सनातनी हिंदुंच्या वर्तवणुकिमुळे उखडलेले फेक्युलर फुरोगामी(म्हणजे सू शिक्षित टनाटनि) असले मूर्ख धंदे करतात.
>>> हे भारी आहे . काहीही झाले तरी मुळ कारण सनातनी हिंदुच ! बीसीसी मधील लोकांनी टीका केली तर सनातनी हिंदुंच्या वर्तणुकी मुळे ! चुकला घाव ऐरणीच्या माथां ! हे सारे मनुस्मृती मुळे होत असेल नै !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
माहितगार गुरुवार, 08/13/2015 - 06:30 नवीन
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता.
बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे. मिपाकरांनी माझा एक धागा फाट्यावर मारला होता परकीय व्यक्ती, परकीय देश, आणि परकीय वृत्तसंस्थां यांनी केलेले कौतुक, टिका आणि निरीक्षणे; त्यांचे हितसंबंध, पूर्वग्रह, महत्व आणि मर्यादा. फाट्यावर मारलेल्या आपल्याच धाग्यातील परिच्छेद उधृत करणे वाचकांना किती पटेल माहित नाही. पण तरीही ते उधृत करण्याचा मोह होतोच आहे. "आपण वर्तमानातील घरगूती वातावरणाकडून आपण जेव्हा वर्तमानातील आंतरराष्ट्रीय संबंधांकडे येतो तेव्हा त्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले असू शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे राजकारणाचे हितसंबंध आणि पुर्वग्रह गुंतलेले परकीय पाहुणे लोक जेव्हा कौतुक अथवा टिका करतात तेव्हा खरेतर लगेच खरी न मानून हुरळून न जाता अथवा नाराज न होता; त्या गोष्टी चिमूटभर मीठा सोबत घेऊन तपासून पहावयास हव्यात. पण प्रत्यक्षात वर्तमान भारतात याच भान सर्वसामान्य भारतीयांनाच नव्हे तर भारतीय विश्लेषकांना आणि नेत्यांनाही असतं का याचा प्रश्न मनात उपस्थित होतो."
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का
खरेतर सध्या कोणतीही विशेष परिस्थीती नसताना एकांगी भडकाऊ लेखन करणे/ आणि छापणे हा पिवळ्या पत्रकारीतेचाच भाग म्हणावयास हवा. अर्थात दुसर्‍या बाजूस आपल्या वाचाळ वीरतेचे आणि वागण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणात अथवा दहशतवादी तयार करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने उपयोग आपली शत्रुराष्ट्रे करू शकतात याचे भान बर्‍याच वाचाळ वीरांना नसते. त्या संबंधीही मागे मी एक धागा काढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाते. या संबंधाने मी मिपावर भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा या विषयावर धागा ऑक्टोबर २०१४ ला धागा काढला एक उदाहरण म्हणून पहावयाचे झाल्यास ऑक्टोबर २०१४ पासून रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात जवळपास ७०-७५ संपादने झाली असतील त्याच कालावधीत रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात २-३ संपादने झाली. आपल्या देशाची चुकीची प्रतीमा रंगवली जाते आहे याचे भान बहुसंख्य भारतीयांना नसते. ते सुद्धा रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडिया या इंग्रजी विकिपीडियावरील लेखात पडीक राहतील पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या लेखात लेखन करणे आम्हा भारतीयांना जड जाते. मिपावरील अशा धाग्यातून आम्ही त्रागा करू पण रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया लेखात जाऊन देशाची सकारात्मक असलेली बाजू बद्दल संदर्भासहीत दोन शब्द लिहिण्यास वेळ काढणार नाही तर अशावेळी जेवढा दोष चुकीच्या पत्रकारीतेकडे जातो तेव्ह्ढाच प्रतिमा सकारात्म्क कशी राहील या साठी तसूभरही काही न करणार्‍या तुम्हा आम्हा कडे येत नाही का ? असा एक प्रश्न पडतो. लास्ट बट नॉट लीस्ट समुहा दरम्यान मनोमीलनास संधी आणि परस्पर विश्वासा निर्मितीवर भर या बद्दल आपल्या देशातील सिस्टीम मजबूत असेल तर पिवळी पत्रकारीता असो किंवा शत्रुराष्ट्रांचे आराखडे ढासळून पडण्यास वेळ लागणार नाही, पण या साठी जरूरी इच्छाशक्ती आणि समज आम्हा भारतीयात आहे का ? माझ्या स्वतःच्याच धाग्यांची अधीकच जाहीरात झाली आहे त्यासाठी क्षमस्व
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 08/13/2015 - 09:08 नवीन
बीबीसी आणि इतर देशीय वृत्तसंस्थांना आणि आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीला कोल्डवॉर काळात मी बर्‍यापैकी फॉलो केले आहे. संतुलित आणि विश्वासार्ह अशी इमेज बीबीसी तयार करत असले तरी प्रसंगोप्पात आणि क्रिटीकल पॉईंट्सवर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने बीबीसी वृत्ते कललेली असू शकतात असाच अनुभव आहे.
म्हणजे "सकाळ"/ मटा पत्रकारिता असे तुम्हाला म्हणायचे आहे असे दिसते.. आपल्याकडे सकाळ/ मटा देखील बहुतांश वेळा असेच वागताना दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार गुरुवार, 08/13/2015 - 11:06 नवीन
सॉरी इथे परदेशी वृत्तसंस्था म्हणावयाचे होते. गोर्बाचेव्ह येई पर्यंतचा काळ मी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संबंधीत डिप्लोमसी बाबतची वृत्ते अनेक देशांच्या वृत्तसंस्थांची मुख्यत्वे शॉर्टवेव रेडीओवरून बर्‍यापैकी फॉलोकरत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गुलाम गुरुवार, 08/13/2015 - 06:50 नवीन
मिडियावर टिका करण्यात काय अर्थ आहे? आपण असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना. सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 08/13/2015 - 06:53 नवीन
नेमकं बोललात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/13/2015 - 10:11 नवीन
अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.
१००% अनुमोदन ! शिवाय अरुंधती रॉय ह्यांचा उल्लेख / संदर्भ असलेले काहीही वाचणे हा वेळेचा अपव्यय आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ह
हाडक्या गुरुवार, 08/13/2015 - 10:34 नवीन
सनातनी लोक आणि फेक्युलर फुरोगामी अशा दोघांनाही अनुल्लेखाने मारणं हाच अशा प्रवॄत्तींवर उपाय आहे.
गुलाम राव, इथे थोडा सहमत आणि असहमत पण.. म्हणजे असं की अनुल्लेखाने मारणं हे मान्य आणि बहुतांश केसेस मध्ये तेच करतो की. पण इथे बीबीसी ही वृत्तसंस्था आहे तिच्यावर विश्वास ठेवणारे करोडो आहेत जगभर(भारतात देखील खूप सारे आहेतच). अगदी ते म्हणतायत म्हणून "असेल कदाचित" म्हणणारे देखील खूप सारे आहेत. तुम्ही-आम्ही पाठ फिरवली म्हणून हे लपून रहात नाही ना.
असल्या लेखावर शतकी धागे काढणं आणि मिडियाने साक्षी महाराजाच्या स्टेटमेंटवर गदारोळ करणं दोन्ही सारखंच ना.
अजिबात नाही. मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही. शतकी धाग्यापेक्षाही "काय करता येईल? इतर कोणते मुद्दे आहेत आणि चर्चेतून अजून काही मुद्दे समोर आले तर तेही लक्षात घ्यावेत आणि बीबीसीशी पत्रव्यवहार करावा" असा मानस आहे. काही झाले तर ठिकच पण प्रयत्न तर नक्कीच केला जाईल. (सकल सामाजिक दांभिकतेची चीड असलेला आणि काही करु इच्छित असणारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुलाम
ग
गुलाम गुरुवार, 08/13/2015 - 19:53 नवीन
हाडक्याजी, बीबीसीवर विश्वास ठेवणारे करोडो आहेत हे मान्य. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ती एक व्यावसायिक वॄत्तसंस्था आहे आणि त्यांचे कार्यक्रम व लेख हे त्याला कसा प्रतिसाद मिळतो (वाचने/ टिआरपी) यावर अवलंबून असते. इथे या लेखाची लिंक देऊन एकप्रकारे आपण त्याची जाहिरातच करतोय (तसा उद्देश नसला तरीही) आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देतोय.
मिडिया खूप दूरगामी परिणाम करतो, मिसळपाव (अजूनतरी) नाही.
जरी मिसळपावची ताकद मर्यादित असली तरीही एकंदर ब्लॉग्स व सोशल मिडियाची ताकद खुप आहे. भारतात तरी ती बिबीसीपेक्षा जास्तच असावी. अशा गोष्टींवर चर्चा करुन आपण फक्त द्वेष वाढवतो आणि ध्रुवीकरण करतो. त्यामुळे अशा चर्चा टाळलेल्याच बर्‍या. या लेखावार खाली आलेले विषारी प्रतिसाद पाहिल्यावरतर हे मत जास्तच दृढ झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
म
माहितगार गुरुवार, 08/13/2015 - 07:42 नवीन
ह्या बीबीसी बातमीची हि अडनीड वेळ का साधली गेली ते लक्षात आले नव्हते. पण या १५ ऑगस्टपर्यंत नरेंद्र मोदी सरकार कडून नागालँडचा प्रश्न धसास लागण्याचे संकेत आहेत त्यास सुरुंग लावण्याच्या दृष्टीने हितसंबंधी वेळ साधत आहेत काय असा प्रश्न पडतो आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/13/2015 - 10:29 नवीन
भारत हा हिंदुंचाच देश आहे ! फाळणी झाली तेव्हाही मुस्लिम बहुल तो पाकिस्तान आणि उरलेला हिंदुबहुल प्रदेश तो झाली आहे . राज्यघटनेने बहुसंख्य हिंदुंनी एकमताने स्वतःचे वर्चस्व असुनही देश धर्मनिरपेक्ष ठेवला हे हिंदुंचे मोठ्ठे पण आहे , मुस्लिमबहुल पाकिस्तान किंव्वा बांग्लादेश सेकुलर नाहीत हे लक्षात घ्यावे . आजही भारतात हिंदु जास्त आहेत म्हणुन धर्मनिरपेक्षता टिकुन आहे हे स्पष्ट आहे , अर्थात ज्या स्पीड ने आयसीस चे वादळ आपल्या कडे सरकत आहे ते पाहुन लवकरच भारत हिंदु बहुल रहाणार नाही हे स्पष्ट आहे तेव्हा पाहु भारत धर्मनिरपेक्ष देश रहातो का ते ! घोडे मैदान लांब नाही मधे एक इराण उभा आहे बस्स , मागल्या वेळी पर्शियाला १०-२० वर्षात झोपवले होते , आता ह्यावेळी किती वर्शे लागतात ते पाहु ! त्या नंतर मग आहेच हा सुर्य आणि हा जयद्रथ ! तेव्हा पाहुयात बीबीसी काय बातमी देते ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
भ
भीमराव गुरुवार, 08/13/2015 - 13:51 नवीन
? जैन? बौद्ध? शिख? ह्यांचा देशावर कितपत अधिकार असावा? ज्या लोकांना मध्ययुगामधल्या धर्म रुढीमुळे नाईलाजास्तव मुस्लीम/ईसाइ बनुन रहावे लागले, त्यांचे आजचे वंशज स्वतःला कट्टर धर्मानुयायी समजतात त्यांना किती % द्यावेत? एखादा नग हिंदु द्वेष्टा असेल पन स्वतःच्या भारतीयत्वाबद्दल मात्र पराकोटीचा अभिमानी असेल तर या केस ला कोणत्या देशात हाकलायचं? एखादी आदिवासी जमात जर बोलली कि आम्हाला कोणत्याच धर्माच जोखड नको तर त्यांना कुठल्या वाडीच्या टेंपेत बसवायच? हं युंद्या आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ख
खटपट्या गुरुवार, 08/13/2015 - 09:35 नवीन
भारत हा हींदूंचा देश आहे - असत्य. क्रुपया पटवून द्या की भारत हा हींदूंचा देश आहे.
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 08/13/2015 - 11:18 नवीन
नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद वाचून . क्रुपया पटवून द्या की भारत हा हींदूंचा देश आहे.>>> अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव . भारत तर आहेच . पण पाकिस्तान सुधा हिंदूंचाच देश आहे . मुसलमानांना दिलेला . ..संपादित..
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 08/13/2015 - 11:35 नवीन
कीव वाटली म्हणता ? बरं बरं धन्यवाद :) रक्षणासाठी "तुम्ही" काय करता ते नाही सांगितलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ख
खटपट्या गुरुवार, 08/13/2015 - 12:50 नवीन
अरे रे .असे लोक भारतात आहेत हेच भारताचं दुर्दैव
असेल भारताचं दुर्दैव. ते आमचा भारत आणि आम्ही बघून घेउ. आधी तुम्ही भारत हा हींदूचा देश आहे हे कोणत्या पुस्तकात लीहीले आहे ते सांगा. लिंक दीलीत तरी चालेल. नाही देउ शकलात तर ओवेसी आणि तुमच्यात काय फरक ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/13/2015 - 11:36 नवीन
हाडक्या, तुमचा हा धागा योग्य वेळीच आलेला आहे, बर्याच लोकांना बीबीसी म्हणजे एक निपक्ष निरिक्षक आहे अस वाटत पण ह्या बीबीसीने भारता विरुद्ध बरेच उपद्वाप केलेले आहेत, गेल्या महीन्याच्या मागे पाकिस्तानातील बलुचीस्तानला पाकिस्तानातुन वेगळे पाडण्यासाठी भारत सरकार आपल्या गुत्पचर विभागाच्या माध्यमातुम्न बराच पैसा खर्च करत आहे असा एक लेख बीबीसीने प्रसिद्ध केला, कोणताही पुरावा नसताना अश्या प्रकारचे लेख लिहीणे व आतर-राष्ट्रीय जनमत तयार करणे हे ह्या बीबीसीच काम आहे. ह्या बीबीसीच्या लेखिका "दिव्या आर्या" ला ईमेल पाठवुन तिच्या कडून देशातील शांतता भंग होईल ह्या द्रृष्टीने लिहीले ल्या हा लेखाच कारण विचारायलाच पाहीजे आहे.
  • Log in or register to post comments
र
राही गुरुवार, 08/13/2015 - 13:01 नवीन
बलुचिस्तानात भारतीय हितसंबम्ध गुंतलेले आहेत हे उघडे गुपित आहे. मात्र ते प्रसिद्ध करावे की नाही आणि कोणी करावे हा वेगळा प्रश्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ड
डँबिस००७ गुरुवार, 08/13/2015 - 11:38 नवीन
ह्या लेखासाठी बीबीसी विरुद्ध कुठे तक्रार करता येईल ?
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी गुरुवार, 08/13/2015 - 13:45 नवीन
खटपट्या . पुस्तकात कशाला लिहायला पाहिजे ?ज्यांना भारताचा इतिहास , वर्तमान माहित आहे त्या प्रत्येक हिंदूला हे पण चांगलंच माहित आहे .तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं . ओवेसी भिकारडा हिंदूंचा खात्मा करायची भाषा करतो . तरीही तो अजून जिवंत आहे . बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात . तसं करण्यात त्यांना मजा वाटते . तरीही इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं . हा सगळा हिंदूंचा मोठेपणा आहे (कि लेचेपेचेपणा ?). इतर मुस्लिम राष्ट्रांत इतर धर्मियांच्या बाबतीत ह्यातली १ तरी गोष्ट घडते का ? प्रगो १ नंबर प्रतिसाद . (संपादित) आधी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इथले ७०% मुस्लिम हे मुळचे धर्मांतर घडवून आणलेले हिंदूच आहेत . पण त्यांना हे समजत नाही किवा ते विसरून गेलेत हे बघून वाईट वाटतं .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/13/2015 - 14:07 नवीन
तुमच्या प्रतिसादातील बहुतांश भाग वादग्रस्त असल्याने संपादित होणार ह्यात शंका नाही . मात्र आयसिस च्या बाबतीत हे बी बी सी वाले किंव्वा आमच्या देशातील पुरोगामी लोक किंव्वा धर्मसुधारक ज्याप्रकारे मातीर डोके खुपसुन बसले आहेत ते पाहुन आश्चर्य वाटते . कालच बंगळुरामध्ये काही हिंदुंन्नी तणाव पसरावा म्हणुन पाकिस्तानचा झेंडा फड्कवला त्याची बातमी फेसबुकवर फिरत होती , मात्र जेव्हा काश्मीरात जाहीरपणे आयसिस चे झेंडे फडकवले जातात त्याबाबत मात्र कोणी काहीच शेयर करत नाही , आमच्या मुंबै कल्याण हईद्राबादेतील युवक जाहीरपणे आयसिस ला जाऊन मिळतात त्यावर कोणी काही बोलत नाही , आमच्या इथे झेंडे फडकवले की तो झेंडा पाकिस्तानचा नाही म्हणणारे कित्येक युक्तीवाद समोर येतात , आणि हो सरते शेवटी हे सारे हिंदुंमुळेच , त्यातही विशेषकरुन मनुस्मृतीमुळेच होते अशी बोंब ठोकतात ते पाहुन आश्चर्य वाटते ! असो ही शहामृगी वृत्ती किती टिकेल ते पाहुयात ! घोडे मैदान लांब नाही ... द स्टॉर्म इज कमिंग :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/13/2015 - 14:14 नवीन
तुड़तुड़ी ह्यांचा प्रतिसाद अन विचार ऐकून शिसारी आली आहे. (एमएमजी प्रार्थना स्थल चा कट्टर भक्त) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाव आडनाव गुरुवार, 08/13/2015 - 15:02 नवीन
+१ मी त्यांची तक्रार संपादकांकडे ~२ तास आधी केली आहे. अजून कोणाला तक्रार असेल त्यांनी पण संपादकांना सांगा. बास झाला मूर्खपणा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाव आडनाव गुरुवार, 08/13/2015 - 14:23 नवीन
बिगर हिंदू हिंदूंना मारायला भारतात येतात यावर उपाय म्हणून "तुम्ही" रक्षणासाठी काय करणार आहात? वर लिहिलेल्या ऑप्शन पैकी की अजून काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
ख
खटपट्या गुरुवार, 08/13/2015 - 16:38 नवीन
अहो तुडतुडी ताई/भाउ, मला भारताचा इतिहास नाही माहीत. आणि इतिहास गेला तेल लावत. आता वर्तमानाचं काय ते सांगा. अहो ते सोन्याबापू सारखे लोक जीवाचं पाणी काय सांगतात ते तरी ऐका. भारत हा हिंदूचा देश आहे हे जर तुम्ही इथे सिध्द करु शकलात तर मी तुमच्या घरी येउन तुमचे पाय धरीन.
तुम्हाला माहित नाही ह्याचा अर्थ तुम्ही हिंदू नाहीत हे स्पष्ट झालं
तुमचे वय काय आहे? का तुम्हाला इथे भयाण विनोद करायचे आहेत? आणि तुम्ही एवढी विखारी भाषा का बरे वापरताय? तुमच्या सारखे भडक माथ्याच्या लोकांना भडकावणे हेच बीबीसीवरील कार्यक्रम सादर करणार्‍या लोकांचे ध्येय आहे. (अख्खा बीबीसी चॅनेल खराब नक्कीच नाही.) मिपावर मुस्लीम वाचकही आहेत. तुम्ही अशी विखारी भाषा वापरल्याबद्द्ल तुमच्या विरुध्द संपादकांनी कारवाई का करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 08/13/2015 - 17:54 नवीन
सहमत
इथं सर्वधर्म समभावाचा आग्रह धरला जातो . इथले लोकल मुसलमान अतिरेक्यांना मदत करतात .तरीही इथले हिंदू त्यांच्याशी गोडी गुलाबीने वागतात . मदरश्यांमध्ये ह्यांना इतर धर्मियांना मारण्याचं शिक्षण दिलं जातं . तरीही इथला सरकार मदरश्यांना अनुदान देतं
कारण आपण आपलं "हिंदुत्व" जरा जरी जाणवून द्यायचा प्रयत्न केला तर यापूर्वीची सर्व सरकारं सरळ "जातीयवादी" ठरवायचीत. तशी भीतीच घालून ठेवली होती (अघोषित भीती). बघू यावेळचं सरकार काय करतंय? मला स्वतःला सार्वजनिक गणेशोत्सवातला (किंवा इतर सणांमधला) धांगडधिंगा पसंत नाही. पण म्हणून गणेशोत्सव मंडळं आणि कार्यकर्त्यांवर केसेस घालून त्यांचं आयुष्य बरबाद करणं हे नक्की कशाचं द्योतक आहे? मशिदींवरच्या अवेळी भोंग्यांमुळं ध्वनी प्रदूषण झाल्याच्या किती केसेस आहेत? सगळ्या तथाकथित फेक्युलर लोकांपैकी किती लोकांच्या XXX त दम आहे एकातरी मशीदीवरच्या भोंग्याबद्दल तक्रार करून तो बंद करण्याची? ह्यानंच तर आपला देश आज या अवस्थेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 08/13/2015 - 17:59 नवीन
चुकून भलत्याच प्रतिसादाला पोस्ट झाली. क्षमा असावी तो प्रतिसाद काढून इतरत्र पोस्ट करण्यासाठी काय करावं? मा. संपादक मदत करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
त
तुडतुडी गुरुवार, 08/13/2015 - 13:46 नवीन
बीबीसी विरुद्ध कोणाकोणाला तक्रार करायचीये ? सगळे मिळून करू चला
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/13/2015 - 14:19 नवीन
ते कोणचे दादा होते ज्यांना फार अपमानस्पद वाटत होते ब्लडी सिविलियन्स वगैरे म्हणालेले, ह्या तुड़तुडिंचा रिप्लाई दाखवा त्यांना अन काय मत आहे अजुन विचारा!! कोपरापासुन नमस्कार असल्या विषारी विचारसरणी ला मग तो दाढ़ीवाला ओवैसी असो का अजुन कोणी
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/13/2015 - 14:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
हाडक्या गुरुवार, 08/13/2015 - 15:29 नवीन
+१ बापू.. धाग्यावर असलं अवांतर होईल असं वाटलं होतं पण इतकं विखारी रुप समोर येईल असं नव्हतं. :( आता त्या बीबीसीच्या पत्रकाराला फक्त काय दोष द्यायचा असं वाटायला लागलंय.. दुर्दैव हेच की असा विचार करणार्‍यांना त्यात काही गैर आहे हेच पटत नाही. मग ह्या असल्या पत्रकारांचं फावतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
द
देशपांडे अमोल गुरुवार, 08/13/2015 - 15:11 नवीन
गेली निदान 10 वर्षे तरी bbc.co.uk/hindi ही वेबसाइट फॉलो करीत आहे. टोटली हिंदू विरोधी मानसिकता दिसून आलेली आहे. आणि उत्तम प्रतिचा मुस्लिम कैवार सुद्धा.. 2/3 महिन्यांखाली त्यांच्या एडिटर ला मेल लिहिला होता. काही मुद्दे त्यांच्या नजरेश आणून देण्यासाठी....नो रेस्पॉन्स. मला तर अशी दाट शंका आहे की त्यांचा इंडियातला संपादक नक्कीच कोणी हिंदू द्वेषी असावा. जेव्हा पासून मोदी सरकार आलेले आहे तेंव्हा पासून तर कळसच झालाय....NDTV.com देखील अजिबात वेगळे नाही....माझ्या दृष्टीने त्यांचा संध्यानंद व्हायला फार वेळ नाही लागणार.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/13/2015 - 15:13 नवीन
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे ! सद्या इतकेच पुरे. :)
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 08/13/2015 - 15:38 नवीन
हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे !
असं वाटतं नै हो काका.. बीबीसी स्वतःच्या देशाच्या धोरणास पूरक अशीच भुमिका घेते हे पाहिलय पण इथे त्यांचा अशा प्रकारची दुही पेरणारी भुमिका ते ही एक वस्तुस्थिती म्हणून, एक खरी प्रतिमा म्हणून रंगवत असतील तर आपल्या देशासाठी धोकेदायक वाटतय. कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे. after all , बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे आणि ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/13/2015 - 19:09 नवीन
बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे ही फारच अतिशयोक्त आणि अयोग्य तुलना झाली. संध्यानंद वगैरे अतिशयोक्ती सोडून, बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे. मात्र, खास ब्रिटीश परंपरेप्रमाणे "आपला अजेंडा त्या अजेंड्यामुळे पिडीत झालेल्यांच्याच कसा फायद्याचा आहे" हे पटवून देण्याचे तंत्र बीबीसी इतके इतर कोणत्याच माध्यमाने क्वचितच विकसित केलेले आहे ! ====== ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे. याने तसा काहीच फरक पडत नाही. प्रत्येक सरकारी / गैरसरकारी माध्यमाचा काही ना काही उघड / छुपा उद्येश (अजेंडा) असतोच... आणि त्यापैकी प्रत्येकजण सगळेच उद्येश उघडपणे राबवतात असे नाही... किंबहुना "गोडगोजिरे बाह्यदर्शन (good / politically correct appearance)" ठेवण्यासाठी त्यांना तसे करणे सोईचे नसते. तसेही, बीबीसी अप्रत्यक्ष सरकारी माध्यम नसून "स्वायत्त संस्था" असल्याचा बीबीसी आणि ब्रिटिश सरकार दोघांचाही "अधिकृत" दावा आहेच ;) ======
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/13/2015 - 19:16 नवीन
कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे. यावरून काहीच स्पष्ट होत नाही का ? आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :) ...फक्त असे करताना ते पोलिटिकली करेक्ट दिसावे इतका इंग्रजांचा आग्रह असतो आणि भारतीयांना त्याची फिकीर नसते, इतकाच काय तो फरक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/13/2015 - 19:19 नवीन
एक राहीलंच की... इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/01/2015 - 08:16 नवीन
बीबीसी च्या खर्‍या रूपाबद्दल अधिक माहिती खालील "स्कॉलर्ली रिसर्च आर्टीकल" मध्ये मिळेल... A NEW KIND OF IMPERIALISM? THE BBC,COLD WAR BROADCASTING AND THECONTESTED GEOPOLITICS OF SOUTH ASIA : Alasdair Pinkerton * हा त्याचा अतीत्रोटक गोशवारा. पण संपूर्ण लेख मूळातून वाचण्याने बर्‍या गोष्टी पुराव्यांसकट समजतील... The relationship between the BBC and Indian listeners has been one of love and hate. Love for the professional competence and hate as it represented the voice of a colonial empire. Even during the post-freedom period, more often than not a bias against India was discernible in BBC broadcasts in our conflicts with Pakistan, particularly on the Kashmir issue. The BBC also did not miss an opportunity to project the seamy side of our people and polity. The fact that so many foreign governments complain about BBC broadcasts show they have an impact, there would be little point complaining if nobody took any notice of them. ======= * : Alasdair Pinkerton, Department of Geography, Royal Holloway, University of London, Egham, Surrey TW20 0EX, UK. E-mail: a.d.pinkerton@rhul.ac.uk लेख : ISSN 0143-9685 (print)/ISSN 1465-3451 (online)/08/040537–20 (c)2008 IAMHIST & Taylor & FrancisDOI: 10.1080/01439680802310324 =======
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अस्वस्थामा Tue, 09/01/2015 - 10:51 नवीन
धन्यवाद काका.. माहितीपूर्ण अर्टिकल.. :) खरं तर बर्‍याचशा गोष्टी आपल्याला आता इतर माहिती स्त्रोत उपलब्ध असल्याने दिसू लागल्या आहेत आणि बीबीसी सारखे "अजेंडा" घेऊन काम करणारे जर बदलले नाहीत तर त्यांची विश्वासार्हता राखू शकणार नाहीत असं वाटतं. (तसेही त्यांनी अजून तरी इ-पत्राचं उत्तर दिलेलं नाही. आता जास्त आशा पण नाहीय.) [अवांतर : कालच भारताचा विकासदर ७% च्या खाली आला याची ठळक बातमी होती आणि फोटो म्हणून "तीन फाटक्या-मळक्या साडीतल्या गवत आणि बोचकी घेऊन चाललेल्या बायका". तसं तर या बातमीचा आणि फोटोचा काहीही संबंध नसताना पण एक प्रतिमा निर्मिती म्हणून केलेली गोष्ट वाटली पण आता काही वैताग वगैरे झाला नाही. असो.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या Fri, 08/14/2015 - 12:29 नवीन
एक्का काका, तुमच्या सगळ्या प्रतिसादांबद्दल एकत्रच लिहितोय.
बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे.
याबद्दल दुमत नाहीच. "संध्यानंद" ही अतिशयोक्तीच होती पण ती मुद्दा समजावण्यासाठी होती की बीबीसी अगदीच हलक्याने घ्यायचं माध्यम कोणीही समजत नाही. अनेक अभ्यास पूर्ण लेख, मालिका या येत असतात आणि त्यामुळेच परकिय देशाबद्दलची बातमी अथवा लेख हा बायस्ड आहे की नाही हे सामान्य वाचकाला कळायची शक्यता खूपच कमी असते हे म्हणायचे होते. आणि त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच चांगले नव्हेत. "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" मान्य. पण हे सामान्यपणे प्रत्येक बाबतीत (खासकरुन देशाबाहेरच्या बाबतीत) बहुसंख्यांना याबद्दल तितकी कल्पना असतेच असे नाही. मग अशी बातमी वाचून जे जनमत तयार होते ते चुकीचेच आणि कलुषित असेच होते. मला हे समजत नाही की भारतात हिंदू-इतर धर्मीय तेढ वाढवणे हे बीबीसीच्या अजेंडाचा भाग आहे का ? असेल तर का? आणि मग आपल्या देशातील माध्यमे व सरकारद्वारे त्यास विरोध/ निषेध होणे अपेक्षित नाही का ?
आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :)
मान्य पण भारतात अंतर्गत तेढ वाढवणे (आणि त्याची झळ इथे युकेत असलेल्यांनाही बसण्याची शक्यता असणे) हे सामान्य इंग्रजाच्या कसे फायद्याचे अथवा त्याच्या बाजूचे?
हे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.
हे शक्य आहे कारण मी बहुतेक युरोपिय लोकांना भेटलोय ते एकतर इंग्रजांच्या देशात खूप वर्षे वास्तव्य करत असलेले असेच आहे त्यामुळे मी तितका ठामपणे दावा करु शकत नाही. फक्त एक निरिक्षण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ज
जडभरत Fri, 08/14/2015 - 07:43 नवीन
बी.बी.सी. = Barking Bulldogs Congregation
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
द
देशपांडे अमोल गुरुवार, 08/13/2015 - 15:17 नवीन
ह्या सगळ्यात गोची अशी झालीय की चांगले वृत्तांकन करणार्‍या वेबसाइट्स नाहीच राहिल्या....newsonair सारखी क्वचितच एखादी आहे. अनॅलिसिस तर दूरचीच गोष्ट
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/13/2015 - 15:44 नवीन
बीबीसी ला बॅन करू नयेत म्हणजे मिळवले नाही तर ह्या चिंधीचोर लोकांचे अजुन दुप्पट उदात्तीकरण व्हायला अजुन एक कारण!!
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड गुरुवार, 08/13/2015 - 18:17 नवीन
मी तुमचं मिपा वरचं बरंचसं लिखाण वाचलंय. अ‍ॅकॅडमी ची लेखमाला मस्तच होती. वरचे तुमचे प्रतिसाद पण पाहिलेत. फक्त एक समजत नाही तुम्ही तथाकथित "चिंधीचोरांवर" वार करताना कळत नकळत बीबीसी ची पाठराखण करताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 08/13/2015 - 18:20 नवीन
भाऊ मी पाठराखण करतोय का त्यांना अकारण मोठे न होऊ देण्यासंबंधी बोलतोय ते एकदा नीट वाचाल का प्लीज?? ;) अवांतर :- आपण दिलेल्या मानासाठी शतशः ऋणी आहेच मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा