बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?
या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.
💬 प्रतिसाद
(139)
ग
गामा पैलवान
गुरुवार, 08/13/2015 - 17:02
नवीन
हाडक्या,
बीबीसीने असाच खोडसाळपणा याअगोदरही केलाय. तेव्हा लक्ष्य मोदी होते. त्यावेळची माझी प्रतिक्रिया : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=312915468879916&id=172939776210820&comment_id=313070432197753&offset=0
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
गुरुवार, 08/13/2015 - 18:37
नवीन
धाग्याचा विषय आहे " हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ? "
हे तुम्हाला पटतय का ?
जर पटत नसेल तर मग असा लेख लिहुन हे सर्व बीबीसीच्या वाचकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न करत आहेत हे तुम च्या लक्षात येत आहे का ?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Fri, 08/14/2015 - 08:38
नवीन
@खटपट्या
तुम्हाला भारताचा इतिहास माहित नाही (माहित करून घ्यायचा असेल तर तो हि सांगते ) म्हणून तुमच्यासाठी तो तेल लावत गेला . आमच्यासाठी नाही . मागच्या अनुभवावरून पुढे शहाणं व्हायचं असतं . पण तुम्हाला वर्तमान हि माहित नाही हे हि समजलं . तुम्ही पेपर वाचत नाही , बातम्या बघत नाही हे हि दाखवून दिलंत .किवा सगळं माहित असूनही डोळेझाक करताय असं दिसतंय . चला तुमच्या माहितीसाठी काही वर्तमानातल्या गोष्टी सांगते . फार लांबच्या नाही. गेल्या काही वर्षात घडलेल्या .
१. याकुब ला फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा मुसलमानांनी त्याला विरोध करून त्यांचा खरा चेहरा दाखवला .
२. उस्मान खान उर्फ मोहम्मद नवीद हसत हसत सांगतोय मी इथं हिंदूंना मारायला आलो होतो . आणि तसं करण्यात मला मजा वाटते
३. ओवेसी(हा इथल्या मुसलमानांचा प्रतिनिधी ) ने हैद्राबाद मध्ये केलेल्या भाषणात 'मुस्लिमांना फक्त १५ मिनटे द्या . १०० करोड हिंदूंना ते दाखवून देतील आम्ही कोण आहोत ते . फक्त काही तासांचा अवधी द्या इथल्या हिंदूंचा खात्मा करायला .' विखार उधळला होता
४. यासीन भटकळ (जर्मन बेकरी बॉम्बस्फोट) ने पोलिसांना सांगितलं , बेंगलोर मधल्या मदरशा मध्ये त्याला धार्मिक अतिरेकाचं शिक्षण देण्यात आलं . तिथे अश्या किती मुलांचं ब्रेन वॉंशिंग करण्याचं काम चालू आहे .
५. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पर्वती भागात दंगल झाली . कारण काय तर मशिदीत चाललेल्या मुस्लिम टोळक्याच्या चेहऱ्यावर गाडी पार्क करताना प्रकाश पडला म्हणून
६. रमजान ची ४००० ची खरेदी केल्यावर पैसे मागितले म्हणून दुकानदाराला मारहाण .
७. २-३ वर्षांपूर्वी दंगल झाली होती . कारण काय तर देवीच्या मिरवणुकी वेळी ह्यांच्या मशीदीवर गुलाल पडला म्हणून
हा सगळा विखर तुम्हाला दिसत नाही का ?मुस्लिमांकडून कुठली वाईट गोष्ट झाली तर इतर मुसलमान त्याचा विरोध करताना आजपर्यंत तुम्ही कधी बघितलेत का ? मुस्लिम लोकांच्या पुढे आमचा भडकपणा काहीच नाही . विनाकारण हिंदू कसे वाईट आणि मुस्लिम कसे चांगले हा चुकीचा प्रचार करत असण्याबद्दल तुमच्यावर का कारवाई करू नये ? मिपावर मुस्लीम वाचकही आहेत आम्हालाही माहित आहे . म्हणून आम्ही घाबरून जावं , हाताची घडी तोंडावर बोट धरून बसावं अशी अपेक्षा करू नका .
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 08/14/2015 - 09:38
नवीन
या सगळ्याचा आणि "भारत हा हींदूचा देश आहे" या वाक्याचा काय संबंध? वरील सर्व गोष्टींमुळे भारत हा हींदूंचा देश आहे हे कुठे सिध्द होतंय?
तुम्ही हे सर्व करतना ना, मग मला पामराला पटवून द्या ना की "भारत हा हींदूंचा देश आहे"
कुठे केला प्रचार दाखवा. का उगीच माझी नसलेली वाक्य माझ्या तोंडी कोंबताय? मी वरील वाक्ये कुठेही टंकलेली दाखवा, कारवाई करायच्या आधी मी मिपा सोडून जाईन.
कधी केली अपेक्षा ?
माझा आक्षेप तुम्ही टंकलेल्या "भारत हा हींदूंचा देश आहे" या निखालस खोट्या वाक्याला आहे.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sat, 08/15/2015 - 12:08
नवीन
सारखं काय सिद्ध करून दाखवा, सिद्ध करून दाखवा लावलंय? तुम्हाला जर पटत नसेल तर राहू दे.
भारत हा हिंदू, बौद्ध, जैन, शिख, आदिवासी आणि ज्या संस्कृती इथे जन्मल्या त्यांचा देश आहेच. तो ज्याची भारतीयत्वावर श्रद्धा आहे त्यांचासुद्धा देश आहे. तो कलामांचा देश आहे आणि सॅम माणेकशाँचासुद्धा देश आहे. सिद्ध करून वगैरे दाखवणार नाही. फुटा.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 08/15/2015 - 20:14
नवीन
तुम्हाला कोणी विचारलंय का? कशाला मधे पचकताय?
का तुडतुडी हा तुमचा डू आयडी आहे?
परत एकदा - भारत हा सर्वधर्मियांचा देश आहे.
बाकी तुमचे जहाल प्रतिसाद चालूदेत...
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Sun, 08/23/2015 - 15:11
नवीन
उगीच पुरावा द्या, पुरावा द्या केलं की लोकं डोक्यात जातात. हा देश हिंदूंचा आहे म्हणायला पुरावा कशाला हवाय? हा हिंदूंचा नाहीये असं तुमचं म्हणणं आहे का? कारण 'हिंदूंचा नाही' म्हणजेच 'हिंदूंचा आहे' चं नकारात्मक वाक्य आहे. मग तसा पुरावा शोधून बघा फारच वाटत असेल तर.
इथं एका आयडी नं लिहायला टाईम मिळत नाही. दोन दोन केव्हा बनवू? आणि माझा आयडी 'तुडतुडी' वगैरे असण्याची शक्यताच नाही.
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Fri, 08/14/2015 - 08:43
नवीन
नाव आडनाव
मी काय करेन हे मला तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नहि. वेळ आल्यावर करून दाखवेन . सध्या काय करत आहे हे लिहिलं आहे . पण ते संपादित केलं गेलं आहे . आम्ही नुसते बोललो तर काही लोकांना शिसारी येतेय . मग हे लोक तर प्रत्यक्षात करतात . आम्हाला किती शिसारी येत असेल विचार करा .
- Log in or register to post comments
न
नाव आडनाव
Fri, 08/14/2015 - 09:35
नवीन
मित्रांनो,
मी काल लिहिलेल्या प्रतिक्रियेसाठी माफ करा. दुसर्याची चूक दाखवून देण्यासाठी सारकॅस्टिकली लिहिलेली माझी प्रतिक्रिया नंतर मलाच चूक वाटली, कारण त्याचा वेगळा अर्थ निघत होता.ईतक्या चांगल्या चाललेल्या चर्चेत माझी प्रतिक्रिया अजिबात नको होती. माझी ती प्रतिक्रिया काढून टाकण्यासाठी संपादकांना व्यनी करण्यासाठी आलो होतो तर ती प्रतिक्रिया संपादकांनी आधीच काढून टाकली आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 08/14/2015 - 09:55
नवीन
एक्का काकांशी सहमत !
बाकी बीबीसीवाल्यांशीच संबंधीत एक प्रतिसाद हल्लीच मी इथे दिला होता.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vande Mataram feat Ustad Amjad Ali Khan :- The Song Of Freedom
- Log in or register to post comments
न
नवशिक्या
Fri, 08/14/2015 - 14:41
नवीन
सर्वच "ते" "ते" नसतात पण जवळपास सगळेच "ते" "ते" असतात ......च्या मायला " जवळपास " शब्दाने घात केला ... ह्या "जवळपास" च्या इंधनावर सगळे आपापल्या रोट्या भाजत आहेत ...आणि जे "ते" नाही आहेत ..त्यांचा तूप म्हणून वापर करत आहेत ......
- Log in or register to post comments
आ
आबा
Fri, 08/14/2015 - 23:48
नवीन
हिंदू-राष्ट्रवादी हे हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत
- Log in or register to post comments
स
सटक
Sat, 08/15/2015 - 03:44
नवीन
वरील लेखाला प्रतिवाद करण्यासाठी are islamists becoming a threat to all other muslims असा लेख कुणीतरी लिहिण्याची गरज आहे असे वाटते आहे. :)
ब्रिटीश मुस्लिम समाजाचे ब्रिटनच्या राजकारणातले/समाजकारणातले वाढते वर्चस्व हे ही ह्या लेखाचे कारण असू शकते.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 08/15/2015 - 06:18
नवीन
उदाहरण म्हणुन जेहादी जॉन का कोण तो आहेच!!!
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Tue, 08/18/2015 - 15:49
नवीन
मुस्लिम परदेशातून आले होते . इंग्रजांसारखेच . अफगाणिस्तानच्या पलीकडून. ते इथले नाहीत . मुस्लिमांनी इथल्या सगळ्या सुंदर गोष्टी उध्वस्त केल्या . त्यांच्या सडक्या विचारसरणीने इथे घाण पसरवून ठेवलीये . फाळणी झाली तेव्हा त्यांनी स्वतःसाठी वेगळा देश मागून घेतला . तेव्हा त्यांचं इथं भारतात काही काम नाही . तेव्हा भारत हा हिंदूंचाच देश आहे . ज्या पाकिस्तानात , बांगलादेश मध्ये ते राहतात तो सुधा हिन्दुस्थानच होता . तेव्हा ती जमीन सुधा त्यांची नाही.
बौद्ध , जैन मूळ हिंदू धर्मापासूनच निर्माण झाले आहेत . त्यांनी देशाच्या विकासात योगदान दिलंय . हिंदूंचा द्वेष करून ते हिंदूंना मारत सुटत नाहीत .केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमापोटी बौद्ध धर्म स्वीकारणारे पण बौद्ध धर्माचं नॉलेज नसणारे , पूर्ण हिंदू असणारे , हिंदू संस्कृती जपणारे , हिंदू देवांचीच पूजा करणारे बौद्ध स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहेत .जैन सुधा हिंदू परंपरा पाळतात . किवा हिंदू देवांची उपासना करतात . शीख सुधा कट्टर देशप्रेमी असतात . आज भारतीय लष्करात सगळ्यात जास्त संख्या शिखांची आहे .उठ सुठ हिंदूंचा द्वेष नाही करत ते .मुस्लिम मात्र हिंदू , जैन , बौद्ध , शीख सगळ्यांशी भांडण करतात . मुस्लिमांनी ह्या देशात मुस्लिम लोकसंख्या वाढवण्यापलीकडे , मागासलेपणा वाढवण्यापलीकडे दुसरं काहीही केलं नाहीये . अब्दुल कलाम सारखा क्वचित अपवाद
गेल्याच आठवड्यातली बातमी .धर्मनिरपेक्ष ब्लॉग लिहिणारा निलोय चौधरीचा बांगलादेश मध्ये खून . ह्या आधी कित्येक धर्मनिरपेक्ष ब्लोग्गर ची इस्लामी देशांमध्ये हत्या झालीये .धर्मनिरपेक्ष लिखाण करणाऱ्या तस्लिमा नसरीनला जीवाच्या भीतीनं देश सोडून पळून जाव लागतं . कालचीच बातमी . पाकिस्तानी समाजाच्या छळाला कंटाळून ४०० हिंदू कुटुंबाचं भारतात स्थलांतर . धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लिमांचे फार लाड झालेत ह्या देशात.
पण ह्यापुढे होतील असं वाटत नाही .
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 08/24/2015 - 09:18
नवीन
तुडतुडीताई/दादा.
पूर्वीचे जे प्रकार 'लाड' म्हणून गणले जात आहेत, तेच 'लाड' आताही होतीलच. कारण लोकशाहीमार्गाने आलेल्या कोणत्याही सरकारला लोकसंख्येच्या एका मोठ्या हिश्श्याला समोरासमोर दुखवता येत नसते. 'हज'ची सब्सिडी तर मुस्लिमांनीही नाकारली आहे कारण ती सब्सिडी सरकारकडून 'एअर-इंडिया'ला मिळते आणि त्यासाठी एअर-इंडियानेच प्रवास करणे भाग असते. शिवाय मुस्लिमांनी हज यात्रेसाठी इतरांचा पैसा घेणे हे त्यांच्या धर्माविरुद्ध आहे त्यामुळे तसेही सब्सिडाइज़्ड तिकिटावर यात्रा करण्याचे प्रमाण कमी होत आहे. भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील.
पाकिस्तानवर हल्ला करणे आणि पाकिस्तानची भूमी त्यावरच्या मुसलमानांसकट ताब्यात घेणे वगैरे गोष्टी कोणतेही शहाणे सरकार करणार नाही. हे सरकारही शहाणे असल्यास तसे करणार नाही. बाकी 'पाकड्यां'ना धडा शिकवणे वगैरे या आधीच्या युद्धात करून झालेले आहे, निर्णायक रीत्या. फक्त १९६५ युद्धाचा अपवाद. पण तो इतिहासही नव्याने लिहिला जात असून त्यानुसार भारतच निर्विवादपणे ते युद्ध जिंकला असे स्थापित होत आहे. मग काय नवे घडणार आहे?
कश्मीर प्रश्न सरळ सुटणार्यातला नाही. सध्याची ताबा रेषा मान्य करणे हाच व्यवहारी पर्याय आहे. आणि त्यामुळे वाटाघाटींचे गुर्हाळ चालूच ठेवावे लागणार आहे. पाकिस्तानला(त्यांच्या लष्कराला) वाटाघाटी नकोच असतात. त्यांना युक्तीप्रयुक्तीने वाटाघाटीच्या टेबलावर आणणे ह्यात मुत्सद्दीपणा असतो. पण ते फेटाळणे यात कोणा बापड्याला असमंजस पोरकटपणाऐवजी वीरश्री दिसल्यास तो त्याचा प्रश्न.
हे सरकार मागील सरकारसारखीच बहुतांशी धोरणे ठेवेल कारण तोच बेस्ट अॅवेलेबल ऑप्शन होता.
त्यामुळे काही किरकोळ बदल सोडता (जे कदाचित काही जणांना फार मोठे वाटू शकतील) फारसे वेगळे काही घडण्याची शक्यता आताही नाही. फक्त स्वच्छ प्रशासनाबाबत आशा आहेत, त्या कितपत खर्या ठरतात ते पाहायचे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Mon, 08/24/2015 - 09:53
नवीन
गळा काढून रडणाऱ्या पोराला (कसं ते swapsच्या पहिलं प्रेम धाग्यावर) समजावणाऱ्या शाळेतल्या बाई डोळ्यासमोर आल्या आणि ड्वाले पानावले.
बाई, केस ऐकनारातली न्हाइ. प्रेत्न करून उपेग न्हाइ.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 08/24/2015 - 09:56
नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 08/24/2015 - 10:10
नवीन
खरेच. पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याने पाणीच वाया जाते.
म्हणूनच धागा सुरू होऊन इतके दिवस झाले तरी प्रतिसाद लिहिला नव्हता.
पण शेवटी तुडतुडीताई/दादा मला उकसवण्यात यशस्वी झाले खरे.
आता पुसा पाहू ड्वाले ! (हलक्याने घेणे)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/24/2015 - 10:50
नवीन
प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद खालील वाक्यांचा)
>>> भारतातल्या सर्वच धर्माच्या उत्सवांसाठी भारत सरकार सुविधा देत असते. उदा. वेलंकनी यात्रेसाठी खास गाड्या सोडणे, नांदेडच्या गुरुद्वारात वार्षिक उत्सवाच्यावेळी पाणी, विजेचा पुरवठा सांभाळणे, कुंभमेळ्यात किंवा पंढरपुरवारीदरम्यान सोयीसुविधा पुरवणे, चैत्यभूमीवर सोयी निर्माण करणे वगैरे. हे सरकारही तेच करील.
असहमत.
वीज, पाणी इ. सुविधा देणे आणि थेट कमी किंमतीत प्रवास करून देणे यात खूप फरक आहे. यात्रेसाठी ज्या गाड्या सोडल्या जातात त्या फक्त अधिकाधिक यात्रेकरूंना यात्रा करता यावी यासाठी. त्या गाड्यांच्या तिकिटात भरपूर सवलत दिलेली नसते. तसेच यात्रेला न जाणार्यांना सुद्धा त्या गाड्यांचा लाभ घेता येतो. उत्सवाच्या वेळी केलेला वीजपुरवठा किंवा पाणीपुरवठा फुकटात किंवा स्वस्तात केलेला नसतो. त्याची किंमत भरावीच लागते. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या निमित्ताने घाट दुरूस्त करणे, रस्ते दुरूस्त करणे इ. गोष्टींचा यात्रेकरूंना फायदा होतोच, परंतु शहरातील नागरिकांना देखील फायदा होतो.
या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार). पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे. त्या तुलनेत हाजचे सौदी अरेबियाचे तिकीट अत्यंत कमी किंमतीत दिले जाते. भारतातील इतर उत्सवाच्या यात्रेकरूंना अशी घसघशीत रोख सवलत मिळत नाही. दुसरे म्हणजे या सवलतीचा उपयोग फक्त हाजला जाणार्यांनाच आहे. इतर प्रवाशांना याचा उपयोग नाही. याऊलट भारतातील इतर उत्सवांना दिल्या जाणार्या सोयीसुविधा इतरांना सुद्धा वापरता येतात.
त्यामुळे हाजला मिळणारी सवलत आणि भारतातील इतर उत्सवांना दिलेल्या सोयीसुविधा यांंची तुलना होऊ शकत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 12:02
नवीन
गुरुजी,
जरा ग्राऊंडवर उतरूया काय?
इथे दरदिवशी लाखो रुपये साधूंच्या खानपानावर सरकारतर्फे खर्च होत आहेत. धान्य, दूध, फळे प्रचंड प्रमाणात पुरवठा सुरू आहे. ६०० एकरच्या वर जमीन साधूग्रामासाठी भाड्याने घेतली आहे. याचे जमिन मालकांना सरकार भाडे भरत आहे, मोफत वीज, पाणी पुरवले जात आहे. आणि या सगळ्यात शहरवासीयांच्या उपयोगाचं काहीच नाहीये. उलट येणार्या गर्दीचा ताप आहे तो वेगळा. शहरवासीयांना रस्ते सोडले तर प्रत्यक्ष फायदयाचे काहीच नाही. वरून ह्या रस्त्यांची पुढील वर्षभर टीकतील याची काहीच हमी नाही. रस्त्यांचा खर्च एकूण खर्चाच्या काही टक्के आहे. बाकीचा खर्च फक्त कुंभमेळ्याच्या आयोजनावर आहे. आणि आयोजन म्हणजे फक्त पोलिसदल आणि बॅरीकेड्स नाही.
नाशिक रेल्वेस्टेशनचा कायापालट केलाय. लाखो उतारुंना एकाच वेळी उतरता येईल इतके स्थानकात बदल केलेत. निवाराशेड्स, रूग्णवाहिका, फिरते दवाखाने, फिरते शौचालय, पाण्याच्या सुविधा, आपत्कालिन व्यवस्था, इत्यादी. शहरवासियांना एवढ्या बदलाची वा सोयींची काहीच आवश्यकता नाही. विशेष म्हणजे नेहमीचे प्रवाशी तर या काळात गरजेच्या सुविधांचाही वापर करू शकणार नाहीत.
अधिक माहीती इथे: दुवा १, दुवा २
खर्चाचे आकडे: मंजूर आराखडा
खास गाड्या सोडल्यात म्हणून प्रवाशांची संख्या वाढते की प्रवाशांची संख्या वाढते म्हणून त्यांच्या सोयीसाठी खास गाड्या सोडल्या जातात? यात सामान्य प्रवाशांचा कुठे विशेष फायदा आहे? विशेष फायदा हा फक्त यात्रेकरूंना आहे ज्यासाठी सरकार पैसा मोजते. या यात्रेकरूंपैकी विनातिकीटही भरपूर असतात. लोक तिकिटही काढतात पण त्यातून सरकारला नफा मिळत नाही.
त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो.
हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 08/24/2015 - 12:40
नवीन
कालच कुठेतरी वाचले की नाशिकचा कुंभमेळा फिफा वर्ल्डकपपेक्षा चांगला आयोजीत केला आहे.
लींक मिळाली तर देतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 13:10
नवीन
ते तर आहेच. जगातल्या सगळ्या मी मी म्हणणार्या विकसित देशांसाठी कुंभआयोजन एक आश्चर्यजनक प्रकार आहे. अनेक देशांतून लोक/अधिकारी याचा अभ्यास करायला येतात.
पर्वण्यांच्या एकूण काळात सुमारे १० कोटी लोकांचे दळणवळण, आरोग्य, निवास, अन्नपाणी इत्यादींची कुठलाही अनुचित प्रकार न होऊ देता घडवून आणणे जगाने दखल घ्यावी अशीच बाब आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मुंबईची लोकसंख्या अदमासे दिड कोटी आहे. व भारताची सव्वाशे कोटी. त्या तुलनेत यंत्रणांवरचा दबाव व कौशल्याची मागणीही त्याप्रमाणात असते.
- Log in or register to post comments
र
राही
Mon, 08/24/2015 - 14:11
नवीन
प्रतिसाद अतिशय आवडला.
सोयी ह्या यात्रेकरूंसाठी असतात. आणि कित्येक सोयी ह्या तात्पुरत्या, यात्राकाळापुरत्या असतात.
यात्रेच्या अतिशय गर्दीच्या काळात नेहमीचे प्रवासी शक्यतो तिथे जाणे टाळतात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 08/24/2015 - 17:15
नवीन
संदीप डांगे,
कुंभमेळ्यातील यात्रेकरूंना सरकार फुकट खाणेपिणे, फुकट प्रवास करण्याची सोय पुरवित आहे का?
आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी शेकडो जादा गाड्या सोडल्या जातात किंवा गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी जादाच्या अनेक गाड्या सोडतात. या गाड्यातून फुकट प्रवास करायला मिळतो का?
जादा गाड्या सोडल्यामुळे एसटी महामंडळ व रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते ना?
या जादा गाड्यांचा लाभ उत्सवासाठी न जाणार्यांना पण मिळतो ना?
आता या सुविधांची तुलना हाज अनुदानाशी केली तर काय दिसते? हाजसाठी प्रतिमाणशी रोख फायदा आहे. त्यातून सरकारला कोणतेही अधिक उत्पन्न मिळत नसून निव्वळ तोटाच आहे. हाजसाठी न जाणार्यांना या सवलतीचा काहीही फायदा नाही.
हिंदू-मुस्लिम तुलनाच करायची तर हिदूंच्या उत्सवाला दिलेल्या सोयीसुविधांंमुळे यात्रकरू व यात्रेकरू नसलेल्यांची सुद्धा सोय होते आणि सरकारला सुद्धा वाढीव उत्पन्न मिळते. याउलट मुस्लिमांच्या उत्सवासाठी दिलेल्या रोख सवलतीमुळे फक्त यात्रेकरूंचा फायदा होत असून सरकारचा तोटा होत आहे.
आपल्या घरी पाहुणे येणार असतील तर आपण घर नीट आवरून व्यवस्थित ठेवतो. आलेल्या पाहुण्यांना स्वच्छ, नीटनेटक्या घरात राहता येतेच. त्याचबरोबर घरात राहणार्यांनाही त्याचा फायदा होतो.
>>> त्यामुळे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहणे सोडा. सरकार सगळीकडे खर्च करते. त्याचे कारण यात्रेकरूंना फायदा व्हावा म्हणून. शहरवासीयांना फायदा करून द्यावा म्हणून कुंभ आयोजित होत नसतो.
यात्रेकरूंसाठी निर्माण केलेल्या सुविधांचा फायदा यात्रेकरूंप्रमाणे स्थानिकांनाही होतो.
>>> हज सबसिडी असावी नसावी यात मला पडायचे नाही. पण हिंदूंसाठी सरकार खर्च करत नाही हा समज योग्य नाही म्हणून प्रतिसाद प्रपंच.
हा खर्च सरकार हिंदूंसाठी करते असे तुम्ही म्हणत आहात ते चुकीचे आहे. त्या खर्चाचा फायदा हिंदूंप्रमाणे अहिंदूंनाही होतो. याउलट हाज सबसिडीचे लाभार्थी फक्त मुस्लिम आहेत. अमुस्लिमांना त्याचा फायदा नाही. किंबहुना त्यांना अप्रत्यक्षरित्या तोटाच आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/24/2015 - 18:16
नवीन
माझा मुद्दा तरी सरकार सर्व धर्माच्या सोहळ्यांसाठी करत असलेल्या खर्चाबद्दल आहे आणि राहीन.
१० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे?
कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा.
सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?.
तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता.
राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात.
हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/25/2015 - 15:52
नवीन
>>> १० लाखाच्या वर येणारे साधू ज्यांना सर्व सुविधा मोफत मिळत आहेत ते यात्रेकरू नाहीत? त्यांच्यावर होणारा खर्च, खर्च नाही? त्यातून सरकारला काय उत्पन्न मिळते? त्याच्यातून अहिंदू लोकांना वा शहरवासियांना काय फायदा आहे?
यातून सरकारला भरपूर उत्पन्न मिळते. येणारे प्रवासी ज्या सार्वजनिक वाहनांचा वापर करतात (आगगाड्या, बसेस इ.) त्याच्या तिकिटविक्रीतून सरकारला उत्पन्न मिळते. कुंभमेळ्याच्या गावी असलेल्या स्थानिक व्यावसियाकांचा व्यवसाय वाढतो (उदा. लॉजेस, दुकाने, रस्त्यावरील विक्रेते, सलून्स इ.). कुंभमेळा बघण्यासाठी परदेशातील अनेक वाहिन्या येऊन चित्रीकरण करतात व त्यांच्याबरोबर काही परदेशी पर्यटकसुद्धा येतात. त्यांच्यामुळेही सरकारला उत्पन्न मिळते. यातून हिंदू आणि अहिंदूंचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या फायदा होतो.
हाजला जाणार्यांमुळे सरकारला नुकसान सोसावे लागते हे लक्षात घ्या.
>>> कुंभमेळ्याला येणारे सर्व यात्रेकरू हिंदूच आहेत. हा काही सर्वधर्मिय सोहळा नाही. की त्यामुळे फक्त सरकारतर्फे उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यायला अहिंदू आपले घरदार सोडून कुंभमेळ्याच्या गर्दीत सामील होतात. असा तुमचा समज असेल तर असो बापडा.
अहिंदू हे यात्रेकरू म्हणून येतात असे मी म्हटलेच नाही. परंतु कुंभमेळ्यामुळे हिंदू आणि अहिंदू अशा दोन्ही प्रकारच्या व्यावसायिकांचा त्या काळात व्यवसाय वाढतो. हाज यात्रा देशाबाहेर असल्याने सरकारला कोणत्याही प्रकारचा फायदा न होता सरकारचा तोटाच होतो.
>>> सरकार करत असलेल्या खर्चाची यादी दिली आहे वरच. त्यात केवळ खाणेपिणे-प्रवास फुकट नाही म्हणून सरकारचे इतर सर्व खर्च, मेहनत, कौशल्य सपशेल नाकारण्याचा व डोळेझाक करण्याचा प्रयत्न का?.
वर लिहिलेच आहे. सरकारने खर्च केला तरी सरकारला व स्थानिक जनतेला उत्पन्न मिळून त्याची परतफेड होते.
>>> तुम्ही मांडलेल्या तर्कावरून असं दिसते की कुंभमेळ्यात केला जाणारा सरकारी खर्च हा 'सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून, शहरवासीयांना विशेष फायदे मिळावे म्हणून, हिंदूंसोबत अहिंदूंनाही लाभ घेता यावा म्हणून' होतो. किंवा असे होते म्हणून सरकारला यात खर्च करण्यात रस आहे अन्यथा नसता.
तसे नाही. सरकारला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार सोयीसुविधा निर्माण करीत नाही. कुंभमेळा ही हजारो वर्षे चालत असलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. हा मेळा व्यवस्थित पार पडावा यासाठी सरकार सुविधा निर्माण करते. त्यानिमित्ताने सर्वांचाच फायदा होतो.
उदा. आपल्याला उत्पन्न मिळावे म्हणून सरकार पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणार्या यात्रेसाठी सुविधा निर्माण करीत नाही. धार्मिक परंपरा कमीतकमी त्रासात सुरू रहावी हा त्यामागे उद्देश असतो आणि त्यासाठी केला जाणारा खर्च हा एकतर्फी आणि अनाठायी नसतो.
>>> राहीताईंनी म्हटल्याप्रमाणे सर्व धर्माच्या सर्व सोहळ्यांना सरकार या ना त्या प्रकारे भूर्दंड सोसून मदत करतेच. उदा. महाराष्ट्र विजमंडळाचे सर्वात कमी दर बीपीएल ग्राहक, कुक्कूटपालन व धार्मिक उत्सवनिमित्तच्या जोडण्या यांना आहेत. त्यात धार्मिक म्हणजे सर्वच धर्माचे. यात सरकारचा फायदा होत असेल तरच गुंतवणूक करावी असा कार्पोरेटी खाक्या नसतो तर नागरिकांच्या मदत व सोयीसाठी ह्या सुविधा असतात.
या उत्सवासाठी सरकार करीत असलेल्या खर्चाचा ताळेबंद मांडल्यास त्यात सरकारला भुर्दंड पडला का व किती भुर्दंड पडला ते लक्षात येईल. परंतु वर लिहिल्याप्रमाणे सरकारने सोयीसुविधांसाठी खर्च केला तरी अनेक अप्रत्यक्ष मार्गाने सरकारला खर्च परत मिळतो. जनतेलाही त्याचा फायदा होतो.
>>> हज सब्सिडी बंद करण्याबाबत न्यायालयाने आपला निर्णय दिलाय. त्यावर सरकार अंमलबजावणी करेल. त्यामुळे तो मुद्दा आता कुठल्याही चर्चेत घेणे गैर वाटत आहे.
हजसाठी दिले जाणारे थेट रोख अनुदान आणि कुंभमेळ्यासारख्या धार्मिक यात्रांच्या निमित्ताने दिल्या जाणार्या सोयीसुविधा यांना मूळ प्रतिसादात एकाच तागडीत तोलल्याने मी प्रतिवाद केला. हे तुमच्या लक्षात असेल की हाजसाठी अल्पदरात विमानप्रवासाची सुविधा दिल्याने सरकारला फक्त आणि फक्त तोटाच होता. हा खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघत नाही. याउलट धार्मिक यात्रांच्या निमित्ताने रोख सवलत न देता सोयीसुविधा दिल्याने सरकारने केलेला खर्च प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने भरून निघू शकतो.
एक साधे उदाहरण देतो. एखाद्या गावातील काही शेतकर्यांना थेट रोख रक्कमेची मदत दिली तर फक्त तेवढ्याच शेतकर्यांचा फायदा होईल आणि सरकारला त्यातून काहीही मिळणार नाही. याउलट सरकारने जर अखंडित वीजपुरवठा, पाणीपुरवठा इ. सोय केली तर त्या भागातील सर्व शेतकरी व शेतकरी नसलेल्यांना सुद्धा फायदा होईल. त्यातून नवीन व्यवसाय निर्माण होऊ शकतील, शेती उत्पन्न वाढू शकेल आणि सरकारला करांच्या रूपाने उत्पन्न मिळून केलेला खर्च भरून येऊ शकेल. हाजला देण्यात येणारी रोख सवलत आणि धार्मिक यात्रांना पुरविण्यात येणार्या सुविधा यात हाच नेमका फरक आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 08/24/2015 - 19:06
नवीन
एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 08/25/2015 - 15:58
नवीन
>>> एकतर हे सब्सीडी प्रकरण खरच किती लाभदायक आहे हेच संदीग्ध आहे. आणि जरी त्याचा लाभार्थी केवळ मुस्लीम समुदाय असेल तरी त्यात प्रॉब्लेम काय आहे ? हज यात्रा करुन काहि लोकांना जर जीवन कृतार्थ झाल्याचं वाटत असेल, त्यातुन कोणाचं नुकसान होत नसेल, आणि कोणाच्या तोंडाचा घास हिरावुन हि सब्सीडी दिली जात नसेल तर आनंदाने यात्रांना सब्सीडी द्यावी.
सरकार हे सर्वधर्मियांचे आहे. त्यामुळे फक्त एकाच विशिष्ट धर्माला लाभार्थी करणे हे योग्य नाही. सरकारने इतर सर्वधर्मियांना अशी रोख सवलत दिल्यास हाजबद्दल आक्षेप येणार नाहीत (उदा. सरकार ख्रिश्चनांना व्हॅटिकनला विमानाने केवळ १२००० रूपयात जाऊन देईल का?).
हाज सवलतीमुळे सर्वांचेच अप्रत्यक्ष नुकसान होते कारण सरकार जी सवलत देते ते उत्पन्न जनतेचे दिलेल्या करांच्या पैशातून आलेले असते. म्हणूनच त्याबद्दल आक्षेप आहेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 08/25/2015 - 21:55
नवीन
दुसर्यांचा हक्क डालवुन असं होत असेल तर ते अयोग्यच आहे. पण हजयात्रा जर मुस्लीमांचा परमोच्च आस्थेचा विषय असेल, व त्यासाठी आर्थीक अनुदान देणं एव्हढी एकच मदत जर सरकार करु शकत असेल तर तसं करायला काहि हरकत नसावी.
घरात फक्त आजीबाई उपास करते म्हणुन तिच्याकरता साबुदाणा खिचडी बनते. इतरांनी पण उपास केला तर त्यांनाही मिळेल. शक्य तेव्हढं आस्थेने केलं तर बिघडलं कुठे ?
जनतेने दिलेल्या करांच्या पैशातुन सरकार मदत करते हे खरं आहे. पण त्याच कर भरणार्या जनतेत मुस्लीम टक्का देखील आहे. आणि या खर्चाचं फार काहि ओझं होत असेल असं वाटत नाहि. जनतेच्या मनःशांती करता अल्प किंमत मोजायला काहि प्रॉब्लेम नसावा.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 08/25/2015 - 22:29
नवीन
vatican ला 12000 मध्ये?
यात इटली वगैरे पैकेज देत असले तर हम रेडी हूँ.
एकदा कन्वर्ट व्हा आणि पुन्हा reconvert व्हा.
हाय काय नि नाय काय!
मोरोक्को मध्ये फ्लेश बिज़नेस जोरात असतो. आणि विशिष्ट धर्मीय लोकांना तर हे हराम आहे. करायचं काय मग? प्रश्न आला की उत्तर तयार होतं. चार लग्न करायला काही अडचण नाही.
मग एक लग्न करा, कार्यक्रम करा, दुसऱ्या दिवशी तलाक तलाक तलाक.
दुसऱ्या दिवशी दुसरं करा, कार्यक्रम करा पुन्हा तलाक.
have fun हबीबी!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 08/26/2015 - 17:00
नवीन
:)
सवीस्तर बोलु ;)
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 08/25/2015 - 03:29
नवीन
भारतातील हजची 'मदत ' ही ' मदत ' नाही.
लोकशाही असल्याने सर्कारी पैशावर जनतेचा हक्क अहेच.
...
हिंदूनी नर्मदा परिक्रमा करावी. भरपूर पुण्य मिळते म्हणे.
....
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 08/25/2015 - 06:42
नवीन
कोणतीही यात्रा हा एक पर्यटनाचा प्रकार आहे ज्यामुळे स्थानीक लोकांना उत्पन्न मिळते. कुंभ मेळा आयोजित केला कि स्थानिक रिक्षावाले, दुकानदार, हॉटेल मालक, कलाकार फुलवाले नारळवाले इ यांना उत्पन्न मिळते. हाज ला जाणार्या लोकांचा हा पैसा सौदी अरेबिया ला मिळतो भारतातील लोकांना त्याचा दोन दमड्यान्चाही फायदा होत नाही. हज ला सबसिडी देण्यापेक्षा( जी केवळ मुस्लिम मतांसाठी दिली गेली होती/ आहे) तोच पैसा अजमेरच्या उरुसावर किंवा फतेहपुर सिक्री वर खर्च केला तरी चालेल निदान स्थानिक लोकांना ( वर म्हटल्याप्रमाणे यात हिंदू मुसलमान सर्वच आले) म्हणजे पर्यायाने भारतालाच फायदा होईल.त्यातून ज्याला हज ला जायचेच आहे त्याने स्वतःच्या पैश्याने जावे म्हणजे पुण्यही मिळेल. मनाला आल्हाददायक का काय तेही वाटेल
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 08/25/2015 - 07:16
नवीन
धार्मिक यात्रा ही स्वतःच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करायची असते. त्यातून पैसा कुणाला मिळतो वगैरे बघायची गरज नसते.
माझा पैसा , परदेशातील लोक हा आप पर भाव असेल तर तुम्ही खुशाल नर्मदायात्रा करावी.
हजला जाताना हा आपपरभव सोडायचा असल्याने मुसलमान खुशाल हजला जातील मg ते कोणत्ञा का देशात असेना !
तुम्ही भारतीय दमड्या व त्यांचे भारतातील वाटप या सगळ्याच्या चिंतनात रमून जावे व त्यानुसार यात्रा कराव्यात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 08/25/2015 - 07:52
नवीन
आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा आम्ही आमच्या पैश्याची चिंता करतो. तुम्हाला हज ला जायचा तर जा की.
आणी जाताना असा आप पार भाव सोडून तुमच्या भारतीय दमड्या आम्हाला देऊन गेलात तर तुमची अधिक अध्यात्मिक उन्नती होईल आणी आमच्या मनालाही आल्हाददायक वाटेल.
हा प्रतिसाद मात्र हलके न घेता सिरीयसली घ्या अशी नम्र विनंती.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/25/2015 - 09:46
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 08/26/2015 - 11:44
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 08/26/2015 - 03:53
नवीन
अचुक हाणलय डॉक =))
@दरेकर
"तिर्थक्षेत्री" जौन तिकडेच कायमचं रहाणार्यांना जास्तं पुण्य मिळतं म्हणे. पुण्यवान व्हा आणि मोठेही व्हा. तेवढे पैसे दानाचे पुण्य मिळवायचं बघा.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/26/2015 - 09:06
नवीन
बाय द वे, हजची यात्रा स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून करावी असा नियम आहे असे ऐकतो... त्याचे काय ?
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 08/26/2015 - 11:48
नवीन
तूर्तास स्वकष्टाची कमाई या शब्द्याची व्याखा+अर्थ लवचिक+सोयीस्कर केला आहे.
अभामिपाधुराळीधागेनियमीत्वचक्चावक्स्वादक संघ
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 08/26/2015 - 12:04
नवीन
तीच तर गंमत आहे. म्हणूनच सरकार एअर इंडीयाला सबसिडी देतं. मग एअर इंडीया यात्रेसाठी खास सवलत असल्याचं जाहिर करतं. आणि यात्रेकरी "आपल्या" कमाईचा पैसा खर्च करून यात्रेला जातात. सगळं कसं नियमात. ;)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 08/25/2015 - 06:44
नवीन
दंडवत घ्या दादा गरीबाचा _/\_
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 08/26/2015 - 11:37
नवीन
या तुलनेत जर हाज सवलत पाहिली तर हाज यात्रेकरूंना अल्प दरात विमान तिकीट दिले जाते (प्रतिमाणशी रू. १२ हजार).
(वेळेत बुक केल्यास) मुंबैइ - जेद्दाह या मार्गावर एरवी तिकिटाचा दर २०० डॉलरच्य आसपास अहे म्हणजे साधारण १३००० रुपये. रिटर्न तिकिट साधारण साव्वातीनशे डॉलर म्हणजे २१००० रुपयात मिळते. हे बघता फार काही सवलत मिळते असे दिसत नाही. शिवाय त्यात एयर इंडियानेच प्रवस करावा अशी अट असेल तर ते एयर इंडिया साठी आणि पर्यायाने सरकारसाठी बरेच आहे की. एरवी एयर इंडियाने जायला लोक कुठे उत्सुक असतात?
पुणे-दिल्ली या प्रवासाचेच परतीचे तिकिट कमीतकमी १६ हजार रूपयांना आहे.
परवाच दुबईहुन परत आलो. तिकिट ७००० रुपयात मिळाले. काही दिवसांपुर्वी मुंबई चेन्नई प्रवास देखील केला. तिकीट २२००० रुपते होते. सांगण्याचा उद्देश हा की देशांतर्गेत तिकीट दर काही अनाकलनीय कारणांमुळे खुप जास्त आहेतचे त्यामुळे ही तुलना होउ शकत नाही.
मुंबई चेन्नई या प्रवासासाठी (रिटर्न नाही) जिथे २२००० रुपये तिकीट होते (ऐनवेळेस बुक केलेले) त्यापेक्षा कमी खर्चात (रु १७५००) नोव्हेंबर महिन्यात बेंगलोर सिंगापूर चे रिटर्न तिकीट मिळते आहे.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Mon, 08/24/2015 - 11:01
नवीन
उत्तर ध्रुवावरुन आलेले लोक पर्शियातुन आलेल्या लोकाना परदेशी म्हणतात तेंव्हा मला तर बै फार हसू येते!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 08/25/2015 - 03:50
नवीन
आपण कुठल्या सुर्यमालेमधुन आला आहात?
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Mon, 08/24/2015 - 13:01
नवीन
पर्शिया , इराण , इराक मुळचे पारशांचे देश . अत्यंत क्रूर पद्धतीनं ते त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले . जे पारशी हिंदुस्थानात आश्रयाला आले त्यांनी त्यावेळी दिलेला शब्द ते आजही पळत आहेत . तेव्हा ते परदेशी असले तरी आम्ही त्यांना तसं मनात नै
- Log in or register to post comments
D
dadadarekar
Tue, 08/25/2015 - 06:24
नवीन
उत्तर ध्रुवावरुन आलेले म्हणजे हिंदू.
पर्शियातून आलेले म्हणजे मुसलमान.
हिंदू लोक मुस्लिमाना परकीय म्हणतात.
पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत ना ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 08/25/2015 - 07:07
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Tue, 08/25/2015 - 10:30
नवीन
तुझा इतिहसाचा इल्म वाढव, उगीचच वेड्यावाकड्या प्रतिक्रिया देउ नकोस.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »