बीबीसीची बातमी : हिंदू इतर भारतीयांना धोकादायक बनत चालले आहेत काय ?
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?
या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे.हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे ! सद्या इतकेच पुरे. :)बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हेही फारच अतिशयोक्त आणि अयोग्य तुलना झाली. संध्यानंद वगैरे अतिशयोक्ती सोडून, बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे. मात्र, खास ब्रिटीश परंपरेप्रमाणे "आपला अजेंडा त्या अजेंड्यामुळे पिडीत झालेल्यांच्याच कसा फायद्याचा आहे" हे पटवून देण्याचे तंत्र बीबीसी इतके इतर कोणत्याच माध्यमाने क्वचितच विकसित केलेले आहे ! ======ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.याने तसा काहीच फरक पडत नाही. प्रत्येक सरकारी / गैरसरकारी माध्यमाचा काही ना काही उघड / छुपा उद्येश (अजेंडा) असतोच... आणि त्यापैकी प्रत्येकजण सगळेच उद्येश उघडपणे राबवतात असे नाही... किंबहुना "गोडगोजिरे बाह्यदर्शन (good / politically correct appearance)" ठेवण्यासाठी त्यांना तसे करणे सोईचे नसते. तसेही, बीबीसी अप्रत्यक्ष सरकारी माध्यम नसून "स्वायत्त संस्था" असल्याचा बीबीसी आणि ब्रिटिश सरकार दोघांचाही "अधिकृत" दावा आहेच ;) ======कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे.यावरून काहीच स्पष्ट होत नाही का ? आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :) ...फक्त असे करताना ते पोलिटिकली करेक्ट दिसावे इतका इंग्रजांचा आग्रह असतो आणि भारतीयांना त्याची फिकीर नसते, इतकाच काय तो फरक आहे ;)इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतातहे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.