Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद

ड
डायवर
Tue, 08/18/2015 - 13:39
🗣 135 प्रतिसाद
प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे. बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच. या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना? पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक.
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
25172 वाचन

💬 प्रतिसाद (135)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 08/18/2015 - 14:08 नवीन
पुरस्कार स्वीकारावा असे आमचे मत.दोन चार राष्ट्रवादीच्या टग्यांच्या धुडगुसाला जुमानता कामा नये. ह्यांचा हेतु प्रामाणिक असता तर त्यांनी बाबासाहेबांवर टिका करण्याऐवजी मूळ मुद्द्यांवर ईतिहास मंडळाबरोबर चर्चा केली असती.पण आडनाव पुरंदरे असल्याने व तो पुरस्कार फडणवीस देणार असल्याने जळजळ चालू आहे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 08/19/2015 - 09:27 नवीन
आँ!!!! अरे कोणीतरी कांदा आणा रे माझ्या नाकाला लावायला. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/20/2015 - 20:04 नवीन
माईंना त्यांच्या 'ह्यां'नी त्यांचे मत सांगणे थाबविल्यापासून माई आमुलाग्र बदलल्यात ! विशेष सूचना : कांद्यांचे भाव लई वाढू र्‍हायलेत, वेळेत साठा करून ठेवा. नाय्तर मंग कठीण हाय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विकास गुरुवार, 08/20/2015 - 21:12 नवीन
ह्यांचा हेतु प्रामाणिक असता तर ह्यातील "ह्यांचा" म्हणजे कोणाचा? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
द
दत्ता जोशी Tue, 08/18/2015 - 14:17 नवीन
आक्षेप एव्हढेच नाहीत . शिवाजीमहाराजांचे व्यक्तिमत्व मुस्लिम विरोधी रंगवले आहे ते खोटे असून शिवाजी महाराज हे सेक्युलर होते - असाही एक आक्षेप आहे. आजच अजून एक बातमी वाचली. पानिपतकार विश्वास पाटलांनी सर्व आक्षेप्कार्त्यांना चर्चेचे आवाहन दिले आहे. हे मला फार आवडलं. चर्चा होणे पुरावे देवाण घेवाण करून सत्य परिस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. तसे न होता लोकांच्या भावनांना आवाहन देवून बुद्धीभ्रम आणि तेढ निर्माण करण्याचे कार्य होत आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Tue, 08/18/2015 - 14:21 नवीन
चर्चा होणे पुरावे देवाण घेवाण करून सत्य परिस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे
हाहा हा ! भलत्याच अपेक्षा बॉ तुमच्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
च
चलत मुसाफिर Tue, 08/18/2015 - 14:21 नवीन
बाबासाहेब पुरंदरे हे स्वतःला शिवरायांचे शाहीर असेच म्हणवून घेतात. इतिहासकार असल्याचा दावा त्यांनी कधीही केलेला नाही. परंतु अवघे आयुष्य शिवस्तुतीला वाहून दिलेल्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान हा व्हायलाच हवा. त्यांचे कार्य निर्विवादपणे थोर आहे. शिवरायांचा जीवनपट त्यांना मुखोद्गत आहे. राजांचे एकूणएक गडकिल्ले त्यांनी पालथे घातले आहेत. हजारो लोकांनी त्यांची पुस्तके, व्याख्याने आणि अर्थातच 'जाणता राजा' यांवर भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. नव्हे, असावेतच. कारण इतिहास हा विविधरूपी असतो. पण हा पुरस्कार योग्य व्यक्तीस मिळत आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 08/18/2015 - 14:21 नवीन
बस... एवढंच?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 08/18/2015 - 14:50 नवीन
अश्स्शाच नावच एक धागा होता ना रे आधी?? असो.. पुरस्कार स्वीकारावा. ४ टग्यांनी धुडगुस घातला म्हणुन त्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 08/18/2015 - 15:04 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
फ
फुलथ्रॉटल जिनियस Tue, 08/18/2015 - 15:21 नवीन
राष्ट्र्वादीचे आमदार मा.ना.जितेंद्रभाऊ आव्हाड यांनी उपस्थीत केलेले मुद्देही योग्य आहेत असे मला वाटते, या मुद्द्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 08/18/2015 - 15:54 नवीन
लिस्ट आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीगुरुजी Tue, 08/18/2015 - 16:02 नवीन
नानासाहेबने आधी माईसाहेबच्या नावाने पुरस्काराला पाठिंबा जाहीर केला आणि आता फुलबॉटलच्या नावाने पुरस्काराच्या विरोधकांचे समर्थन करतोय. हे अगदी पवारांसारखं झालं. म्हणजे आधी ३-४ वेळा पवारांनी स्वहस्ते बाबासाहेबांचा सत्कार केला, स्वहस्ते २०१३ मध्ये त्यांना डी.लिट. ही पदवीही दिली. तेव्हा त्यांना बाबासाहेबांबद्दल काहीही आक्षेप नव्हते. आणि आता त्यांना देण्यात येणार्‍या पुरस्काराला ते विरोध करीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
च
चिनार Wed, 08/19/2015 - 11:30 नवीन
फुलथ्रॉटल जिनियस यांचं बरोबर आहे..जीन्तेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री पदासाठी पात्र असलेले एक ऋषीतुल्य, अभ्यासू, प्रामाणिक व्यक्तीमत्व आहे. त्यांना मुख्यमंत्री बनवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
श
श्रीरंग Wed, 08/19/2015 - 16:51 नवीन
संपूर्ण विश्वाचे अधिपत्य करण्याची योग्यता असलेल्या या थोर विभूतीस एका यःकश्चित राज्याचे मुख्यमंत्री या रूपात पाहूच कसे शकता तुम्ही? "save gaza" असे लिहिलेल्या टी शर्टातील त्यांची छबी डोळ्यासमोर आली, की काटा येतो अंगावर. कोणत्याही क्षणी आपल्या पक्षातील ४ गावगुंड घेऊन आव्हाड महाराज गाझा पट्टीवर अवतीर्ण होऊन पापाचे निर्दालन करतील, असे तेव्हा वाटायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
व
विवेकपटाईत Tue, 08/18/2015 - 15:48 नवीन
सेकुलर इतिहासकारांच्या मते टिपू सुलतान हा सेकुलर होता. अधिक काही बोलणे योग्य नाही. विरोध करणार्याने स्पष्ट बोलले पाहिचे 'ब्राह्मण' व्यक्तीला कुठलाही पुरस्कार देणे आम्हाला खपणार नाही. आमच्या राजनीतिक पोळी भाजण्याच्या दृष्टीने हे योग्य नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 08/18/2015 - 15:57 नवीन
महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना उगाच मातीगोट्याच्या किल्ल्यांवर वेळ दडवणार्‍या शाहीरांना का म्हणुन पुरस्कार द्यावा. लाखमोलाच्या ( आता तर अरबो मोलाच्या ) कामगीर्‍या करणारे राहिले बाजुला. आणि हे टिकोजीराव नागपूरच्या आदेशाने पुरस्कार लाटायला निघाले. काय तर म्हणे शिवशाहीर. त्यापेक्षा आधुनीक काळातल्या कर्तुत्ववान लोकांचे पोवाडे गाणारे शाहीर शासनाला दिसत नाहि काय...
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स Tue, 08/18/2015 - 16:05 नवीन
महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Tue, 08/18/2015 - 17:21 नवीन
पण ति तुम्हाला पचणार नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
म
मृत्युन्जय Wed, 08/19/2015 - 09:49 नवीन
किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू. १. जितेंद्र आव्हाड २. शरद पवार ३. अजित पवार ४. सुप्रियाताई सुळे ५. पुरुषोत्तम खेडेकर अजुन पाहिजे असतील तर अजुन नावे देतो. इतकी महनीय व्यक्तिमत्वे भारतात असताना पुरंदरेंसारख्या माणसांना महाराष्ट्रभूषण मिळावा हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या जातीयवादी राजकारणाची आताशा किळस यायला लागली आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
प
प्यारे१ Wed, 08/19/2015 - 09:52 नवीन
महाराष्ट्राच्या जातीयवादी राजकारणाची आताशा किळस यायला लागली आहे, हे वाक्य वरील प्रतिसादात 'फाऊल' म्हणून गणल्या गेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Wed, 08/19/2015 - 09:54 नवीन
नाना फडणवीस बाबासाहेब पुरंदर्‍यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन जातीयवादी राजकारण करत आहेत असं वाचायचं अस्तं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Wed, 08/19/2015 - 09:57 नवीन
आता बरोबर आहे. किंवा जातीयवादी राजकारणाची किळस ऐवजी अभिमान अथवा कौतुक वाटलं योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मृत्युन्जय Wed, 08/19/2015 - 10:00 नवीन
पैसातै बरोब्बर बोलत्यात. त्यो नाना मुख्यमंत्री झाल्यापासुन महाराष्ट्र जातीयवादी व्हायालाय परत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 17:00 नवीन
नाना हे नाव स्पॉटनानाच्या धर्तीवर अमित शहा ह्यांना द्यावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 10:01 नवीन
आमच्या नारायणरावांना वगळल्याबद्दल निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ख
खेडूत Wed, 08/19/2015 - 10:07 नवीन
तुमचे म्हणजे कुठल्ले ? पेशवाईतले की शिंदूदुर्गातले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/19/2015 - 14:20 नवीन
शिंदुदुर्गातले हो महाराजा. पेशवाईतले नक्को ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
च
चिनार Wed, 08/19/2015 - 11:40 नवीन
रामदास आठवले यांचे नाव वगळून जातीय राजकारणाचा नीच स्तर गाठल्याबद्दल मृत्युंजय यांचा जाहीर निषेध. कुठे फेडाल ही पापं? अजूनही कितीतरी नाव देत येतील. पण फक्त पाचच नाव देण्याचे परस्पर ठरवून कितीतरी जातींवर अन्याय केल्याबद्दल "किमान ५ नावे सांगा. मग पुढे चर्चा करू" या प्रतिसादाचाच जाहीर निषेध..! महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार बंद करून सगळ्या जाती, उपजातीन्साठी "जाती भूषण ' हा पुरस्कार सुरु करावा ही नम्र विनंन्ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
श्रीगुरुजी Tue, 08/18/2015 - 16:12 नवीन
>>> महाराष्ट्राला 'भूषण' ठरावीत अशी अनेक व्यक्तीमत्वे हयात असताना बाबासाहेब सुद्धा हयात आहेत आणि ते महाराष्ट्राचे भूषणही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रचेतस Tue, 08/18/2015 - 16:17 नवीन
उपरोधात्मक प्रतिसाद आहे हो तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/18/2015 - 16:26 नवीन
कशावरुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 08/18/2015 - 16:31 नवीन
दिसतंय की सरळ. नायतर अर्धवटरावांनाच विचारा की हाकानाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/18/2015 - 17:10 नवीन
दिसतंय की सरळ. नायतर अर्धवटरावांनाच विचारा की हाकानाका.
चला अर्धवटरावांनाच विचारु ... अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अर्धवटराव Tue, 08/18/2015 - 17:23 नवीन
अगोदरच इतका वाद झाला आहे. त्यात आमचं नाव देऊन आणखी गदारोळ कशाला करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 08/19/2015 - 08:40 नवीन
तसं नाही हो ... आजकाल आडनावावरुन ठरते की वाद निर्माण करायचा की नाही ते ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रमोद देर्देकर गुरुवार, 08/20/2015 - 13:30 नवीन
अर्धवटराव तुमचे आडनाव काय आहे हो ?>>> प्रगो नुसत्या आडणावाने काय हो होणार उदा. जोशी म्हंटले तर आग्री लोक ही जोशी आहेत. मी म्हणतो इथुन पुढे अशा प्रकारच्या धाग्यावर प्रतिक्रिया देताना सर्वांनी आपापली जातच द्यावी ना. म्हणजे मग प्रतिक्रियेचे स्वरुप जास्त सस्पष्ट होईल हाकानाका. वरिल माझा प्रतिसाद जर गैर वाटत असेल तर संपा ने तो उडवुन लावावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
रमेश आठवले गुरुवार, 08/20/2015 - 18:32 नवीन
देर्देकर साहेब ! आपल्या धाग्याच्या किंवा प्रतिसादाच्या सुरवातीला आपणच आपली जात ,पोटजात , कुल, गोत्र वगैरे माहिती टाकून या प्रथेची सुरुवात करा.खरे नाव लिहा. मिपा वर टोपण नाव असेल तर ते नको .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
ब
बबन ताम्बे Tue, 08/18/2015 - 16:00 नवीन
शिवरायांचे किल्ले मातीगोटयांचे ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/18/2015 - 16:11 नवीन
पवारांनी आणि राष्ट्रवादीने हा वाद मुद्दाम उठविला आहे. त्यामागे सबळ कारणे आहेत. १९९९ साली राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर प्रचंड भ्रष्टाचार आणि जातीयवाद या दोनच क्षेत्रात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अफाट कर्तृत्व गाजविल्याचे लक्षात येईल. अजित पवार, तटकरे, भुजबळ, पद्मसिंह पाटिल, कोल्हापूरच्या महापौर माळवे, पुण्याच्या शिक्षण मंडळातले चौधरी आणि धुमाळ, गेला महिनाभर फरारी असलेले रमेश कदम इ. भ्रष्टाचाराची आघाडी सांभाळली तर आव्हाड, नबाब मलिक, संभाजी ब्रिगेड इ. नी सतत प्रक्षोभक विधाने करून जातीयवाद वाढविला. जूनमध्ये भुजबळांच्या मालमत्तेवर धाड घालून २५६० कोटी रू. ची मालमत्ता सापडल्यावर दुसर्‍या दिवशी तावडे, पंकजा भुजबळ इ. ची नसलेली प्रकरणे बाहेर येणे हा योगायोग नव्हता. तावडे, मुंडे इ. मुळे माध्यमातून भुजबळांचे नाव आपोआप अदृश्य झाले. कालच १ महिनाभर फरारी असलेला आमदार रमेश कदम सापडणे आणि कालपासूनच पुरंदर्‍यांविरूद्ध अचानक उग्र वक्तव्ये सुरू होणे हा देखील योगायोग नाही. किंबहुना काल साहेबांनी स्वत:हूनच कदमला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले असावे. त्याच्या अटकेची चर्चा पुरंदर्‍यांच्या पुरस्कारामुळे माध्यमात फारशी होणार नाही हा त्यांचा अंदाज अचूक ठरला. भविष्यात तटकरे किंवा अजित पवारांविरूद्ध कारवाई सुरू झाली की लगेच दुसर्‍या दिवशी भाजप नेत्यांची नसलेली प्रकरणे जाहीर करून आपल्या नेत्यांबद्दल माध्यमात चर्चा होणार नाही अशी व्यवस्था साहेब नक्कीच करू शकतील.
  • Log in or register to post comments
अ
अमित मुंबईचा Wed, 08/19/2015 - 06:14 नवीन
अगदी बरोबर, हे वाचून यशवंत दत्त यांच्या सरकारनामा चित्रपटाची आठवण झाली. असेच काहीसे राजकीय डावपेच होते त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रसाद गोडबोले Tue, 08/18/2015 - 16:25 नवीन
हे सर्व प्रकरण ब्राह्मण समाजासाठी अत्यंत उपयुक्त असा अभ्यास आहे ! मी अन्यत्र केलेल्या विधान ह्या निमित्ताने परत क्वोट करत आहे !
शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सावरकर आगरकर कर्वे रानाडे ह्यांच्या समाजसुधारणेच्या प्रयत्नांना काडीमोल किंमत राहिलेली नाहीये हे कटु सत्य आहे .
बाबासाहेब ब्राह्मण आहेत हेच एक स्पष्ट कारण आहे ह्या संपुर्ण वादाचे ! ९० वर्षांचे संपुर्ण योगदान आज नुसतेच मातीमोल नव्हे तर वादग्रस्त झालेले दिसत आहे ! समस्त ब्राह्मण समाजाने ह्या निमित्ताने पुनरेकवार , सर्व समाज ,आपले सामाजिक योगदान आणि समाजाची त्यावरील प्रतिक्रिया इत्यादी विषयांवर आत्मचिंतन करावे ! - सन्यस्तखड्ग प्रगो ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 08/18/2015 - 17:07 नवीन
काही का असेना यामुळे बर्याच आयचणीत पडलेल्यांना चमकोगिरी करायची संधी मिळाली.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 08/18/2015 - 17:22 नवीन
वरील प्रतिसाद योग्यच आहेत. पण या निमित्ताने अजून एक गोष्ट ध्यानात घेणे आवश्यक आहे. सारे डावे/ निधर्मी विचारवंत एक होऊन या पुरस्काराचा निषेध करत असताना बाबासाहेबांच्या बाजूने एकही प्रथितयश व्यक्ती उभी राहू नये याचे सखेद आश्चर्य वाटते. प्रसारमाध्यमे देखील या विषयाला नेगेटिव्ह प्रसिद्धी देत आहेत अशी माझी समजूत होऊ लागली आहे. तो देखील निधर्मी अजेंडा असावा. नाही म्हणायला लोकसत्ताने आज अग्रलेख लिहून या विषयाला थोडे फूटेज दिले. पण एकंदरीत प्रसारमाध्यमांची या विषयातील भूमिका संशयातीत नाही असे म्हणावयास शंका नसावी. दुसरा विषय असा की आता या विषयात सर्वसामान्य नागरिकांनीच पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या पुरस्काराचे समर्थन करावे का असा विचार सध्या करत आहे.. त्यानिमित्ताने काही ब्लॉग पोस्ट, निवेदने, सभा वगैरे घेऊन आपण बाबासाहेबांच्या सोबत आहोत असे सरकारला दाखवून द्यावे का असा विचार करू लागलो आहे.
  • Log in or register to post comments
त
तीरूपुत्र Tue, 08/18/2015 - 18:20 नवीन
टीका ह्या होत राहतील पण शिवशाहिरांनी पुरस्कार स्विकारावा.काहीतरी कारण काढून त्यांना पुरस्कार मिळायला नको म्हणून त्यांच्या वर टीका होत आहे.कारण काय ते त्यांनाच माहित .जे टीका करत आहेत त्यांनी शिवाजी महाराज बद्दल किती वाचन आणि लेखन केलं????
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Tue, 08/18/2015 - 19:22 नवीन
संभाजी ब्रिगडने या कारणावरून जो उच्छाद मांडला आहे तो निंदनीय आहे. जातीद्वेष उराशी बाळगून काही साध्य होत नाही. सर्वच ब्राह्मण समाजाला 'त्या' नजरेतून बघून चालणार नाही.ब्राह्मण समाजाचे राष्ट्रासाठीचे योगदान उल्लेखणीय आहे अर्थात इतरांचे नाही असे मी म्हणत नाही.पण आपण हिंदूच जर असे एकमेकांविषयी तिरस्काराची भावना बाळगणार असू तर मग भविष्य कठीण आहे, अर्थात काळाच्या ओघात आणि ग्लोबलायझेशनमुळे सर्व जातीपातींचं आवरण संपून जावं हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Tue, 08/18/2015 - 20:03 नवीन
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला त्रिपाठी आडनाव असलेला एक ब्राह्मण कवि हजर होता. हा मुळचा कानपूर जवळच्या गावाचा होता. त्याला भूषण हा किताब चित्रकुट च्या राजाने दिला होता. कविराज भूषण याने शिवाजी राजांची स्तुति करणारी बरीच कवने ब्रज भाषेत लिहिली आहेत. ही कवने महाराष्ट्रात ही लोकप्रिय आहेत ही पूर्वपीठीका असताना दुसऱ्या एका ब्राह्मणाने मराठी मध्ये महाराजांची स्तुति केल्याबद्दल त्याला भूषण असा किताब मिळत असेल तर ह्या दुसऱ्या भूषण पुरस्कारा विरुद्ध एवढा गदारोळ का ?
  • Log in or register to post comments
R
raudransh_27 Tue, 08/18/2015 - 20:14 नवीन
बार्हमण म्हणुन विरोध करतात’’ जातीची पोपटपंची करत आहेत. त्यांनी आधी खालील महाराष्ट्रभुषण प्राप्त व्यक्तींची यादी वाचावी. ● १९९६ - पु.ल.देशपांडे (साहित्य) ● १९९७ - लता मंगेशकर (कला,संगीत) ● १९९९ - विजय भटकर (विज्ञान) ● २००१ - सचिन तेंडुलकर (क्रीडा) ● २००२ - भीमसेन जोशी (कला,संगीत) ● २००३ - अभय व राणी बंग (आरोग्यसेवा) ● २००४ - बाबा आमटे (समाज सेवा) ● २००५ - रघुनाथ अनंत माशेलकर (विज्ञान) ● २००६ - रतन टाटा (उद्योग) ● २००७ - रा.कृ.पाटील (समाज सेवा) ● २००८ - नाना धर्माधिकारी (समाजसेवा) ● २००८ - मंगेश पाडगावकर (साहित्य) ● २००९ - सुलोचना लाटकर (कला,सिनेमा) ● २०१० - जयंत नारळीकर (विज्ञान) ● २०११ - अनिल काकोडकर (विज्ञान) वरील यादीमध्ये बहुतांश व्यक्ती ब्राह्मण असल्याचे दिसते. जर आमचा विरोध ब्राह्मणांना असता तर वरील लोकांच्या पुरस्कारालाही आम्ही विरोध केला नसता का ? मग पुरंदरेंनाच आमचा विरोध का ? ★ पुरंदरेंना विरोध असण्याची कारणे – ● पुरंदरेंनी ‛‛राजा शिवछत्रपती’’ आणि ‛‛लालमहाल’’ या कादंबरीतुन राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण केले. ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीतुन स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात स्वतःचे रक्त सांडणाऱ्या बारा मावळ आणि महाराष्ट्रातील सरदारांच्या आईबद्दल खुप भयानक व विकृत लिखाण केले. ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीत कुणबीणी म्हणजे कुणब्याची (शेतकऱ्याची) पत्नींविषयी खुप किळसवाणे व बदनामीजनक लिखाण केले. ● पुरंदरेंनी महाराष्ट्रात शिवजयंती तारीख-तिथी वाद सुरु करुन शिवप्रेमींमध्ये फुट पाडली. ● पुरंदरेंनी स्वतःच्या लिखाणातुन मानवतावादी, धर्मसहिष्णु छत्रपती शिवरायांची प्रतिमा गोब्राह्मणप्रतिपालक व मुस्लिमविरोधी एवढी संकुचित करुन छत्रपती शिवराय हे दंगलीचे प्रतिक म्हणुन उभे केले. हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा अवमान आहे. ● पुरंदरेंनी खोटा इतिहास लिहला. शहाजीराजे गैरहजर दाखविले. तुकोबांना अनुल्लेखाने दुर्लक्षित ठेवले. तसेच दादु कोंडदेव आणि रामदास स्वामी हे काल्पनिक गुरु शिवरायांच्या डोक्यावर बसवले. ● २००३ मधे आलेल्या जेम्स लेन लिखीत पुस्तकाची पार्श्वभुमी तयार करण्याचे, त्या पुस्तकाचे महाराष्ट्रात वितरण करण्याचे आणि त्या पुस्तकाचा प्रचार करण्याचे काम पुरंदरे आणि त्यांच्या पुरंदरे प्रकाशनने केले. ● राजघराण्यांतील व सरदारघराण्यांती ल अनेक ऐतिहासिक कागद,दस्तावेज, रुमाल,पत्रे,ताम्रपत्रे,शस्त्रे संशोधनाच्या नावाखाली नेऊन नष्ट करण्याचे काम पुरंदरेंनी केले. ● पुरंदरेंच्या पुस्तकावर,लिखाणावर १ कोटीचा दावा,खटला आणि ४-५ ठिकाणी फौजदारी गुन्हा व तक्रारी दाखल आहेत. ● पुरंदरे इतिहाससंशोधक नाहीत.त्यांचे लिखाण कुठेच संदर्भासाठी वापरले जात नाही.ते शाहीर नाहीत.त्यांनी एकही पोवाडा लिहलेला नाही.हे सगळे त्यांनी स्वतः कबुल केले आहे. यापुर्वी २००४ मध्ये पण त्यांना पुरस्काराची घोषणा झाली होती.परंतु त्यांच्या वादग्रस्त लिखाण व वागण्यामुळे त्यावेळी हा पुरस्कार रद्द झाला होता.मग आता हा पुरस्कार देण्यासाठी फडणवीस एवढी खटाटोप का करत आहेत ? हे व असेच अनेक आक्षेप पुरंदरेंवर आहेत.त्यामुळे पुरंदरे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना विरोध होतोय असले फुटकळ व बालीश अफवा पसरवणाऱ्या बाजारबुणग्यांनी पुरंदरेंवरील आरोप खोडुन दाखवावेत.ब.मो.पुरंदरे ही विकृती आहे आणि अशा विकृतीचा सन्मान करुन संस्कृतीचा अवमान करण्याला आमचा विरोध आहे. जय शिवराय.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 08/18/2015 - 22:12 नवीन
मराठा जहागीरदारांचा कावेबाजपणा पुर्वी होता तसाच आजही आहे. बहुजन समाजाच्या भरोशावर स्वराज्य निर्माण झालं. पण मराठे सरदार, मनसबदार झाले. भटांना दक्षीणा मिळाली. पण बहुजन समाज कायमच दुर्लक्षीत राहिला. जरा स्वातंत्र्य मिळाल्यावर बहुजनांनी काहि भलं करावं म्हटलं तर हे ब्रीगेडी आले बोकांडी बसुन राजकारणाची मलाई ओरपायला. त्यांना वाटते कि भटांना शिव्या दिल्या कि आपण झालोच बहुजनांचे तारणहार. त्याकाळी त्यांनी शिवाजीला मारायचा प्रयत्न केला ( विषाळगडाच्या पायथ्याशी कोण वेढा घालुन बसले होते आठवतय का? ) आज हे बहुजनांचं अस्तित्व मारायला निघाले आहेत ( सामान्य शेतकर्‍यांची पिळवणुक कोण करतय दिसतय का? ) पण आता त्यांचं पितळ उघडं पडलं आहे. जय बहुजन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: raudransh_27
प
पिलीयन रायडर Tue, 08/18/2015 - 23:14 नवीन
तुम्ही उत्तर देणार नाही (हे जे वर लिहीलय ते ही कॉपी पेस्टेड असल्याचाच भास होतोय कार्ण सगळं एकदा आधी चेपुवर वाचलय..) तरीही...
● पुरंदरेंनी ‛‛राजा शिवछत्रपती’’ आणि ‛‛लालमहाल’’ या कादंबरीतुन राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत अवमानकारक व संतापजनक लिखाण केले. ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीतुन स्वराज्य निर्मीतीच्या कार्यात स्वतःचे रक्त सांडणाऱ्या बारा मावळ आणि महाराष्ट्रातील सरदारांच्या आईबद्दल खुप भयानक व विकृत लिखाण केले. ● ‛‛राजा शिवछत्रपती’’ कादंबरीत कुणबीणी म्हणजे कुणब्याची (शेतकऱ्याची) पत्नींविषयी खुप किळसवाणे व बदनामीजनक लिखाण केले.
पुस्तकातले उतारे दाखवा. फोटो काढुन इथे डकवा. नुसतेच भडकाऊ शब्द वापरु नका.
● पुरंदरेंनी महाराष्ट्रात शिवजयंती तारीख-तिथी वाद सुरु करुन शिवप्रेमींमध्ये फुट पाडली.
पुरावा द्या.
● पुरंदरेंनी स्वतःच्या लिखाणातुन मानवतावादी, धर्मसहिष्णु छत्रपती शिवरायांची प्रतिमा गोब्राह्मणप्रतिपालक व मुस्लिमविरोधी एवढी संकुचित करुन छत्रपती शिवराय हे दंगलीचे प्रतिक म्हणुन उभे केले. हा शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा अवमान आहे.
पुन्हा एकदा, कोणत्या वाक्यांमधुन जे ज्ञान मिळाले?? सिद्ध करा.
● पुरंदरेंनी खोटा इतिहास लिहला. शहाजीराजे गैरहजर दाखविले. तुकोबांना अनुल्लेखाने दुर्लक्षित ठेवले. तसेच दादु कोंडदेव आणि रामदास स्वामी हे काल्पनिक गुरु शिवरायांच्या डोक्यावर बसवले.
तुम्हाला पटत नाही म्हणुन खोटं आणि पटलं तरच खरं असं नसतं. ● २००३ मधे आलेल्या जेम्स लेन लिखीत पुस्तकाची पार्श्वभुमी तयार करण्याचे, त्या पुस्तकाचे महाराष्ट्रात वितरण करण्याचे आणि त्या पुस्तकाचा प्रचार करण्याचे काम पुरंदरे आणि त्यांच्या पुरंदरे प्रकाशनने केले.
● राजघराण्यांतील व सरदारघराण्यांतील अनेक ऐतिहासिक कागद,दस्तावेज, रुमाल,पत्रे,ताम्रपत्रे,शस्त्रे संशोधनाच्या नावाखाली नेऊन नष्ट करण्याचे काम पुरंदरेंनी केले.
नष्ट केले???? पुरावे द्या.
● पुरंदरेंच्या पुस्तकावर,लिखाणावर १ कोटीचा दावा,खटला आणि ४-५ ठिकाणी फौजदारी गुन्हा व तक्रारी दाखल आहेत.
तुम्हीच केले असणार अजुन काय... कमालच झाली बिनडोकपणाची.. लक्षात घ्या तुम्ही फार गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामते तुमच्यावर नक्कीच अब्रुनुकसानीचा दावा पुरंदरे करु शकतात. विकृत काय.. किळसवाणे काय? समजतं का तुम्हाला की कुणाविषयी लिहीता आहात??? नाही आता तुम्ही मला पुरावे दाखवाच. मला बघायचंच आहे की आम्हाला का नाही कधी असली विकृत वर्णनं दिसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: raudransh_27
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा