Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवजयंती हायजँक ????

प
पगला गजोधर
Fri, 08/21/2015 - 09:44
🗣 175 प्रतिसाद
महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ? आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते. माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…
वर्गीकरण
इतिहास

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (175)
क
कपिलमुनी Fri, 08/21/2015 - 09:48 नवीन
वैयक्तिक मते
मग असू द्या ! बाकी सध्या मिपावर नमो- केजरी मागे पडून शिवाजी महाराज हा विषय सेलेबल झाला आहे हे नमूद करतो
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Fri, 08/21/2015 - 09:57 नवीन
'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?
मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला.>
याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 10:13 नवीन
'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?
शेतकर्यांचे भुषण
याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?
आहे ना जरूर महत्वाचा भाग आहे. पण ते important पार्ट आहे, Only पार्ट नाही . (म्हणजे (फक्त पातशाही नाश करणे ) तेवढंच नाही)
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.
हेही ध्यानात घ्यावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 11:11 नवीन
भिडस्त भारी । साबडा घरीं ॥ प्रिय मधुरी । भाषण करी ॥ मोठा विचारी । वर्चड करी ॥ झटून भारी । कल्याण करी ॥ आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥ लाडावरी । रागावे भारी ॥ - महात्मा फुले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ह
हेमंत लाटकर Mon, 08/24/2015 - 07:51 नवीन
१८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. हा उतारा संभाजी ब्रिगेडच्या लेखातून घेतलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
माहितगार Mon, 08/24/2015 - 08:16 नवीन
वेल प.ग.ंनी माहिती कुठून घेतली ते माहित नाही ते तेच सांगू शकतील. मराठी विश्वकोशात सत्यशोधक समाजातील लोखंडे, नारायण मेघाजी यांच्या दीनबंधूने (नियतकालिक) रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज उठविला अशी नोंद आहे असे दिसते. संदर्भ: मराठी विश्वकोशावरील लोखंडे, नारायण मेघाजी लेखाची चव्हाण, रा. ना. यांनी लिहिलेली नोंद २४ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनीटांनी जशी पाहिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 04:49 नवीन
हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते व महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
फ
फुलथ्रॉटल जिनियस Mon, 08/24/2015 - 08:34 नवीन
त्यांनी सत्य लिहिले आहे ,लाटकर.प्रतिवाद करता येत नाही म्हणुन ब्रिगेडी वगैरे विशेषंण लावने सोडुन द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
सुबोध खरे Fri, 08/21/2015 - 09:58 नवीन
जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला? श्री लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणी गणेशोत्सव हे उत्सव "सार्वजनीक" स्वरुपात सुरुवात केले असा इतिहास आम्ही शिकलो. याचा अर्थ हे दोन्ही उत्सव अगोदर सुद्धा चालू होतेच. लोकांमध्ये जागृती व्हावी लोकांन एकत्र आणावे आणी हे काम इंग्रज सरकारच्या डोळ्यात येणार नाही अशा तर्हेने व्हावे अशा सद्हेतूने लोकमान्य टिळकांनी दोन्ही उत्सव चालू केले असा इतिहास आम्ही शिकलो. जर ब्रिगेडी लोकांना इतिहासाचे पुनर्लेखन करायचे असेल आपल्या चश्म्याने तर त्याच्या सारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी नसावी. ते लोक किती खालची पातळी गाठू शकतात याचा विक्रम रोज मोडला जात आहे. आपला हेतू तो नसावा अशी अपेक्षा करतो.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 10:03 नवीन
"शिवजयंती कोणी सुरु केली ?" असा प्रश्न होता सर. "सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?" असा नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 11:07 नवीन
जयंतराव श्रीधर टिळक (टिळकांचे नातु) यानी “मी जयंत टिळक” नावाच पुस्तक लिहल व पदमगंधा प्रकाशनाने तो प्रकाशीत केला. या पुस्तकात जयंतरावनी लिहुन ठेवलय. “ माझ्या आजोबानी शिवजयंती पुढे आणली”.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
क
कहर Fri, 08/21/2015 - 12:54 नवीन
आधी प्रश्न नक्की ठरवा ना गजोधर भैय्या. शिवजयंती कोणी सुरु केली ? सार्वजनिक शिवजयंती कोणी सुरु केली ? शिवजयंती कोणी पुढे आणली ? गोंधळ आहे... नक्की कशाचे उत्तर हवय ? अवांतर: तुमचे नाव पाहिले कि राजू श्रीवास्तव चा गजोधर आठवतो. ह घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 13:50 नवीन
'शेतकऱ्यांच हित पाहणारा राजा' आणि अश्या राजाचे हे लोकहितकारी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाणाऱ्या शिवजयंती उत्सवांच हायज्याक कधी होऊन ते , लोकांसमोर 'कट्टर हिंदू राजा' अशी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाऊ लागला ? अवांतर: हो जवळपास तसाच आहे मी (मूर्ख, अल्पबुद्धी, येड्च्याप ( माझी मत पाहून लोकांनी मला बोल लावण्याआधी मी स्वतःला पगला म्हणून जाहीर केलंय ) ) फक्त तो गजोधर युपी बिहारी होता, मी मराठी आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कहर
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/21/2015 - 14:03 नवीन
म्हणजे नेमक काय? की फक्त कट्टर कट्टर करत ओरडत राहायचं? मुस्लिम राज्यकर्त्यांनी जशी पराजीतांच्या कत्तली केल्या किंवा गावे जाळली वा मंदिरे फोडली तसलं काही राजांनी केलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही इतिहासकारांनी तस काहीही लिहील नाही. मग हा अट्टाहास का? ती जयंती छत्रपतींची, जाणत्या राजांची ओळख व्हावी म्हणून फुल्यांनी सुरु केली. त्याच जयंती उत्सवास अन्यायाविरुद्ध आणि परकीय सत्तेविरुद्ध लढणारा राजा म्हणून जागृती व्हावी म्हणून टिळकांनी सुरु केली. ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 14:16 नवीन
ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.
किंवा शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/21/2015 - 14:37 नवीन
शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही. >> प्रजेचे हित जाणणारा - जाणता राजा … म्हणजे तेच नव्हे का? की तुम्हाला फक्त शेतकरीच म्हणायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
क
काळा पहाड Sat, 08/22/2015 - 14:11 नवीन
(१) काही काही ब्राम्हण शेतकरी असतात (२) सगळेच शेतकरी मराठा नसतात आणि (३) ब्राम्हण शेतकर्‍यांना पाण्यात पहात नाहीत - हे गजोधर साहेबांना सांगायला हवं. प्रतिमा पुसट करण्यासाठी यातलं काही तरी खरं नसायला हवं. महाराज ब्राम्हण सोडून सगळ्यांचे राजे होते आणि ब्राम्हणांनी काहीतरी कट करून त्यांना हिंदूंचा राजा 'बनवलं' हेच जर म्हणणं असेल तर तसं करण्यासाठी इतिहासात राजांची कमी होती काय? पहिला बाजीराव चालला नसता का? बाकी २०० वर्षं शेतकरी काय करत होते म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
प
पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 09:23 नवीन
'लोकवाङमय गृह' प्रकाशनाचे आहे. त्यातील ओळी
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 04:43 नवीन
शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
सुबोध खरे Fri, 02/19/2016 - 05:08 नवीन
मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते? आम्ही तर असे वाचले होते कि ते सर्व प्रजेचे राजे होते. शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी? (वादासाठी गोब्राम्हण प्रतिपालक सोडून द्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 05:40 नवीन
शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी?
'शेतकर्यांचा राजा' यामधे तुम्हाला जात कुठे दिसली.
मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?
'शेतकर्यांचा राजा' म्हणजे, 'बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?' असा जावईशोध आपण कशाच्या बळावर लावला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Fri, 02/19/2016 - 07:50 नवीन
मग "रयतेचा राजा" असे का म्हणू नये? फक्त "शेतकर्यांचा राजा" म्हटले तर बाकीच्या लोकांतल्या काही हलक्या मनांच्या लोकांना का दुखवावे? उग्गीच्च?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 10:21 नवीन
म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते.
किती बिनबुडाचे फेकायचे याला लिमिट पाहिजे. राजाराम छत्रपती वारले १७०० साली. त्यानंतर त्यांच्या समाधीचा उत्सव सुरू असल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराजांच्या समाधीचाही उत्सव नक्कीच साजरा होत असला पाहिजे, किमान १८१८ पर्यंत- जेव्हा इंग्रजांच्या स्वाधीन गड करावा लागला तेव्हा. आणि रोचक गोष्ट म्हणजे रायगडाचा शेवटचा किल्लेदार होता शेख अबुद नामक मुसलमान. ते एक असो, १८६०-७० च्या सुमारास सातारच्या कुणी भोसल्याने तिथे जाऊन खजिन्याच्या आशेने कुदळ मारली असा उल्लेख गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत आहे. ज्यांना ही सातारच्या गादीची बदनामी वाटते किंवा अजून काही, त्यांनी दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकावर बंदीची मागणी करावी आणि गोनीदांबद्दल टिपिकल पातळी सोडून लेख लिहावेत अशी विनंती आहे. त्यामुळे फुल्यांपर्यंत या समाधीची कुणालाही माहिती नव्हती हे विधान अतिशय निराधार आहे. दुर्गभ्रमणगाथेतले अजूनही काही उल्लेख बघावेत. कुणी सिंक्लेअर नामक इंग्रज अधिकारी तिथे जाऊन आला आणि त्याने समाधी पाहिली आणि इतक्या महान राजाच्या समाधीकडे असे दुर्लक्ष केल्याबद्दल लै श्या घातल्या, थोडी डागडुजी वगैरे केली कदाचित. नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली. फुल्यांचा उल्लेख मी वाचला होता पण नक्की कुठल्या पुस्तकात ते विसरून गेलो. तस्मात पगला गजोधर यांनी पुस्तकाचे नाव सांगावे अशी विनंती.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 08/21/2015 - 10:30 नवीन
ओ तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नाहीये ना म्हणुन तुम्ही असे स्पष्ट बोलु शकता पण ज्यां बिचार्‍यांन्ना निवडणुक लढवायची आहे त्यांच्या हातातुन मुद्दे असे का बरे हिसकावुन घेता ? -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 10:35 नवीन
हा हा हा =)) बिच्चारे उमेदवार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/21/2015 - 20:03 नवीन
नायतर काय ? राज्कारणात राज्कारण करायचं असतं. राज्कारणात खरं बोलायचं काम नाय वो गोथामकर ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Tue, 08/25/2015 - 08:01 नवीन
बॅट्याचे म्हणून कुणी अपहरण करीत नाही. खंडणीपेक्षा त्याला सांभाळायचा त्रास मोठा आणि

ठेऊन घ्या तुमच्याकडेच त्याचे पैसे देतो

(पाहीजे तर) असे म्हणतात हे लोक !!! खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
माहितगार Fri, 08/21/2015 - 10:48 नवीन
हा सिंक्लेअर कोणता असेल ? एक दोन गूगलात शोधणे अवघड गेले. सिंक्लेअर चे रोमन लेखन Sinclair असेल तर बहुधा ते स्कॉटीश क्लॅन आणि आडनाव दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 10:52 नवीन
स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात अनेक स्कॉटिश लोक भारतात आले होते. पण नक्की कोण, कुठला हे माहिती नाही. बहुधा जिल्ह्याच्या गॅझेटिअरवरून गोनीदांनी ही माहिती घेतली असावी असे वाटते, ते चेकवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 08/21/2015 - 11:11 नवीन
हम्म आपण म्हणता तसे कदाचित गॅझेटीयर मध्ये माहिती मिळणे सोपे जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 10:55 नवीन
१. 'हर्मिस प्रकाशना'ने प्रकाशित केलेले 'कुळवाडीभूषण शिवराय' हे पुस्तक २. महात्मा जोतीरावांचे समग्र साहित्य : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९), बाकीचे दुवे शोधायाला थोड जड जातंय पण मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर Fri, 08/21/2015 - 11:04 नवीन
सर्वप्रथम महात्मा फुलेंनी १८६९ साली शिवजयंती साजरी केली होती व त्याची नोंद ब्रिटीशकालीन पोलिसांच्या कार्यलयात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 11:11 नवीन
धन्यवाद. बाकी २०० वर्षांत शिवरायांची कुणालाही आठवण उरलेली नव्हती हा दावा फोल आहे हे सिद्ध झालेले आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ध
धडपड्या Fri, 08/21/2015 - 15:18 नवीन
आपण आवळस्करांचे, "रायगडाची जीवनकथा" हे पुस्तक वाचले आहे का? यात फुल्यांचा कोठेही उल्लेख नाही.. त्यांच्या अभ्यासानुसार, १८८३ मध्ये एक ब्रिटिश महिला पहिल्यांदा तेथे गेली... १८८५ मध्ये मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यु कमिश्नर क्रॅाफर्ड, कॅप्टन पीट वगैरे मंडळी तेथे गेली. तेव्हा टेंपलने समाधीच्या दुरुस्तीच्या सुचना दिल्या, व कुलाब्याच्या कलेक्टर ला पत्र लिहीले असा उल्लेख आवळस्कर करतात.. १८८७ मध्ये कोणी लॅार्ड रे ने समाधिसाठी दरसाल ५ रु सरकारी मदत मिळवून दिली.. त्यानंतर एकदम १९९५ मध्ये टिळकांनी अग्रलेख, सभा वगैरेंना सुरुवात केली.. या नंतच्या घडामोडींमध्येही फुल्यांचा कोठेच उल्लेख नाही.. माझ्यामते फुले हे काही एवढे दुर्लक्षणीय नक्किच नव्हते, की त्यांच्या भेटीचा कोणत्याच प्रकारचा उल्लेख सापडणार नाही, किंवा असा उल्लेख दडवून कोणाला कोणताच लाभही नसावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
अ
अस्वस्थामा Fri, 08/21/2015 - 11:28 नवीन
बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक सिरीज सुरु भाउ.. कारण अशा खूप सार्‍या गोष्टी आहेत की त्या पूर्वी वर्तमानपत्रात वगैरे लिहून आल्यात, पुस्तकात छापून आल्यात म्हणून लोकांनी विश्वास ठेवून, सांगून वगैरे आता प्रस्थापित झाल्यात. जर अशा गोष्टींना आताच नवीन माध्यमात तरी स्पष्ट केले नाही तर त्या तशाच प्रस्थापित म्हणून सुरु राहतील. त्यावर ज्याला जे माहित असेल ते त्यावर सांगतील आणि तुझे चूक असेल तर दुरुस्त करता येईल अथवा इतरांना त्यांचे फॅ़क्ट्स पण सुधारता येतील. (हा कळकळीचा आणि शिरेस सल्ला आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 11:45 नवीन
सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे काम केलेले आहे. एक उत्तम ब्लॉग खालीलप्रमाणे. www.kaustubhkasture.in
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
अ
अस्वस्थामा Fri, 08/21/2015 - 15:21 नवीन
तुझाच है कय हा "ब्लोग" ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 08/21/2015 - 16:17 नवीन
नाय बा. तो मी न्हवेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
व
विकास Fri, 08/21/2015 - 16:25 नवीन
खूपच छान आहे हा ब्लॉग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Sat, 08/22/2015 - 09:20 नवीन
अनेक धन्यवाद.छान ब्लाॅग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 13:59 नवीन
बॅटमॅन तुम्ही सुचविलेला ब्लाॅग www.kaustubhkasture.in छान वाटला. यातील शनिवाड्यावरील माहिती छान वाटली. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 14:57 नवीन
अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
प
प्यारे१ Sat, 08/22/2015 - 15:06 नवीन
हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके साथ है! ह्या लोकांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही. हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 16:30 नवीन
आघी आगे बढो म्हणायचे आणि वेऴ आली की मागच्या मागे पळायचे. ha! ha!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sat, 08/22/2015 - 16:46 नवीन
बस्स क्या बावा....? आप आगे तो बढो. आप इधरीच झगडा कर्ते बैठे बोले तो आगे कैसे और कब बढोगे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 19:05 नवीन
एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही. अजून तो विषय संपलेला नाही, त्यावर विचार चालु आहे, हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याचा अर्थ काय आहे, कोणाला उद्दशूम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पैसा Sat, 08/22/2015 - 16:25 नवीन
नीट वाचत जा! अस्वस्थामा आहे तो, अश्वत्थामा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 16:40 नवीन
अहो दादा dusyodhankivyatha.blogspot.com/2010 ब्लाॅग वाचा आणि सांगा अस्वस्थामा व अस्वत्थामा नाव एक आहे का वेगवेगळे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 08/22/2015 - 16:54 नवीन
हसून मेले! मी महाभारत वाचते. तुम्ही पण इकडचे तिकडे वाचण्यापेक्षा तेच वाचत जावा प्लीज! आणि तो ब्लॉग बघितला. त्याने अस्वथामा असे तिसरेच आणि तेही चुकीचे लिहिले आहे. तशाही त्या ब्लॉगवरच्या शुद्धलेखनाच्या चुका बघून जास्त काही वाचायचं धाडस झालं नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Sat, 08/22/2015 - 17:56 नवीन
ताई मी गुगलवर चेक केले अस्वस्थामा, अस्वथामा आणि अस्वत्थामा हे तिन्ही नावे महाभारतातील द्राेणाचार्य पुत्र अस्वत्थामासाठीच वापरला आहे. ज्याने द्रोपदीच्या 5 ही पुत्रांचा झोपेत वध केला. हा ब्लाॅग वाचा. indianthefriendofnation.blogspot.com/..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा