Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"

S
shawshanky
Tue, 09/08/2015 - 13:20
🗣 129 प्रतिसाद
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत मटनावरील बंदी ही मूर्खपणाची, निरुपयोगी आहे का? मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर बंधने का? भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र सरकार विविधतेवर बंदी घालत आहे. अच्छे दिन हे आहेत का ?

प्रतिक्रिया द्या
19118 वाचन

💬 प्रतिसाद (129)
ब
बाबा योगिराज Tue, 09/08/2015 - 13:42 नवीन
मायला असल काही खर असेल तर रमजानच्या काळात दिवसभर उपाशी रहाव लागल नाही म्हंजे मिळवली......... . . . . . अवांतरः- मी पयला फ्यासन गेली की काय???
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव Tue, 09/08/2015 - 14:22 नवीन
रमजानच्या काळात दिवसभर उपाशी रहाव लागल नाही म्हंजे मिळवली.. आयला, पॉइंट आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
र
रमेश आठवले Tue, 09/08/2015 - 17:16 नवीन
रमझानच्या काळात एकदा कुवैत ला जाणे झाले होते. तिथे दिवसाच्या काळात बाजारात किंवा ऑफिस मध्ये किंवा इतर कुठेही काही ही खायला प्यायला मिळत नसे.. माझा मुक्काम पंच तारांकित हॉटेल मध्ये असल्याने माझी पोटपूजा फक्त तेथे होऊ शकत होती . रोझा चा उपवास सोडताना सर्व मुस्लिम बांधव हमखास मांसाहार करतांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
प
प्यारे१ Tue, 09/08/2015 - 17:31 नवीन
अनुभवः मुस्लिम लोक उपवास सोडताना खजुर खाऊन आणि पाणी पिऊन उपास सोडतात. नंतर फळं. त्यानंतर लगेच मांसाहार करत नाहीत. नमाज पढून आल्यावर जेवण करतात. त्यात मांसाहार शक्यतो असतो. दिवसभर अन्न पाणी काहीही नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Tue, 09/08/2015 - 21:48 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे निदान हैदराबाद मध्ये तरी रोजा चा उपवास सम्पल्यावर हालिम नावाचा मटनाचा प्रकार जेवणात असतो. गव्हाचा जाडा रवा आणि मटन दिवसभर एकत्र शिजवून हा पदार्थ बनवतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सुनील Wed, 09/09/2015 - 05:52 नवीन
हलीम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
स
सुनील Wed, 09/09/2015 - 05:53 नवीन
http://misalpav.com/node/3272
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/08/2015 - 13:55 नवीन
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? >> मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 09/08/2015 - 14:06 नवीन
+१ ड्राय डे सुद्धा बंद व्हायला हवेत. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ला ड्राय डे ठेवून नेमकं काय मिळतं कुणास ठाऊक. आधीच्या दिवसात कधीही 'स्टॉक' मिळतो च की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/08/2015 - 14:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
S
shawshanky Tue, 09/08/2015 - 14:33 नवीन
अहो इथ शोधून देव सापडतो "स्टॉक" काय चीज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बाबा योगिराज Tue, 09/08/2015 - 14:53 नवीन
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? >> मी काय प्यावे ह्यावर सरकार नियंत्रण ठेवते तर काय खावे ह्यावरदेखील सरकार नियंत्रण ठेवू शकते :) प्रतिसाद द्या मि काहिही खाल्यावर / पिल्यावर .... किती आणि कसा पो टाकावा यावर पन सर्कार नियंत्रण ठुनार का??? . . . . कन्फुज्ड बाबा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 09/09/2015 - 11:00 नवीन
कुठ टाकावं ह्यावर नियंत्रण हाय की …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
ब
बाबा योगिराज Wed, 09/09/2015 - 13:16 नवीन
ते बी खरच हाये म्हना.... . . . . सहमत असलेला बाबा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 14:18 नवीन
तद्दन मूर्खपणा आहे. अगोदरच्या काळातही जैनांची असली दहशत पहावयास मिळालेली आहे. व्हेजिटेर्यन लोक सात्त्विक का कायतर असतात असे समजायचे लोक अगोदर, असला शाकाहारी दहशतवाद पाहून ती उरलीसुरली समजूतही धुळीला मिळाली.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/08/2015 - 14:21 नवीन
बॅटमॅनभो चुकीची समजूत! हिटलर शाकाहारी का काय ते होता म्हणे :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
असंका Tue, 09/08/2015 - 14:38 नवीन
हिटलर शाकाहारी का काय ते होता म्हणे वॉट्स अ‍ॅप / सोशल मिडीया ग्यान ना? वॉट्स अ‍ॅप वर येणारी प्रत्येकच गोष्ट खोटी असते असं वाटायला लागलंय आज काल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/08/2015 - 14:41 नवीन
लहानपणी राजीव दिक्षितच्या जबरदस्ती ऐकाव्या लागेल्या कैसेटीत ऐकल्याचे आठवते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 18:23 नवीन
नै नै. हिटलर नंतर नंतर खरेच शाकाहारी झाला होता. तो आणि त्याचे क्लोज असलेले नाझी अधिकारी यांच्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे त्यांपैकी अनेकांना माणसे मारताना काही वाटत नसले तरी प्राण्यांच्या हालअपेष्टा आवडत नसल्याने कैकजण व्हेज होते. कंबोडिया देशातला क्रूरकर्मा पोल पॉट हाही शुद्ध शाकाहारी होता. त्यानेही लाखो लोक मारले. तेव्हापासून शाकाहाराच्या सात्त्विकतेचे कौतुक सांगणार्‍यांना "हो का, बरं बरं, हिटलरही शाकाहारी होता" असे सांगावे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
फ
फुलथ्रॉटल जिनियस Tue, 09/08/2015 - 14:23 नवीन
ब्याटम्याना, हिंदूंनी बिफला घातलेल्या बंदीला तुझा पाठिंबा असेलच!!!! जैनांना शिव्या टाकायच्या आणि मुस्लिम बांधवांना बीफ खाण्यापासून रोखायच, हि दुटप्पी भूमिका कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
श
शलभ Tue, 09/08/2015 - 14:51 नवीन
माईंच्या स्टाईल मधे फुलथ्रॉटल जिनियस..;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 18:20 नवीन
बीफबंदीला माझा पाठिंबा नाही. बायदवे फक्त मुसलमानच नव्हे तर केरळ-तमिळनाडूतील काही हिंदू जातीही पारंपरिकरीत्या बीफ खातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/09/2015 - 08:43 नवीन
बालीमधले हिंदू पण सर्रास गोमांस खातात. सणासुदीला खास मांसासाठी पोसलेल्या गुरांची विक्री होते. गोमांस फक्त पुजारी लोकांसाठीच निषिद्ध समजले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 09/09/2015 - 09:27 नवीन
नवीन माहितीकरिता धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सटक Tue, 09/08/2015 - 21:47 नवीन
एक उगीच माहितीचा दाणा टाकतो! ग्लॅडिएटर्स जे योद्धे म्हणून गणले जात असत त्यांचे खाणे जवळ जवळ पूर्णतः शाकाहारी असल्याचा ताजा ताजा शोध लागला आहे...अर्थात कारणे थोडी वेगळी आणि विचित्र आहेत म्हणा, पण शाकाहाराच्या सात्विकतेला अगदीच बट्टा लावला आहे बुआ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 09/08/2015 - 23:53 नवीन
रोमन आर्मीच्या आहारातही एकूण मांसाहाराचे प्रमाण तसे कमीच होते. इतके असूनही पूर्ण मांसाहारी असलेल्या अनेक टोळ्यांवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सटक
प
प्रदीप Tue, 09/08/2015 - 14:44 नवीन
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता का ? होय. निरनिराळ्या पंथाचे, धर्माचे, रीतिरिवाजाचे लोक, निरनिराळ्या गोष्टी खातात. उदा. कुत्रे, मांजरे, वाघाच्या लिंगापासून बनविलेले काही पदार्थ वगैरे. परदेशात (काही देशांत, जिथे असे भक्षणा करणारे लोक असू शकतात, तिथे) ह्यातील अनेक गोष्टी खाण्यावर कायद्याने बंदी आहे. उद्या भारतातही ह्यांतील काही कुणी खायचे ठरवले, तर ते अवैध ठरावे?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Tue, 09/08/2015 - 14:48 नवीन
आपला तुमच्या ह्या हि आयडि ला पाठींबा सिंथेटिक कद्रुस दरेकर चा फॅन होबासराव
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 09/08/2015 - 14:52 नवीन
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/08/2015 - 14:55 नवीन
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का? बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही). उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत. यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 09/08/2015 - 15:00 नवीन
हे तुणतुणं गेलं का 'अच्छे दिन' वर! ही बातमी वाचा. त्यावरची तारीख वाचा. www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayander-civic-body-bans-meat-sale-on-september-1-too-1581097 आणि हेही वाचा. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 09/08/2015 - 15:06 नवीन
हा हा हा..................... काय राव ! लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रदीप Tue, 09/08/2015 - 15:50 नवीन
लेखकाच्या तोंडून चांगला व्दिशतकी धागा ओढून काढलात !!! असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 09/09/2015 - 08:44 नवीन
मिपा हे तुमचे आमचे सगळ्यांचेच प्रतिबिंब आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
व
विकास Wed, 09/09/2015 - 16:57 नवीन
असे येथे कुणीही, कुणाच्याही तोंडातील काहीही ओढून घेऊ शकते का? तसे असल्यास मिपाकरांचा णिशेद! आता जर लोकांच्या तोंडचे अन्न देखील ओढण्यात महाराष्ट्र अग्रेसर होत असेल तर एक धागा काय, किस झाड की पत्ती! ;) (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/08/2015 - 15:14 नवीन
आता लिंक व्हिजीट केले! तिथे २००४ चा उल्लेख काढून टाकलाय. द्वाड आहे मीडिया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
न
नाव आडनाव Tue, 09/08/2015 - 17:52 नवीन
ही डीएनए मधलीच पण नंतरची बातमी आहे (तुम्ही दिलेली ३० ऑगस्ट ची आहे आणि ही ६ सप्टेंबरची ) http://www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayandar-civic-body-bans-sale-of-meat-during-jain-fasting-period-2122551 एनडीटीवी च्या बातमीत (सप्टेंबर ७, २०१५ ) पण आठ दिवस बॅन आहे असंच दिलंय http://www.ndtv.com/india-news/after-beef-ban-no-meat-for-8-days-in-district-near-mumbai-1215115 अजून काही बातम्या सुध्धा ह्याच वर्षिच्या आणि ८ दिवसाच्या आहेतः http://www.eenaduindia.com/Maharashtra/OthersInMaharashtra/2015/09/06170047/MiraBhayandar-civic-body-bans-sale-of-meat-during.vpf http://www.mid-day.com/videos/mbmc-mayor-justifies-ban-on-meat-sale-during-jain-fast/683960
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
आ
आनन्दा Fri, 09/11/2015 - 06:37 नवीन
तुम्हाला अर्थ कळलेला नाही असे दिसतेय. असो. जरा त्या इमेज मधली तारीख परत पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाव आडनाव Fri, 09/11/2015 - 07:14 नवीन
लिंक मधे (आणि इमेज मधे सुध्धा) मांस विक्री दोन दिवस ( / तीन दिवस) बंद राहणार असं होतं. म्हणून मी त्या लिंक दिल्या होत्या - ज्यात मांस विक्री या वर्षि आठ दिवस बंद आहे असं लिहिलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ह
होबासराव Tue, 09/08/2015 - 15:06 नवीन
अहो कद्रुस मिया द रेकर उर्फ सिंथेटिक जिनियस आणखि काय काडि टाकणार
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 09/08/2015 - 15:07 नवीन
त्यानी फक्त कत्तलखाने बंद ठेवायचं म्हंटलं आहे. मांसाहार वर्ज्य असं म्हंटलेलं नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/08/2015 - 15:13 नवीन
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,निरुपयोगी आहे का?
शांक्या,मीरा भायंदरच्या महापौर गीता भरत जैन(भाजपा) आहेत. Image removed. ज्यांना मटन खायचे आहे त्यांनी दहिसर,विरारला जाउन मटन विकत घ्यावे असे ह्यांचे म्हणणे.
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Tue, 09/08/2015 - 15:16 नवीन
हे वाचा अनुप ढेरे ह्यान्च्या लिंकेत्लं---- When asked about the needs of Mira-Bhayander’s non-vegetarians, Kumar said that the ban is only for a day at a time. “Meat shops are closed only for a day. So people have the option of buying meat a day earlier,” said Kumar.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 09/08/2015 - 15:34 नवीन
खरे आहे रे संजय.पण प्रश्न एक दिवसाचा नसून व्यक्तीस्वातंत्र्याचा व काही गट जे दादागिरी करतात त्याचा आहे. रमझानच्या महिन्यात 'मीरा-भायंदरमधील लोकांनी एक दिवस उपाशी रहावे' अशी मागणी झाली तर जैन समाज पाठिंबा देणार की "स्वातंत्र्याची गळचेपी झाली हो..."म्हणत न्यायालयात धाव घेणार? असा ह्यांचा सवाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
प
पीके Tue, 09/08/2015 - 18:06 नवीन
व्यक्ती स्वातंत्र्य म्हण्जे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बोका-ए-आझम Tue, 09/08/2015 - 15:23 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/08/2015 - 16:01 नवीन
शाकाहारी दहशतवाद
मी कोणत्याही प्रकारे मांसाहाराचा निषेध अन शाकाहाराचे समर्थन करत नाही , मात्र तरीही सदर धागा आणि इंटरनेट्वरील विचारवंतांची मते पाहुन खालील विचार मनात आहे १) सेक्युलर देश म्हणजे नक्की काय ? बहुसंख्यांची मनमानी चालते तो देश असा काहीसा अर्थ आहे काय ? २) फाळणी नंतर भारत पाकिस्तान दोन देश झाले , पाकिस्तानात , बांग्लादेशात पोर्क मिळते का ? स्वतःच्या धर्माचे आचरण करण्यासाठी त्या लोकांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला मग हिंदु जैन बौध्द शीख लोकांन्नी आपल्या अहिंसेला धरुन सेक्युलर देश कल्पना उचलुन धरली ही त्यांची चुक झाली काय ? ३) जैनांना फाळणी करुन ( इवलासा का होईना ) पण स्वतंत्र देश मिळाला असता तर त्यांना आनंदाने त्यांचे निर्णय राबवता आले असते ना ? ४) भारत देश सेक्युलर असल्याचा कोणत्या धर्माच्या लोकांन्ना सर्वात जास्त फायदा होत आहे ? कोणत्या धर्माच्या लोकांचे नुकसान होत आहे ? ५) जैनांच्या भावनांचा आदर कसा राखला जाईल ? की त्यांनी पारशी धर्माप्रमाणे नामशेष होवुन जाणे अपेक्षित आहे ? बरं पारश्यांच्या अग्यारीत अपारशी लोकांना जाण्यास बंदी असते त्या विरुध्द हे विचारवंत काही का बोलत नाहीत ? सेक्युलॅरिझम च्या नावाखाली , ज्यांनी खर्‍या अर्थाने सेक्युलॅरिझम चा शोध लावला त्या आमच्या भारतीय धर्मांनाच का बरे चेपले जाते ? ६) व्यक्तीस्वातंत्र्याच्या आडुन ह्या मांस बंदीवर टीका करणारे लोक इतर नॉनसेन्स बंद्यांच्या विरोधात आवाज उठवणार का ? ( बाकी सोडा पण १५ ऑगस्टला आमचा जन्मदिवस असतो हो , ते ड्रायडे ची बंदी काढता आली तर बरें होईल =)) ) आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ७) जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ?
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Tue, 09/08/2015 - 16:10 नवीन
बाकी
जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ?
आयसीसच्या वादळाला तोंड द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. आणी त्यामार्फतच तोंड दिले जावे ही अपेक्षाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 09/08/2015 - 16:19 नवीन
आयसीसच्या वादळाला तोंड द्यायला भारतीय लष्कर सक्षम आहे. आणी त्यामार्फतच तोंड दिले जावे ही अपेक्षाही.
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! आयसीस चे युध्द भारताविरुध्द नाही हे ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल तोच सुदीन ! तोवर हॅप्पी ड्रीमींग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Tue, 09/08/2015 - 16:20 नवीन
आयसीसला उत्तर भारतीय लष्करानेच द्यायचे आणी त्यानेच दिले पाहिजे हे ज्या दिवशी लक्षात येइल तो समस्त भारतियांसाठी सुदीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा