"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात
कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर
नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करण्यात येत आहे.
माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,
निरुपयोगी आहे का?
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व
समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर
बंधने का?
भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र
सरकार विविधतेवर बंदी घालत आहे.
अच्छे दिन हे आहेत का ?
💬 प्रतिसाद
(129)
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 15:00
नवीन
प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. बाकी ज्याला जे रुचेल आणि पचेल ते त्याने खावे. सक्ती नसावी.
पृथ्वीवरील सर्वात मोठे तीन प्राणी हे पूर्ण शाकाहारी आहेत. हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो
पहा
http://www.healthaliciousness.com/articles/foods-highest-in-protein.php
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 09/09/2015 - 15:47
नवीन
नाही मुख्य मुद्दा हा आहे की मांसाआहार पोटात गेल्याने नेमकी अशी कोणती (विज्ञानाच्या निकषांवर स्विकार्य) क्रिया होते की ज्याने तामसवृत्ती वाढावी ?
एनी वे आपण विषयातले जाणकार आहात म्हणून कुतूहल म्हणून दाळी कडधान्ये न खाणार्या शाकाहारी प्राण्यांची प्रोटीन्सची गरज कशी भागवली जाते ?
त्यांना खाता येणार्या गोष्टी माणसांना खाता आल्यातर दोन गोष्टी होतील १) वाढत्या लोकसंख्येच्या आहाराचा खास करून शाकाहारी वर्गातील माणसांपुढचा मोठाच प्रश्न सुटू शकेल २) हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो यांच्या आहारावर माणसाने आक्रमण केल्यास त्यांच्या उरल्या सुरल्या अस्तीत्वाचा प्रश्न अधिक गंभीर बनेल :) (ह. घ्या.)
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Wed, 09/09/2015 - 15:59
नवीन
पृथ्वीवरील सर्वात मोठे तीन प्राणी हे पूर्ण शाकाहारी
आहेत. हत्ती, गेंडा आणि रान रेडा किंवा हिप्पो
पहा>>>>>>>> डॉक्टर, कशाला बुद्धीभेद करत आहात? , पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी ब्लू व्हेल हा आहे, आणि तो फक्त मांसाहार करतो, क्रिल हा झिंग्यासारखा प्राणि त्याचा मुख्य आहार आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/09/2015 - 17:15
नवीन
मासे आणि प्राणी ह्यामधला फरक जरा अभ्यासणार काय? सायंशिक्षा वर्ग पॉनसर करतो हवं तर.
- Log in or register to post comments
D
dadadarekar
गुरुवार, 09/10/2015 - 10:47
नवीन
मासे हे प्राणी आहेत.
सजीवाम्चे दोन मुख्य प्रकार आहेत.
प्लेंट किंग्डम
अॅणिमल किंग्डम
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 09/09/2015 - 16:11
नवीन
डॉक्टर यावरुन एक प्रसंग आठवला,
माझ्या आईची शस्त्रक्रिया (लिझारोव फिक्सेटर) झाल्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर (रानडे) म्हणाले : प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. त्या डॉक्टरांकडे नंतर फॉलोअपसाठी जाणे शक्य नव्हते म्हणुन त्यांनी आमच्या जवळचे दुसरे डॉक्टर (पाटील) सुचवले. पहिल्याच भेटीत त्यांनी आईला विचारले: काय चिकन, मटण खाता की नाही? खात जावा.
सांगायचा उद्देश बर्याच माणसांना आपण शाकाहारी / मांसाहारी असलो की बाकीचे पण शाकाहारी / मांसाहारी असावे असे वाटते
(आईसाठी प्रोटीनपॅक्ड खेकडे आणणारा) सौंदाळा
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 16:54
नवीन
सौंदाळा साहेब,
माझी एक रुग्ण जिला चिकन जीव कि प्राण होतं. तिने आपले वडील गेल्यावर त्यांची आठवण म्हणून चिकन (मटण, मासे सगळं सामिष) सोडलं. वडिलांच्या जाण्याने तिची प्रकृती फारच खराब झाली होती अशा स्त्रीला दुसरे चागले निरामिष पर्याय सुचवणे हे डॉक्टर म्हणून तुमचे कर्तव्य असते. मुंबईत बरेच जैन रुग्ण पण येतात.
तिसरी गोष्ट म्हणजे गरीब रुग्ण-- ज्यांना बाजरी २२ % प्रोटीन आणि कडधान्ये(२०-४५% प्रोटीन) परवडू शकतात फारतर अंडे. अशा रुग्णांना आपण चिकन खा ( १४० रुपये किलो) (मटण तर ४००-४५० रुपये आहे) कोणत्या तोंडाने सांगायचे.
एक आठवण -- पुण्याला असताना एक गरीब मजूर स्त्री जिचा मुलगा कुपोषणाची शिकार होता. त्या स्त्रीचा नवरा दारू पित असे. घरात मुलासाठी चिकन केले तर हाच एकटा हादडत असे.( केले नाही तर बायकोला मारत असे). अशा स्त्रीला आमच्या सरांनी बाजरीची भाकरी, मटकी / मुगाची उसळ आणि गूळ ( लोह मिळण्यासाठी) खायला सांगितले होते आणि सकाळी एक अंडे उकडून( जेंव्हा नवरा झोपलेला असे). मुलगा दोन महिन्यात बराच सुधारला होता.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 17:02
नवीन
१०० +
बाजरीत ११ % प्रोटीन असते २२% नव्हे
चुकी बद्दल क्षमस्व
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/09/2015 - 17:03
नवीन
२ भाकरी खाल्ल्या तर ;)
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 09/10/2015 - 07:06
नवीन
सहमत आहे डॉक
मलाही बाकी लोक शाकाहारी / मांसाहारी कसेही असा काही फरक पडत नाही.
पण अजुन एक म्हणजे घरात सगळे कट्टर मांसाहारी असुन छोटा मुलगा / मुलगी मांसाहार करत नाही (आवडत नाही) म्हणुन दु:खी झालेल्या आई-बाबांची मनस्थिती मांसाहारीच जाणोत. ;)
बाकी या धाग्याबद्दल म्हणाल तर बीफ, चिकन, मटण, मासे हा पकडणार्याचा, कापणार्याचा, विकणार्याचा आणि खाणार्याचा राजीखुषीचा सौदा असतो. ईतर लोकांचा यात संबंध यायचे काहीच कारण नाही. फक्त हे मांस विकायच्या जागांची ठिकाणे आणि तिथली स्वच्छता हा कळीचा मुद्दा आहे.
घरच्या मांसाहारासाठी २०-सप्टेंबरची आतुरतेने वाट बघणारा - सौंदाळा
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 09/09/2015 - 16:07
नवीन
प्रोटीन साठी मांसाहार करायची गरज अजिबात नाही. बाकी ज्याला जे रुचेल आणि पचेल ते त्याने खावे. सक्ती नसावी.
फु़जि उर्फ सिंथेटिक जिनियस्..डॉक ह्यांच वाक्य आपण पुन्हा एकदा वाचावे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 16:31
नवीन
डॉक्टर, कशाला बुद्धीभेद करत आहात?
जीनियस साहेब
मी दहा महत्त्वाच्या प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांची यादी सुद्धा दुव्यात दिली आहे.त्यात पाच निरामिष आणी ५ सामिष पदार्थ आहेत.
शिवाय ज्याला जे पचेल किंवा रुचेल ते त्याने खावे असे म्हटले आहे बुद्धिभेद कुणाचा आणी कशाला करू?
जो रुग्ण शाकाहारी म्हणून माझ्याकडे येईल किंवा श्रावण आहे त्यानंतर १० दिवस घरात गणपती असतो त्यानंतर पंधरा दिवस श्राद्धपक्ष/ पितृपक्ष आहे तेंव्हा तेंव्हा मी सामिष खात नाही( शुक्रवारी माझ्या स्वागत सहायीकेच्या आईच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली जी असे दोन महिने सामिष खात नाही) त्याला मी काय निळ्या देव्माशाचे उदाहरण देऊ काय? शक्ती येण्यासाठी वर दिलेल्या पदार्थातील तुम्हाला जे पचेल किंवा रुचेल ते खा.
तुमच्या समाधानासाठी पृथ्वी ऐवजी जमिनीवर असा बदल करून घ्या. आणिक काय लिहिणे
यात बुद्धिभेद कुठे आला?
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 09/09/2015 - 16:36
नवीन
डॉक रॉक्स, फुजि शॉक्स
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Wed, 09/09/2015 - 17:03
नवीन
@सुबोध खरे , आर यु सिरियस! कुठलाच शहाणा डॉक्टर 'पचेल रुचेल ते खा 'असे सांगणार नाही.नऊ गरजेची अमिनो ॲसिड्स आहेत, ज्यातली फक्त पाचच शाकाहारात सापडतात, बाकीच्या चार अमिनो ॲसिड्स साठी मांसाहार करावाच लागतो. त्यामुळे तुम्हाला एक तर माहिती दिसत नाही किंवा जैनांसारखे तुमचे शाकाहाराचे अजेंडे राबवत आहात.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 17:11
नवीन
Every time legumes like beans, lentils, and peanuts are combined with grains like wheat, rice, and corn, a complete protein is born.
The term "complete protein" refers to amino acids, the building blocks of protein. There are 20 different amino acids that can form a protein, and nine that the body can’t produce on its own. These are called essential amino acids—we need to eat them because we can’t make them ourselves. In order to be considered “complete,” a protein must contain all nine of these essential amino acids in roughly equal amounts.
Yes, meat and eggs are complete proteins, and beans and nuts aren’t. But humans don’t need every essential amino acid in every bite of food in every meal they eat; we only need a sufficient amount of each amino acid every day
असे मूळ जीवरसायन शास्त्राचे पुस्तक म्हणते. एक तर मी शिकलो ते चुकीचे असेल किंवा आपले नवीन संशोधन असेल.
https://en.wikipedia.org/wiki/Complete_protein
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 17:19
नवीन
जाता जाता -- मी जैन नाही. मी सर्व तर्हेचे सामिष खातो. बीफ सुद्धा खाल्लेले आहे.( भारतात मिळणारे बीफ हे बर्याच वेळेस रोगी किंवा कुपोषित जनावरांचे असल्याने मी ते नियमितपणे खात नाही) माझा कोणताही छुपा किंवा उघड अजेंडा नाही. परंतु मी लोकांच्या मताचा आदर करतो एवढेच मला म्हणायचे आहे. आपल्याला कोणतीही सफाई द्यायची गरज नाही परंतु मी आपल्याही मताचा आदर करतो यासाठी हा प्रपंच.
माझा पहिला प्रतिसाद आपल्या वाचनासाठी परत देत आहे.
कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का?
बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही).
उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत.
यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.कुणी काय खावे हा नक्कीच वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त ती कत्तल सार्वजनीक ठिकाणी करू नये. (उदा. उघड्यावर कुर्बानी देणे किंवा प्राण्यांचा बळी देणे.) अमुक धर्माच्या सणात त्यांनी वागावे तसेच वागावे हा आग्रह का?
बीफ वरील बंदी सुद्धा त्यात मोडते.( मी बीफ खात नसलो तरीही).
उद्या हे म्हणू लागतील कि श्रावण आहे तर सगळे कोंबडी वाले,मासे विक्रेते, खाटीकखाने आणि अंडी वाल्यांची दुकाने सुद्धा बंद असावीत.
यासाठी पर्युषणाच्या काळात खाटीकखाने बंद ठेवण्याचा निर्णय माझ्या मते चुकीचा आहे. राजकीय फायद्यासाठी कोणत्याही धर्माला झुकते माप देणे हे चुकीचे आहे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 09/09/2015 - 16:45
नवीन
शिवसेना सुद्धा असल्या कुठल्याहि बॅन च्या विरोधात आहे :- उद्धव ठाकरे
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 09/09/2015 - 16:52
नवीन
आज जे काही बातम्यांमधे दिसते आहे आणि जे वर ट्रूमनसाहेबांनी सांगितले आहे त्यावरून हा ठराव काँग्रेसच्या काळात घेतला होता असे दिसते आणि त्याला आता काँग्रेस (आणि शिवसेना देखील) विरोध करताना दिसते. त्यात राज्य सरकारचा संबंध देखील दिसत नाही... तरी देखील, भाजपाने ह्या निर्णयापासून फारकत घेयला हवी होती. पण सगळ्यांच्याच बाजूने नेहमी प्रमाणेच, "All politics is local" चालू आहे झाले.
मला स्वतःला असली कुठलीच बंदी मान्य नाही... (त्यात खात नसलो तरी बीफ देखील आले). पण माझ्या लेखी या चार दिवसाच्या बंदी पेक्षा गंभीर मुद्दा आहे तो विशिष्ठ सोसायट्यांमधे मटण-मांस खाणार्यांना जागा अधिकृत पणे नाकारायच्या पद्धतीला. ज्यामुळे मी २-३ वर्षांपूर्वी ऐकल्याप्रमाणे मुंबईत कोळी समाजाला काही ठिकाणी घरे मिळत नव्हती... हे कायद्याला धरून होऊ शकत नाही. जात आणि धर्म यावर सोसायट्या तयार करण्यावर बंदी घातली पाहीजे. त्याच बरोबर आपल्या पाककृतीमुळे जर इतरांना त्रास होत असला तर तो करताना कमीतकमी कसा त्रास होईल हे देखील समजून सर्वांनी केले पाहीजे असे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/10/2015 - 08:42
नवीन
योग्य मुद्दा विकास! हे जागा न देण्याचे प्रमाण मुंबईत फार वाढत चाललेत.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 09/09/2015 - 17:12
नवीन
कारण काही असुंदेत पण जर एखाद्या गटाला धर्म-पंथ आधी कारणावरून सुखवायचे असेल तर बंदी घालण्यापेक्षा कॅनेडीयन सरकार सारखे करावे...
कॅनडा सरकार / टांकसाळीने दिवाळीच्या निमित्ताने स्पेश्शल सोन्याची नाणी काढली आहेत आणि ते ती कॅनेडीयन $२,६९९.९५ अथवा दुसरे स्वस्त (तरी देखील) कॅनेडीयन $७९.९५ ला विकत आहेत. पब्लीक पण खुष सरकार पण खुष! :)

- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
गुरुवार, 09/10/2015 - 08:47
नवीन
सुरेख.
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 09/10/2015 - 09:43
नवीन
मीट ना मिला रे मनका!
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
गुरुवार, 09/10/2015 - 18:25
नवीन
Indian Express मधील लेखातील काही परिच्छेद -
Is it a new ban? No. It has been in force since 1964, when the BMC passed a resolution directing a two-day prohibition on sale of meat in deference to the demands by Jains, a powerful community which holds many stakes in business and industry in Mumbai.
In 2004, the Congress-NCP government passed another resolution endorsing the two-day ban. Since then, the ban has been extended to four days across Mumbai every September. “Two days are according to the 1964 BMC resolution and two on account of the state’s 2004 resolution,” said a senior BMC official.
The Congress has done a U-turn. Having passed the state government resolution supporting the two-day ban in 2004, it is now opposing it. Sanjay Nirupam, president of the Mumbai unit of the Congress, has termed the BMC’s ban “undemocratic”. “Though religious sentiments should not be hurt, other communities should not be deprived of their daily meals. We condemn this decision,” he said. Why the brouhaha now if it has been an annual affair for 41 years? Simply because this year, it comes just six months after the Maharashtra government’s controversial decision to ban the sale of beef in the state. While the slaughter of cows was previously prohibited in the state under the Maharashtra Animal Preservation Act of 1976, the implementation of the ban means that bulls and bullocks cannot be slaughtered for meat either. Anyone found to be selling beef or in possession of it can be jailed for five years and fined Rs 10,000. In the light of the controversial beef ban, the 41-year-old seasonal ban on mutton and chicken is also raising eyebrows.
Read more at: http://indianexpress.com/article/explained/simply-put-why-mumbai-will-be-denied-mutton-chicken-for-4-days/#sthash.5hvWKgF6.dpuf
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 09/10/2015 - 19:14
नवीन
कहर म्हणजे मुंबै महापालिकेने सुद्धा हा निर्णय घेतला आहे. जिथे शिवसेना सत्तेत आहे. आणि शिवसेनाच आता विरोध करतिये!
- Log in or register to post comments
त
तिमा
Fri, 09/11/2015 - 07:55
नवीन
एका जैन कुटुंबाच्या पार्टीला एका हॉटेलमधे गेलो होतो. मित्रपरिवार व लहान मुले धरुन १०-१२ जणं होतो. खाण्याची ऑर्डर देऊन झाली होती. लहान मुले मस्ती करत होती. मुलांच्या समोर मेन्यु कार्ड पडलेली होती. ईंग्रजी शाळेत जाणारी मुलं ती! तिथेच जाहीर वाचन सुरु झाले. मधेच एका पानावर, चिकन चाऊ चाऊ आणि तत्सम लिस्ट सुरु झाली. त्या मुलांच्या आई-वडिलांचे चेहेरे गोरेमोरे झाले. त्यांनी दटावलं. पण मुले कुठली ऐकायला ? शेवटी एका मुलाच्या आईने लगबगीने उठून, ती मेन्यु कार्डे काढून घेतली. बाकी सारे आश्वस्त झाले पण त्या लिस्टचे आयटेम्स कानावर पडल्यावर माझ्या तोडाला पाणी सुटले.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Fri, 09/11/2015 - 08:04
नवीन
तिमा काका मी तर मुंबईत जैन चिकन मिळते असे ऐकले होते (कांदा-लसुण न घालता केलेले) :)
खखोदेजा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 09/11/2015 - 08:21
नवीन
कोणत्याही धर्मावर टीका नाही मात्र "अहिंसा" या शब्दाचा गैर अर्थ लावत जीव हत्या होते म्हणून घरातील झुरळे , ढेकूण न मारणारे , पर्युषण काळात तोंडातील जंतुंची हत्या होते म्हणून तोंड न घासणारे जैनबांधव पहिल्यावर तर मी माझेच डोके ठिकाणावर आहे का हे तीन चार दा हात लावुन पाहिले होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 09/11/2015 - 12:11
नवीन
कोणत्याच स्वरूपातील मांसाहार करीत नसल्याने अशी बंदी ८ दिवसांऐवजी कायमस्वरूपी असावी अशीच इच्छा करतो!
- Log in or register to post comments
म
मराठे
Fri, 09/11/2015 - 17:09
नवीन
मूर्खपणाचा कळस असं म्हणणार होतो, पण लोकांचं काही सांगता येत नाही. या ही पेक्षा जास्त मूर्खपणा करून दाखवतील. (काही काही प्रतिक्रियांवरून हे दिसतंच आहे)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3