"ना खाऊंगा , ना खाने दूँगा"
जैन धर्मीयांच्या पर्युषण काळात
कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर
नेटिझन्समध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
करण्यात येत आहे.
माझ्या मनात ही काही प्रश्न निर्माण होत आहेत
मटनावरील बंदी ही मूर्खपणाची,
निरुपयोगी आहे का?
मी काय खावे यावर तुम्ही नियंत्रण ठेवू
शकता का ?
मुंबईमध्ये फक्त जैन समुदायाची नव्हे तर सर्व
समुदायाची लोक राहतात . मग इतरांवर
बंधने का?
भारतामध्ये विविधतेत एकता आहे. मात्र
सरकार विविधतेवर बंदी घालत आहे.
अच्छे दिन हे आहेत का ?
💬 प्रतिसाद
(129)
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/08/2015 - 17:31
नवीन
असंख्य हॉटेलांमध्ये जैन पावभाजी मिळते,जैन पिझ्झा,एग्लेस केक का काय तो.. मिळतो ना रे प्रगो?
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/08/2015 - 16:59
नवीन
एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल?
लष्कर समर्थ असलं तर आताच्या वर्तमान अडचणी का संपत नाहीयेत?
एका कसाब सारख्या पित्त्याला किंवा त्या दृष्टीनं २-५ लाख लोकांना मारु शकलो तरी पुढची फळी तयार व्हायची नि आक्रमण करायची थांबेल?
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/08/2015 - 17:09
नवीन
ऑपरेशन म्यानमार.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/08/2015 - 17:12
नवीन
एन्लायटन प्लीज.
घटना ठाऊक आहे. नवीन चलन आलंय आयसिसचं.
बिलियन्स ऑफ डॉलर्स चा खजिना जमला आहे. शस्त्रास्त्रं आहेत, प्रोग्राम्ड लोक आहेत. मिळणारा पाठिंबा दुर्दैवानं जगभरातून आहे
- Log in or register to post comments
द
द-बाहुबली
Tue, 09/08/2015 - 17:22
नवीन
आय डोंट डिस्कस दिज मॅटर्स विद सिवीलीयन्स सॉरी. ;)
बस फक्त हेच दुखणं खरं आहे. आणी तेल विहीरींवर कब्जा केल्यामुळे त्यात भरच पडत आहे. पैसा आहे म्हणूनच हात पाय पसरता येत आहेत. बाकी मी विधान जे धर्म आक्रामकपणे स्वतःच्या तत्वांचा प्रचार प्रसार करत नाहीत ते आयसीसच्या वादळापुढे टिकुन रहातील का ? या वाक्याच्या संदर्भात केले असल्याने यानुशंगाने विशीष्ट प्रश्न मनात असेल तर कृपया विचारावा.
कारण त्या प्रश्नाला माझे उत्तर भारतीय लष्कर इसीसला उत्तर द्यायला सक्षम आहे त्यासाठी जगात एखादा नवीन धर्म स्थापायाची अथवा अस्तित्वात असलेला दुसरा एखादा धर्म आक्रमक करायचा ज्यातुन इसिस आपोआप संपेल/त्याला शह बसेल असे मानणे भाबडी आशा आहे असेच आहे. इसीस मानवते विर्ध्द आहे असेच कृत्यातुन सिध्द करते आणी भारतीय लष्कर मानवतेसाठी काम करायला सक्षम आहे.
अर्थात धर्मस्थापनार्थाय प्रत्यक्ष नारायणानेच अवतार घेतला तर गोष्टच निराळी होइल म्हणा...
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 11:01
नवीन
एका विचारधारेला (भले ती आपल्यासाठी किंवा खरंच, चुकीची असो) शस्त्रानं किंवा लष्कराकडून उत्तर कसं देता येईल?
>>
आपल्याकडच्या पुरोगामी वैचारिक मंडळींना पाठवायचं का तिकडे?
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 09/09/2015 - 11:07
नवीन
'आप'ण सहमत, मिपावर सुद्धा आहेत कि सो कॉल्ड पुरोगामी काड्यासारु, वर्गणी करुया आन द्यु इ पाठ्वुन हाकानाका
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 11:12
नवीन
त्यावरनं आठवलं, फेबुवर पाहिलेलं: पाकिस्ताण टूरिझम/व्हिसाचे सर्वांत मोठे प्रमोटर्स म्हणजे भारतातील स्वयंघोषित राष्ट्रभक्त मंडळी. जरा कै झालं की "याला पाकिस्तानला पाठवा" चा उद्घोष सुरू असतो.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/09/2015 - 17:09
नवीन
ह्या ह्या ह्या. ह्याला गॉथमला पाठवा रे.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/09/2015 - 17:12
नवीन
थोडक्यात 'ह्याला ''घरी'' पाठवा रे' असं आहे का ते? ;)
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 11:12
नवीन
.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/09/2015 - 11:15
नवीन
गुड सजेशन
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 10:57
नवीन
असो.
जैन समाजाविषयी कीव आणि सहानुभुती वाटते .
तुमच्या पेक्षा पारशी नशीबवान हो , दुसर्या देशातुन इथे येवुनही मोठ्ठा कौतुकाने स्वतःच्या धर्माचे आचरण करत आहेत , प्रत्येक अग्यारी बाहेर स्पष्ट पाटी लावलेली असते की पारशी आणि इराणी झोराश्ट्रीयन सोडुन कोणालाही प्रवेश नाही आणि त्यांच्या विरुध्द कोणी ब्र ही काढत नाहीत !
असो . आता १५ ऑगस्ट २६ जानेवारीला सक्तीच्या दारुबंदी विरुध्द बघु कोण आवाज उठवते ह्या इंटरनेटीय विचारवंता मधील !!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 09/09/2015 - 10:59
नवीन
त्यांच्या विरुद्ध जाउन व्होट बँक तयार होत नसेल त्यामुळे असे असावे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 11:06
नवीन
अग्यारीतला प्रवेश आणि स्वतःचा धर्म सोडून इतरांनी काय खावे अन काय नाही या दोन गोष्टींची तुलना करणे हेच मुळात तर्कदुष्ट आहे. जसे अग्यारीत नॉनझोरोअॅस्ट्रियन लोकांना प्रवेश नाही, तद्वतच नॉनहिंदूंना प्रवेश न देणारी देवळेही आहेतच की.
पण स्वतः मांस खात नाही म्हणून इतरांनीही खाऊ नये ही तर दडपशाही झाली. जैन सोडून इतर धर्मीयांनी मांसाहार केला तर जैन धर्मीयांचे कुठले धर्मतत्त्व पाळले जात नाही तेवढे सांगा, मग त्या अनुषंगाने चर्चा करता येईल.
बाकी आयसिस वगैरे निव्वळ मुद्दे भरकटवणे आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 11:28
नवीन
मुद्दा असा आहे की जसा जैनांच्या भावनांचा आदर कोणत्या देशात होईल ?
ठीक आहे , घोडा मैदान दूर नाही !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 11:38
नवीन
भावनांचा आदर इतरांच्या आहारावर का घसरावा हे न उलगडणारे कोडे आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा की इतरांनी नॉनव्हेज खाल्ले तर जैनांचे कुठले धर्मतत्त्व विटाळते? तसे त्यांच्या धर्मग्रंथात काही आहे का?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 12:19
नवीन
नाही नाही तसे मुळीच नाहीये . जैन आणि सारेच भारतीय धर्म अॅकोमोडेटीव्ह आहेत , पण हा आमचा सद्गुण आमच्याच मुळावर उठायला लागला तर काय करावे ?
सौदी मधे मला सहा महिन्यात एकदाही पोर्क खायला मिळाले नाही , रमजान मधे हमखास सारी हॉटेल बंद असायची दिवसा , ते लोकं कसे कट्टरतेने स्वतःची धार्मिक धोरणे राबवतात ! बरं आमचा जैन बौध्द आणि हिंदु धर्म पहिल्या पासुनच सेक्युलर म्हणुन आम्ही सेक्युलॅरिझम स्विकारलले तर ते आमच्याच मुळावर उठायला लागले आहे ! ३६५ दिवसातील ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नाहीतर काय बिघडते ?
फाळणीच्या वेळेला मुसलमानांनी झगडुन स्वतंत्र देश मिळवला , तिथे ते आनंदाने त्यांची धोरणे राबवतात ( भले मग ती काहीही का असेना ) मग आमच्या लोकांनी धर्माच्या आधारावर राज्य निर्माण नकरता सेक्युलरत्व स्विकारले तर त्या धर्माच्या लोकांच्या भावनांचा आदर केला तर काय बिघडेल ?
डिस्क्लेमर : मी स्वतः कट्टर शाकाहारी नाही , पण मला सर्व "सेक्युलर" धर्मांविषयी प्रचंड आदर आहे. जैन , बौध्द आणि वैदिक परंपरांची पार्श्वभुमी नसती तर हा देश किती सेक्युलर राहिला असता देव जाणे !
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 12:27
नवीन
म्हणजे तुम्हांला सौदीत पोर्क मिळाले नसल्याने जैनपुरस्कृत बंदीचा पुरस्कार करताय का?
झालंच तर सेकुलारिझम मुळावर उठणे आणि अशी खाद्यबंदी यांचा काय संबंध आहे ते जरा सांगा बघू.
आणि ५ दिवस नॉनव्हेज खाल्ले नैतर काय बिघडते, बीफ खाल्ले नैतर काय बिघडते, पोर्क खाल्ले नैतर काय बिघडते हे सारेच प्रश्न सारखेच निरर्थक आहेत.
वेल, बहुसंख्य कोण आहेत इथे? त्यांच्या भावनांचा आदर करायचा की अल्पसंख्य भावनांचा?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 09/09/2015 - 12:28
नवीन
चातुर्मास, त्यातही श्रावणात हिंदू लोक मांसाहार करत नाहीत. त्यापायी हिंदूंनी कधी त्या काळात मांसबंदी घातल्याचे आठवत नाही, मग जैनांचा असला आततायीपणा का खपवून घ्यावा?
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 13:13
नवीन
हो .
पहा ना , इतर धर्माचे लोकं त्यांची तत्वे , धार्मिक धोरणे बिन्धास्त पणे राबतात त्यांच्या देशात , ह्या देशात मात्र ज्यांनी सेक्युलॅरिझम स्विकारले त्याच धर्मांना त्यांची धोरणे राबवता येत नाहीत
ह्म्म ....खरेच त्यांनी फाळणीच्या वेळेला स्वतंत्र देश मागुन घ्यायला हवा होता असली धार्मिक धोरणे राबवण्याकरिता !
आता भोगा म्हणाव आपल्या कर्माचि फळं !!
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 13:31
नवीन
इस्लामिक देशांनी त्यांचा देशाचा अधिकृत धर्म मुस्लिम आहे असे जाहीर केले आहे. आणि त्यानुसार त्यांचे कायदे ठरवले आहेत. आणि तिथे रहायचे असल्यास ते पाळावेच लागतात.
भारताने (इंडिया) कोणताही धर्म अधिकृतपणे स्वीकारलेला नाही. त्यामुळे सेक्युलॅरिझममुळे प्रत्येक धर्माला इथे समान हक्क आहे किंबहुना आपल्या कायद्याप्रमाणे अल्पसंख्याकांना संरक्षण देखील आहे.
त्यामुळे मुस्लिम / जैन / बौद्ध / ख्रिस्चन / इतर भारतामध्ये आपापल्या धर्माचे आचरण करू शकतात आणि सरकारकडून त्यांच्या प्रथेसाठी / भावनांसाठी संरक्षण / सोयी/ सुविधा मागू शकतात आणि प्रथा , परंपरा राबवू शक्तात.
जसे १.हिंदूंनी गोमासांवर बंदी आणली
२. जैन लोकांची मांसाहार बंदी मागणी
३. मुस्लिमांचा विवाह कायदा , बुरखा कायदा
४. शिखांचा शस्त्र बाळगण्याचा कायदा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 09/11/2015 - 08:15
नवीन
कोणि काय खावे-प्यावे हे ज्याचे त्याने ठरवावे असे असेल तर मग सरकारने शिगारेट , तंबाखू , मद्य , गांजा अफू चरस या वर बंदी सरसकट बंदी कशासाठी घालावे.
( माझा मांसाहार बंदी ला विरोधच आहे)
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Fri, 09/11/2015 - 08:25
नवीन
कपिलमुनी मी हेच म्हणत आहे . सेक्युलॅरिझम हा गुण फक्त भारतीय धर्मातच आहे म्हणजे हिंदु बौध्द आणि जैन . ह्या धर्माच्या लोकांच्या बहुसंख्यते मुळेच भारत देश सेक्युलर राहिला आहे अन्यथा आपल्यात आणि अन्य धर्मांध देशात फरक राहिला नसता .
पण ह्या धर्मांमुळे भारत सेक्युलर राहिला , त्यांनाच त्यांची धार्मिक धोरणे राबवता येत नाहीत म्हणुन म्हणालो कि सेक्युलॅरिजह्म त्यांच्याच मुळावर उठले आहे .
आता सोपा विचार करा : पाकिस्तान ने धर्माच्या आधारावर स्वतंत्र देश मागुन घेतला , त्यांच्या देशात पोर्क मिळावे म्हणुन आपण आंदोलन करतो का ? नाही ! थोडक्यात "त्यांनी" त्यांची धार्मिक धोरणे राबवण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले .
असेच जर जैनांनी त्यांचा स्वतंत्र देश मागुन घेतला असता तर त्यांनाही त्यांच्या श्रध्दा , त्यांची धार्मिक धोरणे आनंदाने राबवता आली असती ना !
सेक्युलर राहुन काय फायदा झाला त्यांचा ?
असो.
- Log in or register to post comments
थ
थॉर माणूस
Wed, 09/09/2015 - 13:38
नवीन
अहो त्यांच्या देशात बंदीमुळे पोर्क मिळाले नाही तर मग इथे चार दिवस पोर्कसक्ती लागू करा ना, मांसबंदी करून पायावर धोंडा कशाला मारताय? :)
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Wed, 09/09/2015 - 13:38
नवीन
हिंदूमधले काही ब्राह्मण सोडले तर कोण चातुर्मास पाळते हल्ली, बायका असतात धार्मिक ,त्या काही प्रमाणात पाळतात, पण ब्राह्मणेत्तर पुरुषांना श्रावणातच खायची हुक्की जास्त येते.त्यामुळे ते सक्तीच्या भानगडीत कधीच पडले नाहीत,
आजकाल नवीन नॉनव्हेज हॉटेल निघाले कि तिथे उद्घाटनालाच ब्राह्मण असतात म्हणे, सदाशिव पेठेत निघालेली पुरेपुर कोल्हापुर,कोल्हापुरी रस्सा मंडळ हि हॉटेल त्यातीच द्योतके आहेत, यात ब्राह्मणांवर टिका करायचा उद्देश नाही, पण हिंदूंचे धार्मिक नेतृत्व करणारे ब्राह्म्ण व स्वतः हिंदूंच भ्रष्ट झाल्याने ते इतरांवर मांसबंदी घालण्याच्या नैतिक स्थीतीत नाहीत.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 09/09/2015 - 13:41
नवीन
शतक होणार आहे ओ. एवढी का काळजी करताय?
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 09/09/2015 - 13:47
नवीन
केला ना कबूल !
झाला तर मग ! घ्या पाया सूप , नंतर वजडी आणि मुंडी जेवायला
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 14:50
नवीन
फुलथ्रॉटल जिनियस
ब्राह्मणेत्तर पुरुषांना श्रावणातच खायची हुक्की जास्त
स्वतः हिंदूंच भ्रष्ट झाल्याने
हे आपण कोणत्या आधारावर ठरवले?
का अशीच विचारांची पिंक टाकलीत ?
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 09/08/2015 - 17:33
नवीन
चर्चा मीरा-भायंदर महानगर पालिकेकडून चालू होऊन आय्सीस पर्यंत पोचली..
- Log in or register to post comments
फ
फुलथ्रॉटल जिनियस
Tue, 09/08/2015 - 17:49
नवीन
डायनॉसॉरस का नष्ट झाले ' या चर्चेतही हिंदुत्ववादी गांधी नेहरु यांना घुसडु शकतात,तर आयसिस आणि मिरा भाइंदरच काय घेऊन बसलात माइसाहेब
- Log in or register to post comments
प
पीके
Tue, 09/08/2015 - 18:20
नवीन
डायनासॉर का नष्ट झाले हे ओळ्खेल तो सुज्ञ बाकी या जागात इसीस सार्खे डाय्नासोर फक्त आपलं अस्तित्व दखवण्यापुर्तेच येतात आणि न्स्ष्ट होतात हे लक्ष्त ठेवा
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 09/08/2015 - 18:36
नवीन
जरा उघ्डुन सांगाल का?
- Log in or register to post comments
ल
लिओ
Tue, 09/08/2015 - 20:11
नवीन
जर सर्व मांसाहारी एका क्षणात शाकाहारी झाले, आणि त्यामुळे जर शाकाहारी अन्न/पदार्थ पुरवठा व मागणी यात तफावत झाली तर मुळचे शाकाहारी किती दिवस उपवास करतील.
जिओ और जिने दो.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 09/08/2015 - 21:16
नवीन
सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवला पाहिजे. पर्युषण पर्वात ईतर धर्मियांनी जैन समाजाप्रती सदभावना म्हणून मांसाहार न करता फक्त गरम पाणी पिवून उपास करावा. बकरी ईद ला जैन धर्मियांनी बोकडाची कुर्बानी देऊन हलीम वगैरे चापावे. हाकानाका.
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Wed, 09/09/2015 - 01:09
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अविनाश पांढरकर
Wed, 09/09/2015 - 05:07
नवीन
+१००
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 04:51
नवीन
+100
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 09/09/2015 - 05:41
नवीन
हा सगळा मोदीसरकारचा करिष्मा आहे. ते भाजपलाही खुष ठेवणार.. आणि इतरांनाहि! प्रत्येक धर्मात जो जो गाढवपणा आहे, त्याला मधून मधून अशीच सूट/सवलत देणार. हुशार राज्यकर्ते जनतेच्या देवभोळे पणाचा फ़ायदा उचलण्यास कध्धिही चुकत नसतात..
आपणही त्यांना सहाय्यभूत होऊन चातुर्मासात कांदा लसूण वांग विक्रिवर बंदि आणायचि मागणी केलि पाहिजे. नाही का?
(खंरं)सेक्युलर शासन ज्याला खायचय त्याची उपेक्षा करत नसत,ज्याला न खायचय त्याला खाण्याची बळजबरि / आग्रहहि करत नसतं. यात कोणाचिहि गैरसोय होत नाही.
उलट धर्मवादाला बळि पडलेलं अथवा त्याच्या वापराला तयार- असलेलं शासन , हे अशा प्रकारचे "त्या त्या समाजाना बरं वाटणारे" निर्णय घेऊन त्या त्या समाजाचा फ़ायदा उठवायच्या त-यारित नेहमी असतं..
आपण यात कोणाला उचलून धरायचं? हा साधा निर्णय सूज्ञपणे आपल्याला घ्यायचा आहे.
जैनांच्या बाजूनी दिलेल्या निर्णयाचा मी अनेकवार निषेध करतो.. आणि "त्यानाही गटारात लोळू द्या आम्हीही लोळणार !" ह्या टनाटनि मानासिकतेचा धिक्कार!!!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 09/09/2015 - 06:53
नवीन
ही बंदी नक्की कधीपासून आहे याविषयी थोडा संभ्रमच निर्माण झाला आहे. कारण इंडिअन एक्सप्रेसमधील या बातमीत म्हटले आहे की अशी बंदी १९६४ पासून आहे!!
या निर्णयाचे मेरीट-डिमेरीट जे काही असतील ते असतील पण या निमित्ताने जैन धर्मियांचा दहशतवाद वगैरे म्हणणारेच लोक "Terror has no religion" असे म्हणताना दिसतात याचीही जरा मौजच वाटली. (शेफाली वैद्यच्या फेसबुक पेजवरून साभार)
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Wed, 09/09/2015 - 07:18
नवीन
पुढच्या वेळेस भाजप हारणार 'ही काळ्या दगडावरची पांढरी रेष'
(जर हे असेच चालू राहिले तर)
- Log in or register to post comments
D
dadadarekar
गुरुवार, 09/10/2015 - 10:39
नवीन
तुमच्या तोंडात चिकन पडो
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 09/10/2015 - 10:51
नवीन
चिकन नाही बीफ म्हणा बीफ...
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 09/10/2015 - 10:54
नवीन
कच्चं च????
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 09/11/2015 - 08:20
नवीन
आता, ते कसं खातेत ते म्हाईत नाय...
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
गुरुवार, 09/10/2015 - 15:23
नवीन
यापूर्वीही काॅग्रेसच्या काळात दोन दिवसांसाठी वगैरे अशी बंदी होती म्हणे पण तेव्हा प्रसारमाध्यमे झोपा काढत होती.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 09/09/2015 - 08:17
नवीन
याविषयी नवीन नवीन दावे येत आहेत त्यामुळे संभ्रमात भरच पडत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून केरळ सरकार रमझानच्या महिन्यात शाळेत 'मिड डे मिल' देत नाही आणि २००८ मध्ये दस्तुरखुद्द मार्कंडेय काटजूंनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना अशी तात्पुरती बंदी घालणे कायद्याला धरून आहे असे म्हटले होते असा दावा भाजपच्या संजू वर्मा यांनी केला आहे. याविषयी अधिक ट्विटरवरील https://twitter.com/IndiaToday/status/641289247106793472 हा व्हिडिओ. या दाव्याच्या सत्यतेविषयी कोणाला माहित आहे का?
हा दावा खरा असल्यास या प्रकरणामागे पराचा कावळा करण्यामागे नेहमीप्रमाणे प्रेस्टिट्यूट आहेत असे दिसते. जर अशी बंदी गेल्या कित्येक वर्षांपासून असेल आणि इतकी वर्षे त्याचे बातम्यांमध्ये नामोनिशाणही नसेल पण नेमके आताच होणे, केरळमध्ये रमझानच्या महिन्यात मिड डे मील वर बंदी असेल तरी त्याची अजिबात वाच्यता न होणे पण मुंबई आणि मीरा-भाईंदरचा प्रश्न मिडियामध्ये प्राधान्याने येणे या सगळ्यात काहीतरी काळेबेरे असावे असे दिसते. याच मंडळींनी मागच्या वर्षी कुठल्या तरी कॅन्सरच्या औषधाची किंमत ६ हजारवरून १ लाख वर गेली, कुमारी मातांना त्यांच्या मुलांचा पासपोर्ट काढताना त्यांच्यावर बलात्कार झाला होता की नाही याची माहिती देणे आता बंधनकारक झाले आहे वगैरे कंड्या बेमालूम पसरवून दिल्या होत्या. लगोलग अनेक फेसबुकींनी शहाजोगपणे 'हेच का ते अच्छे दिन' असा प्रश्नही विचारला होता. पण या सगळ्या बातम्या खोट्या होत्या हे स्पष्ट झाल्यावर ही सगळी मंडळी पळून गेली होती (अपेक्षेप्रमाणे)--कारण या लोकांना खरी परिस्थिती काय आहे हे शोधून काढण्यात इंटरेस्ट नसतोच मुळी. यांचा इंटरेस्ट नुसती मोदींवर टिका करण्यात असतो!! हा प्रकार पण त्यातलाच आहे की काय ही शंका येऊ लागली आहे.
मला वाटते कोणत्याही धार्मिक सणासाठी कोणावरही सक्ती करू नये. कितीही मोठी एकादशी येऊ दे, पर्यूषण येऊ दे, रमझान येऊ दे, ज्यांना तो मानायचा आहे त्यांनी तो मानावा आणि धार्मिक कृत्ये जी काही असतील ती करावीत पण ज्यांना त्यावर विश्वास नाही त्यांना तो न ठेवायचा अधिकार आहे आणि असलाच पाहिजे. कुणावरही सक्ती होता कामा नये. तीच भारतीय परंपराही आहे आणि तसे करणेच योग्य आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/09/2015 - 14:57
नवीन
कुणावरही सक्ती होता कामा नये. तीच भारतीय परंपराही आहे आणि तसे करणेच योग्य आहे.
+१
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 09/09/2015 - 12:00
नवीन
शाकाहार असो अथवा मांसाहार, जिथ पर्यंत विज्ञानाचा संबंध आहे अन्नपदार्थाचे विघटन चयापचय क्रिया एक सारख्या होत असाव्यात, मांसाहार आणि शाकाहारात मुख्य फरक मांसाहारातून अधिकच्या मिळणार्या प्रोटीनच्या मात्रेचा आहे (डॉक्टर लोकांनी यात चूक असल्यास सुधारावी).
सात्वीकता ही वैचारीक प्रक्रीया मेंदूतून होत असेल आणि आहाराचा आणि मेंदूचा प्रोटीनच्या मात्रे मुळे पडणार्या फरका पलिकडे संबंध नसेल तर १) आहारातून मिळणार्या अधिक प्रोटीन्समुळे सात्विकता कमी होते आणि हिंसकवृत्ती वाढते असे असेल तर अ) अधिक प्रोटीन्स खाणार्यांची सात्वीकता कमी होते आणि तामसवृत्ती वाढते हे साधार सिद्ध करावयास हवे, ब) असा दावा करणार्यांनी शाकाहारी प्रोटीन्सपण खाणे वर्ज्य केले पाहीजे
२) दुसरा आ़़क्षेप उग्र वासाचा असतो, अधिक उग्र वास घेणार्या व्यक्ती पदार्थ न खाता असात्विक आणि तामस होतात आणि त्याच परिस्थितीत उग्रवासही न घेणार्या व्यक्ती असात्विक आणि तामस व्यवहार करतच नाहीत हे निष्पक्षपणे साधार सिद्ध व्हावयास हवे.
३) मांसाहार खाणार्याच्या अन्न ग्रहण करताना प्राणी कापल्याचे इमॅजीनेशन येते म्हणून तो हिंसक होतो असे नसावे दही भात खाणार्या शाकाहारी माणसाला तांदळाच्या दाण्यांच्या पुर्नरुत्पाददन आणि पाडसाला दूध कमी पडल्याचे आणि आपल्या कडून तांदळाच्या भावी रोपावर अथवा पाडसावर अन्याय झाल्याचे जसे येत नाही तसेच मांसाहारी माणसास कत्तलखान्यात काय चालू आहे याचे दृष्य शाकाहारी माणसाच्या कल्पनेत येते त्या पेक्षा अधिक येत नसावे पण तो शाकाहारी माणसांचा गोड गैरसमज आहे.
४) प्रोक्रीएशन आणि प्राण्यांच्या भावी पिढीवरील अन्याय. प्रामाणिक पणे सांगावयाचे झाल्यास झाडावरून खाली पडलेल्या फळाचे इतर कोणत्याही सजीवाने ग्रहण केले नाहीतर प्रत्येक बी जमीनीत पेरून केवळ अशा फळाचा गर तेवढा खाणे हा एकमेव शुद्ध शाकाहार आहे बाकी सर्व प्रकारचे आहार कोणत्या ना कोणत्या प्रकारे इतर सजीवांवर अन्याय करतातच करतात. हे तत्व बहुतांश शाकाहार्यांनी लक्षात घेतलेले नसते. त्या अर्थी त्यांनी सजींवाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हनन केलेलेच असते त्यामुळे तत्वतः ते कोणत्याही मांसाहार्या पेक्षा श्रेष्ठ ठरत नाहीत.
वरच्या प्रतिसादात ब्याटमन म्हणतात तसे खाण्याच्या पदार्शांचा आणि सात्विकतेचा मुलतः संबंध असण्यास कोणताही वैज्ञानिक अथवा तार्कीक आधार दिसत नाही. जगात जेथे जेथे शांततेचा प्रसार करणारा बौद्ध धर्म गेला त्यातील बहुतांश प्रदेशात मांसाहार होत असावा. पण त्यांच्या सात्विकतेत त्यामुळे कमतरता अथवा वाढ दोन्हीही होत नसावे.
धर्मसंस्थांनी मुख्य उद्देशास सोडून गरजेपेक्षा परिघाबाहेरील व्यक्ती, कुटूंब, समुह, राज्य यांच्या आहारातील हस्तक्षेपास श्रद्धेची जोड देण्याचे अधिकतममुल्य एक कर्मकांड, व्यक्ती, कुटूंब, समुह, राज्य व्यक्तीस्वांतत्र्यातील धर्मसंस्थेने टाळण्या जोगा हस्तक्षेप या पलिकडे कितपत जाऊ शकते या बाबत मी साशंक आहे. मुख्य म्हणजे व्यक्ती आणि समाजात मानसिक दुरावा निर्माण करणार्या आहार विषयक अटी धर्मसंस्थेच्या सहीष्णूता आणि मानवतेच्या तत्वांना धरून असू शकतात का या बद्दल मी साशंक आहे.
आणि एवढे विवेचन करूनही काही स्थितीत मी व्यक्तीगत पातळीवर मांसाहार न करण्यास सहमत असू शकतो त्या मागचा तार्कीक मुद्दा प्रतिसाद क्रमांक २ मध्ये देतो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 09/09/2015 - 12:23
नवीन
कोणत्याही धर्माने सांगीतले म्हणून नव्हे तर एक सजीव म्हणून जीवो जीवस्य भोजनम हे तत्वही मी समजून घेऊन स्विकारतो त्याच वेळी एक सजीव म्हणून मी तत्वतः भूतदया मानतो आणि म्हणून सजीवांचा विणीचा (मेटींगचा) काळ, किंवा मैथून ते पाडस अंगावर आहे त्या काळात प्राण्यांप्रती किमान स्तराची भूतदाया बाळगावी आणि हा काळ अधिकतम सजीवांसाठी विशीष्ट ऋतूत पडत असेल जसेकी भारतात पावसाळा तर प्रदेश परत्वे ऋतूस अनुसरून मांसाहार टाळणारे चतुर्मासाचे अनुसरण भूतदयावादी आणि तर्कपूर्ण वाटते. जसे कि मासेमारी करणार्यांना पावसाळ्यात मासेमारी करण्यापासून परावृत्त केले जाते. हे मांसाहार करणार्यांसाठी सुद्धा सयुक्तीक आहे की जेव्हा मुबलक शाकाहार उपलब्ध आहे तेव्हा अधिकतम भूतदया दाखवावी, (किमान पक्षी स्वतःच्या स्वार्थासाठी भूतमात्रांना आधी वाढीची संधी द्यावी मग खावे :) )
(मी स्वतः चतुर्मासातही माझ्यासमोर मांसाहार आल्यास नाही म्हणत नाही हि बाब वेगळी, पण म्हणून इतरांनी तार्कीक बाजू कोणती हे समजून घेऊनये असे नव्हे)
दुसरी बाजू देशाच्या दृष्टीने आर्थीक आहे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रदुषण वाढवणार्या, आणि परकीय चलनाची गंगाजळी आटवणार्या एनर्जींवर चालणार्या टृक्टर्स पेक्षा बैलादी प्राण्यांवर जेवढी म्हणून शेती होऊ शकते त्याचे समर्थन केले पाहीजे हे मला तर्कपूर्ण वाटते.
तिसरी बाजू मांसाहार करणार्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मात्र अंशतः लंगडा यासाठी आहे की जिवनाचे स्वांतत्र्य जे तुम्हाला हवे आहे ते इतर भूत मात्रांनाही हवे आहे. पण म्हणून शाकाहारी लोकांच्या टोकाच्या भूमिका सुद्धा ग्राह्य ठरतात असे नव्हे. समतोल साधण्याच्या दृष्टीने राजसंस्थेचा मानवी आहारसाखलीतील तर्कपूर्ण हस्तक्षेप योग्यही असू शकतो
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »