Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयटीवाले !

व
विजुभाऊ
गुरुवार, 10/08/2015 - 04:29
🗣 209 प्रतिसाद
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
आयटीवाले

प्रतिक्रिया द्या
67105 वाचन

💬 प्रतिसाद (209)
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 09:34 नवीन
थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Fri, 10/09/2015 - 09:37 नवीन
हो ना राव... काय झबलं वगैरे घालायचा की काय हापिसात जाताना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. Sat, 10/10/2015 - 09:24 नवीन
अबे झबलंच. त्येला बंडी म्हणायचं, नायतर छाटण. बिनबाह्याचे आसतय. आमच्या सारख्या तब्येतवाल्यांना शोभतेय. बिअर ढेरकाट दाखवणार्यांना येगळे असतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Sat, 10/10/2015 - 10:25 नवीन
बेंबाट पण डिस्प्लेला ठेवता वाट्टे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/10/2015 - 09:21 नवीन
तू तीन तीन प्रश्नचिन्हे दिलेली चालतेत. म्या एक कॉमा इसरलो तर पळत आला टोचायला. छिद्रान्वेशी कुठला. (टक्या तुला लैच परफेक्ट बसतोय बे ह्यो शब्द)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्यारे१ Sat, 10/10/2015 - 09:26 नवीन
आम्ही एकदा कॉमा चुकून दुसरीकडं टाकलो होतो. >>>>>हो, शिंदळीच्या अशी शिवी आहे. ऐवजी >>>>>हो शिंदळीच्या, अशी शिवी आहे. असं एका थोर्थोर मिपाव्यक्तिमत्वास म्हणून आलो. ती व्यक्ति खरंच तशी असल्यानं तिनं दुर्लक्ष केलं बहुधा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
D
dadadarekar Sun, 10/11/2015 - 11:23 नवीन
इनोदास तेंव्हा दाद दिली नव्हती. आता देतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/13/2015 - 13:04 नवीन
खूप छान समजाउन सांगितलेत. एक सेपरेट लेख लिहून टाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सही रे सई Tue, 06/07/2016 - 22:53 नवीन
तजो, अतिशय नेमकं सांगितलत बघा. तेही अगदी उदाहरणासह स्पष्टीकरण द्या स्टाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
रंगासेठ गुरुवार, 10/08/2015 - 08:38 नवीन
>>आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्‍या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. << +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
P
palambar Sat, 10/17/2015 - 19:40 नवीन
perfect. आपल्या कडे एखादा शेरा आपण अगदि सहज मारतो. त्यातले आपल्याला कळो न कळो .खोल विचार वैगेरे कोण करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विजुभाऊ गुरुवार, 10/08/2015 - 09:53 नवीन
इतके सगळे असताना आपल्या देशी कंपन्या फक्त सेवा देण्यातच अडकून पडल्या आहेत. प्रत्येकानेच प्रॉड्क्ट डेव्हलप केले पाहिजे असे नाही. मायक्रॉसॉफ्ट , एस ए पी , गूगल , अ‍ॅपल मधले भारतीय लोक त्या कम्पन्याना प्रॉडक्ट डेव्हलप करुन देत असतातच. पण ते प्रॉड्क्ट त्या विदेशी कंपन्यांच्या नावावर जमा होते. भारतीय कंपनीच्या नावावर नाही
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/08/2015 - 10:23 नवीन
छान चर्चा. हल्ली तो 'प्रॉड्क्ट'च्या नावाने सगळीकडे उद्घोष चालू असतो.उत्साहापोटी काहीतरी नविन करण्याची मानसिकता भारतियांमध्ये तशी कमी असते.जो काही पगार्,सुखसोयी आहेत त्या पुढे रेटत कशा न्यायच्या ह्यावर भर.मग टाटा असो वा बजाज वा तुमची ती विप्रो...disruptive innovation का काय म्हणतात ते येथे घडायची शक्यता फार कमी असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्यारे१ गुरुवार, 10/08/2015 - 10:25 नवीन
यो यो माई आणि तुमचे हे! व्हाट्सअप दा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बिहाग गुरुवार, 10/08/2015 - 10:42 नवीन
एकदा लग्जरी गाड्या , घरे घेणाऱ्या लोकांची यादी बनवा ( BMX merc etc etc ) त्यात आएती वाले किती आणि नोन आएती वाले किती ते शोधा , दुसरी बाजू डॉक्टर कडे येणर्या लोकांची यादी तपासा ( मुले होण्यासाठी त्रीत्मेंत ते हृदय रोग पर्यंत ) त्यात आएती वाले किती ते शोधा आणि मग ठरवा.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/08/2015 - 11:11 नवीन
योग्य प्रश्न विचारलास रे बिहाग्या. मर्सेडिझ,ऑडीसारख्या प्रचंड महाग मोटारी लहान सहान धंदे-व्यवसाय करणार्या लोकांच्या आहेत.कर कसा चुकवायचा ह्या काळजीत असणारा हा नवश्रीमंत वर्ग तो हाच. औरंगाबादमध्ये २०० लहान मोठ्या व्यापार्यांनी २०० मर्सेडिझ गाड्या पूर्वी बूक केल्या होत्या त्याची आठवणे झाली.आता औरंगाबादेत आय.टी. कुठे? आय.टी.वाल्यांची झेप आय.१० किंवा स्वीफ्ट डिझायर पर्यंत असते असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिहाग
फ
फुलथ्रॉटल जिनियस गुरुवार, 10/08/2015 - 11:37 नवीन
भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद फोफावला आहे ,पुण्यासारख्या सांस्कृतीक शहराचे वातावरण बिघडायला हेच लोक कारणीभूत आहेत.व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे,वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दाखवत फिरणार्या आयटीतील तरुणी,यांच्यामुळे ईतरांची मनं कलुषीत होतात,मग गुन्हे आणी बलात्कार झाले की हेच आयटील लोक मस्त एसीत बसून ' सिक इंडीयन मेंटॅलीटिवर' लांबचौड्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकतात.पैसा कमावण्याला कोणाचीच हरकत नाही, पण त्याबरोबर सामाजिक भानसुद्धा ठेवने गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 10/08/2015 - 11:46 नवीन
आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी मी पण जबाबदार आहे हे मला गेल्या ~१० वर्षांत समजलंच नाही. बरं तुम्ही सांगितलं. "वासनेला खतपाणी" हे सगळ्यात भारी आहे. मी आठवतो आता कोणी कोणी काय काय केलं होतं वासनेला खतपाणी घालण्यासाठी ते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 07:49 नवीन
पाणी तरी घातलेच असशील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
न
नाव आडनाव Fri, 10/09/2015 - 08:08 नवीन
:) आयटीत काम करणार्‍यांची लैच भारी ईमेज आहे. जिनियस साहेबांनी .व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे, हे सगळ्याच आयटी वाल्यांना चिकटवून टाकलंय. बायदवे, जिनियस साहेब तुम्ही काय काम करता ओ? आणि तिकडे सगळे संत असतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 10/09/2015 - 08:24 नवीन
ओ जर्रा जपून की...आता जर जिनियस साहेब म्हणाले कि "मिपावर प्रबोधन करणे" हेच त्यांचे काम तर फट्ट म्हणता ब्रम्हहत्या व्हायची की =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/08/2015 - 12:23 नवीन
काय रे हे फूल्थ्रॉटल्या? दिल्लीत आय.टी. बरेच कमी आहे पण तेथे तर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. तिथे चेन्नईला आय.टी. कंपन्या बर्याच आहेत असे ऐकले आहे पण त्यामानाने अत्याचार कमी असावेत. होय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
फ
फुलथ्रॉटल जिनियस गुरुवार, 10/08/2015 - 12:47 नवीन
अपवादानेच नियम सिद्ध होतो ना हो माईसाहेब! चंगळवाद करायला हरकत नाही, पाश्चीमात्य देशात असे करायला काहीच अडचण नाही,तिथे सामाजिक भान मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच बरोबर आर्थिक संपन्नताही आहे. परंतु भारतासारख्या देशात जिथे प्रचंड प्रमाणात आर्थिक आणि लैंगिक दमन होत असते अश्या ठिकाणी तरी आर्थिक ,लैंगिक चंगळवादाचे जाहीर प्रदर्शन करु नये.हे प्रदर्शन फक्त आयटीवालेच करतात असे नव्हे ,पण भारतात आयटीवाले यात आघाडीवर असतात हे सत्य कोणी नाकरु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 12:56 नवीन
भारताची लोकसंख्या आणि तीत काम करणार्‍या आयटीवाल्यांची (ऑन-साइट वजा) बघितली तर आयटीवाले फार प्रभाव टाकू शकत असतील असं वाटत तर नाही. भारतात जेवढे आयटीवाले आहेत त्यापेक्षा जास्त तर दरवर्षी बलात्कार होत असतील. पण तुम्हाला काही सत्ये जास्त चांगली कळतात ह्याला आमचे आंधळे अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/08/2015 - 13:48 नवीन
आर्थिक ,लैंगिक चंगळवादाचे जाहीर प्रदर्शन करु नये
तुमच्या मुंबापुरीत व दिल्लीत तर हे आय.टी. यायच्या कित्येक वर्षे आधीपासून चालू आहे.हिंदी चित्रपटांमध्ये जे दाखवले जाते त्यालाही आय.टी.वालेच जबाबदार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lakhu risbud Sat, 10/10/2015 - 11:58 नवीन
आयला ! कसं जमतं ओ ? डाव्या हातानं उजव्या हाताला प्रतिसाद देता काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/08/2015 - 16:58 नवीन
धागा शतकी करण्यासाठी तुम्चा काय रेट आहे हो फुजि !? तुम्चं रेट्कार्ड प्रसिद्ध कराच येक्दा... म्युचुअल्ली बेनेफिशियल व्हईल बगा ! =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/08/2015 - 17:43 नवीन
अजून धाग्यात दरेकर वा गुरूजी आलेले नाहीत.नाहीतर रविवार पर्यंत ३००च्या वर प्रतिसाद व सोमवारी धागा वाचन्मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तर्राट जोकर गुरुवार, 10/08/2015 - 17:55 नवीन
त्यांच्या वकुबाचं इकदे काय दिसत नाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
ब
बॅटमॅन Fri, 10/09/2015 - 08:56 नवीन
आयटी क्रांती किंवा क्रायसिस यांपैकी कशाशीच आरेसेस किंवा भाजपाचा संबंध कुणी न जोडल्यामुळे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ड
डायवर गुरुवार, 10/08/2015 - 11:47 नवीन
पुण्यात ५ ते ६ फ्रेशर आईटी इंजीनियर एकाच २बीएचके मध्ये राहताना सर्रास दिसतात. विशेषत वाकड, औंध, पिंपळे सौदागर, बाणेर, हिंजवडी , येरवडा अन विमान नगर या भागात. त्यांचाकडे बघून असे काही वाटत नाही कि ते पैश्यांची उधळपट्टी, चंगळवादी जीवन वगैरे जगतात. आणि क्याम्पस प्लेसमेंट न मिळालेले उमेदवार अगदी ७ हझारांवर करीयर सुरु करताना पाहिले आहेत. तेदेखील दोन वर्षांच्या बाँड वर. स्वीच मारताना २/ ३ महिन्यांचा नोटीस पिरेड असतो, अन तेवढे थांबण्याची दुसर्या कंपनीची तयारी नसते. कंपनी दिवसाला १२ तास राबवून घेते, यातून काहींना मणक्याचे अन डोळ्यांचे विकार जडतात. थोडक्यात सरसकटीकरण योग्य होणार नाही. ऑन साईट बद्दल बोलायचे झाले तर टीम मधल्या सर्वांनाच परदेशात जायचे असते अन संधी कमी असतात त्यामुळे टीममध्ये भयानक स्पर्धा, हेवे दावे, परस्पर चुगल्या, अविश्वास राजकारण चालते. थोडक्यात मला असे म्हणायचे आहे कि बाहेरून दिसते तेवढे आत सुखासुखी नसते.
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 10/08/2015 - 11:54 नवीन
चान चान लेख वाचुन मनोरंजन झाले. मिपाकरांच्या माहितीत भर घालणारे काही जिनियस प्रतिसाद तर त्याहुनही रोचक.
  • Log in or register to post comments
ल
लक्ष्या गुरुवार, 10/08/2015 - 12:40 नवीन
वाचतोय..... पण वरील गोष्टीचा आणि आमचा काही संबंध नाही... आढळल्यास एक योगायोग समजावा....
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली गुरुवार, 10/08/2015 - 13:07 नवीन
आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. - होय. (फ्रेशर्स न्हवे) २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. - मिसळपाववरुन वेळ मिळाला की बरीच कामे असतात. ती वेळेत उरकावी लागतातच. जशी एखादी कुटूंबवत्सल नोकरदार स्त्री घरातील सर्व जबाबदार्‍या पार पाडून नोकरीही व्यवस्थीत सांभाळते तसेच आय्टीवाले नेटसर्फींग करुनही क्लायंट रिक्वायरमेंट्स हसत हसत पुर्ण करत असतात. (पण यात कुम्टुंबसुख प्रकारचा बोर्‍या वाजतो, ज्याची भरपाइ घसघशीत इनकम स्वरुपात होउन जाते) ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? - ते नुकसान झाले की बरोबर लक्षात येते. ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. - होय. यात बर्‍यापैकी तथ्य आहे. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. एव्हडे नाही पण नोकरदार या वर्गात मोडुनही तोंडात बोटे जातील इतकी प्रचंड रक्कम बरेचदा नक्किच मिळुन जाते. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. - होय. पण त्यांना फक्त तिथेच जावे लागते असे नाही. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) - होय. ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. - आधी वाटायचे त्यांना मेकप करणे जमत नाही, पण परप्रांतीयांशी कंपिटीशन बघता बघता म्राठी पोरी ज्या आधी पोस्टात नोकरीला आल्या आहेत प्रमाणे भासत त्या सॉलीड काँम्पीटीटीव झाल्या आहेत. असो मुळात आय्टीवाल्या मुलीने घरकाम का करावे ? आय्टीतच काम करावेना ? ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही आत्मविश्वासाचा आभाव. मराठी लोक धंध्यात ज्यामुले मागे आहेत बरेचदा तेच कारण भारतीय लोक सेवा उद्योग का सोडु शकत नाहीत याला लागु होते. अर्थात काळ बदलत आहे पण अजुन लायकी आलेली नसल्याने चाचपडणॅच चालु आहे. १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल. दिवास्वप्न आहे.
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 10/08/2015 - 14:20 नवीन
श्रीगणेश लेखमालेतील अकरावा लेख म्हणा याला.... अप्रतिम! कसला अविर्भाव नाही, सावरून घेणं नाही, जे आहे ते आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 10/13/2015 - 12:10 नवीन
उत्तम प्रतिसाद! बाकी नं. १० अगदी खोटं आहे असंही म्हणता येणार नाही. अगदी माज नसला उतरणार तरी घाम नक्की फुटेल. परत आलेल्या भारतीयांच्या जागी तिथले लोक घेणं आर्थिक दृष्ट्या अजिबात शक्य नसल्यामुळे तेथील कंपन्या ज्याला आम्ही क्लायंट म्हणतो त्यांचा IT इन्फ्रास्ट्रक्चर डबघाईला येऊ शकता. म्हणजेच पर्यायाने अमेरिकन अर्थव्यवस्थेला घाम फुटू शकतो. अर्थात असं प्रत्यक्षात घडवून आणणं अजिबात शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
ट
टवाळ कार्टा Tue, 10/13/2015 - 12:36 नवीन
wait till chine learns english which they are doing at very rapid rate don't underestimate Philippines which already overtook india in BPO call center business
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ट
टवाळ कार्टा Tue, 10/13/2015 - 12:37 नवीन
and at both places, salaries are less compared to indian salaries for same positions
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 10/14/2015 - 12:13 नवीन
भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे. सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात. सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 10/14/2015 - 12:51 नवीन
मला नाही वाटत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
त
तर्राट जोकर Wed, 10/14/2015 - 13:06 नवीन
भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे. >> व्यापार्‍याला पैसाच प्यारा, तो कुठे वाचतो ह्याचाच तो विचार करतो. २००८ नंतरच्या मंदीत भारतातले प्रोजेक्ट चीनमधे गेलेले बघितले आहेत सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात. >> व्यापार्‍याला या गोष्टींचा विचार करायची काहीच गरज नाही. दोन पैसेही कुणी कमी दर देत असेल आणि तोच दर्जा मिळत असेल तर तो तिकडेच जाईल. याउप्परही थोडा कमी दर्जा चालवून घेऊन पण आत्ता पैसा वाचतोय ना असा विचार भारतातले प्रोजेक्ट चीनमधे जातांना केला गेला. वर त्यांनाही थोडा अनुभव येइल, मग याच अनुभवाचा फायदा आपल्यालाही भविष्यात होईल हा सुविचारही त्यामागे होता. कॅपीटलिस्ट हॅव नो नेशन. ओन्ली कमीशन इज दीअर रीलीजन. सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही. >> या भ्रमात न गेलेलेच बरे. वरच्या माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आयटी मेंदूचं क्षेत्र आहे. मेंदुवर कुणाची मक्तेदारी नाही. पासा कभीभी पलट सकता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 10/14/2015 - 14:23 नवीन
स्वस्त वि. टिकाऊ (थोडक्यात महाग) अशी साधी तुलना आहे ही. स्वस्त (चीन) घेणारेही असतात , टिकाऊ (अमेरिका) घेणारेही असतात. पण तुलनेने-स्वस्त आणि टिकाऊ (भारत) घेणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त असते. कुठलाही व्यापारी चार पैसे वाचतात म्हणून सगळा व्यवसाय धोक्यात नाही घालणार. IT मध्ये करोडो रुपये गुंतवणूक करणारे नक्कीच त्याचं महत्व जाणून असतील. आणि मेंदूचाच प्रश्न असेल तर तो विश्वास आपल्या लोकांच्या मेंदूवर ठेवायला काय हरकत आहे? एनीवेज, चर्चा मूळ विषयापासून भरकटतेय आणि वरून मुळ लेखातला मुद्दा नं . २ सिद्ध होण्याची भीती :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 10/14/2015 - 14:31 नवीन
तुमच्या प्रतिसादावरून मला असं जाणतंय की माझं आयटीक्षेत्राबद्दलचं ज्ञान फारच तोकडे आहे. असो. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
अ
अद्द्या गुरुवार, 10/08/2015 - 13:16 नवीन
फक्त पगार दिसतो . तो हि १० पैकी ३-४ जणांना तसा मिळतो . पण १० पैकी १० लोकांना वयाच्या २५-२६ व्या वर्षी झालेले पाठीचे विकार . डोळे / डोके दुखी , अपुऱ्या आणि कैच्या काय वेळेला झालेली / न झालेली झोप आणि त्यामुळे इतर विकार . हे सगळं बघता का ? आता म्हणाल या आणि अश्या गोष्टी असतातच कि इतर व्यवसायात .. हो असतात .. जरूर असतात . पण मग याहून जास्त पैसा पण असतो . काही लोक लेथ मशीन समोर १४ तास राबतात . . काही लोक कम्प्युटर समोर १४ तास राबतात . शेवटी हिशोब तोच . त्यामुळे . असोच
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 10/08/2015 - 14:37 नवीन
...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 14:44 नवीन
अच्चा म्हणजे एसीमध्ये बसून केलेली राबणूक ही राबणूक नव्हेच तर. ओह आय सी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 10/08/2015 - 14:54 नवीन
उपरोध आहे रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/08/2015 - 14:59 नवीन
रैट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आदूबाळ गुरुवार, 10/08/2015 - 16:49 नवीन
ओह् ए सी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अद्द्या गुरुवार, 10/08/2015 - 14:58 नवीन
असते कि !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा