Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आयटीवाले !

व
विजुभाऊ
गुरुवार, 10/08/2015 - 04:29
🗣 209 प्रतिसाद
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते. त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते. एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो. यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल? लोकांच्या मते १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. २) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात. ३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ? ४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला. ६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात. ७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्‍या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..) ८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही. ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही १०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
आयटीवाले

प्रतिक्रिया द्या
67105 वाचन

💬 प्रतिसाद (209)
अ
अभिजित - १ Tue, 10/20/2015 - 15:38 नवीन
अरेच्या !! इतक्या कठीण प्रश्नांचे उत्तर इतके सोपे आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
त
तर्राट जोकर Tue, 10/20/2015 - 20:27 नवीन
समस्या सोडवायच्या असतील तर उपाय खूप असतात. आपल्याला मोबाँड माहीती असेल. एम-इंडीकेटर वापरत असाल. फुकट आहे. त्यांना जाहिरातीतून प्रचंड पैसा मिळतोय. युजर्सनी विकत घेतले नसते. विकत घेतले असते त्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहेत. एवढं उदाहरण पुरेसे आहे. भारतीय मानसिकतेला दोष द्यायचा असेल तर तो सॉफ्ट्वेअर बनवणार्‍यांच्या द्या. कोण पैसे देणार नाही, सगळ्यांना फुकट पाहिजे ह्या विचाराने कुणी काही बनवत नाही. पैसे मिळाले पाहिजे म्हणून कोणी काम करत असेल तर ते कधीच होणार नाही. कळकळ पाहिजे. तळमळ पाहिजे. कित्येक एकांडे शिलेदार छोटी छोटी सॉफ्टवेअर बनवतात. फ्री-वर्जन देऊन नंतर पेड वर्जनमधे चांगले कमावतातही. अशा पद्धतीने काम करणार्‍या भारतीयांचे काही उदाहरण आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोग्याम्बो
श
शाम भागवत Fri, 06/10/2016 - 18:10 नवीन
बराहा याचे उत्तम उदाहरण होऊ शकेल. जवळजवळ ७-८ वर्षे बराहा फुकट होते. शेवटचे फ्री व्हर्जन ९.२ आता मात्र पैसे पडतात. खपत की नाही ते माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
शाम भागवत Fri, 06/10/2016 - 18:13 नवीन
पण प्रॉडक्ट म्हणून सर्वात यशस्वी म्हणायचे असेल तर क्विक हीलचे नाव घ्यावे लागेल. म्हणजे माझी अशी समजूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अर्धवटराव Tue, 06/07/2016 - 21:07 नवीन
बाकि बरोबर आहे... प्र. क्र. ८ बद्दल नो कमेण्ट्स ;)
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Tue, 06/07/2016 - 21:17 नवीन
200 च्या दिशेने विजुभौंनी धागा दौडवला आहे. विजुभौ, आपलेच धागे वर आणत असतात असं एक निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Fri, 06/10/2016 - 09:52 नवीन
"डफलीवाले डफली बजा " सारखे "आयटीवाले किबोर्ड बजा" असे गाणे यायला हरकत नाही .
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 02/08/2023 - 08:17 नवीन
कोवीड नंतर ही या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाहिय्ये
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 02/12/2023 - 14:02 नवीन
माझ्या नात्यातील 'आयटीवाल्यां'ना या लेखाचा दुवा मी पाठवला होता, त्यापैकी माझ्या पुतण्याने खालील मजकूर पाठवलेला आहे: ९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही याचं कारण असं की भारतात STEM (Science, Technology, Engineering Mathematics) मध्ये Masters आणि PhD level च्या universities अत्यल्प आहेत. Innovation needs research and USA is 10x ahead of India in research capacity. China has invested strategically in research capacity over the last 20 years - I have seen it personally - and has gone far ahead of India in innovation. China has companies like Tencent and Alibaba that rival Microsoft and Amazon
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा