आयटीवाले !
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
- काहितरी शिक आणि आयटीत घुस, हि प्रथा हळू हळू बंद होईल
- पुर्वीसारखं एक टेक्नॉलॉजी शिकून काढले ५-७ वर्ष आणि मग मॅनेजर बनून झालो निश्चिंत असे चालणार नाही
चांगली काम मिळवण्याची अंतर्गत स्पर्धा फार तीव्र झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे बर्याच कंपन्यानी ऑनसाईट्/ऑफशोर रेशो बराच कमी केला आहे. त्यामुळे परदेशी जाण्यास फारच विलंब होत आहे अथवा अशी संधीच मिळत नाहिये. आधी १-२-३ वर्षात अमेरिकास्वारी, तिथे काही वर्षे नोटा छापून भारतात परत, मग लग्न, मग परत जमले तर एक स्वारी आणि मुल झाले कि भारतात सेटलमेंट हे चक्र मोडलेले आहे. आता अशी संधी मिळण्यासाठीच ५-६-७ वर्षे थांबावं लागत आहे. थोडक्यात "आधीसारखं (सोपं) राहिलं नाही आता"! अजुन २५-३० वर्षे या क्षेत्रात काढायची असतील तर हा सर्व विचार करायलाच हवा.