मोहरम : माहिती हवी आहे
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले.
या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
💬 प्रतिसाद
(128)
स
सौंदाळा
Fri, 10/16/2015 - 07:10
नवीन
मी वाचलेली माहिती:
महंमद पैगंबरांनी इस्लामची सुरुवात आणि प्रसार केला. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी वार्धक्यामुळे त्यांना इकडे तिकडे फिरुन धर्मप्रसार करणे जमेनासे झाले. त्यामुळे ती धुरा त्यांनी त्यांचा जावई हुसेन याच्यावर सोपवली. आणि तेव्हाची जी तरुण पिढी ज्यांनी पैगंबरांना पहिले नव्हते ते हुसेनला श्रेष्ठ मानु लागले. यामुळे हळुहळु दोन गट तयार झाले.
महमंद पैगंबरांना मानणारा गट जो सुन्नी म्हणुन ओळखला जाऊ लागला.
हुसेनला मानणारा गट जो शिया म्हणुन ओळखला जाऊ लागला.
महंमद पैगंबराच्या मृत्युनंतर त्याच्यासमर्थकांनी इराणच्या वाळवंटात हुसेन आणि त्याच्या काही अनुयायांचा निर्घृण खुन केला.
तोच दिवस मोहरम म्हणुन साजरा केला जातो.
हा शियापंथीय मुस्लिमांचा सण असुन तो त्यांच्यासाठी दु:खाचा दिवस आहे.
बारीकसारीक तपशील चुकलेले असु शकतात पण जे आठवले ते ढोबळमानाने लिहिले आहे.
अधिक माहिती वाचण्यास उत्सुक.
भारतात कोणते मुस्लिम अधिक आहेत हे माहित नाही. तसेच मोहरमला ताबुत वगैरे का काढतात माहिती नाही.
ब
बॅटमॅन
Fri, 10/16/2015 - 08:36
नवीन
मोहरम फक्त भारतातच नव्हे तर इराणातही साजरा केला जातो. सुन्नीबहुल देशांत तितकासा होत असावासे वाटत नाही कारण हा प्रकार बरेच लोक गैर इस्लामिक समजतात.
प
प्यारे१
Fri, 10/16/2015 - 08:42
नवीन
अल्जीरिया मध्ये मुहर्रम म्हणजे हिजरी नवीन वर्षाची सुरुवात एवढंच ठाऊक आहे. इतर ठाऊक नाही.
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 09:23
नवीन
ते मातम का काय इकडे भारतातच होतं काय? रक्ताने माखलेल्या झुंडी बघितल्यात मुंबैत...
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 09:38
नवीन
म्हणजे? कसला मातम? काही कळल नाही. मुंबै भारतात नाही का?
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 10:02
नवीन
अर् भिया तुमको मातम नई मालुम...?
https://en.wikipedia.org/wiki/Mourning_of_Muharram#Matam
विशेष सूचना:फोटो संवेदनशील मनांसाठी त्रासदायक आहेत.
आणि प्रतिसाद नीट वाचत जा राव..! मी भारतातच होतं का असं विचारलंय, तुम्ही काय वाचलं?
तर्राट तो हम है पर दुनिया क्यूं झूम रही है रे मौला....
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 10:06
नवीन
ते मातम का काय इकडे भारतातच होतं काय? रक्ताने माखलेल्या झुंडी बघितल्यात मुंबैत...
काय अर्थच लागेना हो. कदाचित मला कमी पडली असावी.......
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 10:13
नवीन
अर्रे, चमचा कुठे गेला...? हां सापडला.....
हे घ्या.
आस्सं वाचा रावजी...
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 10:30
नवीन
"ते मातम का काय इकडे भारतातच होतं काय? रक्ताने माखलेल्या झुंडी बघितल्यात मुंबैत..". = "रक्ताने माखलेल्या झुंडी बघितल्यात मुंबैत...ते मातम, का काय, इकडे भारतातच होतं काय? इतर देशांत होत नाही का?"
आस्सं वाचा रावजी...
तो चमचा ठेवूनच घ्यावा लागेल......असो. माहितीसाठी धन्यवाद.
स
सूड
Fri, 10/16/2015 - 10:31
नवीन
ओ जोशीकाका, जे काय विचारायचं ते स्पष्ट विचारा ना!! का उगा लांबड लावताय.
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 10:20
नवीन
टांझानिया, यु पी- इंडिया ,इराण, लकनौ- इंडिया, बाहरेन,इंडोनेशिया ( इंडिया इन जनरल सगळ्या राज्यात आहेच. .)
पण सौदी, कतार, यु ए इ, कुवेत, ओमान हे महत्वाचे देश दिसत नाहीत. batman म्हणताहेत तसंच दिसतंय. शिया बहुल भागातच हा मातम केला जात असावा.
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/16/2015 - 09:31
नवीन
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 09:40
नवीन
याचा उपयोग हिंदू सणांमध्ये विशेषतः दिवाळीत जास्ती होतो ना? मोहरम चा काय संबंध?
असेही नेत वर काहीच माहिती नाही. फक्त तारखा आणि दिवस आहेत. बाकी इतर कोणत्याही सण/ देव व्यक्तीविषयी गुगल केल्यास ढीगभर माहिती इलते चांगली आणि वाईट.
ट
टवाळ कार्टा
Fri, 10/16/2015 - 10:36
नवीन
प
प्यारे१
Fri, 10/16/2015 - 11:09
नवीन
याच्यात 'पूस्प्गुच' ची मजा नाय रे
अ
अस्वस्थामा
Fri, 10/16/2015 - 12:49
नवीन
लहान पणी (ग्रॅहम गूचसाठी) "आला गूच मारलं बूच" म्हणायचो ते आठवलं यावरुन.. ;)
द
दत्ता जोशी
Fri, 10/16/2015 - 09:36
नवीन
"हा शियापंथीय मुस्लिमांचा सण असुन तो त्यांच्यासाठी दु:खाचा दिवस आहे."
ओह्ह ..! माझ्या एका मित्राने सांगितले कि या दिवशी धर्म प्रस्थापनेसाठी मुसा/ मोझेस ने इजिप्तवर विजय मिळवला. म्हणून हा सेलेब्रेशन/ आनंदाचा सण आहे.
"सुन्नीबहुल देशांत तितकासा होत असावासे वाटत नाही"
असेल असंहि. पण बहुतांशी ठिकाणी होत नाही. मी तोच विचार करत होतो असं का?
विश्वास पाटलांच्या पानिपत मध्येही असा उल्लेख आहे खरं.
ब
बॅटमॅन
Fri, 10/16/2015 - 09:51
नवीन
जगात जेवढे मुसलमान आहेत त्यांपैकी ८०% पेक्षा जास्त सुन्नी आहेत. शिया एकदम अल्पसंख्य आहेत, एकमेव शियाबहुल देश आजमितीस इराण हा आहे. मोहरम हा अल्पसंख्य शियांचा सण असल्याने तो फारसा न होणे हे क्रमप्राप्तच आहे.
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 10:04
नवीन
मुहर्रम चा मातम बघितला तर कट्टरतेची शिकवण कशी मिळते हे सोदाहरण पटतं.
ब
बॅटमॅन
Fri, 10/16/2015 - 11:01
नवीन
तसं वाटत नाही. त्याकरिता अजून अनेक उदाहरणे आहेत.
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 11:12
नवीन
ते तर आहेच.
धर्मासाठी रक्त कसं वाहायचं याची शिकवण नकळत्या वयापासून दिली जाते ते दिसलं म्हणून आपली टिप्पणी...!
ज
जातवेद
Fri, 10/16/2015 - 11:47
नवीन
माचिस काय संपत नाय आज :)
प
पेरु
Fri, 10/16/2015 - 10:55
नवीन
ही स्टोरी वडिलांनी सांगितली होती. हसन आणि हुसेन आणि दुसरा गट (शियागट बहुतेक) यांच्यात युद्ध चालु होते तर त्या दुसर्या गटाने हसन आणि हुसेन नमाज पढत असताना त्यांना मारले. म्हणुन या गटाचे लोक त्या चुकिचे प्रायश्चित्त म्हणुन दर वेळेस ताबुतासमोर स्वतःला मारुन घेतात.
ताबुत बहुतेक हुसेनच्या स्मरणार्थ बसवतात. ताबुताचे विसर्जन करुन आल्यावर लोक 'अल्विदा रे अल्विदा' असे काहीतरी गाणेही म्हणयाचे. वडीलांना गाणे आठवत असेन तर सांगते विचारुन.
मला मात्र ताबुत म्हणल्यावर त्यावेळेस मिळणारे सब्जा घातलेले सरबर आठवते फक्त.
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/16/2015 - 11:20
नवीन
इस्लामी पंचांगातला पहिला महिना म्हणजे मुहर्रम. या महिन्याच्या दहा तारखेला शिया लोक मातम मनवतात. अरबी भाषेत दहाला आशरा म्हणतात. म्हणून या मातमच्या प्रसंगाला आशुरा असेही म्हणतात. (आपण जसे एकादशीच्या उपासालाही एकादशीच म्हणतो तसे.)
आता हा शोक कसला? कुणासाठी? हे समजून घेण्याकरता आपल्याला इस्लामच्या सुरूवातीच्या काळात जावे लागेल.
मुहम्मदाच्या मृत्यूनंतर लगेचच काही वाद सुरू झाले होते. यात प्रामुख्याने, मुहम्मदाचा उत्तराधिकारी कोण? हा मुद्दा होता. काहींच्या मते, मुहम्मदाचा चुलत भाऊ आणि जावई, अली, हा त्याचा खरा उत्तराधिकारी होता. मुहम्मदाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू असतानाच, मदिनेतील काही प्रमुख मुस्लिम धुरीणांशी संगनमत करून अन्य काही मुसलमानांनी मुहम्मदाचा एक सासरा अबू बकर याला वारस म्हणून निवडले आणि त्याला खलिफा म्हणून घोषित करून टाकले. मुसलमानांची एकी टिकून राहावी म्हणून अली व अन्य कुटुंबियांनी अबू बकरच्या नियुक्तीला पाठिंबा दिला व रशिदून खिलाफतीची सुरूवात झाली. अबू बकर नंतर अजून दोन खलिफा झाले. पण बर्यापैकी अनागोंदी पसरली होती. अस्थैर्य माजले होते. खलिफाचा खून झाला. म्हणून, अलीला खलिफा केले गेले. पण त्याच्याविरूद्धही उठाव होत राहिले. सतत युद्धं होत राहिली. या यादवी युद्धाला 'पहिला फितना' म्हणतात. फितना म्हणजे, दुही. या सर्वा भानगडीत अलीची बाजू ज्यांनी घेतली ते शिया. अरबीत शिया म्हणजे 'सामिल असलेले'. जे अलीला सामिल होते, ते शिया.
पुढे अलीचा नमाज पढत असताना, सज्दा केलेला असताना, खून केला गेला. त्यानंतर त्याच्या खुनात सहभागी असणारा मुआविया खलिफा झाला. पण अलीचा मोठा मुलगा हसन इब्न अली याने बंडाचा झेंडा उभारला. पण कालांतराने काही शर्तींवर त्याने मुआवियाशी असलेले भांडण थांबवले. पण कालांतराने मुआवियाने त्याचा खून करवला.
त्यानंतर अलीचा धाकटा मुलगा हुसेन हा उभा राहिला. इकडे मुआवियाही वारला आणि त्याने खिलाफत आपला मुलगा याझिद याच्या हाती सोपवली. शियांची अशी अपेक्षा होती की मुआवियानंतर खिलाफत अलीच्या वंशावळीत परत येईल. पण तसे झाले नाही व त्यामुळे हसन व त्याच्या साथीदारांनी याझिदच्या पायी निष्ठा वाहाण्यास नकार दिला. हुसेन आपल्या कुटुंबीय आणि साथीदारांना घेऊन मदिनेहून कुफा नामक गावी निघाला. रस्त्यात, करबला जवळ, याझिदच्या मोठ्या सैन्याने त्यांची वाट अडवून त्यांन घेरले. इथेच ती प्रसिद्ध आणि निर्णायक करबलाची लढाई झाली. तारीख होती, १० मुहर्रम. या लढाईत हुसेनचा पराभव झाला. त्याच्या साथीदारांची कत्तल झाली. अली असगर नामक त्याच्या सहा महिन्यांच्या मुलाचीसुद्धा हत्या केली गेली. या लढाईच्या वेळी हुसेनच्या सैन्याला पाण्यावाचून तडफडावे लागले. अतिशय हाल झाले.
या सर्व घटनाक्रमाबद्दल शोक व्यक्त करण्याकरता शिया आजही मातम मनवतात. आजच्या दिवशी शोक व्यक्त करणे, रडणे वगैरे कार्यक्रम सामुहीक पद्धतीने चालतात. त्यावेळी हुसेन व इतर शियांना झालेल्या जखमांप्रित्यर्थ आजचे शियाही स्वतःला जखमा करून घेतात. तलवारीने स्वतःला कापून घेतात. धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला (कडकलक्ष्मीसारखं) मारून घेतात. हा दिवस सणाचा नाही तर दु:खाचा आहे. पाण्याचे वाटप करणे हा ही एक फार महत्त्वाचा प्रकार असतो.
सुन्नींच्या तुलनेत शिया कमी आहेत. इराण हा सर्वात मोठा शिया देश. (इराण शिया कसा झाला याचीही हकिकत मनोरंजक आहे.) शियांची लक्षणिय संख्या असलेले अनेक देश आहेत. बाहरीनसारख्या देशांत शिया बहुसंख्यही आहेत. पण राजवट शिया असलेला इराण हा एकमेव देश.
आजही शिया-सुन्नी भांडण हिरिरीने चालू असते. 'एकवेळ हिंदू परवडले, ते उघडपणे काफिर आहेत. पण शिया एक नंबर ह_मी. मुस्लिम असल्याचं सोंग घेऊन धर्म भ्रष्ट करतात.' हे वाक्य मी अनेकदा ऐकले आहे.
प
प्रभाकर पेठकर
Sun, 10/18/2015 - 15:48
नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद. ज्ञानात बरीच भर पडली. धन्यवाद बिपिन.
(आधीच्या प्रतिसादातील मुख्य अंग (मजकूर) का आणि कसे गायब झाले कळत नाही.)
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 17:42
नवीन
धन्यवाद साहेब.
क
कोमल
Sun, 10/18/2015 - 16:07
नवीन
माहितीपूर्ण प्रतिसाद बिका.
धन्यवाद __/\__
इराण शिया कसा झाला त्याचाहि किस्सा येउ द्या की
ब
बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/18/2015 - 17:46
नवीन
धन्यवाद कोमल.
इराण शिया कसा झाला (मुळात इराण मुस्लिमच कसा झाला) ही हकिकत रोचक आहेच. पण एक मोठी लेखमाला लिहायचा विचार कधीचा आहे मनात. त्याचा भाग म्हणून ही हकिकत येईल. :)
ब
बॅटमॅन
Sun, 10/18/2015 - 18:00
नवीन
इराणात सफवी राजघराण्याची सत्ता पसरली तसे त्या घराण्याच्या संस्थापकाने - आयमीन प्रथम मोठ्या राजाने- आणि त्याच्या वंशजांनी शियापंथीय धर्मगुरू इराक वगैरे भागातून आणणे सुरू केले, त्यांना मोठी अनुदाने दिली आणि कैक सुन्नींचे हत्याकांड केले. हळू हळू इराण सुन्नीचा शिया झाला.
इराण मुळात मुस्लिम देशच नव्हता. ६४४ सालानंतर अरबांनी इराण मुसलमान केला. त्याचीही स्टोरी काहीशी अशीच आहे.
व
विशाखा पाटील
Tue, 10/20/2015 - 13:46
नवीन
+ १
इराणचा शिया पंथीय होण्याचा इतिहास रोचक आहे.
सफाविद घराण्यातल्या इसमाइल या सोळा वर्षांच्या मुलाने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पर्शिया पादाक्रांत केले. या राजाने फर्मान काढले, 'माझ्या राज्यात फक्त इमाम अली आणि त्यांच्यानंतरचे इमाम यांनाच मानण्यात येईल. यापुढे सर्व जनता अलींच्या पक्षाची म्हणजे शिया होईल.'
तेव्हापासून इराण शियापंथीय झाले. अरब जगात बहुसंख्येने सुन्नी - सुरुवातीच्या चार 'खलीफां'ना मानणारे. शिया मुस्लिम अली आणि त्यांच्यानंतरच्या बारा 'इमामां'ना मानणारे. याशिवाय बारीकसारीक भेद आहेतच.
या इराणच्या सफाविद घराण्यातल्या शहाने शेजारच्या मेसोपोटेमियाकडे लक्ष वळवल्यावर तुर्की सम्राट पुढे आला. तुर्कस्तान आणि इराण यांच्यामधल्या या पट्ट्यात दोन्ही पंथांनी मूळ धरले. आज इराक, लेबनॉन, सिरीया या देशांची जी लक्तरे निघाली आहेत, त्यामागे सुन्नी - शिया पंथातली ही तेढ कारणीभूत आहे. इसिसचा उदयही काही प्रमाणात या तेढीशी निगडीत आहे.
यावर सविस्तर लेख लिहिता येईल, पण टंकनकंटाळा... बाकी माझ्याच 'धागे अरब जगाचे' या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिले आहेच.
व
विशाखा पाटील
Fri, 10/16/2015 - 11:33
नवीन
मोहर्रम हा सण नसून तो शोकाचा काळ आहे.
अधिक माहितीसाठी - https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Karbala
त
तुडतुडी
Fri, 10/16/2015 - 11:53
नवीन
हे तितकंसं खरं नाही . सुन्नी आणि शिया पंथीयांच्या लढाईत इमाम हुसेन मारला गेला . शियांमध्ये माणूस मेल्यानंतर ४० दिवस दुखावटा पाळला जातो . ह्या ४० दिवसांमध्ये शिया जेवढा शोक व्यक्त करता येईल तितका करतात . मशिदीत जावून रडतात . छाती पिटून घेतात . मिरवणुकांमध्ये शिया पुरुष एका लयीत छाती पिटून घेताना बघितले असतील . काही कट्टर धार्मिक लोक अंगावर जखमा करून घेतात . एक घाव वाळला कि रक्त वाहतं राहावं म्हणून नवीन घाव करून घेतात . १४०० वर्षांपूर्वी लढाईत गेलेल्यासाठी आत्ता इतका शोक करणं उचित आहे का ?
मोझेस ला देवाने promised land म्हणून इजिप्तला जायला सांगितलं . पण इजिप्तमध्ये पोच्यापुर्वीच त्याचा जॉर्डन मध्ये मृत्यू झाला . पण जॉर्डन च्या भूमीवरून त्याने इजिप्तला डोळे भरून बघून घेतलं होतं .
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 12:00
नवीन
आल्यात का...? मला वाटलं ब्यान बीन झाल्या का काय..?
अलबत्, ७५०० वर्षांपूर्वी जिंकून आलेल्यांप्रित्यर्थ आजही गुढी उभारणे उचित असेल तर काय चुकीचंय..?
अन् तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल तर तिकडे फेसबुकवर त्यांचे खूप सारे गृप आहेत तिकडे जाऊन प्रबोधन करून बघा काही उजेड पडतो का? इकडं असं बादरायण शिंपण उचित आहे का?
D
dadadarekar
Fri, 10/16/2015 - 15:06
नवीन
मुसलमानांच्या कुठल्या गादीसाठी कसे रक्त्पात झाले , हे इथले लोक अगदी जिभल्या चाटत वाचतात.
आणि महाराष्ट्रात हिकडच्या आणि तिकडच्या गाद्या आपापसात कशा लढत होत्या , ते सांगा म्हटलं तर जीभ गुंडाळून घेतात.
क
काळा पहाड
Fri, 10/16/2015 - 20:29
नवीन
नाही आम्ही ते पण वाचतो, हे पण वाचतो. पवार घराणं आणि देशमुख घराणं कसं लढलं, फडणवीस आणि ठाकरे सरदारांचे वाद कसे होतात वगैरे कथा पण आम्ही चवीने वाचतो. खरं सांगायचं तर मोहम्मद आणि त्याचे पुत्र पौत्र यांच्याबद्दल आम्हाला फारसा इंटरेस्ट नाही. ते तिकडे मेले ते मेले. आम्हाला काय देणं का घेणं! पण हिंदूराष्ट्रात हे मुसलमान उगीचच ट्रॅफिक जाम करतात त्याचं आम्हाला वैषम्य वाटतं. सगळ्यांनी पवित्र स्थळी कायमची सुद्धा जायला आमची हरकत नाही, जरी तशी आमची इच्छा नसली तरी. बाकी तुम्हाला एकदा फुटा म्हटलं तर कळत नै कै? जिथं तिथं जावून पुड्या सोडता ते. एक तुमचा मुसलमान नावाचा धागा तयार करा आणि त्याच्यावर असल्या आंबट ढेकरा देत बसा. तुम्हा लोकाना जनाची नै तर मनाची तर है का मार खाऊन मगच शुद्धीवर येणार?
द
दत्ता जोशी
Sat, 10/17/2015 - 12:14
नवीन
तिकडे सद्दाम ला फाशी झाली कि इकडे दगडफेक, मोर्चे निघतात कि.
इथला इतिहास सांगायला गेलं, कि तो मात्र खोटा, इस्लाम विरोधी नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी लिहिलेला इतिहास असतो. हो ना?
D
dadadarekar
Sun, 10/18/2015 - 14:13
नवीन
हिकडे काही झाले की तिकडचे येतात.
हिकडे चर्चने सांगितले की ऑस्ट्रेलियातून धर्मगुरु येतात
इ इ .
.....
१५० देशात हिरव्या पांढर्यांचे पाहुणे पसरलेत. विश्वबंदु(क)त्व !
....
आता तुमचं जगात कोण नाही , एक ते नेपाळ होतं , तेही सेक्युलर झालं . बाकी ते भूतान , ब्रह्मदेश , कंबूडिया वगैरे नकाशावरचे ठिपके !
तुमचं जगात कोण नाही त्याला बाकेच्यानी काय करायचं ?
द
दत्ता जोशी
Sun, 10/18/2015 - 19:03
नवीन
किती काळजी ओ दादा!! .
१५० पैकी किती देशांना ते हिरवे पांढरे हवे आहेत ते सांगा.
P
psajid
Fri, 10/16/2015 - 13:25
नवीन
बिपीन कार्यकर्ते यांनी बरीच विस्तृत माहिती दिली.
महंमद पैगंबरांनी इस्लामची सुरुवात आणि प्रसार केला. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी वार्धक्यामुळे त्यांना इकडे तिकडे फिरुन धर्मप्रसार करणे जमेनासे झाले. त्यामुळे ती धुरा त्यांनी त्यांचा जावई हुसेन याच्यावर सोपवली.- सौंदाळा
सौंदाळाजी, जिथे ही माहिती तुम्ही वाचली ती एकदम चुकीची माहिती वाचलीत. यातील पहिले वाक्य प्रेषित मोहम्मद यांनी इस्लाम चा प्रसार आणि प्रचार केला ही माहिती एकदम खरी आहे. मात्र ते पैगंबरांचे जावई होते हे चूक आहे. हजरत हसन आणि हजरत हुसेन हे पैगंबराचे नातू (मुलीचे पुत्र ) होते. ज्यांच्यावर यांचे खूप प्रेम होते. हदीद (हदीस ) मध्ये असा उल्लेख येतो कि, हे नातू त्यांना खूप प्रिय होते.
पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार हजरत मुहम्मद (सल्ल.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादि नावांनीही संबोधित केले जाते
ज्यावेळी अनाचार फोफावला होता, एक ईश्वराची (अल्लाहची ) भक्ती करणाऱ्यांना मारले जात होते, आणि स्वतःला देव म्हणवून घेण्यात, सर्वश्रेष्ठ म्हणवून घेण्यात धन्यता मानली जात होती अश्या वेळी त्यांनी इस्लाम चे धोरण आणि एकेश्वरवाद याचा प्रसार केला. यामुळे जे लोक बुतपरस्त होते, जे आपल्या सोयीनुसार देव आणि धर्म मानत आले होते ते पैगंबर आणि त्यांच्या अनुयायांना विरोध करू लागले, त्यांना त्रास देऊ लागले, यातील काही लोक एकेश्वरवाद मानून सुद्धा स्वतःला पैगंबरांचे खरे वंशज समजत होते आणि आपल्या धोरणांना विरोध करणाऱ्या बरोबर युद्ध करू लागले. याचाच परिपाक म्हणजे करबलाची लढाई !
करबला च्या लढाईमध्ये शत्रूंनी याच मोहरम महिन्यामध्ये हजरत इमाम हुसेन यांना शहीद केले आणि त्यांच्या देहाचे पंजे, डोळे पाय काढून त्याची विटंबना केली. म्हणून हा मोहरम महिना मातम किंवा दुःख व्यक्त करण्याचा, मृतात्मासाठी प्रार्थना करण्याचा महिना म्हणून पाळला जातो.
आता काही ठिकाणी या महिन्यामध्ये बांबू/कळक यापासून ताबूत बनवला जातो, ताबूत सोबत हाताचे पंजे आणि इतर अवयव यांची मिरवणूक काढली जाते.
आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव येथे खूप मोठी ताबुतांची मिरवणूक निघते आणि जशी पालखी उचलण्याचा मान असतो तसाच कडेगाव मध्ये हिंदू समाजसुद्धा हा मोहरम डोले (ताबूत ) बनवून साजरा करतात. नंतर ताबुतांच्या भेटीचा कार्यक्रम असतो. हा सोहळा दूरदर्शन आणि सर्व न्यूज चनेल वरती दाखवला जातो.
https://www.youtube.com/watch?v=mMWMG073YWc
आता काही ठिकाणी एक श्रद्धा असावी कि ज्यामध्ये काही लोक इमाम हसन आणि इमाम हुसेन यांना जी शारीरिक तकलीफ (त्रास ) दिली गेली म्हणून स्वतःला शारीरिक इजा करून घेतात, विस्तवावरून चालतात, शरीर टोचून जखमी करतात.
मोहरम हा मुस्लिम नववर्ष सुरु करणारा महिना आहे.
स
सौंदाळा
Fri, 10/16/2015 - 13:51
नवीन
माहितीबद्दल धन्यवाद.
करबला--हेच नाव आठवत नव्ह्ते
म्हणजे (हुसेन यांची हत्या झाल्यामुळे) कडु - (मुस्लिम नववर्ष सुरु होत असल्यामुळे) गोड असा दिवस आहे.
सांगलीतली ताबुतांची मिरवणुक टीव्हीवर पाहिली आहे.
D
dadadarekar
Fri, 10/16/2015 - 15:01
नवीन
आमच्या कुरुंदवाडातही ताबूत व पीर असतात. हळद उधळत लहान मुले फिरत असतात.
भ
भीमराव
Fri, 10/16/2015 - 14:50
नवीन
त्या दिवशी ईद मुबारक म्हनायचं नसत एवढच माहीत होतं राव.
बाकी एक शंका आहे भारतीय मुस्लिमामच्या जातीच्या दाखल्यावर जात कशी ऊल्लेखलेली असते याबद्दल कोणाला माहीती आहे का?
स
सूड
Fri, 10/16/2015 - 15:53
नवीन
मोमीन-शिंपी, शेख-तेली, पठाण-खान (बलुतेदारात येत नाहीत) अशी ऐकीव माहिती आहे. बाकी जाणकार प्रकाश टाकतील.
ब
बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/16/2015 - 16:19
नवीन
'जी जात नाही ती जात' असं म्हणतातच. इथले अनेक लोकसमूह काही ना काही कारणांनी मुस्लिम झाले. पण त्यांच्या मूळ जाती चिकटून राहिल्याच. काही जाती पेशाशी निगडीत आहेत म्हणून राहिल्या. काही जाती प्रतिष्ठित आहेत म्हणून राहिल्या. भारतात अठरापगड जाती (खरे तर हजारो) आहेत हे आपल्याला माहित असते. पण काही जाती अस्तित्वात असतील असे सामान्य माणसाच्या गावीही नसते.
उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण नावाची एक जात आहे. (बरखा दत्त याच जातीची आहे.) पाकिस्तानात मुस्लिम राजपूत मोठ्या संख्येने आहेत. गोव्यात सारस्वत कॅथलिक बरेच आहेत. जात संपणार नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे.
क
काळा पहाड
Fri, 10/16/2015 - 20:17
नवीन
हे माहित नव्हतं. तरीच हिंदू संघटनांबद्दल इतकं विखारी बोलत असते.
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 10/18/2015 - 18:20
नवीन
"हुसैनी" ह्या नावावरुन conclusion ला पोचणे बरे नव्हे, हे मुळात "ब्रह्मक्षत्रिय"(जन्माने ब्राह्मण पण कर्माने अन शिक्षणाने क्षत्रिय) असे आहेत, मुळात ते हिंदुच आहेत, विकिपीडिया चे पान सहज पाहता त्यांच्यातल्या "नोटेबल पीपल" मधे बरखा दत्त चे नाव सुद्धा कुठे दिसले नाही, उलटे अतिशय डेकोरटेड आर्मी ऑफिसर्स ची पुर्ण मांदियाळी दिसली, तस्मात् घाऊक द्वेष करायच्या आधी जरा बेसिक्स समजून घ्या इतकी विनंती करतो मात्र.
ब
बॅटमॅन
Mon, 10/19/2015 - 09:09
नवीन
अगदी असेच म्हणतो.
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 10/20/2015 - 11:45
नवीन
हुसेनच्या बाजूने लढले म्हणून हुसेनी ब्राह्मण, प्रचंड लढवैयी जमात आहे ती.
त
तर्राट जोकर
Fri, 10/16/2015 - 22:18
नवीन
तुमच्या प्रतिसादावरून बरेच दिवस मनात घोळत असलेला प्रश्न विचारुन टाकावा म्हणतो.
इथे कुठेतरी वाचलंय की जेन्युइन मुस्लिम म्हणजे अरबी अफगाणी, पठाणी इत्यादी की जे अरब प्रांतातून भारतात आले, त्यातले बहुसंख्य खपले असून मुस्लिमांमधे त्यांची संख्या कदाचित पारशांच्या संख्येएवढी असावी. बाकीवा फाफटपसारा हा कन्वर्टेड मुस्लिमस आहेत जे आधी हिंदू होते, बळजबरी वा अन्य कारणाने मुस्लिम धर्मिय झाले. म्हणजे त्यांचे पूर्वज हिंदूच होते, त्यांच्यात हिंदूंचेच रक्त आहे. ओके?
आता प्रश्न असा की जेव्हा इस्लामी कट्टरवाद हा त्यांच्या धर्मातच आहे असे जे म्हटले जाते तो कट्टरवाद, क्रूरता, हिंस्त्रपणा माणसाने धर्म बदलल्यावर आपोआप येतो? त्याच्या रक्तातले आधीचे संस्कार नष्ट होऊन जातात? म्हणजे दिक्षा दिली की जाहिरातीत दाखवतात तशी मरगळलेली गृहीणी चहा प्यायल्यावर जशी तरोताजा होऊन जाते तसा आधीचा लेचापेचा हिंदू मुस्लिम झाल्याझाल्या कट्टर, हिंस्त्र वैगेरे होतो का? धर्मात एवढी शक्ती असते? ते पण कन्वर्टेड धर्मात?
एक बोलता किती प्रश्न झाले बॉ... कुणी देइल का उत्तर..?
ख
खटपट्या
Sat, 10/17/2015 - 03:54
नवीन
तर्राट साहेब - माझ्या परीचयाचे आणि रोज भेटणारे माझे दोन जीवलग मित्र आहेत. अस्लम सुर्वे आणि इब्राहीम काळसेकर. आता या दोघांनाही माहीती आहे की आपण पुर्वी कोण होतो. आजही ते रोटीबेटी व्यवहार करताना मराठी मुसलमान असतील तर त्यांना प्राधान्य देतात. आज दोघेही मराठीचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. एकाने तर कुवेतमधे असताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. तुम्ही म्हणता तो कट्टरवाद, क्रूरता, हिंस्त्रपणा मला त्यांच्या बिलकूल सापडला नाही. पण हे लोक एका मोठ्या कल्टला बळी पडले आहेत. कारण दोघांनी फुटभर दाढी वाढवलेली आहे. बहूतेक याच कारणाने दोघांचे अमेरीकन व्हीसे रीजेक्ट झाले. दोघांना एकदा म्हणालो की कमीते कमी इंटर्व्यूला जाताना स्वच्छ दाढी करा. तर रागाने माझ्याशी दोन दीवस बोलत नव्हते. एकाने दाढीच्या कारणास्तव आतापर्यंत ४ नोकर्या बदलल्या आहेत. टेक्नीकल ज्ञानात दोघेही बाप असल्यामुळे लगेच नोकर्या मिळतात. आमची चहा पिताना यावर चर्चाही होते. जर अरब लोक व्यवस्थीत कोरून दाढी ठेवतात तर तुम्हाला काय अडचण आहे. पण रोजच्या व्यवहारात ते अतिशय प्रेमळ, नेहमी मदतीला तत्पर असणारे, बोलण्यात अतीशय म्रुदु असे आहेत. मित्र म्हणून एकदम आदर्शवत. फक्त त्यांच्या दीवसातून पाच वेळा होणार्या नमाजाबाबत आणि दाढीबद्दल बोलायचे नाही.
- 1
- 2
- 3
- ›
- »