Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संतापजनक अनुभव

P
pradnya deshpande
Mon, 11/16/2015 - 12:30
🗣 116 प्रतिसाद
संतापजनक अनुभव मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की. तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले. चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते. माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
22041 वाचन

💬 प्रतिसाद (116)
ज
जिन्क्स Mon, 11/16/2015 - 13:01 नवीन
आज काल सर्व गर्दीची ठिकाणे आपल्या साठी नाही आहेत ही जाणीव होऊ लागली आहेत. भले ते लोणावळा, महाबळेश्वर, लवासा असो की इ-स्क्वेर, अ‍ॅडलॅब्ज, सिनॅपोलिस. ओरबाडणाऱ्या संस्कृतीचे पाईक सगळीकडे वावरत असतात. त्या मध्ये आपणंच अल्पसंख्याक होऊन जातो. आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 11/16/2015 - 13:04 नवीन
आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते. >>>>>>>>>>+११११११ तसेच ५-६ हजार मैला नी जन्माची जागा पण चुकली आपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
स
सागरकदम Mon, 11/16/2015 - 13:14 नवीन
ticket चा दर किती होता ?
  • Log in or register to post comments
क
काकासाहेब केंजळे Mon, 11/16/2015 - 13:15 नवीन
बाहेर तिकीट चेकर उभा असतो तो करतो सरळ अशा लोकांना,एकदा असेच एक टोळके सरळ केले होते,त्यातल्या लिडरला फाडकण ठेऊन दिली होती ,सगळी टीमच थेटरातून गायब झाली त्यांची.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Mon, 11/16/2015 - 13:49 नवीन
आता मराठी चित्रपट होता, म्हणजे यु पी बिहार ची कार्टी नसावी, सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते म्हणताय, तर ती झोपडपट्टी वा खेड्यातली वा गुंठामंत्री छाप पण दिसत नाही. च्यायला आता खापर फोडयाला पांढरपेश्या लोक्कांना कमी कमी ऑप्शन होत चाललेयत आजकाल, कं क्रवे ब्रे ?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 11/17/2015 - 05:45 नवीन
या लेखातुन आणी त्यावरच्या आपल्या वरच्या प्रतिक्रियेतुन हे तर सरळ स्पष्ट होते आहे की सरळमार्गी पांढरपेशी लोक "खापर फोडत नाहित". जे आहे जसे आहे ते सत्यकथन करतात. आता उपद्व्याप करणारे, उपद्रव देणारे, मवाली गुंड जर एखाद्या ठराविक समाजातुन येत असतील तर सरळमार्गी पांढरपेश्यांचा त्याला नाइलाज आहे. याच सरळमार्गी पांढरपेशी लोकांना जेव्हा सुशिक्षित (आता यांना सुशिक्षित कसे म्हणायचे म्हणा) तरुण असे करताना दिसतात तेव्हा ते त्यांनाही नावे ठेवतात. काही ठराविक गटातल्या लोकांना सरळमार्गी पांढरपेशी लोक पसंतच नसतात त्यामुळे जिथे जमेल तिथे त्यांच्याविरुद्ध ते कावकाव च करतात. कं क्रवे ब्रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 06:06 नवीन
ती मुलं मराठी नसावीत. थँक्यू आंटी असं का म्हणतील? हो काकू! असं म्हणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ब
बॅटमॅन Tue, 11/17/2015 - 07:28 नवीन
नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर बघायला का येतील? अन असे अनुभव मलाही आलेले आहेत. त्यात मराठी-बिहारी असे काही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 07:29 नवीन
टवाळक्याच करायच्या असतील तर पिच्चर मराठी असेना की हिंदी की तमिळ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 11/17/2015 - 07:38 नवीन
एकदा डिनायल मोड मध्ये गेल्यावर कसे प्रतिसाद येतात हे दाखवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा Tue, 11/17/2015 - 09:15 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 09:38 नवीन
अच्छा... ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मयुरMK Sun, 11/22/2015 - 09:22 नवीन
कदाचित त्यानाही मराठी बोलण्याची लाज वाटत असेल. कदाचित ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ज
जव्हेरगंज Mon, 11/16/2015 - 13:55 नवीन
चित्रपट घरीच मोबाईल/टिव्हीवर बघुन पायरसी वाढवण्याचे हे ही एक कारण आहे!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/16/2015 - 13:58 नवीन
हे अनुभव आजच नव्हे तर पूर्वीपासून यायचे. प्रज्ञाताई, तुम्हाला फट्यावर मारणे शिकायला लागेल. तुमचा अनुभव वाईट आहेच. अशावेळी तेथील व्यवस्थापनाची काही मदत नाही का होऊ शकणार? (हे मला त्यावेळी सुचले नव्हते) भारतातच नव्हे तर भारतीय चित्रपट पहायला गेल्यास परदेशातही असा अनुभव आलाय. तेथे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी होते. एक चायनीज जोडपेही दंगा करत होते. त्यांना त्या सिनेमातले काय समजत असेल कोणास ठाऊक? दुसर्‍याला शांतपणे नाटक, सिनेमा पाहू न देणे हे परमकर्तव्य असते. ही पैदास नक्की कोठून आलीये कळत नाही. आपल्याला इतका त्रास होतो तर त्या शिनेमातील कलाकारांना जगात वावरणे किती अवघड जात असेल असे वाटले. प्रत्यक्षात येतात तसे जालावरही अनुभव येतात. कित्येकांशी आपण संवाद साधणे टाळतो तरी मुद्दाम होवून उपप्रतिसाद द्यायला येणे वगैरे लोचटपणा चालतच असतो. त्यांना शून्य किंमत देणे एवढे आपण करू शकतो.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 11/17/2015 - 06:15 नवीन
माझ्याशी मयत्री करनार कां? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/17/2015 - 06:20 नवीन
नक्की काय म्हणायचंय तुम्हाला पैजारबुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
जातवेद Tue, 11/17/2015 - 10:02 नवीन
जपान मधल्या थेट्रात बघितलेले पिच्चर आठवले. बाजूच्याशी साधी कुजबूज केलेली देखील खपत नाही तिकडे. सगळे ध्यानमग्न असल्यासारखे पिच्चर बघतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मनीषा Mon, 11/16/2015 - 15:53 नवीन
अतिशय उद्वेगजनक अनुभव आहे हा. असे अनुभव सार्वत्रीक आणि सर्वकालिक आहेत. फक्तं तरूण मुलांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण कित्येकदा सभ्य पोषाखातल्या, आणि सुसंस्कृत वाटणार्‍या मध्यमवयीन अथवा वयोवृद्ध व्यक्तींकडून देखिल अशाप्रकारचे संतापजनक वर्तन अनुभवास येते. पण ते सहन करून गप्प रहाणे एव्हढाच उपाय उपलब्ध असतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 11/16/2015 - 16:48 नवीन
चित्रपटाचा खेळ सुरू असताना उस्फुर्तपणे एखादा विनोद करणे एक वेळ सहन केले जाऊ शकते पण हे म्हणजे फारच. चित्रपटगृहातही बाउंसर्स ठेवायची वेळ न येवो. युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. यावरून आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवला. एकदा एका भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे म्हणून सुरुवात केली. सभागृहातील मागच्या रांगांमधील युवकांच्या गटाने यावर हुर्यो केलं. त्यावर अत्रे तडक उद्गारले, 'मी तुम्हाला नाही, सभ्य स्त्री पुरुषांना म्हंटलं'. त्यानंतर संपूर्ण भाषणात त्या गटाने खोडी काढली नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/16/2015 - 16:55 नवीन
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे.
है शाबास ... ह्याला म्हणतात राजकारण .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
म
मोदक Mon, 11/16/2015 - 17:20 नवीन
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. याच लॉजिकने युती सरकारच्या पूर्वी शिक्षण घेतलेली आणि अयोग्य वर्तन करणारी पिढी म्हणजे "हिंदू कुटुंबसंस्थेचा पराभव" समजावा का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/17/2015 - 07:44 नवीन
तो प्रसंग असा आहे की जेंव्हा अत्रे म्हणाले, ' सभ्य गृहस्थ हो!' तेंव्हा कोणीतरी ओरडले 'ओssss!' त्यावर अत्रे म्हणाले, ' मी सभ्य गृहस्थांबद्दल बोलतो आहे.' असा माणूस अत्रे ह्यांच्या सांगण्यावरूनही 'पेरलेला' असू शकतो. हे पेरलेल्या माणसाचे काम मी सुद्धा केले आहे. अत्रे ह्यांच्या पश्चात श्री सदानंद जोशी 'मी अत्रे बोलतो आहे' हा कार्यक्रम सादर करायचे. त्यांचा सदर कार्यक्रम मस्कतला झाला तेंव्हा हे 'ओssss' ओरडण्याचे काम माझ्याकडे होते. ते त्यांच्या सांगण्यावरूनच मी केले. सभागृहात हशा पसरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
आ
आरोह Mon, 11/16/2015 - 17:07 नवीन
तुम्ही पोलीस हेल्प लाईन वर फोन का नाही केलात? तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत??
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/16/2015 - 17:50 नवीन
तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत?? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे पण घरी पाहुणे आले असताना, आपण दोन घटका निवांत घालवाव्यात म्हणून आपले चार चव्वल खर्च करून शिनेमा बघायला जातो, त्यावेळी दुसर्‍यांशी भांडणे करण्याचा मूड नसतो. काय होते की अंगचटीला येणार्‍या पुरुषांना त्याचवेळी धडा शिकवा, थेट्रात त्रास देणार्‍यांची लगेच तक्रार करा हे म्हणायला सोपे असते पण महिलांसाठी हे रोजचे अनुभव असतात. कधीतरी त्या मनुष्याला निवांतपणा मिळावा असे वाटत असते. त्रास होतो, वैताग येतो पण दरवेळी धडा शिकवणे, दोन हात करणे ही मानसिक अवस्था असेलच असे नसते. तसे जर असते तर याप्रसंगी तेथे उपस्थित असलेले शंभर एक पुरुष त्या मुलांना दम देण्यास पुढे का आले नाहीत? त्यांनाही त्रास होतच होता ना! पत्रकार असणे हे दुय्यम आहे. आधी माणूस असणे याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
आ
आरोह Mon, 11/16/2015 - 18:32 नवीन
त्यांचा उद्वेग समजू शकतो (पत्रकार असून.....हि माझी प्रतिक्रिया त्यांना दुखवण्याच्या हेतूने न्हवती) .पण अशा प्रसंगी कोणत्याही स्त्रीने अगदी ठामपणे प्रतिकार करायला हवा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सस्नेह Tue, 11/17/2015 - 05:34 नवीन
'स्त्री'ने पेक्षा 'व्यक्ती'ने म्हणणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
म
मारवा Mon, 11/16/2015 - 17:56 नवीन
तुमच एकंदरीत सामाजिक स्थान बघता तुमच्या कडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती. तुमच्या अनुभवाने तुम्हाला हे कळायला हवे होते की ते गांधीगीरी ला दाद देण्यालायक नाहीत. किमान माहीत झाल्यानंतर मोबाइल मधुन फोटो वगैरे काढता आला असता. सिनेमा चालु असतांना तुमच्या पत्रकार मित्र मैत्रिणींना संपर्क साधुन किमान कोणा पोलिसाला कळवायला तरी हव होत. बाहेर जाण्याचा बहाणा करुन एसेमेस करुन काहीना काही तर जमल असत यापेक्षा जास्त
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 06:11 नवीन
तुम्ही तक्रार करायला हवी होती असं वाटतं. मान्य आहे, त्या वेळी जे सुचतं ते होतं आपल्याकडून, पण तरीही, जर तक्रार करणं किंवा फोटो काढणं असं काही पाऊल उचललं असतं तर कदाचित पेपरात हा अनुभव देता आला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, एक अनुभवजन्य लेख तुम्ही पेपरमधे नक्कीच देऊ शकता. पुढे ज्यांना असा अनुभव येईल त्यांना प्रत्युत्तराची प्रेरणा मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
इ
इडली डोसा Mon, 11/16/2015 - 17:58 नवीन
प्रत्येक मल्टिप्लेक्स मधे २- ४ सिक्युरिटी गार्ड नक्की असतात. तुम्ही त्यांची मदत घ्यायला हवी होती. शिवाय त्या मुलांचे फोटो काढुन सोशल मिडियामधे टाकु असेही सुनावु शकतो. गांधिगिरी सिनेमात ठिक आहे. प्रत्यक्षात असे 'लाथोंके भुत बातोंसे नही मानते'.
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Mon, 11/16/2015 - 18:14 नवीन
गांधिगिरी सिनेमात ठिक आहे. प्रत्यक्षात असे 'लाथोंके भुत बातोंसे नही मानते'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/16/2015 - 18:00 नवीन
आपण आपला संताप इथे शब्दाद्वारे व्यक्त केलात आणि थोडे मोकळेपण अनुभवलेत. आता पुढे?? थोडे वाईट वाटेल; पण स्पष्ट सांगायचे तर एकतर तुम्ही अशा प्रसंगांना ठामपणे विरोध करा अथवा गुमान सहन करा. असे आंतरजालावरती शब्द खर्च करून काही होणार नाही. असे प्रसंग फक्त थेटरातरच नाही, तर प्रवासी बस, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी येतच असतात. अशावेळी आपल्या शहरातील प्रमुख पोलीस अधिकार्‍यांचे नंबर जवळ असल्यास त्वरीत संपर्क साधत येतो आणि त्वरेने मदत देखील मिळते. http://www.punepolice.gov.in/ https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ इथे अधिकार्‍यांच्या नावांसकट त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. तसेच इमर्जन्सीच्या वेळेसचे वेगळे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत. काही शहरात पोलीसांनी व्हॉटसएप ग्रुपची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. थोडेसे धाडस दाखवून तर बघा. तुम्हालाच नाही, तर याचा फायदा पुढे खूप जणांना मिळणार आहे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/16/2015 - 18:03 नवीन
धन्यवाद. आता भारतवारीत हे नंबर्स जवळ ठेवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मारवा Mon, 11/16/2015 - 18:06 नवीन
परा जी फारच उपयुक्त माहीती पुरवलीत तुम्ही या माहीतीचा मी पण जमेल तसा प्रसार करतो. ही कल्पना खरच व्यावहारीक आहे अनेक अनेक धन्यवाद यासाठी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
उ
उगा काहितरीच Mon, 11/16/2015 - 20:43 नवीन
खरंच संतापजनक अनुभव ! माझे असे निरीक्षण आहे की , कधी कधी मित्रांच्या आग्रहामुळे वा अजून काही कारणांमुळे "थर्ड क्लास" चित्रपट पाहायला गेलो तर अशा कॉमेंटस जास्त बोचत नाहीत . पण नातेवाईक किंवा घरचे काही लोक सोबत असतील किंवा संवेदनशील चित्रपट असेल तर या प्रकाराची तिव्रता जास्त जाणवते. (मला तर "किल्ला" सारखा नितांत सुंदर चित्रपट पाहताना पण असा अनुभव आलेला आहे)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/16/2015 - 21:04 नवीन
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर? असे होवू शकले असते. एकूण प्रकार पाहता असले टगे टोळभैरव संख्येने वाढले आहेत.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 06:30 नवीन
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर?
ही असलीच मनोवृत्ती अशा नालायाक लोकांना अजुन उत्तेजन देणारी ठरते. पाभे सॉरी टू से पण असे घाबरत जगण्यापेक्षा विहीर नाहीतर दोरी जवळ करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ब
बाबा पाटील Fri, 11/20/2015 - 09:46 नवीन
आमच्या सारखेच पाहिजेत राव. त्यांच्या आईबापासह सगळ्यांची परेड काढली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ब
बाबा पाटील Fri, 11/20/2015 - 09:47 नवीन
साधारण ३ ते ५ मिनिटात पोलिसांचे मार्शलस पोहचतात निदान पुण्यातरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
अ
अन्नू Mon, 11/16/2015 - 21:36 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Tue, 11/17/2015 - 05:10 नवीन
अशा टोळक्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना पोलीसांचा हाग्या मार पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 11/17/2015 - 06:18 नवीन
असे उद्वेगजनक अनुभव वाढतच चालले आहेत . शक्यतो , नव्या चित्रपटाला अगदि पहिल्या २,४ दिवसांत तेही रात्री उशीराच्या शोला जाणे टाळावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 06:26 नवीन
मला कट्यार बघताना आलेला अनुभव. टगेगिरी वगैरे नाही. घटनेचा संदर्भ वेगळा आहे, पण आवाज उठवला की सोबतीने आवाज देणारे जमतात हे सुचवण्याकरिता एक किस्सा. शो हाउसफुल्ल होता. पिक्चर सुरू होताच २ मिनिटात बंद पडला. पुन्हा ५ मिनिटांनी सुरू झाला, पुन्हा बंद पडला. असं चौथ्यांदा झाल्यावर प्रेक्षागृहाच्या दाराशी घुटमळणारे प्रेक्षक एकवटून मॅनेजरच्या ऑफिस पर्यंत पोचले. आवाज सुरू झाला. मॅनेजर ने रिफंड देतो शो होणार नाही असं म्हटलं. त्यावर एकमताने रिफंड नको आम्ही पिक्चर बघायला आलोय असा सूर लावला गेला. मॅनेजर ने "टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, हवं तर मी तुम्हाला प्रेम रतन चा शो लावून देतो" असं म्हटलं आणि तिथेच चूक केली. पब्लिक जे पेटलंय, जे पेटलंय... तो रडायचा बाकी होता. सुदैवाने फटकावलं नाही कुणी. पण अखेर ४० एक मिनिटं उशीराने शो व्यवस्थित सुरू झाला आणि निर्विघ्न पार पडला. यातही सुरुवातीला एका दोघांनी आवाज केला, मग सगळे जमले. एका व्यक्तीने डायरेक्ट जय भवानी जय शिवाजी म्हटल्यावर गर्दीचा वाढलेला सूर हा लक्षवेधी आणि निर्णायक होता. तात्पर्यः आवाज जिथे गरज आहे तिथे करायला हवा. अर्थात; हा मात्र एक सल्ला आहे. स्थळ काळ वेळानुसार याची वैधता बदलते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 11/17/2015 - 06:34 नवीन
खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम असेल तर मॅनेजर नी काय करणे अपेक्षीत होते? आणि शो हाऊसफुल होता म्हणजे मॅनेजर ला शो कँसल करुन रीफंड देण्यात काही फायदा नव्हता. हल्ली सिनेमा कुठुन तरी दुरवरुन प्रक्षेपीत होत असतो. त्या प्रकारात कीतीतरी तांत्रीक प्रॉब्लेम होऊ शकतात. अश्या वेळेसे आरडाओरडी आणि गुंडगीरी करुन तुम्ही काय मिळवलेत. ही निव्वळ टगेगिरीच होती. तुम्हाला तसे वाटणार नाही हे मला नक्की माहिती आहे ( कारण तुम्ही ढोल वाजवून सामान्य लोकांना तसेच त्रास देता. ) पण तुम्ही मॅनेजर च्या जागी असता आणि ४० मिनिटानी पण तांत्रीक बिघाड दुरुस्त होऊ शकला नसता तर तुम्ही काय केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 06:47 नवीन
ऑ.... अच्चं जाल्लं तल्ल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/17/2015 - 07:59 नवीन
प्रसाद, थिएटरात एकच प्रोजेक्टर नसतो. स्टँडबाय सोय असतेच असते. अन्यथा चिडलेले प्रेक्षक थिएटराची मोडतोड, जाळपोळ करू शकतात. तो खर्च आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी स्टँड्बाय प्रोजेक्टरची आवश्यकता असते. ज्या चित्रपटासाठी आपण पैसे खर्च केले आहेत तो पाहायला न मिळणं हा अन्याय आहे आणि अन्याया विरुद्ध आवाज ऊठविणे टगेगिरी नाही होऊ शकत. उलट, 'शो होणार नाही, दुसरा चित्रपट दाखवतो' असे म्हणणे टगेगिरी आहे. शक्यता अशी आहे की त्यांचा स्टँडबाय प्रोजेक्टर आधीच बिघडला असेल आणि तो त्या मॅनेजरने दुरुस्त करून घेतला नसेल आणि आपली चुक झाकायला तो प्रेक्षकांना दुसरे पर्याय स्विकारायला भाग पाडत असेल. 'तांत्रिक बिघाड' ही संज्ञा अनेकदा थातूरमातूर कारण म्हणूनही पुढे केली जाते. कारण तंत्रज्ञानाची ओळख सामान्य माणसाला नसते आणि त्यावर तो प्रश्न, शंका विचारू शकत नाही म्हणूनही ती वापरली जाते. असेच झाले असेल असे मी म्हणत नाही पण अशाही शक्यता असतात एव्हढेच सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 11/17/2015 - 08:18 नवीन
एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता म्हणजे प्रोजेक्टर बिघडला नक्की नव्हता. पेठकर काका, तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे. अगदी प्रगत देशात सुद्धा असे बिघाड किंवा त्रास होतात. बस, रेल्वे लेट होतात. मधेच बंद पण पडतात. पण झुंडीने जाऊन मॅनेजर किंवा रेल्चे च्या स्टेशन मास्टर ला मारहाण करणे / दमबाजी करणे असले प्रकार होत नाहीत. माझ्या मते सॉफ्ट टारगेट मिळाले की हात धुवून घ्या ही वृत्ती आहे. रीफंड आणि झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी ही अपेक्षा बरोबर आहे. पण क्वचित प्रसंगी असे होऊ शकते हे समजुन घेण्या इतका विवेक पण हवाच. जी लोक झूंडीने गेली होती त्यातली कीती लोक त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 09:49 नवीन
आपल्याला विशेष माहिती नसेल गोष्टींची तर ती किमान करून घ्यावी वाद घालण्यापूर्वी. माहितीखातर सांगतो, पिक्चर सॅटेलाईट मार्फत दाखवले जातात आता. स्ट्रीमिंग. तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही. नाहीतर मुळात चित्रच दिसलं नसतं. आणखी म्हणजे दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता याहीपेक्षा त्याने एक तर झाला प्रॉब्लेम निस्तरायचं न बोलता प्रेम रतन चं नाव घेतलं तिथे लोकांना राग आला. तांत्रिक अडचण असताना मारामारी/दमबाजी करणारी लोकं कट्यार सारख्या पिक्चर ला नसतात. निरर्थक वाद घालणारी तर त्याहून नाही. राहिला भाग विवेकाचा, किंवा कामात परफेक्ट वगरे असण्याचा, तर तो माझ्यामते आपापला आपण सांभाळावा. याहून काय सांगणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 11/17/2015 - 09:57 नवीन
तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही.
इतके जर तुम्हाला कळते आहे तर त्यात मॅनेजर फार काय करू शकत होता? नेटवर्क कंपनी कडे तक्रार करुन फॉलोअप करण्या पलिकडे तो काय करु शकत होता? त्याच्या नशिबानी ४० मिनिटाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाहीतर त्यानी मारच खाल्ला असता जय भवानी वाल्या कडुन. एक सांगा, तुम्ही मॅनेजर च्या जागी असता तर काय केले असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 11/17/2015 - 10:12 नवीन
हेच अपेक्षित होतं त्याच्याकडून. की बाबा प्रॉब्लेम आहे खरोखर मी बघतो तुम्ही जरा थांबा. लोकं समजणारी होती. आधी म्हटल्याप्रमाणे हिंदी पिक्चर दाखवतो हे म्हणणं, आणि शो होणार नाही तुम्ही हवं तर रिफंड घ्या आणि जा असलं काहीतरी त्याला नडलं (असतं). याच ग्रूपमधल्या एकाने त्याला नीट बाजूला घेऊन समजवलं की तू ट्राय कर, आणि इतर जय भवानी पब्लिकलाही बाजूला नेलं. सो इट वॉज नॉट लाइक व्हाट यू आर इमॅजिनिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा