Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संतापजनक अनुभव

P
pradnya deshpande
Mon, 11/16/2015 - 12:30
🗣 116 प्रतिसाद
संतापजनक अनुभव मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की. तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो. दिवाळीचे दिवस असल्याने रात्रीचा शोही हाऊसपुâल्ल होता. चांगल्या घरातील मंडळी सहकुटुंब चित्रपट पहायला आलेली दिसल्याने चला पब्लीक चांगली आहे असा विचार मनात येऊन गेला. पडद्यावर टायटल झळकू लागली. पहिल्या सीन नंतरच मागच्या रांगेत चुळबुळ सुरु झाली. तरुणांचे टोळके मागच्या रांगेत बसले होते. त्यांचे खुर्चीला मागून पाय लावणे, चित्रपटातील प्रसंगांवर उगाचच हसणे, कॉमेंट करणे असे चाळे सुरु झाले. त्यांच्याच बाजूला एक कुटुंब बसले होते. पतीने जागा बदलून पत्नीला मुलाच्या जागेवर बसवले तसे या टोळक्याने मोठ्याने हसणे सुरु केले. अखेर ते जोडपे पहिल्या पंधरा मिनीटातच चित्रपट अर्धवट टाकून निघून गेले. चित्रपट जस जसा पुढे जाऊ लागला तस तसा या टोळक्याच्या गोंधळ वाढला. प्रत्येक डायलॉगवर त्यांच्या व्दिअर्थी कॉमेंट येऊ लागल्या तसे मला माझ्या भावासमोर आणखी ओशाळवाणे वाटू लागले. माझा संताप वाढू लागला तसा बाजूलाच बसलेल्या माझ्या मुलाने आई जाऊ दे म्हणत मला शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या टोळक्याला चित्रपटगृहातील इतरत्र बसलेल्या काही तरुणांनी साथ द्यायला सुरुवात केली. चित्रपटगृहाच्या वेगवेगळया कोपऱ्यायातून स्पर्धा लागल्या तशा घाणेरड्या कॉमेंट सुरु झाल्या. सुशिक्षीत प्रेक्षकांना सर्व असह्य झाले. शेवटपर्यंत हा गोंधळ सुरु होता. चित्रपट नको पण प्रेक्षक आवर अशी आमची अवस्था झाली होती. अखेर चित्रपट संपला. लाईट लागले. मला संताप अनावर झाला होता. मी ताडकन उठले आणि गोंधळ घालणाऱ्या मागच्या रांगेतील तरुणांना धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला चित्रपटाचा आनंद घेता आला नाही असे बोलून गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला साथ देण्यास काही जण पुढे आले त्यांनीही त्या मुलांना हात जोडून थँक्यू म्हटले. ते टोळके एवढे निगरगट्ट होते की त्यांनीही थँक्यू आंटी म्हटले. सर्वात जास्त धक्का बसला ते त्या मुलांचे चेहरे पाहून. कारण ते सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते. माझ्या सारखाच अनुभव अनेकांना आला असेल. त्यामुळेच मी माझा अनुभव शेअर केला आहे. इतरांनीही त्यांचे म्हणणे आवर्जून मांडावे.
वर्गीकरण
सामाजिक

प्रतिक्रिया द्या
22041 वाचन

💬 प्रतिसाद (116)
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 15:30 नवीन
माय फ्रेंड आदि इज संतापींग सो मच... जौ दे रे आदु. लोकं मिपावर प्रयोगाला येतात आणि काही काळात स्वतःचा गीनीपीग होतात हे तुला काय ठौक नाय काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
र
रेवती Tue, 11/17/2015 - 15:24 नवीन
हात्तिच्या! आम्हाला तावातावाने प्रतिसाद द्यायला लावून ते प्रकरण निकालात निघाल्याचं नंतर सांगताय होय! तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? नै, मला फार महत्वाची कामे त्यावेळी नव्हती, पण तुम्ही असं का करावं? असो, जे काही केलत ते आवडलं नाही. पराकडून नवी माहिती मात्र समजली.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 15:27 नवीन
नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले.
ओक्के! पुढच्या वेळी असा फालतुपणा करू नका. अशा स्वभावामुळेच मग थेटरमध्ये घडले तसे प्रसंग वारंवार अनुभवाला येतात. बाकी, तुमच्या (मोठ मोठ्या) ओळखीने मला कोणी पार्किंगमध्ये गाठून दमात घेऊन नये म्हणून भितीने येवढीच प्रतिक्रीया दिली आहे.
  • Log in or register to post comments
P
pacificready Tue, 11/17/2015 - 15:29 नवीन
प्रतिसाद आवडला नाही. -विका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/17/2015 - 15:31 नवीन
तुमच्या आवडी-निवडी जपायला आम्ही आंतरजालावरती येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
प
पुष्करिणी Tue, 11/17/2015 - 16:01 नवीन
'-विका' म्हण्जे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
आ
आदिजोशी Tue, 11/17/2015 - 16:02 नवीन
प्रतिसाद आवडला नाही विकून टाका असं असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी
प
पुष्करिणी Tue, 11/17/2015 - 16:09 नवीन
आम्हांला पण परिक्षा घेणारा लेख नाही आवडला -ठेवा नाहीतर विका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
P
pacificready Tue, 11/17/2015 - 17:58 नवीन
कुणी विका घ्या कुणी मिका घ्या आणि कुणी बिका घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
स
सागरकदम Tue, 11/17/2015 - 18:20 नवीन
कोणी पिंगा ग पिंगा घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready
च
चैतन्य ईन्या Tue, 11/17/2015 - 16:19 नवीन
हे असले प्रयोग करून आपण दुर्दैवाणे पत्रकार लोकांवर वकील लोकांप्रमाणेच विश्वास ठेवू नये असे सिद्ध करताय काय?
  • Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ Wed, 11/18/2015 - 11:58 नवीन
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले. मल्टीप्लेक्समधे अनावश्यक गोंधळ करणार्‍यांना तिकीटाचे पैसे परत करुन बाहेरचा रस्ता दाखवतात हा अनुभव घेतलेला आहे (मी आतच होतो). बाकी रात्री टोळके पाठलाग करेल, सोबत पोरं आहेत इतकी परिस्थीती वाइट असेल तर अशा रात्री अशा परिसरात चित्रपट बघायला गेलात कशाला ? तसंही तुमचं शांत बसणं तुमच्या मुलांना भविष्यात असेच निर्लज्ज अथवा त्याउलट भित्रट बनवायला कारणीभुत ठरु शकते हे लक्षात आले नाही काय ? बाकी तो नंतरचा तुमचा गौप्यस्फोट अजिबात मास्टर-स्ट्रोक वगैरे समजु नका. तुम्ही पत्रकार आहात. एका सामान्य माणसाप्रमाणे झालेली फटफजीती तुम्ही स्वतःच्य लेखणीने नक्किच चितारणार नाही याची खात्री असल्याने तुम्ही नंतर काय कारवाइ केली हे प्रकाश झोतात येणार हे गृहीत धरलेच होते. फार कमी लोकांनी तुम्ही पत्रकार असुनही हे कसे सहन केले विचारले नाही ? मिपा आहे हे अस्चं आहे :) असो. सामान्यांना असे अनुभव खरेच त्रासदायक असतात.
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Fri, 11/20/2015 - 07:31 नवीन
पडद्यावर बाई दिसली की लोक चेकाळतात. दंगा घालणारी मुले मराठी की अमराठी यावर का जागा घालवण्यात आली? त्याने काय फरक पडतो? असा उपद्रव होऊ नये हे पाहणे ही थिएटरमालकाची जबाबदारी.ती पार न पडल्यास तक्रार करणे, तिची दखल न घेतली गेल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे हे उपायही योजता येतील. आपण त्याचवेळी या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक षंढासारखे बसून असतात. सर्वांनी मिळून आवाज उठवून थोडावेळ शो बंद पाडायला लावून या मुठभर लोकांना बाहेर काढायला भागे पाडणे ही तशी अवघड गोष्ट नाही. पण या षंढांच्या बहुमतामुळे तसे होताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 11/20/2015 - 18:56 नवीन
एखाद्या पत्रकाराच्या संपर्कात येणे, हा किती संतापजनक अनुभव असू शकतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्या लोकांच्या जवळपास फिरकणेही नको, हा धडा नक्कीच घेतला असेल. पुन्हा एकदा इथे तो धडा मिळालेला आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश कुलकर्णी Sat, 11/21/2015 - 05:08 नवीन
तुमच्या या अनुभवाचा संदर्भ देऊन मी आजच्या फुसके बार या स्फुटात त्याच्या अनुषंगाने पुढे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sun, 11/22/2015 - 13:18 नवीन
बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? मी दोम्बिवली ला होते तेव्हा रात्री १० नन्तर लग्नाची वरात जात होती. स्पीकर वर मोठ्याने वाजणारी गाणी आणी फटाके. १०० नम्बर वर फोन केल्यावर १० मिनिटात पोलिस आले व तो गोन्धल बन्द पाडला. नन्तर आम्हाला आवाज खरच बन्द झाला आहे ना ही खात्री करण्या परत फोन पण आला होता. राम नगर पोली दोम्बीवली
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा