कोलेस्ट्रेरॉल
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
चांगल्या आणि विश्वासार्ह डॉकटरकडुनडांगेसाहेब.. ही तक्रार तुमच्याकडून अनेकवेळा ऐकली आहे म्हणून सहज एक सुचवतो आहे. आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे मोटरमन आणि कॅब ड्रायव्हरवर विश्वास ठेवतोच ना? तसेच एक डॉक्टर निवडायचा आणि विश्वास ठेवायचा. आपल्याला निवडायचा 'चॉईस' असला की आपण जास्ती चिकित्सा करतो आणि गोंधळतो. वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याच्या परफॉर्मन्सविषयीचे शेरे आपल्याला माहिती होण्याची सुतराम शक्यता नसते, ठरलेले रूळाचे मार्ग, 'डेड मॅन्स हँडल' वगैरे सुरक्षितता असली तरीही रेल्वे मोटरमन चुका करतात, आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तरी एखाद्या छोट्याश्या कारणाने विमाने कोसळतात आणि रेल्वे अपघात होतातच. मग आपणच निवडलेल्या डॉक्टरांवर शंका घेवून काय फायदा? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे, "डॉक्टरच्या लबाडपणामुळे मला पैसा आणि शरिराचे नुकसान होणार आहे" मग ते टाळण्याचा उपाय काय? मी स्वतः डॉक्टर होत नाही तोपर्यंत माझा दुसर्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांवर विश्वास बसणार नाही आणि जरी इथून पुढे डॉक्टर झालो तरी सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन शक्य नाही. तुम्हाला किंवा मला, कुठेतरी विश्वास ठेवावा लागणारच आहे!