कोलेस्ट्रेरॉल
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
💬 प्रतिसाद
(116)
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 12:38
नवीन
हे पण रुग्णानेच ठरवायचं तर डॉक्टरने काय करायचं? डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी फरक करा राव....!
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Mon, 12/07/2015 - 14:25
नवीन
तुम्हाला फरक वाटत नसला तर तुम्ही आजारी पडलात तर न्हाव्या कडे जा. तसेही हल्ली लोक न्हाव्याला केस कापायचे २०० रुपये देतात, पण डॉक्टर ला द्यायची वेळ आली तर २०० रुपये जास्त वाटतात.
हलके घ्या पण विचार करा.
ब्र्यायडल मेक-अप साठी कमीतकमी पॅकेज १० हजार रुपयांचे आहे. नॉर्मली लोक २०-३० हजार खर्च करतात. फक्त ३-४ तासाचे काम असते. लग्नाच्या फोटो चे पॅकेज ५० हजार कमीत कमी., इतके रेट जनरल सर्जन ला पण मिळत नाही.
-----------
निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 15:45
नवीन
चर्चेचा विषय बदलताय कशाला?
डॉक्टरने आपल्या कौशल्याचे किती पैसे घ्यावे ह्याबद्दल आधीच एका धाग्यात पुरेपुर चर्चा झालीये. त्यात माझे मत तुम्हाला आठवत नसेल तर सांगतो. डॉक्टरने आपल्या कौशल्याचे योग्य ते पैसे घ्यावे. त्यात अजिबात कसूर करू नये. त्याबद्दल मी डॉक्टरांच्या बाजूनेच बोललोय. कुणाही व्यावसायिकाच्या बाजूनेच बोलेन. ज्याला परवडतं त्याने उपचार घ्यावे, नसता मरावे. सो सिम्पल! पण पैसे घेऊन रुग्णाला फसवणे पसंत नाहीये.
निदानात चुक झाली तर डॉक्टरचा दोष, आणि निदान चूकू नये म्हणुन टेस्ट करायला सांगितल्या तरी डॉकटर चा च दोष
तुम्हीच वर बोललात की टेस्ट करावी की नको हे रुग्णाने ठरवावे. म्हणून मी म्हटलं की न्हाव्यात आणि डॉक्टरमधे फरक ठेवा.
मी न्हाव्याला जाऊन तर विचारत नाही ना की बाबारे केस कापु की नको, कापायचे असल्यास किती आणि कसे कापू तूच ठरव. तुला जसं जमेल तसं दे कापून. आजारी पडल्यावर माझ्याकडे चॉइस असतो काय?
मुद्द्यांची सरमिसळ करू नका बंधो...!
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 12/07/2015 - 16:21
नवीन
मी तर माझ्या नेहमीच्या हजामाकडे जातो व् डोके त्याच्यासमोर ठेवतो, कारण त्याला माहीत असते मला कोणता कट पाहिजे. डॉक्टरला मात्र मला सांगावे लागते. डांगेजि तुमचा जो जनरल डॉक्टर असतो त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला या व्यवसाआतले चक्केपंजे माहीत असतात. जर तुमचे संबध चांगले असतील तर तो तुम्हाला फशी पाड़नार नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 16:30
नवीन
ओके फाईन. जर संबंध चांगले नसतील तर तो फशी पाडण्याची मुभा आहे. राईट...!
असू दे. ज्याचे त्याचे मत ज्याचे त्याचे जवळ. पण मला संबंध चर्चेमध्ये जो सूर जाणवला तो असा की आजारी पडणे हे रुग्णाची चूक आहे. डॉक्टरने फसवणे ही चूक नाही. जसे काही लोक म्हणतात, मुलीने रात्री घराबाहेर पडणे चूक आहे, तसेच.
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 12/07/2015 - 16:44
नवीन
डांगे , जर तुम्ही तुमचा हेकेखोरपणा सोडला तर पुष्कळ पुढे जाल हो? तुमच्या अनुभवामुळे तुम्ही दुसर्याला शहाणे नाही तर येडे करत आहात. विश्वास नावाची वस्तु अजूनही शिल्लक आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 16:55
नवीन
भंकसबाबा, लोक इथे एकाच वेळेस विश्वास ठेवा आणि ठेवू नका चे दोन्ही सल्ले देऊन येडे करत आहेत त्याचं काय करायचं...?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/07/2015 - 11:06
नवीन
आणी हो हे माझ्या वरील एका प्रतिसादात लिहिले होते ते वाचले नाही का?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 11:10
नवीन
मग वाद कशासाठी घालताय?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/07/2015 - 11:19
नवीन
कारण ही व्यावसायिक अनैतिकता आर्थिकतेतुनच आली आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/07/2015 - 11:33
नवीन
उदाहरण देऊ शकाल?
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Mon, 12/07/2015 - 11:47
नवीन
कट प्रॅक्टीसमागे काय हेतू असेल?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Mon, 12/07/2015 - 16:30
नवीन
फक्त डॉक्टर कसे वागतात हा मुद्दा परत परत सांगितला जातोय. परंतु कोलेस्टेरोल जर प्रमाणाबाहेर वाढलंच नाही तर?
सध्या अन्नप्रक्रिया उद्योग फार जोरात चालू आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्या बेसिक स्वरुपात न ठेवता उगाच जास्तीच्या प्रक्रिया करून त्याची पोषण दृष्ट्या वाट लावतात. उदा. पूर्वी घाणीतून काढलेलं खाद्यतेल मिळायचं. ते कसं चिपचिपित आहे आणि ते वापरणं कसं धोकादायक आहे हे आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्यांनी जाहिरातींचा मारा करून पटवून दिलं. त्यांचं जास्त प्रक्रिया केलेलं तेल जे तळलेल्या पदार्थांवर अगदी कमी प्रमाणात राहतं त्यामुळे आरोग्यास चांगलं आहे असं आपल्याला पटवण्यात आलं. असं प्रक्रिया केलेलं तेल खरं तर जास्त घातक असतं.
त्यामुळे फक्त डॉक्टरच नाही तर मानक ठरवणारे, अन्न प्रक्रिया करणारे, जाहिरात करणारे या सगळ्याचं छुपे संबंध आणि फायदे असतात. मुलांच्या दुधात टाकायच्या पावडरींमध्ये साखर खूप जास्त प्रमाणात असते. खरी पोषण मुल्य नसतातच. एवढ्या लहान वयापासून ते त्यांचं भावी गिऱ्हाईक बनवायच्या मागे असतात.
अमेरिकन FDA च्या मुख्य panel वरील ७५% सदस्य हे फूड प्रोसेसिंग कंपन्यांशी जवळचे संबंध असलेले आहेत. एखादा पदार्थ तुम्हाला FDA कडून पास करून घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या सोयीच्या प्रयोगशाळेत त्याच्या टेस्ट करून ते FDA ला सदर करायचे. त्यावर FDA फक्त ते बघून तुम्हाला परवाना देते. प्रयोगशाळेत बनवलेले खाद्यपदार्थ, बाहेरून टाकलेले पोषक द्रव्य हे आपल्या आरोग्यास घातकच आहेत.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 12/09/2015 - 20:23
नवीन
Cholesterol Is Finally Officially Removed From 'Naughty' List
The US government has finally accepted that cholesterol is not a 'nutrient of concern', doing a U-turn on their warnings
पूर्ण बातमी इथे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 03/17/2017 - 03:00
नवीन
लेटेस्ट काय ठरलंय?
कोलेस्ट्रॉल वाईट आहे की नाही?
असल्यास.. ते कमी करण्यास काय करावे? आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवावे कसे?
- Log in or register to post comments
R
Ranapratap
Sat, 03/18/2017 - 14:08
नवीन
स्वतः 100 घेतल्याशिवाय शेतकऱ्याचा 7/12 न देणारा तलाठी जेव्हा डॉक्टर च्या बनवाबनवी बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
आणि चार लिटर दुधाचे पाणी, साबुदाणा, यूरिया, साखर टाकून 8 लिटर करणारा शेतकरी जेव्हा डॉक्टर च्या कमाई बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
जाहिरात करताना खोटे दावे करून सामान्य ग्राहकांना फसवणारा बिल्डर जेव्हा डॉक्टर च्या खोटेपणावर आक्षेप घेतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते....
डोळ्यादेखत खोट्याचे खरे करणारा वकील जेव्हा डॉ च्या चुकीच्या प्रॅक्टिस बद्दल बोलतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
सावज मिळाले की दोन्ही बाजूनी पैसे खाऊन मिटवामिटवी करणारा पोलीस डॉक्टर च्या रेफरल वरती आगपाखड करतो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
5000 हजार रुपये घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर आधीच पुरवणारे प्राध्यापक जेव्हा डॉक्टरांनी रक्त लघवीच्या तपासण्या करायला सांगितल्यावर हे अनैतिक आहे असे म्हणतात तेव्हा मला फार आश्चर्य वाटते...
मी डॉक्टर ने खोटेपणा करावा याच्या बाजूने अजिबात बोलत नाहीए पण आपले ठेवायचे झाकून अन लोकांचे पाहायचे वाकून ही वृत्ती नको हे म्हणणं आहे..
जगातला भ्रष्टाचार होत नसलेला एक तरी व्यवसाय मला सांगा... उडदामाजी काळे गोरे प्रत्येक ठिकाणी असतातच; त्यांना खड्या सारखे बाजूला सारून चांगल्याचे कौतुक करावे... संसार आहे, जुने लोक म्हणतात संसार ही लबाडी च आहे... godfather च्या पहिल्या पानावरचे वाक्य लक्षात असू द्यावे..
Behind every fortune, there is crime!!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3