Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/03/2015 - 10:58
🗣 224 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.

प्रतिक्रिया द्या
45187 वाचन

💬 प्रतिसाद (224)
अ
अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 12:15 नवीन
विषयाला कसं धरुन नाही अण्णा? पुरुषांना का वेगळे दालन तर त्यांना स्त्रियासमोर ऑकवर्ड वाटते म्हणून. हो ना? वाइसवर्सा तेच. मग इथे सगळेच येतात. म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल? आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का? . बाकी संघटीत कंपूबाजी बद्दल पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 12:21 नवीन
आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?
काही हरकत नाही. फोटोशॉपची व्हर्जन केवढ्याला मिळते, उत्तम रंग कुठे मिळतात किंवा या प्रकारचे प्रश्न सेप्रेट दालनात विचारले तर नेमके उत्तर येण्याची प्रोब्याबिलिटी अजून वाढेल नै का? मायबोलीवर ही सिस्टिम अगोदरच आहे आणि त्यामुळे तिथे नुकसान झालेय असे कै दिसत नै. जन्रल बोर्डावरचे टॉपिक वेगळे, आपापल्या ग्रूपमधले वेगळे. इथला टॉपिक तिथं किंवा तिथला इथं आला तरी चालेल. पण मुळात वर्गीकरण इटसेल्फ चूक आहे असं तर काय नै वाटत बे अभ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदिजोशी गुरुवार, 12/03/2015 - 12:32 नवीन
म्हातार्‍यांपासून अगदी कॉलेजगोईंग पर्यंत. कीती दालने काढताल? स्त्री आणि पुरुष हा अगदी बेसिक लेवलचा फरक आहे. आज जो तरूण आहे उद्या तो म्हातारा होणारच. पण आज जो पुरुष आहे तो वय वाढल्याने बाई होणार नाही. वाइसवर्सा. त्यामुळे, आर्टीस्ट असलेल्या/नसलेल्यांसाठी, डायबिटिज असलेल्या/नसलेल्यांसाठी, चष्मा असलेल्या/नसलेल्यांसाठी, बद्धकोष्ठ असलेल्या/नसलेल्यांसाठी, असं म्हणून चर्चा भरकटवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संदीप डांगे गुरुवार, 12/03/2015 - 12:41 नवीन
गल्लत होत नै ना नक्की? कारण तुमचं म्हणण मान्य केलं तर कोणत्याच ऑकवर्ड वाटणार्‍या गोष्टींची मिपावर चर्चा होणार नाही. जसे मी वर म्हटले की कोणत्या कंपनीचे रबर चांगले. दुसर्‍या स्पष्ट शब्दात कुठल्या कंपनीचे कंडोम्स चांगले असा धागा मेनबोर्डावर येणार नाहीच. एक आठवत असेल सर्व पुरुषांना. शाळेत असतांना, आठवीत वैगेरे मुलींसाठी एक खास वर्ग (लेक्चर-पीरीयड) घेतला जायचा, अजूनही होत असेल. तिथे त्यांना पाळी येणे व इतर संबंधीत समस्यांबद्दल कोणीतरी स्त्री-रोग तज्ञ येऊन माहिती देत असे. आपण पोरं एकटेच वर्गात बसून टिवल्या-बावल्या करत खास मुलींना कुठे घेऊन गेले, काय चालू असेल याचे ठोकताळे लावत असू. मला नाही वाटत आजवर कुणी वयात येणार्‍या मुलांसाठी खास वेगळ्या वर्गाची - पीरीयडची गरज आहे असे समजून तो आयोजित केला असेल. हे तेव्हापासून दुर्लक्षीत आहे. आताही असेच राहावे असे वाटते का? पुरूष मुळातच आपल्या व्यक्तिगत समस्या मोकळेपणाने चर्चीत नाहीत. मेनबोर्ड तर सोडूनच द्या. बर्‍याच तरुणांना खास पुरुषांचेच असे काही प्रश्न असू शकतात ज्याची उत्तरे इथले जाणकार देऊ शकतात. ते प्रश्न मेनबोर्डावर टाकू शकत नाहीत. दुसरं असं की आमच्या जे जे होस्टेलात कंप्युटर लावण्याबद्दल बंदी होती. (२००३-०४ चा काळ, स्मार्ट्फोन-लॅप्टोप नव्हते) मुलांच्या तर्फे मी जेव्हा संचालकांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी विरोधासाठी मुले फक्त पोर्नच बघत बसतील असा शेरा मारला. हा शेरा मारणार्‍या त्या संचालकांच्या मनात जी भावना मुलांबद्दल तेव्हा होती तीच अशा दालनाला विरोध करणार्‍यांची असेल असे मला वाटते. तुमचे काय म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/03/2015 - 14:09 नवीन
आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?
>>> नै चालणार. कारण हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमन्स ला लागू होत नाही.. (तो तुमचामाझा आर्टिस्ट लोकांचा खाजगी मामला आहे)यापेक्षा वर आदि वगैरेंनी दिलेले वेगळे पणाचे मुद्दे सरसकट सर्व पुरुष जातीला लागू होतात. ते मिपाहाऊस ऑफ कॉमन्स'चे आहेत.आणि म्हणून त्या दृष्टीनं ते बरोबर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2015 - 12:07 नवीन
>>>> मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;) छ्या. मिपावर जगणे आणि मिपावर मरणे, मिपा माझी प्रेयसी आहे. पहिलं प्रेम. :) (आता मिपा स्त्रीलिंगी की पुल्लिंगी म्हणु नका) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 12:54 नवीन
आमचंही पिरेम मिपाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सस्नेह गुरुवार, 12/03/2015 - 12:58 नवीन
मग त्या दर्पणाचं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 12:59 नवीन
ते दुसरं पिरेम. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/03/2015 - 14:13 नवीन
आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा फोडून टाकेल ना ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 14:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 12/03/2015 - 15:30 नवीन
ती होयसळांची? टीशर्टवरली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 15:50 नवीन
नै. आमची यादवांची, मराठमोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 15:48 नवीन
हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा फोडून टाकेल ना ? ;)
..याच्या टाळक्यात..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 15:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/03/2015 - 17:56 नवीन
तसे केले तरच ती खरी मराठमोळी दर्पणा शोभून दिसेल ! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/03/2015 - 18:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गवि Fri, 12/04/2015 - 11:14 नवीन
त्या बिचार्‍या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला मार पडण्याच्या नुसत्या शक्यतेनेही बुवांना नेहमी उकळ्या का फुटतात हास्यानंदाच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 11:24 नवीन
त्या बिचार्‍या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला
>> बाप रे! Image removed. मेलो मेलो! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रचेतस Fri, 12/04/2015 - 11:29 नवीन
अत्मा अमर असतानाही तुम्ही कसे मर'ताल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 19:42 नवीन
मी आत्मा कुठ्ठाय हो पण ? Image removed. अता! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गवि Fri, 12/04/2015 - 19:50 नवीन
निळे का हो पडलात बुवा??!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/04/2015 - 20:07 नवीन
आं........................ ल्लुल्लुल्लु Image removed. दू दू गवि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कपिलमुनी गुरुवार, 12/03/2015 - 12:15 नवीन
आज मिपातक ला मुलाखत देताना अभ्या..ने कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. असे खळबळजनक विधान केले आहे. मिपावरील सध्या असलेल्या काही विशेष व्यवस्थेस त्याचा विरोध आहे हे स्पष्ट झालेय. कॅमेरामन टकासह नारदमुनी ! मिपातक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 12:18 नवीन
गप्पे कप्या. हे लै आधी बोललेलो हाय. नवीन अन खळबळजनक काही नाही त्यात. . . निघाला बोंडूक घेऊन थाटात. कॅमेरा पाडल ते टक्या. लक्ष ठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 12:16 नवीन
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.
वेगळा ग्रूप हवा असणे = कंपूबाजी करायची असणे हे समीकरण खरे आहे का ओ मालक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2015 - 12:22 नवीन
अभ्याचं मत जरा कधी गड्बडीत येत असतं. त्यातला आशय समजून घ्यायचा. माझं मत समीकरण खोटं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अभ्या.. गुरुवार, 12/03/2015 - 12:35 नवीन
तुम्हीच गडबडीत थांबवून इचारणार. मग काय करावे बरे. असो. प्राडॉ. कधी चुकीचे बोललेत काय? जातो ओ. भेटू निवांत कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 12:53 नवीन
कधी भेटताय निवांतपणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 12:27 नवीन
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.
जावा की मफतलाल पार्कात राहायला.. खुशाल **स्तानात जावा.. ?!?! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
रिम झिम Fri, 12/04/2015 - 12:01 नवीन
गवि माफ करा पण चुकून स्तनात जावा असे वाचले... असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सूड गुरुवार, 12/03/2015 - 11:57 नवीन
वाचतोय!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 12/03/2015 - 11:58 नवीन
मिपावर दालन मिळो न मिळो , हे मालक ठरवणार पण या निमित्ताने पुरुषांना भावना असतात किंवा त्यांच्याही शंका किंवा प्रश्न असू शकतात हे पटलावर आले . आणि तिथे मोकळेपणाने चेष्टा मस्करी जरी केली तरी कोणाचातरी मानभावी विनयभंग होउन आयडी उडणार नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 12/03/2015 - 11:59 नवीन
स्त्रीपुरुष वगैरे वाद सोडून दिल्यास, असे एखादे दालन करता येईल ज्यातले धागे हे फक्त लॉगइन केल्यावरच दिसू शकतील. (खफपेक्षा काहीतरी वेगळे).
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 12:10 नवीन
कोनाडा काय म्हणता हो सर? परमिट रुम म्हणा की..!! किंवा खलबतखोली. असावा की नसावा हा मुद्दा सोडा... असावाच. आता नाव काय असावं या नवसाच्या दालनाचं यावर चर्चा सुरु होऊदे. बाकी सीग्राम इम्पिरियल ब्लूची स्पॉन्सरशिप मिळवता येईल का या विभागाला? आणखी काही विषयः १. सिगरेट सोडतानाचे हाल २. रुपा बरी की व्हायपी. व्ही कट की हापचड्डी शेप. ३. व्हिस्कीवादी विरुद्ध रमवादी ४. बर्फवादी विरुद्ध सोडावादी उपरोक्त विषय स्टिरिओटाईप आहेत हे मान्यच आहे. स्त्रियांच्या दालनात सासूसुना, टीव्हीसीरियल्स, मा.पा., विणकाम भरतकाम, स्वैपाक अशाच चर्चा होत असणार अशी समजूत जशी स्टिरिओटाईप दाखवते तसंच इथेही. ;-)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/03/2015 - 12:12 नवीन
कोनाडा, पर्मिट रूम, ढाबा, गुत्ता, खोली, काय पायजे ते ठेवा. शिंपळ असल्याशी कारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पगला गजोधर गुरुवार, 12/03/2015 - 12:16 नवीन
''सिगार-क्लब'' कसं वाटतय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
म
मी-सौरभ गुरुवार, 12/03/2015 - 12:31 नवीन
"चीअर्स !!" हे नाव चलेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 12:32 नवीन
अनुमोदन. बनियन कंपूही चालेल (जवानमर्द फास्टर फेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
न
नाखु गुरुवार, 12/03/2015 - 12:37 नवीन
"चाव"डी चा पार... चार घटका करमणूक, कुणी मागतलाच तर आणि तरच सल्ला, बाकी पीक पाणी आणि इतर गप्पा गावकरी नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सूड गुरुवार, 12/03/2015 - 12:48 नवीन
'माज'घर ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 12/03/2015 - 18:19 नवीन
माजच पाहिजे तर, ’जाऊ, की येता?’ असं चालंन का? अनाहिताशी र्‍हाईमपण होईल बघ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2015 - 12:18 नवीन
>>>>> कोनाडा काय म्हणता हो सर? परमिट रुम म्हणा की..!! चुकलंच गवि. कोनाडा या शब्दात जरा मागासलेपण दिसतंय. परमिट रुमसारखं ते दालन असावं याच्याशी सहमत. सालं दोन दोन पेग आणि दोन दोन सिगारेटचे झुरके घेत (मी यातलं काहीही घेत नाही, सांगुन ठेवतो) सालं आयुष्याविषयी मस्त बोलायचं. प्रामाणिक, व्यवस्थेतील (समाज आणि देश) पटत नाही. मस्त शिव्या द्यायच्या. मस्त रडायचं. कोणी परंपरावादी नाही कोणी पुरोगामी नाही. पटत नै चल छोड दिया. १. सिगरेट सोडतानाचे हाल २. रुपा बरी की व्हायपी. व्ही कट की हापचड्डी शेप. ३. व्हिस्कीवादी विरुद्ध रमवादी ४. बर्फवादी विरुद्ध सोडावादी हे सर्व विषय मुख्य बोर्डावर येऊ शकतात. घेऊ कधी तरी. वाचनखुण साठवतो प्रतिसादाची. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मारवा गुरुवार, 12/03/2015 - 15:53 नवीन
वेगळा कोनाडा मिळाला तर माझे कीतीतरी धागा विषय ज्यांचा मी मनातल्या मनात गळा घोटला ते जिवंत होऊन मोकळा श्वास घेतील. हे विषय मी घेऊच शकत नाही कारण कीतीही संयत भाषेत लिहीले तरी ते शेवटी अश्लील अश्लील बोंब होणारच काय हे कसल हे उदा. हे विषय होते १- स्त्री देहांतील सौंदर्यस्थळे २- सालो चित्रपटावर एक लेख लिहायचा होता. ३- सॅन्डविच व गेयशा आणि इतर मसाजाचे विवीध प्रकार ४- अत्याधुनिक ब्युटी पार्लर मध्ये ब्रायडल मेकअप मध्ये केले जात असलेले विधी. ५- सीक्रेट सेक्स सोसायटीज ६- कोलटकरांच्या काही कवितेवरील चर्चा ७- मेल इगो आणि लैंगिकता इ.इ.इ. आता हे मेन बोर्डावर कसे मांडणार म्हणुन विचारच सोडुन दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2015 - 15:59 नवीन
आत्ता मला आपलीच आठवण झाली. आपण मागे एका कवितेवर बोललो होतो. खरं तर 'तसं कुठे करतात' मला त्यावर चर्चा करायची होती पण कसं बोलू असं मलाही वाटलं आणि आपण दोघांनीही तो विषय सोडुन दिला. बाकी, कोलटकर माझे फेव्हरेट. नक्की लिहा त्यांच्या कवितेबद्दल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मृत्युन्जय गुरुवार, 12/03/2015 - 12:37 नवीन
नाय गरज वाटत ब्वो.
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी गुरुवार, 12/03/2015 - 12:39 नवीन
मिपावर लोकशाही आहे . सर्व सदस्यांना एकाच मापदंड ..... वगैरे असा समज होता माझा . आता हा रिझरवेशन चा मुद्दा कोठून वर आला बरे ?
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य...
या विषयां साठी इतर फोरम्स उपलब्ध आहेतच की .चाललंय ते छानच आहे मग कम्प्लीकेट का करावे ?
keep It simple
असे आपल माझं वैयक्तिक मत हो . बाकी चालुद्या तुमचे पुढे . चूभूद्याघ्या
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/03/2015 - 12:45 नवीन
एका कवितेच्या काही ओळी वाचा तोपर्यंत. कवी अरुण कोलटकर. एवढी मोठी मिशी तुझ्या बायकोला चालते तरी कशी एक माझा पेशंट होता प्रोस्टेटची केस काय त्याचं नाव हां हृषिकेश हृषिकेश Such big whiskers O he was a Laugh पण एका रात्री मी ह्ळूच घेतली कात्री अन कापून टाकल्या साफ अर्थात त्याची बायको झाली खूष पण तो एवढा भडकला की O my gosh दोन महिन्यानी दिसला तेव्हा मला बघून आठ्या आणि व्हिस्कर्स बघाव्या तर पहिल्यापेक्षा मोठ्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/03/2015 - 12:52 नवीन
अगगागागागाग्गा_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि गुरुवार, 12/03/2015 - 12:54 नवीन
अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, सुलभ रेसिपीजची देवाणघेवाण हीदेखील काळानुसार आज पुरुषांच्या दालनातली गरज बनली आहे. सध्याच्या बॅचलरांना पटणार नाही अर्थात. ते भ्रामक सुखस्वप्नात असतील भविष्याच्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा