पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
💬 प्रतिसाद
(224)
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/08/2015 - 11:46
नवीन
१९९
- Log in or register to post comments
P
pacificready
Tue, 12/08/2015 - 11:48
नवीन
काय हे प्रगो? काही गरज आहे का असे प्रतिसाद टाकायची?
बघ झाले की नाही 200 ते!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 12/08/2015 - 11:47
नवीन
२००
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Wed, 12/09/2015 - 10:05
नवीन
बर्यापैकी धाडस दाखवलयं सर्वांनी प्रतिसादांमध्ये.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 12/09/2015 - 10:07
नवीन
प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला, बॅक्ग्राऊंड्स पण पाठवल्यात.
लिंक कधी देताय?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/09/2015 - 10:19
नवीन
आपलं का्य ठरलंय :/ खासगी गोष्टी इथं जाहीर करायच्या नाहीत.
पण, आपल्या आग्रहास्त्व संध्याकाळी चौथारा सॉरी कोनाडा दर्शनासाठी खुला करू ? :)
कोण कोण आयडी सोडू आपण तिथे ? सुरुवातीला पाच पुरुष सोडु ?
आपल्याला महिलाही सोडायच्या आहेत ? अदिती घोळपांडे येते म्हणाली ?
--दिलीप बिरुटे
-
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 12/09/2015 - 11:02
नवीन
ओके आणि सॉरी सर.
आपण करुयात ते सारे मिळून.
रिक्वेस्ट ऐक्सेस मस्त आयडिया आहे. अदितीबैसारखे खिलाडू लोक्स येताहेत ते बरेच आहे की.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 12/09/2015 - 12:09
नवीन
अरे कधी सूरू होणाराय हा कोनाडा??
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/19/2015 - 07:17
नवीन
रंगमंच तयार आहे. बस पडदा वर जाण्याची वाट पाहतोय.
कोनाडा. बघुन या. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 12/19/2015 - 07:52
नवीन
येस्स सरजी.
हो जायेंगा थोडी ही देरमे.
सर, आपका हुक्म सर आंखोपर. ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sat, 12/19/2015 - 07:53
नवीन
सर ते मेंबरशिपचे तुम्हाला व्यनि करुन घेताय की अजून कसे?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/19/2015 - 07:01
नवीन
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 12/19/2015 - 08:16
नवीन
उगवत्या कोनाड्याला शुभेच्छा ! :)
- Log in or register to post comments
म
मोहनराव
Wed, 01/20/2016 - 16:03
नवीन
कोनाड्याचा विषय कोनाड्यात पडला काय?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 13:07
नवीन
नै नै कोनाड्याचा विषय अजिबात कोनाड्यात पडलेला नाही.
अभ्या सध्या सुट्टीवर आहे. तो आला की पुन्हा आपला हा कोनाडा वर काढु. :)
एक कोनाडा गीत तयार करायचा आहे.
कवी शोधतोय आम्ही सध्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मोहनराव
गुरुवार, 01/21/2016 - 13:12
नवीन
आत्मबंधु आहे की त्यासाठी... त्यांनापण आता कोनाड्याची गरज आहे.. ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 13:32
नवीन
बाय द वे, काय काय विषय असतील आपल्या कोनाड्याचे ?
काही अंतिम स्वरुप दिलं की नाही कोणी ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/21/2016 - 16:14
नवीन
गीत तयार करायचा आहे >> पुर्षांचा कोनाडा म्हणून गीत ही करायचा का? भारीच ब्वॉ! =))
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 16:29
नवीन
गीत तयार करायचं आहे, असंही वाचता आलं असतं ना.
आता तर तुमच्या जीद्दीवर कोनाडा सुरु केलं आहे.
सदस्यत्व घेता का ? :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/21/2016 - 16:35
नवीन
घेतलं समजा.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 16:55
नवीन
आपण मुख्य बोर्डावरच बर्या आहात.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/21/2016 - 16:56
नवीन
:D
- Log in or register to post comments
ए
एस
गुरुवार, 01/21/2016 - 16:28
नवीन
पुरुषांसाठी स्वतंत्र कोनाडा असावा म्हणजे काही गोष्टींबद्दल तिथे मनमोकळी चर्चा करता येईल असे मत असेल तर त्याविषयी पूर्ण आदर बाळगून एक सूचना मला करावाशी वाटते, की आधी अशा एखाद्या विषयावर मुख्य बोर्डावर एक धागा काढून पहा. माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो. जर असा एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील. समजा धाग्याचा विषय, मांडणी वा प्रतिसादांचे स्वरूप हे मिपाधोरणाविरुद्ध आहे असे संपादकमंडळाचे मत पडले तर त्यावर कात्री चालविण्याचा अधिकार त्यांना आहेच.
आपण करतोय काय की, रिंगणाच्या बाहेरूनच चाचपणी करत बसलोय. एक धागा काढून पहा. मनातल्या रास्त शंका, प्रश्न खुलेपणाने पण संयमितपणे मांडून पहा. एक प्रयोग करून पाहूया. म्हणजे वेगळ्या कोनाड्याची गरज आहे का व कितपत आहे आणि असल्यास त्याचे स्वरूप काय असावे याचा अंदाज येऊ शकेल.
काय म्हणता?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/21/2016 - 16:52
नवीन
माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो.
मिपाच्या मुख्य बोर्डावर सर्वच विषय यावेत ही माझी एक कट्टर मिपाकर म्हणुन नेहमीच इच्छा आणि भूमिका राहीली आहे. मी कुठल्याही कोनाड्या-कानाड्याच्या विरोधात सुरुवातीपासून आहे. सर्व विषय मुख्य बोर्डावरच यावेत या मताचा आहे.
एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील.
अगदी सहमत. मिपा आता अधिक मोकळं होत आहे. आता ते का आणि कसं विचारु नये. नवनवीन सदस्य स्त्री आणि पुरुष यांचा मिपावर अजून वावर वाढला पाहिजे. सद्य मिपाकरांच्या विचारांना एक साचलेपण आलं आहे. नवनवीन सदस्य येतील आणि आपले विचार मांडतील. अबकडचा पुरुष कोनाडा आणि कखगघ यांचा अमुक धमुक कोनाडा यामुळे एक वैचारिक दुफळी आणि गट-तट निर्माण होण्याची शक्यता असते. विचारांचा, संवादाचा खेळकरपणाचा अभाव अशा कोनाड्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. एकमेव मुख्य बोर्ड हा त्यावरचा उपाय आहे, पण हा आपला विषय नाही. आपला विचार आहे आपण सर्व विषय मुख्य बोर्डावर घेत राहु. संपादक त्या धाग्याचं मुल्य ठरवित राहतीलच त्यात काही वाद नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5