Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा वजनाचा -१

स
सुबोध खरे
गुरुवार, 12/31/2015 - 08:04
🗣 74 प्रतिसाद
डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही. पण आम्ही काही खातच नाही. आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही. वजनाचा काटाच बरोबर नाही वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो वजनाचा तक्ता चूक आहे किंवा एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ? आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो. आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते. आता फक्त उपास करणे बाकी आहे. जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का? आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत. माझे वजन बरोबर आहे फक्त उंचीच थोडी कमी आहे. बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही. दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ? मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं मेनो पॉज नंतर वजन वाढतंच पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात. यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही. खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे. बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन फार जास्त आहे आणी आपण ते कमी करावे असे वाटत नाही. यामुळे जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे. https://en.wikipedia.org/wiki/Denial वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या आज जगात ९२ कोटी लोक भुकेलेले आहेत तर १५० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत. जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात. लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत. अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात. दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत. वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते. जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत. शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे जास्त चांगले परिमाण आहे. यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी. यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा वजनदार माणूस BMI २५ ते ३० आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त. याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३३.८५ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे. http://halls.md/body-mass-index/av.htm यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावऋण आपल्याला पाहता येईल हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine. तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल). रच्याकने-- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते क्रमशः
  • काटा वजनाचा -२
  • काटा वजनाचा -३
  • काटा वजनाचा --४
  • काटा वजनाचा --५
  • काटा वजनाचा --६
  • काटा वजनाचा --७
  • वजनाचा काटा -८
  • वजनाचा काटा --भाग ९

Book traversal links for काटा वजनाचा -१

  • काटा वजनाचा -२ ›

प्रतिक्रिया द्या
48203 वाचन

💬 प्रतिसाद (74)
म
मन१ गुरुवार, 12/31/2015 - 08:19 नवीन
वाचतोय. लेखाच्या सुरुवातीला नेहमीचे संवाद देण्याचा मिश्किलपणा आवडला. ह्याबाबर्त माझे दोन पैसे :- http://www.misalpav.com/node/32875 . . ( अर्थात मला नेमकं काही सम्जत नाही वैद्यकातलं; पण बहुतेक काही काही गोष्टी मी सवयीने/चुकून/अजाणतेपणी बरोबर करत असेन ; असा अंदाज. ) . . पुभाप्र
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/31/2015 - 08:27 नवीन
मनोबा दुपारी १२ ४९ ला असा दुवा देणे हे पाप आहे. जेवणाच्या वेळेस असे विविध खाद्य पदार्थांच्या बद्दल चर्चा करणे अजिबात बरोबर नाही. लेख अगोदरही वाचला होताच. भुकेने कासावीस आणी त्यात हे असं. रच्याकने-- माझा BMI या निमित्ताने पाहिला तो २१. ८ आला. तेंव्हा आता काही तरी जोरदार खायला पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
य
यशोधरा गुरुवार, 12/31/2015 - 08:20 नवीन
वाचते आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 12/31/2015 - 08:23 नवीन
झक्कास. जिव्हाळ्याचा विषय छेडलात. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 12/31/2015 - 08:25 नवीन
उन्हाळ्याच्या अखेरीस ते वाढते. मग गणपतीच्या सुमारास ते थोडे आक्रसते. पुढे दसरा-दिवाळीच्या युतीने ते परत वाढते. आणि मग हिवाळ्यात पोटाच्या कक्षा रुंदावत जातात. हिवाळा संपला की पोट परत आक्रसते आणि आंब्याचा सीझन सुरु झाला की परत वाढते. थोडक्यात काय, तर जीभेसाठी जगत असल्याने, थोडाफार भार पोटावर येतो.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 01/01/2016 - 10:06 नवीन
काका हेच खर ब्रम्हवाक्य....!_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दिपक.कुवेत Fri, 01/01/2016 - 15:24 नवीन
जल्ला ह्या जीभेवरच ताबा नाय तर पोट्/वजन कसं काय कमी होणार?? एनी वे छान धागा. होणार्‍या चर्चा वाचायला आणि त्यातले काही उपाय अमलात आणायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
न
नीलमोहर गुरुवार, 12/31/2015 - 08:27 नवीन
"वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो, एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ? जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?" - अगदी हेच :) पूर्वी कमी वजनाबद्दल OCD होता म्हटले तरी चालेल, आता वजन कमी असले तरी फिटनेस वाढवण्यावर भर असतो. या विषयावरील लेखाची खूप गरज होती, वजन वाढवू इच्छिणार्‍यांसाठीही काही लिहावे ही नम्र विनंती. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/31/2015 - 08:31 नवीन
वजन वाढवू इच्छीणार्यांना मी एक साधा सल्ला देतो. तळवलकर, VLCC, गोल्ड जिम सारख्या जिमच्या बाहेर सकाळी उभे राहा. त्यातून बाहेर येणाऱ्या सुदृढ लोकांना विचारा, "तुम्हाला आहार तज्ञाने "काय काय खाऊ नका" सांगितले आहे? "ते सर्व दाबून खा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर गुरुवार, 12/31/2015 - 10:21 नवीन
कितीही खाण्याने फरक पडत नाही, वेट गेन साठी जिम वगैरे लावूनही उपयोग नाही, वजन तात्पुरते वाढेल परत जैसे थे. इतर लोक आमच्या बारीक असण्यावर जळतात आणि असे जाड लोक पाहिले की आपण आहे तसेच बरे असं वाटतं, तेवढंच समाधान :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रुपी गुरुवार, 12/31/2015 - 21:31 नवीन
इतर लोक आमच्या बारीक असण्यावर जळतात आणि असे जाड लोक पाहिले की आपण आहे तसेच बरे असं वाटतं, तेवढंच समाधान :) >>> अगदी, अगदी.. शिवाय त्यांच्या जाड असण्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही, पण ते मात्र आपल्याला जेव्हा भेटतील तेव्हा "तू आता अजून किती बारीक होणार आहेस?" , "तू म्हणजे एखाद्याने किती बारीक असावे याचा नमुना आहे" असे काही म्हणून मोकळे होणार! मला मात्र ट्रेडमील, सूर्यनमस्कार यांचा फायदा झाला थोडे वजन वाढवायला - BMI - १९ च्या वर आणायला.. पण एकंदरीत जास्त लोकांना वजन कमी करणेच अवघड जात असल्याने उगीच फार वाढवण्याचे कष्ट घेतले नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पिवळा डांबिस गुरुवार, 12/31/2015 - 08:58 नवीन
हे असं सगळं लिहिण्यापेक्षा काढा तुमचं ते पायताण आणि मारा आमच्या टाळक्यात! :) च्यायला, पुढल्या भागात उपाय लिहा ना उपाय!!!!
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 12/31/2015 - 09:15 नवीन
लोल . उपाय सांगतीलच ते पुढील धाग्यात. तोवर होमवर्क, चित्रगुप्तांचा धागा :- शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? सर्व डॉक्टरांना असा होमवर्क केलेले विद्यार्थी खुप खुप आवडतात . गूगल - विद्यार्थी आणि गूगल-ज्ञानी. भरपूर वाचून वगैरे यायचं ; मग डाँ ना विचारत सुटायचं. तेवढाच डॉक्टर लोकांचा वेळही वेळ बरा जातो ;) शिवाय जमल्यास त्यांनाच मार्गदर्शन करुन यायचं. . . अवांतर :- तो धागा शिरेसली चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रचेतस गुरुवार, 12/31/2015 - 09:12 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 12/31/2015 - 09:13 नवीन
पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे भाग्य आम्हास कधी लाभणार :D
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/31/2015 - 09:54 नवीन
बारीक माणसाला सल्ला -- थांबू नका , खा! जाड माणसाला सल्ला -- थांबा , खाउ नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
क
कंजूस गुरुवार, 12/31/2015 - 09:25 नवीन
कुंडलीत सप्तमात गुरू असेल तर वजनाचा काटा विकतही घेऊ नये ,असल्यास माळ्यावर टाकावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 12/31/2015 - 09:28 नवीन
#पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे भाग्य आम्हास कधी लाभणार :D" --आलटून पालटून सकाळी पंजाबी समोसे,मेदुवडे( उडीद वडे),चीज सॅन्विज खाल्यावर सहा महिन्यात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/31/2015 - 09:52 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Body_mass_index
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/31/2015 - 10:03 नवीन
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. च्यामारी असं हाय काय ! आता माझ्या सुटलेल्या तंबोर्‍याला काय सांगावे ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/31/2015 - 10:09 नवीन
कॅलरीज कॅलरीज कॅलरीज... असे अधुन मधुन मी माझ्या मनाला समजावत असतो... तरी सुद्धा परवा लग्नाला गेलो होतो तिथे चांगला ताव मारलाच, पण आईस्क्रीम खाताना जरा जास्तच हवरटपणा केला... आईस्क्रीम + अक्रोड हलवा + रबडी असे बाउल मधे कॉबिनेशन घेवुन आईस्क्रीमची चव चाखली ! :) घरी आल्यावर मग कॅलरी ने मनाला प्रश्न केला ! ते सुद्धा भरलेल्या पोटाच्या तंबोर्‍यावर कटाक्ष गेल्यावर ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नंदन गुरुवार, 12/31/2015 - 10:10 नवीन
>>>आता माझ्या सुटलेल्या तंबोर्‍याला काय सांगावे ? ;) --- गवसणी घालायला हवी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण गुरुवार, 12/31/2015 - 10:13 नवीन
हा.हा.हा... :) होय खरयं ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
पद्मावति गुरुवार, 12/31/2015 - 10:09 नवीन
फारच छान लेख. लेख वाचून घरी माळ्यावर पडून असलेला वजनाचा काटा आता बाहेर काढलाय.
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो
:( खरंय... क्रमश: आहे ते आवडलं. पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments
ख
खुशि गुरुवार, 03/31/2016 - 14:57 नवीन
झकास आहे लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ख
खुशि गुरुवार, 03/31/2016 - 14:59 नवीन
झकास आहे लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
स
सस्नेह गुरुवार, 12/31/2015 - 10:23 नवीन
BMI मोजताना
यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची सेमी मध्ये मोजलेली हवी.
इथे उंची मीटर्समध्ये असे हवे आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 12/31/2015 - 10:29 नवीन
हो उंची मीटर मध्येच हवी.इंच नाही म्हणून सेमी लिहिले आहे. आय माय स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 12/31/2015 - 10:44 नवीन
त्याप्रमाणे दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/31/2015 - 10:42 नवीन
ही उपयोगी लेखमाला होईल हे नक्की. खुसखुशीत शैलीत असल्याने लोकांच्या सहज पचनीही पडेल. मात्र लेख जास्त पचविल्याने (समजून उमजून व्यवहारात आणल्याने) वजन वाढणार नाही तर कमीच होईल ! ;) :) एक छोटीशी सुचवणी : BMI = Weight in Kilograms / ( Height in Meters x Height in Meters ) पुभाप्र.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 12/31/2015 - 10:51 नवीन
रुते कुणाला ची तीव्रतेने आठवण करून देणारा वाखु धागा. स्वगत :नाखु लक्ष्य द्या "बाळश्याकडे"
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 12/31/2015 - 12:08 नवीन
वाचते आहे.पुभाप्र. लेखमालिका वाचून माझे वजन घटल्यास एक डोंबिवली कट्टा प्रायोजित करण्यात येईल ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/31/2015 - 12:37 नवीन
आईग्ग! सगळ्यांच्या चिंतेचा विषय. लेखमाला वाचत राहीन.
  • Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि. गुरुवार, 12/31/2015 - 12:44 नवीन
माहिती अति उत्तम आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी गुरुवार, 12/31/2015 - 13:14 नवीन
पण गोड खाणे सोडणार नाही. रात्रीच्या जेवणात गोड नसेल तर मी चॉकलेट्स तरी खातोच खातो. तीही नसली तर क्रिम बिस्कीटे. अलिकडे नको त्या वयात वजन वाढत आहे, विरोधी पक्ष रोज पोटाकडे बोट दाखवतो. कृपया पुढील भागात गोड खाउनही पोट कमी कसे करता येईल यावर उपाय सुचवा.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 12/31/2015 - 13:15 नवीन
सुरुवातीची वाक्ये मस्तच! ;) (खुद के साथ बातां - रंगा, वजनाचा 'काटा' कसा काढावा बरे? ;) ) (जडशरीरभयकारी)रंगगोल
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 12/31/2015 - 13:27 नवीन
मापात हौ भौ आपण. टेन्शन इल्ला :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 12/31/2015 - 14:11 नवीन
दो के चार हूंदेत आणि दोन अगलतगल खेळूदेत मग बघू हां :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 12/31/2015 - 14:37 नवीन
अगलतगल ग्राऊंडवर घेऊन जाणारे चालायला लागले की. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
न
नाखु Fri, 01/01/2016 - 04:29 नवीन
इद्रीक असल्यावर पोरं चळवळी असतील यात मला अज्याबात सौंशय नाही.. नुकतीच अभ्या मठीला भेट दिलेला. थेट भेट वाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सिरुसेरि गुरुवार, 12/31/2015 - 14:02 नवीन
उपयुक्त माहिती . काहि माणसे खादाडही असतात आणि व्यायामही करीत नाहीत तरी ती बारीक असतात - याचे शास्त्रीय कारण काय असावे .
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Wed, 01/06/2016 - 07:48 नवीन
मागील जन्मी केलेली सत्कर्मे :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
उ
उगा काहितरीच गुरुवार, 12/31/2015 - 15:06 नवीन
कुणी मला म्हटलं की बाबारे असा असा आहार घे शंभर वर्षे जगशील तर त्याला म्हणेल बाबाजी ४०% कमी करा पण खाण्यावर नियंत्रण , अवघड आहे .
  • Log in or register to post comments
र
रामपुरी गुरुवार, 12/31/2015 - 22:59 नवीन
डॉक्टरसाहेबांचा आणखी एक बहुमूल्य धागा... रच्याकने, माझे वजन, उंची, पोट, BMI, रोजचा व्यायाम, आहार सगळं सगळं मापात आहे पण कोलेस्ट्रॉलचा आकडा ढगाला टेकलाय. आहार थोडा कमी करून आणि व्यायाम थोडा वाढवून वजन चार पाच किलो कमी केले. पण यापुढे काय करावे कळत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/01/2016 - 00:05 नवीन
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वार्षिक चाचणीमध्ये माझे कोलेस्टेरॉल बरेच वाढल्याचे आढळले. तरी पण डॉक्टरांच्या मते औषधाच्या साहाय्याने कमी करण्याइतके वाढले नव्हते. डॉक्टरांनी आहारात सुधारणा व व्यायाम हे मार्ग सुचवले. आयुष्यात प्रथमच गांभीर्याने असे उपाय करायची माझी वेळ होती. मी केलेले बदल-
  • साखरेचे सेवन अगदी अपवादात्मक परिस्थितीत करणे.
  • बेकरी प्रॉडक्टस व तळलेले पदार्थही महिन्या दोन महिन्यांतून एखादे वेळेस खाणे.
  • घरी अ‍ॅरोबिक्स व्यायाम करणे व हापिसात जमेल तेव्हा जिन्याने वर जाणे.
पहिल्या २० आठवड्यानंतर कॉलेस्टेरॉल तपासले तर १०% कमी झाले होते अन वजनही १० पाउंडांनी कमी झाले होते. गेल्या आठवड्यात पुन्हा वार्षिक चाचण्या केल्या. कोलेस्टेरॉल गेल्या वर्षी पेक्षा २० टक्के कमी झाले आहे. वजन जे कमी झाले होते ते कायम राहिले. अजुनही कोलेस्टेरॉल नॉर्मल मर्यादेपेक्षा थोडेसे अधिक आहे पण डॉक्टरांच्या मते ती काळजीची बाब नाही. वजन कमी झाल्याने मला अधिक एनर्जेटिक वाटू लागले अन हापिसातले वा घरातले काम करण्याचा स्टॅमिना वाढला. या विषयाला हात लावण्यासाठी डॉ. खरे यांना धन्यवाद. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
र
रमेश आठवले Fri, 01/01/2016 - 01:54 नवीन
भारतीय अनुवंशाच्या लोकांमध्ये Triglycerides नेहमी जास्त प्रमाणात मिळतात. याचे कारण काय,परिणाम काय व त्यावर उपाय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सुबोध खरे Sat, 01/02/2016 - 15:06 नवीन
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/80-Indians-have-skewed-lipid-level-72-low-good-cholesterol/articleshow/36220960.cms हा अभ्यास २१ कोटी लोकांवर केलेला आहे. "चार" रुग्णांवरील स्वतःचे वैयक्तिक अनुभव नाहीत. शिवाय शहरी लोकांमध्येच असे रोग होतात हा दावा पण फोल ठरलेला आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लोकांची परिस्थिती शहरातील लोकांइतकीच गंभीर आहे असे या अभ्यासात आढळून आले आहे. गावात लोकाची जीवन पद्धती जास्त चांगली असते अन गावात माणसे "जास्त निरोगी असतात"असे म्हणणार्यांचे डोळे उघडतील असा हा अभ्यासाचा प्राथमिक निष्कर्ष आहे. यावरील उपाय पुढच्या भागात येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
च
चतुरंग Fri, 01/01/2016 - 00:13 नवीन
असेल तर तसे करु नका. वरणभातावर साजूक तूप घेत चला. शरीरातील चांगला मेद अतिशय कमी झाला तरी कोलेस्टेरॉल वाढते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/01/2016 - 04:53 नवीन
साजूक तूप माझ्या रोजच्या आहाराचा भाग नसले तरी अधून मधून खाल्ले जातेच. माहितीसाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Fri, 01/01/2016 - 15:11 नवीन
परंतु तसा सगळ्यांनीच लक्षात घ्यायला हरकत नाही. साजूक तूप हे योग्य प्रमाणात नियमित आहाराचा भाग बनवणे आवश्यक आहे. रक्तवाहिन्यांची लवचिकता, चांगल्या कोलेस्टेरॉलचे योग्य प्रमाण राखण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात वंगण असणे आवश्यक असते जे या तुपातून मिळते. अर्थातच योग्य आहार अणि व्यायाम याला पर्याय नाहीच. केवळ वजन नियंत्रणात आहे म्हणून तब्बेत चांगली असेलच आणि कोलेस्टेरॉल कमी असेलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा