तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत!
आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!
आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो.
आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी:
आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥
होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥
तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥
याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली.
आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील.
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!
आपलाच:
deadp
💬 प्रतिसाद
(110)
न
नितीनचंद्र
Wed, 01/06/2016 - 10:43
नवीन
नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत?
बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या!
एका रोगावर आपण अनेक पॅथींची औषधे घेतो. अहो ! परीणाम तर पहा. मग बोला. काही काळ जाऊ द्या. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ?
कालच म्हणे वजीरेआलम नवाज शरीफ यांनी पठाणकोट संदर्भात मोदींशी चर्चा केली. असे कधी घडले होते ?
बोलणी सुरु नव्हती तेव्हा सुध्दा शहीद होतच होते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/06/2016 - 11:24
नवीन
. नमो म्हणजे काही जादुची कांडी आहे का ?
बाकी सगळं सोडा, स्वतः अपेक्षा वाढवायच्या मग लोकांनी आश्वासनांची आठवण करून द्यायला सुरुवात केली की 'जादूची कांडी आहे?' का असा प्रतिप्रश्न करायचा हे काही पटत नाही.
"पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो.
बाकी चालू द्या...
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/06/2016 - 11:33
नवीन
+११
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/08/2016 - 10:27
नवीन
ओह मग मोदींनी निषेध खलिता पाठवला का?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 01/06/2016 - 15:13
नवीन
सगळे नुसती नावं ठेवताहेत. पण काय करायला पाहिजे होतं आहे यावर कोणीच काही बोलत नाहीये.
मागच्या वर्षात पाकिस्तानबरोबरच्या चर्चा थांबवल्या म्हणून शिव्या घातल्या. मोदी पाकिस्तानात गेले नव्हते तोपर्यंत पण गेले नाही म्हणून लोक्स शिव्या घालत होते. आता गेले तरी शिव्या घालताहेत. एकूण काय फक्त शिव्या घालायच्या हा एकच उद्देश दिसतोय.
चूक असेल तेथे टीका करायलाच पाहिजे पण मग नक्की काय चुकलं, ती चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि बरोबर काय आहे हे सांगण्याची जबाबदारी पण टीका करणार्यांवर येते. ते ती घेत नाहीत. गळाभेट घेतली तर मग अपेक्षा काय होती की मोदींनी गळाभेट घेताना वाघनखं खुपसून शरीफना मारायचा, मग सुपरम्यान सारख जाउन दाऊदला, हाफिजला मारायचं मग स्पायडरम्यान सारखं सगळ्या दहशतवाद्यांना जाळ्यात पकडून भारतात घेवून यायचं?
सलमान खुर्शीद आणि इतर काँग्रेसचे मान्यवर पाकिस्तानात जाउन काय बरळून आले त्यावर काही भाष्य केलं नाही कोणी. तृणमूलच्या इद्रीस अलीनी तर मोदींचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला. सुशीलकुमार शिंदे म्हणतात भाजपच्या काळात दहशतवादी हल्ले जास्त होतात. यावर इथे कोणाला आक्षेप घेण्यासारखे काहीच वाटत नाही? एकीकडे मोदी मुस्लिमविरोधी आहेत म्हणून बोंबा मारायच्या आणि दुसरीकडे त्यांना दहशतवाद्यांशी संबंध आहेत म्हणायचं!
काही शहाणे पत्रकार तर सगळ्यात चुकीचे प्लानिंग असलेली कारवाई आहे म्हणतात. म्हणे लष्कराच्या वरिष्ठ लोकांनी यांच्याकडे येवून हितगुज केलं म्हणे की आर्मीला बाजूला करून NSG ला कारवाई करायचे अधिकार दिले. त्यामुळे कारवाई एवढी लांबली वगैरे वगैरे. नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले म्हणालं की झालं पुढचे प्रश्न विचारायचे नाहीत. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी एवढे सहज पत्रकारांकडे बोलतात का? एवढी मोठी कारवाई चालू असताना अधिकारी जेवण झाल्यावर शतपावली करत करत निवांतपणे येवून पत्रकारांना भेटले आणि नाराजी व्यक्त केली! काहीही हं xx…
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 01/06/2016 - 18:33
नवीन
इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) राज्यात आणि केंद्रात सरकारे कुणाची आहेत, इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा.
१) ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा आधीच्या (गुरुदासपुर) अतीरेकी हल्ल्याच्या वेळी काम करत नव्हत्या त्या वेळीच अद्ययावत केल्या गेल्या नसाव्यात. यापुढे या बाबत हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेणे.
२) सीमा भागात अतीरेक्यांनी वसाहती क्षेत्रात आसरा मिळवला, सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात सीसी टिव्ही कॅमेर्यांची संख्या आणि गस्त वाढवली जावयास हवी. जेणे करून अतिरेक्यांना आसरा मिळवता येणे दुरापास्त व्हावे
३) सैनिकी विमानतळांना तारे एवजी व्यवस्थीत भिंतींची उपलब्धता
४) डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स , अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी.
५) पंजाब आणि सीमावर्ती राज्यां मधील ड्रग वापराबद्दल समाजशास्त्रीय अभ्यास आणि ड्रग व्यवहारांवर प्रसंगी इतर राज्यातील पोलीस दले वापरून अधीक कठोर नियंत्रण
६) पठाणकोट प्रसंगापुर्वी राज्य पोलीस दलाचा एसपी लेव्हलचा अधिकारी अतीरेक्यांच्या हाती नि:शस्त्र लागणे आणि सुटणे असे विनोद कोणत्याही स्थितीत भविष्यात होणार नाहीत याची दक्षता घेणे.
६) देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांची उपलब्धता होणार नाही याची काळजी घेणे (या वेळच्या केसशी संबंध नसला तरीही)
७) पाकीस्तान अनधिकृत शस्त्रांच्या उपलब्धता, ड्रग व्यापार आणि अतीरेकास अर्थपुरवठ्यावर नियंत्रण आणत नाही तोवर पाकीस्तानवर कठोर निर्बंध घालण्याबद्दल आंतरराष्ट्रीय जनमत बनवण्यावर भर देणे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 01/06/2016 - 18:40
नवीन
उर्वरीत भारतातही घर आणि वाहन विकताना आणि भाड्याने देताना सर्वसामान्य जनतेने विकत/भाड्याने घेणार्यांची नौकरी घेणार्यांची माहिती पोलीस दलांकडे अद्ययावत करण्याची द़क्षता घ्यावयास हवी. आस्थापना आणि व्यावसायिकांनी आपल्या परिसरातील रस्तेही कव्हर होतील अशा पद्धतीने सिसी टिव्ही कॅमेरे बसवावेत, सर्वच रेसिडेंशिअल सोसायटीज खासकरून सीमावर्ती राज्यात कंप्युटराईज्ड गेटपास पद्धतींची अंमल बजावणी कंपलसरी करावी.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/06/2016 - 18:46
नवीन
हे जरा जास्तच नाही होत का? अवघा देश तुरुंग बनवायचाय का?
संपूर्ण पृथ्वीला चामडे घालण्याऐवजी पायास चप्पल घालणे योग्य असते. पायातच चप्पल घातली नाही तर चामडे कितीही अंथरले तरी चटके बसणारच...
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 01/06/2016 - 19:01
नवीन
सीमा व्यवस्थीत कव्हर करता आल्या नाहीत आणि/किंवा देशांतर्गत अनधिकृत शस्त्रांवर नियंत्रण प्रस्थापीत करता नाही आले तर त्या शिवाय पर्याय नसावा. तुम्ही फक्त पाकीस्तानी अतिरेक्यांचा विचार करता आहात, मी नक्षलवादी ते स्मॉल आर्मसी भारतीय गुन्हेगारात वाढलेली उपलब्धता असे सगळेच लक्षात घेऊन लिहिले आहे. गेटवर मेटल डिटेक्टर ठेवायचा त्या मेटल डिटेक्टरने आवाज केला तरी त्याकडे दुर्लक्ष करावयाचे अथवा कुणातरी रॉबर्ट वड्राला (नमुद करण्याचा उद्देश राजकीय टिका नाही) सवलत द्यायची हे कुठे तरी थांबावयास हवे. खाजगीपणाचे महत्व लक्षात घेऊनही पाकीस्तान आणि चीनने भारताशी ज्या पद्धतीचे छुपे अतिरेकी युद्धतंत्र चालवले आहे त्यास सुरक्षीतता हवी असेल तर खाजगीपणाचे चोचल्यांना कोंबाळण्यात अर्थ नाही.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 01/06/2016 - 19:34
नवीन
अहो, आपण एखादा छोटासा प्लॉट घेतला तरी प्रथम त्याभोवताली कुंपण घालतो. 47 साली आपण एवढा मोठा देश ताब्यात घेतला तरी त्याला सांस्कृतिक / सामाजिक/ राजकीय / साधे तारांचे कुंपण घालू शकलो नाही आजपर्यंत ! कोपर्यावरती असलेल्या वाण्याकडे सुद्धा आपण आज cctv असलेला पहातो पण आजही आपण सीमाभागात सगळीएकडे cctv बसवू शकलो नाही. लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना !
- Log in or register to post comments
म
मोगा
Wed, 01/06/2016 - 20:15
नवीन
हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल... ते कशाला स्व पा कु मारुन घेतील?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/07/2016 - 04:43
नवीन
ट्रॅफीक सिग्नल लावले तर ट्रॅफीक पोलीस लागणार नाहीत म्हणण्यासारख आहे. केवळ सिसिटीव्ही लावून अफगाणीस्तान आणि इराक-येमेन-सिरीया सगळीकडचा अतीरेक कमी करता यावयास हवा.
सुरक्षीतता हा खूप मोठा आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचा विषय आहे, त्याच्या समतोल विचार विमर्शासाठी असे भावनावश धागे कितपत पुरेसे असू शकतील या बाबत साशंकता वाटते. विषयाच्या स्वंतत्र चर्चेसाठी (अ)सुरक्षीततेचा सांभाळ हा धागा लेख लिहिला पण दुर्दैवाने त्या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद नाही आणि उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 01/07/2016 - 15:20
नवीन
काहुन जाहिरात करु राह्यले हो?
उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते>>>>>>>म्हणजे तुमचा धागा ब्येश्ट?
पटल नाही ब्वा!!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/06/2016 - 20:13
नवीन
पायात चप्पल घालणे म्हणजे 'योग्य ठिकाणी उपाययोजना करणे जेणेकरून अव्यवहार्य उपाय करायची गरज भासू नये' असे अभिप्रेत होते.
जागोजागी मेटल डिटेक्टर व सीसीटीवी कॅमेरे हे दहशतवादी हल्ले वैगेरेंमधे अतिशय कुचकामी आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे. तरीही आपण त्याच गोष्टींचा पुरस्कार करत आहात ह्याबद्दल आश्चर्य वाटते. ताजमहाल होटेलवर ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यात सीसीटीवी वा मेटल डिटेक्टर असून काय उपयोग झाला? म्हणण्याचे तात्पर्य असे की ज्या गोष्टी प्रत्यक्ष संरक्षणासाठी व्यर्थ आहेत त्यांचा बागुलबुवा उभा करून फक्त आम जनतेस खोट्या सुरक्षिततेची जाणीव होऊ शकते, बाकी काही नाही.
चोरी, मारहाण वा शस्त्रांचा अनधिकृत उपयोग ह्यात सीसीटीवीची भूमिका फक्त साक्षीदाराची असते. आजकाल माध्यमांमधून 'सुरक्षेसाठी सीसीटीवी' ही संकल्पना भारतात फार चर्चीली जात आहे, त्यामागे मोठी उद्योजक लॉबी कार्यरत आहे. भारतात सीसीटीवी म्हणजे बॉडीगार्ड्स वा सुरक्षारक्षकांना पर्यायच आहे, सीसीटीवी जणू फायरवॉल आहे अशी काहीशी प्रतिमा बनवली गेली आहे. अमूक ठिकाणी गुन्हा घडला तिथे सीसीटीवीच कसे नाहीत, असून बंद होते, वैगेरे सीसीटीवी वर मुद्दाम भर देणार्या बातम्या येतात. त्यामागे अर्थकारण आहे, उपयोगिता नाही. कारण अशा बातम्या आल्या की लगेच स्थानिक राज्यसंस्थांमधे सीसीटीवीची मोठमोठाली टेंडरं निघतात, पास होतात, नळकांडी-कॅम्रे लावले जातात, जनता खुश, पुढारी खुश, कंपन्या खुश. सहा महिन्याचा फ्री-मेन्टेनन्स संपला की कॅमेरे व विषय बंद. खरे तर सीसीटीवी हा अतिआवश्यक, परम-संवेदनशील आवारात गरजेचा आहे, त्यास अखंड मानवी नियंत्रण-सुविधेची जोड आवश्यक असते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक फिरू शकत नाही म्हणून एकाच ठिकाणी बसून त्यास सर्व परिसर विनासायास न्याहाळता यावा ह्या उद्देशाने सीसीटीवींची निर्मिती झाली. जिथे समस्या असेल तिथे लगेच कुमक पाठवून परिस्थितीवर नियंत्रण पाठवणे सोपे जाते, मनुष्यबळावरील ताण हलका होतो. ह्यासाठी सीसीटीवी आहेत. आपल्याकडे फक्त कॅमेरे लावले की धन्यता मानतात लोक.
तुम्ही जे सर्व आस्थापनांमधे, अगदी रहिवासीसुद्धा, सीसीटीवी लावण्याबद्दल म्हटले आहे. ते जरा अति होतंय असं वाटतं. भारतीयांना मानसिकरित्या अधिकाधिक सुरक्षित वाटावे म्हणून ह्या उठाठेवी आहेत पण कायम वॉर-अलर्टवर असल्यासारखे आयुष्य सर्वच ठिकाणी कायम जगणे मानसिकरित्या घातक नसेल काय?
देशाच्या सीमा सर्वोत्तमरित्या सुरक्षित करणे, त्यात अजिबात ढीलाई न करणे ह्या सीमापातळीवरील गैरव्यवहार रोखण्यास योग्य अशा कृती आहेत. देशांतर्गत पोलिस-गस्ती असणे, तक्रारींवर कार्यवाहीची तत्परता असणे, गुप्तहेरांचे विश्वासार्ह व जीवंत जाळे असणे, संदेश-देवाण-घेवाण व निर्णयप्रक्रिया सुटसुटीत, वेगवान असणे, ह्या नेहमीच्याच कृती अधिक कडकपणे राबवणे आवश्यक आहे. शहर कितीही मोठे असो वा छोटे असो, प्रत्येक विभागातली बित्तंबातमी पोलिसांकडे असते. शहरात कोण आले, कोण गेले ह्याबद्दल पोलिस-प्रशासनाने स्वतः पुढाकार घेऊन रेकॉर्ड मेन्टेन करणे, (ह्यासाठी एक सर्वंकष सॉफ्टवेअर तयार करून सर्व ठिकाणच्या मानवी वाहतूकीचा रीअल-टाइम डेटा बघणे. म्हणजे प्रत्येक खाजगी वा सरकारी वाहनाच्या सीटमध्ये बायडीफॉल्ट पर्सन-वेट-सेन्सर लावून वाहनात एकूण किती माणसे आहेत, किती उतरली, किती लोक कुठे गेले, चढले वैगेरे मोठा किचकट प्रोग्राम बनवता येईल, इति कल्पनेच्या भरार्या. ह्या प्रणालीबद्दल मागे आराखडा बनवला होता. कधी वेळ मिळाला तर सविस्तर लेख लिहिन.) नागरिकांशी मैत्रीपूर्ण संपर्क ठेवणे ह्याही गोष्टी आवश्यक.
माझी सुरक्षिततेची संकल्पना फार सोपी आहे. चित्रपटांमधे उत्तम पार्श्वसंगीत त्याला म्हणतात जे अजिबात जाणवत नाही पण परिणाम साधून जातं. उत्तम सुरक्षा व्यवस्थाही तशाच पार्श्वसंगीतासारखी हवी. माझ्या संकल्पनेत मेटल डिटेक्टर्स, सीसीटीवी, अनावश्यक चेकिंग ह्यांना थारा नाही. गुन्हा घडण्याआधी रोखणे हेच खरे कौशल्याचे काम. सीसीटीवींचे फुटेजेस गोळा करून वर्षानुवर्षे कोर्टाच्या वार्या करणे अर्थहिन आहे.
बाकी तुमचे पहिल्या प्रतिसादातील सर्व क्रमांकाचे मुद्दे पटले. फक्त उर्वरित भारत व सामान्य नागरिक ह्यांना सुरक्षाव्यवस्थेच्या नावाखाली अनावश्यक मॉनिटर केले जाऊ नये असे वाटते. त्याचे मानसशास्त्रीय परिणाम गंभीर असू शकतात. जॉर्ज ऑरवेल चे '१९८४' ह्याबद्दलच आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/07/2016 - 04:47
नवीन
(अ)सुरक्षीततेचा सांभाळ या धाग्यावर या मग बोलू आपण.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/07/2016 - 04:48
नवीन
www.misalpav.com/node/34369 संपादकांनी हा दुवा दुरुस्त करण्यात मदत करावी
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 01/07/2016 - 05:03
नवीन
२४ तास मॉनिटरिंग आणि वरचेवर देखभाल नसेल तर सी.सी.टीवी व्यर्थ आहेत.
नागरिकांतला हलगरजीपणा हा एक मोठा शत्रू आहे. लष्कर, निमलष्कर, गुप्तवार्ता विभाग, सगळे आपापल्या परीने काम करतातच पण जागृत आणि सदैव सावधान समाज ही खूप मोठी मदत असू शकते.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/07/2016 - 03:03
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 01/06/2016 - 19:24
नवीन
भाडेकरूंची माहिती का देत नाही लोक ? कधी विचार केला का कुणी ?
भाड्याने दिलेल्या घराची घरपट्टी तिप्पट किंवा चौपट असते. त्यामुळे घर भाड्याने दिल्याची माहिती देण्याचे टाळतात लोक. अनेक ठिकाणी लोक भाडे रोखीने घेतात.घर भाड्याने दिल्याचे लपवण्यात हा फायदा असतो. तसेही भाड्याने दिलेल्या जागांपैकी दहा टक्केच जागांची माहिती पालिकेकडे असते. 90 टक्के जागांचा कर चुकविला जातो. जर हा जाचक नियम काढला तर लोक स्वतःहून माहिती देतील. शेवटी सुरक्षा आणि मिळणारा तुटपुंजा कर यात काय महत्वाचे आहे हे ठरवावे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 01/06/2016 - 19:28
नवीन
करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे खरे पण शेवटी सुरक्षा ज्यांच्यासाठी आहे त्यांनीही सामाजिक दायित्व म्हणून पदरमोड करण्यास हरकत नसावी नाही का.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 01/06/2016 - 19:41
नवीन
ढकांब्याच्या पंचायतीला मिळणारा सव्वा रुपया मोठा की तिथे लपलेल्या भाड्याच्या जागेतील अतिरेकी पकडायचा ? अश्या अनेक भाड्याच्या जागांत अनेक आतंकवादी दबा धरून बसलेले असतील . कोण जाणे ? ढकांब्याच्या पंचायतीला सव्वा रुपया मिळण्यासाठी आपण तोच नियम कवटाळून बसायचा ?
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 01/06/2016 - 21:55
नवीन
मुद्दे योग्य आहेत पण सगळे प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. काही गोष्टींना अंतर्गत विरोधच एवढा होईल की मूळ उद्देशच बारगळेल. सध्या फक्त मोदींच्या चुका काढायची स्पर्धा चालू असते. त्यात हा संतुलित प्रतिसाद आहे. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारे, विरोधी पक्ष, पोलिस दले, इतर संरक्षण दले व सामान्य नागरिक, न्यूज चानेल या सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागले तर बर्याच समस्या आणि गोंधळ कमी होतील.
मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं. समजा चर्चा करून किंवा न करून घातपाती कारवाया चालूच राहिल्या तर काय करायचं? तुम्ही भिंतीचं कुंपण घातलं तरी आतल्याच एखाद्यानी पळवाट काढून दिली तर काय करायचं?
डिफेन्समध्ये कार्यरत व्यक्तींना सोशलनेटवर्कींग साइट्स, अभारतीय इमेल सेवा, अभारतीय संकेतस्थळे आणि अभारतीय व्यक्तींशी आंतरजालावरून संपर्कास बंदी घातली आणि अमलात पण आणली तरी एखाद्याने फेक अकौंट तयार करून संपर्क साधला तर काय करायचं? सीसी टिव्ही कॅमेर्यांची संख्या आणि गस्त वाढवली तरी गस्त घालणार्यांपैकीच एखादा फितूर झाला तर काय करायचं? काही गोष्टींवर बंदी घातल्यावर किंवा सक्ती केल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होते आहे म्हणून गळे काढले गेले तर काय करायचं?
यात "काय करायचं" हे बाकी सर्वांनी काय करायचं ह्यापेक्षा फक्त मोदींनी काय करायचं ते सांगावं ही विनंती.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 01/07/2016 - 02:22
नवीन
योग्य प्रश्न अहेत रे ट्रेड मार्का. पण ह्याची उत्तरे संऱ़क्षण खात्यातले सचिव्,वरिष्ट अधिकारी,सैन्यातले माजी अधिकारी ह्यांनी द्यायची. मोदी त्यांचे मत विचारात घेत असतीलच.. तशी चर्चाही होत असेल.
एखादी कंपनी तोट्यात जात असेल, कंपनीच्या सी.ई.ओ.वर टिका होणारच. मग सी.ई.ओ-"टिका काय करताय.. तुम्हीच सांगा मी कंपनी कशी चालवू.." हे विचारण्यासारखे आहे. असे ह्यांचे मत. असो.
मोदी व सरकारवर उगाच टिका करण्यात अर्थ नाही. मनमोहन पंतप्रधान असताना असे हल्ले झाले की "नेभळट कमकुवत नेतृत्व' आहे म्हणून लोक म्हणायचे.त्यात सत्ताधारी आघाडीवर होते.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 01/08/2016 - 17:09
नवीन
>>इंग्रजी वृत्तपत्रातील बातम्यांवरुन काही त्रुटी जाणवल्या/ सुधारणेस वाव आहे असे वाटले त्या अशा.
प्रेस्टिट्यूट मीडियाचं काय सांगू नका राव !!!
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/06/2016 - 15:49
नवीन
"पाकिस्तानको उसीकी भाषामें जवाब देना चाहिये, ये लवलेटर लिखना बंद करो" असे माननीय नमो साहेबांचेच विधान आहे. आता ह्यालाही ते चुनावी जुमला म्हणत असतील तर धन्य असो.
योग्य बोललास रे संदीपा.मनमोहन असताना हा हल्ला झाला असता तर 'देशाचे नेत्रूत्व कमकुवत माणसाच्या हाती असल्याने हे सगळे होतेय' असे फेसबुकी अनुमान निघाले असते.
'मनात आणले तर आपण पाकिस्तानला तीन दिवसांत संपवू शकतो.. फकत हवी ती प्रखर देशभक्ती व खंबीर नेत्रूत्व' अशी वाक्ये तुमच्या त्या ट्वीटरवरच वाचली होती.असो.
हा प्रश्न वाटतो तेवढा सरळ नाही हे एव्हाना कळले असेल.
- Log in or register to post comments
म
मोगा
Wed, 01/06/2016 - 18:10
नवीन
अम्मीजान , कैसी है आप ? आप आती है तो दिल मोघल गार्डन बन जाता है !
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 01/07/2016 - 05:08
नवीन
नियमित कालावधीदरम्यान प्रसिद्ध होणार्या काही बारीकसारीक बातम्यांवरून गेले कित्येक महिने माझ्या मनात अशी एक आशंका निर्माण होते आहे की पंजाबमध्ये काहीतरी शिजतेय. पंजाब अस्वस्थ आणि अशांत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. केवळ पैसा हेच आमिष नसावे. इन्फिल्ट्रेशन आणि इन्डॉक्र्टिनेशनचाही भाग त्यात असावा.
- Log in or register to post comments
ल
लिओ
गुरुवार, 01/07/2016 - 06:20
नवीन
@"ट्रेड मार्क"
मोदींनी काय करावे हे पण सांगा कोणीतरी. म्हणजे पाकिस्तानशी चर्चा करावी का नाही, केली तरी पंप्रबरोबर करावी का सैन्यप्रमुखाबरोबर का ISI प्रमुखाबरोबर. जर या तिघांपैकी एकाबरोबर चर्चा केली त्याचा दुसर्याला राग येवून त्यांनी काही घातपाती कारवाई केली तर काय करायचं.
पाकिस्तानी पन्तप्रधान / सैन्यप्रमुख / ISI प्रमुख यापैकि फक्त पन्तप्रधान बरोबर मोदि गळाभेट करुन आले ते पण सर्व international / political protocall तोडुन ?? मोदि अन शरिफ फार जुने / जिगरी मित्र आहेत का ? ???????
पाकीस्तानात कोण कोणाच्या तालावर नाचते ही एक रहस्य / गुप्त बातमी आहे काय ??
यानन्तर पठानकोट घट्ना एक नेहमीची घट्ना समजायची काय ??
*********************************************************************
*********************************************************************
ज्यांना मोदींचे धाडस वा त्यातून साधलेला डावपेच समजू शकत नाही, त्यांना पठाणकोट हल्ल्याचे रहस्य कधीच उलगडू शकत नाही.
ज्याना मोदींचे धाडस व डावपेच समजले त्यानी तरी एक क्लु द्यावी धाडस व डावपेच बद्दल.
धाडस व डावपेच नावाखाली काय होइल ??
सध्या वाघा सीमेवर BSF व PAKISTANI RANGERS चा कार्यक्रम होतो उद्या कच्छ आखातात भारतीय / पाकिस्तानी नौदलाचे fleet review होइल आणि हवाई दलाचे सराव होतील गप्प बघत बसायचे काय ?? जसे आत्ता गप्प बसावे असे वाट्ते.
**********************************************************************
**********************************************************************
जाता जाता
पाकीस्तानी पन्तप्रधान शरिफ नी श्रीलंका राजधानी कोलंबो येथुन भारतीय पन्तप्रधान मोदींबरोबर पठाणकोट हल्ल्याबद्दल चर्चा केली ??? काय डावपेच आहेत ते काय समजले नाहि. सत्य हे आहे कि शरिफनी पाकीस्तानातुन काय बोलावे हे शरिफ ठरवु शकत नाहि. यापुढे काय बोलावे गप्प बसलेले चांगले.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/07/2016 - 06:34
नवीन
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे.
कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन.
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.
२) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते.
३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत.
यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच
४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे.
५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली.
६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-properties-1853462.html
७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो.
असो
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/07/2016 - 07:15
नवीन
१) माझा हा प्रतिसाद आपण नीटपणे वाचला आहे का ? त्यात संपूर्ण सीमेवर सी सी टी व्ही लावावेत असे कुठे लिहिले आहे ?
"ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा" अशी चर्चा केलेली आहे. कारगीलच्या अनुभवानंतर ज्या ठिकाणी ज्या काळात मनुष्यबळ तैनात करता येत नाही तेवढ्या भारत-पाक सीमा भागा पुरता इलेक्ट्रॉनीक्सचा वापर वाढवला गेला आहे असे माझ्या वाचनात आले होते. (तुर्तास संदर्भ हाताशी नाही) सी सी टी व्हीच्या वाढीव प्रमाणा संदर्भातील चर्चा सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात साठी केली आहे. सीसी टिव्ही मानवी सुरक्षा गस्तीस पूर्ण पर्याय होऊ शकत नाहीत पण सहाय्यकारी ठरू शकतात.
२) आपण काही ठिकाणी पाकीस्तानी लष्कर असा उल्लेख केला आहे पण बर्याच ठिकाणी नुसते लष्कर लिहिले आहे, चुकीचे अनर्थ करणारी मंडळी सर्वत्र असतात तेव्हा उर्वरीत ठिकाणी जेथे पाकीस्तानी लष्कराबद्दल उल्लेख आहेत ते तसे स्पष्ट केल्यास बरे किंवा कसे ?
३) पाकीतानी सिव्हीलीयन गव्हर्नमेंट आणि लष्कर आणि त्यांचे अतिरेकी एकत्रपणे कारवाया करत आहेत अथवा वेगळेपणाने इन एनी केस भारतीय सुरक्षाव्यवस्थेत पुरेसे गॅप्स शोधण्यात ते वेळोवेळी यशस्वी होताना दिसतात हा एक भाग, दुसरे पठाणकोट हल्ल्ला हा भारतीय सीमेत येऊन एका मोठ्या सैनिकीस्थळावर हल्ल्याचा प्रयत्न आहे, महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/07/2016 - 08:07
नवीन
डॉक्टर साहेब +११११११११
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/07/2016 - 08:20
नवीन
डॉक्टरसाहेब,
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट प्रतिसाद! या धाग्यावर सैन्यातील कोणीतरी प्रतिसाद द्यायचीच वाट पहात होतो.
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
गुरुवार, 01/07/2016 - 16:33
नवीन
ते सोन्याबापू आजकाल सैन्यात असतात. डाक्टर आर्मी मेडीकल कोरमधून रिटायर झालेत ;)
आपल्या गोटातून प्रतिसाद यायची वाट पहात होतात का?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/07/2016 - 16:38
नवीन
गोपाळराव
माझा वर्गमित्र प्रत्यक्ष पठाणकोट बेस वर जखमी झालेल्या सैनिकांच्या इलाजासाठी (क्रिटीकल केअर स्पेशालीस्ट) हजर होता. त्यातून उपलब्ध झालेली प्राथमिक माहिती हि अर्थात सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी नाही.
निवृत्त मी लष्करातून झालो आहे. लष्करी विचारधारेतून नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/07/2016 - 16:47
नवीन
तुमचा प्रतिसाद त्यांना समजू शकणार नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/07/2016 - 16:46
नवीन
अभ्यास वाढवा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/07/2016 - 17:46
नवीन
गोपाळराव माफ़ करा पण आपला प्रतिसाद अतिशय विचित्र आहे, अर्थात तुम्हाला आर्मी कळली नाही साहेब, u can retire a soldier from an army but u cannot retire army from a soldier असं म्हणतात, बघा झेपले तर आम्ही सिविलियन नाही, की बुआ आज सुपरवायसर रिटायर झाला की उद्या पासुन त्याला पेंशन केस साठी चपला घासायला लावा, श्रीगुरुजी ह्यांना त्यांचे मत जिकडे आहे तिथे होकार द्यायचा हक्क आहे अन कदाचित ते तसेच रहावे म्हणून झटने ही माझी किंवा निवृत्ति आधी डॉक्टरांची ड्यूटी होती. :)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 01/08/2016 - 09:56
नवीन
धन्यवाद सोन्याबापू! गोपाळरावांच्या प्रतिसादांना तसाही काहीच अर्थ नसतो. ते माझे नाव पाहिले की चवताळून उठतात आणि लगेच देहभान हरपून अत्यंत विचित्र प्रतिसाद देतात. त्यांचा वरील प्रतिसादही नेहमीप्रमाणेच विचित्र आहे.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 01/07/2016 - 15:27
नवीन
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.>>>>>>>>
आपला अजेन्डा समजला. दुखरी नसही कळाली.
व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल>>>>>>
आधी भारत पाकिस्तान व्यापाराचा भारतिय जागतिक व्यापरामध्ये ट्क्का बघा. आणी व्यापाराच्या निमित्ताने काही आगळीक झालीच तर?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/07/2016 - 16:05
नवीन
DEADPOOL साहेब
मला केजरीवाल साहेबांचा उपमर्द करायचा कोणताही हेतू नव्हता.मला आआप बद्दल काहीच वाटत नाही. प्रेम हि नाही कि द्वेष हि नाही.
मुळात सगळ्या दिल्लीत CCTV लावणे हि अव्यवहार्य योजना होती हे केजरीवाल साहेबाना माहित होते. पण अशा दिलखेचक घोषणा सामान्य माणसाना मते देण्यास उद्युक्त करतात हे समजण्याइतके ते धूर्त नक्कीच आहेत.
माझा हेतू फक्त तुलना करणे हा होता. जर साधे दिल्ली सारख्या ठिकाणी जेथे २४ तास माणसे, वीज आणी इतर संसाधने आहेत तेथे हे अशक्य आहे तर इतक्या प्रचंड लांब असणार्या सीमेवर CCTV लावणे त्यावर नजर ठेवणे हे किती कठीण आहे हे समजून घावे यासाठी हि तुलना होती.
राहिली गोष्ट व्यापाराची-- यात भारताला फायदा होण्यापेक्षा पाकिस्तानी लष्कर आणी बिनसरकारी प्याद्यांचा पैशाचा स्त्रोत आटवणे हा हेतू आहे. भारताला यात एक सहस्रांश टक्के इतका फायदा होईल हे न कळ्ण्य़ा इतके सरकारी लोक किंवा राजकारणी लोक ढ नाहीत.
- Log in or register to post comments
र
राही
गुरुवार, 01/07/2016 - 07:06
नवीन
मुद्दा क्रमांक २, ३, ४ शी विशेष सहमत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/07/2016 - 09:02
नवीन
इस्रायल सारखा देश आणि तेथील राजकारण्यांची जाज्वल्य देशभक्ती पाहिली तरीही तेथेही दहशतवादी हल्ल्यात लोक बळी पडतातच ना?
स्वातंत्र्याची किंमत हि आयुष्यभर मोजत राहायला लागतेच.स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे सोपे नाही.
अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे.
बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? तुम्ही एका अण्वस्त्र सज्ज अशा बेजबाबदार राष्ट्राची गोष्ट करत आहात कि एका टिनपाट गुन्हेगाराची? तुम्हाला काय सर्वंकष युद्ध हवे आहे का? ज्यात कोट्यावधी भारतीय बळी पडतील. पाकिस्तान समूळ नष्ट होईल पण हि किंमत परवडेल का? नारेबाजी करणे सोपे आहे. मी वर लिहिले आहे तसे दावूदची आर्थिक नाकेबंदी करणे, लष्कराच्या आर्थिक नाड्या आवळणे हे उपाय सुरु केलेले आहेतच. पाकिस्तानी जनतेला जेंव्हा हे कळून चुकेल कि त्यांना बंदुका नाही तर पुस्तकांची आणि नोकर्यांची गरज आहे( शिक्षण) तेंव्हा हे लष्कर आणि दहशतवादी यांना जनतेचा आधार मिळणे कमी होईल.
गरिबी हि क्रांती आणि गुन्हेगारी यांची माता आहे. क्रांतीच्या नावाखाली निरक्षर आणि बेकार तरुणांची माथी भडकावणे जास्त सोपे असते आणि त्यातून धर्माच्या नावाखाली गुन्हेगारी हीच क्रांती आहे असे डोक्यात भरवून दिले कि दहशतवाद पसरवणे सोपे होते. त्यामुळे पाकिस्तानी जनतेची साक्षरता आणि तीवर लष्कराचा कमी होणारा ताबा हि तेथील गुन्हेगारी आणि दहशतवाद कमी होण्यासाठी मदत करेल.
तेथील लष्कराला तस्करीतून मिळणारा पैसा जर तुम्हाला तेथील जनतेकडे वळवता आला तर जनतेला लष्करापेक्षा मुलकी सरकारचे महत्त्व समजून येईल.
Journalist Lifschultz's famous article revealed that General Zia
himself was doing heroin through Hamid Hasnain, chief executive of
Habib Bank in Islamabad, who was found in possession of General Zia's
personal documents like cheque books. The man was nabbed after his
agent was arrested in Oslo in 1983. General Zia's wife Shafiqa tried to
interfere in the court case against Hamid Hasnain but was effectively
prevented by the government of Norway. Western sources named ten
Noriegas in Pakistan. Air force chief Anwar Shamim, very close to
General Zia, was refused as Zia's ambassador by Canada because his
heroin connection. In 1986, two army officers were arrested in Karachi
with 900 kilos of heroin on them worth $4 billion. Major Zahooruddin
was taken from police custody to a military base from where
he 'miraculously' escaped; Flight Lieutenant Rehman feigned illness and
escaped equally 'miraculously' from the hospital. In all, 14 officers
were arrested for heroin in 1989. In 1987, squadron leader Farooq Ahmad
Khan was arrested in New York with two kilos of heroin on him and
within a week squadron leader Qassim was arrested in Karachi.
The officers used army-owned NLC trucks to smuggle heroin (in one case
10 metric tons) across Pakistan to outlets, including National Shipping
Corporation, to be later white-washed by the BCCI which laundered $4
billion for its Pakistani patrons. Gadoon Area near Peshawar was used
for poppy growing, supported by NWFP politicians. The PPP government,
pushed by the US, pretended to move against Ayub Afridi of Landi Kotal
and Mirza Iqbal Baig of Lahore. Baig was arrested in 1989 linking him
to a Japanese courier caught in Amsterdam with 17.5 kilos of heroin in
1988. This was also a General Zia connection, But the Lahore High Court
freed Baig 'for lack of evidence'. Ayub Afridi kept dodging arrest by
moving around, in which he was 'helped' by the authorities.
Ayub 'financed' a number of PPP leaders win election. Benazir however
fired General Hameed Gul 'who was controversial for his alleged
involvement in drug trade under the Zia regime', and arrested General
Fazle Haq, fired Brigadier Imtiaz for alleged drug trade connections,
which offended the GHQ top brass. The army put together the IJI against
the PPP, comprising most of the pro-heroin elements who began bribing
the PPP members. Benazir offered a PPP ticket to Malik Waris Khan
Afridi of the Khyber Agency, making him state minister and member of
her cabinet. Other heroin peddlers whom the PPP took in its fold were
Amanullah Gichki, Muhammad Ali Rind (a former Zia connection) from
Balochistan and Malik Moin Khan Afridi who was elected to the 1988
National Assembly. Later, Zardari was reported to have run a heroin
smuggling network to enrich himself.
बाकी बलुचिस्तान किंवा सिंध प्रांतातील फुटीरतावादाला भारतीय गुप्तहेर संस्था खत पाणी घालत आहेत हा पाकिस्तानचा आरोप आहेच.
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/07/2016 - 10:22
नवीन
डॉक्टर साहेब, आपल्या प्रतिसादांचे कौतुक होते आहे हा कौतुक सोहळा चालू द्यात; माझ्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास 'अजून किती शहीद हवेत हा प्रश्नच गैरलागू आहे. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल!हि काय जादूची कांडी आहे का? ' या आपल्या दोन मुद्यात असहमत होण्यासारखे फारसे काही नसावे परंतु अद्याप इतर काही साशंकता बाकी आहेत.
१) महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ? या प्रश्नांचे विश्लेषण अथवा उत्तराचा आपल्या प्रतिसादातील नेमका भाग कोणता ?
२) आपल्या दोन्ही प्रतिसादात मिळून भारत-पाकीस्तानात व्यापार सुरळीत झाला तर सारे काही आलबेल होऊ लागेल असा सूर आहे. भारत सोडल्यास जगातल्या इतर सर्व देशांशी पाकीस्तानचा व्यापार गेली सर्व दशके सुरळीतच होता आणि आहे. पाकीस्तानी लष्करच तस्करीत सहभागी असेल (शक्यता नाकारत नाही) तर त्यांना पाकीस्तानची समुद्री सीमा उघडी आहे आणि तिथून ते तस्करी करतच असणार.
अगदी अलिकडचा आमेरीकेत पाकीस्तानी वंशाच्या लोकांकडून झालेला दहशतवाद तपासला तर ती मंडळी साक्षर सुद्धा होती आणि पाकीस्तान आमेरीकेचा व्यापार बर्यापैकी सुरळीत असावा. पाकीस्तान निर्मितीच्या वेळी द्वीराष्ट्रवादाची मांडणी करणार्यातील बरीच मंडळी साक्षर वगैरे असावीत.
३) गरिबीचा शांततामय मार्गापासून भटकण्याशी संबंध असू शकतो यावरून असतोच आणि मग गरिबी संपली की सगळे आलबेल ? केवळ गरिबीमुळे लोक दहशत वादाच्या तत्त्वज्ञानास बळी पडतात गरीबी नसेलतर दहशतवादापासून दुर जातील हे विधानही साशंकता असलेले आहे.
पाकीस्तानचे परकॅपिटा इनकम भारतापेक्षा कमी आहे किंवा गरिब आणि श्रीमंतीतील दरी भारतापेक्षा अल्पशी अधीक आहे पण हे फरक आपली थेअरी स्विकार्य ठरावी एवढेही मोठे नसावेत. त्या अर्थाने बांग्लादेशात पाकीस्तानापेक्षा अधिक गरिबी आहे आणि तेथून अधिक अतिरेकी यावयास हवेत पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे आपले हे तर्क रिव्हिजीट करण्याची गरज आहे किंवा कसे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/07/2016 - 13:07
नवीन
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 01/07/2016 - 13:49
नवीन
माहितगार
तो प्रतिसाद आपल्याला नव्हता. वेळ मिळाला कि आपल्याला सविस्तर प्रतिसाद देतो. कृपया वाट पहा
धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 01/08/2016 - 16:08
नवीन
माहितगार साहेब
सर्वच्या सर्व लष्करी विमानतळाभोवती किमान १२ फुटाची संरक्षक भिंत असते आणि त्यावर काटेरी तारेचे कुंपण असते. प्रत्येक विमानतळाच्या आतमध्ये थोड्या थोड्या अंतरावर निरीक्षणासाठी मनोरे असतात आणि त्या मनोर्यावर सर्चलाईट पण असतात. त्या मनोर्यावर २४ x ७ सैनिकांचा खद पहारा असतो. दहशतवादी (मुख्य फाटकातून कि) कसे आत शिरले ते अजून उघड झालेले नाही.
सीमेतील कोणत्या भागातून दहशतवाद्यांना आत घुसवता येईल याची पूर्ण पाहणी आणि तयारी पाकिस्तानी लष्कराच्या मदती शिवाय होणे शक्य नाही.
मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.) या तयारीला आणि डावपेचाला काही महिने लागतात. त्यातून सुद्धा त्यांचे ९९ % बेत आपले लष्कर आणि सीमा सुरक्षा दल हाणून पडत असतात. पण हे असे पराभूत केलेले डावपेच काही लष्कर / सीमा सुरक्षा दल आपल्या "मार्केटिंग विभागाकडून" जाहिरात करीत नाहीत.
ज्या उरलेल्या १% डावपेचात ते सफल होण्याची शक्यता असते त्याला आळा कसा घालायचा आणि त्याचा निपटा कसा करायचा याचे डावपेच सुद्धा लष्कर( सीमा सुरक्षा दल करत असतेच).
काही लोकांच्या बोलण्यात "शांततेच्या काळात लष्कर स्वस्त मिळणारी दारू पिउन पार्टी करत असते" असे मी ऐकले आहे. अशा विचाराच्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच सोयीस्कर आहे.
महत्वाच्या लष्करी तळापर्यंत दहशतवादी पोहोचू नयेत हि काळजी सर्वच देश घेत असतात. तरीही ज्या दहशतवाद्यांना दुसर्या राष्ट्राच्या गुप्तहेर खात्याचे सहाय्य मिळते त्याच्या जवळ उपकरणे पैसा आणी गुप्त महिती जास्त असणार आणी त्यामुळेच त्यांचे काम जास्त सोपे होते. याच साठी भारतीय लष्कर, गुप्तहेर खाते आणी सीमा सुरक्षा दलाचे काम जास्त कठीण आहे. वर बर्याच लोकांनी फारसा विचार न करता नुसते आरोप केलेले आहेत.
लिहिण्यासारखे बरेच आहे पण लोकांना पाहिजे तसे प्रतिसाद न आल्यास फाटे फोडण्यात समाधान मानणार्या लोकांशी वितंडवाद घालण्यात काही हशील नाही. श्री गुरुजींनी एक दुवा दिला आहे तो हि वाचून घ्या.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 01/08/2016 - 16:48
नवीन
डॉक्टर साहेब 'पाकीस्तानी लष्कराचा' उल्लेख नुसते लष्कर या शब्दाने नव्हे तर 'पाकीस्तानी लष्कर' करावा अशी अपेक्षा ठेऊन आहे.
बाकी कुठे राजकीय दृष्टीने बघावे आणि कुठे नाही याचे तारतम्य नसलेली मंडळी सर्वत्र असतात, तुमचे आणि श्री गुरुजींचे प्रतिसाद त्यांच्या कडे फोकस्ड असतील तर तो तुमच्या राजकीय दृष्टीकोनांचा भाग झाला. माझ्या सारखी मंडळी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांकडे बिगर राजकीय दृष्टीने बघतात, आमची अपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकीय पवित्रेबाजी पलिकडे जाऊन विश्लेषणे करून पुढे काय आणि कोणत्या सुधारणांच्या पायर्या घेतल्या जातात हे पाहण्याची असते. या धाग्यावरील प्रतिसादातून अद्यापतरी तशी चर्चा वाचण्याचे समाधान मिळालेले नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 01/08/2016 - 11:03
नवीन
राजनाथ सिंग
अमित शहा
असे म्हणत होते !
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 01/07/2016 - 09:20
नवीन
___/\___
- Log in or register to post comments
ल
लिओ
गुरुवार, 01/07/2016 - 13:58
नवीन
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?
सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही लावणार होते त्याचे काय झाले हे आपल्याला सर्वाना माहित आहे.
आंतरराष्ट्रीय सीमा हा सर्वस्वी केन्द्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे. केन्द्र सरकारने छान काम केले तर कौतुक नक्किच होइल. त्याची तुलना " दिल्ली राज्य सरकार " बरोबर कशाला?. २९०० किमी सीमा संभाळणे हा साक्षात्कार ६० वर्षांने सत्तेत आल्यावर झाला का ?
२) पंजाब शांत असला तरीही त्यात खालीस्तानचे स्वप्न उराशी बाळगून असणारे लोक कमी नाहीत.अशा काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून घातपाती कृत्य करणे एखाद्या राष्ट्राला करणे सहज शक्य असते.
थोडयाफार फरकाने दहशदवाद पंजाब व काश्मीर येथे सुरु झाला. आज पंजाब मधील दहशदवाद औषधासाठी असेल (पुर्ण सम्पला बोलणे धाड्साचे होइल) . पण काश्मीर येथे थोडाफार आहे. पंजाब मधील दहशदवाद भरपुर कमी होण्यास कोण कारणीभुत कोण? सरकार का सुरक्षा यन्त्रना की पंजाब मधील लोक....... बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ?
३) पाकिस्तान लष्कराला शांतता नकोच आहे कारण शांततेच्या काळात लष्कराचे महत्त्व कमी होत जाते. यासाठी दहशतवाद्यांना हाताशी धरून अशी कृत्ये घडवून आणली जाणारच हे आपल्या सरकारला माहित आहे. शिवाय भारत पाकिस्तान मध्ये व्यापार सुरु झाला तर अनेक गोष्टीची आयात निर्यात होऊन सामन्य जनतेला त्याचा फायदा होईल पण या गोष्टींच्या तस्करीला आळा बसेल. उदा पाकिस्तानात पान कोपर्या कोपर्यावर मिळते पण ते सर्व भारतातून तस्करी करून आणलेले असते. जर व्यापार सुरळीत झाला तर भारत आणि पाकिस्तान सरकारला कर मिळेल पण तस्कर आणि लष्कर यांचा हितसंबंध दुखावतो. असे अनेक उद्योग आहेत. यात लष्कराचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यामुळे त्यांना भारत पाकिस्तान व्यापारी संबंध सुरळीत होणे परवडणारे नाही. या न त्या प्रकारे ते त्यात खीळ घालण्याचा प्रयत्न करणारच.
जर पाकिस्तानात पान भारतातून तस्करी करून जात असेल तर मी असे म्हणेन कि भारतात पान तस्करी माध्यमातुन काळा पैसा तयार होत आहे. सरकारने सध्या तयार होणारा हा "काळा पैसा" रोखावा. ते पान पाकिस्तान लष्करातील लोक / अतिरेकी खातात आणि भारतात येवुन थुन्कतात.
४) दहशत वाद्यांच्या या कारवाईची तयारी कमीत कमी ४-६ महिने चालू असल्याशिवाय त्यांना भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्ला करणे शक्य नव्हते. तेंव्हा हि कारवाई लगेच झाली हे म्हणणे सोपे आहे.
दहशत वाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या तळावर हल्लाचा सराव काहि पाकीस्तानी विमानतळावर केला अशी बातमी आली. आता यावर काय बोलायचे .
५) वायुसेनेच्या तळावर हल्ला होऊन एकही विमान किंवा महत्त्वाची उपकरणे दहशतवाद्यांना नष्ट करता आली नाहीत हि एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण या गोष्टी कुठे आहेत याची संपूर्ण माहिती त्यांना होती तरीही भारतीय गुप्तहेर खात्याने त्यांचा हा बेत नाकाम ठरवला. या उलट पाकिस्तान च्या नौदलाच्या तळावर हल्ला झाला तेंव्हा तेथे त्यांनी १८ सैनिक मारले आणि P ३ C ओरायन हि (३५० कोटी रुपयांना एक अशी) दोन विमाने नष्ट केली.
भारतीय गुप्तहेर खाते व सशस्त्र सेनेने हा बेत हाणुन पाडला.
पठाणकोट एअरबेस वर अतिरेकि एका पोलिस आयुक्तच्या गाडितुन धोका देवुन गेले. अन्यथा हि कारवाइ एअरबेस गेटवरच झालि असती. व्ही आय पी लोकाना अडवायचे कसे या मानसिकतेचा फायदा अतिरेक्यानी घेतला हे फार लाजिरवाणे.
६) मोदी साहेबांनी संयुक्त अरब ऐमिरातीशी केलेल्या करारात दावूद इब्राहीम ची मालमत्ता गोठवण्याची सुरुवात झालेली आहे.दावूदची मालमत्ता लष्कराच्या आशीर्वादानेच उभी राहिली आहे आणि त्यात लष्कराच हातही आहे. त्यामुळे असे होणे हे त्यांना महाग पडू लागले आहे. http://www.oneindia.com/india/dawoods-bad-days-begin-as-uae-probes-his-p...
हि काय मोठी बातमी आहे. ??????
काँग्रेसचे लोक दावुदला काहि करु शकत नाहित असा एक समज आहे ..दावुद ला युती / वाजपेयी काळात दणका दिला असता तर बरे झाले असते, आज केंद्रात भा ज प सरकार असुन पुर्वी दावुद ची भारतातील मालमत्ता खरेदी केलेल लोक न्यायालयात चकरा मारत आहेत मालमत्तेचा ताबा मिळावा म्हणुन.
७) मी एकदा असे म्हटले होते कि प्रत्येक माणसाला असे वाटते कि राजकारण आणि क्रिकेट यात आपल्याला सगळे समजते आणि त्यावर खास टिप्पणी करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर ने ब्याट कोणती वापरावी पासून पंतप्रधानांनी चीन पाकिस्तान बरोबर संबंध सुधारणे कसे चूक आहे यावर आपण सल्ला देऊ शकतो.
सल्ला देण्याची बिलकुल इच्छा नहि.
जेव्हा चीनी पन्त्प्रधान थेट अहमदाबाद येथे दौरयावर आले तेव्हाच चीनी सैन्याने लडाख प्रदेशात अतिक्रमण केले होते, तेव्हा अतिक्रमण सोडुन बाकी गोष्टीनचा उदो उदो केला गेला.
कशाला सल्ला देवु ????????
ज्या लाहोरच्या वेशीवर भारतीय सैन्याने ६५ व ७१ च्या युध्दात धडक मारली होती त्या लाहोरला international / political protocall तोडुन स्वतंत्र भारतात जन्मलेले भारतीय पन्त्प्रधान विमानाने गुपचुप जाउन आले. ६० वर्षात असे घडले नव्हते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »