Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!

D
DEADPOOL
Sun, 01/03/2016 - 14:12
🗣 110 प्रतिसाद
माननीय पंतप्रधान नमो यांना दंडवत! आपण जेव्हा सत्तेत आलात तेव्हा आमच्या मुखावर एकच नारा होता. बघा आता कशी पाकिस्तानांची जिरवतिल! आपण अफगणिस्तानला भेट दिली तरी आम्ही आवडून घेतलं.कारण आम्हाला पठाणामध्ये काबुलीवाला अजूनही दिसतो. आपण तसेच पाकिस्तानात गेलात मात्र हे खटकले,कारण शेजारी जरी असला, तरी: आतां मज लोक सुखें निंदा अक्रु । म्हणती विचारु सांडियेला ॥१॥ होय तो कारण करावा विचार । काय भडीभार करुं देवा ॥२॥ तुका म्हणे काय करुं लापणिक । जनाचार सुख नाशवंत ॥३॥ याप्रमाणेच आम्ही विचार केला. आणि आपल्या भक्तांपैकी काहींचे मौलिक विचार ऐकून आम्हीही मनाची समजूत घालून घेतली. आता काही अतिरेक्यांनी आमच्यावर हल्ला केला. आपले काही भक्त याचेही उत्तर देतील. नमो एकच उत्तर द्या, अजून किती शहीद हवे आहेत? बाकी आपली डिप्लोमसी चालू द्या! आपलाच: deadp

प्रतिक्रिया द्या
19490 वाचन

💬 प्रतिसाद (110)
स
सुबोध खरे Fri, 01/08/2016 - 16:17 नवीन
बोलण्याचा उद्देश असा कि एखाद्या राष्ट्राकडे बोट हव्या त्या पध्दतीने करुन आपली जबाबदारी टाळु शकत नाहि ६० वर्षा नन्तर सुध्दा तेच तेच विधान एकत बसायचे काय ? ६० वर्षात असे घडले नव्हते. मग लष्कराने, मोदी साहेबांनी आणी सीमा सुरक्षा दलाने काय काय करायला हवे आहे हे तरी सांगा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ
र
रामपुरी गुरुवार, 01/07/2016 - 17:57 नवीन
यापुढे "डिप्लोमसि" शी संबंधित सगळे निर्णय फक्त तुमचेच असतील असा कायदाच करून टाकू आपण. हाकानाका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/08/2016 - 10:11 नवीन
याच विषयावर हा एक वेगळे मुद्दे मांडणारा लेख - How swift action saved the day in Pathankot
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 01/08/2016 - 17:20 नवीन
२६/११/२००८ च्या मुंबई हल्ल्याशी या हल्ल्याची तुलना केली तर......... मुंबई हल्ला तीन चार ठिकाणी एकाच वेळी झाला होता. हा हल्ला एकाच ठिकाणी होता. मुंबई हल्ला अचानक झाला होता. या हल्ल्यावेळी विमाने हल्ल्याच्या सहा तास आधी हलवली म्हणतात. तेव्हा हल्ल्याची पूर्वकल्पना होती. मुंबई हल्ला नागरी ठिकाणांवर झाला. त्या ठिकाणी सुरक्षा अत्यंत कडक असणे अपेक्षित नसते. हा हल्ला सीमेजवळच्या लष्करी तळावर झाला जेथे नेहमीच सतर्कता आणि तयारी अपेक्षित असते. मुंबई हल्ल्यावेळी हल्ल्याच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक उपस्थित होते. प्रतिकारावेळी त्यांना कमीतकमी धोका होईल हे पाहणे महत्त्वाचे होते. या हल्ल्याच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती. वरची तुलना* पाहता अतिरेक्यांना काबूत आणण्यास मुंबई हल्ल्याइतकाच किंवा अधिक वेळ लागला. हे लष्कर/कमांडो यांच्यासाठी काळजीचे कारण असावे. त्याचे आत्मपरीक्षण ते करतील अशी आशा आहे. *आणखी एक फरकाचा मुद्दा मनात आला होता पण आता तो व्हॅलिड राहिलाय का अशी शंका आली म्हणून तो लिहिला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नितिन थत्ते Fri, 01/08/2016 - 17:23 नवीन
स्विफ्ट अ‍ॅक्शन सेव्ह्ड द डे या विषयासंदर्भात हा प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ल
लिओ Fri, 01/08/2016 - 18:11 नवीन
@ नितिन थत्ते स्विफ्ट अ‍ॅक्शन सेव्ह्ड द डे अनुशंगाने तुम्हि जे लिहिले त्या संदर्भात एक मत लिहावे असे वाट्ते हल्ल्याची पूर्वकल्पना होती. हल्ल्याची पूर्वकल्पना होती तर प्रतिहल्ल्याची तयारी पण झालीच असणार. पण अशी टिप मिळाली होती का अतिरेकी सरकारी / पोलिस अधिक्षकाच्या गाडीतुन घात करुन येतील म्हणुन. मुंबई हल्ल्यानन्तर व्ही व्ही व्ही आय पी शाणे झालेत असे वाट्ते काय ?? आज पण व्ही व्ही व्ही आय ना सिक्युरीटि चेक ला कसे अड्वायचे हा सुरक्षा यंत्रणाना प्रशन पड्तोच. लष्कर/कमांडो यांची काय झाल्यावर काय करायचे याची SOP ठरलेली असते. कृपा करून भारतीय सशस्त्र सेनेवर शंका करु नका. आज आपण जी लोकशाही "न कळणारया" आनन्दात जगतो कारण भारतीय सशस्त्र सेनेला माहीत आहे की बराकीत कधी जायचे आणि बराकीबाहेर कधी यायचे ते पण एकदा या देशाने आणिबाणी अनुभलेली असताना.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 01/09/2016 - 10:25 नवीन
सलविंदर सिंग नावाच्या एसपीचे अपहरण करून त्याच्याच गाडीतून अतिरेकी लष्करी तळावर पोहोचले. दरम्यान त्याच्याबद्दल संशय न आल्याने त्याला अतिरेक्यांनी न मारता सोडून दिले असे त्याचे सांगणे होते. हाच सलविंदर सिंग आता संशयाच्या भोवर्‍यात आहे. एनआयए ला त्याच्या जबानीत विसंगती आढळली आहे. अतिरेक्यांनी त्याची गाडी वापरणे व त्याला न ओळखता न मारता सोडून देणे हे एनआयए ला संशयास्पद वाटत आहे. त्यामुळे आता त्याची चौकशी सुरू असून कदाचित त्याची सत्यशोधक चाचणी होण्याची देखील शक्यता आहे. पठाणकोट तळाच्या सुरक्षा भिंतीवरील ३ फ्लड लाईट्स दिशा बदलून ठेवलेले आढळले आहेत. त्यासंबंधात एका तांत्रिक कर्मचार्‍याची चौकशी सुरू आहे. एकंदरीत तळावरील कोणीतरी फितूर झाल्याने अतिरेक्यांना तळात प्रवेश करता आला या अंदाजावर चौकशी सुरू आहे. खरे खोटे खुदा जाने!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिओ
क
काळा पहाड Sat, 01/09/2016 - 14:39 नवीन
गंमत अशी आहे, की नक्की काय झालंय याची माहिती न घेताच लोक लिहीत असतात. हल्ला होणार आहे (आणि तो तळाबाहेरून होणार आहे) असं इंटेलिजन्स इन्पूट होतं. हे इंटेलिजन्स इनपूट दिल्ली ला कळायला वेळ लागला कारण स्थानिक पोलिसांनी वेळ घेतला. पण त्या आधीच अतिरेकी तळात घुसले होते याची कल्पना सुद्धा संबंधीत लोकांना आली नाही. हल्ला बाहेरून होण्याऐवजी आतूनच आत झाला (http://indianexpress.com/article/india/india-news-india/pathankot-attack-terrorists-hid-for-20-hours-before-strike-says-home-ministry-official/). बाहेर केलेली सर्व तयारी त्यामुळे वाया गेली. शिवाय नक्की हल्ला कुठे होणार आहे ते कुणालाच माहिती नव्हतं कारण पठाणकोट ला बाकीची पण इन्स्टॉलेशन्स आहेत (तसंच मिसाईलचा तळ सुद्धा आहे). तरीसुद्धा गरुडांनी आणि एन एस जी नं अतिरेक्यांना २५०मी बाय २५०मी एरियात कोंडलं होतं. मारले गेलेले बहुतांश दुर्दैवाने मारले गेलेले आहेत. अतिरेक्यांच्या हुशारीमुळे नव्हे. भाग १: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathankot-attack-fence-floodlights-that-didnt-work-gaps-in-border-patrol-patchy-police-response/ भाग २: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathankot-attack-all-alert-all-caught-unawares-luck-their-strongest-ally/ भाग ३: http://indianexpress.com/article/india/india-news-india/probing-pathankot-attack-how-wires-got-crossed-in-delhi/
  • Log in or register to post comments
न
नमकिन Sat, 01/09/2016 - 18:09 नवीन
कितीही मागे गेलो तरी पाकिस्तान सोबत जेव्हा केव्हा भारतीय (सरकारी स्तर) चर्चा करतात तेव्हा लागोलग अतिरेकी हल्ले होत राहिले व सामान्य नागरिकांचे प्राण जात राहिले. याला विपक्ष नेहमीच गाफिलपणा म्हणत आला. आजच्या समयी मोदी सरकार अतिउत्साही म्हणून पुन्हा गाफिल राहीले व पुनःश्च पाक अतिरेकी मनात आणल्यावर कुठेही नागरी भागात हल्ला लीलया करु शकतात हे दिसले, किंबहुना लष्करी तळावर हल्ला होणे तोदेखील सीमे पलीकडुन हे अधोरेखांकित करते की आपले रक्षणकर्ते आजही झोपा काढतायत व सरकारला कधीच सोयरंसुतक नव्हते. याखेपेला तर मी परखडपणे असे म्हणेन की " आ बैल मुझे मार".
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 01/10/2016 - 06:10 नवीन
यात सगळ्यात संशयास्पद हे बीएसेफ आणि पंजाब पोलिस आहेत. तो पंजाब पोलिस एस्पी हा सपोजेडली बॉर्डरवर ड्रग डील फायनलाइज करायला गेला होता. ड्रग डीलर्स अतिरेकी निघाले अशीही थिअरी आहे. बीएसेफ्च्या हवालदाराला अटक देखील झाली आहे. http://indiatoday.intoday.in/story/pathankot-terror-attack-bsf-mans-arrest-exposes-dark-links/1/566272.html?utm_source=hashtags360.com
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा