शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
💬 प्रतिसाद
(222)
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 15:34
नवीन
मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज! मसाला मारके (प्राडॉ.साठी एक लार्ज टब)!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 16:16
नवीन
बर्फ आणि सोडा लागेल. चखण्याला काय आहे ? तिकडे ड्राय काबुली चना मिळतो का ? चकल्याही चालतील. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:21
नवीन
सध्या बेस्ट ब्रांड बकार्डी ब्लॅक रम आहे. चखण्याला स्वीट अॅण्ड सोअर ड्राय चना...
बर्फ सोडा तयार आहे...
या सायबांनू...
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 16:23
नवीन
ब्रांड तुम बोले वो. चखणेमें भुना हुवा लहसुण और चना, स्पेष्यल मसाला मारके! ऑर्डर प्लीज!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/28/2016 - 16:55
नवीन
गाववाले,
राजहंस ढाब्यावर जाने झाले कधी इंजीनियरिंग कॉलेज बाभुळगाव मधी तर, तिथलचे चना रोस्ट खासान! तंदूरी चिकनच्या दहीवाल्या मॅरिनेशनवाल्या मसाल्यात घोयलेले रायतेत! बंबाट आइटम हाय!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 01/28/2016 - 17:13
नवीन
गणपाभौंच्या सौजन्याने
अन् आमचं आवडतं
अन् तोंडी लावायला

- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 17:51
नवीन
जेव्याच्या टायम्बाले तुम्ही अशे आतरंगी काय तरी सांगता. आता जा लागीनच.
पैलवान भौ! रैवारी कोंबडी हाय मंग आता...
पेटोता लेको जाणून बुजून. निरा सुत नायी तुम्हाले. धागा आपला देवादिकाचा आन् चिकन-मटन-दारूच्या गोठी करू रायले. कुटी फेडसाल हे पापं?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Fri, 01/29/2016 - 06:16
नवीन
चौथर्यावर ?
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
गुरुवार, 01/28/2016 - 18:47
नवीन
नाय म्हटल मिपावर काही आस्तिक मानसं पण हायित
- Log in or register to post comments
र
राँर्बट
गुरुवार, 01/28/2016 - 16:25
नवीन
ओल्ड माँक!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/28/2016 - 16:48
नवीन
ओनली ओल्ड मोंक!!!
+१११११११११११
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Fri, 01/29/2016 - 05:52
नवीन
या धाग्यावर प्रतिसाद फक्त ओल्ड मोन्क दिसला म्हणून
- Log in or register to post comments
ओ
ओल्ड मोन्क
Fri, 01/29/2016 - 08:16
नवीन
आला....
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Fri, 01/29/2016 - 11:57
नवीन
कारण बदल हि काळाची गरज आहे.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 15:41
नवीन
मुळीच जाऊ नये...
काही परंपरा या अनुभवावर तयार झालेल्या असतात...
त्यात बदल करणे घातकच ठरते...
मुळात अनेक हिंदु देवता या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून त्रास होतोच...
हिंदु धर्मात महिलांसाठी दुर्गा, गणपती, भोलेनाथ, महालक्षमी, सत्यनारायण, कृष्ण, श्रीराम वगैरे अनेक सौम्य देवता आहेत. त्यांना सोडून या कडक देवतेचा हट्ट धरणे अनावश्यक आहे...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 15:47
नवीन
हिंदु धर्मातील प्रत्येक देवता ही वेगवेगळ्या स्वभाव, गुणधर्म, वैशिष्ट्ये, मेंटॅलिटी यांचे प्रतिनिधित्व करते आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर रामराम करणेच शहाणपणाचे आहेत.
मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेलो आहे आणि त्यातूनच सांगतो की वर उल्लेख केलेल्या सौम्य देवता या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत.
कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:01
नवीन
मुळात हिंदु भक्तीमार्ग हा महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे:
"तुम्ही ज्याचे ध्यान करता तसे तुम्ही बनत जाता."
मग आता सांगा की एखाद्या संसारी स्त्रीने या विरागी, निरपेक्ष, ब्रह्मानुसंधानी देवतेचा हट्ट धरण्याचे कारण काय?
मुळात अनेक पुरुष तिथे जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात.
शनीमहाराज अतिशय काटेकोर हिशेब मांडतात. आणि जे निगेटीव्ह कर्म असेल त्याचा पाॅझिटीव्ह पर्याय तुम्हाला गोरगरीब, अंध अपंग, समाजाने तिरस्कृत केलेले व्यक्तीसमूह यांची सेवा करुनच परतफेड करावा लागतो.
तिथे ढोंग करुन उपयोग नाही. एक नारळ आणि १०-५ रुपयाची देणगी देऊन निगेटीव्ह कर्म नष्ट होत नाही.
तर ते मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे वर्तणूक सुधारणे यातूनच नलीफाय होते...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 16:26
नवीन
राहु आणि शनी यांची युती झाली अन तो एकदा कोणत्या तरी घरात बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा सोग्यानी डोळे पुसावे लागतात.
शनिचा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक मंत्र सात वेळा म्हणावा लागतो. (मंत्र सांगायची फ़ीस घेतो मी) आपल्या आयुष्यात एका महिन्यात सुख, समृद्धि आणि शांती नै लाभली तर फ़ीस परत. घरात बरकत राहते. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मीळतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात. महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो. मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात.
-दिलीप बिरुटे
(अंदाजपंचे पुरोहीत) :)
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:32
नवीन
सर मी वरच म्हटले आहे की असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता शनीमाऊली नव्हे. त्यांना फक्त तुमचे उत्तम कर्म आणि इतरांशी तुम्ही कसे माणुसकीने वागता हेच पहायचे असते...
आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits...
Then you have no option...
You have to go through it...
No other options are available...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 17:08
नवीन
शनेश्वर असू देत नै तर आणखी कोणी. देव कोणाचं वाईट करणार नाही. (जर तो असेल तर)
आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे तरी आडवी येते आणि त्याचा संबंध ग्रह तारे आणि देवदेवतांशी लावल्या जातो.
बाकी, जिथे जिथे पुरुष जात असतील तिथे तिथे महिलांना येऊ द्या.
आमचा महिलांना फुल सपोर्ट आहे.
आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने हाय काय अन नाय काय ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 17:15
नवीन
मग हेच्च उलट करायला प्रतिबंध का? :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 17:17
नवीन
जिथे जिथे महिला जात असतील. (अपवाद सोडुन द्या)
तिथे तिथे पुरुषांनाही प्रवेश देण्यात यावा. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 01/29/2016 - 09:22
नवीन
हे वाक्य फारच आवडल्या गेले आहे. क्या बात है !
बाकी धाग्याच्या विषयावर आमचे काहीही मत नाही . जो जे वांछील तो ते लाहो !!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 01/28/2016 - 15:52
नवीन
घरातल्या कडक लक्ष्मीने शनी सारख्या कडक देवतेची उपासना करून त्याला प्रसन्न केले तर बिचार्या नवर्यांचे काय हाल होतील. बहुतेक या साठीच महिलांना मज्जाव केला असेल.
बाकी घरातल्या कडक लक्ष्मीला घाबरून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हि समर्थन केल्याचे ऐकले आहे.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/28/2016 - 15:53
नवीन
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत.... >> उका, ह्ये वागनं बरं नव्हं!
सगळ्यात वरच्या फांदीवर बसून बघत आहे! पॉपकॉर्नचा बुधला आहेच.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/28/2016 - 16:07
नवीन
मी पण, मी पण!
सगळेच जण पॉपकॉर्न शोधताहेत. आखाड्यात कोण उतरेना!
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:12
नवीन
ओ पैतै...
आम्ही केवढी मोठ्ठी उडी मारलेय की आखाड्यात...
त्यावर कुणीच काय बोलेना...
:(
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 15:59
नवीन
उगा, ही चर्चा आधीच एका धाग्यावर झाल्याचे स्मरते. त्यामुळे धागा आला नसेल. तरी नव्या घडामोडींसकट नव्या चर्चा घडायला पुर्ण वाव आहे. शनिचौथर्यावर प्रवेशासाठी महिला सक्षमीकरणवाल्यांनी मोर्चा, आंदोलन करणे म्हणजे 'बॉम्बींग फॉर पीस' असा प्रकार आहे.
असो. आम्ही पॉप्कॉर्नच्या प्रतिक्षेत आहोत. लार्ज टब यायला वेळ लागेल बहुतेक!
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:02
नवीन
डांगे अण्णा असा नाय करुचा...
तुमचा मत मांडूकच होई...
आमकापण वाचुचा असा तुमचा मत...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 16:13
नवीन
पुरुषांनाही चौथा-यावर जाऊन दर्शन घेता येत नै आता. लांबूनच पूजा-यांच्या हातात तेल द्यावं लागतं आणि दुरुनच दर्शन घ्यावं लागतं. मी खुप वर्षापूर्वी ट्रिप घेऊन गेलो होतो तेव्हा सर्रास चौथा-यावर जाऊन शनेश्वराचं दर्शन घेता येत होतं. एकदा पुरुषांना चौथा-यावर जाऊ द्या मग महिलांना दर्शनाला घेऊन जाऊ. (वाक्यात घोळ होतोय काहीतरी) शनीचा त्रास महिलांना जास्त होतो विशेषत: असो, असे म्हणतात. माझा काही शनीवर विश्वास नाही. पण मी रिस्क घेत नै. ;)
गुलशनकुमार आणि अनुराधा पौड़वाल यांनी शिंगनापुरच्या या शनेश्वराचं महत्व वाढवलं. नसता तिथे अजिबात गर्दी नसायची.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:19
नवीन
बिरुटे सर, शनीमाऊलीचा त्रास स्त्रियांना जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे...
कुठल्याच हिंदु धर्मशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये...
शनीमाऊली फक्त व्यक्तीने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला इक्व्हीव्हॅलंट पीडा करून ते कर्म नलीफाय करतात...
शनीमाऊली कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपले वाईट कर्म शून्य करणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा देणारा तोच...
अगदी छप्पर फाडके देतात...
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 16:33
नवीन
युनिक फिचरचा लेख क्रमांक १, लेख क्रमांक २
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 16:18
नवीन
उगाजी या धाग्यावर हा विषय आधी हाताळला गेला आहे. नवीन धाग्यातून मागच्या/नव्या पानावरून पुढे जाण्यास आमची ना नाही.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
गुरुवार, 01/28/2016 - 16:26
नवीन
मी मिसला होता तो धागा . खफवर बोललो होतो अगोदर याविषयी . जौद्या होउद्या डेडीकेटेड धाग्यावर चर्चा त्या धाग्यात अजून बरेच मुद्दे होतेना.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 01/28/2016 - 16:28
नवीन
चेपु वर खालील माहिती बघण्यात आली...
अभिजीत साधले नामक एक आर्किटेक्ट या देवळाच्या नुतनीकरणाच्या कामात आहे. त्यांनी दिलेली ही माहीती आहे. त्यापेक्षा जर काही वेगळी (उलट) माहिती इतरांना असेल तर ती अवश्य सांगावीत...

- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:38
नवीन
विकास सर...
प्लीज स्वलिखित माहिती द्यावी. विषय खूप काॅम्प्लिकेटेड आहे. यात काही लक्षात येईना...
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 01/28/2016 - 17:09
नवीन
"जे नाही ते आहे, असे वाटणे म्हणजे माया" :) घटनेतले वास्तव वेगळे आहे का काय असे मी जे वर फोटो चिकटवलेत त्यावरून वाटते. कारण त्यात त्या देवळाच्या आर्कीटेक्टने दिलेल्या जाहीर माहितीनुसार अशी काही बंदी आता अस्तित्वातच नाही. मग या कोण ज्या बायका निदर्शने करत आहेत, त्या कशासाठी? हे कळत नाही.
त्याच बरोबर, जर अजून मंदीर ट्रस्टने हेच जाहीरपणे सांगितले नसेल तसेच मुख्यमंत्री पण "कालानुसार प्रथा बदलायला हव्यात" अशा पद्धतीचे या संदर्भात विधान करत असतील तर त्याचे कारण काय? का ते देखील नुसत्याच पेपरातल्या बातम्या बघून ठरवत आहेत, हे समजत नाही...
कुठल्याही प्रार्थना स्थळात सगळ्यांना प्रवेश असावा असे माझे मत आहे. हळू हळू तसे होत आहे पण हळू हळूच... याचे एक चांगले उदाहरण म्हणजे तिरूपती संस्थान आता दलीतांना पुजाअर्चा करण्याचे (पुजारी होण्याचे) शिक्षण देऊन त्यांना देखील सामावून घेत आहे.
त्या उलट एक ऐकीव गोष्टः एक कुटूंब आपल्या लहान मुलीला घेऊन कुळाचारानुसार कोल्हापूरच्या आंबाबाईच्या पुजेसाठी घेऊन गेले. पण पुजार्यांनी मुलगी असल्याने तिच्या हातून का तिच्यासाठी म्हणून पुजा करण्यास (प्रथेनुसार) नकार दिला. हे आजच्या काळात देखील होत आहे...
कधी काळी तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधींना पुरीच्या देवळात देवदर्शनाला जायचे होते. पण देवस्थानाने त्यांना प्रवेश नाकारला. कारण त्यांनी पारशी माणसाशी विवाह केला होता म्हणून! त्यांना तो शेवटपर्यंत मिळाला नाही.
पण हे केवळ हिंदूंच्या विशिष्ठ देवस्थांपुरतेच मर्यादीत नाही. हजीअली संदर्भात गडबड चालू केली आहेच. मक्का-मदीनेस केवळ मुस्लीमच जाऊ शकतात. ख्रिश्चन लोकांच्या मॉर्मन पंथातील चर्चमधे केवळ मॉर्मनच जाऊ शकतात. (मला वाटते अगदी कोणी मॉर्मन झाले तरी तात्काळ सगळ्या चर्च/देवळात जाता येत नाही. परवानगी लागते आणि खात्री केल्यावरच मिळते).
हे झाले देवळांचे... आता किंचीत वेगळे, ते म्हणजे मुंबईतल्या कुठल्यातरी आलिशान क्लब/हॉटेलमधे एकदा एम एफ हुसैन अनवाणी गेले होते. (वेष पण अर्थातच नेहमीसारखा साधाच असेल) तर त्यांना देखील परवानगी दिली नव्हती. परत पाठवले होते. असे अनेक ठिकाणी नियम असतात जेथे अमुक कपडे घातलेले नसले तर चालत नाही वगैरे...
त्यामुळे हे आक्षेपार्ह असले तरी कळपसंस्कृतीचा भाग आहे. केवळ एका अथवा सर्व धर्मालाच जबाबदार ठरवून संपणार नाही. असो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 01/28/2016 - 18:24
नवीन
विकास,
खाजवून खरूज काढणे ते हेच. हे कम्युनिस्टांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. लोकं गुण्यागोविंद्याने नांदलेली त्यांना बघवत नाहीत. कुठूनतरी कसलंतरी खुसपट काढून भांडणं लावल्याखेरीज त्यांना चैन पडंत नाही. तस्मात भूमाता ब्रिगेडीस शनीच्या चौथऱ्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. (पोलिसांनी तसा तो केलेला आहेच). तसेच तृप्ती देसाई यांच्याकडे दुर्लक्ष करणे हितावह आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 18:26
नवीन
सहमत...
समाजातील ईतर महत्वाच्या प्रश्नांचा विसर पडून या भुक्कडांना फक्त असल्याच गोष्टी महत्वाच्या वाटतात...
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 16:43
नवीन
युनिक फिचर लेख
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 01/28/2016 - 17:10
नवीन
Page not found :)
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 17:43
नवीन
http://uniquefeatures.in/blogs/सुहास-कुलकर्णी/वक्रदृष्टी
- Log in or register to post comments
र
राँर्बट
गुरुवार, 01/28/2016 - 16:28
नवीन
काही मूलभूत भाबडे प्रश्न,
मशिदीत स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून भूमाता ब्रिगेड कधी आंदोलन करणार आहे?
आजवर एकही स्त्री पोप झालेली नाही. भूमाता ब्रिगेड याबद्दल काय करत आहे?
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/28/2016 - 16:35
नवीन
आज हाजीअलीला महिलांना प्रवेश मिळावा यासाठी निदर्शने, आंदोलन झाले. बातम्या येत आहेत. कोण करत आहेत माहीत नाही.
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 01/28/2016 - 16:42
नवीन
पैसा जी
तुम्ही सांगा फक्त तुमच्या साठी काय आणु ?
आले लिंबु मिश्रीत नगरी उसाचा ताजा घुंगुरवाळा रस ?
की मलई वाली लबाबदार लस्सी ?
की मग गुणकारी नैसर्गिक निशापुर्व निरा
की गार गार लिंबु शरबत ?
नैत ते पाश्चात्य च हव असेल तर अंगठाअप पण आणतो
पण तुम्ही अस स्फोटक संदर्भ वगैरे नका देऊ बर
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 16:59
नवीन
पुण्यात नेउन पुणेकराच्या पैशांनी चहा पाजा =))
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/28/2016 - 17:02
नवीन
पुण्याचा चहा लईच फ्येमस झालाय!
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 01/28/2016 - 17:12
नवीन
मला बनवता येतो साहेब चहा उत्तम
दार्जीलीग ची माकाइबारी चाय पत्ती आहे माझ्या कडे
त्यासाठी पुण्यात का जायला हव ?
अमृततुल्य नव्हे अमृत चा च आग्रह आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/28/2016 - 17:44
नवीन
ठांक्यू ठांक्यू!!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 01/28/2016 - 16:39
नवीन
हे भाबडे प्रश्न घेऊन वेगळा धागा काढा. दोन मुद्दे मिसळू नका.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »