शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
💬 प्रतिसाद
(222)
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 16:41
नवीन
हि बातमी वाचलीत का ?
- Log in or register to post comments
म
माहितगार
गुरुवार, 01/28/2016 - 17:56
नवीन
@रॉबर्टराव हा लेखपण तुमच्या मताची दखल घेत असावा
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 17:40
नवीन
अजुन एक सुपर मुलभूत प्रश्नः शनिच्या चौथर्यावर कुणाला जायचंय ?
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/28/2016 - 17:56
नवीन
कशासाठी, हे पण अॅडवा.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 17:57
नवीन
होय होय.. सो हे प्रश्न :
इथे जायचंय कुणाला शनिच्या चौथर्यावर ? कशाला जातात म्हणे आणि ? ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:17
नवीन
- Log in or register to post comments
अ
अन्नू
Fri, 01/29/2016 - 06:11
नवीन
कशा दिल्या?
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Mon, 02/01/2016 - 10:02
नवीन
हे वाचा
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/shani-is-not-god-says-shankaracharya-swaroopananda/articleshow/50756872.cms
- Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे
Mon, 02/01/2016 - 10:03
नवीन
प्रतिसाद स्रुजा यांना
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 20:20
नवीन
वाचला लेख. आता ही बातमीदाराची चूक आहे की शंकराचार्यांचं निवेदन च असं आहे कोण जाणे पण धर्माचा अधिकार वेगळा अस्तो आणि तो परंपरा आणि मान्यतांवर चालतो हे म्हणताना , त्या मान्यता बदलायची वेळ आलीये हे त्यांनी मान्य करु नये किंवा अॅक्नॉलेज करु नये ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:24
नवीन
स्रुजातै, त्यांनी शनीची पुजाच करु नये ही 'नवी मान्यता'च सांगितली आहे ना?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 20:32
नवीन
अहो पण कंडिशनल मान्यता आहे ती. अशा अनेक मान्यता आहेत आपल्या धर्मात. पण सरसकट धार्मिक अधिकार हे मान्यतेने येतात हे विधान आहे त्यांचं. वडिलांना अग्नी द्यायची मान्यता मुलाला नाही तर जावयाला. मुंज मुलाची होते. अशा अनेक मान्यता आहेत च की. त्या सगळ्याच या "ब्लँकेट स्टेटमेंट " मध्ये आल्या च ना.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 20:49
नवीन
एक स्टॅण्ड अलोन स्टेटमेंट जनरलाइज पद्धतीने पाहिलं तर फुल्ली चूक आहे. धार्मिक मान्यता आहे च्या नावाखाली घटनादत्त अधिकारही संपुष्टात येऊ शकतील. म्हणजे हे शरीया टैप व्हायचं. बाकी पाळायचे कंपल्शन असलेल्या रितीत बळजबरी किंवा भेदभाव नकोच हे मी आधीच सांगितलंय ह्या धाग्यावर. म्हणजे मुंज करायची जबरदस्ती नको वा न करायचीही. हल्ली अग्नी देण्याची मान्यताही बदलत आहे. काही महिन्यांआधीच नाशिकच्या स्मशानभूमीत (मी स्वतः तिथे हजर होतो) एका कन्येने आपल्या पित्याला अग्नि दिला आणि जमलेले सर्व ते जणू काही वेगळं घडतंच नाही अशा पद्धतीने वागत होते. ये शादी नही हो सकती च्या धर्तीवर ये अग्नी नही दे सकती असा कोणी विरोध केला नाही. म्हणजे काही प्रथा आहेत ज्या बदलायच्या म्हटल्या तर चटकन बदलू शकतात. बरेच लोक 'लोक काय म्हणतील' ह्या रोगाने ग्रस्त असतात अन् कुणीच काही करत नाही. सगळ्याना वाटते प्रथा बदलावी कोणीच बदलत नाही.
एक रामबाण उपायः जी प्रथा, परंपरा, मान्यता, रुढी पाळण्यावाचून गत्यंतर नसते तीला बदलल्यावाचून ठेवू नये.
बाकी शनीचौथर्याबद्दल आपले मत क्लिअर आहे. तिकडे स्त्रियांनीच का पुरुषांनी सुद्धा जाऊ नये.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 20:58
नवीन
अहो आपल्याला (तुम्हा-आम्हाला) काय वाटतं हा मुद्दा नाहीये. शंकराचार्य हे खुप मोठं धर्मपीठ आहे. त्यांनी विधान करताना मान्यता या एकुणात अधिकृतरित्या बदलायला हव्यात हा सूर ठेवलेला नाही. ही मान्यता मुळात चुकीची आहे आणि बाकी धार्मिक अधिकार हे मान्यता आणि परंपरेने चालत आलेले असतात असा कुठेतरी "आहे ते, सकारण!" असा अध्याहृत सूर वाटला.
आणि एक, विधान आहे , सरसकटीकरण नको हे अगदी मान्य म्हणुनच सुरुवातीला मी म्हणलं की हा बातमीदाराने काढलेला अर्थ आहे की खरोखर त्यांचं विधान हे माहिती नाही. त्यांचं विधान असेल असं जर गृहित धरलं तर पुरेसं नाही, एवढंच.
हिंदु धर्म तसा ही बराच पुढारलेला आहे आणि इतर धर्मांसारखे प्रत्येकाची वैयक्तिक मान्यता ( आस्तिक, नास्तिक, कर्मकांडं मानणं न मा न णं रविवारी देवळात जाणं किंवा कोणत्या देवळात जाणं, वगैरे) काही ही असोत तो माणुस हिंदु असु शकतो. तुम्ही म्हणाता तशा घटना मी देखील पाहिल्या आहेत पण काही कट्टर लोकं याच धर्मपीठांचा किंवा चालत आलेल्या परंपरांचा आधार घेऊन हे कसं चूकीचं आहे असा नवीन बखेडा उभा करु शकतात. कालानुरुप अनेक गोष्टी बदलल्या आहेत पण अधिकृतरित्या केल्या गेलेल्या विधानांचं वजन वेगळं असतं , इतकंच.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 22:31
नवीन
शंकराचार्यांना अधिकृत वैगरे काही किंमत नाही हिंदू धर्माचरणात, ते उगाच आजकाल टीवी-पत्रकारांचा बुळबुळाट झाला म्हणून नाहीतर शंकराचार्य हे इतिहासाच्या पुस्तकात असतात एवढाच समज होता माझातरी. चार सामान्य लोकांना शंकराचार्य कोण किंवा हा शंकराचार्य कोणत्या पिठाचा ते सांगता यायचं नाही. ते पीठ म्हणजे गव्हाचं का बाजरीचं विचारतील. ;-) मुळात हे शंकराचार्य सर्वसामान्य हिंदू धर्माचे कोणी लागत नाहीत. त्यांचा संसारच वेगळा, सामान्य हिंदूंशी त्यांचा संबंध नाही. ते आखाडे, मठ वैगरे योगी-साधु-सन्याशांचे-अध्यात्मिकांचे हे धर्मगुरु, त्यांनी सांगितलेले नियम तिकडे पाळतात, ते नियम पाळण्याची पात्रता अंगी येण्यास खास संस्कार-विधि असतात. सामान्य संसारी हिंदूंचा ह्यांच्या मतांशी काही संबंध नाही. आपले संसारी हिंदू कृपाकटाक्षासाठी ह्यांचे पाय धरतात तेवढाच काय तो संबंध. सामान्य हिंदूंनी काय करावे करू नये हे सांगण्याचा कोणताही शास्त्रिय अधिकार ह्या शंकराचार्यांना नाही. हिंदूंनीही त्यांची मते घराबाहेरच ठेवावी. याचे उदाहरण म्हणुन तुम्हाला लक्षात येईल की काही साध्वि, महंत इत्यादी टिनपाटांची काही वक्तव्ये प्रचलित हिंदू मान्यतांपेक्षा वेगळी असतात, कारण हे नॉर्मल समाजात कधी नसतातच. त्यांच्या कोंडाळ्यात सदैव राजकारण राजकारण खेळत असतात. त्यांची सत्ता मठ व त्याच्याशी संलग्नित आखाडे यांच्यापुरतीच. हिंदूंच्या घर-संसारात, चाली-रीतीत, कर्मकांडांत काही लुडबुड करण्याचा, उपदेश करण्याचा लिगल, मॉरल, नॅचरल, रिलीजियस कुठलाच हक्क नाही. कुणाला काही गैरसमज असतील तर कृपया आजच दूर करावे.
मुद्दा असा आहे की चाली-रीती, मान्यता ह्या काही धर्मगुरु ठरवत नाहीत हिंदूंमधे, ज्याला जसं वाटतं तसे वागतात, वागणार्यांची मेजॉरिटी वाढली की त्याचे नियम, मान्यता होतात. तो मोडणार्यांची मेजॉरिटी झाली की परत नियम बदलतात. हिंदूधर्माचं हेच खुप सॉल्लिड आवडतं मला. फक्त तेवढ्यासाठी अभिमान आहे. बाकी कट्टर लोकांना काय, जंगल पेटवायला काहीही पुरतं, लोक तसे सुज्ञ आहेत. पण आता अशा अडगळीतल्या धर्माचार्यांना पुढे आणून मुल्लामौलवी, पोप-बिपच्या जागी बसवण्याचे प्रकार होत असतील तर कठिण आहे. एक ते मक्का मदिना स्टाईल राममंदिर करायचं चाल्लंय उगाच. त्यात आणि हे. कहर आहे.
आधीच खूप गोंधळ आहे भारतात, त्यात ह्या मिडीयावाल्यांनी 'भगवे कपडे घातलेला कोणी दिसला की उकळ काहीतरी त्याच्याकडून वादग्रस्त', असा स्वतःच्याच घराला आग लावण्याचा प्रकार चालवला आहे. शनि चौथर्याप्रकरणी फक्त शनि-भाविकांचे मत विचारात घेतले जावे. असल्या असंबंधित लोकांना महत्त्व देऊ नये.
(कुंभमेळ्यानिमित्त ह्या आणि अशाच दुर्लक्षित विषयांवर लिहायचं होतं पण वेळ मिळू शकला नाही. बघुया कधी जमतंय ते, फार खोदकाम करायला लागतं.)
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Tue, 02/02/2016 - 22:42
नवीन
हे पहा, आपण त्यांना महत्त्व देण्याचा न देण्याचा मुद्दा नाहीये. आपली मतं पेपर मध्ये येतात का छापून? ज्यांची येतात त्यांनी हा विचार करुन मत व्यक्त करावं .
बाकी सूज्ञ कशाला महत्व द्यायचं ते त्यांचं ते ठरवतात. पण म्हणुन शंकराचार्यांसारखं कुणी विधानं करताना त्यांच्यावर असलेलं (विधानकर्त्यावर) त्याचं उत्तरदायित्व टळतं असं नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 02/02/2016 - 23:05
नवीन
स्रुजाताई, माझे प्रतिसाद तुम्हाला व्यक्तिगत उद्देशून नाहीत, गैरसमज नसावा. सामान्यपणे वाचकांना ठावूक असावं म्हणून लिहलंय. पेपरात असली विधानं वाचणारे माझंही विधान वाचतील, विचार करतील, चार जागी अजून सांगतील. आपल्यालाही जे व्यासपीठ मिळालंय ते का सोडावं?
ज्यांची मतं छापून येतात त्यांनी उत्तरदायित्वाचा विचार केला असता तर आणि काय पाहिजे होतं. मुख्य म्हणजे जे छापतात त्यांच्यावर हे उत्तरदायित्व असावं असं मला वाटतं. उद्या मिडिया कोणाही माकडाला उचलून विचारवंत, अधिकारी, तज्ञ, धर्मगुरू म्हणून छापेल (जे आज नाही करत असे नाहीच म्हणा) तर त्याचं उत्तरदायित्व त्या माकडावर येईल काय? खरं उत्तरदायित्व वाट्टेल तसा प्रसार करणार्यावर व त्यातून वाट्टेल तसा अर्थ काढणार्यावर असावे असे माझे मत आहे. कुठलीही न्युजएजंसी, वृत्तपत्र, वॄत्तवाहिनी आपण प्रसारित करत असलेल्या बातम्यांची जबाबदारी घेते. त्या बातम्यांद्वारे काही अफवा, कटुता, अनिष्ट समज, धार्मिक तेढ, तणाव पसरत असतील तर ती जबाबदारी पूर्णपणे त्या संस्थेची आहे. इथे या विशिष्ट केसमधे शंकराचार्यांच्या विधानाला तसा काही अर्थ नाही पण मीडियाने छापले म्हणून ते महत्त्वाचे झाले, अन्यथा तो तिकडे आपल्या शिष्यांसोबत सत्संगमधे काही-बाही बरळला तर आपल्याला काय कळतं? किंवा मागचेच त्याचे विधान की 'साई हा देव वैगरे नाही, लोकांनी त्याची पुजा, भक्ती करु नये.' बराच वाद झाला. साईभक्तांवर कणभर फरक पडला नाही. त्यामुळे तुम्ही जे उत्तरदायित्वाचं म्हणालात तेवढं सिरियस म्याटर नाहीये.
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 01/28/2016 - 16:37
नवीन
राबर्ट क्या हुआ
ये भुमाता वाले मेरे पीछे पडे है
एक काम करो भागो
वही तो कर रहा हु लेकीन थक गया हु बॉस
एक काम करो
खो खो खेलो
कैसे ?
तुम उन्हे दुसरो के पीछे भगाओ
और खुद बैठ जाओ
खो
यु मीन प्रो कब्बडी जैसा प्रो खो खो
येस
राबर्ट येस्स
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 16:40
नवीन
ऑ??? या टुकार प्रतिसादाचा अर्थ काय???
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 01/28/2016 - 16:40
नवीन
चौथार्यावर महिलांना प्रवेश द्या अथवा न द्या माज्या बा च काय जातय! ;) गेलतर शिंगापुर वाल्याच जाई.
-इति सूर्य पुत्र सनी..;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 01/28/2016 - 16:59
नवीन
जेपीदादूस इज बॅक! नेटपॅक नवीने का?
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 01/28/2016 - 16:43
नवीन
तुमच्या गावात वेगळा शनि लावाना.त्योच कशाला पाहिजे?डोकं काय कुठंही आपटता येतं.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/28/2016 - 17:13
नवीन
काही तरी चांगला विषय घ्या राव चर्चेला.
काय मजा नै आली या विषयावर. :(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 17:48
नवीन
इंपॉसिबल सन्यासः जेपी! असा धागा काढावा काय?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 01/28/2016 - 17:53
नवीन
जेपीसायबा, हलके घेणे: हे राहिलं
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 01/28/2016 - 17:19
नवीन
महिलांना शनी चौथार्यावर प्रवेश द्यावा का ?>>
अजिबात देऊ नये ..जी परंपरा आहे त्याला चालु द्या..
नायतर " बापा परीस बाप गेला,बौबंलताना हात गेला" अशी अवस्था व्हायची शिंगापुर वाल्याची ;)
आता सत्कार होईल.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 17:23
नवीन
जेप्या काय कळ्ळं नाय रे माका मेल्या...
सपष्ट बोल की मेल्या...
मांत्रिक...
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 17:56
नवीन
धागा रंगात आला चांगलाच...
- Log in or register to post comments
अ
अजया
गुरुवार, 01/28/2016 - 18:06
नवीन
अंधश्रध्दा पाळायची असमानता दूर करण्याचे आंदोलन!
काय मिळणार हे करुन?
असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:21
नवीन
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 18:22
नवीन
याच का त्या संस्कृती बुडवणार्या मिपा बायका??? काय मेल्या अगोचर आहेत..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:24
नवीन
तुम्हीच विचारा की...झाडांवर तुम्हीच जौन बस्लायत
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 18:25
नवीन
तू अभ्यास वाढीव.. लाटकर काकांना विचारायचे असे प्रश्न..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:31
नवीन
खिक्क...नक्को...
- Log in or register to post comments
क
काळी मावशी
गुरुवार, 01/28/2016 - 18:27
नवीन
अशा बायका असतात का मिपावर ?
अशा पवित्र विषयाच्या धाग्यावर असली चेष्टा शोभते का?
तुमचा विश्वास नसेल पण आमचा आहे ना.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 18:30
नवीन
होय हो, म्हणुन तर बुडते संस्कृती.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/28/2016 - 18:32
नवीन
कोणीच वाचवली नाही?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
गुरुवार, 01/28/2016 - 18:33
नवीन
नाय गं वर पॉपकॉर्न खाता खाता संसकृती चं मेलं डोक्यात च नाही आलं बघ ..
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 01/29/2016 - 06:15
नवीन
हे सगळे मिपा पुरुष झाडाखाली उभे राहून संस्कृतीकडे लक्ष ठेवायचे काम करत असल्याने झाडावरील सदस्यांना पॉपकॉर्णकडे लक्ष ठेवणे हेच्च काम !

- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/29/2016 - 12:00
नवीन
संस्कृती कुठे आहे फोटोत? तिचं पुढे काय झालं ?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 01/29/2016 - 12:05
नवीन
ती बुडाली नाही का ? :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 01/29/2016 - 12:07
नवीन
किती तो दुत्तपणा! जखमेवर मीठ का काय ते! अगं, बुडाली ना ती?
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 01/29/2016 - 12:10
नवीन
इतके महान मिपापुरुष असताना बुडालीच कशी ती :-/
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Fri, 01/29/2016 - 12:20
नवीन
पाईंटाचे मुद्दे काढु नयेत!~ महानादेशावरुन!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 01/29/2016 - 13:05
नवीन
निदान झाडाची आयडीया तरी कॉपी नव्हती करायची :)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:33
नवीन
आणि मग काळ्या मावशीकडे चोर येतो =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:31
नवीन
तुम्ही अकुंच्या कथेतल्या ना? =))
- Log in or register to post comments
क
काळी मावशी
गुरुवार, 01/28/2016 - 18:34
नवीन
जिमो आमचे मायबाप. हे अकु कुठून काढले?
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
गुरुवार, 01/28/2016 - 18:37
नवीन
मुद्दा बरोबर गं मावशे...
टका कै पण विचारतो....
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 18:40
नवीन
खिक्क....अर्रे हो....मी मध्ये मिपावर नव्हतो ना ;)...म्हणून विसरलो =))
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »